(योहान 8:1-12)
"पण येशू जैतूनांच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हां मंदिरांत आला तेव्हां सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवूं लागला. त्यावेळीं व्यभिचार करीत असतांना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्रांनीं त्याच्याकडे आणिलें, व तिला मध्यें उभे करून तें त्याला म्हणाले, गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असतांना धरण्यांत आली, मोशेनें नियमशास्त्रांत आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयीं काय म्हणता? त्याला दोष लावावयाला आपणांस कांहीतरीं मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरितां ते असें म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटानें जमिनीवर लिहूं लागला; आणि ते त्याला एकसारखे विचारीत असतां तो उठून त्याना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हां खाली ओणवून जमिनीवर लिहूं लागला. हे शब्द ऐकून वृध्दांतल्या वृध्दांपासून तों थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेंच ती स्त्री मध्यें उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथें कोणी नाहीं असें पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठें आहेत? प्रभुजी, कोणीं नाहीं. तेव्हां येशू तिला म्हणाला, मीहि तुला दंड ठरवींत नाहीं; जा, ह्रापुढें पाप करूं नकों." "पुढें येशू पुन्हां त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारांत चालणारच नाहीं, तर त्यांच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."
येशूनें किती पाप नाहीसे केले?
जगांतील सर्वच पापे.
येशूने आपल्याला सार्वकालिक मुक्ति दिली. जगामध्ये असा कोणीहि नाही की ज्याने तारणकत्र्या येशूवर वि·श्वास ठेवलेला आहे पण त्याला मुक्ति मिळालेली नाही. त्यानें सर्वांनाच मुक्ति दिलेली आहे. जर एखादा पापी त्याच्या पापांबद्दल दुःख करीत असेल तर त्याचें कारण हेंच की येशूने बाप्तिस्म्याच्या द्वारे त्याची पापें घेतली आणि त्याला मुक्ति दिली हे तो समजून घेत नाही.
तारणाचें रहस्य आपण जाणून घ्यायला हवे. बाप्तिस्म्याच्या द्वारे येशूने आपणा सर्वांची पापे स्वतःकडे घेतली आणि त्या पापांची शिक्षा म्हणून तो आपल्यासाठी खांबावरती मरण पावला.
पाणी व आत्मा यांच्या योगे सर्व पापांपासून सार्वकालिक मुक्ति मिळते ह्राच्यावर तुम्ही वि·श्वास ठेवायला पाहिजे. त्याच्या महान प्रेमामुळे तुम्ही नीतिमान बनला आहांत हे लक्षांत घ्या. तुमचें तारण व्हावे यासाठी त्यानें यार्देन नदीत आणि वधस्तंभावर काय केले ह्राच्यावरती तुम्ही वि·श्वास ठेवा.
आपल्या ठायी दडून बसलेली पापं येशूला माहित होती. कांही लोक पापाबद्दल चुकीची कल्पना करतात. त्यांना वाटते कांही पापांपासून मुक्ति मिळत नाही. येशूने सर्व पापांपासून म्हणजेच प्रत्येक पापापासून मुक्ति दिलेली आहे.
जगामध्ये असं कोणतेहि पाप नाही की ते राहून गेले आहे. जगातल्या सर्व पापांपासून त्यानें मुक्ति दिली म्हणून आता पापी लोक नाही आहेत. तुम्हांला तुमच्या सर्व पापांची, एवढंच काय पण तुमच्या भविष्यकाळातील पापांची सुध्दां मुक्ति मिळालेली आहे ही सुवार्ता तुम्हांला माहित आहे का? तिच्यावर वि·श्वास ठेवा आणि तारण होऊन देवाच्या गौरवांत या.
व्यभिचारी स्त्री
जगांत किती लोक व्यभिचार
करतात?
सर्व लोक.
योहानाच्या 8 व्या अध्यायांत व्यभिचारी स्त्री बद्दल लिहिले आहे. येशूने तिला कसे वाचवले याबद्दल आपल्याला त्यांत दिसून येते. त्या स्त्रीला कशी कृपा मिळाली याबद्दल आपण पाहू. आपण सर्वजण आयुष्यभर व्यभिचार करीत असतो हे म्हणणे कांही अतिरेकी नाही. प्रत्येकजण व्यभिचार करीत असतो.
वरकरणी तसं नसेल पण आपण इतके वेळां व्यभिचार करतो की आपल्या लक्षांत येत नाही. असं कां? याचे कारण हेच की आपण व्यभिचाराने भरलेले असे आयुष्य जगतो.
मी स्त्रीकडे पहातो तेव्हां विचार करतो की आपल्यांत असा कोणी आहे का की ज्याने कधीही व्यभिचार केलेला नाही. त्या व्यभिचारी स्त्री प्रमाणेच असा कोणीच नाही की ज्याने व्यभिचार केला नाही. सर्वांनीच केलेला आहे. आपण नुसतं वरून दाखवतो की आपण असं कांही केले नाही.
मी चुकीचे बोलत आहे असं तुम्हांला वाटते का? नाही. मी बिलकूल चूक नाही. तुम्ही आत्मपरिक्षण करा. ह्रा भूतलावर प्रत्येकाने व्यभिचार केला आहे. रस्त्याने जात असलेल्या स्त्रीकडे एकटक पहाणारे व्यभिचार करतात; त्यांच्या विचारांत कृतीत, कधीहि, कुठेहि ते व्यभिचारच करतात.
ते अस कांही करीत आहेत हे त्यांना समजत नाही. अनेकांना मरेपर्यंत समजत नाही की त्यांनी त्यांच्या आयुष्यांत खूप वेळां व्यभिचार केलेला आहे. जे पकडले जातात तेच नाही तर जे आपण पकडले जात नाही त्यांनासुध्दां समज नाही. सर्व लोक वागण्याने, मनानें व्यभिचार करतात आणि असं वागण्याची सवय होते नाही का?
तुम्ही अस्वस्थ झालात का? पण हे खरं आहे. आपल्याला लाज वाटते म्हणून आपण सारवासारव करतो. मला माहित आहे की हल्ली लोक नेहमीच व्यभिचार करतात पण त्यांना समजत नाही की ते तसं करीत आहेत.
लोक त्यांच्या अंतःकरणांत पण व्यभिचार करतात. आपल्याला देवाने निर्माण केलेले आहे आणि ह्रा भूतलावर रहात असतांना नकळतपणें आपण स्वतःच्या अंतःकरणांत व्यभिचार करतो. इतर देवांची भक्ति करणें हा एक आत्मिक व्यभिचार आहे. फक्त परमेश्वर हा संपूर्ण मानवजातीचा पती आहे.
व्यभिचारी स्त्री आपल्यासारखीच होती. जशी आपल्याला पापमुक्ति मिळाली तशीच तिला सुध्दां देवाची कृपा मिळाली. पण ढोंगी परूश्यांनी तिला मध्यभागीं उभे करून तिची निंदानालस्ती केली जणूं कांही ते स्वतः फार पवित्र असे न्यायाधिश होते. ते तिला दगडमार करायला निघांले होते जसं कांही त्यांनी स्वतः कधी व्यभिचार केलाच नव्हता.
ख्रिस्ती बांधवांनो, आपण पापी आहोत हे तुम्हांला माहित आहे म्हणूनच कोणाचाहि न्यायनिवाडा करू नका. दुसरे लोक सबंध आयुष्यभर व्यभिचार करीत असले तरी व्यभिचारी स्त्री प्रमाणे त्यांना देवाची कृपा व पापमुक्ति मिळू शकते.
देवाची कृपा कोणाला मिळते?
देवाची कृपा कोणाला मिळते?
ज्यांची पात्रता नाही त्यांना.
जो माणूस व्यभिचार न करता शुध्द रहातो त्याला देवाची कृपा मिळते की जो अपात्र आहे त्याला मिळते? ज्यांची पात्रता नाही आणि जे असहाय कमकुवत दुर्बल असे आहेत त्यांच्यावरच देवाची कृपा जास्त असते आणि त्यांना पापमुक्ति मिळते.
जे स्वतःला निष्पाप समजतात त्यांना पापमुक्ति मिळत नाही. पापमुक्ति होण्यासाठीं त्यांच्याजवळ पापच नसेल तर त्यांना देवाची कृपा कशी काय मिळणार?
व्यभिचार करीत असतांना धरलेल्या स्त्रीला शास्त्री व परूशी ह्रांनीं तिला ढकलत फरफटत आणून येशूसमोर मध्ये उभे केले आणि विचारले, "गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असतांना धरण्यांत आली, तर आपण हिच्याविषयीं काय म्हणता?" त्यांनी त्या स्त्रीला समोर आणून त्याची परीक्षा कां घेतली?
त्यांनी स्वतः खूप वेळा व्यभिचार केलेला होता. पण ते व्यभिचारी स्त्रीचा न्यायनिवाडा करून येशूकरवी तिला मारून त्याला दोषी ठरवायला पहात होते.
त्यांच्या मनांत काय विचार चालले आहेत हे येशूला समजले होते आणि त्या स्त्रीबद्दलहि त्याला पूर्ण माहिती होती. म्हणूनच तो म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड टाकावा." मग शास्त्री आणि परूशी, आणि वृध्दांपासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा आणि ती स्त्री तेथे राहिली.
व्यभिचारी स्त्रीचा न्याय करायला निघालेले शास्त्री व परूशी हे धर्मगुरू होते पण ते असे वागले की जसे कांही त्यांनी स्वतः कधीच पाप केले नव्हते.
येशूनें जगाला प्रेमाचा संदेश दिला. तो प्रेमस्वरूप होता. येशूने लोकांना अन्न दिलें, मेलेल्यांना जिवंत केले, विधवेच्या मुलाला मरणातून उठवले, लाजारसला जिवंत केले, कृष्ठरोग्यांना बरे केले, आणि गरिबांसाठी पुष्कळ चमत्कार केले. पापी लोकांची सर्व पापें त्यानें स्वतःकडे घेऊन त्यांचे तारण केले.
येशू आपल्यावर प्रेम करतो. तो सर्वसमर्थ आहे आणि कांहीहि करू शकतो. पण शास्त्री व परूशी त्याला स्वतःचा शत्रू समजले. म्हणूनच त्यांनी परीक्षा घेण्यासाठी व्यभिचारी स्त्रीला त्याच्यासमोर आणले.
त्यांनी विचारले, "गुरूजी, मोशेनें नियमशास्त्रांत आम्हांला अशी आज्ञा दिलीं आहे की अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्यांना वाटले होते की तो त्यांना दगडमार करण्यास सांगेल. कां बरे? कारण नियमशास्त्रांत तसं लिहिले होते आणि त्याला अपवाद नव्हता.
खरं म्हणजे सर्वजण दगडमाराने मृत्यु होऊन नरकांत जाण्याच्या लायकीचे आहेत. कारण पापाचें वेतन मरण आहे. पण येशू त्यांना दगडमार करा असं म्हणण्याऐवजी म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड पाकावा.
613 नियम असलेले नियमशास्त्र
देवानें आपल्याला कां दिले?
आपण पापी आहोत हे आपल्याला
समजावे म्हणूनच दिले.
देव पवित्र आहे आणि त्याचें नियमशास्त्र पण पवित्र आहे. त्यामध्ये 613 नियम आहेत. आपल्यांत उणीवा आहेत आणि आपण पापी आहोत हे समजावे म्हणूनच देवानें नियमशास्त्र दिलें. तारण होण्यासाठी आपल्याला देवाच्या कृपेची जरूर आहे असंच नियमशास्त्र सांगते. हे जर आपल्याला माहिती नसते आणि शास्त्रांत काय लिहिले आहे याचाच आपण विचार करीत असतो तर आपल्या वाटट्याला व्यभिचारी स्त्री प्रमाणेच दगडमाराची शिक्षा आली असती.
शास्त्री व परूशी यांना नियमशास्त्रांतील सत्य समजलेले नव्हते म्हणूनच त्यांनी विचार केला असेल की ते असहाय स्त्रीवरती आणि आपल्यावरतीसुध्दां दगडमार करू शकतात. जरी ती स्त्री व्यभिचार करीत असतांना पकडली गेली तरी जगामध्ये कोणीहि तिला दगडाने मारू शकत नव्हते.
जर नियमशास्त्राप्रमाणे त्या स्त्रीचा आणि आपल्या प्रत्येकाचा न्याय केला तर आपल्याला आणि त्या स्त्रीला सुध्दां भयानक शिक्षा मिळायला पाहिजे पण येशूने आपल्याला सोडवलेले आहे. देवाचे नियमशास्त्र जर शब्दाप्रमाणे घेतले तर जगांत कोण जिवंत राहील? प्रत्येक जण नरकांतच जाईल.
शास्त्री व परूशी यांना देवाचे नियमशास्त्र लिहिल्याप्रमाणे माहित होते. जर नियमशास्त्राप्रमाणे एखाद्याचा न्याय केला तर तो हमखास मरणारच. खरं म्हणजे लोकांना त्यांची पापं समजावीत म्हणूनच ते दिले गेले. त्याच्याबद्दलचे गैरसमज आणि त्याचा गैरवापर यामुळे लोकांनी खूप त्रास सहन केला.
बायबलमधील परूशीप्रंमाणेच आजच्या परूशी लोकांना सुध्दां नियमशास्त्र माहित आहे. देवाची कृपा, न्याय आणि सत्य त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तारण होण्यासाठीं पापमुक्तीची सुवार्ता त्यांना शिकवायची जरूर आहे.
परूशी म्हणाले, "नियमशास्त्रांत आम्हांला अशी आज्ञा आहे कीं, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयीं काय म्हणतां?" हातांत दगड घेऊन ठाम आत्मवि·श्वासाने त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यांना खात्री होती की येशू ह्रावर कांही बोलू शकणार नाही. त्यांचं हे आव्हान येशू कसा काय घेतो याची ते वाट पहात होते.
येशूनें जर नियमशास्त्राप्रमाणे न्याय दिला असता तर त्यांनीं येशूवर दगडमार केला असता. दोघांवरहि दगडमार करायचा हाच त्यांचा उद्देश होता. जर येशूने स्त्रीवर दगडमार करू नका असं म्हटले असते तर त्याने नियमशास्त्र नाकारून दुर्भाषण केले आहे असा आरोप त्यांनी त्याच्यावर लावला असता. त्यांचं हे कारस्थान केवढे भयानक होते!
पण येशू खालीं ओणवून बोटानें जमिनीवर लिहूं लागला, आणि ते सर्व जण सातत्याने त्याला विचारीत होते, "आपण काय म्हणता? आमच्या प्रश्नाचें उत्तर द्या. जमिनीवर तुम्ही काय लिहित आहात? तर आपल्याला काय म्हणायचे आहे?" त्याच्याकडे बोट दाखवित ते त्याला त्रस्त करीत होते.
येशू उठून त्यांना म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड टाकावा." जेव्हां त्यांनी हे ऐकले तेव्हां त्यांची सद्सद्विवेकबुद्धि त्यांना टोचू लागली म्हणून वृध्दांपासून तों थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटाराहिला आणि तेथेच ती स्त्री त्याच्याबरोबर होती.
तुम्हांमध्यें जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड टाकावा
पापें कुठे लिहून ठेवलेली आहेत?
आपल्या ह्मदयपटावर आणि ज्याच्या त्याच्या
कृत्यांप्रमाणे असलेल्या पुस्तकांत
लिहून ठेवलेली आहेत.
येशूनें त्यांना म्हटलें, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा," नंतर तो जमिनीवर लिहूं लागला. वृध्दांमध्ये ज्यांनी जास्त पापें केली ते प्रथम निघून गेले. नंतर तरूण माणसं पण निघून गेली. असं आपण समजू की येशू आपल्यामध्ये उभा आहे व आपण त्या स्त्रीभोवती उभे आहोत. `तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड टाकावा` असं जर येशू आपल्याला म्हणाला असता तर तुम्ही काय केले असते?
येशू जमिनीवर काय लिहित होता? निर्माणकर्ता देव आपली पापें दोन ठिकाणीं लिहितो.
पहिलं म्हणजे आपल्याच ह्मदयपटावर तो आपली पापें लिहितो.
"यहूदाचें पातक लोखंडी खचरणीनें, हिरकणीच्या टोकानें लिहिले आहें; त्यांच्या ह्मदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगावर खोदिलें आहे." (यिर्मया 17:1)
यहूदा जो आपला प्रतिनिधी आहे त्याच्या द्वारे देव आपल्याशी बोलतो. माणसांची पापें लोखंडी लेखणीने, हिरकणीच्या टोकानें लिहिलेली आहेत. ती आपल्या ह्मदयपटावर लिहिलेली आहेत.
देवाला माहित आहे की आपण पाप करतो. तो ती पापें आपल्या ह्मदयपटावर लिहितो. प्रथम तो आपली कृत्ये नमूद करून ठेवतो. पापें ह्मदयपटावर लिहिलेली असल्यामुळें जेव्हां आपण नियमशास्त्र पहातो तेव्हां आपल्याला समजते की आपण पापी आहोत. कारण देवाने ती आपल्या ह्मदयपटावर, आपल्या अंतःकरणांत लिहून ठेवलेली आहेत.
आणि येशू पुन्हां खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. बायबलमध्ये म्हटले आहे की आपल्या सर्वांची पापें ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे लिहून ठेवलेली आहेत. (प्रकटीकरण 20:12). माणसाचें नांव व त्याची पापें त्या पुस्तकांत लिहिलेली आहेत. आणि माणसाच्या ह्मदयपटावर पण ती लिहिलेली आहेत. याचा अर्थ आपली पापें देवाचे पुस्तक आणि आपला ह्मदयपट अशा दोन ठिकाणीं लिहिलेली आहेत.
तरूण किंवा वृध्द असो, सर्वांच्यांच ह्मदयपटावर पापें नमूद केलेली आहेत म्हणूनच ते येशूसमोर कांही बोलू शकले नाहीत. स्त्रीला दगडमार करायला निघालेले लोक येशूच्या बोलण्यामुळे एकदम गप्प झालें.
दोन ठिकाणीं लिहून ठेवलेली आपली
पापें कधी पुसली जातात?
जेव्हां आपण आपल्या ह्मदयांत पाणी
आणि येशूचे रक्त ही पापमुक्तीची
सुवार्ता स्वीकारतो तेव्हां.
जेव्हां तुम्हांला तारण प्राप्त होते तेव्हां तुमची सर्व पापें देवाच्या पुस्तकातून खोडली जातात आणि तुमचें नांव जीवनाच्या पुस्तकांत लिहिले जाते. ज्यांची नांवं जीवनाच्या पुस्तकांत आहेत ते स्वर्गांत जातात. ह्रा जगांत त्यांनी केलेली चांगली कामं, देवाच्या राज्यासाठी त्यांनी केलेली मेहनत हे सुध्दां जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेलं असतं. ते स्वर्गांत स्वीकारले जातात. ज्यांची पापमुक्ती होते तेच सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गांत जातात.
प्रत्येकाची पापें दोन ठिकाणीं लिहून ठेवलेली आहेत म्हणूनच कोणीहि देवाला फसवू शकत नाही. असा कोणीच नाही की ज्याने त्याच्या ह्मदयांत पाप केलेले नाही आणि व्यभिचार केलेला नाही आपण सर्वजण पापी आहोत.
येशूकडून मिळणारे तारण ज्यांनी स्वतःच्या ह्मदयांत स्वीकारले नाही ते पापांपायी यातना सहन करतात. त्यांच्यामध्ये आत्मवि·श्वास नसतो. ते देवाला घाबरतात. ज्या क्षणींच ते पाणी व आत्मा याची सुवार्ता ते स्वीकारतात त्या क्षणीं त्यांच्या ह्मदयपटावरील आणि कृत्यांच्या पुस्तकातील त्यांची पापें साफ पुसली जातात आणि त्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्ति मिळते.
स्वर्गामध्ये जीवनाचें पुस्तक आहे. जे लोक पाणी व आत्मा या सुवार्तवर वि·श्वास ठेवतात त्यांची नांवें त्यांत लिहिलेली आहेत, आणि तेच स्वर्गात जातील. ह्रा जगांत त्यांनी पाप केले नाही म्हणून ते स्वर्गात जातात असं नाही तर ते पाणी व आत्मा या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात म्हणूनच ते स्वर्गांत जातात. हा `वि·श्वासाचा नियम` आहे (रोमकरांस पत्र 3:27).
माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, त्या व्यभिचारी स्त्री प्रमाणेच शास्त्री व परूशी पण पापी होते.
खर म्हणजे तेच जास्त पापी होते कारण त्यांनी स्वतःला तर फसवलेच पण आपण पापी नाही असं ढोंग ते करीत होते. त्यावेळचे धार्मिक पुढारी जसे कांही परवानगी मिळालेले चोरटे होते, आयुष्याची, आत्म्याची चोरी करणारे लुटारू! स्वतःचें तारण झालेले नसतांना ते इतरांना प्रवचने देत असत.
नियमशास्त्राप्रमाणे निष्पाप कोणीच नाही. माणूस पाप न करण्याने नीतिमान बनत नाही तर त्याचें तारण होण्याने व त्याचे नांव जीवनाच्या पुस्तकांत असण्याने होतो. जीवनाच्या पुस्तकांत नांव लिहिलेल असणे हे महत्त्वाचें आहे. लोक पाप न करता राहू शकत नाही म्हणूनच त्यांचे तारण होणे ही गरज आहे.
तुमचा वि·श्वास आहे की नाही यावर तुमचें स्वर्गांत जाणे अवलंबून आहे. देवाची कृपा तारणावर अवलंबून आहे. व्यभिचारी स्त्रीचे काय झाले? आता आपण मरणारच असं समजून ती डोळे मिटून उभी होती. कदाचित् ती भीति आणि पश्चातापामुळे रडत असावी. मृत्युला सामोरे जातांना लोक असे प्रामाणिक होतात.
"अरे देवा, मला आता मरावे लागणार. कृपा करून माझा आत्मा तूं तुझ्या हांतांत घे. येशू, माझ्यावर दया कर" ती येशूकडे काकूळतीने त्याच्या प्रेमाची, तारणाची भीक मागू लागली. "देवा, तू माझा न्याय केलास तर मला न्याय मिळेल. तू जर मला निष्पाप म्हटलेस तर माझी पापं पुसून टाकली जातील. सर्व कांही तुझ्या हातीं आहे." ती असंच कांही बोलली असेल कारण सर्व कांही येशूच्या हांतांत होते.
येशूसमोर आणलेली स्त्री असं नाही बोलली, "मी चूक केली. माझ्या व्यभिचाराबद्दल मला माफ कर." ती म्हणाली, "माझ्यावर दया करून मला पापांपासून सोडव. तू माझी सुटका केलीस तरच मी वाचेन. नाहीतर मी नरकांत जाईन. मला तुझ्या दयेची जरूर आहे. मला तुझे प्रेम हवं आहे. माझं तारण कर." डोळे मिटून तिने तिची सर्व पापं कबूल केली.
आणि येशूनें तिला विचारले, "तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय?" ती म्हणाली, "प्रभुजी कोणी नाहीं." तेव्हां येशू तिला म्हणाला, "मीहि तुला दंड ठरवीत नाही." येशूने तिला दंड ठरविला नाही कारण तिची सर्व पापें त्यानें यार्देन नदींत त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे घेतली होती. आणि तिचे तारण झालेले होते. त्या स्त्रीऐवजी आता येशू तिच्या पापांची शिक्षा घेणार होता.
तो म्हणाला, "मीहि तुला दंड ठरवीत नाहीं."
येशूने तिला दंड ठरविला कां?
नाही.
पापमुक्तीनंतर तारणाची देणगी मिळून ही स्त्री येशूकडून आशीर्वादीत झाली. आपला प्रभु येशू आपल्याला हे सांगतो की त्याने आपली पापांपासून सुटका करून आपल्याला नीतिमान बनवलेले आहे. यार्देन नदींत बाप्तिस्म्याच्या द्वारे आपली पापें त्याने घेतली आणि त्या पापांची किंमत त्याने खांबावरती मरण सहन करून दिली. येशू आपल्याला बायबलमध्ये हे सांगत आहे. त्याच्या ह्रा शब्दांवर वि·श्वास ठेवून त्या शब्दांना धरून ठेवण्याची आपल्याला गरज आहे. तसं केले तरच आपले तारण होऊन आपण आशीर्वादीत होऊ.
"हे देवा, माझ्यांत कांही गुण नाहीत, हुशारी नाही. तुला दाखवण्यासाठी पापांखेरीज माझ्यांत कांहीच नाही. येशू माझा तारणकर्ता आहे ह्रावर मी वि·श्वास ठेवतो. माझ्या पापमुक्तीसाठी त्यानें किंमत भरली. यार्देन नदींत माझी सर्व पापं त्यानें घेतली आणि त्याच्या प्रायश्चित्तासाठी तो खांबावर गेला. त्यानें त्याच्या बाप्तिस्म्याच्या व त्याच्या रक्ताच्या द्वारे माझी सर्व पापं घेऊन टाकली ह्रावर हे परमेश्वरा, माझा वि·श्वास आहे."
अशा प्रकाराने आपले तारण होते. येशू `आपल्याला दंड ठरवीत नाही.` जे पाणी व आत्मा यांच्या द्वारे पापमुक्त होण्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात ते नीतिमान बनून त्यांना देवाची मुलं बनण्याचा हक्क मिळतो.
प्रिय मित्रांनो, ती स्त्री पापमुक्त झाली. त्या व्यभिचारी स्त्री प्रमाणेच आपल्याला सुध्दां आशीर्वाद मिळू शकतो. जो कोणी स्वतःची पापें जाणून घेऊन देवाकडे दयेची याचना करतो आणि येशूच्या पाणी व आत्मा या पापमुक्तीच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतो तो देवाकडून आशीर्वादीत होतो. जो पाप करतो आणि स्वतःची पापं जाणून घेत नाही त्याचें तारण होऊ शकत नाही.
येशूनें जगाचें पाप हरण केलें (योहान 1:29). जगांतल्या कोणत्याहि पापी माणसाने जर येशूवर वि·श्वास ठेवला तर त्याचें तारण होईल. "मीहि तुला दंड ठरवीत नाही" असं येशू त्या स्त्रीला म्हणाला कारण तिची सर्व पापं त्याच्याकडे होती. त्यानें आपल्या सर्वांची पापं स्वतःकडे घेतली आणि त्यासाठी आपल्याऐवजी त्याचाच न्याय होणार होता.
येशूसमोर आपला सुध्दां उध्दार व्हायला पाहिजे
महत्त्वाचें काय आहे, देवाचे प्रेम की
देवाचा न्याय?
देवाचें प्रेम.
हातांत दगड घेतलेले परूशी आणि आजचे धर्मगुरू दोन्ही लोक नियमशास्त्राचा अर्थ अगदी शब्दशः घेतात. ते म्हणतात की व्यभिचार करू नका असं शास्त्रांत म्हटले आहे आणि जो करतो त्याला मरेपर्यंत दगडमार करायला पाहिजे. पण ते स्वतः मात्र स्त्रियांकडे वासनेच्या नजरेने पहातात आणि असं ढोंग करतात की ते व्यभिचार करीत नाहीत. त्यांचें तारण होऊ शकत नाही. शास्त्री व परूशी हे त्याकाळचे नैतिक पुढारी होते पण येशूने त्यांना कांही बोलवले नव्हते. "मी तुला दंड ठरवीत नाही" हे येशूचे उद्गार त्यांनी कधीच ऐकले नव्हते.
फक्त त्या व्यभिचारी स्त्रीने हे हर्षभरित शब्द ऐकले होते. जर तुम्ही देवासमोर प्रामाणिक राहिला तर तुम्हांला सुध्दा तिच्यासारखे आशीर्वाद मिळतील. "देवा, मी सबंध आयुष्यभर व्यभिचार करीत असतो. मी दिवसातून अनेक वेळा पाप करतो." असं आपण देवापुढे कबूल करायला पाहिजे.
जेव्हां आपण नियमशास्त्र स्वीकारतो आणि समजून घेतों की आपण मरायच्या लायकीचे असे पापी आहोत आणि देवापुढे प्रामाणिकपणें कबूल करतो, "देवा, मी हा असा आहे. कृपा करून तूच मला वाचव," तेव्हां देव आपल्याला पापांपासून वाचवून आशीर्वाद देतो.
येशूप्रेमाने ओसंडून वहात असलेल्या `पाणी व आत्मा` या सुवार्तेने देवाच्या न्यायावर सरशी मिळवलेली आहे. "मीहि तुला दंड ठरवीत नाही." तो आपल्याला दंड ठरवीत नाही. तो म्हणतो "तुम्ही पापमुक्त झाला आहात." आपला प्रभु येशू ख्रिस्त कारूण्यमय देव आहे. जगांतल्या सर्व पापांपासून त्यानें आपली सुटका केलेली आहे. आपला देव न्यायी व प्रेमळ असा देव आहे. पाणी व आत्मा या द्वारे वहाणारे प्रेम हे देवाच्या न्यायापेक्षां कितीतरी पटीने मोठे आहे.
त्याची प्रीति त्याच्या न्यायापेक्षां श्रेष्फ् आहे
त्यानें आपल्याला मुक्ति कां दिली?
कारण त्याची प्रीति त्याच्या न्यायापेक्षां
श्रेष्ट आहे.
न्यायनिवाडा अमलांत आणून न्याय देण्याची सक्ती जर देवाने केली असती तर पापी लोकांचा न्याय होऊन ते सर्वजण केव्हांच नरकांत गेले असते. न्यायानिवाड¬ापासून आपल्याला वाचवणारी अशी येशूची प्रीति इतकी अपरिमित आहे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू दिला. येशूने आपल्या सर्वांची पापें स्वतःकडे घेऊन त्याबद्दलची शिक्षा सहन केली. जो कोणी उध्दारकत्र्या येशूवर वि·श्वास ठेवतो तो त्याचा गुणी मुलगा बनतो. कारण त्याची प्रीति त्याच्या न्यायापेक्षां श्रेष्ट आहे. त्याने सर्वांनाच पापमुक्त केले.
न्यायनिवाडा करून देव आपला न्याय करीत नाही म्हणून आपण त्याचें आभार मानायला पाहिजे. येशूनें शास्त्री, परूशी आणि त्यांचें शिष्य यांना सांगितले होते की देवाला तुमच्याकडून दयेची व त्याच्यासंबंधीच्या ज्ञानाची अपेक्षा आहे. त्याला तुमची अर्पणे नको आहेत. कांही लोक गाय किंवा बकरा दररोज मारतात आणि देवाला अर्पण करून प्रार्थना करतात, "हे देवा, माझ्या अपराधांची तू मला दररोज क्षमा कर." देवाला आपली अर्पणें नको आहेत. पाणी व आत्मा या सुवार्तेवर आपण वि·श्वास ठेवणे हे त्याला हवं आहे. त्याला आपला उद्धार करायचा आहे. आपला वि·श्वास स्वीकारून त्याला आपल्यावर प्रीति करायची आहे. तुम्हांला हे सर्व समजते का? येशूने आपल्याला तारण दिलेले आहे.
येशूला पापाचा द्वेष वाटतो, पण ज्या मनुष्यप्राण्यांना देवाचें प्रतिरूप असें बनवले आहे त्याच्यांवर त्याचं पेटते प्रेम आहे. आपल्याला देवाची मुलं बनवायचे हे त्यानें पूर्वीच ठरवले होते. बाप्तिस्मा आणि रक्त याच्याद्वारे आपली सर्व पापं त्यानें काढून टाकली यासाठी की की आपण त्याची मुलं बनावी. स्वतःच्या निर्मीती बद्दल देवाचें प्रेम हे असं आहे.
जर देवाने नियमशास्त्राप्रमाणे आपला न्याय केला तर पापांमुळे आपल्याला मराव लागेल. पण त्याच्या मुलाचा बाप्तिस्मा आणि त्याचा खांबावरील मृत्यु या द्वारे त्यानें आपला उध्दार केला आहे. तुम्हाला हे खरे वाटते का? जुन्या करारांत काय लिहिले आहे ते आपण पाहू.
अहरोनानें आपले दोन्ही हात बकयावर ठेवले
इस्त्राएल लोकांचें अपराध जिवंत
बकयाकडे कोण देत असे?
प्रमुख याजक.
जुन्य करारांत इस्त्राएल लोकांच्या वर्षभराच्या पापांचे प्रायश्चित म्हणून प्रमुख याजक दोषहीन बकयाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवीत असे.
"अहरोनानें आपले दोन्ही हात त्या जिवंत बकयाच्या डोक्यावर ठेवून इस्त्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्रांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; तीं त्या बकयाच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हातीं रानांत पाठवून द्यावें." (लेवीय 16:21)
जुन्या कराराप्रमाणे त्याकाळीं अशा प्रकाराने पापाचें प्रायश्चित्त केले जात असे. रोजच्या पापाबद्दल एखादे दोषहीन मेंढरू किंवा बकरी दर्शनमंडपांत आणल्यानंतर वेदीवर अर्पण करीत असत. प्रमुख याजक अर्पणाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून पापें त्याच्या माथीं ठेवून त्याला मारल्यानंतर त्याचे रक्त वेदीच्या शिंगावर लावीत असे.
वेदीच्या चारहि बाजूला शिंगे होती. प्रकटीकरण 20:12 यांत वर्णन केलेल्या पुस्तकाचे ही शिंगे म्हणजे प्रतिक आहेत. उरलेले रक्त जमिनीवर शिंपडले जात असे. माणूस जमिनीवरच्या मातीपासून बनलेला आहे आणि जमिन म्हणजे माणसाच्या ह्मदयाचें प्रतिक आहे. रोजच्या पापाचे प्रायश्चित्त त्यावेळी लोक अशा प्रकारे करीत.
पण हे पापार्पण ते रोज करू शकत नव्हते म्हणून देवाने त्यांच्या वर्षभराच्या पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित्ताचा दिवस ठरवला. सातव्या महिन्यातील दहावा दिवस हा प्रायश्चित्ताचा दिवस ठरवला गेला त्या दिवशी इस्त्राएलचें लोक दोन बकरे आणीत व प्रमुख याजक लोकांच्या प्रायश्चित्तासाठीं बकयाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून सर्व पापं बकयाच्या माथीं ठेवून नंतर देवासमोर अर्पण करीत.
"अहरोनानें आपले दोन्ही हात त्या जिवंत बकयाच्या डोक्यावर ठेवून इस्त्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध बकयाच्या माथीं ठेवली".
प्रत्येक माणसाने पापार्पणासाठी अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवण्याऐवजी प्रमुख याजक अहरोन लोकांचा प्रतिनिधी म्हणून जिवंत बकयाच्या डोक्यावर प्रायश्चितासाठी हात ठेवील असं देवाने ठरवले.
मग तो इस्त्राएल लोकांच्या पापांबद्दल देवाला सांगायचा, "परमेश्वरा, इस्त्राएलच्या तुझ्या मुलांनी पापें केलेली आहेत आम्ही मूर्तिपूजा केली. दहा आज्ञांतील सर्व आज्ञा आम्ही मोडल्या, तुझें नांव व्यर्थ घेतलें, आम्ही मूर्ति बनवून तुझ्यापेक्षां त्यांच्यावर अधिक प्रेम केलें, आम्ही शब्बाथ दिवस पाळला नाही. आमच्या आईबापांचा मान राखला नाही, आम्ही खून केले, व्यभिचार केला आणि चोरी . . . आम्ही हेवादावा करतो, भांडतो."
सर्व पापांची यादी सांगून झाल्यावर तो म्हणत असे "देवा, इस्त्राएलचे लोक काय किंवा मी काय, कोणीहि तुझें नियमशास्त्र पाळू शकत नाही. पण पापमुक्तीसाठीं मी माझें दोन्ही हात बकयाच्या डोक्यावर ठेवून त्याच्या शिरीं पाप ठेवत आहे." (लेवीय 1:1-4; 16:20-21)
जुन्या कराराप्रमाणे त्या काळी प्रायश्चित्त
कशा प्रकाराने केले जात असे?
पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून.
देवानें इस्त्राएलच्या लोकांना पापार्पणासाठी ही पध्दत सांगितली त्यामुळे ते त्यांची पापं अर्पणाच्या शिरी ठेवून पापमुक्त होऊ शकत होते. देवाने त्यांना सांगितले होते की पापार्पणाचा बकरा दोषहीन असावा व नंतर माणसाऐवजी त्याला मारण्यांत यावे.
प्रायश्चित्ताच्या दिवशी पापार्पण मारल्यानंतर त्याचें रक्त पवित्रस्थानांत नेऊन दयासनावर सात वेळा शिपंडले जाई. अशा प्रकारे इस्त्राएलचें लोक वर्षांतून एकदा सातव्या महिन्यातील दहाव्या दिवशीं प्रायश्चित्त करीत.
प्रमुख याजक पवित्रस्थानांत अर्पण घेऊन एकटाच जाई तेव्हां बाहेर जमा झालेले लोक त्याच्या एफोदच्या झग्याला लावलेल्या सोन्याच्या घुंगरांचा आवाज ऐकत. दयासनावर सात वेळा जेव्हां रक्त शिंपडले जायचे त्यावेळी त्या घुंगरांचा आवाज त्यांना ऐकू येत असे. आपल्या पापांचं प्रायश्चित्त झालं आहे असं त्या आवाजाने समजले की ते हर्षभरित होत असत. सोनेरी घुंगरांचा कर्णमधूर नाद ऐकणे म्हणजे जणूं कांही त्यांच्यासाठी ती हर्षाची, आनंदाची सुवार्ता होती.
येशू ठराविक लोकांवर प्रेम करून फक्त त्यांच्याच उध्दार करतो, असं म्हणणे चुकीचे आहे. येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळीं संपूर्ण जगाची पापं एकदम, एकाचवेळी घेतली. त्याला सर्वांचाच उध्दार त्यावेळीच करायचा होता. दररोज केलेल्या पापांबद्दल आपला उध्दार होऊ शकत नाही कारण एकाचवेळी आणि एकदाच सर्व पापांपासून आपला उध्दार झालेला आहे.
जुन्या करारांत पापार्पणाच्या पध्दतीने प्रायश्चित केले जांत असे. अहरोन त्याचें दोन्ही हात जिवंत बकयाच्या डोक्यावर ठेवून लोकांची वर्षभराची पापं त्याच्या माथीं ठेवीत असे.
नंतर हा बकरा योग्य माणसाकरवी नेला जाई. इस्त्राएल लोकांच्या पापांनी भरलेला हा बकरा जेथे पाणी आणि गवत नाही अशा रानांत सोडून दिला जाई. प्रखर उन्हामध्ये, रानांत भटकण्याने तो बकरा शेवटी मरून जाई. इस्त्राएल लोकांच्या पापांपायी तो बकरा मरत असे.
लोकांचा उध्दार व्हावा यासाठी देवाचे प्रेम हे असे होते! अशा प्रकाराने त्याकाळी लोक वर्षातून एकदा प्रायाश्चित्त करीत. पण आता आपण नव्या कराराच्या काळांत राहत आहोत. येशू या जगांत आला ती घटना होऊन 2000 वर्षे झाली आहेत. त्याच्या येण्याने जुन्या करारातील संदेशवचनें पूर्ण झाली. तो आला आणि त्याने आपले तारण केले.
आपले तारण होण्यासाठी
येशू या नांवाचा अर्थ
काय आहे?
तारणकर्ता, जो आपल्या लोकांना
पापांपासून तारील.
मत्तयाच्या पहिल्या अध्यायांत म्हटले आहे;
"असें विचार त्याच्या मनांत घोळत असतां पाहा, प्रभूच्या दूतानें त्याला स्वप्नांत दर्शन देऊन म्हटलें, योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तूं मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचें नांव तूं येशू असें ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील." (मत्तय 1:20-21).
जगाची सर्व पापं धुवून टाकण्यासाठी स्वतःच्या मुलाला पाठवता यावे म्हणून आपल्या आकाशातील पित्यानें कुमारी मरीयेचा देह उसना घेतला. त्यानें दूताला मरीयेकडे पाठवून सांगितले, "पाहा, तूं गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचें नाव येशू ठेव." त्याचा अर्थ मरीयेचा मुलगा तारणकर्ता होईल. येशू ख्रिस्त याचा अर्थ हा की तो लोकांना तारील म्हणजेच तारणकर्ता.
यार्देन नदींत बाप्तिस्मा घेऊन त्या द्वारे येशूने जगाची सर्व पापं स्वतःकडे घेतली. बाप्तिस्मा करणाया योहानानें त्याला बाप्तिस्मा दिला त्याचेवेळी जगातील सर्व पापं येशूकडे दिली गेली.
मत्तय 3:13-17 मध्ये असं लिहिले आहे; :तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असें असता आपण माझ्याकडे येतां हें काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हे आपणांला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें; तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं, हा माझा `पुत्र` मला `परमप्रिय आहे, ह्राच्याविषयी मी संतुष्ट आहे.`
आपल्याला पापमुक्त करण्यासाठी येशू बाप्तिस्मा करणाया योहानाकडे गेला.
येशू पाण्यांत उतरला आणि योहानापुढे नतमस्तक होऊन तो म्हणाला, "योहान, मला बाप्तिस्मा दे ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हे आपणांला उचित आहे. पापी लोकांची सुटका करण्यासाठी त्यांची सर्व पापं बाप्तिस्म्याच्या योगे माझ्याकडे घेणे जरूर आहे. मला तू आत्ताच बाप्तिस्मा दे."
अशा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें उचित होते. बाप्तिस्मा करणाया योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला. त्याचवेळी आपल्याला पापमुक्ति मिळाली आणि देवाचें धर्माचरण पूर्ण झालें.
अशा प्रकारें येशूने आपली सर्व पापं घेतली. तुम्हां सर्वांची पापें येशूकडे दिली गेली तुम्हांला हे समजले का?
आत्मा आणि येशूचा बाप्तिस्मा या सुवार्तेवर तुम्ही वि·श्वास ठेवा.
सर्व धर्माचरण कसे
पूर्ण झाले?
येशूच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे.
देवानें इस्त्राएलला वचन दिलें होतें कीं पापार्पणाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून त्याला मारल्यानंतर त्यांची पापं धुतली जातील पण प्रत्येक माणसाने बकयाच्या डोक्यावर हात ठेवणे कठीण होते म्हणून मग देवानें प्रमुख याजक अहरोन याला हें काम सांगितले. त्यामुळे वर्षातून एकदा एकाचवेळी पापार्पणाच्या डोक्यावरती पापें ठेवणें शक्य झाले. ह्रांतच उध्दारकत्र्या देवाची शक्ति आणि त्याचें ज्ञान दिसून येते. देव बुध्दीमान व आश्चर्यजनक आहे.
जगाला वाचवण्यासाठीं देवाने त्याचा मुलगा येशू ह्राला पाठवले. म्हणजेच पापार्पण तयार होते. आता ह्रा पापार्पणावर दोन्ही हात ठेवून कोणीतरी त्याच्या माथीं पाप ठेवायला पाहिजे होतं ते कोणीतरी म्हणजेच संपूर्ण मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून देवानें योहानाला येशूच्या आधी पाठवले. (मत्तय 11:11). बाप्तिस्मा करणारा योहान जो शेवटचा प्रमुख याजक होता त्याच्याबद्दल मत्तय 11:11 मध्ये असें म्हटले आहे; "स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्यापेक्षां मोठा कोणी झाला नाही" देवाने सर्वांचा प्रतिनिधी म्हणून योहानाला पाठवले यासाठी की तो येशूचा बाप्तिस्मा करून जगाची पापें येशूकडे देईल.
जर पृथ्वीवरील लाखो लोक येशूकडे गेले व त्यांची पापं त्याच्या शिरीं देण्यासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवू लागले तर विचार करा की येशूच्या डोक्याचें काय हाल होतील! ते पहायला पण प्रशस्त वाटणार नाही. जोरांत दाबले तर येशूचे केस गळायला लागतील! बुद्धिमान देवानें त्यासाठीच योहानाला प्रतिनिधी म्हणून पाठवण्याची योजना केली.
मत्तय 3:13-17 मध्ये म्हटले आहे, "तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला" त्यावेळी येशू 30 वर्षाचा होता. जन्मानंतर येशूची सुंता झाली तेव्हां तो आठ दिवसाचा होता. तो 30 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या वयाबद्दल थोडेच उल्लेख आहेत. 30 वर्षाचा होईपर्यंत येशूला वाट पहावी लागली याचे कारण हेच की जुन्या करारांत अनुवादमध्ये देवानें मोशेला आज्ञा दिली होती कीं प्रमुख याजकानें देवाचे काम सुरू करण्याआधी त्याचे वय किमान 30 वर्षाचे असावे. येशू स्वर्गामध्ये प्रमुख याजक आहे. ह्रावर तुम्ही वि·श्वास ठेवता का?
नव्या करारांत मत्तय 3:13-14 यांत म्हटले आहे, "तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतू योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा." मानवजातीचा प्रतिनिधी कोण आहे? बाप्तिस्मा करणारा योहान. स्वर्गांत प्रतिनिधी कोण आहे? आता हे दोघं एकत्र भेटले तर त्यांच्यात श्रेष्ट कोण आहे? अर्थातच स्वर्गातील प्रतिनिधी.
बाप्तिस्मा करणारा योहान जो त्या काळातील धर्मगुरूंवर बेधडकपणे आवेशाने तुटून पडून म्हणायचा, "सापांच्या पिलांनो! पश्चाताप करा." तोच योहान येशूसमोर एकाएकी नम्र होऊन म्हणाला, "आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हें काय?" येशूनें त्याला उत्तर दिलें, आता हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणाला उचित आहे." धर्माचरण पूर्ण करण्यासाठीच येशू ह्रा जगांत आला आणि त्यानें योहानाकडून बाप्तिस्मा घेतला तेव्हां ते पूर्ण झालें.
"तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें; तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयी मी संतुष्ट आहे."
येशूनें बाप्तिस्मा घेतला तेव्हां हे असं घडले. स्वर्गाचें दार उघडले गेले आणि योहानाकडून झालेल्या बाप्तिस्म्यामुळे जगाची पापें हरण केली गेली.
"बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्या दिवसांपासून तों आतांपर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे तें बळकावीत आहेत." (मत्तय 11:12). नियमशास्त्र व संदेष्टे ह्रांनी हाच संदेश दिला. जो येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवतो तो खचितपणें स्वर्गांत जाऊ शकतो.
"मीहि तुला दंड ठरवीत नाही."
येशूला दोषी ठरवून त्याला खांबाची
शिक्षा कां झाली?
कारण त्याने आपली सर्व
पापें घेतली.
संपूर्ण जगाची पापें घेण्यासाठीं योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला. आणि त्यानंतर येशू व्यभिचारी स्त्रीला म्हणाला होता, "मीहि तुला दंड ठरवीत नाही." यार्देन नदींत येशूनें संपूर्ण जगाची पापें घेतलेली होती म्हणूनच त्याने स्त्रीला दोषी ठरवले नाही. पण तिच्या अपराधांची शिक्षा तिला न मिळता येशू दोषी ठरला जाऊन त्याला मिळणारं होती.
येशूने संपूर्ण जगाची पापें पुसून टाकली. `पापाचे वेतन मरण आहे` म्हणूनच त्याला खांबावर असह्र यातना सहन करायच्या होत्या. या जाणीवेने अस्वस्थ होऊन त्याने जैतुनाच्या डोंगरावर तीन वेळां प्रार्थना केली. येशूचा देह मानवी होता. म्हणूनच रक्तबंबाळ होऊन असह्र यातनेने आपल्याला मरायचे आहे या कल्पनेने तो व्याकूळ झाला होता.
जुन्या करारांत पापार्पणाला रक्तबंबाळ होऊन पापांची किंमत मोजावी लागत होती तशीच येशूला खांबावरती स्वतःला अर्पण करून किंमत मोजावी लागणार होती. लोकांचे तारण होण्यासाठीं, त्यांच्या पापांची किंमत मोजण्यासाठी त्यानें सर्वांची पापें आधीच घेतलेली होती आणि त्याबद्दल देवासमोर आपला न्याय होणार आहे याची येशूला कल्पना होती.
येशूच्या मनांत कोणनेहि पाप नव्हते पण बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व पापें येशूकडे गेल्यामुळे देवाला त्याच्या पुत्राचा न्याय करावा लागणार होता. देवाचा न्याय पूर्ण व्हावा आणि आपल्याला देवाची अपरिमित प्रीति मिळून तारणाची देणगी मिळावी यासाठीच येशूला दोषी ठरवून खांबाची शिक्षा झाली.
"मीहि तुला दंड ठरवीत नाही किंवा तुला दोषी पण ठरवीत नाही" कळन नकळत झालेल्या आपल्या सर्व अपराधांबद्दल आपला न्याय व्हायचा होता.
देवानें आपल्याला दोषी ठरवले नाही. पण ज्या येशूनें बाप्तिस्म्याच्या द्वारे आपली पापें घेतली त्याला त्यानें दोषी ठरवले. कारूण्यमय प्रेमळ देवाला पापी लोकांना अपराधी ठरवायची इच्छा नव्हती. बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील रक्त या दोन गोष्टी उध्दारकत्र्या देवाची आपल्यावरील प्रीति दर्शवितात. "देवानें जगावर एवढी प्रीती केली कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी कीं, जो कोणी त्याच्यावर वि·श्वास ठेवतो त्याचा नाश होऊं नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावें." (योहान 3:16)
येशूनें व्यभिचारी स्त्रीला दोषी ठरवीले नाही यावरून आपल्याला देवाचें प्रेम समजते.
व्यभिचारी स्त्रीला माहित होते कीं ती देहानें व मनानें पापी आहे. तिचें पाप ती नाकबूल करू शकत नव्हती. तिनें वि·श्वास ठेवला कीं येशूने तिची सर्व पापें घेऊन तिचा उध्दार केलेला आहे. उध्दारकत्र्या येशूवर वि·श्वास ठेवला तरच आपले तारण होते. वि·श्वास करा. वि·श्वास करणे आपल्या चांगल्यासाठीच आहे.
सर्वांत आशीर्वादीत
कोण आहे?
ज्याच्याकडे पाप नाही तो.
पाप सर्वच करतात. सर्व लोक व्यभिचार करतात पण त्याबद्दल सर्वांचा न्याय केला जात नाही. जे उध्दारकत्र्या येशूवर वि·श्वास ठेवतात त्यांच्या ह्मदयांत पाप नसते. जे येशूकडून होत असलेल्या तारणावर वि·श्वास ठेवतात ते लोक सर्वांत आनंदित असतात. येेशूकडून पापमुक्ति मिळून जे नीतिमान बनलेले आहेत ते आशीर्वादीत असतात.
रोमकरांस पत्र 4:7 यामध्ये देव आनंदाविषयी असं म्हणतो, "ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य." आपण मरेपर्यंत पाप करीत राहतो. देवासमोर आपण पाप करीतच राहतो. आपण फार दुबळे आहोत.
देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राच्या बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे आपल्याला पापमुक्त केलेले आहे. म्हणूनच आपण आता पापी नसून देवाची नीतिमान मुलं असे आहोत.
पाणी व आत्मा ही सुवार्ता तारणाची सुवार्ता आहे. तुमचा यावर वि·श्वास आहे का? जे वि·श्वास ठेवतात त्यांना देव नीतिमान, पापमुक्त आणि स्वतःची मुलं असंच समजतो. जगांत आनंदी माणूस कोण आहे? जो वि·श्वास करतो आणि ज्याचा उध्दार झाला आहे तोच. तुमचा उध्दार झाला आहे का?
येशूनें तुमची कांही पापं वगळलेली आहेत का? नाही. बाप्तिस्म्याच्या वेळी त्यानें तुमची सर्व पापं घेतली. यावर वि·श्वास ठेवा आणि उध्दारित व्हा. आता योहान 1:29 आपण पाहू.
जणूं कांही झाडूने झाडावे त्याप्रमाणें
येशूनें किती पाप नेले?
जगाचें सर्व पाप.
"दुसया दिवशी येशूला आपणाकडे येतांना पाहून तो म्हणाला, हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोकरा!" (योहान 1:29).
योहानानें यार्देन नदींत जगाची सर्व पापें येशूकडे दिली. दुसयाच दिवशीं त्याने येशूबद्दल साक्ष देऊन म्हटले कीं हा पाहा जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोकरा. येशूने जगाच्या पापांची जबाबदारी, पापांच ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतले.
जगाची सर्व पापें म्हणजे जगाच्या निर्मितीपासून अंतापर्यत मनुष्यप्राणी करीत असलेली सर्वच पापें होय. दोन हजार वर्षापूर्वीच येशूने देवाचा कोकरा म्हणून सर्व पापें घेतली आपला उध्दार केला, आणि त्याचा न्याय केला गेला.
आपण जे कांही पाप करतो ते येशूकडे दिले गेले आणि तो सर्व पापें स्वतःच्या माथीं घेणारा देवाचा कोकरा बनला!
येशू एक नम्र मनुष्य म्हणून या जगांत आला जो जगातील सर्व पापी लोकांना तारणार होता. आपण दुर्बल, दुष्ट, अजाण, दुराचारी आणि अपूर्ण आहोत म्हणूनच आपण पाप करीत असतो. यार्देन नदींत येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी ही सर्व पापें जणूं कांही झाडूने झाडून एकत्रित येशूच्या माथीं ठेवली गेली. ह्राचा शेवट येशूच्या देहाचा खांबावर मृत्यु होण्यांत झाला. त्याला पुरले पण तीन दिवसानंतर तो पुन्हां उठला.
आता तो न्याय देणारा, विजयी आणि पापी लोकांचा तारणारा म्हणून देवाच्या उजवीकडे बसला आहे. आता त्याला परत परत आपला उध्दार करण्याची गरज नाही. आपले तारण होण्यासाठीं त्याच्यावर वि·श्वास ठेवणे एवढंच आपलं काम आहे. जे वि·श्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन मिळते तर जे वि·श्वास ठेवीत नाहीत त्यांचा नाश होतो. या खेरीज दुसरा कांही पर्याय नाही.
येशूनें तुमचा उध्दार केलेला आहे. तुम्ही पृथ्वीवरील सर्वांत आनंदित असे लोक आहांत. तुमच्या दुर्बलतेमुळे तुम्ही भविष्यकाळांत जी कांही पापं करणार आहात ती सर्व त्यानें अगोदरच घेतलेली आहे.
तुमच्या ह्मदयांत कांही पाप राहिलेले आहे का? - नाही. -
येशूनें सर्व पापें घेतली का? - होय! सर्व घेतली -
सर्व लोक सारखेच आहेत. शेजायापेक्षां जास्त पवित्र कोणीच नाही. पण कितीतरी लोक ढोंगी आहेत. त्यांना वाटते कीं ते पापी नाहीत पण प्रत्यक्षांत ते आहेत. हे जग म्हणजे पापाचें उपज करणारे शेवाळ आहे.
जेव्हां स्त्रिया घराबाहेर जातात तेव्हां त्या लाल लिपस्टिक लावतात, तोंडाला पावडर लावतात, केस कुरळे करतात, छान कपडे घालून उंच टाचाचे. माणसं सुध्दां न्हाव्याकडे जाऊन हेअरकट करून चांगला शर्ट, फँशनेबल टाय घालतात आणि बुटांना पाँलीश करतात. बाहेरून ते एखाद्या राजकुमार किंवा राजकुमारी सारखे दिसत असले तरी आतून ते उकीरडट्यावरील कचयाप्रमाणे असतात!
पैसा माणसाला आनंद देतो का? आरोग्य माणसाला खूष ठेवते का? नाही. फक्त तारणच माणसाला खराखुरा आनंद देते. बाहेरून माणूस कितीहि आनंदित दिसत असला तरी ह्मदयांतील थोडसं पाप सुध्दां त्याला बेचैन करते आणि तो न्यायनिवाड्याच्या भीतिमध्ये रहातो.
तारण झालेला मनुष्य हा एखाद्या खवळलेल्या सिंहाप्रमाणें बेडर असतो. त्याच्या ह्मदयांत पाप नसते. "परमेश्वरा मी तुझें आभार मानतो. तू माझ्यासारख्या पापी माणसाला वाचवलेस. पापांपासून मला कायमची सुटका मिळालेली आहे. देवाला गौरव असो!"
जो पापमुक्त झालेला आहे तो खरोखरच आनंदित असतो. देवाच्या कृपेमुळे उध्दार होऊन तो आशीर्वादीत झालेला असतो म्हणूनच तो खूप आनंदात असतो.
येशू `जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा` याने आपली सर्व पाप घेतली म्हणून आपल्यांत आता पाप नाही. खांबावर जाऊन त्याने आपले तारण केले. `जगाची सर्व पापं` याच्यामध्ये तुमची व माझी पण पापं आहेत म्हणूनच आपणा सर्वांचेच तारण झालेले आहे.
देवाच्या इच्छेप्रमाणे
जे आपण येशू ख्रिस्तामध्ये त्या
आपल्यांत आता पाप आहे कां?
नाही.
प्रिय वाचकहो, व्यभिचारी स्त्रीने येशूवर वि·श्वास ठेवला म्हणून तिचे तारण झालें. बायबलमध्ये तिची कथा यासाठी लिहिलेली आहे की तिचा उध्दार होऊन ती आशीर्वादीत झाली होती. पंण ढोंगी शास्त्री व परूशी येशूपासून दूर पळाले होते.
जर तुम्ही येशूवर वि·श्वास ठेवला तर स्वर्ग मिळतो आणि नाही ठेवला तर नरक वाट्याला येतो. पापमुक्ती मिळणे हे कांही एकाद्या व्यक्तीची कर्तबगारी नसते तर तारणकत्र्या येशूमुळे हे शक्य होते.
इब्राी लोकांस पत्र 10 यांत असं म्हफ्ले आहे.
"तर मग ज्या पुढें होणाया चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रांत छाया आहे, वास्तविक स्वरूप नाहीं, म्हणून तें प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाया त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्यांना पूर्ण करण्यास केव्हांहि समर्थ नाही. तें समर्थ असतें तर एकदां शुध्द झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्यानें तें यज्ञ करणें बंद झालें नसतें काय? परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे; कारण बैलांचें व बकयाचें रक्त पापें दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगांत येतेवेळेस म्हणाला, `यज्ञ व अन्नार्पण ह्रांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठीं शरीर तयार केलें; होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनीं तुला संतोष नव्हतां. ह्रावरून मी म्हणालों, पाहा, हे देवा, ग्रंथपटांत माझ्याविषयी लिहून ठेविलें आहे, तुझ्या इच्छेप्रमाणें करण्यासाठी मी आलों आहे.`
वर उल्लेखल्याप्रमाणें तो म्हणाला, `यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे, ह्रांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष नव्हता; (नियमशास्त्राप्रमाणे जीं अर्पिण्यांत येतात तीं हीं) आणि मग तो म्हणाला, `पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलों आहे.` ह्रांत दुसरे स्थापण्यासाठी तो पहिलें नाहीसें करितो. त्या इच्छेने आपण येशूख्रिस्ताच्या "एकदांच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहों." (इब्राी लोकांस पत्र 10:1-10) "देवाच्या इच्छेप्रमाणे" येशूने स्वतःला एकदाच अर्पण केले.
म्हणूनच `आपण पवित्र केलेलें आहो,` हे वाक्य व्याकरणाच्या भाषेंत पूर्ण भूतकाळ असें म्हणता येईल म्हणजेच पापमुक्तीचा उल्लेख परत करायची जरूर नाही. तुम्ही पवित्र झाला आहांत.
"प्रत्येक याजक प्रतिदिवशीं सेवा करीत आणि जें यज्ञ पापें दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो;" परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे;` आणि तेव्हांपासून `आपले वैरी आपलें पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणार्यांना त्यानें एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केलें आहे." (इब्राी लोकांस पत्र 10:11-14)
तुम्ही सर्वकाळासाठी पवित्र झाला आहांत. जर तुम्ही उद्या पाप केले तर तुम्ही परत पापी बनता का? येशूने ती सुध्दां पापं नेली का? होय त्याने ती नेली. एवढच काय पण भविष्य काळातील तुमची सर्व पापं सुध्दां त्याने घेतली.
"पवित्र आत्माहि आपल्याला साक्ष देतो, कारण हे म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटावर लिहीन. आणि त्यांची पापें व त्यांचे स्वैराचार मी ह्रापुढे आठवणारच नाही. तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 10:15-18)
`जेथें त्यांची क्षमा झाली` याचा अर्थ येशूने जगाची सर्व पापें काढून फाकली. तोच आपला उध्दारकर्ता आहे. येशूवर वि·श्वास ठेवण्याने आपल्याला तारणाची देणगी मिळालेली आहे. आपला उध्दार झालेला आहे म्हणूनच आपण सर्वांत आशीर्वादीत आहोत.