• All e-books and audiobooks on The New Life Mission website are free
  • Explore multilingual sermons in global languages
  • Two new revised editions in English have been released
  • Check out our website translated into 27 languages
Search

Sermons

Subject 3 : Gospel of water and the Spirit

< 3-2 > येशूचा बाप्तिस्मा आणि पापांचे प्रायश्चित्त (मत्तय 3:13-17)

2021.04.21 25
(मत्तय 3:13-17)
"तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे. येतां हें काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणाला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें, तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबूतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयी मी संतुष्फ् आहे"
 
 
असा कोणी आहे का कीं जो पापांमुळे आतापर्यंत त्रस्त झालेला आहे?
 
पापबंधनातून आपली सुफ्का
झाली का?
होय.
 
आपल्या परमेश्वर देवानें पापाच्या बंधनातून सर्व लोकांची सुटका केलेली आहे. जे लोक पापाच्या अमलांखाली येतात ते गुलाम बनतात. आपल्या प्रभूने ह्रा गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या आहेत. अजूनपर्यंत असा कोणी आहे का की जो पापांमुळे त्रास सहन करीत आहे?
पापाविरूध्द असलेली आपली लढाई संपली आहे हे आपण समजायला हवं. पापांमुळे आपल्याला आता परत त्रास सहन करावा लागणार नाही . येशूने आपले तारण केले तेव्हां पापाच्या बंधनातून आपली सुटका झाली. देवाने येशूच्या द्वारे पापी लोकाची खंडणी भरून सुटका केली.
पापाचें दुष्परिणाम लोक किती सहन करीत आहेत याची तुम्हांला कल्पना आहे का? आदाम आणि हव्वा यांच्या काळापासून ही सुरूवात झाली. आदामापासून वंशपरंपरागत पापं आल्यामुळे मानवजातीला त्रास सहन करावा लागत आहे.
उत्त्पत्ति 3:15 मध्ये देवाने असा करार केला कीं तो सर्व पापी लोकांची सुटका करील आणि येशू ख्रिस्ताच्या पाणी व आत्मा या सुवार्ते द्वारे सर्वांचा उध्दार करील त्यासाठी योग्य वेळी देवानें उध्दारकत्र्या येशूला आपल्याकडे पाठवले. बाप्तिस्मा करणा­या योहानाला येशूच्या आधी पाठवण्याचें त्यानें वचन दिले होते ते पण त्यानें पाळले.
मार्क 1:1-8 मध्ये म्हटले आहे; "देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्राच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. यशया संदेष्टट्याच्या ग्रंथांत लिहिले आहे कीं, पाहा मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवितों; तो तुझा मार्ग तयार करील; अरण्यांत घोषणा करणा­याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या वाटा नीट करा. त्याप्रमाणें पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यांत प्रगट झाला. तेव्हां सगळा यहूदीया देश व सर्व यरूशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपआपलीं पापें पदरीं घेऊन यार्देन नदींत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसाचें वस्त्र पांघरीत असे, त्याच्या कमरेस कातडट्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षां समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्यानें केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानें करणार आहे."
 
 
शुभवर्तमानातील आघाडीवरचा साक्षीदार बाप्तिस्मा करणारा योहान
 
बाप्तिस्मा करणारा योहान
कोण होता?
प्रमुख याजक आणि संपूर्ण
मानवजातीचा प्रतिनिधी.

बाप्तिस्मा याचा अर्थ `धुतले जाणे, पुरले जाणे, बुडले जाणे, सोपवले जाणे` असा आहे. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां देवाचें धर्माचरण पूर्ण झालें. `धर्माचरण` या शब्दाचा ग्रीक भाषेंत `सज्जन असणे` `सर्वांत योग्य`, `सर्वांत अनुरूप` असाहि आहे.
म्हणजेच येशूचा बाप्तिस्मा होणें ही सर्वांत योग्य आणि अनुरूप अशीच घटना होती. येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभ, पाणी व आत्मा याच्यावर वि·श्वास ठेवण्यानें माणसाला देवाकडून तारणाची देणगी मिळते.
नव्या करारांत बाप्तिस्मा करणारा योहान हा जुन्या करारांतील शेवटचा प्रमुख याजक आहे. मत्तय 11:10-11 मध्ये त्याच्याबद्दल लिहिलेले आहे कीं तो संपूर्ण मानवजातीचा प्रतिनिधी आहे आणि त्याने जुन्या कराराच्या पध्दतीप्रमाणे नव्या कराराच्या काळांत प्रमुख याजक म्हणून सर्वांची पापें येशूकडे सोपवली. योहानाबद्दल साक्ष देतांना स्वतः येशू मत्तय 3:13-14 येथे असं म्हणतो, "कारण योहाना पर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्रांनी संदेश दिले, आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे." म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहानं ज्याने येशूला बाप्तिस्मा दिला तो प्रमुख याजक अहरोनाच्या घराण्यांतला वंशज होता. योहान हा जुन्या करारांतील अहरोनाचा वंशज होता याबद्दल बायबल सुध्दां साक्ष देते. (लूक 1:5; 1 इतिहास 24:10)
तर मग उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरणारा योहान रानामध्ये एकाकी कां राहत होता? प्रमुख याजकपदाचें काम पार पाडण्यासाठी तो लोकांमध्ये राहू शकत नव्हता म्हणूनच. लोकांना तो आवेशाने म्हणाला, "अहो सापांच्या पिलांनो!" आणि मग पश्चातापास योग्य फळ मिळावे म्हणून त्यानें लोकांना बाप्तिस्मा दिला. त्यामुळें लोक येशूकडे वळले. तोच येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन लोकांची सर्व पापें स्वतःकडे घेऊन त्यांचें तारण करणार होता.
 
 
दोन प्रकारचे बाप्तिस्मे
 
बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना
बाप्तिस्मा कां देत होता?
लोकांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप
करून तारणासाठीं येशूच्या बाप्तिस्म्यावर
वि·श्वास ठेवावा म्हणून.
 
योहानानें लोकांना बाप्तिस्मा दिला होता त्यानंतर त्यानें येशूला बाप्तिस्मा दिला. पहिला बाप्तिस्मा हा `पश्चातापाचा बाप्तिस्मा` होता ज्यामुळें पापी लोक देवाकडे परत वळत होते. योहानाकडून देवाची वचनें ऐकल्यानंतर अनेक लोकांनी मूर्तिपूजा सोडून दिली व ते देवाकडे वळले.
दुसरा बाप्तिस्मा हा येशूचा बाप्तिस्मा होता धर्माचरण पूर्ण करून लोकांना पापमुक्त करण्यासाठी योहानानें त्यांची सर्व पापें येशूच्या माथीं ठेवली. (मत्तय 3:15).
योहानाला येशूचा बाप्तिस्मा कां करावा लागला? जगाचें सर्व अपराध काढून टाकण्यासाठीच. देवाला योहानाच्या हातून सर्व पापें येशूकडे दिली जातील असे करावे लागले यासाठी की जें लोक येशूवर वि·श्वास ठेवतील त्यांचें तारण होऊ शकेल.
बाप्तिस्मा करणारा योहान देवाचा सेवक होता. मानवजातीचें अपराध धुवून टाकण्यास मदत करणे हे त्याचें काम होते. मानवजातीचा प्रतिनिधी या नात्यानें त्यानेच तारणाच्या सुवार्तेची साक्ष दिली. म्हणूनच तो रानांत एकटाच रहात असे. त्याच्याकाळी इस्त्राएलचे लोक भ्रष्टाचारी व वाईट चालीचें बनले होते.
मलाखी 4:5-6 यांत देवाने म्हटले आहे, "पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्टयास तुम्हांकडे पाठवीन. तो वडिलांचें ह्मदय त्यांच्या पुत्राकडे व पुत्रांचे ह्मदय त्यांच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावें असे न होवो."
देवाच्या नजरेतून इस्त्राएलचे सर्व लोक भ्रष्टाचारी होते. त्याच्यासमोर एकहि जण नीतिमान नव्हता. मंदिराचे धर्मगुरू, याजक, शास्त्री यासारखे लोक खोलपर्यंत सडल्यासारखे झाले होते. ते देवाच्या नियमाप्रमाणे अर्पण करीत नसत.
याजकांनी अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवून प्रायश्चितासाठी रक्तार्पण करण्याची देवाची आज्ञा झुगारून दिली होती. मलाखीच्या काळांत ही अर्पणपध्दत याजकांनी सोडून दिली होती असं नमूद केलेले आहे.
अशा लोकांबरोबर बाप्तिस्मा करणारा योहान राहू शकत नव्हता म्हणूनच अरण्यांत जाऊन तो घोषणा करू लागला. तो काय म्हणाला होता?
यशया संदेष्टट्यानें म्हटल्याप्रमाणें मार्क 1:2-3 यांत असें म्हटले आहे, "पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढें पाठवितो; तो तुझा मार्ग तयार करील; अरण्यांत घोषणा करणा­याची वाणी झाली, ती अशी कीं, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या वाटा नीट करा."
अरण्यांत घोषणा करणारी वाणी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायला सांगत होती. हा `पश्चातापाचा बाप्तिस्मा` म्हणजे काय आहे? बाप्तिस्मा करणारा योहान जीव तोडून लोकांना बाप्तिस्मा घ्यायला सांगत होता यासाठी की ते येशूकडे वळून त्याच्यावर वि·श्वास ठेवतील आणि येशू त्यांची सर्व पापें घेऊन त्यांना वाचवील. अशा प्रकारे पश्चातापाचा बाप्तिस्मा त्यांना तारणाकडे नेणारा होता.
"पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या. तुमची पापें घेण्यासाठीं येशूचा पण बाप्तिस्मा होणार आहे" बाप्तिस्मा करणा­या योहानाची घोषणा हीच होती कीं येशू लोकांची सर्व पापे घेऊन खांबावर जाईल त्यामुळें लोकांचे तारण होऊन ते देवाकडे परत येतील.
"मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानें करितों, परंतु तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानें करील." बाप्तिस्मा याचा अर्थ `धुतले जाणे` असा आहे. `तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील` याचा अर्थ `तुमचें सर्व अपराध धुतले जातील.` यार्देन नदीतला येशूचा बाप्तिस्मा हेच सांगतो कीं आपली पापें धुतली जाऊन आपले तारण व्हावे यासाठी देवाच्या पुत्राचा अशा प्रकारे बाप्तिस्मा झाला.
म्हणूनच पापाकडे पाठ फिरवून आपण येशूवर वि·श्वास ठेवायला पाहिजे. तोच लोकांचें पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. योहानानें साक्ष दिली ती हीच तारणाची सुवार्ता होय.
 
 
पापाच्या प्रायश्चितासाठी प्रमुख याजकाचें काम
 
तारणाचा मार्ग कोणी
सिध्द केला?
बाप्तिस्मा करणा­या
योहानाने.
 
यशया संदेष्टट्यानें संदेश दिला होता, "यरूशलेमेच्या मनाला धीर येईल असें बोला, तिला पुकारून सांगा, तुझें युध्द संपलें आहे, तुझ्या पापबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे." (यशया 40:2)
येशूने तुमची, माझी व प्रत्येकाची पापें घेतली. अंगभूत पापें, वर्तमानकालातील पापे एवढंच काय पण भविष्यकालातील पापें सुध्दां त्यानें घेतली. खंडणी भरून त्यानें आपली सुटका केली.
बाप्तिस्मा करणा­या योहानानें येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी सर्व पापें त्याच्या शिरीं ठेवली ही सुवार्ता समजून घेऊन आपण त्यावर वि·श्वास ठेवायला पाहिजे.
आपण असा विचार करायला नको कीं, `देव प्रीति आहे म्हणून आपल्या ह्मदयांत थोडेच पाप असले तरी हरकत नाही आणि येशूवर वि·श्वास ठेवला की आपण स्वर्गात जाणारच.`
सर्व पापांपासून सुटका होण्यासाठी योहानाने बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व पापें येशूकडे दिली यावर आपण वि·श्वास ठेवणे आवश्यक आहे. `पाण्याच्या` द्वारे योहानाने मानवजातीची पापें येशूकडे दिली.
आपला उध्दार व्हावा यासाठीं प्रथम देवानें योहानाला या जगांत पाठवले. देवाचा निरोप्या बाप्तिस्मा करणारा योहान याला एखाद्या राजाच्या राजदूताप्रमाणे पाठवण्यांत आले. त्याने मानवजातीच्या वतीनें प्रमुख याजकपदाचें काम करून जगाची पापें बाप्तिस्माच्या योगे येशूकडे दिली.
देवानें म्हटले होते, "मी आपल्या दूताला तुझ्यापुढें पाठवितों." `तुझ्यापुढे` याचा अर्थ येशूच्या आधी असा आहे. योहानाला येशूच्या आधीच पाठवण्याचें काय कारण होते? हेच कीं येशू जो देवाचा पुत्र याच्या बाप्तिस्म्याच्या योगे जगाची पापें त्याच्याकडे सोपवली जावी.
आपण पापमुक्त होऊन स्वर्गात जावं यासाठी आपला मार्ग कोणी तयार केला? योहानाने. "तो तुझा मार्ग तयार करील." येथे `तुझा` म्हणजेच येशूचा. आणि `आपल्या दूताला` या ठिकाणी `आपल्या` म्हणजेच `देव स्वतः` असा अर्थ आहे.
येशूकडे सर्व पापें देऊन त्याला बाप्तिस्मा देणे हेच योहानाचें काम होते. येशूनें स्वतःकडे घेतलेले सर्व अपराध धुऊन टाकले. येशू आणि योहान या दोघांनी आपला उध्दार होणे शक्य केले. आपले तारण कशावर अवलंबून आहे? देवाचा पुत्र येशू याच्या कार्यावर आपण कितपत वि·श्वास ठेवतो आणि योहानाने आपली सर्व पापें येशूकडे दिल्यानंतर ती सर्व धुतली गेली याच्यावर आपण किती वि·श्वास ठेवतो यावर आपले तारण अवलंबून आहे. पापांची क्षमा होते ही सुवार्ता आपण समजून घेतली पाहिजे. देव जो पिता आहे त्यानें स्वतःच्या पुत्राच्या बाप्तिस्म्यासाठी योहानाला मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून अगोदरच पाठवले. अशा प्रकारे त्याने आपल्या उध्दाराचें कार्य पूर्ण केले. जे लोक येशूवर वि·श्वास ठेवतात त्यांच्या तारणाचा मार्ग नीट व्हावा यासाठींच देवानें योहानाला पाठवले. योहानाकडून झालेला येशूचा बाप्तिस्मा यामुळे लोकांचा उध्दार झाला आणि त्यावर वि·श्वास ठेवण्यानें स्वर्गांत जाणे शक्य झाले.
 मानवजातीची भविष्यकाळांतील पापें सुध्दां बाप्तिस्म्याच्या योगे येशूकडे दिली गेली. येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान या दोघांनीहि आपला स्वर्गांत जाण्याचा रस्ता तयार केला. अशा प्रकारे योहानाच्या द्वारे देवानें तारणाचें रहस्य प्रगट केले.
 आपल्या प्रत्येकाच्या वतीनें योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला आणि आपली पापें त्याच्याकडे दिली. या उध्दारकार्यावर आपण वि·श्वास ठेवण्यानें स्वर्गांत जातो. हीच आनंदाची सुवार्ता आहे.
 
 
बाप्तिस्मा करणारा योहान कां जन्मला?
 
आपण कोणाच्या द्वारे येशूवर
वि·श्वास ठेवू शकतो?
बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या.
 
मलाखी 3:1 मध्ये असें लिहिलेले आहे, "पाहा, मजपुढें मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितों." तुम्ही बायबल काळजीपूर्वक वाचायला हवे. देवानें आपल्या अगोदरच निरोप्या कां पाठवला? येशूच्या आधी 6 महिने योहान कां जन्मास आला?
बायबलमध्ये काय म्हटले आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. जुन्या करारांत एका ठिकाणीं प्रमुख याजक अहरोन याची माहिती दिलेली आहे. अहरोन हा मोशेचा मोठा भाऊ होता. तो आणि त्याचे मुलगे देवाकडून तेलाचा अभिषेक झालेले याजक होते. त्यांच्या हाताखाली काम करणारे लेवी वेगवेगळी पात्र आणणे, भाकरीसाठी पिठाचें मिश्रण तयार करणे यासारखी कामें करीत, तर अहरोनाचें मुलगे पवित्र दर्शनमंडपाच्या आंत अर्पण करीत. हे काम ते सर्वजण मिळून करीत पण प्रायश्चिताच्या दिवशीं, फक्त प्रंमुख याजक एकटाच लोकांच्या प्रायश्चितासाठी अर्पण करीत असे.
लूक 1:5 मध्ये बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या वंशावळीसंबंधी माहिती आहे. येशूबद्दल नीट समजून घेण्यासाठीं आपल्याला देवाच्या निरोप्यासंबंधी नीट माहिती असणे हे आवश्यक आहे. येशूबद्दल विचार करण्याकडे आपला जास्त कल आहे त्यामुळे बाप्तिस्मा करणारा योहान जो येशूच्या अगोदर आला त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
"देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्राच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. यशया संदेष्टट्याच्या ग्रंथांत लिहिलें आहे कीं पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो, तो तुझा मार्ग तयार करील." स्वर्गाच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ नेहमीच बाप्तिस्मा करणा­या योहानापासून होतो.
बाप्तिस्मा करणा­या योहानाबद्दल आपल्याला नीट माहिती झाली की मग येशूची तारणाची सुवार्ता आपल्याला समजू शकते. जगभर पाठवलेल्या राजदूतांकडून ऐकण्याने आपल्याला एखाद्या देशाच्या अंतर्गत स्थितीची माहिती मिळते तसेच देवाचा दूत योहान याचे ऐकण्याने आपल्याला देवाच्या शुभवर्तमानासंबंधी ज्ञान मिळते.
आज अनेक ख्रिस्ती लोक योहानाला महत्त्व देत नाहीत ही खेदाची बाब आहे. देवाला कोणतेहि काम नव्हते आणि त्याला कंटाळा आला होता म्हणून कांही त्यानें योहानाला पाठवले नव्हते. नव्या करारातील चारही शुभवर्तमान येशूच्या सुवार्तेच्या आधी बाप्तिस्मा करणा­या योहानाबद्दल सांगतात.
पण सध्याचें सुवार्तिक योहानाला साफ विसरून लोकांना असं सांगतात कीं तुम्ही फक्त येशूवर वि·श्वास ठेवणे पुरेसे आहे. प्रत्यक्षांत ते लोकांना देवाच्या वचनाप्रमाणे न शिकवता पाप करण्यास परावृत्त करतात. योहानाचें महत्त्वपूर्ण कार्य समजून न घेतां तुम्ही येशूवर वि·श्वास ठेवला तर तुमचे ख्रिस्तीपण नांवापुरते होते. तुम्हाला सत्याची पारख करता आली नाही तर तुमचा उध्दार कसा काय होणार? ते अगदी अशक्य आहे.
उध्दाराची, पापमुक्तीची सुवार्ता वाटते तितकी साधी व सोपी नाही. पुष्कळांना वाटते की येशू खांबावर आपल्यासाठी मरण पावला त्यावर वि·श्वास ठेवला म्हणजे बस झाले. येशूकडे आपली पापें दिली गेली हे सत्य समजून न घेता केवळ वधस्तंभावरील मृत्युवर वि·श्वास ठेवण्याने, मग तो वि·श्वास कितीहि असो, तो कांही आपल्याला पापमुक्ती देत नाही.
तारणकार्य कसे केले जाईल आणि येशू जगाची पापें कशा प्रकारानें स्वतःकडे घेणार आहे हे जगाला समजावे म्हणूनच देवानें बाप्तिस्मा करणा­या योहानाला पाठवले होते. आपण हे सत्य समजून घेतले तरच आपल्याला कळून चुकेल कीं येशू हा देवाचा पुत्र आहे त्यानेच आपली पापें स्वतःकडे घेतली.
बाप्तिस्मा करणारा योहान आपल्याला तारणाचे सत्य दाखवून देतो. तो आपल्याला साक्ष देतो कीं येशू हाच देवाचा पुत्र आहे, आणि तो जगाचा प्रकाश म्हणून आला, पण जगाने त्याला ओळखले नाही. योहानाच्या पहिल्या अध्यायांत त्यानें अशी साक्ष दिली कीं येशूला बाप्तिस्मा देऊन त्याने उध्दाराचा मार्ग सिध्द केला.
उध्दारासंबंधी आपल्याकडे योहानाची साक्ष नसती तर आपण येशूवर वि·श्वास कसा काय ठेवणार होतो? आपण कांही येशूला पाहिलेले नाही. वेगवेगळ्या चोलीरीतीच्या व धर्माच्या पार्श्वभूमीवर आपण एकाच देवावर कसा काय वि·श्वास ठेवणार?
आज जगामध्ये वेगवेगळे धर्म असतांना येशू ख्रिस्त आपल्याला कसा काय समजू शकेल? येशू जो देवाचा पुत्र होता त्यानें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेऊन आपला उध्दार केला आहे याबद्दल आपल्याला कसे समजू शकेल?
त्यासाठीच आपण उध्दारासंबंधी प्रारंभापासून जुन्या करारांत काय लिहिलेले आहे ते शोधून काढून येशू हाच तारणकर्ता आहे याचा अभ्यास केला पाहिजे. अचूक वि·श्वासासाठी अचूक ज्ञानाची जरूर आहे. ख­या ज्ञानाखेरीज आपण कांहीच करू शकत नाही. येशूवर वि·श्वास ठेवून आपला उध्दार होण्यासाठी बाप्तिस्मा करणा­या योहानाने दिलेली साक्ष, सुवार्ता व त्यासाठी त्याने पार पाडलेली त्याची भूमिका, हे सर्वच आपण समजून घ्यायला पाहिजे.
म्हणूनच येशूने म्हटले होते, "तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." येशूकडून होणा­या तारणासंबंधीचे सत्य आपण समजून घ्यायला हवे.
 
 
बायबलमधील पुरावें
 
चार शुभवर्तमानें कुठून
सुरू होतात?
बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या
आगमनापासून.
 
बायबलमध्ये तारणासंबंधी असलेले सर्व पुरावे आपण आता शोधून काढू. बाप्तिस्मा करणारा योहान कोण होता, त्याला `मानवजातीचा प्रतिनिधी` किंवा `शेवटचा मुख्य याजक` कां म्हणतात, त्यानें जगाची पापें येशूकडे कशी काय सोपवली आणि येशूने ती पापें स्वतःकडे खरंच घेतली की नाही हे सर्व आपण चार शुभवर्तमानातून हुडकून काढून पाहू.
चारही शुभवर्तमानाचा प्रारंभ बाप्तिस्मा करणा­या योहानापासून होतो. योहान 1:6 यांत महत्त्वाचा मुद्दा आहे. जगाची पापें येशूकडे देण्याचें काम कोणी केले याबद्दल त्यांत सांगितलेले आहे. "देवानें पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला; त्याचें नांव योहान. तो साक्षीकरितां म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरितां आला; ह्रासाठीं कीं त्याच्याद्वारें सर्वांनी वि·श्वास ठेवावा." (योहान 1:6-7)
येथे असं म्हटले आहे, "त्याच्याद्वारें सर्वांनी वि·श्वास ठेवावा," आणि तो तर "त्या प्रकाशाविषयीं साक्ष देण्याकरितां आला." प्रकाश म्हणजेच येशू ख्रिस्त होय. योहानाने येशूविषयी साक्ष द्यायची होती की त्याच्याद्वारे सर्वजण येशूवर वि·श्वास ठेवतील. आता मत्तय मध्ये काय आहे ते पाहू.
 मत्तय 3:13-17 मध्ये लिहिले आहे, "तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हें काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणाला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें, तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येताना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली कीं, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयीं मी संतुष्फ् आहे."
 
योहानाच्या वंशावळीसंबंधी आपण
माहिती कां करून घ्यायला पाहिजे?
कारण बायबल सांगते की योहान हा संपूर्ण
मानवजातीचा प्रमुख याजक आहे.
 
लूक 1:1-14 मध्ये असें लिहिलें आहे, "ज्या गोष्टीसंबंधानें आपल्यामध्यें पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक ह्रांनीं आम्हांस सांगून ठेविलेला वृत्तांत लिहून काढण्याचें काम पुष्कळांनीं हाती घेतलें आहे; ह्रास्तव, थियफील महाराज, मलाहि वाटलें कीं, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळें मीं त्या आपल्याला अनुक्रमानें लिहाव्या; ह्रासाठीं कीं, ज्या वचनांचें शिक्षण आपल्याला देण्यांत आलें आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षांत यावा. यहूदीयाचा राजा हेरोद ह्राच्या दिवसांत अबीयाच्या वर्गांतील जख­या नांवाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळांतील असून तिचें नांव अलीशिबा होतें. ती उभयतां देवाच्या दृष्टीनें नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधि पाळण्यांत निर्दोष होतीं. अलीशिबा वांझ असल्यामुळें त्यांस मूलबाळ नव्हतें; ती उभयतां वयातीतहि झाली होतीं.
एकदां असें झालें कीं, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमानें देवापुढें आपलें याजकाचें काम करीत असतां, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणें प्रभूच्या पवित्रस्थानांत जाऊन धूप जाळण्याचें काम त्याच्याकडे आलें. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हां प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जख­या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूतानें त्याला म्हटलें, जख­या, भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यांत आली आहे. तुझी पत्नी अलीशीबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तूं त्याचें नांव योहान ठेव. त्याच्या जन्मानें तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील."
लूक येशूचा शिष्य बनला होता त्यानें त्याचें शुभवर्तमान थियफील नांवाच्या माणसाला शिकवले होते. हा थियफील वेगळ्या धर्माचा होता आणि त्याला प्रभू येशूबद्दल कांहीच माहिती नव्हती. लूकने योहानाच्या वंशावळीबद्दल प्रारंभापासून विस्तृतपणें वर्णन केलेले आहे. थियफीलला पापी लोकांचा तारणकर्ता येशू याच्याबद्दल नीट शिकवता यावे म्हणून लूकने विचार केला असेल की योहानाची वंशावळ विस्तृतपणे सांगणे जरूर आहे.
लूक 1:5-9 मध्ये म्हटले आहे, "यहूदीयाचा राजा हेरोद ह्राच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जख­या नांवाचा कोणीएक याजक होता, त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचें नांव अलीशिबा होतें. तीं उभयतां देवाच्या दृष्टीनें नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधि पाळण्यांत निर्दोष होती. अलीशिबा वांझ असल्यामुळें त्यांस मूलबाळ नव्हतें, ती उभयतां वयातीतहि झाली होती.
एकदा असें झालें कीं, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमानें देवापुढें आपले याजकाचें काम करीत असतां, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणें प्रभूच्या पवित्र स्थानांत जाऊन धूप जाळण्याचें काम त्याच्याकडे आलें."
लूकने अगदी स्पष्टपणें साक्ष दिलेली आहे कीं जख­या अहरोनाच्या कुळातील होता. तर मग जख­या कोणत्या वर्गाचा होता? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लूक स्पष्टीकरण करतांना म्हणतो, "जख­या आपल्या वर्गाच्या अनुक्रमानें देवापुढें आपलें याजकाचें काम करीत असतां" लूकला जख­याबद्दल इतकी नीट माहिती होती कीं त्यामुळें जख­या आणि अलीशिबा याच्याद्वारे तो तारणाचें शुभवर्तमान सांगू शकला.
आपण परराष्ट्रीय आणि वेगवेगळ्या वंशाचे, धर्माचे असे लोक आहोत. कोणीतरी विस्तृतपणे, नीटनेटके तारणासंबंधी आपल्याला सांगितले नसते तर आपल्याला तारण म्हणजे काय हे कधीच समजले नसते. जख­या आणि त्याची बायको अलीशीबा यांना मुलगा झाला तोच बाप्तिस्मा करणारा योहान होय. आता आपण जख­या आणि योहान यांच्या वंशावळीबद्दल पाहू.
 
 
बाप्तिस्मा करणा­या योहानाची वंशावळी
 
बाप्तिस्मा करणारा योहान कोणाचा
वंशज होता?
प्रमुख याजक अहरोन याचा.
 
बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या वंशावळीसंबंधी माहिती मिळवण्यासाठीं जुन्या करारांत 1 इतिहास 24:1-19. यांत काय लिहिले आहे ते आपण पाहू.
"अहरोनवंशजाचे वर्ग हे: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार. नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हें याजकाचें काम करीत. दाविदाने एलाजाराच्या वंशांतला सादोक व इथामाराच्या वंशांतला अहीमलेख यांस त्यांची सेवेची कामें वांटून दिलीं. इथामाराच्या वंशजापेक्षां एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरूष आधिक निपजले, त्यांची वाटणी येणेंप्रमाणें. झाली: एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचें प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातले पितृकुळांप्रमाणे आठ होते. याप्रमाणे दोन्ही वंशांतल्या पुरूषांकडे होती. आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक याचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक यांच्या पितृकुळांचें प्रमुख यांच्यासमोर त्यांची नांवे लिहिली; एक प्रमुख घराणें एलाजारचें व एक इथामाराचें अशीं धरिली. पहिली चिठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हारीमाची, चवथी सोरीमाची, पांचवी मलकीयाची, सहावी मीयामिनाची, सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची, नववी येशूवाची, दहावी शकन्याची, अकरावी एल्याशिवाची, बारावी याकीमाची, तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची, पंधरावी विल्गाची, सोळावी इम्मेराची, सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची, एकुणिसावी पथह्राची, विसावी यहेजकेलाची, एककविसावी याखीनाची, बाविसावी गामूलाची, तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची. इस्त्राएलाचा देव परमेश्वर यानें आज्ञा केली होती तदनुसार त्यांचा पूर्वज अहरोन याच्या हस्ते त्यांस लावून दिलेल्या विधीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरांत सेवा करावयास पाळीपाळीने जावयाचा त्यांचा हा क्रम लावून दिला होता."
वरील उता­यातील 10 व्या वचनांत लिहिले आहे, "सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची." अहरोनाच्या मुलांनी त्यांच्या क्रमानुसार अर्पण करावीत म्हणून दाविदानें प्रत्येकाच्या नांवावर चिठट्या टाकण्याची योजना केली होती. (तुम्हाला माहितच आहे कीं अहरोन हा मोशेचा वडील भाऊ होता. देवानें मोशेला त्याचा मदतनीस म्हणून आणि अहरोनाला इस्त्राएलच्या लोकांच्या पवित्रस्थानांत प्रमुख याजक म्हणून निवडले होते).
सर्व लेवी याजक म्हणून आणि अहरोन व त्याचें मुलगे हे देवासमोर अर्पणें करण्यासाठी प्रमुख याजक म्हणून निवडलेले होते. दाविदानें त्याची पध्दतशीरपणें चिठट्या टाकण्याची योजना अमलांत आणायच्या आधी अहरोनाचे वंशज ज्या पध्दतीनें चिठट्या टाकीत त्यामुळे पुष्कळदां गोंधळ होत असे.
म्हणूनच दाविदानें वंशजांची विभागणी करून वर्ग बनवले. अहरोनाच्या मुलाच्या मुलापासून केलेले 24 वर्ग होते आणि त्यापैकी अबीया आठव्या वर्गाचा होता. बायबलमध्ये असं म्हटले आहे, "अबीयाच्या वर्गातील जख­या नांवाचा कोणीएक याजक होता." म्हणजेच जख­या हा अबीयाच्या वर्गातील याजक होता आणि ते दोघंहि प्रमुख याजक अहरोनाचें वंशज होते.
जख­या हा अबीयाच्या वर्गातील याजक होता आणि तो बाप्तिस्मा करणा­या योहानाचा बाप होता. बायबलवरून आपल्याला समजते कीं त्या काळी जवळच्या नातेवाईकांची आपसांत लग्न होत असत. याकोबानें त्याच्या मामाच्या मुलीबरोबर लग्न केले होते. "अबीयाच्या वर्गातील जख­या नांवचा कोणीएक याजक होता" वंशावळीच्या विस्तृत वर्णनामध्ये हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. 
म्हणूनच तो अहरोनाचा वंशज होता. तो म्हणजे कोण? जख­या, बाप्तिस्मा करणा­या योहानाचा बाप. तारणकत्र्या येशूकडे जगाची सर्व पापें सोपवली जाणें, योहानाचे कार्य, हे सर्व खुलासेवार सांगतांना हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
 
 
फक्त अहरोनाच्या मुलांनी याजक ह्रा नात्यानें सेवा करावी
 
जुन्या कराराच्या वेळी याजक ह्रा
नात्यानें कोण सेवा करू
शकत होते?
अहरोन आणि त्याचें वंशज.
 
तर मग बायबलमध्ये नेमके कुठे लिहिलेले आहे कीं अहरोनाच्या मुलग्यांनीच याजक या नात्याने सेवा करावी? ते आपण आता पाहू.
गणना 20:22-29 मध्ये लिहिलेले आहे. इस्त्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगरापाशी येऊन पोहंचली. अदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्रांना म्हणाला कीं, अहरोन आतां आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. जो देश मी इस्त्राएल लोकांना दिला आहे त्यांत त्याचा प्रवेश हेणार नाही; कारण तुम्हीं मरीबाच्या पाण्यापाशीं माझ्या आज्ञेचें उल्लंघन करून बंड केले.
अहरोन व त्याचा मुलगा ह्रांना घेऊन होर डोंगरावर जा; आणि अहरोनाची वस्त्रें उतरून त्याचा मुलगा एलाजार ह्राला घाल; मग अहरोन तेथें मृत्यु पावेल आणि आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणें केलें; सर्व मंडळीदेखत ते होर डोंगर चढून गेले. तेथे मोशेनें अहरोनाची वस्त्रें उतरून त्याचा मुलगा एलाजार ह्राला घातलीं, आणि अहरोन तेथेच डोंगरमाथ्यावर मृत्यु पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले. अहरोन मरण पावल्याचें सर्व मंडळीला कळलें तेव्हां सर्व इस्त्राएल घराण्याने अहरोनासाठीं तीस दिवस शोक केला.
निर्गमच्या पुस्तकांत देवाची आज्ञा सांगते कीं प्रमुख याजकांचे मुलगे वयांत आल्यानंतर त्यांच्या वडलांच्या जागी याजकपदाचें काम पहातील.
निर्गम 28:1-5 मध्ये लिहिलेले आहे, "तुझा भाऊ अहरोन ह्रानें याजक ज्या नात्यानें माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्रांना इस्त्राएल लोकांतून आपल्याजवळ आण; आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्राच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर; आणि जे ज्ञानी आहेत म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केलें आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करावयाला सांग; त्यामुळें तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. त्यांनी तयार करावयाची वस्त्रें हीं: ऊरपट, एफोद, झगा, चौकडट्यांचा अंगरखा, मंदील व कमरबंद तुझा भाऊ अहरोन ह्रानें याजक ज्या नात्यानें माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी हीं पवित्र वस्त्रं तयार करावीं. त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचें सूत व तलम सणाचे कापड घ्यावें"
देवाने मोशेचा भाऊ अहरोन याचीच याजकीय सेवा करण्यासाठीं नेमणूक केली. हे काम दुसरा कोणी माणूस करू शकत नसे. म्हणूनच अहरोनाने पवित्र होऊन, सांगितल्याप्रमाणे पवित्र वस्त्रे घालावी यासाठीं देवाने मोशेला सूचना केल्या. देवाची वचनें आपण कधी विसरता कामा नये.
निर्गम 29:1-9 मध्ये देव म्हणतो, "त्यांनी याजक ह्रा नात्यानें माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठीं जे तुला करावयाचें तें हें: एक गो­हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावे, आणि बेखमीर भाकरी, तेलांत मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्या; ह्रा सर्व सपिठाच्या असाव्या. ह्रा सर्व एका टोपलींत घाल आणि तो गो­हा व ते दोन मेंढे ह्रांच्यासहित ती टोपली घेऊन ये. मग अहरोन व त्याचें मुलगे ह्रांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल; आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याच; अंगरखा व एफोदाचा झगा घाल, त्याला एफोद व ऊरपट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध; त्याच्या डोक्यात मंदील घाल आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव. नंतर अभिषेकाचें तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर. मग त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यानां अंगरखे घाल; आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध व त्याच्या डोक्यांना फेटे बांध; ह्रा प्रकारे ह्रा निरंतरच्या विधीनें त्याना याजकपद प्राप्त व्हावें. ह्रा प्रकारें अहरोन व त्याचे मुलगे ह्रांच्यावर संस्कार करावा."
"अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्रा प्रकारें ह्रा निरंतरच्या विधीनें त्यांना याजकपद प्राप्त व्हावें. ह्रा प्रकारें अहरोन व त्याचे मुलगे ह्रांच्यावर संस्कार करावा...." देवाने सांगितले की फक्त अहरोन व त्याचें मुलगे यांनीच फक्त पवित्र होऊन निरंतरच्या विधीनें याजकपद पार पाडावे. येशू आल्यानंतर सुध्दां हा निरंतरचा विधी खरा ठरला होता.
म्हणूनच प्रमुख याजक अहरोन याचा वंशज जख­या याच्याबद्दल लूक सविस्तरपणे सांगतो. जेव्हां जख­या परमे·श्वाच्या मंदिरांत याजकाच्या नात्याने सेवा करीत होता तेव्हां प्रभूचा दूत त्याच्यासमोर येऊन म्हणाला कीं देवाने त्याची प्रार्थना ऐकली, आणि त्याची पत्नी अलीशिबा हिला मुलगा होईल.
पण जख­याला यावर वि·श्वास ठेवता आला नाही म्हणून तो म्हणाला, "माझी पत्नी वयातीत आहे तर तिला कसा काय मुलगा होईल?" त्याच्या शंकेमुळे, अवि·श्वासामुळे देवानें त्याला मुका बनवले, आणि त्याचें शब्द खरे आहेत हे दाखवण्यासाठी जख­याला कांही काळ तो मुका राहील असं केले.
त्या दिवसानंतर त्याची पत्नी गरोदर रहिलीं, आणि थोडट्या काळाने कुमारी मरीया सुध्दां गर्भवती बनली. भ्रष्टाचारी मानवजातीला वाचवण्यासाठीं आणि आपले तारण होण्यासाठीं देवाला या दोन घटना घडवून आणाव्या लागल्या. त्यानें त्याचा सेवक योहान व स्वतःचा एकुलता एक पुत्र येशू या दोघांना जगांत पाठवले.
म्हणूनच देवानें त्याच्या पुत्राचा बाप्तिस्मा योहानाकडून घडवून आणला यासाठी की त्यायोगे जगाची पापें त्याच्याकडे दिली जातील आणि जो कोणी त्याच्यावर वि·श्वास ठेवेल त्याचा उध्दार होईल.
 
 
देवाचा खास दूरदर्शीपणा
 
उध्दारकार्यासाठी येशूच्या अगोदर
देवानें कोणाची योजना
केली होती?
बाप्तिस्मा करणा­या योहानाची.
 
मानवजातीचा उध्दारकर्ता येशू ख्रिस्त कुमारी मरीयेच्या उदरीं जन्मास आला होता. यहूदाचा वंशज योसेफ ह्राला मरीया वाग्दत्त होती. देवाचा करार पूर्ण करण्यासाठीं येशू यहूदाच्या घराण्यांत जन्माला आला त्याचप्रमाणें बाप्तिस्मा करणारा योहान सुध्दां प्रमुख याजक अहरोनाच्या घराण्यांत जन्मास आला होता.
योहान येशूच्या आधीच जन्माला येईल असं करून देवाने दोघांच्याहि जन्मांची अगोदरच योजना केलेली होती. योहान प्रथम जन्मल्यामुळें तो येशूचा बाप्तिस्मा करू शकला आणि त्यायोगे त्याच्याकडे जगाची पापें सोपवू शकला. जुन्या करारातील देवाचा करार पूर्ण करण्यासाठीं प्रमुख याजकाच्या वंशजाला पापाचें प्रायश्चित अर्पण करावे लागत असे. आणि नव्या करारांत हाच करार पूर्ण करावा लागला यासाठीं की येशूच्या तारणाच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवला जाईल.
निर्गम मध्ये देवाने इस्त्राएलच्या लोकांना नियम शास्त्र आणिं करार दिले होते. दर्शनमंडपातील अर्पणाच्या पध्दतीपासून ते थेट याजकाच्या वस्त्रांपर्यंत, अर्पणाच्या बारीकसारीक तपशीलापासून ते याजकांच्या मुलांच्या याजकपदापर्यंत सर्व कांही देवाने सांगितले होते. अहरोन आणि त्याचे मुलगे यांना निरंतरच्या विधीने याजकपद देण्याची योजना देवाने केलेली होती.
म्हणूनच अहरोनाचें वंशज अर्पणे करू शकत होते आणि प्रमुख याजक अहरोनाच्या घराण्यांतलाच असे. आता तुम्हांला समजले आहे का?
पण अहरोनाच्या अनेक वंशजांमधून देवानें जख­या आणि अलीशिबा यांनाच निवडले होते. तो म्हणाला होता, "पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढें पाठवितों." जेव्हां देवानें जख­याला सांगितले की अलीशिबेला मुलगा झाल्यावर त्याचें नांव तू योहान ठेव तेब्हां जख­या इतका थक्क झाला कीं मुलगा जन्मल्यानंतर त्याचें नांव ठेवण्याच्या दिवसापर्यंत तो मुका राहिला होता.
आणि खरच त्याच्या घरांत मुलगा जन्मला. त्याकाळी इस्त्राएलमध्ये मुलाचें नांव त्याच्या वडलानंतर ठेवले जात असे.
 "अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करूं लागले. मग आठव्या दिवशीं असें झालें कीं, ते बाळकाची सुंता करावयास आलें आणि त्याच्या बापाच्या नांवावरून तें त्याचें नांव जख­या ठेवणार होते; परंतु त्याच्या आईनें म्हटलें, तें नको, ह्राचें नांव योहान ठेवावयाचें आहे. ते तिला म्हणाले ह्रा नांवाचा तुझ्या नातलगांत कोणी नाहीं. मग ह्राचें नांव काय ठेवावयाचें आहे, असें त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारिलें. त्यानें पाटी मागवून ह्राचें नांव योहान आहे, असें लिहिलें. तेव्हां सर्वांस आश्चर्य वाटलें. मग लगेच त्याचें तोंड उघडलें, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलूं लागला. ह्रावरून त्यांच्या सभोवती राहणा­या सर्वांस भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशांत ह्रा सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणा­या सर्वांनीं ह्रा गोष्टी आपल्या अंतःकरणांत ठेवून म्हटलें, हा बाळक होणार तरी कोण? कारण प्रभु त्याच्याबरोबर होता." (लूक 1:57-66)
बाळकाचें नांव ठेवायच्या वेळेस जख­या मुका होता. नातेवाईकांनी बाळकाचे नांव जख­या असे सुचवले पण त्याची आई ठामपणें म्हणत होती की त्याचें नांव योहान ठेवायचे आहे. तेव्हां नातेवाईक म्हणाले की ह्रा नांवाचा नातलगांत कोणी नाही म्हणूनच बाळकासाठी बापाचे नांव ठेवायला पाहिजे.
जेव्हां अलीशिबा नांवासंबंधी हट्ट करू लागली तेव्हां नातेवाईक जख­याकडे गेले आणि त्याला विचारले कीं बाळकाचें नांव काय असायला पहिजे. जख­याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने पाटी मागवून त्यावर `योहान` असे लिहिले. त्या आगळ्यावेगळ्या नांवाच्या निवडीमुळे सर्व नातेवाईकांना खूप आश्चर्य वाटले.
मुलाचें नांव ठेवल्यानंतर जख­याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलूं लागला, आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यानें संदेश दिला.
लूक जख­याच्या घरांत जन्मास आलेल्या योहानाच्या जन्माबद्दल असे लिहितो. "अबीयाच्या वर्गांतील जख­या नांवाचा कोणीएक याजक होता." देवाच्या खास दूरदर्शीपणामुळें बाप्तिस्मा करणारा योहान हा अहरोनाचा वंशज जख­या याचा मुलगा म्हणून आणि मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून जन्माला आला. योहानाच्या द्वारे देवाने मानवजातीच्या कल्याणासाठी तारणाचें कार्य सिध्दीस नेले. योहान आणि येशू ख्रिस्त यांनी जे उध्दारकार्य केले त्यावर वि·श्वास ठेवण्याने आपले तारण झालेले आहे.
 
 
येशूचा बाप्तिस्मा
 
योहानाकडून येशूचा
बाप्तिस्मा कां झाला?
जगाची सर्व पापें निघून
जावी म्हणून.
 
बाप्तिस्मा करणा­या योहानाने साक्ष दिली की येशू देवाचा पुत्र होता आणि त्यानें सर्व पापें घेतली. योहान देवाचा सेवक होता आणि आपल्या उध्दारासाठी त्याने साक्ष दिली. त्याचा अर्थ असा नाही कीं देव स्वतःहूनच आपल्याला तो तारणकर्ता आहे हे सांगत आहे. तो चर्चमध्ये त्याच्या सेवकांकडून कार्य करतो आणि ज्यांचें तारण झालेले आहे त्यांच्या मुखांतून बोलतो.
देव म्हणतो, "गवत सुकतें, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचें वचन सर्वकाळ कायम राहतें. तिला पुकारून सांगा, तुझें युध्द संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे." (यशया 40:2,8)
आता येथून पुढे तू पापी नाहीस. तुझ्या पापांचें प्रायश्चित मी घेतले आहे. तुझें युध्द संपले आहे. उध्दाराच्या सुवार्तची वाणी आपल्याला हेच ओरडून सांगत आहे. हीच पूर्वनियोजित सुवार्ता आहे.
योहानाचें कार्य आपण समजून घेतले आणि आपण वि·श्वास ठेवला कीं त्यानें आपली सर्व पापें खरोखरच येशूकडे दिली तेव्हांच आपण सर्व पापांपासून मुक्त होतो.
बायबलमधील चारहि शुभवर्तमान बाप्तिस्मा करणा­या योहानाबद्दल सांगतात. जुन्या करारातला शेवटचा संदेष्टा सुध्दां योहानाबद्दल साक्ष देतो आणि नव्या कराराची सुरूवात बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या जन्मापासून होते.
तर मग आपण योहानाला बाप्तिस्मा करणारा असे कां म्हणतो? याचे कारण हेच की त्यानें येशूला बाप्तिस्मा दिला होता. बाप्तिस्मा याचा अर्थ काय? त्याचा अर्थ `दिले जाणे, पुरणे, धुतले जाणे`- जुन्या करारांतील `दोन्ही हात डोक्यावर ठेवणे` याचाहि अर्थ तोच आहे.
जुन्या करारांत, जेव्हां एखादा माणूस पाप करी तेव्हां तो दोषहीन पापार्पणाच्या डोक्यावर त्याचें दोन्ही हात ठेवून त्याचें पाप अर्पणाच्या माथीं ठेवीत असे. नंतर अर्पणाला मारले जाई. `डोक्यावर दोन्ही हात ठेवणे` म्हणजेच `दिले जाणे` किंवा `सोपवणे` असा होतो. म्हणूनच `डोक्यावर दोन्ही हात ठेवणे` आणि `बाप्तिस्मा` या दोन्हीचा अर्थ सारखाच होतो.
येशूच्या बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो? देवाच्या नियोजित कार्यपध्दतीप्रमाणे पापांसाठी प्रायश्चित घेण्याचा एकच मार्ग म्हणजे बाप्तिस्मा होय.
जुन्या करारांत पापी माणसं त्यांचे दोन्ही हात अर्पणाच्या डोक्यावर ठेवून त्यांची पापें त्याच्या माथीं ठेवीत. अर्पणाला मारल्यानंतर त्याचें रक्त याजकाकडून होमार्पणाच्या वेदीवरील शिंगाना लावले जाई. रोजच्या पापांच्या प्रायश्चितासाठी ही अशी पध्दत होती.
तर मग वर्षभराच्या पापांचे प्रायश्चित कसे केले जात असे?
अहरोन हा प्रमुख याजक इस्त्राएली लोकांच्या पापांसाठी अर्पण करीत असे आणि योहान हा अहरोनाच्या घराण्यांत जन्माला आल्यामुळें त्यानें प्रमुख याजक होणे हे योग्यच होते. तारणकार्य पूर्ण करण्याचें देवाचे जे वचन होते ते पार पाडण्यासाठी शेवटचा प्रमुख याजक म्हणून योहानाचीच देवाने निवड केलेली होती.
बाप्तिस्मा करणारा योहान हा मानवजातीचा प्रतिनिधी तर होताच पण शिवाय तो शेवटचा प्रमुख याजकहि होता. कारण येशूच्या जन्मामुळे जुना करार संपतो. जुन्या करारांत अहरोनाचें जसे लोकांच्या पापांच्या प्रायश्चितासाठी याजकाचें काम केले तसेच काम नव्या करारांत बाप्तिस्मा करणा­या योहानाखेरीज दुसरे कोण करणार होते? जुन्या कराराप्रमाणे शेवटचा प्रमुख याजक आणि संपूर्ण मानवजातीचा प्रतिनिधी या नात्यानें बाप्तिस्मा करणा­या योहानानें येशूचा बाप्तिस्मा करून सर्व पापें त्याच्या माथी ठेवली.
योहानाने सर्व पापें येशूच्या माथीं सोपवल्यामुळे पाणी व आत्मा या सुवार्तेवर आपण जेव्हां वि·श्वास ठेवतो तेव्हां आपला उध्दार होतो. पापी लोकांना वाचवण्यासाठी आणि उध्दारकार्याची देवाची पूर्वनियोजिन योजना पार पाडण्यासाठी येशू स्वतः देवाचा कोकरा बनला होता. येशूने म्हटले होते कीं, बाप्तिस्मा करणारा योहान हा शेवटचा संदेष्टा, आणि शेवटचा प्रमुख याजक जो जगाची सर्व पापें त्याच्याकडे सोपवील.
मग येशूने हे काम स्वतःच कां केले नाही त्याला योहानाची गरज कां होती? येशूच्या अगोदर सहा महिने योहान जन्मला याचे कांही कारण आहे. जुन्या करारातील देवाचा नियम पूर्णपणे पाळण्यासाठीच योहान येशूच्या आधी जन्मला होता.
येशू कुमारी मरीयेच्या उदरी जन्मास आला तर योहान वयोवृध्द स्त्री अलीशिबा हिच्या पोटी जन्मास आला. हे सर्व देवाचें काम होते. पापी लोकांची सुटका करण्यासाठीं योहान आणि येशू यांना देवानें जगांत पाठवले. पापांचे असह्र दुष्परिणाम सहन करीत पापाविरूध्द युध्द करून रंजीस आलेल्या मानवजातीला वाजवण्यासाठीं देवानें त्याचा सेवक, शेवटचा प्रमुख याजक योहान आणि स्वतःचा पुत्र येशू, यांना जगांत पाठवले.
 
 
स्त्रियांपासून जन्मलेल्यांत थोर माणूस
 
पृथ्वीवर सर्वांत मोठा
माणूस कोम होता?
बाप्तिस्मा करणारा योहान.
 
मत्तय 11:7-14 मध्ये असे म्हटले आहे, "तें जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलूं लागलाः तुम्ही काय पाहावयास रानांत गेलां होतां? वा­यानें हालविलेला बोरू काय? तर मग काय पाहावयास गेलां होता? तलम वस्त्रें धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रें वापरणारे राजवाडट्यांत असतात. तर मग कां गेलां होतां? संदेष्टट्याला पाहावयास काय? मी तुम्हांला सांगतों, हो; संदेष्टट्याहूनहि जो श्रेष्ट त्याला. `पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवितों, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिध्द करील.` असें ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. मी तुम्हांस खचित सांगतो कीं स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्यापेक्षां मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यांत जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्या दिवसांपासून तो आतांपर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्रांनी संदेश दिले; आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे."
 लोक रानामध्ये बाप्तिस्मा करणा­या योहानाला पहाण्यासाठी गेले. तो तर रानांत ओरडून म्हणत होता "सापांच्या पिलांनो! पश्चाताप करा" आणि येशू त्याच्याबद्दल असं म्हणतो, "तुम्ही रानांत काय पहावयास गेला होता? तलम वस्त्रें धारण केलेल्या माणसाला का? पाहा, तलम वस्त्रें वापरणारे राजवाडट्यांत असतात."
योहानाच्या मोठेपणाची साक्ष येशूने स्वतःहून दिलेली होती. "तुम्ही काय पाहावयास रानांत गेला होता? उंटाच्पा केसांची वस्त्रे पांघरणा­या आणि फुफ्फुसांना ताण देऊन आरोळी ठोकणा­या रानटी माणसाला काय? त्यानें नक्कीच उंटाच्या केसांची वस्त्रे पांघरली असतील. तलम वस्त्रें धारण केलेल्या माणसाला काय? जे तलम वस्त्रें वापरतात ते तर राजवाडट्यांत असतात. पण तो तर राजापेक्षां श्रेष्ठ आहे." अशी साक्ष देत येशू आणखी म्हणाला, "जे तलम वस्त्रें धारण करतात ते राजवाडट्यांत असतात. तर मग तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टट्याला? होय, मी तुम्हांला खचित सांगतो कीं संदेष्टट्याहून श्रेष्ठ आहे त्याला."
पूर्वीच्या काळीं संदेष्टे राजांहूनहि श्रेष्ठ असत. बाप्तिस्मा करणारा योहान राजापेक्षां श्रेष्ठ आणि संदेष्टट्याहून श्रेष्ठ होता. जुन्या करारातील सर्व संदेष्टट्याहून तो श्रेष्ठ होता. खरं म्हणजे मानवजातीचा प्रतिनिधी व शेवटचा प्रमुख याजक जो योहान तो पहिला प्रमुख याजक अहरोनापेक्षां श्रेष्ठ होता. येशूने स्वतःच योहानाबद्दल अशी साक्ष दिलेली आहे.
मानवजातीचा प्रतिनिधी कोण आहे? येशू ख्रिस्त सोडला तर पृथ्वीवर मोठा माणूस कोण आहे? बाप्तिस्मा करणारा योहान. "मी तुम्हांला खचित सांगतो संदेष्टट्याहून श्रेष्ठ. पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवितों, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिध्द करील."
बाप्तिस्मा करणा­या योहानानें साक्ष दिली की पापांविरूध्द चाललेलें युध्द संपले आहे. "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोकरा!" योहानाने येशूबद्दल साक्ष दिली की येशूनें जगाची सर्व पापें वाहिली.
 मत्तय 11:11 या ठिकाणीं म्हटले आहे, "मी तुम्हांस खचित सांगतों कीं, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्यापेक्षां मोठा कोणी निघाला नाहीं." स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्यापेक्षां कोणी मोठा आहे का?
`स्त्रियांपासून जन्मलेल्यांत` याचा अर्थ काय? याचा अर्थ संपूर्ण मानवजातीमथ्ये. आदामाचा अपवाद सोडला तर बाकी सर्वजण स्त्रियांपासून जन्मलेले आहेत. होय, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्यापेक्षां मोठा कोणी नाही. म्हणूनच योहान हा शेवटचा प्रमुख याजक, मानवजातीचा प्रतिनिधी आणि संदेष्टा ठरतो.
देवाच्या दूरदर्शीपणाला अनुसरून जुन्या करारांत अहरोन आणि त्याचें मुलगे पवित्रतेने देवाची सेवा करीत. फक्त त्यांच्या हस्तेच लोकांच्या पापार्पणाचा विधि होत असे. देवाने तसा नियम केला होता.
जर एखाद्या लेव्याने धाडस करून पुढे येऊन ह्रा कामांत ढवळाढवळ केली असती तर तो नक्कीच मेला असता. ते वेदीवरील अग्नीसाठी सरपण गोळा करणे, जनावरांची कातडी काढून त्यांचे आंतले भाग म्हणजे आंतडी, चरबी काढणे यासारखी कामें फक्त करू शकत होते. जर त्यांनीं प्रमुख याजक पदाचें काम करण्याचा प्रयत्न केला असता तर ते मेले असते. देवाच्या नियमशास्त्रामुळे ते त्यांना आखून दिलेल्या मर्यादारेखेचे उल्लंघन करू शकत नव्हते.
पृथ्वीवर बाप्तिस्मा करणा­या योहानापेक्षां मोठा कोणी झाला नाहीं. मत्र्य लोकांमध्ये तो सर्वांत थोर होता. "बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्या दिवसांपासून तों आतांपर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे तें बळकावीत आहेत."
बाप्तिस्मा करणा­या योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हां मानवजातीचे उध्दारकार्य संपुष्टांत आले. जे येशूवर वि·श्वास ठेवतात ते स्वर्गाच्या राज्यांत जातात. ते नीतिमान बनतात. योहानाच्या बापाने त्याच्या मुलाबद्दल कशी काय साक्ष दिली ते आपण आता पाहू.
 
 
योहानाचा बाप जख­या यानें दिलेली साक्ष
 
स्वतःच्या मुलाबद्दल जख­याने
काय संदेश दिला?
योहान प्रभूचा मार्ग सिध्द करील
ह्रासाठीं कीं त्याच्या लोकांस त्यांच्या
पापक्षमेने तारणाचें ज्ञान द्यावे.
 
लूक 1:67-80 मध्ये म्हटले आहे,
"त्याचा बाप जख­या ह्राने पवित्र आत्म्यानें परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असाः इस्त्राएलाचा देव प्रभु धन्यवादित असो; कारण त्यानें आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे; आणि आपल्यासाठीं त्याने आपला दास दावीद ह्राच्या घराण्यांत बलवान उध्दारक प्रस्थापित केला आहे; हे त्यानें युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्टट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होतें. म्हणजे आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणा­या सर्वांच्या हातून सुटका करावी; अशासाठीं कीं, आपल्या पूर्वजांवर त्यानें दया करावी आणि त्यानें आपला पवित्र करार म्हणजे जी शपथ आपला पूर्वज अब्रााहाम ज्याच्याशीं त्यानें वाहिली ती स्मरावी, ती अशी कीं, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीनें आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणें कराल, असें मी करीन. आणि हे बाळका तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरितां तूं त्याच्यापुढें चालशील; ह्रासाठीं कीं त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेनें तारणाचे ज्ञान द्यावे. आपल्या देवाच्या परम दयेने हें झालें आहे; तिच्यायोगें उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल. ह्रासाठी कीं त्यानें अंधारांत व मृत्युच्छायेंत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचें पाय शांतीच्या मार्गी लावावे. तो बाळक वाढत गेला व आत्म्यांत बलवान होत गेला, आणि इस्त्राएलास प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यांत राहिला."
जख­यानें दोन गोष्टींबद्दल संदेश दिले. त्यानें संदेश दिला कीं इस्त्राएलचा राजा आलेला आहे नंतर 68 व्या वचनापासून ते 73 व्या वचनापर्यंत त्यानें हर्षभरित होऊन सांगितले कीं देव त्यानें केलेला करार विसरला नाही. अब्रााहाम व इस्त्राएली लोक यांच्याबरोबर त्याने जी शपथ वाहिली ती स्मरणांत ठेवून त्याने कुमारी मरीयेच्या द्वारे येशूला जन्मास आणले यासाठीं कीं अब्रााहामाचें वंशज त्यांच्या शत्रूंच्या हातून सुटू शकतील.
आणि 74 व्या वचनांत "ती अशी कीं, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझी सेवा निर्भयपणें कराल" देवानें अब्रााहाम आणि इस्त्राएली यांच्याबरोबर जो करार केला किंवा जी शपथ वाहिली ती पुढील वचनांत व्यक्त केली आहे. "ती अशी कीं, तुम्ही माझी सेवा निर्भयपणें कराल."
76 व्या वचनांनंतर जख­या त्याच्या मुलाला संदेश देतांना म्हणतो, "आणि हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील; ह्रासाठीं कीं त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेनें तारणाचें ज्ञान द्यावे. आपल्या देवाच्या परम दयेनें हें झालें आहे; तिच्यायोगें उदयप्रकाश करून आमच्याकडे येईल. ह्रासाठीं कीं त्यानें अंधारांत व मृत्युच्छायेंत बसलेल्यांना प्रकाश द्यावा, आणि आमचें पाय शांतीच्या मार्गी लावावें."
जख­याने 77 व्या वचनांत म्हटले आहे, "यासाठीं कीं त्याच्या लोकांस त्यांच्या पापक्षमेनें तारणाचें ज्ञान द्यावें." आता कोणाकडून लोकांना तारणाचें ज्ञान मिळणार असं जख­या म्हणतो? बाप्तिस्मा करणारा योहान. तुम्हांला दिसून आले का? देवाच्या वचनाप्रमाणें बाप्तिस्मा करणारा योहानच आपल्याला हे ज्ञान देणार होता कीं येशू हा देवाचा पुत्र त्यानेच जगाची सर्व पापें वाहिली.
आता मार्कच्या पहिल्या अध्यायांत पहा, "देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्राच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. यशया संदेष्टट्याच्या ग्रंथांत लिहिलें आहे कीं, पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढें पाठवितों; तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यांत घोषणा करणा­याची वाणी झाली, ती अशी कीं, `परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या वाटा नीट करा. त्याप्रमाणें पापांच्या क्षमेसाठीं पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा` अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यांत प्रगट झाला. तेव्हां सगळा यहूदीया देश व सर्व यरूशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपआपलीं पापें पदरी घेऊन यार्देन नदींत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला." (मार्क 1:1-5)
दुस­या देशांच्या धर्माप्रमाणें मूर्तिपूजा करण्याचे सोडून देऊन लोकांनी बाप्तिस्मा करणा­या योहानापासून बाप्तिस्मे घेतलें. योहानानें साक्ष दिली, "तुम्ही देवाकडे वळावे म्हणून मी तुम्हांला बाप्तिस्मा देतो. पण देवाचा पुत्र माझ्याकडे येऊन बाप्तिस्मा घेईल यासाठी कीं तुमची सर्व पापें त्याने घ्यावी. जुन्या करारांत अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवण्याने त्याच्या माथीं पापें दिली जात तसेंच तुमचीहि पापें देवाच्या पुत्राच्या डोक्यावर बाप्तिस्मा करतांना दोन्ही हात ठेवण्याने दिली जाणार आहेत."
येशूचा बाप्तिस्मा यार्देन नदींत झाला. त्या नदीला `मृत्युची नदी` असेहि म्हणतात. मरण पावलेल्या माणसाला पुरायच्या आधी आपण अशा अर्थाचें गाणे म्हणतो "मधुरतेने सोडून जाताना, भेटू आपण नदीपलिकडे". जेव्हां आपण मरतो तेव्हां यार्देन नदी आपल्याला ओलांडून जावे लागते. यार्देन नदी ही मृत्युची नदी आहे. येशूचा बाप्तिस्मा ह्राच नदींत झाला होता.
 
 
आपली पापें घेतली जाणारा बाप्तिस्मा
 
नव्या करारांत डोक्यावर हात
ठेवणे याचा अर्थ काय आहे?
येशूचा बाप्तिस्मा.
 
मत्तय 3:13-17 मध्ये लिहिले आहे,
"तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा, असें असता आपण माझ्याकडे येतां हे काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हे आपणांला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें; तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयीं मी संतुष्ट आहे."
बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी येशू यार्देन नदीवर येऊन योहानास म्हणाला, "मला बाप्तिस्मा दे" पण योहान म्हणाला, "आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येता हे काय?" स्वर्ग आणि पृथ्वीवरील दोन प्रमुख याजक अशा प्रकारे एकमेकांना भेटले होते! इब्राी लोकांस पत्र या पुस्तकाप्रमाणें `येशू ख्रिस्त हा मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणें युगानुयुगाचा याजक आहे.` मलकीसदेकाची वंशावळ बायबलमध्ये लिहिलेली नाही. तो अहरोनाचा वंशज नाही. तोच देवाचा पुत्र कारण त्याची वंशावळ लिहिलेली नाही स्वर्गाचे वैभव व गौरव सोडून तो मानवजातीला वाचवण्यासाठी या पृथ्वीतलावर आला.
सैतानाकडून फसवणूक होऊन पापपीडित झालेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन त्यांची सर्व पापें स्वतःकडे घेण्यासाठीं येशू ह्रा जगांत आला. "येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे, कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हे आपणाला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें."
"आतां हें होऊं दे" मानवजातीच्या प्रतिनिधीसमोर मस्तक लवून येशूने असे म्हटले. जुन्या करारांत देवासमोर पापार्पण करीत तेव्हां पापी माणूस किंवा प्रमुख याजक अर्पणाने पाप वाहून न्यावे यासाठी दोन्ही हात पापार्पणाच्या डोक्यावर ठेवीत असत. `डोक्यावर दोन्ही हात ठेवणे` म्हणजेच `वाहून नेणे` `सोपवणे` किंवा `त्याच्या शिरीं ठेवणे` असा होतो.
योहानाकडून झालेला येशूचा बाप्तिस्मा म्हणचे जुन्या करारातील `डोक्यावर दोन्ही हात ठेवणे` या पध्दतीसारखाच आहे. बाप्तिस्मा याचा अर्थः `सोपवणे,` `धुतले जाणे` `अर्पण करणे` असा होतो. नवा करार म्हणजे वास्तवता आहे तर जुना करार ही त्याची छाया आहे.
जेव्हां पापी माणूस त्याचें दोन्ही हात मेंढयाच्या डोक्यावर ठेवी तेव्हां त्याची सर्व पापें मेढयाच्या माथीं जात. ते मेंढरू मेल्यानंतर त्याला पुरले जात असे. आता सगळी पापें मेंढयात घातल्यानंतर मेंढरू मेले तर ज्याने ते मेंढरू आणले तो पापी ठरतो का?
आता आपण असं समजू की माझ्या हातातील रूमाल म्हणजे पाप आहे आणि मी मायक्रोफोनवर दोन्ही हात ठेवण्याने सर्व पापें त्यांत गेली असं होते. मायक्रोफोन किंवा मेंढरावर हात ठेवण्याने त्यांत ती पापें जातात. उध्दारकार्यामध्ये हे असें दोन्ही हात डोक्यावर ठेवणे जरूर आहे. त्यानंतर तो माणूस पापी ठरत नाही. येशूचा बाप्तिस्मा पापें धुण्यासाठी, पुरण्यासाठी, पापें सोपवली जाण्यासाठी होता.
 
धर्माचरण पूर्ण करणें याचा
काय अर्थ आहे?
येशूकडे सर्व पापें देऊन ती
धुतली जाणे.
 
जेव्हां येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां जगाची सर्व पापें खरोखरच त्याच्याकडे दिली गेली का? जगाची सर्व पापें त्याच्याकडे सोपवल्यानंतर सर्व लोकांचा उध्दार झालेला आहे. जुन्या करारातील अर्पणपध्दतीसारखेच हे आहे. येशू ह्रा जगांत आला आणि यार्देन नदीतीरी म्हणाला, "आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हे आपणाला उचित आहे." (मत्तय 3:15)
मग येशूनें स्वतःचा बाप्तिस्मा योहानाकडून करवून घेतला. `सर्व धर्माचरण` याचा अर्थ `सर्वांत योग्य.` येशूने योहानाला सांगितले कीं दोघांनीहि सर्व धर्माचरण पूर्ण करणें उचित आहे. म्हणजेच येशूला बाप्तिस्मा देऊन त्याच्याकडे सर्व पापें देणे हे योहानासाठी योग्यच होते.
येशूचा बाप्तिस्मा, त्याचें अर्पण आणि आपला वि·श्वास याच्यावरच देव आपल्याला तारण देतो. जणू कांही येशू तेव्हां म्हणाला, "संपूर्ण मानवजात सैतानाच्या कचाटट्यांत आलेली आहे. पापांनी पीडलेली आहे. तू तर मानवजातीचा प्रतिनिधी आहेस आणि अहरोनाचा वंशजहि आहेस. तर लोकांना वाचवून स्वर्गात पाठवता यावे यासाठी तूच मला बाप्तिस्मा दे. त्यामुळें उध्दारकार्य पूर्ण होईल."
तेव्हां योहानानें उत्तर दिले असेल, "होय, मला समजते."
म्हणून योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला. त्याच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून योहानानें जगाची सर्व पापें त्याच्या माथीं ठेवली. तारणकत्र्या येशूनें ही सर्व पापें धुतली. आम्ही ह्रा सुवार्तेंवर वि·श्वास ठेवून वाचलो आहोत. तुमचा वि·श्वास आहे का?
बाप्तिस्मा केल्यानंतर जगाची सर्व पापें स्वतःच्या डोक्यावर घेऊन येशू साडेतीन वर्षे ठिकठिकाणी प्रवास करीत उपदेश देत फिरला.
व्यभिचार करतांना पकडण्यांत आलेल्या स्त्रीला येशू म्हणाला होता, "मीहि तुला दंड ठरवीत नाही." तो तिला दोषी ठरवू शकला नाही कारण तिचे दोष त्याने आपल्या शिरीं घेतले होते आणि त्यासाठी तो वधस्तंभावर मृत्युदंड सहन करणार होता. गेथशेमानें बागेंत प्रार्थना करतांना येशूने तीन वेळां त्याच्या स्वर्गीय पित्याला विनंती केली कीं शक्यतो हा पेला मजपासून दूर कर. पण नंतर तो म्हणाला, "माझ्या इच्छेप्रमाणें नको, तुझ्या इच्छेप्रमाणें होऊ दे."
 
 
हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!
 
येशूनें किती पापें नेली?
जगांतील सर्व पापें.
 
योहान 1:29 मध्ये म्हटले आहे, "दुस­या दिवशीं येशूला आपणाकडे येतांना पाहून तो म्हणाला, हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" बाप्तिस्मा दिल्यानंतर दुस­या दिवशी येशूला येतांना पाहून योहानाने लोकांना उद्देशून अशी साक्ष दिली, "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!"
देवाच्या पुत्राने जगांत येऊन जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली. योहान 1:35-36 या ठिकाणी योहान पुन्हां एकदा साक्ष देतो, "त्यानंतर दुस­या दिवशीं योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हां उभा असतां, येशूला जातांना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पाहा, देवाचा कोंकरा!"
देवाचा कोकरा याचा अर्थ म्हणजे, येशू जुन्या कराराप्रमाणें इस्त्राएलच्या पापांसाठी मरण पावणा­या अर्पणाप्रमाणे खरा वास्तवपूर्ण अर्पण होता. तुमच्यासाठीं, माझ्यासाठी आपला निर्माणकर्ता, देवाचा पुत्र खाली या जगांत येऊन आदिपासून ते अंतापर्यंत असलेली सर्व पापें, आपल्या प्रथम पापापासून ते सर्व पातकांपर्यंत आणि आपल्या लहानसहान चूकांपासून ते दोषांपर्यंत सर्व कांही स्वतःकडे घेऊन बाप्तिस्मा व वधस्तंभावरील रक्त यांच्या योगे त्याने आपल्याला पापांपासून मुक्त केले.
येशूनें सर्व पापें घेऊन आपला उध्दार केला हे तुमच्या लक्षांत येते का? "जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!"
येशू ख्रिस्ताला या जगांत येऊन जवळजवळ 2000 वर्षे झाली. इ.स.1 हे त्याच्या जन्माचें वर्ष होते. इंग्रजींत हा काळ आपण ख्रिस्तापूर्वी अशा शब्दांत म्हणतो.
इ.स.30 मध्ये बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला. दुस­याच दिवशीं लोकांकडे पाहून योहान उच्च स्वरानें म्हणाला, "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" "हा पाहा!" येशूबद्दल ठामपणें बोलून तो लोकांना साक्ष देत होता की हाच देवाचा कोंकरा आहे.
येशूनें सर्व पापें घेऊन आपल्या पापविरूध्दच्या युध्दाची समाप्ति केली. देवाच्या पुत्रानें सर्व पापें समुळ नाहिशी केल्यामुळें आपण आता पापी नाही. योहानाने हीच साक्ष दिली कीं येशूनें सर्वांची, तुमची व माझी पापें घेतली. "तो साक्षीकरितां म्हणजे त्या प्रकाशाविषयीं साक्ष देण्याकरितां आला; ह्रासाठीं कीं, त्याच्याद्वारें सर्वांनी वि·श्वास ठेवावा." (योहान 1:7).
योहानाची साक्ष नसती तर आपल्याला कसे काय समजले असते की येशू हाच जगाचें पाप हरण करणारा कोंकरा होता आणि त्यानें जगाची सर्वच्या सर्व पापें स्वतःच्या खांद्यावर घेतली? बायबल खूप वेळां सांगते की येशू आपल्यासाठी मरण पावला पण फक्त योहान साक्ष देतो की येशूने सर्व पापांचें ओझे स्वतःकडे घेतले.
  
जगामध्ये एकूण किती पाप आहे?
जगाच्या निर्मीतीपासून ते अंतापर्यंत
सर्व माणसांची पापें जेवढी आहेत
तेवढी सर्वच्या सर्व पापें.
 
 येशू मेल्यानंतर खूप जणांनीं त्याच्याबद्दल साक्ष दिली पण फक्त योहानानेच येशू जिवंत असतांना त्याच्याबद्दल साक्ष दिली होती. अर्थात येशूच्या शिष्यांनी पण येशू हा तारणकर्ता आहे अशी साक्ष दिलेली होती.
 आता तुम्ही वयानें 100 वर्षाचे पण नाही खर आहे ना? येशूनें जगाची पापें स्वतःकडे घेतली तेव्हां तो 30 वर्षाचा होता. आता पुढील आकृत्ती पहा.
 
8bd4b4de-8456-4009-8015-e960627307c3

येशूच्या जन्माअगोदर 4000 वर्षें हे जग निर्माण झाले होते. येशू जन्माला येऊन 2000 वर्षे झाली आहेत. आपल्याला माहिती नाही की हे जग किती काळ असेल, पण एक दिवस जगाचा अंत नक्कीच होणार आहे. तो म्हणतो, "मी अलफा व ओमेगा, म्हणजे पहिला व शेवटला, आदि व अंत असा आहे." (प्रकटीकरण 22:13)
तर मग एक दिवस जगाचा अंत नक्कीच होणार आहे. आपण आता 2002 या वर्षांत आहोत. येशूने स्वतःकडे जगाची पापें घेतली तेव्हां तो काळ इ.स.30 हा होता, म्हणजेच खांबावर तो मरण पावला त्याच्या 3 वर्षे आधीचे ते वर्ष होते.
"जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" देवाच्या कोंक­यानें जगाची, तुमची व माझी 2000 वर्षापूर्वीच सर्व पापांपासून मुक्तता केली तरीसुध्दां आपण पापांत राहून पाप करीत राहतो. आपण जन्मतो त्याक्षणापासून आपण पापांत रहायला लागतो.
आपण जन्मतो त्या क्षणापासून आपण पाप करतो का? होय, आपण पाप करतो. आता आपण आपलें आयुष्यचक्र पाहू. जन्मलो त्या दिवसापासून ते वयाच्या 10 व्या वर्षापर्यत आपण पाप करतो का? होय, आपण करतो. मग ती पापें येशूकडे दिली गेली होती का? होय, ती दिली होती. येशूने आपली पापें स्वतःकडे घेतली म्हणून तर तो तारणकर्ता आहे.
वयाच्या 11 ते 20 वर्षाच्या दरम्यान आपण पाप करतो का, कीं नाही करत? होय, आपल्या मनानें व कृतीने आपण पाप करीत असतो आणि ते करण्यात आपण चांगलेच हुशार आहोत. पाप करू नका असं आपल्याला शिकवलेले असते तरीसुध्दां आपण अगदी सफाईने पाप करीत असतो.
आणि देव आपल्याला सांगत आहे कीं ही सर्व पापें येशूने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहेत. कारण देवाला माहित आहे कीं आपण कसे आहोत म्हणून आधीच त्यानें आपली सर्व पापें घेतली.
आपण ह्रा जगांत किती वर्ष जगतो? असं म्हणू कीं 70 वर्ष आपण जगतो. आता एवढया काळांत आपण जे कांही अपराध केले आहेत ते सर्व मोजले तर किती वजन असू शकेल? आपण ते 8 टन वजनाच्या लाँरीमध्ये भरले तरी त्या अपराधांचे वजन 100 टनाहून जास्तच भरेल.
तुम्ही नुसती कल्पना करा कीं सबंध आयुष्यांत आपण किती अपराध करीत असतो. ते सर्व अपराध जगाचें पण आहेत की नाहीत? होय, ते जगाचें पण अपराध आहेत. वयाच्या 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान आपण पापें करीत असतो आणि ती सुध्दां जगाचीच पापें ठरतात.
 
 
माणसाचा तारणकर्ता येशू ख्रिस्त
 
येशूनें किती अपराध
स्वतःकडे घेतले?
आपल्या पूर्वंजासून ते वंशजापर्यंत
जगाच्या अंतापर्यंत होणारे
सर्व अपराध.
 
येशू आपल्याला सांगतो कीं त्यानें आपलें सर्व अपराध धुतलेले आहेत. `मला बाप्तिस्मा दे` असं येशू म्हणू शकत नव्हता म्हणूनच देवानें त्याचा सेवक योहान याला सर्व लोकांचा प्रतिनिधी म्हणून पाठवलें. जगाची पापें धुवून टाकण्यासाठीं देवाचा पुत्र देहरूपाने आला, "त्याला अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील." देवाचे हे असें अद्भूत तारणकार्य आहे हे तुम्हां पटते का?
होय, हे अद्भूत आहे. म्हणून फक्त एकदाच योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन सर्वांचे अपराध धुवून टाकून, जगाच्या सर्व पापांच्या अपराधांची शिक्षा म्हणून खांबावर मरणदंड भोगून त्यानें सर्वांनाच पापमुक्त केले. विचार करा, तुम्ही वयाच्या 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 60, आणि 70 ते थेट 100 वर्षापर्यंत जी कांही पापें केली आणि तुमच्या मुलाबाळांनी केलेली सर्व पापें ती येशूने धुवून टाकली की नाही? होय त्यानें सर्व अपराध धुतले. तो येशू ख्रिस्त, मानवजातीचा उध्दारकर्ता आहे.
देवाने योजना केल्याप्रमाणें बाप्तिस्मा करणा­या योहानानें सर्व अपराध येशूकडे दिल्यामुळें केवळ येशूवर वि·श्वास ठेवण्याने आपली पापांपासून सुटका होते. आता तुम्ही आणि मी पापी आहोत का? आपले सर्व अपराध येशूकडे दिले होते की नाही? आपण आता येथूनपुढे अजिबात पापी नाही आणि येशूकडे आपले सर्व अपराध दिले होते.
जगांत पाप आहे असं म्हणण्याचें धैर्य कोणाला आहे? येशूनें जगाची सर्वच पापें नेली. आपल्यापैकी कांही जण 50 वर्षाचे पण नाहीत आणि कांही जण आपल्या अर्धे आयुष्य पण जगलेले नाहीत पण आपण आणि मी सुध्दां स्वतःबद्दल असं कांही बोलतो की जणू काय आपण खूप काळ जगलेलो आहेत.
आपल्यापैकी पुष्कळजण वादळी आयुष्य जगतात. मी हे खुलासा करून सांगतो. एखादी माशी किती काळ जगते? फार तर 12 तास.
माशी दुस­या माशीला सांगते, "मला एक माणूस भेटला त्यानें माझ्यावर माशी मारण्याचे फेकले तेव्हां मी मरूनच जाणार होते, आणखी तुला माहिती आहे...." ती माशी फक्त 12 तास जगली पण तिचे बोलणे तोपर्यंत चालूच होते! त्यांत तिचें अर्धे आयुष्य गेले होते.
संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता माशीच्या आयुष्याची संध्याकाळ होऊन ती मरते. कांही माश्या 20 तास तर कांही 21 तास जगतात आणि कांही तर जरव्खड म्हाता­या होईपर्यंत 24 तास जगतात! ते त्यांच्या आयुष्यातील अनुभव लाख सांगतील पण जे 70 किंवा 80 वर्षाचे आहेत ते म्हणतील `मला हसवायचा प्रयत्न करू नका." माश्यांचें हे असे अनुभव आपल्यापुढे कांहीच नाहीत.
परमेश्वर निरंतर आहे. तो युगानुयुगाचा देव आहे. प्रारंभ आणि अंत तोच ठरवतो. तो त्याच्या युगानुयुगाच्या जागेपासून आपल्याकडे पहात असतो.
एखादा माणूस त्याच्या मित्राला म्हणतो, "अरेरे! मी फक्त 20 वर्षाचा आहे आणि मी खूप पाप केलेले आहे" तर दुसरा म्हणतो, "मी तर 30 वर्षाचा आहे आणि मी तर तुझ्यापेक्षां जास्त पाप केलेले आहे. मला माझ्या पापांपासून कधी क्षमा मिळेल का?"
 देवाला असं म्हणायचे आहे, "असं बोलून मला हसवायला पाहू नका मी आता ह्रा वेळापर्यंत केवळ तुमच्याच पापांची क्षमा केलेली आहे असं नाही तर तुमच्या पूर्वजांच्या आणि तुमच्या मरणानंतर येणा­या अनेक पिढट्यांच्या अपराधांची क्षमा करून त्यांना पापमुक्त केलेले आहे." सार्वकालिक युगाच्या पार्श्वभूमीवर देव हे असं बोलतो. तुमचा यावर वि·श्वास आहे का? वि·श्वास ठेवा. आणि तारणाची देणगी घेऊन स्वर्गाच्या राज्यांत जा.
 तुम्ही स्वतःच्या विचारांवर वि·श्वास न ठेवता देवाच्या वचनांवर वि·श्वास ठेवा. "ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." जगाची सर्व पापें स्वतःकडे घेऊन देवाच्या कोंक­याने सर्व धर्माचरण पूर्ण केले होते. येशूनें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली होती. खरच त्यानें घेतली होती. कां कीं नाही घेतली? होय, त्यानें घेतली.
 
येशू खांबावरती शेवटी काय
बोलला होता?
"पूर्ण झाले आहे."
 
येशूने जगाचीं सर्व पापें स्वतःकडे घेतल्यावर रोमन सुभेदार पिलाताकडून त्याला वधस्तंभावर खिळले जाण्याची शिक्षा झाली.
"मग त्यांनी येशूली आपल्या ताब्यांत घेतलें, आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचें स्थान म्हटलेल्या जागीं गेला. त्या जागेला इब्राी भाषेंत गुलगुथा म्हणतात. तेथें त्यांनीं त्याला व त्याच्याबरोबर दुस­या दोघांना, एकाला एका बाजूस व दुस­याला दुस­या बाजूस आणि येशूला मध्यें, असें वधस्तंभावर खिळलें. पिलातानें पाटी लिहूंन वधस्तंभावर लाविली; तिच्यावर यहूद्यांचा राजा नासोरी येशू असें लिहिले होतें. येशूला वधस्तंभावर खिळलें ते स्थळ नगराच्या जवळ होतें. म्हणून पुष्कळ यहूद्यानी ती पाटी वाचली. ती इब्राी, रोमन व हेल्लेणी ह्रा भाषांत लिहिली होती." (योहान 19:17-20) "ह्रानंतर आतां सर्व पूर्ण झाले आहें हें जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून," आपलें सर्व अपराध घेतले. "तो म्हणाला, मला तहान लागली आहे!" तेथे आंब भरून ठेवलेलें एक भांडें होतें, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवूर त्याच्या तोंडाला लावला. येशूनें आंब घेतल्यानंतर `पूर्ण झालें आहे!` असें म्हटलें; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला." (योहान 19:28-30)
आंब घेतल्यानेंर `पूर्ण झालें आहे` असं म्हणून मस्तक लववून येशूनें त्याचा आत्मा समर्पित केला. वधस्तंभावर मेल्यानंतर तिस­या दिवशी त्याचें पुनरुत्थान झाले त्यानंतर तो कांही काळाने स्वर्गांत गेला.
इब्राी लोकांस पत्र 10:1-9 यांत असे लिहिले आहे, "तर मग ज्या पुढें होणा­या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रांत छाया आहे, वास्तविक स्वरूप नाहीं; म्हणून तें प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणा­या त्याच त्याच यज्ञांनीं जवळ येणा­यंाना पूर्ण करण्यास केव्हांहि समर्थ नाहीं. तें समर्थ असतें तर एकदां शुध्द झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्यानें तें यज्ञ करणें बंद झालें नसतें काय? परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे; कारण बैलांचें व बक­याचें रक्त पापें दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगांत येतेवेळेस म्हणाला, `यज्ञ व अन्नार्पण ह्रांची तुला इच्छा नव्हती, तूं माझ्यासाठीं शरीर तयार केलें; होमांनीं व पापाबद्दलच्या अर्पणांनीं तुला संतोष नव्हता. ह्रावरून मी म्हणालों, पाहा, हे देवा, ग्रंथपटांत माझ्याविषयीं लिहून ठेविलें आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठीं मी आलो आहें` वर उल्लेखल्याप्रमाणें तों म्हणाला, `यज्ञ, अन्नार्पणें, होम व पापाबद्दलची अर्पणे, ह्रांची इच्छा तुला नव्हती, व त्यांत तुला संतोष नव्हता;` (नियमशास्त्राप्रमाणें जीं अर्पिण्यांत येतात तीं हीं.) आणि मग तो म्हणाला, `पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलों आहें.` ह्रांत दुसरें स्थापण्यासाठीं तो पहिलें नाहींसें करितो."
 
 
सार्वकालिक उध्दार
 
येशूवर वि·श्वास ठेवल्यानंतर
रोजच्या पापांची समस्या आपण कशी
काय सोडवू शकतो?
बाप्तिस्माच्या द्वारे येशूने सर्व पापें
काढून टाकलेली आहेत असं वि·श्वासपूर्वक
निर्धाराने म्हणून आपण दैनंदिन पापांची
समस्या सोडवू शकतो.
 
नियमशास्त्र हें पुढें होणा­या चांगल्या गोष्टींची छाया होती. जुन्या करारातील मेंढरें व बकरे यांची अर्पणें हेच दर्शवितात कीं येशू ख्रिस्त पण ह्राच अर्पणपध्दतीप्रमाणें आपली सर्व पापें स्वतः वाहून नेईल.
जुन्या करारांतील दावीद, अब्रााहाम आणि बाकीच्या सर्वांना अर्पणपध्दतीचा अर्थ माहित होता आणि यावर त्यांच्या वि·श्वास होता. ही पध्दती हेच दर्शवित होती कीं एक दिवस ख्रिस्त, मशीहा (ख्रिस्त याचा अर्थ तारणकर्ता) येईल आणि तो सर्व अपराध धुवून टाकील. त्यांनी ह्रा तारणावर वि·श्वास ठेवला आणि ते सर्व वि·श्वासामुळे वाचले.
नियमशास्त्र हें पुढें होणा­या चांगल्या गोष्टींची छाया होती. दिवसे न दिवस, वर्षानुवर्षे अर्पणें करण्यानें आपला उध्दार होऊ शकत नव्हता. म्हणूनच पूर्ण, चिरकालीन दोषहीन व्यक्ती, म्हणून देवाच्या पुत्राला ह्रा पृथ्वीतलावर यावे लागले.
आणि तो म्हणाला कीं ग्रंथपटांत त्याच्याबद्दल लिहिल्याप्रमाणें, त्याच्या पित्याची इच्छा पुरी करण्यासाठी तो आला. "ह्रावरून मी म्हणालों, पाहा, तुझ्या इच्छेप्रमाणें करण्यासाठीं मी आलो आहें. ह्रांत दुसरें स्थापण्यासाठीं तो पहिलें नाहींसें करितो." जुन्या करारांत सांगितल्याप्रमाणें येशूनें सर्व अपराध घेतल्यामुळे आणि आपण त्याच्यावर वि·श्वास ठेवतो म्हणूनच आपले तारण झालेले आहे.
इब्राी लोकांस पत्र 10:10 यांत लिहिले आहे; "त्या इच्छेनें आपण येशू ख्रिस्ताच्या एकदांच झालेल्या देहार्पणा द्वारें पवित्र केलेले आंहों." या वचनांत म्हटल्याप्रमाणें आपण पवित्र केलेले आहोत की नाही? - होय आपण पवित्र केलेले आहोत. -
याचा अर्थ काय आहे? पित्यानें त्याच्या पुत्राला पाठवून बाप्तिस्माच्या योगें आपली सर्व पापें त्याच्या शिरीं देऊन त्या पापांबद्दल न्याय करून त्याला वधस्तंभावरील मरणाची शिक्षा दिली. अशा प्रकारे त्यानें आपल्याला आपल्या सर्व अपराधांपासून सोडवले. हीच त्याची इच्छा होती.
आपलें तारण व्हावे यासाठी येशूने स्वतःचा देह एकदाच अर्पण करून आपल्याला पवित्र केले, आणि आपल्याला शिक्षा होऊ नये म्हणून आपल्याऐवजी तो स्वतः मरण पावला.
जुन्या करारांत अर्पणें दररोज केली जात कारण नवी पापें रोजच्या रोज धुतली जाणे जरूर होते.
योहानाच्या 13 व्या अध्यायांत येशू पेत्राचें पाय धुतो त्याबद्दल लिहिलेले आहे. पेत्र भविष्यकाळांत पाप करील पण ती पापें त्यानें आधीच धुतलेली आहेत हे त्याला समजावे म्हणूनच येशूनें पेत्राचें पाय धुतले. येशूला ठाऊक होते कीं पेत्र नंतरच्या काळांत पाप करील म्हणूनच गंगाळांत पाणी ओतून त्याने पेत्राचें पाय धुतलें.
पेत्र मना करू लागला तेव्हां येशू त्याला म्हणाला, "मी करितों ते तुला आता कळत नाहीं; ते तुला पुढें केळेल." याचा अर्थ असा, "हे असे केल्यानंतर सुध्दां तू पुन्हां पाप करशील. मला नाकारशील. तुला धुतल्यानंतर तू पुन्हां पाप करशील. मी स्वर्गांत गेल्यानंतर सुध्दा तू पाप करशील. म्हणूनच तुझें पाय धुवून सैतानाला मी ताकीद दिलेली आहे की त्याने तुझी परीक्षा घेऊ नये त्यासाठीच मी तुझ्या भविष्यकाळांतील पापें सुध्दां धुवून टाकलेली आहेत."
तुम्हाला काय वाटते की आपण रोज रोज पश्चाताप करीत बसावे यासाठी येशूनें पेत्राचें पाय धुतले होते? नाही. जर आपल्याला रोज पश्चाताप करायचा असता तर येशूनें सर्व अपराध एकाचवेळी एकदाच नेले नसते.
पण येशू म्हणतो कीं त्याने एकदाच आपल्याला पवित्र केलेले आहे. जर आपल्याला दररोज पश्चाताप करायचा असेल तर मग आपल्याला जुन्या कराराच्या काळांत जावे लागेल. मग नीतिमान कोण होऊ शकेल? संपूर्ण पापमुक्ती कोणाची होऊ शकेल? जरी आपण देवावर वि·श्वास ठेवला तरी पापाशिवाय कोण राहू शकेल?
पश्चाताप करून कोण पवित्र बनू शकतो? निष्काळजीपणानें आपण रोजच पाप करीत असतो तर मग त्या प्रत्येक पापाबद्दल आपण कशी काय क्षमा मागणार? पापमुक्तीसाठीं रोज रोज देवाला त्रास देण्याइतके निब्बर आपण कसे काय बनू शकतो? सकाळी केलेली पापें आपण संध्याकाळी विसरून जातो आणि संध्याकाळीं केलेली पापें आपल्याला सकाळीं अजिबात आठवत नाही. सर्व पापांबद्दल संपूर्णपणें पश्चाताप करणे अगदी अशक्य आहे.
म्हणूनच येशूचा बाप्तिस्मा एकदाच झाला, त्यानें वधस्तंभावर स्वतःला एकदाच अर्पण केले यासाठी की आपण सर्व एकदाच एकाचवेळी पवित्र असे होऊ. तुम्हांला हे समजते का? आपल्याला पापांपासून मुक्ती एकदाच मिळालेली आहे. जेव्हां जेव्हां आपण पश्चाताप करतो तेव्हां कांही आपले तारण होत नसते.
  
असं एखादे पाप राहून गेलेले आहे
का कीं आपण त्यासाठी पश्चातापयुक्त
प्रार्थना करायला पाहिजे?
नाही.
 
येशूनें आपल्या सर्वांचे, तुमचें व माझे अपराध वाहून नेले यावर वि·श्वास ठेवण्याने आपले तारण झालेले आहे.
"प्रत्येक याजक प्रतिदिवशीं सेवा करीत आणि जे यज्ञ पापें दूर करावयाला कदापि समर्थ नाहींत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हांपासून आपले वैरी आपलें पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणा­यंाना त्यांनें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहें. पवित्र आत्माहि आपल्याला साक्ष देतो, कारण हें म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः `मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन. आणि त्यांची पापें व त्यांचें स्वैराचार मी ह्रापुढे आठवणारच नाही.` तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचे राहिलें नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 10:11-18)
`त्यांची क्षमा झाली` याचा अर्थ काय? 10 व्या अध्यायांत 18 व्या वचनांत असे म्हटले आहे की देवानें कायमसाठी पापांचे उच्चाटन करून त्यासांठीं क्षमा केलेली आहे. तुमचा यावरती वि·श्वास बसतो का? "तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाही."
हे सर्व कांही संक्षिप्तपणें असं म्हणू. जर बाप्तिस्मा करणा­या योहानाने त्याचे दोन्ही हात येशूच्या डोक्यावर ठेवले नसते किंवा दुस­या शब्दांत असं म्हणू कीं त्यानें येशूचा बाप्तिस्मा केला नसता तर आपले तारण होऊ शकले असते का? नाही. आपले तारण होऊ शकले नसते. जर येशूनें बाप्तिस्मा करणा­या योहानाला मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून निवडले नसते आणि त्याच्याद्वारे सर्व पापें घेतली नसती तर ती पापें तो धुवू शकला असता का? तो हे करू शकला नसता.
देवाचे नियमशास्त्र अगदी योग्य असेच आहे. मी तुमचा तारणकर्ता आहे असं तो नुसते म्हणू शकत नव्हता. त्याला आपली पापें देहरूपाने घ्यावी लागली. येशू देव देहरूपानें आपल्याकडे कां आला? कारण त्याला आपल्या तनमनाच्या पापांची पुरी कल्पना होती. ती सर्व पापें काढून टाकण्यासाठी देवाच्या पुत्राला ह्रा जगांत यावं लागले.
जर येशूचा बाप्तिस्मा झाला नसता तर आपणा सर्वांची पापें तशीच्या तशीच राहिली असती. आणि आपली पापें वाहून न नेतां तो वधस्तंभावर मरण पावला असता तर त्याचा मृत्यु निरर्थक ठरला असता. त्याच्या मरणाचा आपल्याशी कांहीच संबंध नसता ते संपूर्णतः निरर्थक ठरले असते.
वयाच्या 30 व्या वर्षी कार्यास प्रारंभ करण्याच्या वेळेस येशू बाप्तिस्मा घेण्यासाठी यार्देन नदीवर बाप्तिस्मा करणा­या योहानाकडे आला. 33 व्या वर्षी येशूचे कार्य संपले होते. जेव्हां 30 वर्षाचा असतांना तो योहानाकडे आला तेव्हां तो त्याला म्हणाला, "आतां हें होऊं दे; कारण लोकांचें तारण होऊन त्यांनी नीतिमान व्हावे यासाठी ह्राप्रकारे करणे आपणांला उचित आहे. तर मग मला आताच बाप्तिस्मा दे" होय सर्व लोकांच्या तारणासाठीच येशूखिस्ताचा बाप्तिस्मा झाला.
बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन त्याच्या द्वारे सर्व पापें स्वतःकडे घेऊन येशू जेव्हां वधस्तंभावर मरणयातना सहन करीत होता तेव्हां देवाने त्याचें तोंड फिरवले होते. येशू जरी त्याचा एकुलता एक पुत्र होता तरी त्याचा मृत्यु त्यानें होऊ दिला.
देव प्रीति आहे, पण त्याला त्याच्या मुलाचा मृत्यु होऊ द्यावा लागला. त्यावेळी तीन तास सर्वत्र अंधकार झाला होता. मृत्युपूर्वी येशू मोठट्यानें आरोळी मारून बोलला, `एली, एली, लमा सबखथनी,` म्हणजे `माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग कां केला?` येशूने आपले सर्व अपराध स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या अपराधांची जबाबदारी स्वतःकडे घेतली. ह्रा अपराधांची शिक्षा म्हणून तो खांबावर मरण पावला. अशा प्रकारें त्यानें आपल्याला वाचवले. येशूच्या बाप्तिस्म्याशिवाय त्याचा मृत्यु अर्थहीन ठरला असता.
 
तुम्ही पापी आहात कीं
नीतिमान आहात?
जिच्या ह्मदयांत कोणतेहि पाप नाही
अशी नीतिमान व्यक्ती आहोत.
 
बाप्तिस्मा न घेता आणि आपली पापें स्वतःकडे न घेता येशू वधस्तंभावर मरण पावला असता तर तारणकार्य सिध्दीस गेले नसते. आपले तारण होण्यासाठीच येशूचा बाप्तिस्मा व नंतर पापदंड म्हणून वधस्तंभ ह्रा घटना झाल्या यासाठी की जे कोणी येशूवर वि·श्वास ठेवतील त्यांना पापमुक्ती मिळेल.
म्हणूनच बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या दिवसापासून ते आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे. कारण योहानाने जगाची सर्व पापें येशूकडे दिली होती. त्या पापांचें प्रायश्चित केले गेले म्हणूनच आपण आता देवाला पिता असें संबोधून धीटपणानें स्वर्गाच्या राज्यांत जाऊ शकतो.
इब्राी लोकांस पत्र 10:18 यांत म्हटलें आहे, "तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." तुम्ही सर्वजण पापी आहात का? येशूनें तुमची सर्व कर्जे फेडल्यानंतर आता तुमचें आणखी कांही कर्ज फेडायचे उरले आहे का?
एक माणूस होता. तो खूप दारू प्यायचा त्यामुळे त्याची खूप जणांकडे उधारी होती. मग एके दिवशी त्याच्या मुलाला धनलाभ झाला तेव्हां त्याच्या बापाची सर्व उधारी फेडून टाकली आता त्याच्या बापाने कितीहि जरी पिण्याचे ठरवले तरी त्याला कर्ज किंवा उधारी फेडावी लागणार नाही.
येशूने आपल्यासाठी हेच केले आहे. आपल्या सर्व पापांची किंमत त्याने जरूरीपेक्षा जास्तच भरलेली आहे. नुसती आपल्याच आयुष्यभराच्या पापांची नव्हे तर जगांतील सर्व पापांची किंमत त्यानें मोजलेली आहे. सर्व अपराध बाप्तिस्माच्या वेळी येशूकडे दिले गेल्यामुळे तुम्ही आता पापी आहांत का? नाही. तुम्ही पापी नाहीत.
ही सुवार्ता आपल्याला आधीच माहित असती तर येशूवर वि·श्वास ठेवणे किती सोपे झाले असते! ऐकायला तर ही सुवार्ता नवी वाटते म्हणूनच पुष्कळ लोकांना तिच्याबद्दल कुतूहल वाटते.
पण ही सुवार्ता कांही नवीन नाही. ती प्रारंभापासून आस्तित्वांत होती. फक्त आपल्याला ती माहित नव्हती. पाणी व आत्मा ही सुवार्ता बायबलमध्ये नमूद केलेली आहे आणि ती नेहमीच परिणामकारक अशीच आहे. एवढा काळ ती तेथेच होती. मी आणि तुम्ही जन्मायच्या आधीपासून ती आहे. पृथ्वी निर्माण होण्याच्या काळापासून ती तेथे आहे.
 
 
तारणाची सुवार्ता
 
देवासमोर आपण काय
करायला पाहिजे?
सार्वकालिक तारणाच्या सुवार्तेवर
आपण वि·श्वास ठेवायला पाहिजे.
 
तुम्ही आणि मी जन्माला यायच्या आधीच येशू ख्रिस्ताने आपली सर्व पापें धुतलेली आहेत. तुम्ही पापांत आहांत का? - नाही - तर मग उद्या तुम्ही पाप कराल त्याचे काय? जगाच्या सर्व पापांत ते जमा केलेले आहे.
आता उद्याची पापें आपण काढून टाकू. आतापर्यंत आपण जी पापें केलेली आहेत ती जगाच्या पापांमध्ये जमा केलेली आहेत. नाही का? ती सर्व पापें येशूकडे दिली की नाही? होय, ती दिली.
तर मग उद्याची पापें येशूकडे दिली गेली का? होय. त्यानें ती सर्व घेतली ह्रांत प्रश्नच नाही. त्यानें एक सुध्दां पाप वगळलेले नाही. सुवार्ता आपल्याला हेच सांगते कीं तुम्ही संपूर्ण मनानें, संपूर्ण ह्मदयाने वि·श्वास ठेवा कीं येशूने तुमची सर्व पापें घेऊन त्या पापांची किंमत मोजली.
"देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्राच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ." स्वर्गाची सुवार्ता ही हर्षभरित वार्ता आहे. ती आपल्याला विचारित आहे, "मी तुमची सर्व पापें घेतली मी तुमचा उध्दारकर्ता आहे. तुम्ही माझ्यावर वि·श्वास ठेवता का?" असंख्य लोकांपैकी फक्त थोडेजण उत्तर देतील, "होय, मी वि·श्वास ठेवतो. तू जे कांही सांगितले आहेस त्यावर मी वि·श्वास ठेवतो. ते इतके सोपे होते की मला ताबडतोब समजू शकले." जे असं बोलतात ते अब्रााहामाप्रमाणे नीतिमान ठरतात.
पण दुसरे लोक म्हणतात, "मी यावर वि·श्वास ठेवू शकत नाही कारण ही सुवार्ता ऐकायला मला नवीन व चमत्कारिकच वाटते."
मग येशू विचारतो, "तू मला सांग की मी तुझी सर्व पापें घेतली की नाही?"
"मला शिकवले गेले आहे की तू मूळची पापें घेतलेली आहेस, माझी दैनंदिन पापें नाही."
"जे शिकवले त्यावर वि·श्वास ठेवायला तू खूप हुशार दिसतोस. तू नरकांत जा. मला तुझ्याशीं कांही बोलायचे नाही."
संपूर्ण तारणावर वि·श्वास ठेवण्याने आपण वाचतो. जे लोक म्हणतात की त्यांच्यांत पाप आहे त्यांनी नरकांत जावे. त्यांनी स्वतःच तशी निवड केलेली आहे.
बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या साक्षीपासून तारणाच्या सुवार्तेचा प्रारंभ होतो. योहानाकडून बाप्तिस्मा झाल्यावर येशूने आपले सर्व अपराध धुवून टाकले. यावर आपण वि·श्वास ठेवतो तेव्हां आपण पवित्र होतो.
प्रेषित पौलाने येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल पुष्कळ कांही सांगितले आहे. गलतीकरांस पत्र 3:27 मध्ये म्हटले आहे, "कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनीं ख्रिस्ताला परिधान केलें आहे." ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेणे याचा अर्थ आपण ख्रिस्तांत आहोत. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या द्वारे आपली सर्व पापें त्याच्याकडे दिली गेली आणि ती सर्व पापें धुतली गेली.
पेत्राचें पहिलें पत्र यांतील तिस­या अध्यायांतील 21 व्या वचनांत म्हटले आहे; "त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचें तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणें नव्हे, तर शुध्द भावानें देवाचें ऐकणें असा आहे."
जे बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या साक्षीवर येशूच्या बाप्तिस्म्यावर, वधस्तंभावरील रक्तावर वि·श्वास ठेवतात त्यांच्या अंतःकरणांत सुवार्तेच्या तारणाची कृपा नांदत असते.
येशूच्या बाप्तिस्म्याचा तुम्ही तुमच्या ह्मदयांत स्वीकार करा. लाक्षणिक अर्थाने तुमचें तारण करणारा याने तुम्ही उध्दारित व्हा.