(मार्क 7:8-9)
"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देतां व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे!"
(मार्क 7:20-23)
"आणखी तो म्हणाला, जें माणसातून बाहेर निघतें तेच माणसाला भ्रष्ट करितें. कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, दुष्टपणा, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्फ् करितात."
प्रथम मला पापाची व्याख्या सांगायला आवडेल. कांही पापांची व्याख्या देव सांगतो तर कांही पापांची व्याख्या मानवजात ठरवते. ग्रीक भाषेंत पापाचा अर्थ `नेम चुकणे` असा आहे. म्हणचेच अयोग्य ते करणे. आपण देवाच्या आज्ञा नीट पाळल्या नाहीत तर ते पाप आहे. आता आपण मानवजातीने केलेली पापाची व्याख्या काय आहे ते पाहूया.
पाप काय आहे?
देवाच्या आज्ञा न
पाळणे.
आपण आपल्या सद्सद्विवेकबुध्दीने पाप मोजतो. स्वतःचा न्याय करण्यासाठी देवाच्या आज्ञांखेरीज माणूस स्वतःचे अंतःकरण, सद्सद्विवेकबुध्दि आणि पार्श्वभूमी हे लक्षांत घेऊन पाप काय ते ठरवतो.
एखाद्याच्या मोजमापाने पाप ठरवले तर जे एकाचें पाप ते दुस¬याचें पाप होत नाही. म्हणूनच देवानें त्याच्या आज्ञांत 613 सूचना केलेल्या आहेत पुढील चित्र माणसाचें पाप यावर स्पष्पीकरण करते.
देशाचा कायदा. अंतर्गत कायदा.
माणसाची सद्सद्विवेकबुघ्दि.
देवाचीआज्ञा.
नैतिकता. सामाजिक कायदे.
म्हणूनच आपण सद्सद्विवेकबुध्दीने पापाचें मोजपाप करायला नको आहे.
देवानें केलेली पापाची व्याख्या ही कांही आपल्या सद्सद्विवेकबुध्दीनुसार नाही आहे. म्हणूनच आपल्या हालचाली स्वतःच्या मनाप्रमाणे न करता देवाच्या आज्ञेनुसार ठरवल्या पाहिजे.
पापाबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी कल्पना असते. उदाहरण म्हणजे कोरियातील लोक त्यांच्या मात्या-पित्याची कबर गवताने झाकून ठेवतात. कबरेवरील गवत वेळच्यावेळी कापून त्याची ते लोक नीट देखभाल करतात. हे काम ते मरेपर्यत कर्तव्यपूर्वक करतात. पण न्यू गिनिया येथीळ आदिवासी लोक त्यांच्या मेलेल्या पालकांचे देह वाटे करून खातात. (मला माहिती नाही की ते लोक खायच्या आधी शिजवतात की नाही!)
बायबल म्हणते की देवाच्या आज्ञा न पाळणे हे पाप आहे. "तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देतां व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहतां. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे!" (मार्क 7:8-9) आपण बाहेरून कसं दिसतो याकडे न पहातां देव आपल्या अंतःकरणाकडे पहात असतो.
स्वतःच्याच पध्दतीने चालणे हे देवासमोर पाप आहे
सर्वांत गंभीर पाप काय आहे?
देवाच्या शब्दाचा मान न ठेवणे.
देवाच्या इच्छेप्रमाणें न चालणें व त्याच्या शब्दाचा मान न ठेवणे हेच पाप आहे.
परूशी लोकांनी देवाच्या आज्ञांऐेवजी माणसांच्या संप्रदायाला जास्ती महत्त्व दिले. त्यामुळे येशू परूश्यांना ढोंगी समजत असे.
"कोणत्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता? तुम्ही खरोखरच माझा मान ठेवता कां? तुम्ही माझें नांव घेतां पण माझा आदर राखता कां?" बाह्र रूपावर जाऊन लोक देवाच्या वचनाचा मान ठेवत नाहीत तेच देवापुढे पाप आहे. तुमच्या ध्यानांत येते का? देवाच्या वचनाकडे लक्ष न देणे हे एक सर्वांत गंभीर पाप आहे.
आपले दुबळेपण म्हणजे आपल्यातील दोष, उणीवा व आपली पापं ही होत. पण देव पाप व उणीवा हे वेगवेगळे पहातो. जे लोक चूका करीत नाहीत पण देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात ते देवापुढे जास्त पापी ठरतात. म्हणूनच येशू परूश्यांवर चिडत असे.
उत्त्पत्ति पासून अनुवाद पर्यंत असलेल्या पांच पुस्तकांत आपण काय करायला हवे आणि काय करायला नको याबद्दल देवाच्या आज्ञा आहेत. त्या आज्ञा आपण 100ऽ पाळू शकत नाही. पण शेवटी या सर्व आज्ञा देवाने आपल्याला प्रारंभापासून दिलेल्या आहेत हे सत्य आपण स्वीकारायला हवे.
"प्रारंभी देवानें आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली" नंतर तो म्हणाला "प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला." त्यानें सर्व कांही निर्माण केले त्यानंतर नियम अस्तित्वांत आणले.
`शब्द देही झाला आणि त्यानें आम्हांमध्ये वस्ती केली. आणि शब्द देव होता` (योहान 1:1,14) देवाने स्वतःला कसं प्रकट केले? त्याच्या आज्ञा व वचनें यांच्या द्वारे त्यानें स्वतःला प्रकट केले. देव आत्मा आहे. आपण बायबलला काय म्हणतो? आपण त्याला देवाचा शब्द म्हणतो.
"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देतां व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता." असं म्हटलेलं आहे. देवाचे जे 613 नियम आहेत ते अमूक करू नका, तमूक करा, आईबापांचा मान राखा . . . वगैरे सांगतात. लेवीय मध्ये स्त्री पुरूषांनी कोणते नियम पाळायचे, एखादे जनावर खड्डयांत पडले तर काय करायचें याबद्दल सूचना आहेत. अशा प्रकारे एकंदर 613 नियम आहेत.
हें सर्व शब्द देवाचें आहेत. म्हणूनच आपण त्याबद्दल नेहमीच विचार करायला हवा. या सर्व देवाच्या आज्ञा आहेत हे स्वीकारून आपण त्या पाळण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे.
देवाचा एकतरी असा शब्द आहे का की तो बरोबर नाही? परूश्यांनी देवाच्या आज्ञांऐवजी संप्रदायाला जास्त महत्त्व दिले. वडीलधारी मंडळींच्या शब्दांना देवाच्या शब्दापेक्षां जास्त वजन येऊ लागले त्यावळी येशूचा जन्म झाला. अनेक लोक देवाचें शब्द ओळखू शकत नाहीत हे येशूला त्यावेळी आवडले नाही.
देवानें 613 नियम आपल्याला हे शिकवण्यासाठी दिले की तो खरा पवित्र देव आहे आणि आपण त्याच्यासमोर पापी आहोत. त्यानें आपल्यावर प्रीति करून येशूला पाठवले यासाठी की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून जगावे.
जे लोक देवाच्या शब्दांकडे लक्ष देत नाहीत ते पापी आहेत आणि त्यांचा शेवट नरकांत होईल. देवाच्या शब्दांवर विश्वास न ठेवणे हे देवासमोर पाप आहे.
देवानें आपल्याला आज्ञा कां दिल्या त्याचें कारण
असं काय कारण आहे की देवाने आपल्याला आज्ञा दिल्या? यासाठी की आपल्याला पाप म्हणजे काय हे समजावे व आपण त्याच्या सनातन बाहूंच्या आश्रयासाठी परतावे म्हणूनच. त्यानें 613 नियम असलेल्या आज्ञा आपल्याला दिल्यामुळे पापांची जाणीव होऊन येशूच्या द्वारे आपला उध्दार होऊ शकतो.
देवानें आपल्याला नियमशास्त्र
कां दिले?
पाप म्हणजे काय व त्याबद्दल कोणकोणत्या
शिक्षा आहेत हे आपल्याला
समजावे म्हणून.
रोमकरांस पत्र 3:20 यांत असं म्हटले आहे, "कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते." म्हणून आता आपल्याला समजेल की आपण त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र पाळलेच पाहिजे अशी जबरदस्ती देव आपल्यावर करीत नाही.
मग आपण ह्रा आज्ञांपासून काय शिकतो? देवाच्या आज्ञा काटेकोरपणें पाळण्यास आपण असमर्थ आहोत, म्हणूनच आपण त्याच्यासमोर पापी आहोत. जे 613 नियम आहेत त्यापासून आपल्याला काय समजते? आपल्याला आपल्यातील उणीवांची, आज्ञा काटेकोरपणे पाळण्याच्या असमर्थतची व आपल्या नपुसंक अस्तित्वाची जाणीव होते. आपल्याला हे पण समजते की देवापुढे आपण पापी आहोत व आपण नरकांत जाण्याच्याच लायकीचे आहोत.
जेव्हां आपल्याला आपल्यांतील पापांची जाणीव होते तेव्हां आपण काय करतो? आपण पूर्ण बनायचा प्रयत्न करतो का? नाही. आपल्याला फक्त एवढंच करायचे आहे. म्हणजे येशूवर विश्वास ठेवायचा, त्याच्याकडे आपल्या पापांची कबूली द्यायची व नंतर पाणी व आत्मा याच्या द्वारे तारण मिळवून येशूचे आभार मानायचे.
देवानें आपल्याला आज्ञा यासाठी दिल्या की आपल्याला पापं व त्याबद्दल कोणत्या शिक्षा आहेत ते समजावे. आणि येशूशिवाय आपली नरकातून सुटका होऊच शकत नाही. येशू हा आपला तारणकर्ता आहे असा विश्वास ठेवला तरच आपला उध्दार होईल. आपल्याला वाचवण्यासाठीच देवानें आज्ञा दिल्या.
आपण किती पापी आहोत हे समजून आपल्या आत्म्यांची पापां पासून सुटका व्हावी म्हणूनच देवानें आज्ञा दिल्या. आपल्याला वाचवण्यासाठी त्यानें येशूला पाठवले. त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आपली सर्व पापं घेतली जावी म्हणूनच देवानें स्वतःच्या मुलाला पाठवले. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्याने वाचतो.
कोणतीहि आशा उरलेली नाही अशा प्रकारचे आपण पापी आहोत हे समजून घेऊन आपण येशूवर विश्वास ठेवला तरच आपण पापमुक्त होऊ शकू आणि देवाची मुले बनून त्याच्या गौरवांत येऊ शकतो.
आपण देवाचा शब्द समजून घ्यायला पाहिजे. त्यानेच सर्व कांही निर्माण केले. देवाच्या वचनामुळेच आपले तारण होते हे सत्य आपण समजून घ्यायला हवे. त्याच्या शब्दानुसार आपण आपला विचार व न्यायक्षमता ठेवली पाहिजे. हाच खरा विश्वास आहे.
माणसाच्या ह्मदयांत काय आहे?
वि·श्वासाचा आरंभ देवाच्या शब्दापासून व्हायला हवा. आपण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. जर नाही ठेवला तर आपण चुका करतो. आणि तो मग खोटा व चुकीचा विश्वास ठरतो.
जर परूशी आणि शास्त्री यांनी देवाचा शब्द नीट वाचला असता तर येशूच्या शिष्यांना न धुतलेल्या हातांनीं भाकरी खाताना पाहिले तेव्हां त्यांनी त्यांच्यावर टिका केलीच नसती. बायबल असं सांगते की जे बाहेरून माणसाच्या आंत जाते ते त्याला भ्रष्ट करीत नाही. कारण ते त्याच्या ह्मदयांत न जाता पोटात जाते व तेथून ते बाहेर जाते.
मार्क 7:20-23 मध्ये म्हटले आहे,- "आणखी तो म्हणाला, जें माणसांतून बाहेर निघतें तेंच माणसाला भ्रष्ट करितें. कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मै, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्रा सर्व वाईट गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात."
याचा अर्थ काय आहे हे तुम्हांला समजते कां? आपण सर्व आदामाच्या घराण्यांतील आहोत. आपल्याला खर काय ते दिसत नाही. कारण आपण देवाचा शब्द स्वीकारत नाही आणि त्यावर विश्वास ठेवत नाही. माणसाच्या ह्मदयांत काय आहे?
मार्क 7:21-22 मध्ये आपण पाहू. "कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा." हे सर्व मानवी ह्मदयांतून बाहेर निघून त्याला किंवा तिला आणि इतरांना भ्रष्ट करितें.
स्तोत्रसंहीतेंत म्हटले आहे, "आकाश जे तुझें अंगुलिकार्य, व त्यांत तू नेमलेले चंद्र व तारे ह्रांच्याकडे पाहावें तर - मनुष्य तो काय कीं तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावें?" (स्तोत्रसंहिता 8:3-4)
देवानें आपल्याला कां दर्शन दिले? यासाठी की त्यानेच आपल्याला निर्माण केले, आपल्यावर प्रेम केले आणि आपल्यावर दया करून पापमुक्त केले व स्वतःचे लोक असं बनवले. देव स्वतःच आपला तारणकर्ता होणार आहे असं जेव्हां दाविद राजाला समजले तेव्हां तो जुन्या करारातील गाण्यांत म्हणाला, "हे परमे·श्वरा, आमच्या परमे·श्वरा, पृथ्वीवर व स्वर्गांत तुझें नाम महान आहे!"
नव्या करारांत पौलाने सुध्दां असंच म्हटले आहे. निर्माणकत्र्या देवाची आपण मुलं बनू शकतो ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. कारूण्यमय देवाच्या प्रितीमुळे हे शक्य होत आहे.
देवाच्या आज्ञा पूर्णपणें पाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे देवाला आव्हान देण्यासारखेच आहे अशा प्रकारचे वागणे हे एक प्रकारे आपल्या अज्ञानांतूनच येते. देवाच्या प्रेमाच्या कक्षेपलिकडे जाऊन आज्ञा पाळणे, प्रार्थना करणे अशी धडपड किंवा निष्कारण कष्ट करणे बरोबर नाही. देवाच्या ज्या आज्ञा आहेत त्याच्यावरूनच आपण किती पापी आहोत हे आपल्याला समजल्यानंतर आपण पाणी व आत्मा या तारणाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवावा हीच देवाची इच्छा आहे.
मार्क 7:20-23 मध्ये देवाचे वचन म्हणते, "जें माणसांतून बाहेर निघतें तेच माणसाला भ्रष्ट करितें. कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्रा सर्व वाईट गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात."
येशूनें म्हटले, जे माणसाच्या आंतून बाहेर निघते, म्हणजे त्याच्या आतमधील पापं, तीच त्याला भ्रष्ट करितात. देव आपल्याला जे अन्न देतो ते कांही आपल्याला भ्रष्ट करित नाही. निर्माण केलेले सर्व कांही योग्य आहे, स्वच्छ आहे. माणसांतून बाहेर निघणारे जे पाप आहे तेच त्याला भ्रष्ट करते आपण सर्व आदामाचें वंशज आहोत. मग आपण कसं जन्मलो? आपण डझनभर पापांमध्ये जन्मलो आहोत. हे खर आहे की नाही?
तर मग आपण पापाशिवाय राहू शकतो कां? आपण पापांत जन्म घेतलेला असल्यामुळे आपण पाप करीतच रहाणार. केवळ आपल्याला देवाच्या आज्ञा माहित आहेत म्हणून काय आपण पाप करण्याचें सोडून देऊ का? आपण देवाच्या आज्ञेनुसार राहू शकतो का? नाही.
जितकं आपण जास्त प्रयत्न करतो तितकेच आपल्याला कठीण होऊन जाते. आपली मर्यादा समजली की आपण आशाही सोडून देतो. त्यावेळीच नम्र मनाने आपण येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त याचा स्वीकार करू शकतो.
देवासमोर आपण काय
करायला हवे?
आपल्या पातकांची कबूली देऊन आपण
देवाकडे तारण मागायला पाहिजे.
देवाच्या नियमशात्रामध्ये सर्व 613 नियम अगदी योग्य आहेत. पण माणसं त्यांच्या मातांच्या गर्भाशयांत गर्भधारणेपासूनच पापी असतात. जेव्हां आपल्याला समजते की देवाच्या आज्ञा चांगल्या आहेत पण आपण पापांत जन्म घेतल्यामुळे स्वतःहून आपण धार्मिक, नीतिमान बनूच शकत नाही. तेव्हां मग आपल्या लक्षांत येते की स्वतःला वाचवण्यासाठी देवाच्या दयेची आपल्याला जरूर आहे. आणि स्वतःच्या उध्दारासाठीं येशूचा पाण्याचा बाप्तिस्मा, त्याचें रक्त व पवित्र आत्मा याचीही फार मोठी गरज आहे. जेव्हां आपल्याला समजते की आपण असमर्थ आहोत, मर्यादित आहोत आणि आपण आपल्याच सत्कार्यांनी नीतिमान ठरू शकत नाही. उलट आपल्या पापांपायी एक दिवस आपण नरकांतच जाणार आहोत तेव्हां उध्दारकत्र्या येशूवर अवलंबून रहाण्याखेरीज आपल्याला कांही पर्याय उरत नाही.
म्हणूनच ह्रा प्रकाराने आपली मुक्तता होऊ शकते. आपण समजून घ्यायला हवे की देवासमोर आपण स्वतःहून स्वतःला चांगले किंवा नीतिमान ठरवू शकत नाही. आपण जे सर्वजण नरकांत जायच्या लायकीचे आहोत त्या आपण सर्वांनी देवासमोर पापांची कबूली देऊन दयेची याचना करीत प्रार्थना करायला हवी, "हे देवा, कृपा करून तूं मला पापांपासून सोडव आणि माझ्यावर दया कर."
दाविदानें देवापुढे अशी प्रार्थना केली. "म्हणून तू बोलशील, तेव्हां न्यायी ठरशील, व निवाडा करिशील तेव्हां निस्पृह ठरशील." (स्तोत्रसंहिता 51:4)
दाविदाला माहित होते की तो म्हणजे जसा कांही एखाद्या पापाच्या गोळ्याप्रमाणे आहे आणि तो गोळा इतका वाईट आहे की तो नरकांत टाकून देण्याच्या लायकीचाच आहे. म्हणूनच तो देवाला म्हणाला, "जर तू मला पापी म्हणत असशील तर मी पापी आहे. जर तू मला नीतिमान म्हणत असशील तर मी नीतिमान आहे. जर तू मला वाचवलेस तर मी वाचेन, आणि जर तू मला नरकांत पाठवलेस तर माझा शेवट नरकांत होईल." हा खरा विश्वास आहे. असा विश्वास ठेवण्यानें येशूच्या द्वारे आपण वाचूं शकतो, आपले तारण होऊ शकते.
आपल्यांत कोणकोणती पापं आहेत हे आपण माहित करून घ्यायला हवं आहे
आपण सर्वजण आदामाचें वंशज असल्यामुळे आपल्या ह्मदयांत अभिलाषा आहे. तरी पण देव काय म्हणतो? देव आपल्याला सांगतो की व्यभिचार करू नको. आपल्या ह्मदयांत खून आहे, पण देव आपल्याला काय सांगतो? तो सांगतो की खून करू नको. आपण सर्वजण आपल्या आईवडलांचा मान ठेवत नाही, आणि देव आपल्याला सांगतो की आईवडलांचा तुम्ही मान राखा. आपण समजून घ्यायला हवं आहे की देवाची वचने चांगल्यासाठीच आहेत पण आपल्यांच मनांत पाप असते.
हे खरं आहे की नाही? मग आपण देवासमोर काय करायला हवे? आपल्या अंतःकरणांत पापांची घाण जमलेली असल्यामुळे आपण आशाहीन पापी आहोत हे कबूल करायला हवे. काल आपण खूप सत्कार्ये केली म्हणून नीतिमान होतो तर आज वाईट कामं केल्यामुळे आपण पापी ठरतो असा विचार करणें चुकीचे आहे. आपण पापांत जन्मलो आणि आपण कांहीही जरी केले तरी पापीच ठरतो. म्हणूनच येशूच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे तारण होण्याची आपल्याला गरज आहे.
व्यभिचार, खून, चोरी यासारखी कामं करण्यामुळे कांही आपण पापी बनत नाही. डझनावारी पापांमध्ये आपण जन्म घेतलेला असल्यामुळे देवाच्या नजरेतून आपण पापी ठरतो. आपण स्वतःहून चांगले बनण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी आपण चांगले बनू शकत नाही. फक्त आपण चांगले आहोत असा देखावा मात्र करू शकतो.
आपण सर्वजण खून, चोरी सारख्या पापांनी खचून भरलेल्या मनांनी जन्मलो आहोत. प्रत्यक्षांत अशा प्रकारची पापं न करतासुध्दां आपण कसे काय नीतिमान होऊ शकतो? आपल्याच मेहनतीने आपण देवासमोर नीतिमान होऊच शकत नाही. आणि जर आपण स्वतःला फार नीतिमान समजत असलो तर तो ढोंगीपणा आहे. येशू शास्त्री व परूशी यांना ढोंगी म्हणाला होता. मानवजात पापांतच जन्मली आहे. ही मानवजात देवासमोर आयुष्यभर पापच करीत रहाणार आहे.
जो कोणी इतरांना सांगतो की त्यानें त्याच्या सबंध आयुष्यांत कोणाबरोबरही भांडण केले नाही किंवा कोणाचीहि सुई चोरली नाही तो खोटच बोलतो कारण माणूस जन्मतःच पापी आहे. तो खोट बोलणारा, ढोंगी व पापी आहे. देव अशा प्रकाराने मानवाकडे पहातो.
तुम्ही जन्मतः पापी आहांत. जरी तुम्ही कोणतेहि पाप केले नाही तरी तुम्ही नरकांत जाणार आहांत. जरी तुम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या तरी तुम्ही पापीच ठरता व तुम्ही नरकांत जाण्याच्याच लायकीचे ठरतात.
अशा परिस्थितींत आपण काय करायला हवे? आपल्या पापमुक्तीसाठी देवापुढे दयेची याचना करून त्याच्यावर आपण अवलंबून रहायला हवे. जर त्यानें आपल्याला वाचवले नाही तर आपण नरकांत जाऊ. तेंच आपलं नशिब आहे.
जे देवाचें वचन स्वीकारतात, ते कबूल करतात की ते पापी आहेत. देवाचे वचन स्वीकारल्यामुळे जरी ते पापी असले तरी ते देवापुढे नीतिमान ठरतात. देवाच्या वचनामुळे, शब्दांमुळें ज्यांचा नव्याने जन्म होतो आणि देवाची कृपा त्यांच्यावर येते ते खरोखरच धन्य आहेत.
जे लोक स्वतःच्या प्रयत्नांनी मुक्ती किंवा तारण मिळवू पहातात ते पापी आहेत
येशूवर विश्वास ठेवल्यानंतर सुध्दा जे
पापी आहेत ते कोण?
जे स्वकर्मांनीं तारण मिळवू
पहातात ते.
आता आपण गलतीकरांस पत्र 3:10 आणि 11 यांत काय लिहिले आहे ते पाहूया. "कारण नियमशास्त्रांतील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत ; कारण शास्त्रांत असें लिहिलें आहे कीं, `नियमशास्त्राच्या पुस्तकांत जें लिहिलेलें आहे तें सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. `नियमशास्त्राच्या योगें देवापुढें कोणी नीतिमान ठरविण्यांत येत नाहीं हें उघड आहे; कारण नीतिमान वि·श्वासाने जगेल."
असं लिहिलेलं आहे, `नियमशास्त्राच्या पुस्तकांत जें लिहिलेलें आहे तें सर्व आचरण्यास जो कोणी फ्किून राहत नाहीं तो शापित आहें.` जे येशूवर विश्वास ठेवतात पण स्वतःच्या कृत्यांनी नीतिमान व्हायला पहातात ते शापित आहेत. असे लोक देवाच्या शापांत येतात.
तर मग देवाने आपल्याला हे नियमशास्त्र आणि आज्ञा कां दिल्या? आपण पापी आहोत हे समजावे म्हणूनच. (रोमकरांस पत्र 3:20) आणि आपल्याला समजायला की आपण पूर्णतः पापी आहोत व नरकांत जाणे हीच आपली लायकी आहे.
म्हणूनच तुम्ही आता देवाचा पुत्र येशू याच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवून पाण्याने व आत्म्याने जन्मायला हवं आहे. तेव्हांच तुमची पापांपासून सुटका होईल. तुम्ही नीतिमान बनाल, आणि सार्वकालिक जीवन मिळून तुम्ही स्वर्गांत जाल. तुमच्या अंतःकरणांत हा विश्वास ठेवा.
जगांतील सर्वांत उध्दट पाप
जगांत उध्दट पाप
कोणते आहे?
देवाच्या आज्ञांप्रमाणें जगण्याचा
प्रयत्न करणे.
देवावर विश्वास ठेवणे हेच महत्त्वाचे व मौल्यवान असें आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्याने आपण आशीर्वादींत होतो. जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांनाच देव वाचवतो.
आज जगामध्ये पुष्कळ ख्रिस्ती लोक देवाच्या आज्ञांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पण तसं शक्य आहे का?
आपण हे लक्षांत घ्यायला हवे की आज्ञा व नियमशास्त्राप्रमाणे जगण्याचा आटापीटा करणे हा मूर्खपणा आहे. जितकं आपण प्रयत्न करतो तितकेच आपल्याला कठीण होऊन बसते. "देवाचें वचन ऐकण्याने विश्वास येतो" आपलें तारण व्हावे यासाठी आपण आपल्यातील घमेंडी उध्दफ्पणा सोडून द्यायला हवा.
तारणासाठी आपण स्वतःची मोजमापनपफ्फपी सोडून द्यायला पाहिजे
तारण होण्यासाठी आपण काय
करायला हवे?
स्वतःची मोजमापन पफ्फी सोहून
द्यायला पाहिजे.
माणसांचें तारण कसे होऊ शकेल? आपण पापी आहोत असं त्यांना स्वतःहून समजले तरच. पुष्कळ लोक त्यांच्या अंधश्रध्दा व कर्मे सोडून देत नाहीत म्हणूनच त्यांचे तारण होत नाही.
देव म्हणतो की जे नियमशास्त्रांवर भर देतात ते शापित आहेत. जे लोक येशूवर विश्वास ठेवतात आणि नियमशास्त्राप्रमाणें जगण्याचा प्रयत्न करून नीतिमान बनायला पहातात ते शापित आहेत. ते देवावर विश्वास ठेवतात तरीहि त्यांना वाटते की तारण मिळण्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे जगायला पाहिजे.
माझ्या प्रिय मित्रांनो, आपण जीवंतपणी आपल्याच प्रयत्नांनी कधी नीतिमान बनूं शकतो का? येशूच्या शब्दांवर ठेवला तरच तारण मिळून आपण नीतिमान बनू शकतो. येशूचा बाप्तिस्मा, त्याचें रक्त व येशू हाच देव यावर विश्वास ठेवला तरच आपल्याला तारणाची देणगी मिळते.
म्हणूनच देवानें आपण नीतिमान बनावे यासाठी वि·श्वासाचा रस्ता तयार केलेला आहे. पाणी व आत्मा यांच्या द्वारे होणारे तारण हे कांही माणसांच्या कर्मांवर अवलंबून नाही पण देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्यावर अवलंबून आहे. ही अशी देवाचीच योजना आहे व ती त्यानें पुरी केलेली आहे.
अशीही कांही माणसे आहेत जी येशूवर विश्वास ठेवतात पण त्यांना पापमुक्ती मिळालेली नाही याचे काय कारण आहे? हेच की ते लोक पाणी व आत्मा याची सुवार्ता स्वीकारीत नाहीत. पण ज्या आपल्यामध्ये थोडेफार दोष आहेत तरीही आपल्याला पापमुक्ती मिळते याचे कारण म्हणजे आपण देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवतो.
दोन जण जात्यावर दळण दळीत असतील तर एक जण उचलला जाईल व दुसरा मागे राहील. जो मागे राहिलेला आहे तो त्याचें काम सतत करीतच राहिल. याचे कारण हेच की त्याला पापमुक्ती मिळाली नाही. तर मग एक जण का वरती उचलला गेला आणि दुसरा मागेच राहिला?
कारण हेच की एकाने देवाचे वचन ऐकून त्यावर विश्वास ठेवला. पण दुसरा मात्र नियमशास्त्र पाळण्याचें परिश्रम करीत राहिला म्हणून त्याचा शेवट नरकांत झाला. तो जणू काही देवाकडे हळूहळू रांगतपणे जाण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या पायावर एखादा किडा रांगत चढू लागला तर आपण जसं त्याला झटकून टाकतो तसंच देवही त्याला झटकून टाकतो.
म्हणूनच आपण पाणी व आत्मा या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे.
"कारण नियमशास्त्रांतील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत; कारण शास्त्रांत असें लिहिलें आहे कीं, `नियमशास्त्राच्या पुस्तकांत जें लिहिलेलें आहे तें सर्व आचरण्यास जो कोणी फ्किून राहत नाहीं तो शापित आहे.` नियमशास्त्राच्या योगें देवापुढें कोणी नीतिमान ठरविण्यांत येत नाहीं हे उघड आहे; कारण `नीतिमान वि·श्वासाने जगेल.`" (गलतीकरांस पत्र 3:10-11 आणि रोमकरांस पत्र 1:17)
स्वतःच्या मनाप्रमाणे वागून देवाच्या शब्दांवर विश्वास न ठेवणे हे पाप आहे. आपण जन्मतः पापी असल्यामुळे नियमशास्त्र पाळणे आपल्याला जमत नाही. ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तेथे इकडे थोड पाप, तिकडे थोडे पाप असं करीत आपण पापच करीत राहतो. आपण दैहिक आहोत म्हणूनच पापाखेरीज दुसरं आपण कांही करीत नाही.
मनुष्य हा एखाघा खतानें खचून भरलेल्या बालदीप्रमाणे आहे. जेथे जेथे तो जातो तेथे ते खत सांडत रहाते. पापाचेहि तसंच आहे. जेथे कुठे आपण जातो तेथे आपली पापें सांडत रहातात. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येते का?
तुम्ही अजूनहि आपण खूप पवित्र आहोत असा आव आणता का? तुम्ही नीट विचार केला तर तुम्ही स्वतःला पवित्र समजण्याचा किंवा तसा प्रयत्न करण्याचा नाद सोडून घाल आणि फक्त येशूचे रक्त व पाणी या सुवार्तेवर विश्वास ठेवाल.
स्वतःची घमेंड सोडून आपण नम्रपणानें देवापुढे पापांची कबूली करायला हवी आहे. देवाच्या वचनाकडे वळून पाणी व आत्मा या सुवार्तेने आपण कसं काय पापमुक्त होऊ शकू ते शोधून काढायला हवे आहे.