(योहानाचें पहिलें पत्र 5:1-12)
"येशू हा ख्रिस्त आहे, असा वि·श्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला आहे; आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीति करितो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरहि प्रीति करितो. आपण देवावर प्रीति करितों व त्याच्या आज्ञा पाळतों तेव्हां त्यावरून आपल्याला कळून येतें कीं, आपण देवाच्या मुलांवर प्रीति करितों. देवावर प्रीति करणें म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणें होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत. कारण जें कांहीं देवापासून जन्मलेलें आहे तें जगावर जय मिळवितें; आणि ज्यानें जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला वि·श्वास.
येशू देवाचा पुत्र आहे असा वि·श्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारें व रक्ताच्या द्वारें आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्यानें केवळ नव्हें, तर पाण्यानें व रक्तानेंहि आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेतः आत्मा, पाणी व रक्त; ह्रा तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसांची साक्ष स्वीकारतों पण तिच्यापेक्षां देवाची साक्ष मोठी आहे, जी साक्ष देवानें आपल्या पुत्राविषयी दिली; तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायींच साक्ष आहे; ज्यानें देवाचा वि·श्वास धरला नाहीं त्यानें त्याला लबाड ठरविलें आहे; कारण जी साक्ष देवानें आपल्या पुत्राविषयीं दिली आहे तिच्यावर त्यानें वि·श्वास ठेवला नाहीं. ती साक्ष हीच आहे कीं, देवानें आपल्याला सार्वकालिक जीवन दिलें आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायीं आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलें आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाहीं त्याला जीवन लाभलें नाहीं."
येशू कशाच्या द्वारें आला?
पाणी, रक्त आणि आत्मा.
येशू पाण्याच्या द्वारें आला होता का? होय. तो पाण्याच्या द्वारें आला. तो बाप्तिस्म्याच्या द्वारें आला. पाणी म्हणजेच यार्देन नदींत योहानाकडून झालेला येशूचा बाप्तिस्मा. तो पापमुक्तीचा बाप्तिस्मा होता त्याच्यायोगे येशूनें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली.
येशू रक्ताच्या द्वारे आला होता का? होय. तो रक्ताच्या द्वारें आला. तो देहरूपी मनुष्य म्हणून आला. जगाची पापें घेण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा झाला. त्या अपराधांची शिक्षा म्हणून त्याने वधस्तंभावर मृत्युदंड सहन केला. जगाच्या सर्व पापांसाठी तो खांबावर रक्तबंबाळ होऊन मेला. येशू रक्ताच्या द्वारें आला.
येशू आत्म्याच्या द्वारें आला होता का? होय. तो आत्म्याच्या द्वारें आला. येशू देव होता पण देहांतील आत्मा म्हणून पापी लोकांसाठी तारणारा म्हणून आला.
पुष्कळ लोक येशू हा पाण्याच्या, रक्ताच्या व आत्म्याच्या द्वारें आला ह्रावरती वि·श्वास ठेवत नाहीत. फक्त थोडे लोक वि·श्वास ठेवतात कीं येशू हा राजांचा राजा आणि देवांचा देव आहे. पुष्कळ लोक शंका व्यक्त करतात, `येशू खरच देवाचा पुत्र आहे की मनुष्याचा पुत्र आहे?` पुष्कळ लोक त्याबरोबरच कांही धर्मगुरू व पाळकमंडळीं पण असं समजतात की येशू तारणकर्ता किंवा देव नसून केवळ मनुष्य आहे.
पण देवानें सांगितलें आहे कीं जो कोणी वि·श्वास धरतो कीं येशू हा खरा देव आणि राजांचा राजा आहे, तोच उध्दारकर्ताहि आहे त्यालाच देवांचा पुत्र लाभतो. जे देवावर प्रीति करतात ते येशूवर प्रीति करतात.
माणूस जगाला जिंकू शकत नाही. प्रेषित योहानाने सांगितले की फक्त खरा ख्रिस्ती माणूस जगाला जिंकू शकतो. वि·श्वासू ख्रिस्ती माणूस जगावर जय मिळवतो याचें कारण म्हणजे पाणी, रक्त आणि येशूचा आत्मा ह्रावर त्यानें धरलेला वि·श्वास. जगावर जय मिळवणारी शक्ति कांही माणसाची इच्छा, त्याची कर्तबगारी किंवा त्याचा ध्यास यातून येत नसते.
"मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलों, पण माझ्या ठायीं प्रीति नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहें. मला संदेश देण्याची शक्ति असली, मला सर्व गुजें व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवितां येतील इतका दृढ माझा वि·श्वास असला, पण माझ्या ठायीं प्रीति नसली, तर मी कांहीच नाहीं. मी आपलें सर्व धन अन्नदानार्थ दिलें व मीं आपलें जिवंत शरीर जाळण्यासाठीं दिलें, पण माझ्या ठायीं प्रीति नसली तर मला कांही लाभ नाहीं." (करिंथकरांस पहिलें पत्र 13:1-3) ह्रांत उल्लेखलेली प्रीति म्हणजेच येशू होय तो पाण्याच्या, रक्ताच्या व आत्म्याच्या द्वारें आला.
जो पाण्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवतो तोच जगावर जय मिळवू शकतो
जगावर जय कोण मिळवू
शकतो?
जो येशूचा बाप्तिस्मा, त्याचे रक्त आणि
त्याचा आत्मा ह्रावर वि·श्वास
ठेवतो तो.
योहानाचें पहिले पत्र 5:5 ते 6 मध्ये म्हटले आहे, "येशू देवाचा पुत्र आहे असा वि·श्वास जो धरतो त्याच्यावांचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारें व रक्ताच्या द्वारें आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्यानें व रक्तानेहि आला."
ख्रिस्ती बंधूंनो, येशू ख्रिस्तानें जगाला जिंकले आहे, त्यानें सैतानाला जिंकले आहे. जो कोणी पाणी, रक्त व येशूचा आत्मा ह्राच्यावर वि·श्वास ठेवतो तो जगावर जय मिळवतो. पापी लोकांचा तारणकर्ता म्हणून येशू पाण्याच्या, रक्ताच्या व आत्म्याच्या द्वारें आला.
बायबलमध्ये `पाणी` हे येशूच्या बाप्तिस्म्याशी संबंधित आहे. (पेत्राचें पहिलें पत्र 3:21). येशू देहरूपाने या जगांत आला. जगातील सर्व पापी लोकांची पापें स्वतःकडे घेण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्या पापांचे प्रायश्चित म्हणून तो वधस्तंभावर मरण पावला.
वधस्तंभावरील रक्त असं दर्शविते कीं येशू मानवाचा देह घेऊन आला होता. पापी लोकांना वाचवण्यासाठी मानवाचा देह घेऊन त्यानें बाप्तिस्मा घेतला. म्हणजेच येशू पाण्याचा व रक्ताच्या द्वारें आला. जगाची सर्व पापें त्यानें बाप्तिस्म्याच्या पाण्याच्या द्वारे व वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे काढून टाकली.
जगामध्ये सैतान स्वतःची सत्ता कशी काय गाजवून राहिला आहे? सैतानानें मानवजातीच्या मनांत देवाच्या वचनाबद्दल शंका निर्माण करून त्यांच्या ह्मदयांत देवाच्या आज्ञा भंग करण्याच्या बिया पेरलेल्या आहेत. दुसया शब्दांत सांगायचे म्हणजे सैतानाने मानवजातीला फसवून देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करायला लावून तिला स्वतःचें गुलाम केलेलें आहें.
पण येशू ह्रा जगांत आला आणि त्यानें बाप्तिस्म्याच्या पाण्यानें व वधस्तंभावरील रक्तानें लोकांची सर्व पापें धुतली आणि सैतानाला जिंकून जगाची सर्व पापें काढून टाकली.
हे असं घडले याचें कारण येशू ख्रिस्त हा पापी लोकांचा उध्दारकर्ता होता. तो पाण्याच्या व रक्ताच्या द्वारे आला म्हणूनच येशू आपला तारणकर्ता बनला.
येशूने तारणाच्या बाप्तिस्म्याने जगाची सर्व पापें नेली
येशूनें जगाला जिंकले याचा
अर्थ काय होतो?
त्याचा अर्थ हाच कीं येशूनें
जगाची सर्व पापें नेली.
जगाची सर्व पापें नेण्यासाठीं येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्या सर्व पापांचा अंत करण्यासाठीं तो मानवाप्रमाणें देहाने मरण पावला, म्हणूनच तो आपल्याला पापमुक्त करू शकला. यार्देन नदींत योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन सर्व पापें स्वतःकडे घेतल्यावर त्याने आपल्या स्वतःच्या आयुष्याची किंमत खांबावर मोजली. मरणांतून तो परत उठला आणि सैतानावर त्यानें जय मिळवला. आपल्या पापांची किंमत देण्यासाठी तो मृत्युला सामोरे गेला होता.
येशू पापी लोकांना भेफ्ण्यासाठी बाप्तिस्म्याचा पाण्यानें आणि वधस्तंभावरील रक्तानें आला
येशूने सैतानाच्या शक्तीवर कसा
काय विजय मिळविला?
स्वतःचा बाप्तिस्मा रक्त आणि
आत्मा याच्या द्वारे.
प्रेषित योहानानें म्हटले की तारण फक्त पाण्यानेच नाही तर पाणी व रक्त यानें होते. येशूनें सर्व पापें नेल्यामुळें, जगाची सर्व पापें कायमसाठी काढून टाकली गेलेली आहेत म्हणूनच पापी लोक येशूवर आणि त्याच्या शब्दांवर वि·श्वास ठेवण्याने वाचतात.
जेव्हां येशू ह्रा जगांत आला तेव्हां त्यानें आपली सर्व पापें तर नेलीच पण त्याशिवाय आपल्याला पापांपासून वाचवण्यासाठी खांबावरती रक्तबंबाळ स्थितींत मरणही सहन केले. यार्देन नदींत बाप्तिस्म्याच्या द्वारे आपली सर्व पापें घेऊन त्याने त्या पापांची किंमत वधस्तंभावर मोजली. "पापाचें वेतन मरण आहे" (रोमकरांस पत्र 6:23) देवाच्या ह्रा वचनाची अशा प्रकारे पूर्णता झाली.
जगाला जिंकणे याबद्दल येशूला काय म्हणायचे आहे? असा वि·श्वास की ज्यामुळे जगाला जिंकता येईल तो वि·श्वास म्हणजेच पाणी व रक्त याच्या द्वारे येशूने जी तारणाची सुवार्ता आणली आहे तिच्यावर वि·श्वास ठेवणे. येशूनें देहरूपानें येऊन पाण्याचा बाप्तिस्मा आणि खांबावरील मृत्यु यांच्या द्वारें तारणाची साक्ष दिली.
येशूने जगाला, विशेषकरून सैतानाला जिंकले होते म्हणूनच रोमन साम्राज्यापुढे मान न झुकवता किंवा जगाच्या मोहजालाला बळी न पडतां स्वतःच्या जीवाला धोका असतांनासुध्दां सुरूवातीच्या काळांतील चर्चमधील ख्रिस्ती लोक त्यावेळी बेधडक खंबीरपणे उभे राहिले होते.
हे सर्व त्यांच्या वि·श्वासामुळें घडून आले होते. येशू पाण्याच्या द्वारें आला, (पापें नेण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा झाला होता.) आणि तो वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारें आला. (आपल्या पापांची किंमत त्याने स्वतःच्या मरणाने दिली).
येशू आत्म्याच्या द्वारें आला (तो मनुष्यदेह घेऊन आला) आणि त्याने पापी लोकांचीं सर्व पापें बाप्तिस्म्याच्या आणि वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारें नेली यासाठी की आपण सर्वजण तारण झाल्यामुळे जगावर जय मिळवू शकू.
त्याच्या लाक्षाणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचें तारण करीत आहे (पेत्राचें पहिलें पत्र 3:21)
लाक्षणिक अर्थानें तारण
काय आहे?
येशूचा बाप्तिस्मा.
पेत्राचें पहिलें पत्र 3:21 यांत म्हटलें आहे, "त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचें तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणें नव्हे, तर शुध्द भावानें देवाचें ऐकणें, असा आहे." प्रेषित पेत्रानें साक्ष दिली कीं येशू हाच तारणकर्ता होता आणि तो बाप्तिस्म्याच्या पाण्याच्या द्वारें आणि रक्ताच्या द्वारें आला होता.
याचा परिणाम म्हणून आपण सुध्दां येशू पाणी व रक्त या द्वारे आला ह्रावरती वि·श्वास ठेवला पाहिजे. लाक्षणिक अर्थाने येशूचा बाप्तिस्मा आपलें तारण करतो हे आपण समजून घ्यायला पाहिजे. प्रेषित पेत्रानें सांगितले कीं तारणकार्यांत बाप्तिस्म्याचे `पाणी`, `रक्त` आणि `आत्मा` हे खूप महत्त्वाचें घटक आहेत.
येशूच्या कोणत्याहि शिष्याने येशूचा बाप्तिस्मा वगळून त्याच्या वधस्तंभावरील रक्तावर वि·श्वास ठेवला नव्हता. रक्तावर वि·श्वास ठेवणें हें संपूर्ण वि·श्वासाऐवजी अर्धवट वि·श्वास ठेवण्यासारखे आहे. हा असा अर्धवट किंवा अपूरा वि·श्वास थोडट्या काळानंतर नाहीसा होतो. पण जे लोक पाणी, रक्त व आत्मा या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात त्यांचा वि·श्वास कांही काळानें अधिक बळकट वृध्दींगत होत जातो.
पण हल्लीच्या काळांत रक्ताच्या सुवार्तेचा आवाज जास्त वाढत चालला आहे. हे असे कां होत आहे? लोकांना खरे काय ते माहित नाही. पाणी व आत्म्याने पुन्हां जन्मणे ही सुवार्ता त्यांना माहित नाही.
एक काळ असा होता की त्यावेळी पाश्चिमात्य देशांतील प्रार्थनामंदिरें भ्रामक समजूंतीना बळी पडली होती. ती सर्व भरभराटीला आलेली चर्चेस किंवा प्रार्थनामंदिरें आहेत अस बाहेरून वाटत होते पण सैतानाच्या चेल्यांनी त्यांचा वि·श्वास भ्रामक समजूतींमध्ये रूपांतरित केला होता.
अशी एक समजूत होती की सैतानापुढें कागदाचा किंवा लाकडाचा क्राँस दाखवला तर तो पळून जातो किंवा एखाद्याचा येशूच्या रक्तावर वि·श्वास असेल तर सैतान पळ काढतो. अशाच प्रकारच्या समजूतींनी सैतानानें लोकांना फसवून त्यांना वि·श्वास करायला लावला कीं फक्त येशूच्या रक्तावर वि·श्वास ठेवणे पुरेसे आहे. सैतान रक्ताला घाबरत असल्याचें नुसते नाटक करतो.
पण पेत्र आणि इतर शिष्यांनी खरी सुवार्ता म्हणजेच येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील रक्त याची साक्ष दिली. हल्लीचें ख्रिस्ती लोक कोणती साक्ष देत आहेत? फक्त येशूच्या रक्ताची साक्ष देतात.
पण आपण बायबलमध्ये जे लिहिलेले आहे त्यावर वि·श्वास ठेवायला पाहिजे. येशूचा बाप्तिस्मा, रक्त आणि आत्मा या द्वारे तांरण होते ह्रावर द्दढ वि·श्वास ठेवायला पाहिजे. येशूचा बाप्तिस्मा वगळून आपण जर अशी साक्ष दिली की येशू आपल्यासाठीं वधस्तंभावर मेला तर आपले तारण पूर्ण होऊ शकत नाही.
पाण्याच्या तारणाबद्दल देवाच्या वचनाची साक्ष
देवानें आपले तारण केलेले
आहे याचा पुरावा काय आहे?
पाणी, रक्त व आत्मा.
योहानाचें पहिले पत्र 5:8 यामध्ये देवाने म्हटले आहे, "साक्ष देणारे तिघें आहेतः आत्मा, पाणी व रक्त; ह्रा तिघांची साक्ष एकच आहे." पहिला साक्षी आत्मा आहे, दुसरा साक्षी म्हणजे येशूच्या बाप्तिस्म्याचें पाणी, आणि तिसरा म्हणजे वधस्तंभावरील येशूचें रक्त. हे तिनहि एक असल्यासारखेच आहेत. तारण व्हावे म्हणून येशू ह्रा जगांत आला. त्यानें एकटट्याने हे कार्य बाप्तिस्मा, रक्त आणि आत्मा ह्रा तिघांच्या द्वारें केले. `साक्ष देणारे तिघे आहेत` हे तिन जण म्हणजे येशूच्या बाप्तिस्म्याचें पाणी, रक्त व आत्मा होय. ते येशूचे तारणकार्य सिध्द करून दाखवतात.
आपण ह्रातून एकाला जरी वगळले तर तारणकार्य पूर्ण होऊ शकत नाही. पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेतः आत्मा, पाणी व रक्त.
येशू ख्रिस्त जो देहरूपाने आला तो देव आहे, आत्मा आहे आणि देवाचा पुत्र आहे. देवाचा पवित्र आत्मा असलेल्या मनुष्यदेही रूपाने तो जगांत आला आणि जगाची पापें घेण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा पाण्याने झाला. जगाच्या पापांचें ओझे त्यानें स्वतःच्या खांद्यावर वधस्तंभापर्यंत वाहिले. त्या पापांची पुरी किंमत त्यानें वधस्तंभावर स्वतःचें रक्त ओतून मृत्युने दिली. पाणी, रक्त आणि आत्मा यांनी परिपूर्ण झालेली तारणाची सुवार्ता ती हीच होय.
ह्रातील एक जरी वगळले तरी त्याचा अर्थ देवाकडून मिळणारे तारण नाकारण्यासारखेच होते. आपण जर बहुसंख्य वि·श्वासू ख्रिस्ती माणसांबरोबर सहमत होण्याचे ठरवले तर आपण त्यांच्यासारखेच असं म्हणू, `पृथ्वीवर साक्ष देणारे दोनजण आहेतः रक्त आणि आत्मा.`
पण प्रेषित योहानानें म्हटले आहे कीं साक्ष देणारे तिघे आहेतः येशूच्या बाप्तिस्माचे पाणी, वधस्तंभावरील रक्त आणि आत्मा. अशी साक्ष देण्यांत योहान अगदी दक्ष होता.
पापी माणसाला पापमुक्त होण्यासाठी ज्या वि·श्वासाची जरूर आहे तो वि·श्वास म्हणजेच त्यानें आत्मा, पाणी व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवणे होय. माणूस जगाला जिंकू शकेल असा वि·श्वास कुठे आहे? तो येथेच आहे. जो पाणी, रक्त व आत्म्याने आला, त्या येशूवर वि·श्वास ठेवणे हाच खरा वि·श्वास आहे. म्हणूनच तुम्ही वि·श्वास ठेवा आणि तारण मिळवून सार्वकालिक जीवनहि मिळवा.
येशूच्या बाप्तिस्म्याशिवाय तारण
पूर्ण होते का?
नाही.
मी नव्याने जन्मायच्या आधी इतर ख्रिस्ती लोकांप्रमाणेच फक्त येशूचे वधस्तंभावरील रक्त आणि आत्मा यावर वि·श्वास करीत होतो. येशू माझ्यासाठीं देवाचा आत्मा घेऊन ह्रा जगांत आला आणि माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला आणि मला तारण मिळाले एवढाच माझा वि·श्वास होता. ह्रा दोन गोष्टींची खात्री झाल्यानंतर मी लोकांना उपदेश करू लागलो होतो.
धर्माचा खूप अभ्यास करून मिशनरी बनायचे आणि येशूप्रमाणे लोकांसाठी मरायचे अशा अनेक योजना मी मनांत त्यावेळी आखल्या होत्या.
पण जोपर्यंत मी फक्त दोन गोष्टींवर वि·श्वास ठेवत होतो तोपर्यंत माझ्या ह्मदयांत कुठेतरी पाप शिल्लक होतेच. त्याचा परिणाम म्हणजे मी कांही जगाला जिंकू शकलो नाही किंवा पापांपासून मुक्तहि होऊ शकलो नाही. फक्त रक्त आणि आत्मा यावर वि·श्वास ठेवल्यामुळें माझ्या ह्मदयातील पाप समूळ नाहिसे झालेले नव्हते.
येशूवर वि·श्वास ठेवून सुध्दां माझ्या ह्मदयांत पाप होतेच याचे कारण म्हणजे मला पाण्याबद्दल, येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल कांहीच माहिती नव्हती. जोपर्यंत मी माझ्या तारणासाठी बाप्तिस्म्याचें पाणी, रक्त आणि आत्मा यावर वि·श्वास ठेवत नव्हतो तोपर्यंत मला संपूर्णतः पापमुक्ती मिळाली नव्हती.
मी माझ्या दैहिक पापांवर जय न मिळविण्याचे कारण हेच होते की येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल मी अज्ञानांत होतो. आता सुध्दां खूप लोक येशूवर वि·श्वास ठेवूनसुध्दां दैहिक पापें करीत राहतात. त्यांचें पहिले प्रेम पुन्हां बहरून येण्यासाठीं ते खूप प्रयत्न करतात. पण ते त्यांना जमत नाही.
त्यांची सर्व पापें पाण्यानें धुतली गेलेली नसतात म्हणूनच त्यांच्या पहिल्या प्रेमाला बहर येत नाही. येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हांच त्यानें त्यांची सर्व पापें घेतली होती हे त्यांच्या लक्षांत येत नाही. म्हणूनच एकदा आपटी खाल्ल्यानंतर त्यांचा वि·श्वास डगमगतो.
तुम्हां सर्वांना मला स्पष्टपणें हे सांगायला आवडेलः येशूवर वि·श्वास ठेवून आपण वि·श्वासू राहिलो तर जगाला जिंकणे शक्य आहे. ह्रा जगांत आपण कितीहि पापें केली तरी जोपर्यंत आपण उध्दारकत्र्या येशूने त्याच्या बाप्तिस्माच्या द्वारे आपल्याला सर्व पापांपासून मुक्तता दिली असा वि·श्वास ठेवतो तोपर्यत आपण नेहमीच विजयी ठरू शकतो.
पण जर आपण बाप्तिस्म्या पाण्याशिवाय येशूवर वि·श्वास ठेवला तर आपली संपूर्ण पापमुक्ती होऊ शकत नाही. योहानानें आपल्याला सांगितले की जगावर जय मिळविणारा वि·श्वास म्हणजेच बाप्तिस्म्याच्या पाण्याने, रक्ताने आणि आत्म्याने आलेल्या येशू ख्रिस्तावर वि·श्वास ठेवणे होय.
देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला यासाठी पाठवले की जे कोणी त्याचा बाप्तिस्मा व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवतील त्यांचे तारण होईल. येशू आत्म्याने आला. (मनुष्याच्या देहरूपाने). पापांची किंमत मोजण्यासाठी वधस्तंभावर रक्त ओतून तो मरण पावला. अशा प्रकारे येशूने सर्व माणसांची पापांपासून सुटका केली.
येशू पाण्याने, रक्ताने आणि आत्म्याने आला आणि त्यानें आपल्याला सर्व पापांपासून मुक्त केले या सत्यवचनावरील वि·श्वासच आपल्याला जग जिंकण्याच्या रस्त्याकडे नेतो.
जर बाप्तिस्म्याचें पाणी व वधस्तंभावरील रक्त नसते तर आपले खरे तारण झाले नसते. पाणी व रक्त यापैकी एखादे वगळले तरी तारण मिळू शकत नाही. पाणी, रक्त व आत्मा याच्याशिवाय तारण होऊच शकत नाही. म्हणूनच पाणी, रक्त व आत्मा ह्रावरती वि·श्वास ठेवला पाहिजे. तोच खरा वि·श्वास ठरतो.
मी तुम्हांला सांगतो की पाणी, रक्त आणि आत्म्याच्या साक्षीखेरीज खरे तारण नसते
तारणाच्या साक्षीसाठी जरूर असणरे
तीन घटक कोणते आहेत?
पाणी, रक्त आणि आत्मा.
एखादा माणूस वर विचारलेल्या प्रश्नाबद्दल मनांत असा विचार करेल, "येशू माझा तारणकर्ता आहे. मी वधस्तंभावरील रक्तावर वि·श्वास ठेवतो. मला हुतात्मा होऊन मरायची इच्छा आहे. माझ्या ह्मदयांत पाप आहे तरीसुद्धां मी येशूवर वि·श्वास ठेवतो. मी माझ्या पापांबद्दल पश्चाताप केलेला आहे आणि रोजच मी उदारतेने चांगले वागण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. मी माझ्या मालकीच्या सर्व वस्तु आणि माझे आयुष्य देवाला दिलेले आहे. अजून माझे लग्न पण झालेले नाही. देवाला मी माहित नाही असं कसे काय होऊ शकेल? येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. आपला पवित्र देव स्वर्गातून माणूस म्हणून आला व आपल्यासाठी खांबावर मरण पावला. देवा, मी तुझ्यावर वि·श्वास ठेवतो. मी तुझ्यासाठी निःस्वार्थीपणानें, वि·श्वासपूर्वक खूप काम केलेले आहे. जरी मी नालायक आहे आणि माझ्या ह्मदयांत थोडेफार पाप शिल्लक आहे तरीहि येशू मला नरकांत पाठवेल का? नाही. तो पाठवणार नाही."
वर उल्लेखलेल्या माणसाप्रमाणेच अनेक लोक आज जगांत आहेत. ह्रा प्रकारचे लोकच येशूने जगाची पापें घेण्यासाठी बाप्तिस्मा घेतला होता ह्रा घटनेवर वि·श्वास ठेवत नाहीत. अशा प्रकारचे लोक येशूवर वि·श्वास ठेवतात पण तरीहि त्यांच्या ह्मदयांत पापाहि असते. असे लोक कुठे जातात? ते नरकांत जातात. कारण ते पापी आहेत!
जे लोक स्वतःच्या आवडीप्रमाणे विचार करतात आणि असं धरून चालतात कीं देवाने सुध्दां त्यांच्यासारखाच विचार करायला पाहिजे ते सुध्दा नरकांत जातील. कांहीजण असं म्हणतात की येशू वधस्तंभावर मेला त्यावेळीच त्यानें सर्व पापें घेतली म्हणूनच आता जगांत पापें नाहीत. पण हे बोलणे फक्त रक्त व आत्मा यासंबंधी आहे. हा कांही द्दढ वि·श्वास नाही की ज्यामुळे लोकांना संपूर्ण तारणप्राप्ती होईल.
येशूनें बाप्तिस्म्याबरोबरच सर्व पापें घेतली, त्याबद्दल त्याचा न्याय करण्यांत आला, तो आपल्यासाठी वधस्तंभावर मेला आणि तीन दिवसानंतर तो पुन्हां उठला ह्राच्यावर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे.
अशा प्रकारच्या द्दढ वि·श्वासाखेरीज आपल्याला संपूर्ण तारण मिळू शकत नाही. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, तो वधस्तंभावर मरण पावला आणि नंतर पुन्हां उठला. येशू ख्रिस्त आपल्याकडे पाण्याने, रक्ताने आणि आत्म्याने आला. त्यानें जगाची सर्व पापें काढून टाकली.
पृथ्वीवर साक्ष देणारे तीन महत्वाचे घटक म्हणजेः आत्मा, पाणी व रक्त ही होत.
प्रथम `पवित्र आत्मा` साक्ष देतो की येशू हाच देव आहे आणि तो मनुष्याचा देह घेऊन पृथ्वीवर आला.
दुसरी साक्ष `पाण्याची` आहे. पाणी म्हणजेच योहानानें आपली सर्वांची पापें येशूकडे देण्यासाठीं यार्देन नदींत येशूला दिलेल्या बाप्तिस्म्याचे पाणी होय. (मत्तय 3:15)
तिसरी साक्ष `रक्ताची` आहे ज्यातून नवीन आयुष्य सूचित होते. आपल्या अपराधांची जबाबदारी येशूने स्वतःकडे घेतली आणी त्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा त्यानें पित्याकडून पत्करली. वधस्तंभावर मृत्यु झाल्यानंतर तीन दिवसांनी येशूचें पुनरुत्थान झाले.
आकाशांतील पिता जो देव आहे तो येशूचा बाप्तिस्मा आणि त्याच्या पुत्राचे रक्त ह्रावरती जे वि·श्वास ठेवतात त्यांच्या ह्मदयांत पवित्र आत्मा पाठवतो. तोच आपल्याला तारणाची साक्ष देतो. ज्यांचा नव्याने जन्म झाला आहे ते देवाच्या वचनाने जगावर जय मिळवितात. ज्यांचें तारण झालेले आहे ते सैतानी हल्ले, दडपणे व खोटे संदेष्टे यांच्यावर जय मिळवू शकतात. ही अशी जबरदस्त शक्ती आपल्यांत असण्याचें कारण हेच कीं आपल्या ह्मदयांत येशूचें पाणी, रक्त व आत्मा आहे.
आपण जगावर आणि सैतानावर
कसा काय जय मिळवू शकतो?
तीन साक्षींवर वि·श्वास ठेवण्याने.
आपण आत्मा, पाणी व रक्त ह्राच्यावर वि·श्वास ठेवतो म्हणूनच सैतानावर व जगावर जय मिळवतो. जे येशूचा बाप्तिस्मा व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवतात ते खोटट्या संदेष्टष्ट्यांवर पण जय मिळवू शकतात. ही जिंकण्याची शक्ती पाणी, रक्त व आत्मा ह्रावर वि·श्वास ठेवल्यामुळे मिळते. तुम्ही ह्रावर वि·श्वास ठेवता का?
येशू हाच देवाचा पुत्र आहे, आपला तारणकर्ता आहे असा वि·श्वास ठेवून, आपल्या ह्मदयांत पाणी व येशूचे रक्त याला जागा दिली नाही तर तुमचा नव्याने जन्म होऊ शकत नाही किंवा तुम्ही जगाला जिंकू शकत नाही. तुमच्या ह्मदयांत हे सर्व आहे का?
तुमच्या ह्मदयांत आत्मा व पाणी आहे का? येशूनें तुमची सर्व पापें घेतली ह्रावर तुमचा वि·श्वास आहे का? वधस्तंभावरील रक्त तुमच्या ह्मदयांत आहे का?
तुमच्या ह्मदयांत पाणी व येशूचें रक्त असेल, आणि तुम्ही वि·श्वास ठेवला कीं येशू तुमच्या अपराधांची शिक्षा भोगून वधस्तंभावर मरण पावला तर तुम्ही जगाला जिंकू शकता.
प्रेषित योहानानें जगाला जिंकले होते याचे कारण म्हणजे त्याच्या ह्मदयांत तीन साक्षी होते. त्याचें सहकारी त्यांच्या वि·श्वासामुळें तारणकार्यांत अनेक अडचणी व अडथळे सहन करीत होते त्यांना योहानानें साक्ष दिली होती, "येशू आत्म्याने, पाण्याने व रक्ताने आला आणि त्याने जगावर जय मिळविला. तुम्हीसुध्दां त्याच्यावर वि·श्वास ठेवण्याने जगावर जय मिळवाल. वि·श्वासू लोकांसाठी जगावर जय मिळवण्याचा हा एकच मार्ग आहे."
योहानाचें पहिलें पत्र 5:8 यांत म्हटले आहे, "साक्ष देणारे तिघे आहेतः आत्मा पाणी व रक्त; ह्रा तिघांची साक्ष एकच आहे." पुष्कळ लोक येशूचा बाप्तिस्मा वगळून त्याचें रक्त आणि आत्मा याबद्दल बोलतात. जर त्यांनी `पाणी` काढून टाकले तर सैतान त्यांना फसवतो. ह्रा फसवेगिरीतून बाहेर पडून त्यांनी पश्चाताप करायला पाहिजे; आणि `येशूच्या बाप्तिस्म्याच्या पाण्यावर` वि·श्वास ठेवून नव्याने जन्मायला हवे.
पाणी व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवल्याखेरीज कोणीच जगाला जिंकू शकत नाही. मी पुन्हां एकदा सांगतो की कोणीच नाही! पाणी आणि येशूचे रक्त ही शस्त्रास्त्रे आहेत असं समजून आपण युध्द करायलाच हवे. देवाचे वचन ही आत्म्याची तरवार आहे.
अजूनहि पुष्कळ लोक असे आहेत की ते येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवत नाहीत. बाप्तिस्म्याने त्यांची सर्व पापें धुतली आहेत असं समजून घेत नाहीत. कांही जण फक्त दोहोवंर वि·श्वास ठेवतात. येशू म्हणतो, `ऊठ प्रकाशमान हो` पण तरीहि लोक त्यांचा प्रकाश पाडत नाहीत. त्यांच्या ह्मदयांत अजूनहि पाप आहे. जरी ते येशूवर वि·श्वास ठेवतात तरी सुध्दां त्यांचा शेवफ् नरकांत जाण्यामध्येच होणार.
बाप्तिस्मा आणि येशूचे रक्त ह्रा सुवार्तेची साक्ष द्यायलाच हवी यासाठी की लोक ती ऐकतील, त्यावर वि·श्वास ठेवतील आणि वाचू शकतील
बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवणें हा एक
ठाम समज आहे का?
नाही, तो कांही ठाम समज नाही.
ते निर्भळ सत्य आहे.
जेव्हां आपण सुवार्तेची साक्ष देतो तेव्हां ती एकदम स्पष्ट असायला पाहिजे. येशू आत्म्यानें,
बाप्तिस्म्यानें. (आपली पापें नेणारा बाप्तिस्मा) आणि रक्ताने (आपल्या पापांची किंमत मोजणारे रक्त) आला. आपण ह्रा तिन्हीवर वि·श्वास ठेवायला पाहिजे.
जर नाही ठेवला तर आपण खरी सुवार्ता न सांगता साधा धर्म शिकवत असतो. आज जगांतील अनेक ख्रिस्ती लोक त्यांच्या धर्माला ख्रिस्ती धर्म म्हणतात. पण त्याची धर्म म्हणून व्याख्या करता येत नाही. ख्रिस्ती पणा म्हणजेच सत्यावर आधारित असलेल्या तारणकार्यावर ठेवलेला वि·श्वास, असा वि·श्वास की तो नेहमीच वरती देवाकहे पहात असतो. म्हणूनच ख्रिस्तीपणा म्हणजे धर्म नाही.
धर्म माणसाने निर्माण केला आहे. पण वि·श्वास म्हणजे देवाने दिलेल्या तारणाकडे पहाणे होय. जर आपण सत्याकडे दुर्लक्ष केले तर ख्रिस्तीपणा हा एक धर्म ठरून त्याचा कल आचरणा संबंधी उपदेश करण्याकडे जातो.
येशू ख्रिस्त धर्म प्रस्थापित करण्यासाठी कांही या जगांत आला नाही. त्याने ख्रिस्ती धर्माची स्थापना कधीच केली नाही. मग तो धर्म आहे असा तुम्ही कां वि·श्वास ठेवता? त्याऐवजी तुम्ही बौध्द धर्मावर कां वि·श्वास ठेवीत नाहीत? मी चुकीचे बोलत आहे असे तुम्हांला वाटते का?
कांही लोक धर्म म्हणून येशूवर वि·श्वास ठेवतात आणि शेवटी म्हणतात, "काय फरक आहे? स्वर्ग, निर्वाण..... हे सगळं एकच आहे फक्त त्याला वेगवेगळी नांवे आहेत. कांहीही झाले तरी आपल्या सर्वांचा शेवट एकाच ठिकाणी होणार आहे."
ख्रिस्ती बंधूंनो, सत्याला सामोरे जा. आपण उठून आपला प्रकाश इतरत्र पाडायला पाहिजे. कांहीहि चलबिचल न करता आपल्याला सत्य काय ते स्पष्टपणे सांगता आले पाहिजे.
जर कोणी म्हणाला, `हा कांही एकच मार्ग नाही` तर तुम्हांला अधिकारवाणीने म्हणता आले पाहिजे, "होय! हा एक रस्ता आहे. पाण्यानें, रक्ताने आणि आत्म्यानें आलेल्या येशू ख्रिस्तावर तुम्ही वि·श्वास ठेवला तरच तुम्ही स्वर्गांत जाऊ शकता." तुम्ही इतके प्रकाशित असायला पाहिजे की दुसरे लोक तुमची सुवार्ता ऐकून नव्याने जन्मून स्वर्गांत जाऊ शकतील.
योग्य द्दढ असा वि·श्वास असू द्याः येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त या तारणासंबंधी अज्ञानानांत असलेले आणि येशूच्या प्रेमाची परतफेड न करणारे नाश पावतील
येशूवर वि·श्वास ठेवून सुध्दां
कोणते लोक नाश पावतील?
जे येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास
ठेवत नाहीत तेच नाश पावतील.
स्वतःच्या इच्छेप्रमाणें येशूवर वि·श्वास ठेवून, त्याच्या प्रेमाची परतफेड न करणे म्हणजे सत्याला साध्या धर्माचें रूप आणण्यासारखेच आहे.
एकदा एक जहाज पॅसिफिक महासागरांत बुडाले. थोडेफार जे वाचले होते ते लहान रबराच्या बोटीतून इतरांना धोक्याचें इशारे पाठवू लागले. पण तुफानी वादळामुळे दुसरी जहाजे त्यांच्या मदतीला जाऊ शकली नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर तेथे आले. त्यातून एक दोर खाली टाकण्यांत आला.
जर एखाद्याने हा दोर त्याच्या कमरेला बांधायच्या ऐवजी दोन्ही हातांत पकडला तर तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे देवावर वि·श्वास ठेवून त्याच्या प्रेमाची परतफेड न करणाया माणसाप्रमाणे होतो. आता हा माणूस अजूनहि सुरक्षित नाही आणि तरीहि तो म्हणतो, `माझा वि·श्वास आहे देवा मला वाचव, मला असं वाटते की मी वाचीन`.
त्याला येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त याबद्दल कांहीच माहिती नाही आणि तरीहि तो स्वतः वाचण्याच्या गोष्टी करतो, का तर त्याने हातांत दोर पकडलेला आहे!
पण जसजसा तो दोर वर उचलला जातो तसतशी त्या माणसाची दोरावरील पकड ढिली होत जाते. कारण तो स्वतःच्या ताकदीवरच अवलंबून रहातो. ती ताकद कमी होत गेली की त्याची हाताची पकड सुटून तो पुन्हां समुद्रांत पडतो.
येशूच्या प्रेमाची परतफेड न करणे हे असेच आहे. अनेक लोक असं म्हणतील की ते येशूवर वि·श्वास ठेवतात. पण हे असं समजणे म्हणजे संपूर्ण गणितापैकी थोडा भाग करण्यासारखे आहे. ते संपूर्ण सुवार्तेवर वि·श्वास ठेवीत नाहीत. म्हणूनच `आम्ही वि·श्वास ठेवतो` असं परत परत ते म्हणत असतात.
वि·श्वास ठेवणे आणि वि·श्वास ठेवण्याचा प्रयत्न करणे या दोन्ही गोष्टी सारख्याच नाहीत. ते म्हणतात कीं ते शेवटपर्यंत येशूला अनुसरतील. पण त्यांच्या ह्मदयांत पाप असल्यामुळे शेवटच्या दिवशी ते मागे फिरतील. येशू बाप्तिस्म्याने, रक्तानें व आत्म्यानें आला हे समजून न घेता ते येशूवर प्रेम करतात, ते अर्थातच नरकांत जातील.
तुम्ही तुमचा आत्मा बाप्तिस्म्याच्या पाण्याला आणि वधस्तंभावरील रक्ताला बांधा. जेव्हां येशू तारणाचा दोर खाली सोडेल तेव्हां ज्यांनी स्वतःला पाणी, रक्त व आत्मा यांना बांधलेले आहे तेच वाचतील.
हेलिकॉप्टरमधून लाऊडस्पीकरवर मदतनीस ओरडून म्हणाला, "कृपया नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हां मी दोर खाली टाकीन तेव्हां तुम्ही तो तुमच्या कमरेभोवती आणि दोन्ही कांखेतून नीट बांधा. जेथे आहांत तेथेच रहा. दोन्ही हातांनी दोराला लोंबकळत बसू नका. स्वतःच्या अंगाभोवती नीट बांधून स्वस्थ रहा. त्यानंतर तुमची सुटका होऊन तुम्ही वाचाल."
ह्रा सगळ्या सूचना त्यानें दिल्यानंतर एका माणसाने सूचनेप्रमाणे स्वतःला दोराने बांधून घेतले त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण दुसरा माणूस म्हणाला, "कांही काळजी करू नकोस. मी चांगला सशक्त आहे. हेल्थ क्लबमध्ये जाऊन मी शरीर चांगले कमावलेले आहे. माझे पीळदार स्नायू तुम्हाला दिसतात का? मी पुष्कळ मैल अंतर लोंबकळू शकतो." असं म्हणत त्याला उचलले जात असतांना त्याने दोर पकडला.
सुरूवातीला दोन्ही माणसे वरती उचलली गेली. पण त्यांत फरक होता. ज्याने सूचना नीट ऐकून दोर स्वतःच्या अंगाभोवती नीट बांधला तो विनासायासानें वर उचलला गेला. मध्येच एकदा त्याची शुध्द हरपली होती पण तरीहि त्याला वरती खेचण्यांत आले.
पण ज्याने स्वतःच्या शक्तीची घमेंड केली त्याची दोरावरील पकड सुटली कारण त्याची शक्ती कमी होत गेली. सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो मरण पावला.
संपूर्ण तारण होण्यासाठीं बाप्तिस्मा व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवणे जरूर आहे. जे पूर्ण मनाने देवाच्या वचनावर वि·श्वास ठेवतात त्यांचे तारण होतेः "बाप्तिस्मा करणाया योहानाकडून घेतलेल्या बाप्तिस्माने व वधस्तंभावरील रक्ताने मी तुम्हांला वाचवले आहे."
जो फक्त रक्तावर वि·श्वास ठेवतो तो म्हणतो, "काळजी करू नका. मी वि·श्वास ठेवतो. येशूच्या रक्ता बद्दल मी माझ्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आभारी राहीन. मी शेवटपर्यंत येशूच्याच मागे जाईन. येशूच्या रक्तावरील माझा वि·श्वास, पापांवर आणि जगावर जय मिळवण्यास आयुष्याच्या अखेरपर्यंत पुरेसा आहे.
नाही. तो पुरेसा नाही. ज्या लोकांना देव माझी माणसं असं म्हणून त्यांच्यांबद्दल साक्ष देतो ती माणसं या तीन गोष्टींवर वि·श्वास ठेवणारी असतातः येशू आत्म्याने आला, सर्व पापें नेण्यासाठी यार्देन नदींत त्याचा बाप्तिस्मा झाला, पापांचें वेतन मरण म्हणून वधस्तंभावर तो आपल्या पापांसाठी मरण पावला आणि नंतर त्याचें पुनरुत्थान झाले.जे लोक तीनहि गोष्टींवर वि·श्वास ठेवून त्याची साक्ष देतात त्यांच्यावरच पवित्र आत्मा येतो.तो म्हणतो, "मी तुझा तारणारा देव आहे. मी तुला पाण्याने व रक्ताने वाचवले आहे."
जे लोक ह्रा तीन गोष्टींवर वि·श्वास ठेवत नाहीत त्यांना देवांकडून तारण मिळत नाही. ह्रा तीन मधून एक जरी वगळले तर देव म्हणतो, "तुझें तारण झालेले नाही." येशूच्या सर्व शिष्यांनी या तिन्हीवर वि·श्वास ठेवला होता येशू म्हणतो की त्याचा बाप्तिस्मा तारणाची साक्ष देतो आणि त्याचे रक्त न्यायाची साक्ष देतो.
प्रेषित पौल आणि पेत्र यांनी सुध्दां येशूचा बाप्तिस्मा व रक्त याची साक्ष दिली होती
येशूच्या शिष्यांनी कशाची
साक्ष दिली होती?
येशूचा बाप्तिस्मा आणि
त्याचे रक्त.
प्रेषित पौल येशूच्या बाप्तिस्म्यासंबंधी कांही बोलला होता का? येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल तो किती वेळा बोलला ते आपण पाहू. रोमकरांस पत्र 6:3 यांत तो म्हणतो, "आपण जितक्यांनीं ख्रिस्त येशूमध्यें बाप्तिस्मा घेतला तितक्यांनीं त्याच्या मरणांत बाप्तिस्मा घेतला. ह्राविषयी तुम्ही अजाण आहां काय?" आणि 6:5 मध्ये म्हटले आहे, "कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालों आहों, तर त्याच्या उठण्याच्याहि प्रतिरूपानें त्याच्याशीं संयुक्त होऊं." पौलाने गलतीकरांस पत्र 3:27 मध्ये म्हटलें आहे; "कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनीं ख्रिस्ताला परिधान केलें आहे." येशूच्या शिष्यांनी येशूच्या बाप्तिस्म्याच्या `पाण्याची` साक्ष दिली होती. पेत्राचें पहिलें पत्र 3:21 मध्ये लिहिले आहे, "त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचें तारण करीत आहे."
परमेश्वराचें पापमुक्तीचें तारण पाण्यानें व येशूच्या रक्ताने आले
देव नीतिमान कोणाला म्हणतो?
ज्या माणसाच्या ह्मदयांत
अजिबात पाप नाही त्याला.
बाप्तिस्म्याचें पाणी व वधस्तंभावरील रक्त यांच्या द्वारे येशूनें मनुष्याला तारण दिलेले आहे. या तारणानंतर आपण ऊठून प्रकाशमान व्हायला पाहिजे. पण कसे काय? तीन गोष्टींबद्दल साक्ष देऊनच.
`ऊठ, प्रकाशमान हो.` देवाने आपल्यावर देदिप्यमान प्रकाश पाडून तो आपल्याला प्रकाशमान व्हायला सांगत आहे. त्याची आज्ञा पाळणे हे आपले काम आहे.
पुष्कळ लोक अजिबात ऐकत नाहीत. जोर लावून आपण सुवार्तेबद्दल उपदेश करायला पाहिजे. येशूवर वि·श्वास ठेवा म्हणजे तुमचा उध्दार होऊन तुम्ही नीतिमान बनाल. तुमच्या ह्मदयांत जर कुठे पाप असेल तर तुम्ही नीतिमान ठरत नाहीत; तुम्ही अजूनहि जगातील पापांवर जय मिळवलेला नाही असेच आहात.
तुम्ही जर येशूच्या बाप्तिस्म्याच्या पाण्यावर वि·श्वास ठेवला नाही तर तुम्ही तुमच्या ह्मदयांतील सर्व पापें कधीच काढू शकत नाही. आणि जर तुम्ही येशूच्या रक्तावर वि·श्वास ठेवला नाही तर अपराधांची शिक्षा व तुमचा न्याय तुम्ही टाळू शकत नाही. येशू आत्म्याने आला ह्राच्यावर तुम्ही वि·श्वास ठेवला नाही तर तुमचे तारण कधीच होऊ शकणार नाही. तीन साक्षींवर वि·श्वास ठेवल्याखेरीज तुम्ही कधीहि नीतिमान बनू शकत नाही.
अर्धवट चांगले वागणारे लोक नुसते नांवापुरते चांगले असतात. एखाद्याच्या ह्मदयांत पाप असतांना तो स्वतःला नीतिमान किंवा चांगले समजत असेल तर तो अजूनहि ख्रिस्तांत नाही. अशा प्रकारच्या अर्धवट लोकांनी तारणासंबंधी खूप निरर्थक लेख लिहून ठेवलेले आहेत.
एखाद्या माणसाच्या मनांत पाप असेल तर देव त्याला निष्पाप म्हणेल का? नक्कीच नाही. देव जे पहातो तेच बोलतो. तो सर्वसमर्थ आहे. तो खोटं कधीच बोलू शकत नाही. लोकांना नीतिमत्त्व म्हणजे काय ते माहित नाही. एखादी वस्तु स्वच्छ असेल तर आपण तिला `स्वच्छ` म्हणतो. पण तेथे जर पाप असेल तर आपण `स्वच्छ` म्हणत नाही.
तुम्ही विचार कराल कीं तुमच्या ह्मदयांत जरी पाप असले तरी येशू तुम्हांला नीतिमान म्हणतो. पण ते चुकीचे आहे.
जेव्हां आपण वि·श्वास करतो कीं येशू आत्म्याने, पाण्यानें (बाप्तिस्म्याच्या वेळी त्यानें पापें घेतली), आणि रक्तानें (देहाने येऊन तो आपल्यासाठीं मरण पावला) आला; तेव्हांच येशू आपल्याला नीतिमान म्हणतो.
ख्रिस्ती बंधूनो, जे स्वतःला `नीतिमान म्हणवून` घेतात त्यांचा पाणी व रक्ताच्या सुवार्तेशी कांही एक संबंध नाही. `नीतिमान असणे किंवा तसं म्हणवून घेणें` हे माणसाने त्याच्या पारंपरिक ठाम समजूतीनुसार निर्माण केलेले आहे. एखादा माणूस येशूवर खूप वि·श्वास ठेवत असेल पण त्याच्या ह्मदयांत पाप असेल तर देव त्याला नीतिमान समजत नाही.
एखाद्या माणसाच्या मनांत पाप असेल तर देव त्याला सज्जन माणूस म्हणेल का? देवाला खोटेपणा आवडत नाही. तुम्ही फक्त `आत्मा` व `रक्त` ह्राच्यावर वि·श्वास ठेवला तर देव तुम्हाला नीतिमान माणूस असं म्हणू शकेल का? नाही. नक्कीच नाही.
ज्या माणसाच्या मनांत कांही पाप नाही आणि तो माणूस फक्त पुढील तीन गोष्टींवरच वि·श्वास ठेवतोः येशू देव आहे तो देहाने या जगांत आला, त्यानें यार्देन नदींत बाप्तिस्मा घेतला आणि आपली सर्व पापें नष्ट करण्यासाठी तो वधस्तंभावर रक्तबंबाळ झाला. अशा प्रकारच्या माणसालाच देव नीतिमान समजतो.
जे लोक तारणाच्या सुवार्तवर वि·श्वास ठेवतात त्यांनाच देव ओळखत असतो. कारण जिथे ठेवायला पाहिजे तिथेच ते लोक वि·श्वास ठेवत असतात. येशूने आपल्यासाठी काय काय केले त्यावर ते पूर्ण मनाने वि·श्वास ठेवतात. त्यांची सर्व पापें स्वतःकडे घेण्यासाठीच येशूने बाप्तिस्मा घेतला त्यानंतर त्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला आणि नंतर मरणातून उठला ह्राच्यावरती त्यांचा द्दढ वि·श्वास असतो.
हे सर्व देवाच्या प्रेमामुळे घडून आले. येशू सर्वातून खाली पृथ्वीवर आला आणि म्हणाला, "अहो कष्फ्ी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसांवा देईन." (मत्तय 11: 28). आपल्या पापांचे ओझे त्याने स्वतःकडे घेतले.
जे लोक फक्त येशूच्या रक्तावर वि·श्वास ठेवतात त्यांना देव ओळखत नाही. कारण त्यांच्या ह्मदयांत कुठेतरी पाप राहिलेले असते.
येशू म्हणतो, "मी ह्रा जगांत येऊन योहानाकडून बाप्तिस्मा घेतला तेव्हांच तुझी सर्व पापें मी माझ्याकडे घेतली. त्या पापांपायी मी वधस्तंभ सहन केला. तुझ्या पापांची किंमत मी भरली आणि तुला वाचवले." तारण होण्यासाठी येशूचा बाप्तिस्मा, त्याचें रक्त आणि तो म्हणजेच देव ह्रावर वि·श्वास असणे जरूर आहे.
जे लोक ह्रा तीन गोष्टींवर वि·श्वास ठेवतात त्यांना येशू म्हणतो, "तुमचें तारण झालेले आहे. तुम्ही आता नीतिमान आहांत आणि देवाची मुले आहांत." तुम्ही जर येशूचा बाप्तिस्मा, त्याचें रक्त आणि आत्मा या तिनहि गोष्टीवंर वि·श्वास ठेवला तर तुमचें तारण होते. जे फक्त रक्त आणि आत्मा यावरच वि·श्वास ठेवतात ते पापीच असतात.
देवाच्या राज्यांत केवळ निर्भेळ सत्य असते. तेथे न्याय, प्रामाणिकपणा, प्रीति आणि दयाळूपण असतो. तेथे खोटेपणाचा थोडा सुध्दां भाग नसतो. खोटेपणा आणि डावपेच खेळणे याला स्वर्गांत जागा नाही.
अनीतीने वागणारा कोण आहे?
जो येशूच्या बाप्तिस्म्यावर
वि·श्वास ठेवत नाही तो.
"त्या दिवशीं पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, `आम्ही तुझ्या नांवानें संदेश दिला, तुझ्या नांवानें भुते धालविलीं, व तुझ्या नांवानें पुष्कळ महत्कृयें केलीं नाहीत काय?" (मत्तय 7:22) देव माणसाची ही कामें ओळखत नाही "तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो, अनाचार करणायांनो, माझ्यापुढून निघून जा." (मत्तय 7:23)
एक माणूस येशूला म्हणतो,
"मी तुला दोन घरे दिली, तुझ्यासाठी मी स्वतःचें आयुष्य दिले. तुला हे दिसत नाही का? मी तुला यार्देन नदीवर कधीच नाकारले नव्हते."
त्यावर येशू त्याला विचारतो,
"तुझ्या ह्मदयांत पाप आहे का?"
"होय प्रभो, थोडफार पाप आहे."
"तर मग निघून जा. पापी लोकांना येथे यायची परवानगी नाही."
"पण प्रभुजी, मी तुझ्यासाठीं हुतात्म्याप्रमाणे मेलो."
"तू कसं काय म्हणतोस की हुतात्मा म्हणून तू मेलास. तू तर तुझ्या हट्टीपणामुळें आणि तुझ्या कठोर ह्मदयामुळें मेलास. माझा बाप्तिस्मा व रक्त तूं कधी स्वीकारलेस का? तू माझा आहेस अशी साक्ष कधी दिली होती का? तू माझ्या बाप्तिस्म्यावर कधीच वि·श्वास ठेवला नव्हता. तू तुझ्याच मतांना आणि विचारांना धरून राहिला होतास. तारण होण्यासाठी तू तुझें स्वतःचेच प्रयत्न करीत होतास. तर मग तू तुला वाटते त्या मार्गाने जा."
येशूने आपल्याला उठून प्रकाशीत व्हायला सांगितले आहे. पुष्कळदां तारण झालेल लोक खोटे संदेष्टे व बोगस ख्रिस्ती लोक यांच्या दडपणाखाली आल्यामुळे जास्त तेजोमय किंवा प्रकाशित होण्यांत असफल होतात. एखादी लहान ठिणगी मोठी आग पेटवू शकते. जर एका माणसाने उठून बेडरपणे साक्ष दिली तर सबंध जग प्रकाशीत होईल व उजळून जाईल.
यशया 60:1-2 मध्ये म्हटले आहे, "ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुजकडे आला आहे; परमे·ाराचें तेज तुजवर उदय पावलें आहे. पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे, पण तुजवर परमे·ार उदय पावत आहे, त्याचें तेज तुजवर दिसत आहे."
असत्याचा आणि खोटट्या सुवार्तेचा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे म्हणूनच खरी सुवार्ता आपल्याला दणदणीत भाषेंत सांगत आहे की तुम्ही आता ऊठा आणि प्रकाशमान व्हा आणि तुमच्या भोवतालचे जग उजळून टाका. जे येशूवर वि·श्वास ठेवतात तेच त्याच्यावर प्रेम करू शकतात. ज्यांचा उध्दार झालेला नाही ते येशूवर प्रेम करू शकत नाही. कसे काय ते करू शकतील? ते नुसते प्रेमाच्या गप्पा करतात. जर मूळांत त्यांचा येशूवर वि·श्वास नाही तर ते खर प्रेम करूच शकत नाहीत.
पापी लोकांच्या तारणासाठी साक्ष देणारे तिघे आहेत
आपल्या ह्मदयांत तारणाची
साक्ष कोण देते?
येशूचा बाप्तिस्मा.
"आणि पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेतः आत्मा, पाणी व रक्त; ह्रा तिघांची साक्ष एकच आहे." येशू पृथ्वीवर आला आणि त्याने त्याचे कार्य पाण्याने व रक्ताने करून आपला उध्दार केला.
"आपण माणसांची साक्ष स्वीकारतों पण तिच्यापेक्षां देवाची साक्ष मोठी आहे, जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयीं दिली; तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायींच साक्ष आहे; ज्यानें देवाचा वि·श्वास धरला नाहीं त्यानें त्याला लबाड ठरविलें आहे; कारण जी साक्ष देवानें आपल्या पुत्राविषयीं दिली आहे तिच्यावर त्यानें वि·श्वास ठेवला नाहीं. ती साक्ष हीच आहे कीं, देवानें आपल्याला सार्वकालिक जीवन दिलें आणि हें जीवन त्याच्या पुत्राच्या ठायीं आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलें आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाहीं त्याला जीवन लाभले नाहीं." (योहानाचें पहिलें पत्र 5:9-12)
ज्यांचा नव्याने जन्म झाला आहे ते माणसांची साक्ष स्वीकारतात. मग आपण नीतिमान ठरलो जातो. नव्याने जन्मलेले जेव्हां त्यांच्या तारणासंबंधी खरं काय ते सांगतात तेव्हां ऐकणारे लोक ते सत्य स्वीकारतात. त्याच्याबद्दल वादविवाद करीत नाहीत. ते म्हणतात की आपला वि·श्वास योग्य आहे. आपण जर त्यांना आपल्यांतील आमूलाग्र बदलाबद्दल आणि आपल्या नव्याने जन्मण्याबद्दल खुलासा करून सांगितले तर ते आपल्याशी सहमत होतात. अशा प्रकारें आपण माणसाची साक्ष स्वीकारतो.
बायबल म्हणते, "पण तिच्यापेक्षां देवाची साक्ष मोठी आहे कारण ती देवाची साक्ष आहे." बायबल म्हणते देवाची साक्ष म्हणजे त्याचा पुत्र आहे. खरं आहे ना? देवाच्या पुत्राची साक्ष काय आहे? देवाने आपला उध्दार केला त्याचा जबरदस्त पुरावा म्हणजेच येशू आत्म्याने आला, तो बाप्तिस्म्याच्या पाण्यानें आला आणि वधस्तंभावरील रक्तानें आला. देवाची हीच साक्ष आहे. त्यानें आपला उध्दार केला कारण आपण त्या साक्षीवर वि·श्वास ठेवतो.
"जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायींच साक्ष आहे; ज्यानें देवाचा वि·श्वास धरला नाहीं त्यानें त्याला लबाड ठरविलें आहे; कारण जी साक्ष देवानें आपल्या पुत्राविषयीं दिली आहे तिच्यावर त्यानें वि·श्वास ठेवला नाहीं."
तारण कोणाचें होते याबद्दल वरील परिच्छेद आपल्याला अचूकपणें सांगते. त्यांत म्हफ्लें आहे कीं जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायींच साक्ष आहे. तुमच्या ह्मदयांत साक्ष आहे का? ती तुमच्यांत आहे आणि ती माझ्यांत आहे. आपल्यासाठीं देव पृथ्वीवर आला (कुमारी मरीयेच्या उदरीं तो देहरूपाने आलाः.) जेव्हां तो 30 वर्षाचा होता तेव्हां त्याचा बाप्तिस्मा झाला. आपली सर्व पापें स्वतःकडे घेऊन तो वधस्तंभावर गेला. तीन दिवसानंतर तो मरणातून उठला आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठीच येशूने अशा प्रकारे आपला उध्दार केला.
येशूचें पुनरुत्थान झाले नसते तर काय झाले असते? कबरेमध्ये त्यानें माझ्यासाठी कशी काय साक्ष दिली असती? म्हणूनच येशू आपला तारणकर्ता आहे. आपण ह्रावर वि·श्वास ठेवतो.
येशूने म्हटले त्याप्रमाणेच त्यानें बाप्तिस्मा व रक्ताच्या द्वारे आपले तारण केले. असा वि·श्वास ठेवण्यानेच आपण पापमुक्त झालो. ती साक्ष माझ्या ठायीं आहे आणि तुमच्या ठायीं आहे. ज्यांचा उध्दार झालेला आहे ते लोक बाप्तिस्म्याच्या `पाण्याचा` अनादर करीत नाहीत. येशूनें आपल्यासाठी जे जे कांही केलेलं आहे ते आपण कधी विसरायला नको.
"कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." (मत्तय 3:15) योहानाकडून यार्देन नदींत बाप्तिस्मा घेऊन येशूने आपली पापें स्वतःच्या शिरीं घेतली हे आपल्याला कधीहि नाकारता येत नाही. तारण झालेली माणसं येशूच्या बाप्तिस्म्याचे `पाणी` कधीहि नाकारू शकत नाहीत.
तारण न झालेले पण वि·श्वास ठेवणारे लोक शेवफ्पर्यंत येशूचा बाप्तिस्मा नाकारतात
देवाला लबाड कोण ठरवतो?
जो माणूस येशूच्या बाप्तिस्म्यावर
वि·श्वास ठेवत नाही तोच.
प्रेषित योहानाने अगदी अचूकपणें म्हटले, "ज्यानें देवाचा वि·श्वास धरला नाहीं त्यानें त्याला लबाड ठरविलें आहे." जर प्रेषित योहान आता आपल्यामध्ये राहत असता तर तो ख्रिस्ती लोकांना काय म्हणाला असता? त्यानें विचारले असते कीं `येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हां आपली सर्व पापें नेली होती का.`
येशूचा बाप्तिस्मा करून योहानाने सुध्दां तारणाच्या सुवार्तेची साक्ष दिली की नाही? योहान म्हणतो, "मी येशूचा बाप्तिस्मा केला केला तेव्हां तुमची सर्व पापें त्यानें त्याच्या खांद्यावर नाही का घेतली?" तो अशीच साक्ष देईल, "तुमच्या तारणासाठी येशूचा बाप्तिस्मा झाला."
जे लोक देवावर आणि त्याच्या तारणकार्यावर वि·श्वास ठेवत नाहीत ते देवाला लबाड ठरवितात. जेव्हां आपण इतर लोकांना सांगतो कीं येशूनें बाप्तिस्म्याच्या वेळीं आपली सर्व पापें नेली. तेव्हां ते लोक म्हणतात, "नाही नाही! तो आपली सर्व पापें नेऊ शकला नसेल! त्यानें फक्त आपली पूर्वीची पापें नेली असतील. रोजच्या पापांचें काय? दैनंदिन पापें तशीच राहिलेली आहेत".
ते हट्टीपणाने म्हणतात, `तारण होण्यासाठीं आपण आपली पापें रोज रोज कबूल करून त्याबद्दल पश्चाताप करायला पहिजें.` तुम्ही सुध्दां असंच म्हणता का? येशूच्या बाप्तिस्म्यामुळे आपली सर्वच्या सर्व पापें कायमसाठी एकदाच धुतली गेली ह्राच्यावर जे लोक वि·श्वास ठेवत नाहीत ते देवाला लबाड ठरवितात.
बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील रक्त यांच्या द्वारे येशूने आपले एकदाच कायमसाठी तारण केलेले आहे
खोटं कोण बोलतो?
जो येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास
ठेवत नाही तोच.
येशूचा बाप्तिस्मा झाला त्याचवेळी त्यानें सर्व पापें एकदाच कायमसाठी नेली. जे लोक येशूच्या बाप्तिस्म्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवतात त्यांनाच देव तारण देतो, पण जे कोणी वि·श्वास ठेवत नाहीत त्यांना देव सोडून देतो. ते नरकांत जातात. आपले तारण होणे किंवा न होणे हे आपण कशावर वि·श्वास ठेवतो त्यावरच अवलंबून आहे. येशूने संपूर्ण जगाची सर्व पापांपासून सुटका केलेली आहे. जे वि·श्वास ठेवतील त्यांचेच तारण होईल. जे वि·श्वास ठेवत नाहीत त्यांचें तारण होणार नाही कारण त्यांनीं देवाला लबाड ठरविलें आहे.
लोक त्यांच्या दुर्बलतेमुळे नाही तर त्यांच्या अवि·श्वासामुळे नरकांत जातात. "ज्यानें देवाचा वि·श्वास धरला नाहीं त्यानें त्याला लबाड ठरविलें आहे." जे लोक असा वि·श्वास धरत नाही कीं त्यांची सर्व पापें येशूकडे दिली गेली त्यांच्या ह्मदयांत पाप असते. त्यांच्यांत पाप नाही असं ते म्हणू शकत नाहीत.
एकदा मी एका पाळकाला भेटलो आणि त्याला विचारले, "पाळकसाहेब, मी येशूवरती वि·श्वास ठेवला तर माझी सर्व पापें निधून जातील का?"
"होय, यांत प्रश्नच नाही. ती सर्व निघून जातील."
"येशूने जगाची सर्व पापें नेली आणि पूर्ण झाले असं म्हटले त्यामुळें तुमचें तारण झाले. खर की नाही?"
"होय, माझें तारण झाले."
"तर मग तुम्ही आता निष्पाप आहांत."
"होय, मी निष्पाप आहे."
"तुम्ही जर पाप केले तर काय होईल?"
"कांही झाले तरी आपण मानव आहोत. आपण परत कधी पाप करू शकणार नाही हे कसं काय शक्य आहे?" म्हणूनच आपण दररोजच्या पापांची क्षमा होण्यासाठी पश्चाताप करायला पाहिजे."
वरील पाळकाच्या ह्मदयांत अजूनहि पाप आहे कारण तारणासंबंधीचे संपूर्ण सत्य त्याला समजलेले नाही.
अशा प्रकारची माणसेच देवाच उपहास करून त्याला लबाड ठरवितात. येशू जो देव आहे तो जगाची सर्व पापें समूळ नष्ट करण्यांत असफल झाला होता का? असं बोलणं त्रासदायक आहे. जर येशूनें सर्व पापें नष्ट केली नाहीत तर तो तारणकर्ता देव कसा काय होऊ शकतो? त्याच्यावर वि·श्वास ठेवा हे तो कसं काय म्हणू शकेल? तुम्ही त्याला लबाड ठरविणार आहात का? मी तुम्हांला विनंती करतो की तसं कांही करू नका.
बायबल आपल्याला सांगते की देवाला खोटं ठरवू नका, आणि त्याला फसवू नका. तो आपल्यासारखा नाही आहे.
प्रेषित योहान आपल्याला अगदी मार्मिकपणे तारणाची सुवार्ता सांगत आहे. देवाने आपल्यासाठी काय केले आहे ह्राच्या वरती पुष्कळ लोकांना वि·श्वास ठेवावासा वाटत नाही. (म्हणजेच येशू ख्रिस्त पाण्याने, रक्ताने आणि आत्म्यानें आला या सत्य घटनेवर.)
जे लोक पाणी, रक्त व आत्मा या संबंधी वि·श्वास धरत नाहीत ते देवाला खोटं ठरवतात.
कृपया तुम्ही देवाला असं खोट ठरवू नका. येशूने यार्देन नदींत बाप्तिस्म्याच्या द्वारें (जगाची सर्व पापें घेऊन जाण्यासाठीफ् धर्माचरण पूर्ण केले.
वाईट आत्मा येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें पावित्र्य नाकारीत असतो
सैतान काय नाकारीत असतो?
येशूचा बाप्तिस्मा व त्याचें पावित्र्य.
जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष असते. तारण झालेल्या माणसाला खात्री असते की त्याची सर्व पापें येशूकडे दिली गेली आणि पाण्यामुळे व येशूच्या रक्तामुळें त्याला पापमुक्ती मिळाली. येशू मरीयेच्या उदरीं जन्मास आला; यार्देन नदींत त्याचा बाप्तिस्मा झाला. तो वधस्तंभावर मरण पावला आणि नंतर तो मरणातून उठला ह्रावर त्याचा वि·श्वास असतो.
जो नीतिमान असतो त्याच्याठायींच साक्ष असते. येशू पाण्याने, रक्ताने व आत्म्यानें आला असा वि·श्वासच आपल्या तारणाचा पुरावा ठरतो. साक्ष आपल्या ठायींच असते. मी म्हणतो, `साक्ष तुमच्या ठायीं असू द्या` जर साक्ष नसेल तर त्याला तारण म्हणता येत नाही. तारणाचा पुरावा हा तुमच्या ठायींच आहे.
प्रेषित योहान म्हणाला होता, `जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायींच साक्ष आहे.` स्वतःमध्ये साक्ष असण्यासाठी फक्त वधस्तंभावरील रक्तावर वि·श्वास ठेवणे पुरेसे आहे का? किंवा फक्त पाण्यावर वि·श्वास ठेवून रक्तावर ठेवायचा नाही हे चालेल का? देवाकडून तुमचा स्वीकार केला जावा यासाठी तुम्ही तीनहि गोष्टींवर (पाणी, रक्त व आत्मा) वि·श्वास ठेवणे जरूर आहे.
तेव्हांच मग येशू तुम्हांला म्हणेल, `तुझे तारण झालें आहे.` फक्त दोनांवर वि·श्वास ठेवला तर तुम्हांला असं वाटते काय की तुमच्या ठायीं साक्ष आहे? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे देवावर वि·श्वास ठेवता असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही स्वतःचीच साक्ष देता असं होऊन जाते.
तीन पैकी फक्त दोनांवर वि·श्वास ठेवणारे जगांत पुष्कळ जण आहेत. त्यांचें तारण कसे झाले याबद्दल ते खूप पुस्तकं लिहितात. किती सफाईने ते तसं लिहितात! पण हे निराशजनक आहे. ते लोक स्वतःला `सुर्वातिक` म्हणवून घेतात. त्यांना वाटते की तें नुसते `सुर्वातिक` नाही पण `धार्मिक` सुध्दां आहेत. ते `पाण्यावर` वि·श्वास ठेवत नाहीत तरीसुध्दां ते तारणाच्या गप्पा करतात! त्यांच्या ठायीं देवाची साक्ष नसते.
तुम्ही कसं काय याला तारण समजता? येशू पाण्याने, रक्ताने आणि आत्म्यानें आला असा वि·श्वास जे धरतात त्यांच्या ठायी माणसाची व देवाची साक्ष असते.
प्रेषित पौलानें म्हटले, "कारण आमची सुवार्ता केवळ शब्दानें नव्हें, तर सामथ्र्याने, पवित्र आत्म्यानें व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळविण्यांत आली." (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र 1:5) जेव्हां लोक फक्त येशूच्या रक्तावरच वि·श्वास ठेवतात तेव्हां सैतानाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. तो म्हणतो, "अहाहा! मूर्खांनो, तुम्ही माझ्याकडून फसवले गेला आहांत," पुष्कळ लोकांचा असा वि·श्वास आहे की आपण जर येशूच्या रक्ताची स्तुति केली तर सैतान पळ काढतो. त्यांना वाटते कीं सैतान क्रॉसला घाबरतो. खरं म्हणजे सैतान नुसते नाटक करतो. आपण त्याच्या आहारी जाता कामा नये.
जेव्हां सैतान एखाद्या माणसाच्या अंगांत जातो तेव्हां तो माणूस वेडट्यासारखा वागायला लागतो. त्याच्या तोंडाला फेस पण येतो. अशा प्रकारचे प्रयोग करणे सैतानाला फारसे कठीण नसते. माणसाकडून कांहीहि करवून घ्यायची शक्ती सैतानाकडे आहे. सैतानाला फक्त त्याचा मेंदू थोडासा वापरावा लागतो. मारून टाकण्याचा अधिकार सोडून बाकी सर्व अधिकार देवाने सैतानाला दिलेले आहेत. एखाद्या माणसाला सुकलेल्या पानाप्रमाणे थरथर कापवणे, किंचाळायला लावणे आणि तोंडाला फेस आणणे अशा गोष्टी करणे म्हणजे सैतानाच्या हातचा मळ आहे.
हे असं होते तेव्हां वि·श्वास ठेवणारे ओरडून म्हणतात, "येशूच्या नांवाने सांगतो, निघून जा!" जेव्हां तो माणूस भानावर येऊन पूर्वस्थितींत येतो तेव्हां ते म्हणतात की येशूच्या रक्ताच्या सामथ्र्यामुळे असं झाले. हा सर्व सैतानाचा खेळ असतो.
येशूने आपल्याला बाप्तिस्म्याच्या पाण्याने धुतलेले आहे, त्याच्या रक्ताने त्याने आपल्याला न्याय मिळवून दिला आणि वधस्तंभावर मेल्यानंतर तो तीन दिवसानंतर पुन्हां उठला असा वि·श्वास जे लोक करतात त्यांना सैतान खूप घाबरत असतो. येशूचा बाप्तिस्मा व रक्त याची साक्ष ज्यांच्या ठायीं आहे त्यांच्या आसपास सैतान राहत नाही.
तुम्हांला माहितच आहे की कांही सिनेमांमध्ये कॅथालिक फादर भूतांना कसं काढतात ते दाखवलेले आहे. `दि ओमन` ह्रा सिनेमांत एक फादर माणसांतील भूत काढून टाकण्यासाठी लाकडाचा क्रॉस जोरजोरांत हलवतो पण भूत निघून जाण्याऐवजी तो फादर स्वतःच मरतो! ज्याचा जन्म नव्याने झाला आहे तो अशा प्रकारे कधीच हार खाणार नाही.
ज्याचा जन्म नव्याने झाला आहे त्याला जर सैतानाने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस म्हणेल "येशूने माझी सर्व पापें नेली हे तुला माहित आहे का?" हे ऐकले तर सैतान पळूनच जाईल. ज्यांचा जन्म नव्याने झाला आहे त्यांच्या जवळपास जाण्याचा सैतानाला तिरस्कार वाटतो. अशा माणसापासून सैतान दूर पळतो. जे लोक देवाच्या पुत्रावर, पाण्यावर व रक्तावर ह्रा तीन साक्षींवर वि·श्वास ठेवत नाहीत ते देवाला लबाड ठरवितात.
देवाच्या पुत्राची साक्ष काय आहे?
त्याचा बाप्तिस्मा, त्याचे रक्त
आणि आत्मा.
देवाच्या पुत्राची साक्ष काय आहे? हीच की तो आत्म्याने आला आणि पाण्यानें सर्व पापें स्वतःकडे घेतली. आपल्यासाठी त्यानें वधस्तंभावर त्याचें रक्त सांडले. पाण्याने, रक्ताने आणि आत्म्याने होणारे तारण ते हेच नाही का?
लोक देवासमोर खोटं बोलतात कारण त्यांचा पाणी व रक्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास नाही. म्हणूनच ते खोटेपणाचा प्रसार करतात.
योहानाचें पहिलें पत्र 5 वा अध्याय यांतील 11 व्या वचनांत म्हटलें आहे, "ती साक्ष हीच आहे कीं, देवानें आपल्याला सार्वकालिक जीवन दिलं आणि हें जीवन त्याच्या पुत्राच्या ठायीं आहे."
जे लोक येशूच्या बाप्तिस्म्यावर आणि रक्तावर वि·श्वास ठेवतात त्याच लोकांना सार्वकालिक जीवन मिळालेले असते. ज्यांचे तारण झालेले आहे त्यांना सार्वकालिक जीवन मिळून ते युगानुयुगे जगतात.
12 व्या वचनांत म्हटले आहे, "ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलें आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाहीं त्याला जीवन लाभले नाहीं." याचाच अर्थ असाहि होऊ शकतोः देवाच्या पुत्राने पृथ्वीवर जे कार्य केले त्या कार्यावर म्हणजेच त्याचा बाप्तिस्मा, त्याचा वधस्तंभावरील मृत्यु, त्याचें पुनरुत्थान ह्रावर जो माणूस वि·श्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. जो कोणी यांतील एखादे जरी कार्य वगळतो त्याला सार्वकालिक जीवन मिळत नाही.
जे लोक येशूचा बाप्तिस्मा, रक्त आणि आत्मा ह्राच्यावरती वि·श्वास ठेवत होते त्यांनाच प्रेषित योहानाने देवाची माणसं म्हणून ओळखलेले आहे. पाणी, रक्त व आत्मा ह्रा तीन गोष्टीच देवाच्या माणसांच्या ह्मदयांत देवाचे वचन आहे हे सिध्द करतात.
ज्यांचा जन्म नव्याने झालेला नाही त्यांना मेंढरू व बकरी यांच्यातील फरक समजत नाही
तारण झालेले व तारण न झालेले
ह्रांच्यातील फरक कोणाला समजतो?
ज्याचा नव्याने जन्म झालेला आहे
त्यालाच हा फरक समजतो.
प्रेषित योहानाला तारण झालेली माणसं अगदी अचूकपणे ओळखता येत होती. प्रेषित पौलाला पण ओळखता येत होती. देवाच्या माणसांना मेंढरू व बकरी कशी काय ओळखता येत होती? देवाचें खरे सेवक कोण आणि ढोंगी माणसं कोण हे देवाच्या माणसांना कसं काय समजत होते? येशूच्या पाणी व रक्ताच्या सुवार्तेने तारण झालेल्यांनाच हे ज्ञान मिळण्याचे आंतरिक सामथ्र्य प्राप्त होत असते.
एखाद्या पाळकाला, सुर्वातिकाला किंवा वडील माणसाला तारण झालेला माणूस ओळखता येत नसेल किंवा त्याला मेंढरू व बकरी ह्राच्यातील फरक समजत नसेल तर त्याचा अर्थ हाच की त्यांचें स्वतःचेच तारण झालेले नाही. ज्यांचें तारण झालेले आहे त्यांनाच फरक समजत असतो.
डोळे मिटून तुम्ही जर रंग ओळखायचा प्रयत्न केला तर हिरवा रंग हिरवाच असतो आणि पांढरा रंग पांढराच असतो पण डोळे मिटलेले असल्यामुळे किंवा अंधारामुळे तुम्हांला ते रंग ओळखता येत नाहीत.
पण जे डोळे उघडे ठेवून पहातात त्यांना कोणता रंग हिरवा व कोणता पांढरा आहे हे सांगता येते. तारण झालेले व न झालेले यांच्यांत असाच फरक आहे.
पाणी, रक्त व आत्मा या सुवार्तेचा आपण उपदेश करायला पाहिजे. आपण सर्वांनी उठून प्रकाशमान व्हायला पाहिजे. जेव्हां आपल्या भोवती माणसं कांही ऐकण्यासाठी येतात तेव्हां त्यांना माणसांच्या शब्दांत न सांगता बायबलप्रमाणे; योहानाचे पहिलें पत्र 5 वा अध्याय यांत जंस सांगितलेले आहे त्याप्रमाणेच आपण सांगायला पाहिजे म्हणजे मग त्यांच्या मनांत कांही शंका रहाणार नाहीत.
आम्ही प्रचार करीत असलेले देवाचें वचन ते हेचः पाणी, रक्त आणि आत्मा. सर्वांना `पाण्यासंबंधी` ज्ञान देणे म्हणजेच प्रकाशमान होणे होय. सर्वांना येशूच्या `रक्ताबद्दल` सांगणे म्हणजेच तेजाने तळपण्यासारखे आहे. आपण ही सुवार्ता पृथ्वीवर सर्वांना सांगितली पाहिजे. अशा पध्दतीने की ज्याला या सुवार्तेबद्दल माहिती नाही असा कोणी असूच शकणार नाही.
तारण झालेल्यांनी उठून सुवार्तेचा प्रकाश सर्वत्र पाडला नाही तर अनेक लोक तारणाशिवाय मरून जातील. देवाला हे नक्कीच आवडणार नाही आणि तो आपल्याला `आळशी सेवक` असंच म्हणेल. येशूच्या पाण्याची व रक्ताची सुवार्ता आपण सांगायलाच पाहिजे.
मी हे पुन्हां पुन्हां तुम्हांला सांगतो याचे कारण हेच की आपले तारण होण्यासाठी येशूचा बाप्तिस्मा महत्त्वाचा आहे. जेव्हां आपण आपल्या मुलांना हे शिकवू तेव्हां प्रत्यंक मुद्दा पुन्हां पुन्हां त्यांना सांगून त्यांना समजेलेले आहे याची खात्री पटेपर्यंत शिकवत रहायला पाहिजे.
अडाणी माणसाला शिकवताना आपण बाराखडी पासून सुरूवात करतो. नंतर आपण त्याला लिहायला शिकवतो. समजा `शिक्षा` हा शब्द शिकवायचा आहे तर आपण त्याला त्याचा अर्थ समजावून सांगतो. येशूबद्दल सांगताना आपल्याला अशाच प्रकारे इतर लोकांबरोबर बोलायला पाहिजे. येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल खुलासेवार सांगून त्यांना पाणी, रक्त व आत्मा याबद्दल नीट सांगायला हवे.
पाणी व आत्म्याची ही सुवार्ता; येशूचा बाप्तिस्मा, वधस्तंभावरील रक्त व येशू हाय तारणकर्ता देव आहे ह्रा वि·श्वासांतूनच निर्झराप्रमाणे उफाळून वर येते.