(मार्क 7:20-23)
"आणखी तो म्हणाला, जें माणसांतून बाहेर निघतें तेंच माणसाला भ्रष्ट करितें. कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात ; जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्रा सर्व वाईफ् गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्फ् करितात."
आज विवेकशून्य माणसं त्यांच्याच भ्रमांत राहत आहेत
सर्वांमध्ये कोणत्या माणसाचें तारण
होण्याची जास्त शक्यता आहे?
जगामध्ये सर्वांत भयंकर पापी मीच आहे
असं जो स्वतःबद्दल समजतो त्याचेच.
आणखी जास्त कांही सांगायच्या आधी मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? तुम्ही स्वतःला चांगले समजता की वाईट?
सर्व लोक स्वतःच्याच कल्पनेंत राहात असतात. तुम्ही स्वतःला जितके वाईट समजत असाल तितके कांही तुम्ही वाईट नसणार. तसंच तुम्ही स्वतःला जितके चांगले समजत असाल तितके काही तुम्ही चांगले नसणार.
दर्जेदार, वि·श्वासू आयुष्य कोण जगेल असं तुम्हांला वाटते? जो स्वतःला चांगला समजतो तो की जो स्वतःला वाईट समजतो तो?
अर्थातच नंतरचा. म्हणूनच पापमुक्ती कोणाला मिळू शकतेः ज्यांनी खूप पाप केली आहेत त्यांना की ज्यांनी कमी पापं केलेली आहेत त्यांना? ज्यांनी जास्त पांप केलेली आहेत त्यांना पूर्ण कल्पना असते की ते किती पापी आहेत म्हणूनच येशूच्या द्वारे तारण स्वीकारायला ते तयार असतात.
आपण स्वतःकडे नजर टाकली तर आपल्याला समजेल की आपल्या अंतर्यामी पाप अगदी खच्चून भरलेले आहे. मानवप्राणी कसे आहेत? खरं म्हणजे प्रत्येक मानव हा एक पापाचें बीज आहे. यशयाच्या 59 व्या अध्यायांत म्हटले आहे की माणसांच्या ह्मदयांत सर्व प्रकारची पापं आहेत. म्हणूनच संपूर्ण मानवजात पापांनी खचून भरलेली आहे. पुष्कळांना माझं हे म्हणणं पटणार नाही. मानवाची व्याख्याच करायची असेल तर मानव म्हणजे `पापाचें बीज` आहे ही व्याख्या करणे योग्य आहे. आपण जर स्वतःकडे प्रामाणिकपणाने पाहिले तर आपल्याला कळून चुकेल की आपण पापी आहोत.
असेही कांही लोक आहेत की त्यांना वाटतच नाही की त्यांच्यामध्ये पापं खच्चून भरलेली आहेत. ते स्वतःला पापी समजत नाही त्यामुळे ते आरामांत रहातात. आपल्या पापांमुळे आपण पापी जग निर्माण केलें आहे. कांही लोकांना पाप करायची लाज वाफ्ते, तर कांही निर्लज्जपणाने पाप करतात.
तरी पण प्रत्येकाला सद्सद्विवेकबुध्दि असते ती सांगते, "हे लाजिरवाणें आहे" पाप केल्यानंतर आदाम आणि हवा झाडांपलिकडे लपून राहिले होते. आजहि अनेक पापी लोक आपल्या दुष्ट, पापी संस्कृतीच्या पाठीमागे लपून रहातात.
स्वतःच्या भ्रामक कल्पनांनी लोक फसले गेलेले आहेत. ते स्वतःला इतरांपेक्षां फार पवित्र समजतात. ते चिडून म्हणतात, "त्याने असे कृत्य कसं काय केले? मुलगा स्वतःच्या आईवडलांबरोबर असा कसा वागला?" ते स्वतःशी समजतात की अशी कामं ते स्वतः कधीच करणार नाहीत.
प्रिय मित्रांनो, माणसाचा स्वभाव जाणून घेणे फार कठीण आहे. स्वतःबद्दल आपल्याला खरी माहिती करून घ्यायची असेल तर प्रथम आपले तारण व्हायला हवे. तारण मिळण्यासाठी कांही वेळ लागतो. असेही कांही लोक आहेत की त्यांना मरणाच्या दिवसापर्यंत पापमुक्ती मिळत नाही.
स्वतःबद्दल माहिती करून घ्या
ज्यांना स्वतःबद्दल माहिती नसते
ते कसे जगतात?
ते स्वतःला लपवण्याचा
प्रयत्न करितात.
कधी आपण एखाद्याला पहातो तेव्हां आपल्याला समजते की तो स्वतःबद्दल अज्ञानांत आहे. साँक्रेटीस म्हणाला होता, "स्वतःबद्दल सज्ञान व्हा". कांही लोकांना त्यांच्या ह्मदयांत काय आहे ते माहित नसते. खून, चोरी, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, वाईट नजर.
माणसाच्या ह्मदयांत सापाचें विष असते पण तो तोंडाने मात्र गोड बोलतो. याचे कारण म्हणजे त्याला समजत नाही की तो जन्मतःच पापी आहे.
आज जगांत खूप लोक असे आहेत की त्यांना स्वतःबद्दलची माहिती नाही. ते फसवले गेलेले आहेत. स्वतःच्या भ्रामक समजूतींमध्ये गुंतून जाऊन ते त्यांचें संपूर्ण आयुष्य कंठतात. ते स्वतःहूनच स्वतःला नरकांत टाकतात. त्यांच्या भ्रामक कल्पनांपायीच ते नरकांत जातात.
सबंध आयुष्यभर लोक सतत पाप करीत राहतात
लोक नरकांत कां जाणार आहेत?
कारण ते स्वतःलाच समजून
घेत नाहीत.
मार्क 7:21-23 मध्ये म्हटलें आहे. "कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्रा सर्व वाईट गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात." गर्भांत असतांनाच लोकांच्या ह्मदयांत वाईफ् विचार भरलेले असतात.
आपण अशी कल्पना करू की माणसाचें ह्मदय ही. एखाद्या गलिच्छ द्रवपदार्थाने म्हणजेच पापाने भरलेल्या पेल्याप्रमाणे आहे. माणूस जर पुढे मागे हलूं लागला तर काय होईल? अर्थातच पेल्यातील गलिच्छ द्रवपदार्थ बाहेर पडेल. तसंच माणूस येथे तेथे वेगवेगळ्या हालचाली करतो तेव्हां त्याची पापंही बाहेर पडायला लागतात.
आपल्यांत पापांची खूप घाण जमलेली आहे आणि जेथे कुठे आपण जातो तेथे ती घाण आपण उघड¬ावर टाकतो.
आपण पापाचें बीज आहोत, आपल्यांत पापाची घाण जमलेली आहे आणि आपल्या ह्मदयांत पण पाप आहे हे आपण समजून घेत नाही हीच एक अडचण आहे.
पापांची घाण अगदी तुडूंब भरलेली आहे, आणि माणसांना समजत नाही की ते जन्मतःच पापी आहेत. त्यांना वाटते की त्यांच्यांत तसें कांही दोष नाहीत, इतर लोकच त्यांना पाप करायला लावतात.
म्हणूनच जेव्हां ते पाप करतात, तेव्हां त्यांना वाटते की आपण स्वतःला धुतले तर आपण पापापासून स्वच्छ होऊ. म्हणूनच प्रत्येकवेळी पाप केले की ते लोक धुण्याचा पुसण्याचा आटापीटा करतात आणि वरती म्हणतात की खरं म्हणजे आमचा यांत कांहीच अपराध नव्हता. आपण घाण पुसतो पण पुन्हां पुन्हां ती बाहेर येते की नाही? आपल्याला ती परत परत पुसावीच लागते.
पापाच्या गलिच्छतेने पेला जर पूर्णपणे भरला तर तो सांडला जाणारच. आणि असा पेला आपण बाहेरून स्वच्छ पुसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कांही उपयोग होत नाही. पुष्कळदा आपण आपल्या चांगल्या वर्तणूकीने बाहेरून स्वतःला स्वच्छ पुसण्याचा प्रयत्न करतो पण जोपर्यंत आपल्या ह्मदयाचा पेला घाणीने भरलेला आहे तोपर्यंत हा सर्व आटापीटा व्यर्थ आहे.
आपण भरल्या पापांनी जन्माला आलो आहोत. ही भरलेली घाण आपण वाटेवर कितीहि जरी फेकत असलो तरी आपली ह्मदय कधीच रिकामी होत नाहीत. म्हणूनच आपण आयुष्यभर पाप करीतच राहतो.
जेव्हां एखाद्याला समजत नाही की तो पापी आहे तेव्हां तो पध्दतशीरपणें स्वतःला झाकायचा प्रयत्न करतो. खर म्हणजे लोकांच्या मनांतच पाप असते आणि बाहेरून स्वच्छ पुसण्याने ते कांही नाहीसे होत नाही. जेव्हां आपण पापांची थोडीशी घाण बाहेर टाकतो तेव्हां ती रूमालाने पुसतो, नंतर आणखी पाप टाकतो तेव्हां फडक्याने, नंतर टाँवेलने नंतर चादरीने.... आपण नुसतं विचार करतो की ह्रावेळी आपण स्वच्छ होऊ. पण तरीही पापाची घाण पुन्हां पुन्हां बाहेर पडत असते.
तुम्हांला काय वाटते की असं हे किती काळ चालणार? माणूस मरतो त्या दिवसापर्यंत हे चक्र चालूच रहाते. माणूस मरेपर्यंत पाप करतो. आपला उध्दार व्हावा म्हणून आपण सर्वांनी येशूवर वि·श्वास ठेवून स्वतःला समजून घेतले पाहिजे.
येशूला आभारपूर्वक कोण स्वीकारतात?
जे पापी स्वतःची पापं कबूल
करतात ते.
असं आपण समजू की गलिच्छ द्रवपदार्थाने भरलेल्या दोन पेल्यांप्रमाणे दोन माणसं आहेत. दोन्ही पेले पापांनी तुडूंब भरलेले आहेत. एकजण स्वतःकडे पाहून म्हणतो, "अरेरे! मी महापातकी माणूस आहे." असं म्हणून तो आशा सोडून देतो व त्याला कोण मदत करू शकेल हे तो पहायला जातो.
पण दुसरा विचार करतो की तो इतका कांही वाईट नाही. त्याला स्वतःच्या पापाची घाण दिसत नाही म्हणूनच तो स्वतःला वाईट समजत नाही. सबंध आयुष्यभर पापाची घाण बाहेर टाकायची आणि कधी एका बाजूला पुसायची तर कधी दुसरीकडे असा उद्योग तो करीत राहतो.
कांही लोकांच्या ह्मदयांत थोडेच पाप असते. ते लोक खूप सावधगिरीने त्यांचे आयुष्य जगतात. कितीहि झाले तरी थोडेसे पाप त्यांच्या ह्मदयांत असतेच मग त्यांतून चांगले असं काय निष्पन्न होणार आहे? `सावधगिरीने चालण्याचा` रस्ता त्यांना कांही स्वर्गांत नेत नाही. `सावधगिरीने चालण्याचा` रस्ता तुम्हांला नरकाकडे नेतो.
प्रिय मित्रांनो, `सावध रहाणे` हे तुम्हांला नरकाकडे नेते. जेव्हां लोक खूप सावधपूर्व वागतात तेव्हां जास्ती पापं करीत नाहीत पण तरीहि ते मुखवटा धारण केलेले पापीच असतात.
मानवजातीच्या ह्मदयांत काय आहे? पाप? अनैतिकता? होय. वाईट विचार? होय. चोरी? होय. गर्विष्फ् पणा? होय.
कुठचेहि शिक्षण न घेता आपण सफाईने दुष्फ् पापं करीत असतो याची आपल्याला जाणीव आहे. जेव्हां आपण लहान असतो तेव्हां ती पापं इतकी कांही दिसून येत नाही पण जसं जसे आपले वय वाढत जाते आणि आपण शाळेतून काँलेजमध्ये जातो नंतर..... मग आपल्या लक्षांत येते की आपल्या अंतर्यामी पाप आहे. हे खरं आहे की नाही? एक वेळ अशी येते की आपल्याला पाप दडवता येत नाही. ते उघडकीस येते. मग आपण पश्चातापाने म्हणतो, "मी असं करायला नको होतं" तरीही स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करणे आपल्याला अशक्य वाफ्ते. हे असं का? कारण प्रत्येकजण जन्मतःच पापी आहे: -केवळ सावध रहाण्याने आपण स्वच्छ बनू शकत नाही. स्वतःचा उध्दार होण्यासाठी आपण समजून घ्यायला हवे की आपण जन्मतःच पापी आहोत. जे पापी आभारपूर्वक येशूकडून तारण स्वीकारतात त्यांचाच उध्दार होतो.
जे असा विचार करतात, `मी कांही खूप चुका केलेल्या नाहीत आणि मी फारशी पापंही केलेली नाहीत` त्याशिवाय येशूने त्यांची सर्व पापं स्वतःकडे घेतली असा वि·श्वासपण ते ठेवत नाहीत ते अर्थातच नरकांत जातील. आपल्या अंतर्यामी पाप आहे आणि आपण जन्मतः पापी आहोत हे आपण समजून घ्यायलाच हवे.
जर एखाद्याने विचार केला, `मी जास्ती कांही चुका केलेल्या नाहीत. माझ्या ह्रा लहानशा अपराधाने सुध्दां माझा उध्दार होऊ शकतो.` मग तो पापमुक्त होईल का? नाही. कधीच नाही.
ज्याचा उध्दार होतो त्याची पक्की खात्री असते की तो पापी आहे. त्याचा वि·श्वास असतो की येशूने यार्देन नदींत बाप्तिस्मा घेऊन त्याची सर्व पापं नदींत नाहीतशी केली व नंतर तो त्याच्या पापांसाठी मरण पावला.
आपला उध्दार झालेला असो वा नसो. आपण सर्व जण भ्रमांत आहोत. आपण सर्व पापी आहोत. येशूने आपली सर्व पापं घेतली असा आपण वि·श्वास ठेवला तरच आपला उध्दार होईल.
जे लहान-सहान पाप करणारे आहेत त्यांचा देवाने कधीहि उध्दार केला नाही
देवाला फसवणारा कोण आहे?
जो देवाकडे रोजच्या पापांबद्दल माफी
मागतो तो.
जे लहान-सहान पाप करतात त्यांचा देवाने कधीहि उध्दार केला नाही. `हे देवा, माझ्यांत खूप कमी पाप आहे,` असं जो म्हणतो, त्याच्याकडे देव अजिबात लक्ष देत नाही. `हे देवा, मी महापातकी आहे. मी नरकाकडे जात आहे. कृपा करून तू मला वाचव` असं जो म्हणतो त्याच्याकडेच देव लक्ष देतो. पूर्ण पापी आहे असा माणूस म्हणतो, `हे देवा, तू जर मला वाचवलेस तरच मी वाचेन. मी पश्चातापासाठी यापेक्षां जास्त प्रार्थना करू शकत नाही कारण मग मी आणखी पापच करीत बसेल. कृपा करून तूच मला सोडीव.`
जे लोक देवावर पूर्णपणें अवलंबून रहातात त्यांनाच देव वाचवतो. मी सुध्दां रोज रोज पश्चातापाची प्रार्थना करण्याचा खूप प्रयत्न केला. पण पश्चातापाची प्रार्थना आपल्याला कधीहि पापमुक्त करू शकत नाही. "हे देवा, मजवर दया कर आणि मला पापमुक्त कर" अशी प्रार्थना जो करतो त्याचेच तारण होते. योहानाकहून झालेल्या येशूच्या बाप्तिस्म्यावर जे वि·श्वास ठेवतात त्यांचाच उध्दार होतो.
आपण जन्मतःच पापी आहोत, असं जे लोक समजून घेतात त्यांचीच देव सुटका करीत असतो. जे लोक असं म्हणतात, "आम्ही थोडसच पाप केलेले आहे. कृपया आम्हांला माफ कर" ते पापीच असतात आणि देव त्यांना वाचवू शकत नाही. जे स्वतःला पूर्णतः पापी समजतात अशांनाच देव वाचवतो. यशया 59:1-2 मध्ये असं लिहिलेले आहे, "पाहा, उध्दार करवत नाहीं इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकूं येत नाहीं इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचें अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्यें आडभिंतीप्रमाणे झालें आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांस दर्शन देत नाहीं, तुमचें ऐकत नाहीं."
आपण जन्मतः पापी असल्यामुळे देव आपल्याकडे कौतुकाने किंवा लाडाने पाहूं शकत नाहीं. त्याचा अर्थ असा नाही की देवाचा हात तोकडा आहे किंवा आपली पश्चातापाची प्रार्थना ऐकण्यास त्याचा कान मंद आहे.
देव आपल्याला सांगतो, "तुमचें अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्यें आडभिंतीप्रमाणें झालें आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांस दर्शन देत नाहीं, तुमचें ऐकत नाहीं."
प्रत्येकवेळी पाप केल्यानंतर आपण देवाकडे माफी मागत राहिलो तर देवाला त्याचा पुत्र पुन्हां पुन्हां मारावा लागेल. म्हणूनच देव म्हणतो, "तुम्ही रोज रोज तुमची पापं घेऊन माझ्याकहे येऊ नका. मी तुम्हांला निर्माण केले म्हणून माझें तुमच्यावर इतके प्रेम आहे की माझ्या पुत्राला तुमच्या पापमुक्तीसाठी मी पाठवले. तुम्ही हे सत्य पहा की त्याने तुमची पापं घेतली. म्हणूनच उध्दाराच्या, तारणाच्या सुवार्तेवर तुम्ही वि·श्वास ठेवा.
ह्रा सुवार्तेत देव आपल्याला सांगतो, "मी तुमचा देव आहे, मी माझ्या स्वतःच्या पुत्राला तुम्हा सर्वांची पापांपासून सुटका व्हावी म्हणून पाठवले. त्याच्यावर वि·श्वास ठेवा व पापमुक्त व्हा"
ज्यांना समजत नाही की ते महापातकी आहेत ते येऊन फक्त त्यांच्या किरकोळ पापांची माफी मागतात. ते म्हणतात, `कृपा करून माझ्या ह्रा लहानश्या पापाची तू मला क्षमा कर. मी परत कधी असं करणार नाहीं`
ते देवाला फसवण्याचा प्रयत्न करतात. आपण कांही फक्त एकदाच पाप करीत नाहीं. मरेपर्यंत आपण पाप करीत राहतो. मग त्यामुळे आपल्याला आपल्या अंतिम दिवसापर्यंत माफी मागत बसावं लागेल.
एखाद्या लहान पापाबद्दल आपल्याला माफी मिळण्याने आपले प्रश्न सुटत नाहीत. आपल्या मृत्युदिनापर्यंत रोजच आपण पाप करतो. म्हणूनच पापमुक्त होण्यासाठीं येशूकडे आपली सर्व पापें सोपवून द्यायची हा एकच रस्ता उरतो.
मानवजात काय आहे?
ती म्हणजे पापाचा गोळा आहे.
बायबलमध्ये यशया 59:3-8 मध्ये माणसाच्या पापाबद्दल असं लिहिले आहे, "कारण तुमचें हात रक्ताने, तुमचीं बोटें अधर्मान विटाळलीं आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचें शब्द पुटपुटते. धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाहीं, आणि सत्यास स्मरून खटला चालविणारा कोणी नाहीं, :- लोक पोकळ गोष्टीवंर भिस्त ठेवितात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करितात आणि अनर्थाला जन्म देतात. ते नागाची अंडी उबवितात, कातिणीचे जाळें विणितात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एकादें चिरडिले तर त्यांतून फुरसें निघतें. त्यांचीं जाळीं पांघरण्याच्या उपयोगीं नाहींत; ह्रा आपल्या वीणकामानें त्यांना स्वतःस झाकतां येत नाहीं; त्यांची कामें केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामें होतात. त्यांचें पाय दुष्कर्म करण्यास धावतात, निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करितात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गांत नाश व विध्वंस असतात. शांतीचा मार्ग त्यांस ठाऊक नाहीं; त्यांच्या वाटांत न्याय नाही; तें आपणांसाठी वाकडे मार्ग करितात; त्या मार्गांनी चालतात त्यांना शांति ठाऊक नाहीं."
लोकांची बोटं अधर्माने विटाळलेली आहेत आणि ते आयुष्यभर वाईटच करीत राहतात. आणि आपली `वाणी असत्य आहे.` आपल्या तोंडातून जे कांही येते ते असत्यच असते.
`जेव्हां सैतान खोटं बोलतो तेव्हां तो स्वतःचें बोलतो` (योहान 8:44). ज्यांचा जन्म नव्याने झालेला नाही त्यांना असं बोलायला खूप आवडते, "मी तुम्हांला खर तेच सांगतो..... मी अगदी खरे तेच सांगत आहे. मी जे काय सांगत आहे ते निर्भेळ सत्य आहे....." कांहीही झाले तरी ते जे कांही सांगत असतात ते खोटच असतं. "जेव्हां सैतान खोटं बोलतो तेव्हां तो स्वतःचें बोलतो."
लोक पोकळ शब्दांवर वि·श्वास ठेवून खोटं बोलतात. वाईटातून ते अधर्म आणतात. ते सापाची अंडी उबवितात व कोळ्याची जाळी विणितात. देव म्हणतो, "त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एकादें चिरडिले तर त्यांतून फुरसें निघतें" तो म्हणतो की तुमच्या ह्मदयांत नागाची अंडी आहेत. नागाची अंडी! तुमच्या ह्मदयांत पाप आहे. पाणी व रक्त या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून तुम्ही पापमुक्त व्हा.
जेव्हां मी देवासंबंधी बोलतो तेव्हां कांही लोक म्हणतात, "कृपया तुम्ही माझ्याबरोबर देवासंबंधी कांही बोलू नका. जेव्हां मी कांही करायला जातो तेव्हां माझ्यातील पाप उफाळून बाहेर येते. पाप केल्याखेरीज मी एकही पाऊल टाकू शकत नाही. मी खूप पापी आहे. म्हणूनच देवासंबंधी माझ्याबरोबर कांही बोलू नका."
ह्रा माणसाला खात्री झालेली आहे की तो खूपच पापी आहे. पण वाचवू शकणारी सुवार्ता मात्र त्याला माहित नाही.
खरं म्हणजे प्रत्येकजण असाच आहे. जेथे कुठे तो जातो तेथे तो पाप करीतच राहतो. लोक पापांनी इतके तुडूंब भरलेले आहेत की ते पाप सर्वत्र ओसंडून वहात आहे. देवाच्या शक्तीमुळे वाचणे हा एकच रस्ता आहे. खरोखरच हे आश्चर्यजनक आहे की नाही? जे लोक हादरल्यामुळे, आनंदामुळे किंवा आरामामुळे पापं करतात ते सुध्दां प्रभू येशूच्या द्वारे पापमुक्त होऊ शकतात.
येशूने तुमच्या पापांची किंमत मोजलेली आहे. म्हणूनच आपण पापी आहोत हे समजून घ्या व पापमुक्त व्हा.