• All e-books and audiobooks on The New Life Mission website are free
  • Explore multilingual sermons in global languages
  • Two new revised editions in English have been released
  • Check out our website translated into 27 languages
Search

Sermons

Subject 3 : Gospel of water and the Spirit

< 3-4 > येशूचा बाप्तिस्मा लाक्षणिक अर्थानें पापी लोकांसाठी तारण आहे (पेत्राचें पहिलें पत्र 3:20-22)

(पेत्राचें पहिलें पत्र 3:20-22)
"हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसांत तारूं तयार होत असतां देव सहन करीत वाट पाहत होता त्यावेळीं ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवांत केवळ आठ जण पाण्यांतून वाचविण्यांत आले. त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचें तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणें नव्हे, तर शुध्द भावानें देवाचें ऐकणे, असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गांत गेला आणि आतां देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत"
 
आपण नीतिमान कशामुळे बनतो?
देवाच्या कृपेमुळे.
 
आपण पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वीच देव आपल्याला ओळखत होता. आपण पापी म्हणूनच जन्माला येणार हे त्याला आधीच माहित होते. म्हणूनच जगाची सर्व पापें धुऊन बाप्तिस्म्याच्या द्वारें त्यानें वि·श्वासू लोकांना वाचवून त्यांना स्वतःची माणसं असं केले.
हे सर्व देवाच्या कृपेमुळे घडून आले. स्तोत्रसंहितेंत म्हटले आहे, "मत्र्य मनुष्य तो काय कीं तू त्याची आठवण करावी?" सर्व पापांपासून सुटका होऊन ज्यांचे तारण झालेले आहे त्यांच्यावर देवाची विशेष प्रीति असते. ती देवाची मुलं असतात.
पाणी व आत्म्यावर वि·श्वास ठेवणारे आपण, देवाची नीतिमान अशी मुलं होण्यापूर्वी, आणि तारण होऊन देवाला `अब्बा` म्हणून हाक मारण्याचा हक्क आपल्याला मिळण्याआधी कसे होतो? आपण सर्व पापी होतो. जगांत जन्माला येऊन तब्येत चांगली असली तर 60-70 वर्षे वयापर्यंत किंवा 70-80 वर्षापर्यंत जगायचे एवढीच आपली लायकी होती.
येशूचा बाप्तिस्मा व रक्त या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून आपली सर्व पापें धुऊन टाकण्याच्या आधी ज्यांचा नाश अटळ आहे अशा प्रकारच्या पापी लोकांप्रमाणे आपण होतो.
प्रेषित पौल म्हणाला होता कीं केवळ देवाच्या कृपेमुळे तो होता तसा होता. सध्या आपण जे कांही आहोत ते देवाच्या कृपेमुळे आहोत. त्या कृपेबद्दल आपण देवाचें आभार मानत असतो. निर्माणकर्ता देव आपल्याला त्याची मुलं बनवून आपल्या तारणासाठी या जगांत आला म्हणून आपण आभार मानतो. पाणी व आत्मा या सुवार्तेच्या कृपेबद्दल आपण देवाचें आभार मानतो.
देवाने आपल्याला त्याची गुणी मुलं म्हणून कां निवडले आहे? आपण दिसायला खूप सुंदर दिसतो म्हणून का? आपली योग्यता आहे म्हणून काय? की आपण खूप चांगले आहोत म्हणून? याबद्दल आपण विचार करू या.
देवाने आपल्याला निर्माण केले याचे कारण म्हणजे आपल्याला देवाची माणसं असं बनवून आपण स्वर्गाच्या राज्यांत त्याच्याबरोबर सदैव रहावे यासाठीच. आपल्याला देवाने सार्वकालिक जीवन देऊन आशीर्वादीत केले याला दुसरे कोणतेच कारण नाही आहे. आपली निवड त्याने केली ती कांही आपण सुंदर दिसतो किंवा आपण पात्र आहोत म्हणून किंवा आपण चांगले जीवन जगतो या कारणांनी नव्हे तर त्याची आपल्यावर खूप प्रीति आहे म्हणूनच.
"त्याच्या लाक्षणिक अर्थानें आता बाप्तिस्मा तुमचें तारण करीत आहे." (पेत्राचें पहिले पत्र 3:21) "केवळ आठ जण पाण्यांतून वाचविण्यांत आले." (पेत्राचे पहिले पत्र 3:20)
आपण इतरांपेक्षां खूप चांगले आहोत का? नाही, अजिबात नाही. आपण कोणी विशेष व्यक्ती नाही तरीसुध्दां पाणी व आत्मा ह्राच्यावर वि·श्वास ठेवण्यामुळे आपण वाचलो आहोत.
हा एक मोठा चमत्कार समजायला पाहिजे कीं आपण वाचलेलो आहोत. हे तारण म्हणजे देवाच्या निरपेक्ष प्रेमाची देणगी व आशीर्वाद आहे. म्हणूनच देवाला आपण; आमचा परमेश्वर, आमचा पिता असं म्हणू शकतो. आपण जर पापी असतो तर तसं म्हणू शकलो असतो का?
जेव्हां आपण आपल्या झालेल्या तारणासंबंधी विचार करतो तेव्हां आपल्याला देवाच्या आपल्यावरील प्रेमाची जाणीव होते. आपण त्याबद्दल देवाचे आभार मानू शकत नाही का? देवाची आपल्यावर प्रीति नसती तर जन्मल्यानंतर अर्थहीन आयुष्य जगून आपण नरकातच गेलो असतो. म्हणूनच आपण देवाची आपल्यावरील प्रीति आणि त्याचें आशीर्वाद याबद्दल आणि देवाने आपल्याला त्याच्या नजरेतून योग्य पात्रतेची अशी त्याची मुलं केलेले आहे याबद्दल आभार मानीत असतो.
 
 
येशूच्या बाप्तिस्म्यामुळे आपल्याला मिळालेले मौल्यवान तारण
 
नोहाच्या वेळी लोकांचा नाश
कां झाला?
कारण त्यांनी पाण्यावर (येशूच्या बाप्तिस्म्यावर)
वि·श्वास ठेवला नाही.
 
पेत्राच्या पहिल्या पत्रांत म्हटले आहे, "लाक्षणिक अर्थाने बाप्तिस्मा तुमचें तारण करीत आहे." त्यांत असेहि लिहिले आहे की त्यावेळी केवळ आठजण पाण्यांतून वाचविण्यांत आले. नोहाच्या वेळी किती माणसं होती? किती माणसे होती हे समजायला कांही मार्ग नाही. आपण असं समजू की दहा लाख लोक होते. तर मग त्यापैकी फक्त आठजण वाचले होते.
आता असं म्हणतात की आज जगांत 5 अब्ज लोक आहेत. त्यापैकी येशूवर वि·श्वास ठेवण्याने ज्यांची पापें धुतली गेलेली आहेत असे किती लोक आज जगांत असतील? आपण एखाद्या शहरावर नजर टाकली तर आपल्याला फार थोडे लोक आढळून येतील.
250,000 जनसंख्या असलेल्या शहरांत तारण झालेले लोक किती असू शकतील फारतर 200? त्याचा अर्थ एक हजार माणसांमध्ये फक्त एकाचेच तारण झालेले आहे.
कोरियामध्ये कॅथालिक लोक पकडून जवळजवळ 120 लाख ख्रिस्ती लोक आहेत. त्यांच्यापैकी किती जणांनी पाण्याने व आत्म्याने जन्म घेतलेला आहे? नोहाच्या वेळी पृथ्वीवरील सर्व लोकांपैकी फक्त आठजण वाचले होते याचा आपण विचार करायला पाहिजे. येशूच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व पापें धुतली गेलेली आहेत ह्राच्यावर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे.
येशूने बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील रक्त याच्याद्वारे आपले तारण केलेले आहे ह्रावर वि·श्वास ठेवणारे फार कमी लोक आहेत. `येशूचें पुनरुत्थान` हे सुप्रसिध्द चित्र तुम्ही पाहिले का? त्यांत पुनरुत्थान झालेले किती लोक दाखवलेले आहेत? त्या चित्रांत येशू दोन्ही हात बाजूला पसरून उभा आहे व बाकी लोक त्याच्याकडे जात आहेत. तुम्हांला काय वाटते की त्यांत किती धर्मगुरू असतील?
आज जगांत पुष्कळ धर्मगुरू आहेत. पण त्यांतील खूप थोडेजण तारणाच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवतात. कांही धर्मगुरू म्हणतात की येशू नम्र वृत्तीचा होता म्हणून त्याने बाप्तिस्मा घेतला तर कांही म्हणतात की इतर माणसांप्रमाणे आपण असावे यासाठीच येशूने बाप्तिस्मा घेतला होता.
पण बायबलमधील सर्व प्रेषितांनी, पेत्र व योहानाने सुध्दां साक्ष दिली की सर्वांची पापें बाप्तिस्माच्या द्वारे येशूकडे दिली गेली. आपण सुध्दां हाच वि·श्वास धरतो.
देवाच्या कृपेची अशी आश्चर्यजनक साक्ष शास्त्रामध्ये प्रेषितांनी देऊन म्हटले आहे कीं येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याच्या शिरीं आपली पापें दिली गेली. ह्राच्यावर नुसता वि·श्वास ठेवण्यानेच आपण पापमुक्त होतो.
 
 
तारणाच्या बाप्तिस्म्यामध्ये `कदाचित` हा शब्द नाही आहे
 
देवाची अगाध प्रीति
कोणाला मिळते?
जो मनुष्य येशूचा बाप्तिस्मा व रक्त ह्रावर
वि·श्वास ठेवतो त्यालाच मिळते.
 
येशूवर वि·श्वास ठेवला कीं आपले तारण होईल असा विचार करण्याकडे आपल्या मनाचा कल अधिक असतो. वेगवेगळ्या प्रकारची चर्चेस किंवा प्रार्थनामंदिरें तारणासंबंधी वेगवेगळ्या प्रकाराने वि·श्वास ठेवीत असतात आणि येशूचा बाप्तिस्मा हा त्यापैकीच एक असा त्यांचा समज असतो. पण ते खरे नाही. मी स्वतः हजारो पुस्तकांचे वाचन केले पण येशूचा बाप्तिस्मा व रक्त या योगे होत असलेल्या तारणसंबंधी एकाहि पुस्तकांत नमूद केलेले नाही.
नोहाच्या वेळी फक्त आठजण वाचले होते. आज किती वाचतील ते मला माहित नाही. पण मला वाटते की वाचणारे लोक जास्त नसतील. जे लोक येशूचा बाप्तिस्मा व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवतात ते लोकच वाचतील. अनेक चर्चैस किंवा प्रार्थनामांदिरे यांना भेट दिल्यानंतर मला आढळून आले की फार कमी प्रार्थनामंदिरांत येशूचा बाप्तिस्मा व रक्त या सुवार्तेचा खरा संदेश दिला जातो.
आपण येशूचा बाप्तिस्मा व रक्त ह्रावर वि·श्वास ठेवला नाही तर आपण पापी ठरतो. (आपण चर्चला नियमितपणे जाऊन सुध्दां) सबंध आयुष्यभर नियमितपणे चर्चला जाऊनसुध्दां आपल्या ह्मदयांत पाप असले तर आपण पापीच ठरत असतो.
जर आपण मनांत पाप ठेवून 50 वर्षे चर्चला गेलेलो असलो तर आपला 50 वर्षाचा वि·श्वास निरर्थक व खोटा ठरतो. त्याच्यापेक्षां एक दिवसाचा खरा वि·श्वास ह्मदयांत बाळगणे हे परवडले. जे लोक येशूच्या बाप्तिस्म्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवतात त्यांनाच स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश मिळतो.
देवाचा पुत्र आपल्यासाठी ह्रा जगांत आला आणि जगाच्या सर्व पापांची जबाबदारी बाप्तिस्म्याच्या द्वारे त्यानें स्वतःच्या खांद्यावर घेतली त्यानंतर त्याने आपल्यासाठी स्वतःचे रक्त वधस्तंभावर वाहिले. ह्राच्यावर वि·श्वास ठेवणे हाच खरा वि·श्वास आहे. तोच आपल्याला स्वर्गाच्या राज्याकडे नेतो. हे सर्व समजून घेऊन आपण येशूचे आभार मानायला पाहिजे.
आपण कोण आहोत? आपण केवळ मनुष्याची मुलं आहोत. पण देवाने आपल्याला बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे वाचवले. त्याबद्दल आपण त्याचे आभार मानायला नको का? यार्देन नदींत बाप्तिस्मा झाला तेव्हां येशू 30 वर्षाचा होता. त्यानें आपली पापें बाप्तिस्म्यापासून ते वधस्तंभापर्यंत वाहिली आणि त्या पापांची किंमत मोजून आपल्याला वाचवले.
जेव्हां आपण अंतर्मुख होऊन याबद्दल विचार करतो तेव्हां नतमस्तक होऊन आपल्याला येशूचे आभार मानावेसे वाटतात. येशूने ह्रा जगांत येऊन जे कांही केले ते आपल्या कल्याणासाठी, तारणासाठीच केले. प्रथम तो स्वर्गातून पृथ्वीवर आला, त्याचा बाप्तिस्मा झाला, त्याला वधस्तंभावर खिळण्यांत आले, तो मरण पावला, तीन दिवसानंतर त्याचे पुनरुत्थान झाले आणि आता तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे.
देवानें तारणाची देणगी कोणालाहि न वगळता प्रत्येक माणसाला देऊ केलेली आहे. येशूकडून होणारा उध्दार तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण आहे. देवाच्या ह्रा आशीर्वादाबद्दल आणि त्याच्या अगाध प्रीति बद्दल आपण आभारी असायला पाहिजे.
चर्चमध्ये पुढील आशयाचे एक गाणे म्हटले जाते, "♪एक कथा आहे सुंदर. जगामध्ये मी एक कलंदर. ज्याच्यावर देवाचे आहे खूप प्रेम, इतके की देतो तो तारणाची भेट सप्रेम. ही आश्चर्यजनक प्रीति, ही अगाध प्रीति. हीच एक कथा आहे सुंदर. जगामध्ये आम्ही सर्व कलंदर. आमच्यावर देवाचे आहे खूप प्रेम. इतके की देतो तो तारणाची भेट सप्रेम. देवकृपेची वस्त्रें पांघरून आम्ही आता म्हणतो, ही आश्चर्यजनक प्रीति, ही अगाध प्रीति♪!"
तुम्हांला आणि मला वाचवण्यासाठी येशू आला होता. त्याचा तारणाचा बाप्तिस्मा तुमच्यासाठी व माझ्यासाठी होता. ही सुवार्ता म्हणजे सत्य आहे. हे सत्यच आपल्याला आपल्या कष्टप्रद आयुष्यातून देवाच्या सुंदर राज्याकडे उचलून नेते. हा वि·श्वासच देव आणि तुम्ही यांच्यामधील एक दुवा आहे.
वि·श्वासू माणूस जेव्हां देवाला `पिता` किंवा `अब्बा` म्हणतो तेव्हां तो किती आशीर्वादीत असतो! येशू हा तारणकर्ता आहे आणि त्यानें पापांपासून आपली मुक्तता केली आहे असा वि·श्वास आपण कसा काय ठेवतो? हे सर्व देवाच्या अमाप प्रेमामुळे घडून आलेले आहे. आपण सर्व वाचलो आहोत कारण देवानेच प्रथम आपल्यावर मोठी प्रीति, अगाध प्रीति केलेली आहे.
 
 
येशूने आपली सर्व पापें एकदाच कायमची धुतलेली आहेत
 
"कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेंहि पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरूषानें अनीतिमान लोकांकरितां, एकदा मरण सोसलें." (पेत्राचें पहिलें पत्र 3:18).
तुम्ही आणि मी अनीतिमान आहोत. आपले तारण होण्यासाठीं येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर तो वधस्तंभावर एकदाच मरण पावला.
देवासमोर आपला न्याय होऊ नये आणि आपण देवाच्या राज्यांत रहावे यासाठीं येशूने देहरूपाने या जगांत येऊन आपली सर्व पापें बाप्तिस्मा, वधस्तंभावरील मृत्यु व पुनःरूत्थान यांच्या द्वारे संपूर्णपणे धुऊन टाकली.
येशू ख्रिस्ताने त्याच्या बाप्तिस्म्याने व रक्ताने तुम्हांला संपूर्णपणे वाचवले आहे ह्राच्यावर तुमचा वि·श्वास आहे का? तुम्ही येशूचा बाप्तिस्मा व रक्त या सुवार्तेवर वि·श्वास ठेवला नाही तर तुमचें तारण होऊ शकत नाही. आपण खूप अशक्त व दुर्बल असल्यामुळें येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे आपली सर्व पापें एकदाच कायमसाठी धुतलेली आहेत यावर आपण वि·श्वास धरत नाही त्याचा परिणाम म्हणजे आपण नव्याने जन्मू शकत नाही याच्यांत होतो.
 येशूचा बाप्तिस्मा, वधस्तंभावरील त्याचे मरण व रक्ताचा द्वारे पापी लोकांची सर्व पापें धुतली जाणे या सर्व गोष्टी एकदाच कायमसाठी झाल्या.
प्रत्येकवेळी पाप केले की त्याबद्दल पश्चाताप करणे, नेहमीच चांगले वागण्याचा प्रयत्न करणे, चर्चला दानार्पणें देणे या सर्व गोष्टी तारण मिळवण्यासाठी करीत बसणे माणसाला अशक्य आहे.
म्हणूनच आपल्या तारणासाठी येशूचा बाप्तिस्मा व रक्त यावर आपण वि·श्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. पाणी व रक्तावर आपण वि·श्वास ठेवला पहिजे. नव्याने जन्म होण्यासाठी आपण नुसती चांगली कामं करू शकत नाही.
गरिबांना चांगले कपडे देऊन किंवा पाळकाला चांगलं जेवण देऊन आपलं कांही भलं होणार नसते, किंवा त्यामुळे तारण मिळणार नसते. जे येशूच्या बाप्तिस्म्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवतात तेच तारणांकित होतात. देवाने आपल्याला येशूचा बाप्तिस्मा व रक्त याच्या द्वारे एकदाच कायमसाठी वाचवलेले आहे असा वि·श्वासच आपला उध्दार करतो.
कोणी म्हणेल की देव तर बायबलमध्ये असं म्हणत आहे. अशांना जे म्हणायचे ते म्हणू दे. आपण मात्र बायबलमध्ये लिहिलेल्या शब्दांवर वि·श्वास ठेवला पाहिजे.
इब्राी लोकांस पत्र 10:1 ते 10 मध्ये लिहिलेले आहे की देवाने आपणा सर्वांना एकदाच वाचवलेले आहे. जे येशूचा बाप्तिस्मा व रक्त यावर वि·श्वास ठेवतात त्या सर्वांनाच देवाने एकदाच कायमसाठी वाचवलेले आहे. आपण पुढील अर्थाच्या गाण्यावर वि·श्वास करायला पाहिजे, "♫तो एकदाच मरण पावला, त्याने सर्वांना एकाचवेळी वाचवले, माझ्या बंधूनो, वि·श्वास ठेवा व पापमुक्त व्हा. तुमची सर्व ओझी येशूच्या खांद्यावर त्याच्या बाप्तिस्म्याच्या नांवाने द्या." एकदाच बाप्तिस्मा घेऊन आणि एकदाच वधस्तंभावर स्वतःचे रक्त ओतून येशूने आपली पापमुक्तता केलेली आहे.
"नीतिमान पुरूषानें अनीतिमान लोकांकरिता" (पेत्राचें पहिले पत्र 3:18). येशू हा देव आहे. त्याने कधीहि पाप केले नव्हते. तो देहरूपाने स्वर्गातून खाली आला. त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हां त्यानें अनीतिमान लोकांची सर्व पापें स्वतःकडे घेतली आणि अशा प्रकारे त्याने आपल्याला अनीति आणि पापांपासून सोडवले.
येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां लोकांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत ते करीत असलेली सर्व पापें येशूच्या खांद्यावर सोपवली गेली. येशू वधस्तंभावर त्याचें रक्त ओतून मरण पावला तेव्हाच आपल्या पापाबद्दल न्याय करण्यांत आला होता. पापी लोकांसाठी येशूचा बाप्तिस्मा झाला आणि पापी लोकांच्या ऐवजी तो मरण पावला.
बाप्तिस्म्याचे तारण ते हेच होय. येशूने एकाचवळी एकदाच सर्व पापी लोकांना मुक्त केलेले आहे. जन्मापासून ते मृत्युपर्यत आपण जी सर्व पापें करतो त्याची शिक्षा म्हणून येशूने वधस्तंभावर स्वतःला अर्पण केले. आपण प्रत्येकजण किती अशक्त व दुर्बल असे आहोत! येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे आपल्याला एकदाच एकाचवेळी वाचवलेले आहे असा वि·श्वास आपण ठेवला पाहिजे.
आपण दुर्बल आहोत पण येशू नाही. आपण वि·श्वासू नाही पण येशू वि·श्वासू आहे. देवाने एकदाच एकाचवेळी सर्वांना पापमुक्त केलेले आहे. "देवानें जगावर एवढी प्रीति केली कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठीं कीं, जो कोणी त्याच्यावर वि·श्वास ठेवतो त्याचा नाश होऊं नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावें." (योहान 3:16) देवानें त्याचा एकुलता एक पुत्र दिला. जगाची सर्व पापें त्याने वाहून न्यावी म्हणून देवाने त्याचा बाप्तिस्मा घडवून आणला. यासाठी की मनुष्यप्राण्याच्या सर्व पापांबद्दल त्याचा न्याय केला जाईल.
हे तारणकार्य किती आश्चर्यकारक आहे! ही प्रीति किती अद्भूत आहे! देवाच्या ह्रा अपार प्रीतिबद्दल व त्याच्या तारणकार्याबद्दल आपण म्हणूनच त्याचे आभार मानतो. येशूच्या बाप्तिस्म्याचे आपण म्हणूनच त्याचे आभार मानतो. येशूच्या बाप्तिस्म्याचे पाणी, त्याचें रक्त व तो देवाचा पुत्र आहे असा वि·श्वास जे ठेवतात त्यांना देव वाचवतो. त्यांना नीतिमान म्हणून सार्वकालिक जीवनाचा लाभ होतो.
आपले तारण कोणी केले? देवाने कीं त्यानें निर्माण केलेल्या व्यक्तीने? येशू जो देव आहे त्यानेच आपले तारण केलेले आहे. देवाच्या तारणकार्यावर वि·श्वास ठेवण्यानेच आपण पापमुक्त झालो आहोत.
 
 
येशू हा तारणकर्ता देव आहे
 
ख्रिस्त याचा अर्थ काय आहे?
याजक, राजा आणि संदेष्टा.
 
येशू ख्रिस्त देव आहे. येशू म्हणजे तारणारा आणि ख्रिस्त म्हणजे `ज्याचा तेलाने अभिषेक झाला आहे तो.` जुन्या करारांत शमुवेलानें शौलाला तेलानें अभिषेक केला होता. त्याकाळी राजे लोक, याजक मंडळी व संदेष्टे या सर्वांचा तेलाने अभिषेक केला जात असे.
येशू ह्रा जगांत आला तेव्हां तीन कामांसाठी त्याचा अभिषेक केला होताः याजक, राजा व संदेष्टा. स्वर्गीय याजक म्हणून जगाची पापें वाहून नेण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा झाला होता. आकाशांतील पित्याची इच्छा पुरी करण्यासाठी येशू त्याच्यासमोर पापार्पण म्हणून उभा राहिला. "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारें आल्यावांचून पित्याकडे कोणी येत नाही." येशूने त्याचा बाप्तिस्मा व वधस्तंभावरील मृत्यु या द्वारे आपल्याला पापमुक्ती दिली यावर आपण वि·श्वास ठेवतो म्हणूनच आपले तारण झालेले आहे.
"शरीराचें जीवन तर रक्तांत असते" (लेवीय 17:11) येशूने त्याच्या बाप्तिस्म्या नंतर आपल्या पापांचें वेतन म्हणून स्वतःला देवासमोर पापार्पण म्हणून अर्पण केले आणि वधस्तंभावर स्वतःचे रक्त वाहिले यासाठीं की जे कोणी त्याच्यावर वि·श्वास ठेवतात ते वाचतील.
वधस्तंभावर मरण पावल्यानंतर येशूने जे आत्मे तुरूंगांत होते त्यांना शुभवर्तमान सांगितले. तीन दिवसानंतर येशू पुन्हां उठला. ज्यांचे तारण झालेले नाही ते लोक पापाच्या तुरूंगांत असल्याप्रमाणेच आहेत. येशू आपल्याला पाणी व रक्ताची खरी सुवार्ता सांगत आहे. देवानेच आपल्याला पाणी व आत्म्याची सुवार्ता दिलेली आहे. जो या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतो त्याचा जन्म नव्याने होतो.
 
 
येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त पापी लोकांना पापमुक्त करते
 
देवासमोर आपण शुध्द भावाने
कसे राहू शकतो?
येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त
यावर वि·श्वास ठेवण्याने.
 
येशू ख्रिस्त आपला तारणकर्ता आहे, आणि याबद्दल पेत्राचें पहिलें पत्र 3:21 याच्यात साक्ष दिलेली आहे. "त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणें नव्हे, तर शुध्द भावानें देवाचें ऐकणें असा आहे." पापी लोकांचें तारण होण्यासाठी येशूच्या बाप्तिस्म्याचें पाणी अगदी आवश्यक आहे.
येशूने बाप्तिस्म्याच्या द्वारे पापी लोकांची सर्व पापें स्वतःकडे घेऊन ती धुतली. तुम्ही येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवता का? येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आपल्या ह्मदयांतील सर्व पापें धुतली गेली यावर तुमचा वि·श्वास आहे का? आपली ह्मदये सर्व पापांपासून घुतली गेली हे खर आहे पण आपले देह पाप करीतच राहतात.
एखाद्याचें तारण झाले याचा अर्थ असा नाही की तो परत कधीच पाप करणार नाही. कितीहि झाले तरी आपण पाप करीत असतो. पण येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवण्यामुळे आपली ह्मदये स्वच्छ राहतात. "त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणें नव्हे, तर शुध्द भावानें देवाचें ऐकणें असा आहे." (पेत्राचें पहिले पत्र 3:21).
येशूने माझी सर्व पापें धुतलेली आहेत तर मी त्याच्यावर वि·श्वास ठेवणार नाही हे कसं काय शक्य आहे? त्यानें वाचवलेले आहे तर मी त्याच्यावर वि·श्वास न ठेवणे शक्य आहे का? तारण झाल्यामुळे आता देवासमोर आपली अंतःकरणे स्वच्छ आहेत. येशूने आमची पापें धुतली नाहीत असं आपण देवासमोर कधीच म्हणू शकणार नाही.
आपली सद्सद्विवेकबुध्दि फार नाजूक असते. जेव्हां आपण कांही चूक करतो तेव्हां ती आपल्याला दाखवून देते. आपल्याला सद्सद्विकबुध्दि टोचत असेल तर त्याचा अर्थ आपण येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवून अजूनहि पापमुक्त झालेलो नाही असाच होतो. शुध्द भाव स्वतःमध्ये असण्यासाठी येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवणे हा एकच मार्ग आहे.
जेव्हां आपल्या अंतःकरणांत टोचत रहाते तेव्हां त्याचा अर्थ कुठेतरी आपण चूक केलेली आहे असा होतो. येशूच्या बाप्तिस्म्याचे पाणी आपल्या पापांचा मळ धुऊन टाकतो. बाप्तिस्म्याच्या वेळी येशूने आपली सर्व पापें घेतली व आपल्याला धुऊन टाकले. आपण यावर वि·श्वास ठेवतो तेव्हां आपोआपच आपले अंतःकरण म्हणा किंवा सद्सद्विवेक बुध्दि म्हणा ती पण साफ होऊन जाते. आपली सद्सद्द्विवेकबुध्दि कशाने स्वच्छ होते? येशूच्या बाप्तिस्म्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवण्याने. प्रत्येकाची सद्सद्विवेक बुध्दि जन्मतःच वाईट व अस्वच्छ असते. पण येशूने आपली सर्व पापें स्वतःकडे घेतली असा जर आपण वि·श्वास ठेवला तर पापांचे अस्वच्छ डाग व मळकेपणा आपण काढू शकतो.
नव्याने जन्म घेतात त्यांचा वि·श्वास हा असा असतो. तुमचे अंतःकरण साफ आहे का? तुम्ही स्वच्छ आयुष्य जगता त्यामुळे ते साफ आहे, कीं तुमची सर्व पापें येशूकडे दिली गेलीत असा तुम्ही वि·श्वास ठेवता म्हणून? केवळ तुमच्या वि·श्वासामुळें तुम्ही तुमचे अंतःकरण साफ ठेवू शकता.
कांही शब्द असे आहेत की त्यांत जीवन आहे आणि कांही शब्द निर्जीव असतात. सर्व लोकांची अंतःकरणे कशी काय साफ होऊ शकतील? आपण सर्वांनी नीतिमान होऊन आपल्यांत शुध्द मनोभाव असण्याचा एकच रस्ता आहे तो म्हणजे येशूच्या संपूर्ण तारणकार्यावर आपण वि·श्वास ठेवणे हाच होय.
येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवून आपण पवित्र बनतो. त्याचा अर्थ असा नव्हे कीं आपल्या देहाचा मळ धुऊन टाकला गेलेला आहे, तर आपण देवासमोर शुध्द भावाने उभे राहून त्याचे ऐकत आहोत असा आहे. यासाठीच येशू आला, त्यानें बाप्तिस्मा घेतला, तो वधस्तंभावर मरण पावला आणि तीन दिवसानंतर तो मेलेल्यातून पुन्हां उठला आणि आता तो देवाच्या उजव्या हाताकडे बसला आहे.
जेव्हां वेळ येईल तेव्हां तो या जगांत पुन्हां येईल. "जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधांत नव्हे तर तारणासाठीं तो दुस­यांदा दिसेल." (इब्राी लोकांस पत्र 9:28) आपण येशूचा बाप्तिस्मा आणि रक्त यावर वि·श्वास ठेवून तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी परत येणार आहे अशा वि·श्वासाने आता त्याची वाट पाहत आहोत.
 
 
वि·श्वासासंबंधी केलेला एक प्रयोग
 
येशूच्या बाप्तिस्म्याशिवाय आपले
तारण होऊ शकते का?
नाही. कधीच नाही.
 
आम्ही एकदा अचानकपणे आमच्या ताईजॉन चर्चमध्ये एक लहानसा प्रयोग करण्याचे ठरवले.
ताईजॉन चर्चचे पाळक रेव्ह. पार्क यांनी एका जोडप्याला येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल खुलासेवार न सांगता फक्त एवढंच सांगितले कीं जगांत आता कांहीहि पापें नाहीत. आता ह्रा जोडप्यामधील जो नवरा होता तो चर्चमध्ये पाळकांचा उपदेश सुरू झाला की हमखास झोपा काढीत असे! अनेक चर्चला हजेरी लावून वेगवेगळ्या पाळकांचे उपदेश त्यानें ऐकण्याचा प्रयत्न केलेला होता. पण सर्वच पाळक येशूचा बाप्तिस्मा वगळून उपदेश करीत त्यामुळें त्या माणसाला दररोज पश्चाताप करावा लागत होता.
पण इकडे ह्रा ताईजॉन चर्चमध्ये त्या माणसाने दोन्ही डोळे सताड उघडे ठेवून पाळकांचा उपदेश नीट ऐकला कारण पाळकसाहेब उपदेश करतांना सांगत होते कीं त्याची सर्व पापें येशूकडे दिली गेली. बस! एवढट्या एकाच कारणाने तो नवरा कांहीही आढेवेढे न घेता, तक्रार न करता बायकोबरोबर चर्चला नियमित जाऊ लागला.
एकदा चर्चमध्ये बसलेले असतांना त्यानें रोमकरांस पत्र 8 वा अध्याय त्यांतील पहिले वचन ऐकले, "म्हणून ख्रिस्त येशूमध्यें असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच." एकाएकी त्यानें विचार केला, `एखाद्याने जर येशूवर वि·श्वास ठेवला तर तो निष्पाप ठरतो. मी जर येशूवर वि·श्वास ठेवतो तर मी सुध्दां निष्पाप आहे.`
घरी गेल्याबरोबर तडक त्यानें त्याच्या मेहूण्याला व मित्रांना फोन करून सांगितले, `तुमच्या मनांत कुठेतरी पाप आहे का? तसं असेल तर तुमचा वि·श्वास चुकीचा ठरतो.` हे सर्व जेव्हां रेव्ह. पार्क यांना समजले तेव्हां ते एकदम गडबडून गेले. आता त्या माणसाला येशूच्या बाप्तिस्म्याबद्दल कांहीच माहिती नव्हती तरी सुध्दां तो अधिकारवाणीनें तो निष्पाप आहे असं सांगत सुटला होता.
त्यानंतर त्या नवराबायकोंमध्ये वादविवाद सुरू झाले. नवरा म्हणायचा की तो निष्पाप आहे. म्हणूनच तो कमी वेळा चर्चला जाऊ लागला. पण बायकोला असं वाटायचे की दोघांच्याहि अंतःकरणांतील पापें संपूर्णतः गेलेली नाहीत. तिच्याबरोबर वाद घालतांना नवरा म्हणे, "ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच." पण बायको त्याला सतत म्हणत रहायची की तिला कांही संपूर्ण पापमुक्त झाल्यासारखे वाटतच नाही.
या सर्वाचा निकाल लावण्यासाठीं त्यानी पुन्हां पाळकाकडे जाऊन `येशूकडे सर्व पापें दिली गेली` म्हणजे काय याबद्दल विचारायचे असे ठरवले.
एकदा संध्याकाळीं चर्च सुटल्यानंतर तिने त्याला घरी जायला सांगून स्वतः एकटीनेच पाळकाला भेटायचे ठरवले. रेव्ह. पार्क भेटल्यानंतर ती म्हणली, "पाळकसाहेब, तुम्ही कांहीतरी महत्त्वाचें असे मला सांगायचे राहून गेलेले आहे असं मला वाटते. कृपा करून तुम्हीच मला तुमचा उपदेश सवीस्तर सांगा." तेव्हां रेव्ह. पार्क यांनी तिला पाणी व आत्मा यांच्या द्वारे नव्याने जन्मण्यासंबंधी सांगितले. त्याचक्षणीं रोमकरांस पत्र 8:1 यांत "म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच" असं कां लिहिलेले आहे हे तिला समजले. तिने ह्रावर ताबडतोब वि·श्वास ठेवला त्यामुळे ती पापमुक्त झाली येशूच्या बाप्तिस्म्याच्या
वेळीच आपली सर्व पापें येशूकडे सोपवली गेल्यामुळे जे लोक ख्रिस्तांत आहेत त्यांना कोणतीहि शिक्षा किंवा दंड होणार नाही.
बायबलमध्ये लिहिलेले शब्द तिला समजू लागले. शेवटी तिला कळून चुकले की आपण सर्वांनी नीतिमान होऊन, आपले सर्वांचेच तारण व्हावे यासाठी येशूचा बाप्तिस्मा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
तिचा नवरा घरी न जाता बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता. ती आल्यावर त्यानें तिला विचारले "आता तरी तुझे तारण झाले काय?"
पाळकसाहेबांनी आपल्या बायकोला काय सांगितले हे सर्व तिच्याकडून ऐकल्यानंतर तो एकदम गोंधळांत पडला. येशूच्या बाप्तिस्म्यासंबंधी त्यानें पूर्वी कधीच ऐकले नव्हते. येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास नसतांना सुध्दां आपण निष्पाप आहोत अशी तर त्याची पक्की खात्री होती. घरी गेल्यानंतर ती दोघं पुन्हां आपसांत भांडू लागली.
आता या वेळी मामला थोडा उलटा होता. आता तुझ्या ह्मदयांत पाप आहे की नाही असं विचारून बायको तिच्या नवरदेवाला सतावू लागली! येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास न ठेवता तो कसा काय स्वतःला निष्पाप म्हणवून घेतो असं तिचे म्हणणे होते. शेवटी तिने त्याला त्याची सद्सद्द्विवेक बुध्दि काय म्हणते हे शोधून काढ असं बजावले. तेव्हां नवरदेवाला समजले की त्याचें ह्मदय संपूर्णपणे साफ नाही.
म्हणून रेव्ह. पार्ककडे जाऊन त्यानें आपण पापी आहोत ही कबूली दिली आणि विचारले, "पापार्पणाच्या डोक्यावर मारायच्या आधी हात कां ठेवत?" डोक्यावर हात ठेवण्याच्या पध्दतीबाबत त्याच्या डोक्यांत गोंधळ झाला होता म्हणूनच त्यानें असा प्रश्न विचारला. रेव्ह. पार्कंनी त्याला येशूच्या बाप्तिस्म्यासंबंधी खुलासा करून सांगितले तेव्हां कुठें त्याचें समाधान झाले.
ज्या दिवशी प्रथमच त्यानें ही सुवार्ता ऐकली त्याच दिवशी एकदाच ऐकण्याने त्याचे तारण झाले.
येशूचा बाप्तिस्मा वगळला तर काय होते ते ह्रा वरील प्रयोगावरून समजते. आपल्या अंतःकरणांत पाप नाही असं आपण लाख वेळा म्हणू. पण येशूच्या बाप्तिस्म्यावरे वि·श्वास नसेल तर अंतःकरणांत पाप असतेच असते. वधस्तंभावरील येशूच्या मरणामुळे आम्ही पापमुक्त झालो आहोत असं पुष्कळ लोक म्हणतात. पण जे येशूचा बाप्तिस्मा व रक्त यावर वि·श्वास ठेवतात तेच देवासमोर निष्पाप ठरतात.
नवराबायकोवर अभिनव प्रयोग करून रेव्ह. पार्क यांनी सिध्द केले की येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवल्याखेरीज संपूर्ण पापमुक्ती मिळू शकत नाही.
 
 
लाक्षणिक अर्थाने तारण म्हणजेच येशूचा बाप्तिस्मा
 
लाक्षणिक अर्थानें तारण
काय आहे?
येशूच बाप्तिस्मा.
 
"त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा तुमचें तारण करीत आहे." जगांतील सर्व पापें धुऊन टाकण्यासाठी आणि आपली अंतःकरणे बर्फाहून शुभ्र करण्यासाठी येशू या जगांत आला. बाप्तिस्म्याच्या वेळी त्यानें आपली सर्व पापें स्वतःकडे घेऊन ती धुतली. बाप्तिस्मा व रक्त या द्वारे त्याने आपले तारण केले म्हणूनच जगांत निर्माण केलेल्या प्रत्येकाने येशूच्या समोर गुडघे टेकायला पाहिजे.
येशूवर वि·श्वास ठेवण्याने आपण पापमुक्त झालो आहोत. त्याच्यावर वि·श्वास ठेवण्याने आपण देवाची मुले झालो आहोत. त्याच्यावर वि·श्वास ठेवण्याने आपण नीतिमान झालो आहोत त्यामुळे आपण स्वर्गांत जाणे शक्य झाले आहे. आपण राजकीय याजकगण आहोत. आपण देवाला पिता असे म्हणू शकतो. आपण या जगांत राहतो खरे पण राजे आपण आहोत.
जे लोक पाणी व आत्मा या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात त्या सर्वांचाच देवाने उध्दार केलेला आहे याच्यावर तुम्ही खरोखरच वि·श्वास ठेवता का? येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवल्याखेरीज आपले तारण पूर्ण होऊ शकत नाही. बाप्तिस्मा, वधस्तंभ आणि आत्मा ही जी येशूची तारणाची सुवार्ता आहे त्यावर असलेला वि·श्वासच देवाला मान्य असतो. कारण हाच खरा वि·श्वास आहे.
येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हां आपली पापें धुतली गेली. त्या पापांची किंमत येशूने वधस्तंभावर त्याचें रक्त ओतून मोजली. येशूने आपल्याला पाणी व आत्म्याने वाचवले. होय! आम्ही यावर वि·श्वास ठेवतो!