लूक 10:25-30)
"मग पाहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरूजी, काय केल्यानें मला सार्वकालिक जीवन हें वतन मिळेल? त्यानें त्याला म्हटलें, नियमशास्त्रांत काय लिहिलें आहे? तुझ्या वाचनांत काय आलें आहे? त्यानें उत्तर दिलें, `तूं आपला देव परमेश्वार ह्राच्यावर संपूर्ण मनानें, संपूर्ण जिवानें, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुध्दीनें प्रीति कर; आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजायावर प्रीति कर.` त्यानें त्याला म्हटलें, ठीक उत्तर दिलेंस; हेंच कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूनें उत्तर दिलें, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहोस जात असतांना लूटारूंच्या हातीं सापडला; त्यांनी त्याचें कपडे काढून त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले."
माणसांची सर्वांत कठीण समस्या
काय आहे?
ते चुकीच्या कल्पनांत
रहातात हीच.
लूक 10:28. "हेंच कर म्हणजे जगशील."
लोक खूप चुकीच्या कल्पनांमध्ये रहात आहेत. असं दिसतं की येथेच त्यांचें दुबळेपण आहे. तसं दिसायला ते हुशार, तल्लख बुध्दीचे दिसत असले तरी ते सहज फसवले जातात आणि त्यांना त्यांची दुसरी वाईट बाजू समजतच नाही. आपण स्वतःबद्दल कांहीच माहिती नाही अशा स्थितींत जन्म घेतो पण आयुष्य जगतांना आपण असं दाखवतो की आपल्याला खूप माहिती आहे. आपण पापी आहोत हे बायबल आपल्याला सांगते.
लोक बोलतांना स्वतःमध्ये असलेल्या पापांबद्दल बोलतात. आपण खूप चांगले आहोत असं ते दाखवायला पहातात पण प्रत्यक्षांत ते चांगलं कांही करूं शकत नाही. त्यांना त्यांच्या चांगल्या कामांचें प्रदर्शन करून त्याबद्दल फुशारक्या मारायला आवडते. ते लोक तोंडाने नुसते म्हणतात की ते पापी आहेत पण प्रत्यक्ष वागतांना ते चांगलं वागण्याचें नाटक करतात.
त्यांना माहिती असते की त्यांच्यांत चांगूलपणा नाही आहे आणि सत्कृत्य करण्याची क्षमता पण नाही. तरीहि ते इतरांना व स्वतःलाहिं फसवतात. आणि म्हणतात, "आम्ही खूप दुष्ट असूच शकत नाही. आमच्यांत थोडाफार चांगुलपणा आहे."
म्हणून मग ते इतरांकडे पाहून म्हणतात, "मला वाटतं की त्यानें असं करायला नको होत. तो असं बोलला असता, तर बरं झाल असतं. मला वाटतं की त्याने सुवार्तेचा उपदेश वेगळ्या पध्दतीने द्यायला हवा होता. त्याचा उध्दार माझ्या आधी झाला. त्याने नीट वागायला हवं होत. मी जास्त शिकलो असतो तर त्याच्यापेक्षां मी चांगलं काम केलं असत."
ते त्यांच्या ह्मदयांत जणू कांही सुरीला तीक्ष्ण धार देत रहातात. "तू नुसती वाट पहा मग तुला समजेल की मी कांही तुझ्यासारखा नाही आहे. तुला वाटते की तू स्वतः माझ्या पुढे गेलेला आहेस. तू वाट पहा. बायबल म्हणते की जे शेवटले ते पहिले होतील. मला माहिती आहे की हे मला लागू पडते. वाट तर पहा मग मी तुला दाखवीनच" असं म्हणून लोक स्वतःलाच फसवतात.
जर तो दुसयाच्या जागी असता तर त्याने बडबड करीत दुसयाचा न्यायनिवाडा केलाच असता. जेव्हा हाच माणूस व्यासपीठावर भाषण करायला उभा रहातो तेव्हां मात्र त्याची जीभ अडखळते व तो थरथर कांपत उभा रहातो. दुसरे लोक काय विचार करतात याला महत्त्व न देतां उपदेशकाने फक्त देवाकडे पहायला हवे. जर त्यांनी इतर लोकांचा विचार केला तर ते चांगला उपदेश देऊ शकणार नाहीत.
सत्कृत्य करण्याची क्षमता तुमच्यांत आहे कां असं जर लोकांना विचारले तर पुष्कळ लोक नाही असंच उत्तर देतात. आपल्यांत ती क्षमता आहे अशा भ्रमांत मात्र ते असतात. म्हणूनच मरेपर्यंत ते खूप प्रयत्न करीत रहातात.
त्यांना वाटते की त्यांच्या ह्मदयांत `चांगुलपणा` आहे म्हणूनच सत्कृत्य करण्याची क्षमता आहे. ते असाहि विचार करतात की ते सज्जन आहेत. जे खूप काळापूर्वी नव्याने जन्मलेले आहेत व ज्यांनी देवाची सेवा करण्यांत खूप प्रगति केलेली आहे ते सुध्दां म्हणतात, "देवासाठी मी अमूक करीत, तमूक करीन."
पण जर आपण देवाला आपल्या आयुष्यांतून बाहेर काढले तर आपण सत्कृत्य करू शकतो कां? मानवजातीत चांगूलपणा ही चीज आहे कां? माणसामध्ये चांगलं कांही करण्याची कार्यक्षमता नाही आहे. जेव्हां जेव्हां तो स्वतःच्या हिंमतीवर कांही करायला जातो तेव्हां तो पापच करतो.
कांही लोक उध्दार झाल्यानंतर येशूला बाजूला करून स्वतःच्या हिमतीवर सत्कृत्ये करायचा प्रयत्न करतात. आपल्या सर्वांमध्ये पापाखेरीज कांहीच नाही आहे. आपण फक्त वाईट आचरण करू शकतो. आपण सर्वजण (ज्यांचे तारण झालेले आहे ते सुध्दां) फक्त पापच करू शकतो. आपल्या दैहिक अस्तित्वाचें हे खरे रूप आहे.
आपण नेहमीच काय करतो,
चांगले की वाईट?
वाईट.
`परमेश्वाराचे स्तवन करा` ह्रा आमच्या भक्तीगीतांच्या पुस्तकांत असं एक गाणं आहे, "♪येशूशिवाय आम्ही कोलमडतो, आमचं जीणे आहे निरर्थक, दर्यापार करणाया शीड नसलेल्या जहाजाप्रमाणे;" येशूशिवाय आपण फक्त पापच करतो. आपले तारण झालेले आहे म्हणूनच आपण नीतिमान आहोत. प्रत्यक्षांत आपण वाईटच आहोत.
प्रेषित पौलानें म्हटले, "कारण जें चांगले करावेंसें मला वाटतें ते मी करीत नाहीं; तर करावेंसें वाटत नाहीं असें जें वाईट तें मी करितो." (रोमकरांस पत्र 7:19) जर एखादा माणूस येशूबरोबर असेल तर कांही अडचण नाही. पण जर येशूशिवाय तो देवासमोर सत्कृत्ये करूं पहात असेल तर ते त्याला जमणार नाही. तसा प्रयत्न त्याने केलाच तर सत्कृत्याऐवजी आपण वाईट तेच करीत आहोत असं त्याला समजेल.
दावीद राजाचा स्वभाव पण अशा प्रकारचा होता. जेव्हां त्याच्या देशांत शांति व सुबत्ता होती तेव्हां तो चैनीखातर खरेदीला गेला. तेथे त्यानें एक मोहक चित्र पाहिले आणि त्याच्यातील वासना उद्दीपित झाली. देवाला साफ विसरून तो कसा बनला! तो अगदी दुष्ट बनला. त्यानें उरीयाला मारून टाकले आणि त्याची बायको घेतली. यांत कांही वाईट आहे असं त्याला वाटले नाही. ह्रा असल्या कृत्याबद्दल तो सबबी सांगू पहात होता.
मग एक दिवशी नाथान नांवाचा संदेष्टा दाविदाकडे येऊन म्हणाला, "एका नगरांत दोन मनुष्य राहत होते; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत मनुष्याचीं मेढरें व गुरें विपुल होती. पण त्या गरिबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज कांहीच नव्हतें. त्यानें ती विकत घेऊन तिचें संगोपन केले होतें; ती त्याजबरोबर व त्याच्या मुलांबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हां त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठीं भोजन तयार करावें म्हणून त्यानें आपल्या शेरडांमेंढरांतून अथवा गाईबैलांतून एखादें न घेतां त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केलें." (2 शमुवेल 12: 1-4)
दावीद म्हणाला, "ज्या मनुष्यानें हें काम केलें तो प्राणदंडास पात्र आहे." त्याचा कोप खूप भडकला व तो म्हणाला, "त्या श्रीमंत माणसाकडे स्वतःचे भरपूर असतांना त्यानें गरीब माणसाची मेंढी घेऊन पाहुण्यासाठी जेवण तयार केले म्हणून त्या माणसानें मरायलाच पाहिजें!" तेव्हां नाथान म्हणाला, "♪तो मनुष्य तूच आहेस" येशूला अनुसरून, त्याच्याबरोबर राहिलो नाही तर नव्याने जन्मलेले सुध्दां दाविदासारखे वागू शकतात.
हे असं सगळ्यांच्या बाबतींत खरं आहे. वि·श्वासू म्हटलेले लोक सुद्धां अडखळतात. येशूशिवाय आपण नेहमीच धडपडतो व चुका करतो. आपण पापी असतांना येशूने आपल्याला वाचवले आहे याबद्दल आपण आभारी असायला पाहिजे. "वधस्तंभाच्या छायेंत हवा आहे मला विसावा" उध्दारकत्र्या येशूच्या छत्राखाली आपल्या ह्मदयाला शांति मिळते, विसावा मिळतो. पण आपण जर ते छत्र सोडले तर आपल्याला कधीच विसावा मिळणार नाही.
नियमशास्त्राच्या आधी देवानें आपल्याला वि·श्वासाचें नीतिमत्त्व दिले
आधी काय आहे; वि·श्वास
की नियमशास्त्र?
वि·श्वास.
प्रेषित पौलाने म्हफ्ले की देवानें प्रथम आपल्याला वि·श्वासाचें नीतिमत्त्व दिले. त्याने ते आदाम आणि हव्वा यांना दिले. नंतर काइन आणि हाबेल, शेथ आणि हनोख, नोहा.... अब्रााहाम.... नंतर इसहाक, याकोब आणि त्याचे बारा मुलगे. नियमशास्त्राशिवाय केवळ देवाच्या शब्दावर वि·श्वास ठेवल्यामुळे हे सर्वजण देवासमोर नीतिमान ठरले गेले ते सर्व आशीर्वादीत झाले व सर्वांना शांति मिळाली.
आणि कांही कालावधीनंतर याकोबाचे वंशज मिसर देशांत योसेफामुळे 400 वर्ष दास म्हणून राहिलें त्यानंतर देवाने त्यांना मोशेच्या द्वारे कनान देशांत आणले. पण 400 वर्षाच्या दास्यांत ते सर्वजण वि·श्वासाचें नीतिमत्त्व विसरून गेले होते.
म्हणून मग देवानें तांबडा समुद्र ओलांडण्याचा चमत्कार करून त्यांना रानांत आणले. जेव्हां ते रानांत आले तेव्हां देवानें त्यांना सीनाय पर्वतावर दहा आज्ञा दिल्या. त्यांत सविस्तर असे 613 नियम आहेत. "मी परमेश्वार तुझा देव आहे. मी अब्रााहामाचा, इसहाकाचा, याकोबाचा देव आहे. मोशेला मी सीनाय पर्वतावर आज्ञा देईन" देवानें इस्त्राएलच्या लोकांना आज्ञा दिल्या.
देवानें त्यांना आज्ञा दिल्या यासाठी की त्यांना पापांची जाणीव व्हावी.` (रोमकरांस पत्र 3:20) त्याला काय आवडते व काय आवडत नाही हे पण त्यांना समजावे आणि त्याचें नीतिमत्त्व व पावित्र्य याचे त्यांना दर्शन घडावे हीच देवाची इच्छा होती.
मिसर देशांत 400 वर्षे दास्यांत असलेल्या सर्व इस्त्राएलच्या लोकांनी तांबडा समुद्र ओलांडला. त्यावेळी अब्रााहामाचा देव, इसहाकाच देव, याकोबाचा देव त्यांना भेटला नव्हता. ते त्याला ओळखतही नव्हते.
जेव्हां ते 400 वर्ष दास्यांत होते तेव्हां ते नीतिमान देवाबद्दल विसरून गेले होते. त्यावेळी त्यांना कोणी मार्गदर्शक नव्हते. याकोब आणि योसेफ यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते पण ते मरून गेले होते. असं दिसते की वि·श्वासाची ठेव मनश्शे व एफ्राईम यांच्या द्वारे नंतरच्या पिढींत पोचवायला योसेफ असफल झाला होता.
नीतिमान देवाला लोक विसरून गेले होते म्हणूनच देवाला पुन्हां एकदा शोधून काढून त्याला भेटण्याची त्यांना जरूर वाटली. त्यामुळे देवानें त्यांना नीतिमत्त्वाचा वि·श्वास प्रथम दिला नंतर नियमशास्त्र दिले. लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठीच त्यानें नियमशास्त्र दिलें.
इस्त्राएलला वाचवून त्यांना स्वतःचे लोक, अब्रााहामाचे लोक बनवण्यासाठी देवानें त्यांना सुंता करायला सांगितली.
नियमशास्त्र अस्तित्वांत आणून देवानें प्रथम त्यांना दाखवून दिले की तो देव आहे. आणि त्याच्यापुढे ते सर्वजण पापी आहेत. अर्पणाच्या पध्दतीने लोकांचा उध्दार होऊन त्यांनी त्याचें लोक बनावे अशीच देवाची इच्छा होती.
जो मशिहा येणार होता त्याच्यावर वि·श्वास ठेवण्याने व नियमशास्त्रातील अर्पण पध्दती मुळे इस्त्राएलच्या लोकांचा उध्दार झाला. कांही काळाने अर्पण पध्दत कमी होत गेली. कधी ते आपण पाहूया.
लूक 10:25 मध्ये, "कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहिली" त्याकाळी शास्त्री व परूशी देवाचा शब्द खूप काटेकोरपणे पाळून जुन्या मताने वागणारे असे होते. ते प्रथम देशरक्षणासाठी झटत आणि नंतर नियमशास्त्र पाळणे महत्त्वाचे मानीत. त्याखेरीज त्याकाळी दुसरे पण क्रांतीकारी लोक
होते जे स्वतःची स्वप्ने पुरी करायला निदर्शने करण्याचा मार्ग अवलंबीत असत.
येशू कोणाला भेटू पहात होता?
मेंढपाळ नसलेल्या पापी लोकांना.
आज अशा प्रकारचे लोक आहेत. ते सामाजिक चळवळी सुरू करून म्हणतात, `देशातील पीडित लोकांना वाचवायला पाहिजे` येशू गरीबांना व पीडित लोकांना सोडवण्यासाठी आला असा ते वि·श्वास करतात. म्हणून मग ते थियाँलाँजीकल सेमिनरीमध्ये जाऊन धर्माचा अभ्यास करतात नंतर ते राजकारणांत जातात आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रांत `पीडित गरजू लोकांना वाचवण्याचा` धंदा करतात.
हेच लोक असं म्हणतात, "आपण सर्व जण पवित्र नियमशास्त्राप्रमाणे राहूया. देवाच्या शब्दाप्रमाणेच जगूया" पण त्यांना नियमशास्त्राचा खरा अर्थ माहित नाही. ते नियमशास्त्रातील शब्दाप्रमाणे जगू पहातात पण या शब्दांतून देव कसा प्रगट होतो ते त्यांना समजत नाही.
तर मग आपण असं म्हणू शकतो की ख्रिस्ताच्या 400 वर्षे आधी देवाचा सेवक किंवा संदेष्टा नव्हता. म्हणूनच त्यांवेळी लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे होते.
त्यांच्याकडे नियमशास्त्र नव्हते किंवा कोणी मार्गदर्शक नव्हता. त्यावेळी देवाने त्याकाळच्या ढोंगी, धार्मिक प्रमुखांद्वारे स्वतःला कधीच प्रकट केले नाही. संपूर्ण देश रोमन साम्राज्याच्या ताब्यांत होता. इस्त्राएलचे लोक रानामध्ये जेव्हां येशूच्या मागोमाग गेले तेव्हां येशू म्हणाला होता की तो त्या सर्वांना भुकेल्या स्थितीत परत पाठवू शकत नाही. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे असलेले लोक पाहून येशूला कळवळा आला होता.
अधिकार गाजवणारे शास्त्री आणि इस्त्राएलच्या घराण्यातील परूशी हे त्याकाळी फार घमेंडी असे लोक होते.
आणि त्यातल्या एका शास्त्र्याने येशूला विचारले, (लूक 10:25), "काय केल्यानें मला सार्वकालिक जीवन हें वतन मिळेल?" त्याला वाटलं होतं की इस्त्राएलच्या सर्व लोकांमध्ये त्याच्यासारखा चांगला दुसरा कोणी नाही. म्हणून तो शास्त्री (ज्याचा उध्दार झालेला नव्हता) येशूची परीक्षा पहाण्याकरितां म्हणाला, "काय केल्यानें मला सार्वकालिक जीवन हें वतन मिळेल?"
हा शास्त्री म्हणजे आपलंच प्रतिबिंब आहे. त्यानें येशूला विचारले, "काय केल्यानें मला सार्वकालिक जीवन हें वतन मिळेल?" येशूनें त्याला म्हटलें, "नियमशास्त्रांत काय लिहिलें आहे? तुझ्या वाचनांत काय आलें आहे?"
त्यानें उत्तर दिलें, "तूं आपला देव परमेश्वार ह्राच्यावर संपूर्ण मनानें, संपूर्ण जिवानें, संपूर्ण शक्तीनें व संपूर्ण बुध्दीनें प्रीति कर; आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजायावर प्रीति कर." येशूने त्याला म्हटलें, "ठीक उत्तर दिलेंस; हेच कर म्हणजे जगशील".
त्याला समजत नव्हतं की तो एक पापाचा गोळा आहे आणि चांगलं काम तो कधीहि करू शकत नव्हता. तरीसुध्दां त्याने येशूची परीक्षा घेतली. म्हणूनच येशूने त्याला विचारले, "नियमशास्त्रांत काय लिहिले आहे? तुझ्या वाचनांत काय आलें आहे?"
नियमशास्त्रांत तुमच्या वाचनांत
काय आलें आहे?
नियमशात्र पाळणे अशक्य आहे असं
समजणारेआपण सर्व पापी आहोत.
"ठीक उत्तर दिलेंस; हेच कर म्हणजे जगशील" याचा अर्थ नियमशास्त्र तुम्हांला किती समजते हें महत्त्वाचें आहे.
नियमशास्त्रांत लिहिल्याप्रमाणे वागायला हवं, देवानें ते त्यासाठीच दिलेले आहे असं अनेक लोक आज समजतात. म्हणूनच तो शास्त्री येशूला म्हणाला होता, "तूं आपला देव परमेश्वार ह्राच्यावर संपूर्ण मनानें, संपूर्ण जिवानें, संपूर्ण शक्तीनें, व संपूर्ण बुध्दीनें प्रीति कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजायावर प्रीति कर."
नियमशास्त्रांत कोणतेहि दोष नव्हते. देवाने आपल्याला अगदी नीटनेटके असे नियमशास्त्र दिलें. त्यानें आपल्याला सांगितले की तुम्ही तुमचा देव परमेश्वार ह्राच्यावर संपूर्ण मनानें, संपूर्ण जिवानें, संपूर्ण शक्तीनें व संपूर्ण बुध्दीनें प्रीति करा आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजायावर प्रीति करा. देवावर संपूर्ण मनानें, संपूर्ण शक्तीने आपण प्रेम करणे योग्य आहे पण आपण त्याच्या पवित्र शब्दाचे पालन करीत नाही.
"तुझ्या वाचनांत काय आलें आहे?" याचा अर्थ हाच की नियमशास्त्र अगदी चांगले व अचूक असं आहे. पण तुम्हांला ते कितपत समजते? शास्त्रीला वाफ्ले की नियमशास्त्र केवळ आज्ञापालनासाठीं आहे. आपल्यांतील पापं उघडकीस येऊन, आपल्यांत कोणते दोष आहेत हे समजावं म्हणूनच देवानें नियमशास्त्र दिलें. तें पाप उघडकीस आणते व म्हणते, "तूं पाप केलेस. मी सांगितल होत की खून करू नको तरी तू खून केलास. तू आज्ञाभंग कां केलास?" "तूं पाप केलेस मी सांगितल होत की खून करू नको तरी तू खून केलास. तू आज्ञाभंग कां केलास?"
नियमशास्त्र लोकांच्या मनांतील पाप उघडकीस आणते. असं समजा की मी रस्त्याने चालत आहे. एका शेतांत मला छान पिकलेली कलिंगडं दिसतात. देवाने मला नियमशास्त्रांत ताकीद दिलेली आहे. "ही कलिंगडं तूं खाण्यासाठी तोडून घेऊ नकोस. जर तूं घेशील तर मी लज्जित होईन." "होय बाबा." "हे शेत मिस्टर अमूक तमूकचं आहे म्हणूनच तूं ती घेऊ नकोस." "होय बाबा." ज्या वेळी आपल्याला समजतं की आपण नियमाप्रमाणे घ्यायला नको त्याचवेळी ते घेण्याची आपल्याला तीव्र इच्छा होते. एखादा झरा आपण खाली दाबायचा प्रयत्न केला तर तो उसळी मारून वर येतो तसंच लोकांच्या पापाचं आहे.
देवानें आपल्याला सांगितले की वाईट कधीच करू नका. देव पूर्णपणे पवित्र आहे म्हणून तो तसं म्हणतो. पण आपण सत्कृत्य कधी करीत नाही आणि पाप न करण्याचें पण करीत नाही. नियमशास्त्र `करू नको` असं कां म्हणते? कारण लोकांच्या मनांत पाप आहे आणि ते त्याप्रमाणे वागतात. आपल्या मनांत व्यभिचार आहे म्हणून आपण व्यभिचार करतो.
आपण बायबल नीट काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. जेव्हां मी प्रथम येशूवर वि·श्वास ठेवला तेव्हां तो बायबलच्या शब्दाप्रमाणे ठेवला. मी वाचलं की येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. त्यावेळी मला माझं रडणे थोपवणे कठीण झाले. मी इतका पापी आहे की तो माझ्यासाठी खांबावर मेला! माझ्या अंतःर्यामी इतक्या भयंकर वेदना झाल्या की मी येशूवर वि·श्वास ठेवू लागलो. पण मी ठरवलं की `वि·श्वास ठेवायचाच तर तो बायबलच्या शब्दांवर आधारित असाच ठेवीन.`
मी निर्गमचा 20 वा अध्याय वाचला होता. त्यांत म्हटलेलं आहे, "माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत." त्यावेळी पश्चाताप होऊन मी प्रार्थना केली. माझ्या स्मृतिभांडारांत वेगळे कांही देव आहेत का किंवा मी कधी परमेश्वाराचे नांव व्यर्थ घेतलेले आहे का किंवा इतर देवांच्या मी पाया पडलो का हे शोधण्याचा मी जेव्हां प्रयत्न केला तेव्हां मला कळून चुकले की मी, रिवाजाप्रमाण माझ्या पूर्वजांच्या देवांच्या पाया खूप वेळा पडलो होतो. स्वतःकडे वेगळे देव असण्याचं मोठं पाप मी केलं होतं.
म्हणून मग मी पश्चातापयुक्त प्रार्थना केली, "परमेश्वारा, मी इतर देवांची पूजा केली. त्याबद्दल माझा न्याय व्हायला पाहिजे. पण कृपा करून तू मला माफ कर. मी परत कधी असं करणार नाहीं." म्हणून मग त्यावेळी त्या एका पापाची दखल घेतली गेली.
परमेश्वाराचें नांव मी कधी व्यर्थ घेतले आहे का असं आठवण्याचा मी प्रयत्न केला तेव्हां लक्षांत आले की मी प्रथम जेव्हां देवावर वि·श्वास ठेवला त्यावेळी मी सिगरेट ओढीत असे. माझे मित्र मला म्हणत, "तू सिगरेटी ओढून देवाच्या नांवाला काळीमा आणीत आहेस. ख्रिस्ती माणूस कसा काय सिगरेट ओढूं शकतो?"
हे सर्व परमेश्वाराचें नांव व्यर्थ घेण्यासारखेच होते नाही का? म्हणून मी पुन्हां प्रार्थना केली, "परमेश्वारा, तुझें नांव मी व्यर्थ घेतलें. कृपा करून मला माफ कर. मी सिगरेट ओढणे सोडून देईन." सिगरेट सोडून देण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तरीहि सिगरेट पेटवायची, विझवायची हे असं वर्षभर चालूच राहिले. सिगरेट सोडणे हे मला फार कठीण व अशक्यप्राय असे झाले होते पण शेवटी सिगरेटचं हे व्यसन कायमचं सोडणे मला जमलं. मला वाटले की आणखी एका पापाची दखल घेतली गेली.
मग त्यानंतर "शब्बाथ दिवस पवित्रपणें पाळ" त्याचा अर्थ रविवारी कोणतंहि काम करायचे नाही; धंदा करायचा नाही किंवा पैसे कमवायचे नाही..... म्हणून मग मी काम करण्याचें बंद केले!
त्यानंतर "आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख" मी माझ्या आईवडलांपासून दूर असतांना फक्त त्यांचा मान राखीत असे पण जवळ असतांना मी त्यांच्या अंतःकरणास वेदनाच देई. "अरेरे! मी देवापुढे केवढे पाप केले. परमेश्वारा, कृपया मला माफ कर" मी पश्चातापीत होऊन अशी प्रार्थना केली.
आता मी माझ्या आईवडलांचा आणखी मान राखू शकत नाही कारण ते केव्हांच मेले आहेत, मग आता मी काय करू शकतो? "परमेश्वारा, मला माफ कर कारण मी पापी आहे. तूं माझ्यासाठी खांबांवर मेलास." मी त्याबद्दल किती आभारी आहे!
मला वाटले की अशा प्रकाराने मी माझ्या प्रत्येक पापाची दखल घेतली. पण आणखी पुष्कळ नियम आहेत; खून करू नको, व्यभिचार करू नको, लोभ धरूं नको..... मग माझ्या ध्यानांत आले की मी एक सुध्दां नियम नीट पाळलेला नाही. सबंध रात्रभर मी प्रार्थना केली. तुम्हांला माहित आहे का की अशी पश्चातापाची प्रार्थना करण्यांत कांही मजा नसते. आपण त्याबद्दल आता बोलू.
जेव्हां मी येशूच्या वधस्तंभावरील दुःखसहनाबद्दल विचार केला तेव्हां त्याच्या यातनामय मरणाची मला जाणीव झाली. मी त्याच्यावर किती प्रेम करीत आहे असा विचार करून सबंध रात्रभर रडत होतो. त्यानेच मला खरा आनंद दिला म्हणून मी त्याचें आभार मानले.
चर्चला नियमितपणें जायचे हे पहिल्या वर्षी मला खूप सोपं वाटले होते पण नंतर एक दोन वर्षांत ते कठीण वाटू लागले कारण कितीहि विचार केला तरी माझ्या डोळ्यांतून पाणी येईनासे झाले!
कांही केल्या डोळ्यांतून पाणी येईनासे झालें तेव्हां मी 3 दिवस उपास करून पर्वतांवरती प्रार्थना करण्यासाठी जाऊ लागलो तेव्हां कृठे डोळ्यांत पाणी येऊ लागले. मग अश्रूभरल्या डोळ्यांनी मी माणसांत आलो आणि तडक चर्चला जाऊन तेथे ढसढसा रडलो! माझ्या बाजूचें लोक मला म्हणाले, "पर्वतांवर प्रार्थना करण्याने तुम्ही खूप पवित्र झाला आहात." पण अनपेक्षितपणें माझ्या डोळ्यातील पाणी आटून गेले. तिसरे वर्ष खूप कठीण गेले. माझे मित्र व ख्रिस्ती सहकारी यांच्याबरोबर मी नीट वागलो नसेन या विचाराने मी रडायचो, पण 4 वर्षानंतर माझे अश्रू सपशेल आटून गेले. माझ्या डोळ्यांत अश्रू पींडे होती पण ती नीट काम करेनाशी झाली!
5 वर्षानंतर मी कितीहि प्रयत्न केला तरी रडू शकत नव्हतो. कांही काळ माझें नाक गळायला लागले होते. पण एक दोन वर्षात वैतागून मी पुन्हां बायबलकडे वळलो.
नियमशास्त्र हे पापांची जाणीव होण्यासाठी आहे
नियमशास्त्राबाबतींत आपण काय
समजून घ्यायला हवे?
आपण नियमशास्त्र पाळू
शकत नाही हेच.
प्रेषित पौलाने रोमकरांस पत्र 3:20 यांत म्हटलें आहे, "नियमशास्त्राच्या द्वारें पापांची जाणीव होते" काही काळाने माझें डोळ्यातील पाणी आटून गेले तेव्हां वि·श्वासपूर्वक जगणें मला कठीण वाटू लागले.
म्हणून मग मी सातत्याने पापच करीत राहिलो. माझ्या ह्मदयांत पाप असल्यामुळे नियमशास्त्राप्रमाणे जगणें मला अशक्य असे वाटायला लागले. मला ते असह्र झाले पण ते टाळता येत नव्हते, कारण माझा वि·श्वास होता की नियमशास्त्र पाळण्यासाठीच दिलेले आहे. अखेरीस बायबलमधल्या शास्त्रीप्रमाणे मी बनलो आणि वि·श्वासपूर्वक आयुष्य जगणे मला कठीण होऊन गेले.
ह्रा दगदगीतून सुटका होण्यासाठी मी उपदेशकाचा शोध घेऊ लागलो. मला वाटले की तो पाण्यानें व आत्म्यानें जन्मण्यासंबंधी कांही सांगेल. मी एकाला भेटलो त्याने उपदेश केला की आपल्याला आपल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळालेली आहे.
जेव्हां जेव्हां मी ऐकायचो की मी निष्पाप आहे तेव्हां तेव्हां माझ्या ह्मदयांतून स्वच्छ हवेची झुळुक वहात आहे असं मला वाटायचे. मी नियमशास्त्र वाचू लागलो तेव्हां मला पापांची जाणीव झाली. मला कळून चुकले की माझ्या ह्मदयांत मी देवाच्या सर्व दहा आज्ञा मोडलेल्या आहेत. मग मी कुठेतरी नियमशास्त्रावर वि·श्वास ठेवणारा बनलो.
जेव्हां मी नियमशास्त्र पाळायचो तेव्हां मी अगदी खुषींत असायचो पण ते पाळले नाही तर मग मी अगदी त्रस्त, चिडचिडा व दुःखी होत असे. शेवटी मला ह्रा सर्वाचाच कंटाळा आला. हे सर्व आधीपासूनच शिकवले असते तर, "नाही नाही नियमशास्त्राचा दुसरा अर्थ आहे. ते तुम्हांला दाखवून देते की तुम्ही म्हणजे एक पापाचा गोळा आहे. तुम्हाला पैशाबद्दल, शारिरीक आकर्षणाबद्दल, सुंदर वस्तुंबद्दल देवापेक्षां जास्त प्रेम आहे. तुम्ही जगाचें अनुसरण करता. नियमशास्त्र हे कांही तुम्हांला पाळण्यासाठी दिलेले नाही आहे तर तुम्ही पापी आहांत आणि तुमच्या मनांत पाप आहे हे समजावे म्हणूनच दिलेले आहे.
कोणीतरी मला हे सर्व आधीच शिकवले असते तर 10 वर्षे मला त्रास सहन करावा लागला नसता. डोक्यांत अक्कल येईपर्यंत मला 10 वर्षे नियमशास्त्राखाली रहावे लागले.
चौथी आज्ञा आहे, "शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणें पाळ." याचा अर्थ असा आहे की शब्बाथ दिवशी आपण कोणतेहि काम करायला नको. याचा अर्थ आपण चालू शकतो पण दूरच्या ठिकाणीं वहानाने प्रवास करू शकत नाही. आणि मी मग विचार केला की जेथे उपदेश द्यायचा आहे त्या ठिकाणी चालतच जायला पाहिजे. कांही झाले तरी शेवटी मी नियमशास्त्रासंबंधीच उपदेश करणार आहे. माझा उपदेश माझ्या आचरणातून दाखवायला पाहिजे असा मी विचार केला. पण हे सर्व इतके कठीण होऊन बसले की मी हे आचरण सोडून देणार होतो.
"तुझ्या वाचनांन काय आलें आहे?" हा प्रश्न समजून न घेतल्यामुळे मी 10 वर्षे त्रास सहन केला. शास्त्रीनी सुध्दा त्या प्रश्नाबद्दल गैरसमज केलेला होता. त्याला वाटले होते की नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळले. तर देवासमोर तो आशीर्वादीत होईल.
पण येशूनें त्याला म्हटले, "तुझ्या वाचनांत काय आलें आहे?" होय, तू ठीक उत्तर दिलेस. तू लिहिलेलं शब्दशः घेतो आणि ध्यानांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. तू ते पाळलेस तर जगशील; नाही पाळले तर मरशील. पापाचें वेतन मरण आहे. "नाही पाळले तर मरशील" (जीवनाच्या विरूध्द शब्द मरण आहे, नाही का?)
पण त्या शास्त्रीला कांही केल्या समजलेच नाही. तो शास्त्री म्हणजेच आपण, तुम्ही आणि मी आहे. मी धर्माचा 10 वर्षे अभ्यास केला. मी सर्व कांही करायचा प्रयत्न केला, सर्व कांही वाचले, उपासतापास केले....... वेगळ्या भाषांत बोलण्याचा प्रयत्न केला..... 10 वर्षे बायबल वाचले आणि अशी आशा ठेवली की मी कांहीतरी करून दाखवीन. पण आत्मिक द्दष्टीने मी आंधळा बनलो होतो.
म्हणूनच पापी माणसाला कोणीतरी भेटावा लागतो जो त्याला प्रभू येशूचे खरे रूप दाखवण्यास मदत करतो. मग तो भानावर येऊन म्हणतो, `हाय, मी नियमशास्त्र पाळू शकत नाही.` नियमशास्त्र पाळण्याचा प्रयत्न करण्यापायी मी मरून पण जाऊ शकतो. पण येशू आत्मा व पाणी यांच्या द्वारे आपला उध्दार करण्यासाठी आला. हालेलूया! आत्मा व पाणी यांच्या द्वारे उध्दार होण्याची देणगी देवाने दिलेली आहे. म्हणूनच आपण परमेश्वाराची स्तुति करू.
असहायतेच्या रस्त्याने जाऊन पदवीधर बनण्यांत मी नशिबवान ठरलो. कांही लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य धर्माचें अध्ययन करण्यांत निरर्थकपणे घालवतात आणि मरणाचा दिवस येऊन ठेपला तरी सत्य म्हणजे काय ते त्यांना समजत नाही. कांही जण पिढयानपिढया वि·श्वास ठेवतात पण ते नव्याने जन्मलेले नसतात.
जेव्हां आपल्याला समजते की आपण पापी आहोत आणि नियमशास्त्र पाळू शकत नाही त्यावेळी येशूसमोर उभे राहून त्याची आत्मा व पाणी याची सुवार्ता आपण ऐकली तरच आपल्याला पदवी मिळू लागते. येशूला भेटल्यानंतर आपली न्यायनिवाड¬ापासून सुटका होऊन आणखी पण पदवी मिळते. आपण फार भयंकर पापी आहोत तरीहि आपण नीतिमान बनतो कारण येशूने आपल्याला पाणी व रक्त याच्या द्वारे वाचवले आहे.
शास्त्रीला येशूचे बोलणे समजले नाही म्हणून येशूने त्याला पुढील गोष्ट सांगितली.
वि·श्वासाच्या आयुष्यांत माणसं अपेशी
ठरण्याचें काय कारण आहे?
पाप.
"एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोस जात असतांना लुटारूंच्या हातीं सांपडला` त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले." (लूक 10:30) येशू त्याला सांगत होता की लुटारूंकडून मार खाऊन अर्धमेला झालेल्या माणसाप्रमाणेच त्याने सुध्दां सबंध आयुष्यभर खूप सहन केले.
एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोस जात होता. यरीहो शहर अधार्मिक जगाचें प्रतिनिधीत्व करते तर यरूशलेम शहर, एक धार्मिक वि·श्वासाचे शहर जेथे नियमशास्त्राची प्रौढी मिरवणारे रहातात अशा जगाचें प्रतिनिधित्व करते.
यरूशलेम त्यावेळी पुष्कळ लोकसंख्या असलेले मोठे शहर होते. तेथे मुख्य याजक, इतर याजक मंडळी, लेवी आणि इतर धार्मिक प्रतिष्ठित लोक रहात असत. नियमशास्त्राप्रमाणें चालणारे पुष्कळ लोक तेथे होते आणि ते यरीहोच्या (अधार्मिक) शहराकडे चालले होते म्हणूनच ते लुटारूंच्या हातीं सांपडले.
जो माणूस लुटारूंच्या हातीं सांपडला त्याचे कपडे त्यांनी काढून घेतले. "कपडे काढून घेतले गेले" याचा अर्थ त्या माणसानें त्याचे नीतिमत्त्व गमवले. नियमशास्त्राप्रमाणे चालणे हे अगदी अशक्य आहे.
प्रेषित पौलाने रोमकरांस पत्र 7 मध्ये म्हटलें आहे, "कारण जें चांगलें करावेंसें मला वाटतें तें मी करीत नाहीं; तर करावेंसें वाटत नाही असें जें वाईट ते मी करितों. जें करावेंसें वाटत नाही ते जर मी करितो; तर ते कर्म मीच करितो असें नव्हे, तर माझ्या ठायीं वसणारें पाप तें करितें."
मला वाटतं की देवाच्या शब्दाप्रमाणे राहून मी चांगलं कांही करू शकेन पण माणसाच्या ह्मदयांत वाईट विचार, जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार मूर्खपणा आहेत. (मार्क 7:21-23).
हे असे वाईट आपल्या ह्मदयातून अधून मधून बाहेर येत असते. जे आपण करायला पाहिजे ते आपण करीत नाही आणि जे करायला नको तेच आपण करीत असतो. आपण आपल्या ह्मदयांत पुन्हां पुन्हां पाप करीत राहातो. आपल्याला पापे करण्याची प्रेरणा देणे एवढं एकच काम सैतानाला करावे लागते.
संपूर्ण मानवजातीच्या ह्मदयांतील पापें
आपण नियमशास्त्राप्रमाणे
जगू शकतो का?
नाहीं.
मार्कच्या 7 व्या अध्यायांत म्हटलें आहे; "जें कांही बाहेरून माणसाच्या आंत जातें तें त्याला भ्रष्ट करू शकत नाही, पण जें माणसांतून बाहेर निघतें तेंच माणसाला भ्रष्ट करितें."
येशू आपल्याला असं सांगतो की वाईट विचार, जारकर्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा या सर्व गोष्टी माणसाच्या ह्मदयांत आहेत. आपल्या ह्मदयांत खून आहे.
असा एकहि जण नाही की तो खून करत नाही. आया त्यांच्या मुलांवर ओरडतात, "असं करू नको. मी तुला किती तरी वेळा सांगितले की असं करू नको. हे केल्याबद्दल मी तुला मारूनच टाकीन" अस बोलणे हे खून करण्यासारखे आहे.
आपली मुलं आपल्यापासून फार लवकर दूर जातात म्हणून ती जीवंत असायला हवी. पण आपण जर आपला सर्व राग त्यांच्यावर काढला तर ते लवकर मरतील. कधी कधी आपण मुलांना मारहाण करतो नंतर मग त्यांच्या जखमा, वण पाहिल्यावर आपण म्हणतो, `अरे देवा! मी असं कां केले?` आपण हा वेडेपणा केला असा विचारही करतो. हे असं वागण्याचे कारण हेच की आपल्या ह्मदयांत खून आहे.
`जे करावेसे वाटत नाही ते मी करितों` याचा अर्थ हाच की आपण वाईट तेच करतो कारण आपण मूळातच वाईट आहोत. म्हणूनच पाप करण्यासाठी आपल्याला परावृत्त करणे सैतानाला खूप सोपं वाटते.
असं समजू की पापमुक्ती झालेली नाही असा माणूस एका झोपडींत 10 वर्षे भिंतीकडे तोंड करून प्रसिध्द कोरियन साधू संगचोल प्रमाणे ध्यानस्थ बसलेला आहे. भिंतीकडे तोंड करून बसणे वगैरे सगळं छान आहे पण कोणीतरी येऊन जेवण द्यायला पाहिजे आणि त्याची घाण काढली पाहिजे.
म्हणजेच त्याचा कुणाबरोबर तरी संपर्क असायला हवा. आता तो संपर्क एखाद्या माणसाबरोबर असेल तर ठीक आहे पण जर ती सुंदर स्त्री असेल आणि त्याने तिला पाहिलेच तर त्याचं हे ध्यानस्थ बसणं वाया जाईल. तो माणूस मनांत विचार करेल, "मी व्यभिचार करायला नको. माझ्या ह्मदयांत तो आहे. मी तो मनांतून काढून फेकून द्यायला पाहिजे!"
पण ज्या क्षणीं तो तिला पहातो त्या क्षणीं त्याचा ठाम निश्चय विरघळून जातो. ती स्त्री निघून गेल्यानंतर त्याला कळून चुकते की त्याची 5 वर्षाची खडतर तपस्या वाया गेली! एखाद्या माणसाची नैतिकता काढून नेणे सैतानाला खूप सोपं वाटते. सैतान फक्त त्याला थोडासा धक्का देण्याचें काम करतो. तारण झालेले नाही असा माणूस जेव्हां कष्ट करतो तेव्हां तो पापांत जास्त रूतला जातो. तो दर रविवारी नियमितपणे दशमांश देतो, 40 दिवस उपास करतो, 100 दिवस सकाळच्या प्रार्थना करतो पण सैतान त्याला जगाच्या आकर्षक वस्तूंच्या मोहांत पाडतो.
"एका कंपनीच्या उच्च पदावर तुला काम देणे मला आवडेल पण तू ख्रिस्ती आहेस आणि रविवारी तर तुला काम करता येत नाही. खर आहे ना? ते काम चांगल्या हुद्द्यांचें आहे. तू तीन रविवारी काम करून महिन्यातून एकदा चर्चला जाऊ शकतोस. मोठी जागा व भरपूर पगार यामुळे तू मजेंत रहाशील. तुला कसं काय वाटते?" अशा प्रकारे सैतानाला 100 पैकी 100 मार्कस् मिळण्याची दाट शक्यता आहे.
ही गोळी जर लागू नाही पडली तर बाई किंवा स्त्री म्हटले की विरघळलाच अशा माणसाच्या मागे सैतान लागतो. तो त्या माणसाच्या समोर एखादी बाई उभी करतो. तिला पाहिले की हे महाशय तिच्या प्रेमांत पडून त्याचक्षणीं देवाला विसरून जातात. अशा प्रकारें माणसाची नैतिकता लुटली जाते.
आपण जर नियमशास्त्राप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर शेवटी पापाच्या जखमा, वेदना आणि गरिबी हेच आपल्या वाट¬ाला येते आणि आपण आपली सर्व नैतिकता गमवून बसतो. "यरूशलेमहून खाली यरीहोस जात असतांना तो लुटारूंच्या हातीं सांपडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले."
याचा अर्थ असा की पवित्र देवाच्या इच्छेप्रमाणे यरूशलेम मध्ये रहाण्याचा आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी आपल्यातील दुर्बलतेमुळे आपण वारंवार धडपडतो आणि आपले नुकसान होते.
आणि मग पश्चाताप होऊन आपण देवापुढे प्रार्थना करतो "परमेश्वारा, मी पाप केले. मला माफ कर. मी परत कधी असं करणार नाही. मी तुला वचन देतो हे अखेरच आहे. मी तुझ्याकडे दयेची भीक मागतो. ह्रावेळी तूं मला माफ कर."
पण हे जास्ती काळ टिकत नाही. पाप केल्याशिवाय माणसं या जगांत राहूच शकत नाही. ते फार तर एक दोन वेळा पाप करण्याचें टाळू शकतील पण पाप न करणे हे त्यांना अशक्य आहे. म्हणून पापाची पुनरावृत्ती होते, "परमेश्वारा, कृपया मला माफ कर." जर हे असंच चालू राहिले तर ते चर्चपासून (धर्मापासून) दूर जातात. पापांमुळे ते देवापासून पण दूर जातात आणि अखेरीस त्यांचा शेवट नरकाकडे जाण्यांत होतो. यरीहोकडे प्रवास करणे म्हणजे अधार्मिक जगांत पडण्यासारखे आहे. सुरूवातीला यरूशलेम जवळ असते. पण नंतर पाप आणि पश्चाताप अशा चक्रांत आपण सापडलो की आपल्याला समजते की आपण यरीहोच्या रस्त्यांत, म्हणजे भलत्याच जगांत उभे आहोत.
तारण कुणाचे होऊ शकते?
जो स्वतःहून प्रयत्न करणे सोडून
देतो त्यांचे.
यरीहोच्या रस्त्यावर माणसाला कोण भेटले? त्याला लुटारू भेटले. जो नियमशास्त्राप्रमाणें अजिबात रहात नाही तो नीच कुत्र्याप्रमाणे बनतो. तो पितो, कुठेहि झोपतो, कोणत्याहि ठिकाणीं मुततो. हा कुत्रा सकाळी उठतो, पुन्हां पितो. नीच कुत्रा स्वतःचीच घाण पण खाईल म्हणूनच तो कुत्रा असतो. त्याला माहित असते की प्यायला नको तरीपण सकाळी तो पुन्हां पितो.
यरीहोच्या रस्त्यावर लुटारू भेटलेल्या माणसाप्रमाणे हे सर्व आहे. त्याला जखमी अर्धमेल्या स्थितींत सोडून दिले गेले. माणूस हा अशा प्रकारे आहे. त्याच्या मनांत नुसते पाप आहे.
लोक येशूवर वि·श्वास ठेवून आणि नियमशास्त्राप्रमाणें वागून यरूशलेममध्ये रहातात खरे पण त्यांच्या ह्मदयांत पाप तसेच राहून गेलेले असते. त्यांच्या धार्मिक जीवनांत ते फक्त त्यांच्या पापाच्या जखमा दाखवू शकतात. ज्यांच्या ह्मदयांत अशा प्रकारे पाप राहून गेलेले आहे ते नरकांत टाकले जातात. त्यांना ते माहित असते पण काय करायचे ते त्यांना समजत नाही. मी आणि तुम्ही सर्वजण अशाच स्थितींत आहोत की नाही? होय. आपण समान स्थितींत आहोत.
शास्त्रीने देवाचें नियमशास्त्र समजून घेतले नाही म्हणूनच त्यानें सबंध आयुष्यभर परिश्रम केले पण शेवटी जखमी होऊन त्याचा शेवट नरकांत झाला. तो शास्त्री म्हणजेच आपण सर्वजण, तुम्ही आणि मी आहे.
फक्त येशूच आपल्याला वाचवू शकतो. आपल्याभोवती कितीतरी हुशार माणसे आहेत पण ती सर्वजण त्यांच्या हुशारीचें. नुसते प्रदर्शन करतात. देवाचें नियमशास्त्र पाळत असल्याचें ते नुसते नाटक करतात. ते स्वतःशीच प्रामाणिक नसतात. ते फावड¬ाला फावडे म्हणू शकत नाही. बाहेरून वि·श्वासू दिसण्यासाठीं ते खूप आटापीटा करतात.
यरीहोच्या रस्त्याने अनेक पापी जात आहेत. कांही जण चोरलुटारूंकडून मारहाण खातात तर कांही जण मरतात. देवापुढे आपण किती दुर्बल, हतबल आहोत हे आपल्याला समजायला पाहिजे.
म्हणूनच आपण देवापुढे कबूल करायला हवे, "परमेश्वारा, तू जर मला वाचवले नाहीस तर मी नरकांत जाईन. गारांच्या वर्षावांत किंवा वादळांत जिथे कुठे मी जावे अशी तुझी इच्छा आहे तेथे मी तुझी खरी सुवार्ता ऐकण्यासाठी जाईन. तूं जर मला सोडलेस तर मी नरकांत जाईन. मजवर दया कर आणि मला वाचव."
ज्यांना माहिती आहे की ते नरकाकडे चालले आहेत, जे स्वतःहून परिश्रम करणें सोडून देतात ते वाचू शकतात. आपण आपल्याच प्रयत्नांनी कधी वाचू शकत नाही.
लुटारूंच्या हांती सापडलेल्या माणसाप्रमाणे आपण आहोत हे आपण समजून घ्यायला पाहिजे.