• All e-books and audiobooks on The New Life Mission website are free
  • Explore multilingual sermons in global languages
  • Two new revised editions in English have been released
  • Check out our website translated into 27 languages
Search

Sermons

Subject 3 : Gospel of water and the Spirit

< 3-7 > बदललेले याजकपण (इब्राी लोकांस पत्र 7:1-28)

(इब्राी लोकांस पत्र 7:1-28)
"हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता; अब्रााहाम जेव्हां राजांस ठार मारून परत आला तेव्हां ह्रानें त्याला सामोरें जाऊन आशीर्वाद दिला, व अब्रााहामानें त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला; तो आपल्या नांवाच्या अर्थाप्रमाणें एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरें शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता; त्याची मातापितरें, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्रांचा उल्लेख कोठेहि सांपडत) नाहीं. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखें करण्यांत आल्यामुळें तो नित्य याजक राहतो. तर आतां कुलाधिपति अब्रााहाम ह्रानें ज्याला लुटींतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हें ध्यानांत घ्या. लेवीच्या संतानापैकी ज्यांना याजकपण मिळतें त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्रााहामाच्या पोटीं जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणें दशमांश घेण्याची आज्ञा आहे; परंतु जो त्यांच्या वंशांतला नव्हता त्यानें अब्रााहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचनें मिळालीं होतीं त्याला त्यानें आशीर्वाद दिला. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हें निर्विवाद आहे. इकडे पाहिलें तर, मत्र्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु जो त्यांच्या वंशांतला नव्हता त्यानें अब्रााहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचनें मिळालीं होतीं त्याला त्यानें आशीर्वाद दिला. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हें निर्विवाद आहे. इकडे पाहिलें तर, मत्र्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिलें तर, जिवंत आहे अशी ज्याच्याविषयीं साक्ष आहे, त्याला मिळाले. आणि दशमांश दिलेच असें म्हणता येईल. कारण त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला त्यावेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपानें होता. ह्रावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधांत लोकांना नियमशास्त्र प्राप्त झालें त्यामुळें पूर्णता झाली असती तर मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्यानें अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणें म्हटलेलें नसावें ह्राचें काय अगत्य राहिलें असतें? कारण याजकपण बदललें म्हणजे नियमशास्त्रहि अवश्य बदलतें. कारण ज्याच्याविषयीं हें सांगितलें आहे तो निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणींहि वेदीजवळ काम केलें नव्हतें. कारण आपला प्रभु हा यहूदा वंशातून उद्भवला हें उघड आहे. याजकांच्या बाबतींत त्या वंशाविषयीं मोशेनें कांहीं सांगितलेलें नाहीं; आणि दैहिक आज्ञेच्या नियमानें नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामथ्र्यानें झालेला असा मलकीसदेकासारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्रावरून आम्हीं सांगितलें तें अधिकच स्पष्ट होतें. त्याच्याविषयीं अशी साक्ष आहे, `तूं मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणें युगानुयुग याजक आहेस. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरूपयोगी झाल्यामुळें ती रद्द झाली आहे, कारण नियमशास्त्रानें कशाचीहि पूर्णता केलीं नाहीं, आणि ज्या आशेच्या द्वारें आपण देवाजवळ जातों, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे; आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाहीं, (ते तर शपथेवांचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयीं `तू युगानुयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वरानें वाहिली आणि ती तो बदलणार नाहीं` असें सांगितलें त्याच्या त्या शपथेनें हा याजक झाला) त्याअर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. ते पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे, पण हा युगानुयुग राहणारा असल्यामुळें ह्राचें याजकपण अढळ आहे. ह्रामुळें ह्राच्या द्वारें देवाजवळ जाणा­यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणें योग्य होतें; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यांत आलेला आहे. त्याला प्रमुख याजकांप्रमाणें पहिल्यानें स्वतःच्या पापांसाठीं, मग लोकांच्या पापांसाठीं प्रतिदिवशीं यज्ञ करण्याचें अगत्य नाहीं, कारण त्यानें स्वतःला अर्पिल्यानें तें अर्पण एकदांच करून ठेविलें आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमितें; पण नियमशास्त्रानंतरचें शपथ वाहून उच्चारिलेलें वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमितें."
 
 
येशूनें स्वर्गीय याजकपण केले
 
प्रमुख याजक मलकीसदेक आणि अहरोनाच्या
घराण्यांतील ऐहिक प्रमुख याजक
यांच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे?
प्रमुख याजक मलकीसदेक.
 
जुन्या कराराच्या काळांत मलकीसदेक नांवाचा एक प्रमुख याजक होता. अब्रााहामच्या वेळी राजा कदार्लागोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे ह्रांनी सदोम व गमोरा येथील मालमत्ता लुटून नेली होती. तेव्हां अब्रााहामानें त्याच्या घरीं जन्मलेले व लढाईच्या कामांत कसलेले त्याचें दास सोबत घेऊन कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्रांच्याविरुद्ध लढाई केली.
तेथे अब्रााहामानें एलामचा राजा कदार्लागोमर आणि त्याच्यासोबतचे राजे या सर्वांचा पराभव करून स्वतःचा पुतण्या लोट आणि त्याची लुटलेली मालमत्ता परत आणली. शत्रूंचा पराभव करून अब्रााहाम माघारीं येत असतां, परात्पर देवाचा प्रमुख याजक, शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला आणि त्यानें अब्रााहामाला आशीर्वाद दिला. तेव्हां अब्रााहामानें त्याच्या अवघ्याचा दहावा भाग दिला. (उत्पत्ति 14).
बायबलमध्ये प्रमुख याजक मलकीसदेक याच्या महानतेविषयी आणि इतर प्रमुख याजक यांच्याबद्दल विस्तृतपणें सांगितलेले आहे. मातापिता नसलेला, कोणतीहि वंशावळ नसलेला प्रमुख याजक मलकीसदेक हा `शांतीचा राजा` होता; आणि `नीतिमत्त्वाचा राजा` होता. आयुष्याचा प्रारंभ व शेवट नसलेल्या मलकीसदेकाला देवाच्या पुत्रासारखें केले गेल्यामुळे तो नित्य याजक राहतो.
नव्या करारांतील येशू ख्रिस्ताच्या याजकपणाची जुन्या करारांतील प्रमुख याजक अहरोन ह्राच्याबरोबर तुलना करून मलकीसदेकाच्या संप्रदायातील असलेल्या येशू ख्रिस्ताची महानता आपण समजून घेतली पाहिजे असं बायबल आपल्याला सांगत आहे.
लेवीच्या संतानापैकी ज्यांना याजकपण मिळाले त्यांनी लोकांकडून म्हणजे अब्रााहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या त्यांच्या बांधवांपासून दशमांश घेतला. पण अब्रााहामानें प्रमुख याजक मलकीसदेकाला दशमांश दिला, तेव्हां लेवी त्याच्या बापामध्ये बीजरूपानें होता.
जुन्या करारातले याजक येशूपेक्षां श्रेष्ठ होते का? बायबलमघ्ये याचा खुलासा केलेला आहे. ऐहिक प्रमुख याजकांपेक्षां येशू श्रेष्ठ आहे का? कोणी कोणाकडून आशीर्वाद घ्यायला पाहिजे? इब्राी लोकांस पत्र यांत प्रारंभीच सांगितले आहे, "श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हें निर्विवाद आहे." अब्रााहामाला प्रमुख याजक मलकीसदेक याच्याकडून आशीर्वाद मिळाला होता.
आपण कोणत्या विश्वासांत रहायला पाहिजे? जुन्या करारातील पवित्र दर्शनमंडपामधील अर्पणपध्दत पाळून देवाच्या आज्ञा पालनावर आपण अवलंबून रहायला पाहिजे कीं पाणी व आत्म्याच्या, स्वतःच्या अर्पणाद्वारे आलेल्या स्वर्गीय प्रमुख याजकावर म्हणजेच येशू ख्रिस्तावर आपण अवलंबून रहायला हवे?
आपण जो निर्णय घेऊ त्याच्यावरच आपले आशीर्वादित होणे किंवा शापित होणे अवलंबून आहे. देवाच्या वचनाप्रमाणे दररोज अर्पणे करीत आपण जगत आहोत की पाणी व रक्ताद्वारे येशूने स्वतःचें अर्पण एकदाच करून आपल्याला दिलेल्या तारणावर आपण विश्वास ठेवत आहोत? ह्रा दोनपैकी एकाचीच निवड आपण केली पाहिजे.
जुन्या कराराच्या काळांत इस्त्राएलचे लोक अहरोन व लेवी यांच्या घराण्यांतील लोकांकडे ते लोक श्रेष्ठ आहेत असं समजून पहात असत. पण नव्या कराराच्या दिवसांत जर कोणी असा प्रश्न विचारला की कोण श्रेष्ठ आहे, येशू कीं अहरोनाच्या घराण्यांतील याजक, तर आपण येशूच श्रेष्ठ आहे, असं उत्तर देऊ यांत शंकाच नाही. लोकांना हे माहित असूनसुद्धां विश्वासानें चालणारे खूप कमी आहेत.
बायबल आपल्याला ह्रा प्रश्नाचें रोखठोक उत्तर देते. ज्या वंशातल्या कोणींहि वेदीजवळ काम केलें नव्हतें अशा निराळ्या वंशातल्या येशूनें स्वर्गीय याजकपण घेतले. "कारण याजकपण बदललें म्हणजे नियमशास्त्रहि अवश्य बदलतें."
देवानें मोशेच्या द्वारें आज्ञा आणि 613 नियम असलेले नियमशास्त्र इस्त्राएली लोकांना देऊन त्यांना त्याचे आज्ञापालन करण्यास सांगितले होते. आणि लोकांनी पण त्याप्रमाणे वागण्याची संमति देवाला दिली होती.
 
देवानें पहिला करार बाजूला ठेवून
दुसरा कां प्रस्थापित केला?
कारण पहिल्या कराराप्रमाणे जगण्यासाठीं
मनुष्य फार कमजोर होता.
 
बायबलमध्ये लिहिले आहे कीं मोशेने जी पांच पुस्तके लिहिलेली आहेत त्यांत देवाच्या आज्ञा आहेत आणि इस्त्राएलचे लोक आज्ञापालनाची शपथ घेत असत. ती पांच पुस्तके म्हणजे उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना व अनुवाद ही आहेत देवानें इस्त्राएली लोकांना प्रत्येक आज्ञा सांगितली होती तेव्हां प्रत्येकवेळी त्यांनी न अडखळता "होय" असं म्हटले होते.
पण नंतर आपण पहातो की अनुवाद नंतर यहोशवाच्या काळानंतर इस्त्राएलचे लोक देवाच्या आज्ञांचे पालन करिनासे झाले. आणि शास्ते पासून 1 राजे व 2 राजे या ठिकाणी आपण पहातो कीं इस्त्राएली लोक त्यांच्या राज्यकत्र्यांना जुमानिसें झाले आणि त्यानंतर ते इतके भ्रष्टाचारी झाले कीं त्यांनी पवित्र दर्शनमंडपातील अर्पणपद्धती बदलून टाकली होती.
आणि शेवटी मलाखीमध्ये दोषहीन पशु अर्पण करण्यासंबंधी देवानें इस्त्राएली लोकांना सक्त ताकीद दिलेली असतांना सुद्धां ते देवाला व्यंग असलेले पशू अर्पण करू लागले. ते लोक याजकाला म्हणत, "कृपया याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचा स्वीकार कर." देवाच्या आज्ञेनुसार अर्पणे करण्याऐवजी ते मन मानेल तसं वागू लागले.
जुन्या कराराच्या काळांत इस्त्राएलच्या लोकांनी देवाचे नियमशास्त्र संपूर्णपणे एकदाहि पाळले नव्हते. अर्पणपद्धतींत दिसून येणा­या तारणकार्याकडे दुर्लक्ष करून त्याबद्दल ते साफ विसरून गेले होते. म्हणूनच देवाला अर्पणपद्धत बदलावी लागली. यिर्मया मध्ये देवानें म्हटलें, "इस्त्राएलाचें घराणें व यहूदाचें घराणें यांच्याबरोबर मी नवा करार करीन."
यिर्मया 31:31-34 मध्ये म्हटलें आहे, "परमेश्वर, म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत कीं त्यांत इस्त्राएलाचें घराणें व यहूदाचें घराणें यांच्याबरोबर मी नवा करार करीन; परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांस मिसर देशातून बाहेर आणिलें, तेव्हांच्या कराराप्रमाणें हा करार व्हावयाचा नाहीं; मी त्यांजबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्त्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हाः मीं आपलें धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामीं ठेवीन; मी तें त्यांच्या ह्मदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढें कोणी आपल्या शेजा­यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहींत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढें स्मरणार नाहीं."
देवानें म्हटले होते की तो नवा करार करील. त्यानें इस्त्राएलच्या लोकांबरोबर आधीच करार केला होता पण देवाच्या वचनाप्रमाणे जगण्यांत ते असफल झाले होते. म्हणूनच देवानें त्याच्या लोकांबरोबर तारणाचा नवा करार करायचा असं ठरवले.
त्यांनी देवासमोर शपथ घेतली होती, "आम्ही तुझ्या शब्दांचे व आज्ञांचे पालन करून फक्त तुझीच उपासना करू." देवानें त्यांना सांगितले होते, "माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत," आणि इस्त्राएलचे लोक म्हणाले होते, "आम्ही अन्य देवांची उपासना कधीच करणार नाही. तूंच आमचा देव आहेस. आम्हांला दुसरा कोणी देव असू शकणार नाही." पण त्यांनी त्यांची शपथ पाळली नाही.
नियमशास्त्राचा गाभा म्हणजे दहा आज्ञा होय. "माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत. आपल्यासाठीं कोरीव मूर्ति करूं नको; कशाचीहि प्रतिमा करू नको. त्यांच्या पायां पडू नको किंवा त्यांची सेवा करूं नको. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. तुझा देव परमेश्वर ह्राचें नांव व्यर्थ घेऊं नको. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. खून करूं नको. व्यभिचार करूं नको. चोरी करूं नको. आपल्या शेजा­याविरुद्ध खोटी साक्ष देऊं नको. आपल्या शेजा­याच्या घराचा लोभ धरूं नको." (निर्गम 20)
इस्त्राएली लोकांनी देवाच्या आज्ञांचे पालन त्यांच्या आयुष्यांत नेहमीच करावे म्हणून त्या आज्ञांची 613 नियमांत विभागणी केली गेली होती. "कन्यांबरोबर, पुत्रांबरोबर कसे वागू नये, सावत्रआईबरोबर कसे वागले पाहिजे..." देवाने त्यांना चांगले वागण्यास आणि कोणतीहि वाईट गोष्ट न करण्यास सांगितले होते. अशा प्रकारें देवानें त्यांना दहा आज्ञा आणि 613 नियम असलेले नियमशास्त्र दिले होते.
तरीपण संपूर्ण मानवजातीमध्ये असा एकहि माणूस नाही की जो देवाचे सर्व नियम पाळू शकतो. म्हणूनच त्यांना पापमुक्त करण्यासाठीं देवाला दुसरा मार्ग काढावा लागला.
याजकपण केव्हां बदलले गेले? येशू जेव्हां ह्रा जगांत आला त्यावेळी याजकपण बदलले. अहरोनाच्या घराण्यातील याजकांपासून त्यांचे याजकपण येशूनें स्वतःकडे घेतले. लेवीच्या घराण्यांतील याजक लोक दर्शनमंडपांत अर्पणें करीत ते काम बाजूला करून येशूने स्वतःच स्वर्गीय प्रमुख याजकपण केले.
अहरोनाच्या घराण्यांत जन्म न घेता येशू यहूदाच्या म्हणजे राजाच्या घराण्यांत जन्माला आला होता. बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील रक्त याच्या द्वारे स्वतःचे अर्पण करून येशूनें मानवजातीचें तारण केले.
स्वतःला अर्पण करून त्यानें आपल्या पापांची समस्या सोडवली. स्वतःचा बाप्तिस्मा व रक्त या अर्पणाच्या द्वारें त्यानें मानवजातीची सर्व पापें धुतली. सर्व पापांसाठी त्यानें एकदाच सार्वकालिक अर्पण केले होते.
 
 
याजकपण बदलले तेव्हांच नियमशास्त्र पण बदलले
 
तारणाचा बदललेला नियम
काय आहे?
येशूचें एकच सार्वकालिक
अर्पण.
 
प्रिय मित्रांनो, जुन्या करारातील याजकपण नव्या करारांत बदलले होते. जुन्या कराराच्या काळांत अहरोनाच्या घराण्यातील व लेवीच्या घराण्यांतील प्रमुख याजक, इस्त्राएली लोकांच्या गतवर्षाच्या पापांसाठी प्रायश्चित्ताचें अर्पण करीत असत. अर्पण केलेल्या पशूचे रक्त घेऊन प्रमुख याजक दयासनासमोर जाई. त्या परमपवित्रस्थानांत, पडद्याच्या पलिकडे फक्त प्रमुख याजक जाऊ शकत असे.
पण येशू आल्यानंतर अहरोनाचें याजकपण येशूकडे दिले गेले. येशूनें सार्वकालिक याजकपण स्वतःकडे घेतले. संपूर्ण मानवजातीचें तारण व्हावें म्हणून येशूनें स्वतःला अर्पण करून सार्वकालिक याजकपण केले.
जुन्या कराराच्या काळांत प्रमुख याजकाला सुद्धां लोकांसाठीं याजकपण करण्याआधी गो­ह्राच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून स्वतःच्या पापांचें प्रायश्चित्त करावे लागत असे. स्वतःचे दोन्ही हात अर्पणाच्या डोक्यावर ठेवून त्याच्या माथीं पापें ठेवतांना तो म्हणे, "परमेश्वरा, मी पाप केले आहे." पशूचा वध केल्यानंतर त्याचें रक्त दयासनावर सात वेळा शिंपडले जाई.
जर प्रमुख याजक अहरोन, पूर्णपणे नीतिमान नव्हता तर बाकीचे लोक किती पापी असतील याची तुम्ही कल्पना करा. लेवीच्या घराण्यांतील प्रमुख याजक अहरोन स्वतःच पापी होता म्हणूनच त्याला स्वतःच्या व स्वतःच्या घराण्यातील लोकांच्या पापांचें प्रायश्चित्त म्हणून गो­हा अर्पण करावा लागे.
यिर्मयाच्या पुस्तकांत अध्याय 31 मध्ये देवानें म्हटले, "मी तुमच्याबरोबर जो करार केला होता, तो तुम्ही पाळला नाही म्हणून मी तो मोडणार आहे. म्हणूनच जो करार तुम्हांला पवित्र करू शकत नाही तो बाजूला करून मी तुम्हांला तुमचे तारण व्हावे म्हणून नवा करार देईन. माझ्या आज्ञांपासून मी तुमचे तारण करणार नाही. पण मी तुम्हांला पाणी आणि आत्म्याच्या सुवार्तेद्वारे तारणाची देणगी देईन".
देवानें आपल्याला नवा करार दिला. जेव्हां योग्य समय आला तेव्हां येशू मनुष्याच्या रूपानें ह्रा जगांत आला होता. जगाची पापें हरण करून, खांबावर रक्त ओतण्यासाठीं त्यानें स्वतःला अर्पण केले यासाठीं की जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचे तारण व्हावे. स्वतःच्या बाप्तिस्म्याच्या द्वारें त्याने संपूर्ण मानवजातीची पापें हरण केली होती.
देवाचें नियमशास्त्र बाजूला ठेवले गेले आणि त्या जागी नवे आले. इस्त्राएलचे लोक जर देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे वागले असते तर त्याचें तारण होऊ शकले असते पण तसं करण्यांत ते असफल ठरले. "कारण नियमशास्त्राच्या द्वारें पापाची जाणीव होते." (रोमकरांस पत्र 3:20).
आपण पापी आहोत आणि नियमशास्त्र कांही आपले तारण करू शकणार नाही असं इस्त्राएली लोकांनी समजून घ्यावे अशी देवाची इच्छा होती. देवाने त्यांचे तारण त्यांच्या क्रिया किंवा कर्मांनी केले नाही तर ते पाणी व आत्म्याच्या तारणाच्या नियमाद्वारे केले. त्याच्या अमर्याद प्रेमातून देवानें आपल्याला नवा करार दिला की त्यामुळे येशूच्या बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्राच्या द्वारें जगातील सर्व पापांपासून मुक्त होऊन आपले तारण होऊ शकेल.
येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त ह्राचा खरा अर्थ समजून न घेता तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुमचा विश्वास वाया जातो. तुम्ही जर तसं केले तर येशूवर विश्वास न ठेवण्याच्या काळांत जसे अस्वस्थ होता त्याच्यापेक्षां तुम्ही जास्त अस्वस्थ होऊन जाल.
देवानें म्हटलें कीं मानवजातीला पापांपासून वाचवण्यासाठीं त्याला नवा करार करावा लागला. त्यामुळे केवळ आपल्याच कामांनी नव्हे तर देवाच्या नीतिमत्त्वाच्या तारणाच्या नियमाद्वारें म्हणजेच पाणी व रक्ताद्वारें आपले तारण झाले.
देवानें आपल्याला सार्वकालिक वचन दिले होते आणि येशूवर विश्वास ठेवणा­यांची तो त्या वचनाची परिपूर्णता करतो. त्यानेच आपल्याला येशूच्या थोरवीबद्दल सांगितले होते. जुन्या करारातील अहरोनाच्या घराण्यांतील याजकांपेक्षां येशू किती श्रेष्ठ आहे ते त्यानेच सांगितले.
पाणी व येशूच्या रक्ताद्वारें होणा­या तारणावर विश्वास ठेवल्यामुळे आपण विशेष किंवा स्पेशल होतो. कृपया याबद्दल तुम्ही काळजीपूर्वक विचार करा. तुमचा पाळक कितीहि शिकलेला असो किंवा उत्तम वक्ता असो, येशूपेक्षां तो श्रेष्ठ कसा काय होऊ शकेल? ते शक्यच नाही. पाणी व रक्ताच्या सुवार्तेद्वारेच आपले तारण होऊ शकते, देवाचें नियमशास्त्र पाळण्याने नव्हे. याजकपण बदलले गेल्यामुळे तारणाचा नियम सुद्धां बदलला गेला.
 
 
देवाच्या प्रीतीचें श्रेष्ठत्त्व
 
देवाची प्रीति आणि देवाचे
नियमशास्त्र ह्रांत श्रेष्ठ काय आहे?
देवाची प्रीति.
 
आपण जर येशूवर विश्वास ठेवला तरच आपले तारण होऊ शकते. देवानें आपल्यावर केवढी मोठी प्रीति केली आहे आणि येशूनें आपले कसे तारण केले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. देवाच्या नियमशास्त्रावर विश्वास ठेवणे व देवाच्या अमाप प्रेमावर विश्वास ठेवणे ह्रांत मग काय फरक आहे?
कायदेकानू लोक देवाच्या वचनाऐवजी स्वतःच्या शास्त्रलेखांना आणि स्वानुभवांना जास्त महत्त्व देतात. पाणी व आत्म्याद्वारे किती महान तारणकार्याची पूर्णता झाली या विश्वासांतून येशूच्या ठायी खरा आणि पूर्ण आध्यात्मिक विश्वास बळकट होतो.
आजसुद्धां पुष्कळ लोक म्हणतात की त्यांची फक्त पूर्वीची पापें माफ केली गेलेली आहेत म्हणूनच रोजच्या पापांबद्दल त्यांना रोज पश्चात्ताप करावा लागतो. पुष्कळ लोक असा विश्वास ठेवून जुन्या करारातील आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करून त्यांचें जीवन जगतात. पाणी व आत्म्याद्वारे येशूनें केलेल्या तारणकार्याच्या श्रेष्ठत्त्वाबद्दल त्यांना अजूनहि ज्ञान नाही.
जुन्या कराराच्या काळांत इस्त्राएली लोकांना त्यांचे तारण व्हावे म्हणून देवाचे नियमशास्त्र पाळावे लागत होते पण त्यांचें तारण होऊ शकत नव्हते. कारण आपण अशक्त आणि अपूर्ण आहोत आणि देवाला ते समजते. म्हणूनच त्यानें त्याच्या आज्ञा बाजूला ठेवल्या. आपण आपल्याच कार्यांनी पापमुक्त कधीच होऊ शकत नाही. येशूनें म्हटले होते कीं तो पाणी व आत्म्याच्या सुवार्तेद्वारें आपले तारण करील. त्याने म्हटलें, "मी स्वतः तुम्हांला तुमच्या सर्व पापांपासून मुक्त करीन." उत्पत्ति मध्ये देवानें असा संदेश दिला होता, "तूं व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्परवैर स्थापीन; ती तुझें डोके फोडील व तू तिची टांच फोडिशील." (उत्पत्ति 3:15).
आदाम आणि हवेनें पाप केल्यानंतर, देवापासून त्यांचे पाप लपवण्यासाठीं त्यांनी स्वतःसाठीं अंजिराचीं पानें शिवून कटिवेष्टनें केलीं. देवानें त्यांना बोलवून तारणाचे प्रतिक असलेली चर्मवस्त्रें त्यांस घातलीं. उत्पत्तिमध्ये तारणाच्या दोन प्रकारच्या वस्त्रांबद्दल सांगितले आहे. एक वस्त्र अंजिराच्या पानांपासून बनवले होते तर दुसरे चर्मवस्त्र होते. ह्रांतील कोणते वस्त्र चांगले आहे असं तुम्हांला वाटते? अर्थातच चर्मवस्त्र चांगले आहे कारण त्यांत मनुष्याला संरक्षण देण्यासाठीं एखाद्या पशूनें त्याचे जीवन अर्पण केलेले असते.
अंजिराच्या पानांची वस्त्रे लवकर सुकून जातात. ह्रा झाडाच्या पानाचा आकार हाताच्या पांच बोटांप्रमाणे दिसतो हे तुम्हांला माहितच आहे. म्हणजेच अंजिराच्या पानांची वस्त्रे परिधान करणे याचा अर्थ स्वतःची पापें सत्कृत्याच्या पाठीमागे लपवण्यासारखे आहे. तुम्ही जर अंजिराच्या पानांची वस्त्रे घालून खाली बसला तर ती पानें लगेच फाटून जातील। मी लहान होतो तेव्हां ऑरोरूट झाडाची पाने काढून त्यापासून मी शिपायाचा पोशाख बनवीत असे. पण मी कितीहि जरी काळजी घेतली तरी तो पोशाख संध्याकाळपर्यंत फाटून जात असे. त्याचप्रमाणे मानवाच्या नाजूक देहाला पवित्रीकरणाचा भाग अशक्य होऊन जातो.
पण पाणी व रक्त; येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त याच्याद्वारे तारण झालेले पापी इतके आहेत की ते सर्व देवाच्या प्रीतीच्या श्रेष्ठत्त्वाची साक्ष देतात. देवाची प्रीति ही त्याच्या नियमशास्त्रापेक्षां केव्हाहि श्रेष्ठ आहे.
 
 
देवाच्या नियमशास्त्रावर अजूनहि विश्वास ठेवणारे लोक
 
नियम पाळणारे लोक स्वकर्मांनी
दररोज नवी वस्त्रे कां बनवतात?
त्यांच्या स्वकर्मांनी ते कांही नीतिमान बनू शकणार
नाहीत हे त्यांना समजत नाही.
 
अंजिराच्या पानांची वस्त्रें परिधान करणारे लोक त्यांचें जीवन, नियमाचे पालन करण्यांत घालवतात. अशा प्रकारच्या दिशाभूल झालेल्या विश्वासू मंडळींना त्यांची वस्त्रें नियमितपणे बदलावी लागतात. जेव्हां ते चर्चला जातात तेव्हां प्रत्येक रविवारी त्यांना त्यांची वस्त्रें बदलावी लागतात. "हे देवा, गेल्या आठवडट्यांत मी खूप पाप केले. पण हे देवा, माझा विश्वास आहे की वधस्तंभावर तूं माझे तारण केलेस. कृपाकरून तूं माझी पापें वधस्तंभावरील रक्ताने धुऊन टाक." नंतर तिथल्या तिथेच एक नवा पोशाख शिवून ते घालतात. "परमेश्वराची स्तुति असो. हालेलूया!"
पण घरी गेल्यावर त्यांना लवकरच नवा पोशाख किंवा ड्रेस बनवावा लागलो. कां बरे? कारण त्यांचा जुना ड्रेस फाटून गेलेला असतो. "हे देवा, मी गेले तीन दिवस परत पापे केलेली आहेत. कृपा करून तूं मला क्षमा कर." पश्चात्तापाची नवी वस्त्रे ती अशा प्रकारे परत परत बनवून घालीत असतात.
सुरुवातीला त्यांची वस्त्रे जास्त काळ टिकतात पण नंतर ती फाटून गेल्यामुळे त्यांना पुन्हां दररोज नव्या वस्त्रांची जरूर भासते. देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे ते राहू शकत नाहीत म्हणून त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते. "अरेरे, हे खूपच लाजिरवाणे आहे, मी परत पाप केले!" आणि त्यांना पुन्हां त्यांच्यासाठीं पश्चात्तापाची नवी वस्त्रें बनवावी लागतात. "देवा, आज मला अंजिराच्या पानांची वस्त्रे करणे खूप कठीण वाटत आहे." नवा पोशाख करण्यासाठीं ते अशा प्रकारे खूप परिश्रम करतात.
देवाकडे हे लोक प्रार्थना करतात त्या प्रार्थना त्यांची पापें कबूल करण्यासाठीच केलेल्या असतात. स्वतःचेच ओठ चावून ते देवाला हांक मारतात, "देफ़्वा!" आणि अशा प्रकारे रोज नवी वस्त्रे बनवण्याचा त्यांचा धंदा ते चालूच ठेवतात. पण जेव्हां ह्रा व्यापापायीं ते थकून जातात तेव्हां ते काय करतात?
वर्षांतून एकदा किंवा दोनदा पर्वतावर जाऊन ते प्रार्थना करतात. आणि खूप प्रयत्न करून स्वतःसाठी जास्त दिवस टिकणारी मजबूत वस्त्रें बनवतात. "हे देवा, कृपा करून माझी पापें तूं धुऊन टाक आणि मला नव्यासारखे कर. परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे". त्यांना वाटते कीं रात्री प्रार्थना करणे जास्त चांगले आहे. म्हणूनच ते लोक दिवसा विसावा घेऊन काळोख पडला की स्वतःची सर्व शक्ति एकवटून झाडांवर लोंबकळतात किंवा काळोख्या गुहेंत जाऊन देवाकडे रडत प्रार्थना करतात, "देवा, तुझ्यावर मी विश्वास ठेवतो!" "♪माझ्या ह्मदयांत भग्न मन भरले आह♪े". जोरजोरांत ओरडून ते प्रार्थना करतात आणि म्हणतात, "माझा विश्वास आहे." अशा प्रकारे ते स्वतःसाठी खास वस्त्रे बनवतात ती अर्थातच जास्त काळ टिकत नाहीत.
पर्वतांवर अशा प्रार्थना करून ते खाली येतात तेव्हां ते कसे जोमदार दिसतात! थंडगार, टवटवीत वा­याच्या झुळूकीप्रमाणे आणि फुलांझाडांवर पडणा­या पावसाच्या शीतल वर्षावाप्रमाणें त्यांची अंतःकरणें परमेश्वराच्या कृपेने व शांतीने भरलेली असतात! स्वतःची नवी वस्त्रें धारण करून, पर्वतावर आपण पवित्र झालो आहोत अशा समाधानांत खाली येऊन ते जगाला सामोरे जातात.
पण घरी आणि चर्चला जाऊन नित्यजीवनास त्यांनी सुरुवात केली की त्यांची वस्त्रें घाणेरडी होऊन फाटायला लागतात.
त्यांचे मित्र त्यांना विचारतात, `काय, एवढे दिवस तूं कोठे होतास?"
"थोडा काळ मी जरा बाहेरगांवी गेलो होतो."
"तुझें वजन थोडे कमी झाल्यासारखे दिसते!"
"होय, ती एक वेगळीच गोष्ट आहे."
उपास केला होता असं ते दुस­यांना कधीच सांगत नाहीत. चर्चला जाऊन ते प्रार्थना करतात, "मी इतर स्त्रियांकडे व्यभिचारी नजरेने पहाणार नाही. मी कधी खोटं बोलणार नाही. मी शेजा­याच्या घराचा लोभ धरणार नाही. मी सर्व लोकांवर प्रेम करीन."
पण ज्या क्षणीं ते अंगाने भरलेल्या, सडपातळ लांब पाय असलेल्या सुंदर स्त्रीला पहातात त्या क्षणीं त्यांच्या ह्मदयांतील पवित्रतेचे अभिलाषेंत रूपांतर होते. "तिने किती तोकडा स्कर्ट घातला आहे! हल्ली स्कर्टस् जास्त तोकडे होत चालले आहेत! तिचे पाय मला पुन्हां बघायला मिळाले पाहिजे! अरे! नको! हे देवा मी पुन्हां पाप केले!"
नियमशास्त्र काटेकोरपणे पाळणारे लोक बाहेरून फार धार्मिक दिसतात पण त्यांना रोज रोज नवी वस्त्रें बनवावी लागतात हे तुम्ही लक्षांत घ्या. नियमाप्रमाणे वागणे किंवा कायदापालन करणे म्हणजे अंजिराच्या पानांवर विश्वास ठेवण्यासारखे आहे आणि हा विश्वास चुकीचा आहे. देवाचें नियमशास्त्र पाळून अतिधार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न खूप लोक करतात. हे लोक पर्वतांवर स्वतःच्या फुफ्फसांना ताण देऊन ओरडण्याचा इतका सराव करतात की नंतर नंतर त्यांचा आवाज खूप धार्मिक आहे असं वाटायला लागते.
कायदापालन करणारे हे लोक चर्चच्या सभांमध्ये खूप भारदस्त दिसत असतात. "स्वर्गातील पवित्र पित्या! आम्ही गेल्या आठवडट्यांत पाप केले होते. कृपा करून तूं आम्हांला क्षमा कर...." असं बोलून ते रडायला लागतात तेव्हां बाकीचे सभासद सुद्धां त्याला साथ देऊन त्यांच्या रडगाण्याचा सूर काढतात. ते सभासद स्वतःशी विचार करून मनांत म्हणतात, "ह्राने पर्वतावर उपासतापास व प्रार्थना करून खूप वेळ खर्च केलेला आहे. हा किती धार्मिक व विश्वासू वाटतो!" पण त्या माणसाचा विश्वास, नियमांवर आधारित असल्यामुळे प्रार्थना संपायच्या आंतच अशा माणसाची छाती पापांनी व गर्वाने फुगून गेलेली असते.
लोक जेव्हां स्वतःसाठी अंजिराच्या पानांची वस्त्रे बनवतात तेव्हां ती फारतर दोन तीन महिने टिकून रहाण्याची शक्यता आहे. पण कधी ना कधीतरी त्यांची वस्त्रे मळकी होतात आणि त्यांना त्यांचें ढोंगी जीवन चालू ठेवण्यासाठीं पुन्हां नवी वस्त्रें बनवावी लागतात. नियमशास्त्र पाळले तर आपले तारण होईल असं समजणा­यांचे आयुष्य हे असं असते. त्यांना नेहमीच अंजिराच्या पानांची वस्त्रे करावी लागतात.
नियमशास्त्र पाळणारे लोक अंजिराच्या पानावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, "तुम्ही सर्वांनी मागच्या आठवडट्यांत पाप केलेले आहे, नाही का? तर मग आता पश्चात्ताप करा."
ते तुमच्यावर जोरांत ओरडून म्हणतात, "पश्चात्ताप करा! प्रार्थना करा!"
धार्मिक, पवित्र आवाज कसा काढायचा हे त्या लोकांना छान माहित असते.
" परमेश्वरा, मला दुःख होत आहे कीं मी तुझ्या आज्ञांचे पालन केले नाही. तुझे नियमशास्त्र पाळले नाही. मला क्षमा कर. कृपा करून तूं परत एकदाच माफ कर"
नियमशास्त्र पाळण्यासाठी ते लोक कितीहि जरी पराक्रम गाजवीत असले तरी त्यांचे जीवन ते नियमशास्त्राप्रमाणे जगूच शकत नाहीत. खरं म्हणजे ते नियमशास्त्राला आणि देवाला सुद्धां आव्हानच देत असतात. असे ताठ मानेचे लोक देवासमोर गर्विष्ठ ठरतात.
 
 
चुदाल बे सारखे असलेले लोक
 
देवानें नियमशास्त्र बाजूला कां ठेवले?
कारण ते आपले तारण करण्यासाठीं फ्
उपयोगी नव्हते.
 
पूर्वी एकदा चुदाल बे नांवाचा एक तरुण माणूस होता. 1950 सालच्या कोरियन लढाईच्या दिवसांत, कम्युनिस्ट शिपाई, चूदाल बे ह्राचा धार्मिक विश्वास डळमळीत करून त्याला कम्युनिस्ट बनवण्याच्या हेतूने त्याच्याकडे आले आणि शब्बाथ दिवशीं त्याला अंगण झाडण्यास सांगितले. पण ह्रा तरुण माणसाने त्यांची आज्ञा मानली नाही. त्यांनी जबरदस्ती केली तरी त्या तरुणानें पुन्हां नकार दिला.
शेवटी त्यांनीं त्या तरुण माणसाला झाडाशी बांधून त्याच्यावर बंदूक रोखून विचारले, "तुला काय आवडेल, अंगण झाडायला की मरायला?" त्यांनी निर्णयासाठीं जबरदस्ती केली तेव्हां तो म्हणाला, "पवित्र शब्बाथ दिवशी काम करण्याऐवजी मी मरणे पसंत करीन."
"तूं तुझा निर्णय घेतलेलाच आहेस तर तो पार पाडण्यांत आम्हांला आनंद वाटेल."
असं म्हणून त्यांनी त्या तरुणाला ताबडतोब बंदुकीच्या गोळ्यांनी मारून टाकले. नंतर चर्चच्या वडील मंडळींनी त्या तरुणाच्या अढळ विश्वासाची तारीफ करून त्याला मरणोत्तर डीकनचा सन्मान दिला.
अशी जबरदस्त इच्छा असलेल्या तरुण माणसाचा विश्वास दिशाभूल केला गेलेला होता. अंगण झाडून त्या शिपायांना तो सुवार्ता कां सांगू शकला नाही? इतका हट्टीपणा करून त्यानें स्वतःवर मरण कां ओढवले? शब्बाथ दिवशी त्यानें काम केले नाही याबद्दल देव त्याची प्रशंसा करील का? नाही.
आपण धार्मिक जीवन जगले पाहिजे पण देवासमोर आपल्या कर्मांऐवजी, विश्वास जास्त महत्त्वाचा आहे. चर्चच्या वडील मंडळींना चुदाल बे सारख्या लोकांचा गौरव करायला खूप आवडते कारण त्यामुळें त्यांना त्यांच्या शाखेचा कर्मठपणा व श्रेष्ठत्त्व दाखवण्याची संधी मिळते. हे वागणे येशूला आव्हान देणा­या ढोंगी परूश्यांसारखेच आहे.
कायदे किंवा नियम पाळणा­या लोकांपासून आपण कांहीच शिकू शकत नाही. आपण आध्यात्मिक विश्वासासंबंधी ज्ञान मिळवले पाहिजे. येशूला बाप्तिस्मा कां घ्यावा लागला आणि वधस्तंभावर त्याला रक्त कां ओतावे लागले या सारख्या प्रश्नांचा विचार करून पाणी व आत्म्याची सुवार्ता म्हणजे काय याबाबतीत चौकस बुद्धीने अध्ययन केले पाहिजे.
प्रथम चौकसबुद्धीने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचे काम आपण केले पाहिजे त्यानंतर जगांतील लोकांना नव्याने जन्म घेता येणे शक्य व्हावे यासाठी आपण जगभर सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. आध्यात्मिक कार्य करण्यांत आपण आपला वेळ खर्च करायला हवा.
जर एखादा पाळक तुम्हांला सांगत असेल, "तरुण माणूस चुदाल बे सारखे तुम्ही बना. शब्बाथ दिवस पवित्र ठेवा," त्याचा अर्थ तुम्ही दर रविवारी चर्चला यावे म्हणून तो पाळक प्रयत्न करीत आहे असा होतो.
येथे आणखी एक गोष्ट मी सांगतो. एक स्त्री होती तिला दर रविवारी चर्चला जाण्यासाठीं पुष्कळ संकटांतून जावे लागत असे. तिचे सासूसासरे ख्रिस्ती नव्हते. तिने चर्चला जाऊ नये म्हणून ते खूप प्रयत्न करीत. रविवारी तिला ते काम करण्यास सांगत. म्हणून मग ती शनिवारी रात्रीं चंद्रप्रकाशांत शेतावर काम करू लागली त्यामुळे तिच्या चर्चला जाण्यांत अडथळा आणण्याचे त्यांना कांही कारणच उरले नाही.
अर्थात चर्चला जाणे महत्त्वाचे आहे. पण दररविवारी चर्चला जाऊन आपण किती धार्मिक आहोत याचे प्रदर्शन करणे योग्य आहे का? खरे विश्वासू पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले असतात. जेव्हां एखाद्या मनुष्याचा नव्यानें जन्म होतो तेव्हांच त्याच्या ठायीं ख­या विश्वासू जीवनास प्रारंभ होतो.
देवाच्या नियमशास्त्राचे पालन करून तुमचे तारण होऊ शकते का? नाही. नियमशास्त्रातील सर्व नियम पाळणे हे मानवी शक्तीच्या, कुवतीच्या पलिकडचे काम आहे म्हणूनच नियमशास्त्राकडे लक्ष देऊ नका असं मी कांही सांगत नाही.
याकोबाचें पत्र 2:10 ह्रांत म्हटलें आहे, "कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयीं चुकतो तो सर्वाविषयीं दोषी होतो." पाणी व आत्म्याच्या सुवार्तेने नव्याने जन्म कसा घेता येईल याचा विचार तुम्ही प्रथम करा. ज्या ठिकाणी सुवार्ता ऐकायला मिळेल अशा चर्चला तुम्ही जा. नव्यानें जन्म घेतल्यानंतर तुम्ही विश्वासू जीवन जगू शकता आणि प्रभूचें बोलावणे येईल तेव्हां तुम्ही आनंदाने त्याच्यासमोर जाऊ शकता.
खोटट्या चर्चला जाऊन तुम्ही तुमचा वेळ खर्चू नका, भलत्या ठिकाणी दानार्पणें देऊन तुमचें पैसे वाया घालवू नका. खोटे धर्मगुरू तुमचे नरकांत जाणे टाळू शकत नाहीत. प्रथम तुम्ही पाणी व आत्म्याची सुवार्ता ऐका आणि नव्यानें जन्म घ्या.
येशू ह्रा जगांत कां आला होता याचा तुम्ही विचार करा. नियमशास्त्राप्रमाणे जगून स्वर्गाच्या राज्यांत आपल्याला जाता आले असते तर येशूला ह्रा जगांत यावे लागले नसते. तो आल्यानंतर याजकपण बदलले. कायदे पालन करणे हे भूतकाळांत जमा झाले. आपले तारण होण्याआधी आपल्याला वाटायचे की नियमशास्त्राचे पालन करण्याने आपले तारण होऊ शकते. पण ख­या विश्वासाचे ते चिन्ह नाही.
येशूने त्याच्या अमर्याद प्रीतीने; बाप्तिस्म्याच्या पाण्याने, त्याच्या रक्तानें आणि आत्म्याने जगांतील सर्व पापांपासून आपल्याला मुक्त केले. यार्देन नदीतील बाप्तिस्मा, वधस्तंभावरील त्याचें रक्त आणि त्याचें पुनरुत्थान याच्या द्वारें त्याने आपल्या तारणाची पूर्णता केली.
आधीचें नियम कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे देवानें ते बाजूला ठेवले. "कारण नियमशास्त्रानें कशाचीहि पूर्णता केली नाहीं, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातों, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे; आणि ज्याअर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 7:19-20). येशूने शपथ घेतली आणि त्याचा बाप्तिस्मा व रक्त याच्याद्वारे आपल्याला सर्व पापांपासून मुक्त केले. कायद्याच्या रस्त्याने जाऊन पत्करलेले हौतात्म्य म्हणजे निष्फळ मृत्यु ठरतो. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवणे हाच खरा विश्वास ठरतो.
आपला विश्वास फलित असला पाहिजे. तुमच्या जीवासाठी कोणत्या प्रकारचा विश्वास चांगला आहे असं तुम्हांला वाटते? चर्चला नियमित जाऊन नियम शास्त्र पाळणे चांगले आहे की ज्या ठिकाणीं पाणी व आत्म्याची नव्यानें जन्म घेण्याची सुवार्ता सांगितली जाते अशा चर्चला जाणे चांगले आहे? कोणते चर्च व कोणता पाळक तुमच्यासाठीं चांगला आहे? याबद्दल विचार करून तुमच्याजीवासाठी चांगले काय याचा निर्णय तुम्हीच घ्या.
ज्या पाळकाला पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचे शब्द माहित आहेत त्याच्याद्वारें देव तुमचा जीव वाचवतो. प्रत्येकानें स्वतःच्या जीवाची जबाबदारी घेतली पाहिजे. जो स्वतःच्या जीवाची भिस्त देवाच्या शब्दांवर ठेवतो तो शहाणा व विश्वासू असतो.
 
 
येशू शपथेनें याजक झाला होता
 
लेवीच्या घराण्यातील वंशज शपथेने
याजक झाले होते का?
नाही. फक्त येशूला शपथेने
याजक केले गेले.
 
इब्राी लोकांस पत्र 7:20-21 मध्ये म्हटलें आहे; "आणि ज्याअर्थी येशू शपथेवांचून याजक झाला नाही, (ते तर शपथेवांचून याजक झालेले आहेत; पण ज्यानें त्याच्याविषयीं `तूं युगानुयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वरानें वाहिली आणि ती तो बदलणार नाहीं,` असें सांगितलें त्याच्या त्या शपथेनें हा याजक झालाफ्".
स्तोत्रसंहिता 110:4 मध्ये म्हटले आहे, "परमेश्वरानें शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाहीं; ती अशी कीं, मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणें तूं युगानुयुग याजक आहेस." प्रभूने शपथ घेतली. त्याने आपल्याबरोबर जो करार केला तो त्याच्या लिहिलेल्या वचनाद्वारे दाखवला. "मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणें मी युगानुयुग याजक असणार. मलकीसदेक नीतिमत्त्वाचा राजा आहे. तो शांतीचा राजा आहे आणि तो युगानुयुग याजक आहे. तुमच्या तारणासाठीं मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे मी युगानुयुग प्रमुख याजक आहे."
येशू ह्रा जगांत आला आणि तो चांगल्या कराराचा जामीन झाला. (इब्राी लोकांस पत्र 7:22) गो­हा आणि बक­याच्या रक्ताऐवजी त्यानें बाप्तिस्मा व वधस्तंभावरील रक्त याच्याद्वारें स्वतःला अर्पण करून आपली पापें धुतली.
जुन्या कराराच्या काळांत प्रमुख याजक मेल्यानंतर त्याचा मुलगा 30 वर्षाचा झाल्यावर याजकपण करीत असे. तो वयोवृद्ध झाल्यानंतर त्याचें याजकपण तो त्याच्या 30 वर्ष वयाच्या मुलाकडे सोपवीत असे.
प्रमुख याजकांचे वंशज खूप झाल्यामुळे दाविदाने त्यांची विभागणी केली होती आणि ते त्यांच्या वर्गाच्या अनुक्रमानें याजकाचे काम करीत. अहरोनाच्या घराण्यांतील सर्व वंशजांना याजक म्हणून नेमलेले होते. म्हणूनच त्यांना याजकपणाचा अधिकार होता. लूकने म्हटलें, "अबीयाच्या वर्गातील जख­या नांवाचा कोणी एक याजक आपल्या वर्गाच्या अनुक्रमानें देवापुढें आपलें याजकाचे काम करीत असतां..."
येशू ह्रा जगांत आला आणि त्यानें युगानुयुगचे याजकपण स्वतःकडे घेतले. पुढे होणा­या चांगल्या गोष्टींसाठी तो याजक म्हणून आला होता. पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या तारणाची त्यानें पूर्णता केली.
अहरोनाचे वंशच देहाने दुर्बल व अपूर्ण होते. प्रमुख याजक मेल्यानंतर काय होत असे? त्याचा मुलगा याजकपण करीत असे. पण त्यांनी केलेली अर्पणे तारणाचे आश्वासन देऊ शकत नव्हती. मानवजातीच्या द्वारे असणारा विश्वास खरा आणि पूर्ण विश्वास होऊ शकत नाही.
नव्या कराराच्या काळांत येशू आला होता. पण त्याला नेहमी अर्पणे करण्याची जरूर नाही कारण तो युगानुयुग आहे त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें त्यानें आपली पापें कायमची नेली. त्याने स्वतःला अर्पण केले आणि तो खांबावर मरण पावला यासाठीं की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांनी संपूर्णपणे पापमुक्त व्हावे.
आता तो जिवंत आहे आणि देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला असून तो आपल्या वतीने देवाला सांगत आहे, "हे पित्या, ते अजूनहि अपूर्ण असतील, पण ते माझ्यावर विश्वास ठेवतात. मी खूप वर्षापूर्वी त्यांची पापें नेली नव्हती का?" येशू आपल्या तारणाचा युगानुयुग प्रमुख याजक आहे.
ऐहिक याजक कधीच पूर्ण नव्हते. ते मेले की त्यांचे मुलगे याजकपण करीत. प्रभु युगानुयुग आहे. ह्रा जगांत येऊन, बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन; वधस्तंभावर रक्त ओतून त्याने आपल्यासाठी सार्वकालिक तारणाची पूर्णता केली.
"तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 10:18) येशू आपल्या तारणाची साक्ष देत आहे. पाणी व आत्म्यापासून तुमचा जन्म नव्याने झाला आहे का?
"असाच प्रमुख याजक आपल्याला असणें योग्य होतें; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यांत आलेला आहे." (इब्राी लोकांस पत्र 7:26).
"नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमितें; पण नियमशास्त्रानंतरचें शपथ वाहून उच्चारिलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमिते." (इब्राी लोकांस पत्र 7:28).
मला तुम्हांला हे सांगयची इच्छा आहे कीं निर्दोष येशू ख्रिस्ताने त्याचा बाप्तिस्मा व खांबावरील त्याचे रक्त याच्या द्वारें आपली पापें एकदाच धुतली. त्यानें नियमशास्त्र पाळण्याच्या कर्माच्या नियमाने नव्हे तर आपली सर्व पापें स्वतःकडे घेऊन त्या पापांचा कायमसाठी न्याय करून आपले तारण केले.
सार्वकालिक तारणाद्वारे येशूने आपल्याला सर्व पापांपासून मुक्त केले ह्रावर तुमचा विश्वास आहे का? जर तुमचा तसा विश्वास असेल तर तुमचे तारण झालेच असं समजा. पण तसा विश्वास नसेल तर तुम्हांला येशूच्या सार्वकालिक तारणासंबंधी पुष्कळ कांही शिकले पाहिजे.
बायबलवर आधारित असलेल्या पाणी व आत्म्याच्या सुवार्तेपासूनच खरा विश्वास येतो. सार्वकालिक स्वर्गीय प्रमुख याजक येशू ख्रिस्त, त्याच्या बाप्तिस्म्याच्या आणि वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारें आपला सार्वकालिक तारणकर्ता बनला.
 
 
आपण आपला विश्वास पूर्णपणे ओळखून घेतला पाहिजे
 
येशूच्या ठायीं विश्वास असणे म्हणजे काय?
येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचा मुत्यु ह्रावर
विश्वास ठेवणे म्हणजेच येशूच्या ठायीं
विश्वास असणे होय.
 
येशूवर योग्य मार्गाने विश्वास ठेवून आपण सरळ मार्गाने विश्वास कसा अनुसरू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आपण ते कसं काय करू शकतो? येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे वधस्तंभावरील रक्त याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवण्याने ते शक्य होते.
आपल्या स्वतःच्याच भलत्या-सलत्या कल्पनांची भर न घालता; येशूचे कार्य, त्याचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्राच्यावर विश्वास ठेवणे हाच खरा व योग्य विश्वास आहे, हे खर आहे असं तुम्हाला वाटते का? तुमची आध्यात्मिक स्थिति कशी काय आहे? तुम्ही तुमच्याच सत्कर्मांवर व प्रयत्नांवर अवलंबून आहात का?
येशूवर मी विश्वास ठेवू लागलो होतो तेव्हांपासून ते आतापर्यंत फार जास्त काळ गेलेला नाही. पण मी नियमशास्त्र पाळण्यावर जास्त भर दिला होता त्यामुळे मला 10 वर्षे त्रास सहन करावा लागला होता. नंतर नंतर मला त्या प्रकारच्या आयुष्याचा कंटाळा येऊ लागला होता. मला त्या काळची आठवण सुद्धां नकोशी वाटते. माझी बायको येथे बसलेली आहे. आम्ही दोघांनी किती भयंकर त्रास सहन केला हे तिलाच माहित आहे.
रविवारी मी तिला म्हणत असे, "हनी, आजचा दिवस आपण मजेंत घालवूया"
"पण आज रविवार आहे !"
रविवारी ती कपडे धुण्याचे पण काम करीत नसे. एका रविवारी माझी पॅन्ट फाटली तेव्हां तिने मला सोमवारपर्यंत वाट पहाण्यास सांगितले होते. खर म्हणजे शब्बाथ दिवस काटेकोरपणे पाळण्याचा हट्ट माझाच असे. पण ते फार कठीण वाटे. आम्ही कोणत्याहि रविवारी विसावा घेतला नव्हता कारण शब्बाथ दिवसाचे योग्य रीतीने पालन करणे आम्हांला जमत नव्हते. मला अजूनहि त्या दिवसांची आठवण येते.
प्रिय मित्रहो, तुम्हांला येशूच्या ठायीं असलेला खरा विश्वास पाहिजे असेल तर तुम्ही येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे खांबावरील रक्त याच्या द्वारें आपल्या पापांची क्षमा झालेली आहे असा विश्वास धरला पाहिजे. येशूचें मानवी व ईश्वरी व्यक्तिमत्त्व समजून घेऊन त्याने या जगांत केलेल्या सर्व कार्यावर आपण विश्वास ठेवणे हाच खरा विश्वास आहे. खरा विश्वासू मनुष्य येशूच्या सर्व शब्दांवर विश्वास ठेवतो.
"येशूच्या ठायीं विश्वास ठेवणे" याचा अर्थ काय होतो? येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवणे, हाच त्याचा अर्थ होतो. ह्रांत खूप खोलपर्यंत साधेपणा सामावलेला आहे. बायबल उघडून त्यांतील सुवार्तेवर विश्वास ठेवणे हे एकच काम आपल्याला करण्याचे बाकी आहे. आपण सर्वांनी योग्य प्रकारें विश्वास ठेवला पाहिजे.
"परमेश्वरा, मी तुझें आभार मानतो. तारणकार्य माझ्या सत्कर्मामुळे झालेले नाही हे मला आता दिसून आले आहे! कारण नियमशास्त्राच्या द्वारें पापांची जाणीव होते. (रोमकरांस पत्र 3:20). मला आता हे समजत आहे. नियमशास्त्र चांगले आहे. त्यांत देवाच्या आज्ञा आहेत. त्याचे पालन करून रहाण्याचा प्रयत्न करून जीवन जगले पाहिजे, असा विचार मी केला होता. मी आतापर्यंत तसा प्रयत्न करीत होतो. पण आता मला समजले कीं देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे मी वागू शकतो हा माझा विचार चुकीचा आहे. देवाचें नियम मी कधीच पाळू शकत नाही हे मला आता दिसून आले आहे! देवाच्या नियमशास्त्राद्वारे मला आता माझ्या अंतःकरणातील वाईट विचारांची व अपराधांची जाणीव झाली आहे. आता मला समजते कीं आपल्याला पापांची जाणीव व्हावी म्हणूनच नियमशास्त्र दिलेले होते. "प्रभो, मी तुझा खूप आभारी आहे. मी तुझ्या इच्छेसंबंधी गैरसमज केला आणि नियमशास्त्राप्रमाणे वागण्यासाठीं खडतर कष्ट करीत राहिलो. माझं हे वागणे गर्विष्टपणाचे होते आणि मला त्याबद्दल पश्चात्ताप होत आहे. येशूने माझ्या तारणासाठी बाप्तिस्मा घेतला आणि खांबावर रक्त ओतले हे मला आता समजले आहे! माझा विश्वास आहे!"
शुद्ध व मोकळ्या मनाने तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही फक्त बायबलमध्ये लिहिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवायला हवा संपूर्णपणे नव्यानें जन्म घेण्याचा हा एकच रस्ता आहे.
येशूच्या ठायीं विश्वास असणे म्हणजे काय? हे असं कांही आहे काय कीं कांही काळानंतर आपण ते पुरे करायचे आहे? आपला विश्वास म्हणजे धर्म आहे काय कीं त्यासाठीं तुम्ही काम केले पाहिजे? लोकांनी देव बनवलेले आहेत आणि त्या देवांना अनुरूप असें धर्म बनवले आहेत. धर्म ही एक अशी कृति आहे कीं तिच्याद्वारें माणसातील चांगुलपणा जागृत करण्याच्या उद्देशाने ते लोक काम करीत राहतात.
तर मग विश्वास काय आहे? देव आहे असा विश्वास करून त्याच्याकडे वरती पहाणे, असा त्याचा अर्थ आहे. येशूकडे उध्र्वनजरेने पाहून त्याच्या तारणाच्या आशीर्वादाबद्दल आपण त्याचे आभार मानतो. हा खरा विश्वास आहे. विश्वास आणि धर्म याच्यांत असा फरक आहे. ह्रा दोहोंतील फरक तुमच्या एकदा लक्षांत आला कीं विश्वासासंबंधीच्या ज्ञानाबद्दल तुम्हांला 100 टक्के मार्कस् मिळतात.
येशूवर विश्वास ठेवा आणि धार्मिक जीवन जगा असं नव्यानें जन्म न घेतलेले धर्मगुरू म्हणतात. केवळ धार्मिक जीवन जगून माणूस विश्वासू असू शकतो का? अर्थातच आपण चांगले वागले पाहिजे. ज्यांचा जन्म नव्यानें झालेला आहे त्यांच्यापेक्षां चांगले धार्मिक जीवन कोण बर जगते?
पण प्रश्न हा आहे की ते धर्मगुरू पापी लोकांना प्रवचनें देतात. प्रत्येक पापी माणसाच्या अंतःकरणांत 12 प्रकारची पापें असतात. तो माणूस धार्मिक जीवन कस काय जगू शकेल? धार्मिक जीवन जगण्याचा निर्णय तो पापी मनुष्य त्याच्या मनाने घेऊ शकतो पण त्याचे ह्मदय त्याला साथ देऊ शकत नाही. एकदा चर्चमधून बाहेर पडले की पापी मनुष्याला धार्मिक जीवन म्हणजे ठेवणीतल्या विषयासारखे होते आणि त्याचे अंतर्याम त्याला पाप करण्यास प्रवृत्त करते.
म्हणूनच नियमशास्त्राप्रमाणे जीवन जगायला पाहिजे किंवा स्वर्गाच्या राज्याचा युगानुयुगाचा प्रमुख याजक येशू ह्राच्या बाप्तिस्म्यावर आणि खांबावरील त्याच्या रक्तावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे हा निर्णय आपणच आपल्या ह्मदयांत घेतला पाहिजे.
विश्वास ठेवणा­यांसाठी येशू हाच खरा प्रमुख याजक आहे हे लक्षांत ठेवा. येशूचा बाप्तिस्मा व त्याचें खांबावरील रक्त ह्रा ख­या तारणकार्यावर विश्वास ठेवून आपण सर्वजण पापमुक्त व्हायला हवे.
 
 
नव्यानें जन्म घेतलेल्यांना जगाच्या शेवटाची भीति वाटत नाही
 
नव्यानें जन्म घेतलेल्यांना जगाच्या
शेवटाची भीति कां वाटत नाही?
पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवरील त्यांचा विश्वास
त्यांना पापमुक्त करतो म्हणूनच त्यांना
भीति वाटत नाही.
 
तुमचा जन्म नव्यानें झालेला असेल तर जगाचा शेवट होण्याची भीति बाळगण्याचे तुम्हांला कांही कारणच नाही. कोरियामधले खूप ख्रिस्ती लोकांनी ठामपणे सांगितले होते कीं 28 आक्टोबर 1992 रोजी जगाचा शेवट होईल. तो दिवस किती खळबळजनक आणि भयंकर असेल असंहि ते म्हणाले होते. पण त्यांचं बोलणं खोटं ठरले. नव्यानें जन्म झालेले लोक नेटके धार्मिक जीवन जगून शेवटच्या मिनिटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करतात. जगाचा शेवट होण्याच्या काळापर्यंत आपल्याला पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे एवढे एकच काम करायचे आहे.
जेव्हां वर येईल तेव्हां त्याची नवरी म्हणजे पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेतलेले, त्याला भेटून हर्षाने म्हणतील, "अखेर तू आलास. माझा देह अपूर्ण आहे पण माझ्यावर प्रीति करून तूं मला पापमुक्त केलेस. माझ्या ह्मदयांत आता पाप नाही. प्रभो, तूच माझा तारणकर्ता आहेस! मी तुझा खूप आभारी आहे."
सर्व नीतिमान लोकांसाठी येशू हा आध्यात्मिक वर आहे. वर नवरीवर प्रीति करतो म्हणूनच लग्न होणार आहे, नवरी करते म्हणून नव्हे. मला माहित आहे कीं जगांत असं घडते. पण स्वर्गांत लग्नाचे ठरवणारा वर आहे. येशू त्याची प्रीति व त्यानें देऊ केलेले तारण ह्रावर आधारित लग्न करण्याचा निर्णय घेतो मग नवरी कोणीहि असो. स्वर्गांत लग्न अशाप्रकारे जमते.
वराला त्याच्या नवरीबद्दल संपूर्ण माहिती असते. त्याच्या जिवलग नव­या इतक्या पापी होत्या कीं त्याला त्यांची दया आली म्हणून बाप्तिस्मा घेऊन आणि खांबावर रक्त ओतून त्यानें त्यांना पापमुक्त केले.
अहरोनाचा वंशज म्हणून कांही प्रभु येशू ह्रा जगांत आला नव्हता. ऐहिक अर्पण करण्यासाठीं. कांही तो ह्रा जगांत आला नव्हता. हे काम करण्यासाठी पुष्कळ लेवी आणि अहरोनाचे पुष्कळ वंशज होते.
खर म्हणजे जुन्या करारात अर्पणामध्ये मुख्य भूमिका येशूची होती. म्हणूनच जगामध्ये ख­याचे आगमन झाले तेव्हां त्या ख­याच्या सावलीचे किंवा छायेचे काय झाले? ती छाया बाजूला ठेवली गेली.
जेव्हां येशू ह्रा जगांत आला होता तेव्हां त्यानें अहरोनाप्रमाणे कधीच अर्पण केले नव्हते. बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे पापी लोकांचे तारण व्हावे म्हणून येशूने संपूर्ण मानवजातीसाठी स्वतःला अर्पण केले. त्यानें वधस्तंभावरती तारणाची पूर्णता केली.
येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवणा­यांचे तारण होतेच होते. आपल्या पापांची क्षमा येशूने कोणत्याहि अस्पष्ट मार्गाने न करता स्पष्ट मार्गाने केलेली आहे. "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे." (योहान 14:6) येशूने ह्रा जगांत येऊन त्याचा बाप्तिस्मा, त्याचा मृत्यु आणि त्याचे पुनरुत्थान याच्या द्वारें आपले तारण केले.
 
 
जुना करार हा येशूचा आदर्श आहे
  
दुसरा करार प्रस्थापित करण्याचे
काय कारण होते?
कारण पहिला करार दुर्बल व
निरुपयोगी झाला होता.
 
जुना करार हा नव्या कराराची छाया आहे. जुन्या करारातील प्रमुख याजकांप्रमाणे येशूने जरी अर्पणे केली नव्हती तरी त्यानें त्यांच्यापेक्षां चांगले याजकपण केले, ते म्हणजेच सार्वकालिक स्वर्गीय याजकपण होय. ह्रा जगांतील लोक जन्मतःच पापी असतात आणि नंतर ते पापीच होतात आणि देवाच्या नियमशास्त्राद्वारे सुद्धां ते नीतिमान बनू शकत नव्हते. म्हणूनच देवानें दुस­या कराराची स्थापना केली.
आपल्या स्वर्गातील पित्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला ह्रा जगांत पाठवले होते आणि त्याच्या बदलांत त्यानें आपल्याकडून फक्त त्याच्या पुत्राचा बाप्तिस्मा, त्याचे रक्त आणि त्याचे पुनरुत्थान ह्रावरील आपल्या विश्वासाची मागणी केली. हाच देवाचा दुसरा करार आहे. दुस­या कराराला आपल्याकडून पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवरील आपल्या विश्वासाची अपेक्षा आहे.
देव आपल्याकडून कांही आपल्या सत्कर्मांची अपेक्षा करीत नाही. तारण होण्यासाठीं जीवन कसे जगले पाहिजे हे पण तो सांगत नाही. त्याच्या पुत्राच्या द्वारे आपण तारणकार्यावर विश्वास ठेवावा एवढंच त्याचे सांगणे आहे. त्या सर्वांहून अधिक आपण येशूचा बाप्तिस्मा व त्याचे खांबावरील रक्त ह्रावर जास्त विश्वास ठेवावा असं तो म्हणतो. आणि आपण ह्रा सर्वासाठी होय म्हटले पाहिजे.
बायबलमध्ये यहूदाचे घराणे म्हणजे राजघराणे होते असे उल्लेख आहेत. शलमोनापर्यंत इस्त्राएलचे सर्व राजे यहूदाच्या घराण्यांत जन्माला आले होते. राज्याचे दोन भाग झाल्यानंतर सुद्धां यहूदा घराण्यांतील राजे लोकांनी दक्षिणेचे राज्य म्हणून ख्रिस्त पूर्व 586 पर्यंत म्हणजे त्यांच्या राज्याचे पतन होईपर्यंत राज्य केले होते. अशा प्रकार यहूदाचे लोक इस्त्राएलचे लोक म्हणूनच ओळखले जात होते. लेवीच्या घराण्यातील लोक याजक असत. इस्त्राएलच्या प्रत्येक वंशाला स्वतःची कामे असत. देवाने यहूदाच्या वंशाला वचन दिले होते की येशू त्यांच्या घराण्यांतून येईल.
त्यानें यहूदाबरोबर कां करार केला? कारण त्याच्याबरोबर करार करणे म्हणजे सर्व लोकांबरोबर करार करण्यासारखेच होते. येशूनें नव्या कराराची पूर्णता केली होती. आणि तो नवा करार म्हणजे येशूचा बाप्तिस्मा, त्याचा वधस्तंभावरील मृत्यु आणि त्याचे पुनरुत्थान ह्राच्याद्वारें मानवजातीचे झालेले तारण होय.
 
 
मानवजातीची पापें पश्चात्तापाने धुतली जाऊ शकत नाही
 
मनुष्याची पापें पश्चात्तापाने
 धुतली जाऊ शकतात का?
नाही.
 
यिर्मया 17:1 मध्ये असे लिहिलेले आहे कीं प्रत्येक मनुष्याची पापें दोन ठिकाणी लिहिलेली असतात. "यहूदाचें पातक लोखंडी खचरणीनें, हिरकणीच्या टोकानें लिहिलें आहे; त्यांच्या ह्मदयपटावर, त्यांचा वेद्याच्या शृंगांवर खोदिलें आहे."
आपली पापें आपल्या ह्मदयावर लिहिलेली असतात. त्यामुळेच आपण पापी आहोत हे आपल्याला समजते. येशूवर विश्वास ठेवायच्या आधी एखाद्या मनुष्याला माहित नसते की तो पापी आहे. का बरे? ह्राचे कारण त्याच्या ह्मदयांत देवाचें नियमशास्त्र नसते. म्हणूनच येशूवर विश्वास ठेवल्यानंतरच एखाद्याला आपण देवासमोर पापी आहोत अशी जाणीव होते.
कांही लोकांना तर येशूवर विश्वास ठेवून 10 वर्षांनी ते पापी आहेत अशी जाणीव होते. "अरेरे! मी पापी आहे! मला वाटले होते की माझे तारण झालेले आहे पण मी तर अजूनहि पापी आहे!" एक दिवस डोक्यांत प्रकाश पडल्यानंतर मग शेवटी आपल्याला स्वतःचे खरे रूप समजते. ते लोक दहा वर्षे मजेंत होते पण मग एकाएकी त्यांना खर काय ते समजले. तुम्हांला ह्राचे कारण माहित आहे का? देवाच्या नियमशास्त्रामुळें त्यांना त्यांची खरी पापें व अपराध अगदी स्पष्ट दिसतात. अशा प्रकारचा मनुष्य नव्यानें जन्म न घेता सुद्धां येशूवर 10 वर्षे विश्वास ठेवून होता.
पापी मनुष्य त्याची ह्मदयपटांवरील पापें खोडून टाकू शकत नाही म्हणून तो देवासमोर पापीच ठरतो. आपण पापी आहोत हे समजायला कांही लोकांना 5 वर्षे तर कांहींना 10 वर्षे लागतात. कोणाला 30 वर्षे
तर कोणाला 50 वर्षानंतर समजते आणि कांही जणांना तर शेवटपर्यंत सत्य समजत नाही. "प्रिय देवा, एवढे दिवस मला वाटत होते की मी नियमशास्त्राप्रमाणे वागत आहे पण आता मला कळून चुकले की मी रोजच पाप करीत आलो आहे. पौलाने म्हटले होते, "मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हां जगत होतों, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झालें आणि मी मरण पावलों." (रोमकरांस पत्र 7:9). मी ख्रिस्तावर विश्वास ठेवून सुद्धां पापी आहे."
तुमची पापें तुम्हांला देवाच्या शब्दाप्रमाणे जीवन जगू देत नाही. तुमची पापे तुमच्या ह्मदयपटावर लिहिलेली आहेत. कारण देव तुमची पापें तेथे लिहून ठेवतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतांना मान झुकवता त्यावेळी ते पाप उफाळून वर येऊन म्हणते, "आश्चर्य! तूं केलेले ते पाप मीच आहे."
"पण मी 2 वर्षापूर्वी तुझ्यासाठी प्रायश्चित्त केले होते. आता तू मध्येच एकाएकी कशाला येत आहे? तू निघून कां गेला नाहीस?"
"उगीच माझ्यावर चिडू नकोस. मी तुझ्या ह्मदयपटावर ठाण मांडलेले आहे. कांही म्हटले तरी तू पापीच आहेस."
"नाही! नाही!"
म्हणून मग त्या 2 वर्षापूर्वी घडलेल्या पापाबद्दल तो पापी मनुष्य पश्चात्ताप करीत बसतो. "हे देवा, कृपा करून तू मला माफ कर. मी पूर्वी जे पाप केले त्याच्यामुळे मला अजूनहि यातना होत आहे. मी त्या पापांबद्दल पश्चात्ताप केला होता तरी अजूनहि ते पाप मला त्रास देत आहे. मला क्षमा कर कारण मी पाप केलेले आहे."
अशा पश्चात्तापाने ती पापें सोडून जातात का? लोकांची पापें त्यांच्या ह्मदयपटांवर लिहिलेली असतात म्हणूनच ती पाणी व आत्म्याच्या सुवार्तेखेरीज कशानेहि खोडली जाऊ शकत नाही. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेनेच पापांची क्षमा होते. येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवण्याद्वारेच आपले तारण होऊ शकते.
 
 
मी तुमचा तारणकर्ता असणार
 
नव्या कराराबाबतीत आपली प्रतिक्रिया
कशी असली पाहिजे?
त्याच्यावर पूर्ण ह्मदयानें विश्वास ठेवून आपण जगभर
सर्वत्र नव्या कराराचा प्रचार
केला पाहिजे.
 
स्वर्गातील आपल्या प्रभूनें आपल्याबरोबर नवा करार केला होता, "मी तुमचा तारणकर्ता असणार. पाणी व आत्म्याच्या द्वारे मी तुम्हांला संपूर्णपणे पापमुक्त केलेले असेल. माझ्यावर विश्वास ठेवणारे आशीर्वादित असतील."
तुम्ही देवाच्या ह्रा नव्या करारावर विश्वास ठेवता का? देवाच्या करारातील सत्य वचनावर आणि पाणी व रक्ताद्वारे होणा­या तारणकार्यावर विश्वास ठेवण्याने आपले तारण होऊन आपण नव्यानें जन्मू शकतो.
जर एखाद्या डॉक्टरने रोगाचे निदान निट केले नाही तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. डॉक्टरला प्रथम पेशंटची केस काय आहे ते शोधून काढून नंतर त्याला योग्य औषध द्यावे लागते. औषधे अनेक प्रकारची असतात पण नेमके कोणते औषध द्यायला पाहिजे हे त्याला माहित असले पाहिजे. डॉक्टरने तिची/त्याची केस कोणती आहे हे शोधून काढले म्हणजे पेशंटला बरे होण्यासाठी कितीतरी औषधे उपलब्ध असतात. पण चुकीच्या निदानानें चांगल्या औषधांनी सुद्धां पेशंटची तब्येत बिघडू शकते.
तसेच जेव्हां तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हां तुम्ही तुमच्या आत्म्याच्या स्थितीचे निदान देवाचे वचन वापरून केले पाहिजे. देवाच्या वचनावरून तुम्ही तुमच्या आत्म्याची तपासणी केली तर नेमकी त्याची काय अवस्था आहे हे समजू शकते. आत्म्यांचा डॉक्टर त्याच्या सर्व पेशंटना अपवादाशिवाय बरे करू शकतो आणि ते नव्याने जन्मू शकतात.
तुम्ही जर म्हटले, "माझें तारण झालेले आहे कीं नाही हे मला माहित नाही," त्याचा अर्थ असा होतो कीं तुमचे अजून तारण झालेले नाही. जर एखादा पाळक येशूचा खरा शिष्य असेल तर त्याला त्याच्या चर्चच्या लोकांच्या पापांची समस्या सोडवता आली पाहिजे. त्यानंतरच तो त्यांना आध्यात्मिक गोष्टींत मार्गदर्शन करू शकतो. त्याला सुद्धां डॉक्टरसारखेच त्याच्या चर्चच्या लोकांची आध्यात्मिक स्थिती नीट समजली पाहिजे.
जगाची पापें घेऊन जाण्यासाठी येशू ह्रा जगांत आला होता. तो आला, त्यानें बाप्तिस्मा घेतला आणि तो वधस्तंभावर मरण पावला. जेव्हां त्याने सर्व पापांचे प्रायश्चित्त केले तेव्हां तुमची पापें त्याने वगळली होती का? पाणी व आत्म्याची वचने, सर्व विश्वासू लोकांची पापें खोडून टाकतात.
सुवार्ता ही एखाद्या बॉम्बप्रमाणे स्फोटक आहे. उंच इमारतींपासून ते पर्वतांपर्यत ती सर्वाचा स्फोट करते. येशूचे कार्य अगदी असेच आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांची पापें तो पाण्याच्या व आत्म्याच्या सुवार्तेने काढून टाकतो. बायबलमध्ये ह्रा सुवार्तेबद्दल जस कांही सांगितले आहे त्याप्रमाणे आपण तिच्याकडे पाहू.
 
 
जुन्या करारातील डोक्यावर दोन्ही हात ठेवण्याची सुवार्ता
 
जुन्या करारांत डोक्यावर दोन्ही हात
ठेवण्यामध्ये काय उद्देश होता?
पापार्पणाच्या माथीं पापें ठेवून देण्याचा
 उद्देश होता.
 
लेवीय 1:3-4 मध्ये तारणाच्या सुवार्तेचे काय सत्य दडलेले आहे ते आपण पाहू. "गुराढोरांतलें होमार्पण अर्पावयाचें असल्यास त्यानें दोषहीन नर अर्पावा; तो त्यानें दर्शनमंडपाच्या दारापाशीं अर्पावा, म्हणजे परमेश्वारासमोर तो मुनुष्य मान्य होईल. यज्ञपशूच्या डोक्यावर त्यानें आपला हात ठेवावा म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल."
दर्शनमंडपाच्या दारांत परमेश्वरासमोर जिवंत दोषहीन यज्ञपशूच्या डोक्यावर हात ठेवूनच होमार्पण केले पाहिजे असं वरील परिच्छेदावरून आपल्याला समजते.
जुन्या कराराच्या काळांत, पापी मनुष्य त्याच्या एक दिवसाच्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी पापार्पणाच्या डोक्यावर त्याचे हात ठेवीत असे. परमेश्वरासमोर पापार्पणाच्या वध केल्यानंतर त्याचें रक्त याजकाकरवी काढले जात असे. त्यांतील कांही रक्त याजकाच्या हस्ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगावर शिंपडले जाई आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले जात असे. आणि त्यामुळे पापी मनुष्याच्या एक दिवसाच्या पापांची क्षमा केली जाई.
वर्षाच्या पापांसंबंधी लेवीय 16:6-10 मध्ये म्हटलें आहे, "अहरोनानें आपल्यासाठीं पापार्पणाचा गो­हा सादर करून स्वतःसाठीं व स्वतःच्या घराण्यासाठीं अर्पून प्रायश्चित्त करावें. मग त्यानें ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशीं परमेश्वरासमोर उभे करावे. अहरोनानें त्या दोन बक­यांवर चिठट्या टाकाव्या; एक चिठी परमेश्वरासाठीं व दुसरी पाप वाहून नेण्यासाठीं. ज्या बक­यावर परमेश्वराच्या नांवाची चिठी निघेल तो अहरोनानें सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. ज्या बक­यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभें करावें व त्याच्याद्वारें प्रायश्चित्त व्हावें, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठीं रानांत सोडून द्यावा." बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे दुसरा बकरा पापे `वाहून नेण्यासाठीं` होता. सातव्या महिन्यातील दशमीस वर्षाची पापें अशा प्रकारे काढून टाकली जात.
लेवीय 16:21-30 मध्ये लिहिले आहे, "तुमच्यासाठीं हा एक निरंतरचा विधि असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्हीं आपल्या जिवांस दंडन करावें; त्या दिवशीं कोणींहि कसलेंच काम करूं नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्यें राहणारा परदेशीय असो; कारण त्या दिवशीं तुम्हांला शुद्ध करावें म्हणून तुमच्यासाठीं प्रायश्चित्त करण्यांत येईल; परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल."
इस्त्राएलचे लोक वर्षातून एकदां सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चित्त करीत असत. ते कशा प्रकारे करीत असत? पहिलं म्हणजे प्रमुख याजक अहरोन ह्राला ह्रा प्रसंगी हजर रहावे लागत असे. इस्त्राएली लोकांचा प्रतीनिधी कोण होता? अहरोन. देवानें प्रमुख याजकाच्या कामासाठीं अहरोन आणि त्याचें वंशज यांची निवड केली होती.
अहरोन स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठीं प्रायश्चित्त करावे म्हणून गो­हा अर्पण करी. एखाद्या पापी मनुष्याची पापें पापार्पणाच्या माथीं ठेवून, त्या पापी मनुष्याच्या जागीं पापार्पणानें त्याची पापें वाहून नेऊन नंतर मरून जाणे असा अर्थ प्रायश्चित्त करण्याच्या विधीने होत असे. खर म्हणजे पापी मनुष्याने त्याच्या पापांसाठी मेले पाहिजे पण प्रायश्चित्त करण्याने तो त्याची पापें पापार्पणाला देऊ शकत होता यासाठीं की त्याच्याऐवजी पापार्पणाने मरावे.
स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठीं प्रायश्चित्त केल्यानंतर अहरोन एक बकरा परमेश्वरासमोर सादर करीत असे आणि दुस­याला सर्व इस्त्राएल लोकांसमोर रानांत पापें वाहून नेण्यासाठीं सोडून देई.
एक बकरा पापार्पणाचा असे. त्याच्या डोक्यावर हात ठेवून अहरोन म्हणत असे, "हे परमेश्वरा, इस्त्राएलच्या तुझ्या लोकांनी तुझ्या दहा आज्ञा आणि 613 नियम असलेले तुझें नियमशास्त्र यांतील आज्ञांचा व नियमांचा भंग केलेला आहे. इस्त्राएली लोक पापी झालेले आहेत. मी आता या बक­याच्या डोक्यावर माझें दोन्ही हात ठेवून आमची वार्षिक पापें ह्राच्या माथीं ठेवत आहे."
बक­याचा वध केल्यानंतर त्याचें रक्त घेऊन तो दर्शनमंडपांतील परम पवित्रस्थानांत जाई. त्यानंतर ते दयासनावरती आणि दयासनासमोर सात वेळा रक्त शिंपडत असे.
परमपवित्रस्थानाच्या आंत परमेश्वराच्या कराराचा कोश ठेवलेला असे. त्याच्या आच्छादनास दयासन म्हणत असत आणि त्याच्या आंत देवानें दिलेल्या आज्ञांच्या दोन दगडी पाटट्या, मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र आणि कळ्या आलेली अहरोनाची काठी ठेवलेली असे.
अहरोनाची कळ्या आलेल्या काठीतून पुनरुत्थानाचा, दोन दगडी पाटट्या मधून देवाच्या न्यायाचा आणि सुवर्णपात्रांतील मान्ना यातून देवाच्या जीवन वचनाचा अर्थ सूचित होतो.
परमेश्वराच्या कराराचा कोश सोन्यानें मढवलेला असे. दयासनासमोर रक्त सात वेळा शिंपडले जाई. प्रमुख याजकाच्या झग्याच्या काठाला सोन्याचे घुंगरू लावलेले असत त्यामुळे रक्त शिंपडतांना तो जेव्हां चालायचा तेव्हां त्या घुंगरांचा सात वेळा मंजूळ आवाज यायचा.
लेवीय 16:14-15 मध्ये म्हटलें आहे, "मग त्यानें गो­हाचें कांही रक्त घेऊन ते दयासनाच्या पुर्वेकडील बाजूला बोटानें शिंपडावें, आणि कांहीं रक्त दयासनासमोर बोटानें सात वेळां शिंपडावें. मग त्यानें लोकांसाठी आणिलेल्या पापार्पणाच्या बक­याचा वध करावा; त्याचें रक्त अंतरपटाच्या आंत घेऊन जावें आणि जसें त्यानें गो­ह्राच्या रक्ताचें केलें तसेच बक­याच्या रक्ताचें करावें, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावें."
जेव्हां प्रमुख याजक रक्त शिंपडी तेव्हां त्याच्या झग्याला लावलेल्या घुंगरांचा आवाज बाहेर जमलेल्या इस्त्राएली लोकांना ऐकू येत असे. त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त प्रमुख याजकानेंच केले पाहिजे असा नियम होता म्हणूनच घुंगरांचा आवाज ऐकू येणे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा झाली असं ते समजत. हा मंजूळ ध्वनि त्यांना आशीर्वादासारखा वाटे.
घुंगरांचा सात वेळा आवाज झाला की ते म्हणत, "आता मला खूप मोकळे वाटत आहे. सबंध वर्षाच्या पापांमुळे मला फार काळजी वाटत होती, पण आता मला निर्धास्त वाटत आहे." अपराधी मनापासून मुक्त झाल्यामुळे लोक आनंदाने घरी परत जात असत. त्या काळांतील त्या सोन्याच्या घुंगरांचा आवाज, पाणी, व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या हर्षभरित बातमीसारखाचा होता.
जेव्हां आपण पाणी व आत्म्यापासून नव्याने जन्म घेण्याच्या तारणासंबंधीची सुवार्ता ऐकतो, ह्मदयांत विश्वासपूर्वक तिचा स्वीकार करतो आणि आपल्या मुखाने ती कबूल करतो तेव्हां देखील त्या काळच्या सोनेरी घुंगरांच्या ध्वनिश्रवणाच्या हर्षासारखा हर्ष आपल्याला होतो. जेव्हां घुंगरे सात वेळा वाजत तेव्हां देवासमोर इस्त्राएल लोकांची वार्षिक पापें धुतली जात असत.
इस्त्राएली लोकांसाठीं एक बकरा अर्पण केल्यानंतर प्रमुख याजक दुसरा बकरा घेऊन दर्शनमंडपाच्या बाहेर उभे असलेल्या लोकांकडे घेऊन येई. नंतर प्रमुख याजक अहरोन त्याचे दोन्ही हात बक­याच्या डोक्यावर ठेवीत असे.
लेवीय 16:21-22 मध्ये म्हटलें आहे, "अहरोनानें आपले दोन्ही हात त्या जिवंत बक­याच्या डोक्यावर ठेवून इस्त्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्रांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व तीं त्या बक­याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हातीं रानांत पाठवून द्यावें. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशांत वाहून नेईल; त्या मनुष्यानें त्या बक­याला रानांत सोडून द्यावें."
पापें वाहून नेणा­या बक­याच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून प्रमुख याजक अहरोन म्हणत असे, हे परमेश्वरा, इस्त्राएली लोकांनी पापें केलेली आहेत. आम्ही तुझ्या दहा आज्ञांचा आणि 613 नियम असलेल्या नियमशास्त्राचा भंग केलेला आहे. हे देवा, इस्त्राएली लोकांची संपूर्ण वर्षाची पापें मी ह्रा बक­याच्या माथीं सोपवत आहे.
यिर्मया 17:1 यांत म्हटल्याप्रमाणे पापें दोन ठिकाणीं लिहिलेली असतात. एक म्हणजे ब­या वाईट कृत्यांची नोंद असलेल्या पुस्तकांत आणि दुसरे म्हणजे त्यांच्या ह्मदयपटांवर लिहिलेली असतात.
म्हणजेच जर लोकांना त्यांच्या पापांची क्षमा हवी असेल तर त्यांची पापें पुस्तकातून आणि त्यांच्या ह्मदयपटावरून खोडली जायला पाहिजे. प्रायश्चित्ताच्या दिवशी जे दोन बकरे लागत असत, त्यातील एक बकरा न्यायाच्या पुस्तकांतून पापें खोडली जाण्यासाठी तर दुसरा बकरा ह्मदयपटावरील पापें खोडली जाण्यासाठी असे.
 
जुन्या करारांतील अर्पणपद्धतीतून देवाने
इस्त्राएली लोकांना काय दाखवले होते?
हेच की त्यांची सर्व पापें योग्य प्रकारे काढून
टाकण्यासाठी तारणारा येणार आहे.
 
प्रमुख याजकानें त्याकाळीं बक­याच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून इस्त्राएली लोकांना दाखवून दिले होते कीं त्यांची वर्षभराची सर्व पापें खरोखरच त्या बक­याकडे दिली गेली आहेत. सर्व दृष्कर्मांचा व अपराधांचा भार त्याच्या डोक्यावर ठेवून दिल्यानंतर त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हातीं रानांत पाठवले जात असे.
पॅलेस्टाईन हा वाळवंटी प्रदेश आहे. इस्त्राएली लोकांची सर्व पापें स्वतःच्या माथीं घेऊन जाणा­या बक­याला ठराविक मनुष्याकरवी जेथे गवत किंवा पाणी नाही अशा निर्जन रानांत सोडून दिले जात असे. त्याला निर्जन प्रदेशांत सोडून देतांना इस्त्राएली लोक उभे राहून पहात असत.
ते स्वतःशी म्हणत, "त्याच्याऐवजी मी मरणार होतो पण आता बकरा माझ्या पापांपायी मरणार आहे. पापाचे वेतन मरण आहे पण बकरा माझ्याऐवजी मरणार आहे. बक­या, मी तुझे आभार मानतो. तुझे मरण याचा अर्थ मी जगू शकतो." त्या बक­याला दूर वाळवंटांत पाठवून दिल्यानंतर इस्त्राएली लोकांच्या वार्षिक पापांची क्षमा केली जाई.
खूप दूरवर बकरा दिसेनासा झाला की त्याला तेथेच सोडून तो मनुष्य परत येत असे. इस्त्राएली लोकांची वर्षभराची पापें अशा प्रकारे निघून जात. इस्त्राएली लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा व अपराधांचा भार डोक्यावर घेऊन तो बकरा त्या निर्जन वाळवंटात भटकून पाणी किंवा गवताशिवाय मरून जात असे.
पापाचें वेतन मरण आहे आणि देवाचा न्याय अशा प्रकारे पार पाडला जात असे. देवानें बक­याचे अर्पण केले यासाठी की इस्त्राएली लोक जगतील. इस्त्राएली लोकांचे वर्षाचे अपराध अशा प्रकारे धुतले जात असत.
जुन्या कराराच्या काळांत एक दिवसाच्या पापांची आणि एक वर्षाच्या पापांची जशी क्षमा केली जात होती, त्याच धर्तीवर देवाने करार करून आपली पापें एकदाच कायमची धुतलेली आहेत. तो मशिहा पाठवेल आणि तो आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करील असा त्याचा करार होता. येशूच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे त्या कराराचे कार्य पूर्ण झाले होते.
 
 
नव्या करारातील पाण्यापासून आणि आत्म्यापासून नव्यानें जन्म घेणे
 
बाप्तिस्मा करणा­या योहानापासून येशूचा
बाप्तिस्मा कां झाला होता?
जगाची सर्व पापें हरण करून धर्माचरण पूर्ण करण्यासाठी.
नव्या करारातील येशूचा बाप्तिस्मा हा जुन्या करारातील
दोन्ही हात डोक्यावर ठेवण्याच्या
विधीसारखाच आहे.
 
मत्तय 3:13-15 आपण वाचू, "तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हें का? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे, कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे, तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें."
येशू यार्देनेवर गेला आणि बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून त्यानें बाप्तिस्मा घेतला. तसं करून त्यानें धर्माचरणाची पूर्णता केली होती. येशूचा बाप्तिस्मा ज्या योहानाने केला होता तो स्त्रियांपासून जन्मलेल्यांत श्रेष्ठ होता.
मत्तय 11:11-12 मध्ये म्हटलें आहे, "मी तुम्हांस खचित सांगतों कीं, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्यापेक्षां मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यांत जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्या दिवसांपासून तो आतांपर्यत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे तें बळकावीत आहेत."
देवानें बाप्तिस्मा करणा­या योहानाची निवड मानवजातीचा प्रतिनीधी म्हणून करून ख्रिस्ताच्या आधी 6 महिने त्याला पाठवले. तो अहरोनाचा वंशज होता आणि शेवटचा प्रमुख याजक होता.
येशू त्याच्याकडे आला तेव्हां बाप्तिस्मा करणा­या योहानानें म्हटलें, "आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हे काय?"
"आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणाला उचित आहे."
मानवजातीला पापमुक्त करून तिला देवाची मुलें करायचे हाच येशूचा उद्देश होता. येशू योहानाला म्हणाला, "पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याची सुवार्ता आपल्याला पुरी करायची आहे. म्हणूनच तूं मला बाप्तिस्मा दे".
योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला होता. जगाची सर्व पापें घेऊन जाण्यासाठीं येशूने बाप्तिस्मा घेणे उचितच होते. येशूचा उचित प्रकारे बाप्तिस्मा झाला म्हणूनच आपले योग्य पद्धतीने तारण झाले. येशूचा बाप्तिस्मा झाल्यामुळेच आपली पापें त्याच्याकडे देणे शक्य झाले होते.
येशू ह्रा जगांत आला होता आणि त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हां तो 30 वर्षाचा होता. ते त्याचे पहिले कार्य होते. येशूनें जगाची सर्व पापें काढून टाकून धर्माचरण पूर्ण केले आणि अशा प्रकारें सर्व लोकांना पवित्र केले.
येशू ह्रा जगांत आला होता आणि आपण सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठीं त्याचा उचित प्रकारे बाप्तिस्मा झाला होता आणि "ह्रा प्रकारें" धर्माचरणाची पूर्णता झाली होती.
देव म्हणाला, "हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयीं मी संतुष्ट आहे." (मत्तय 3:17). येशू ख्रिस्ताला माहित होते कीं मानवजातीची सर्व पापें घेऊन त्याला वधस्तंभावर त्याच्या रक्ताची किंमत द्यावी लागणार आहे. त्यानें पित्याची इच्छा मानली, आणि म्हटले, "तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." (मत्तय 26:39). मानवजातीची सर्व पापें धुऊन टाकून जगांतील सर्व लोकांचें तारण करायचे हीच पित्याची इच्छा होती.
म्हणूनच आज्ञाधारक पुत्राने, येशूनें पित्याच्या इच्छेचा मान राखून बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून बाप्तिस्मा घेतला होता.
योहान 1:29 मध्ये लिहिले आहे, "दुस­या दिवशीं येशूला आपणाकडे येतांना पाहून तो म्हणाला, हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" येशूनें जगाची पापें स्वतःकडे घेतली. गुलगुथा या ठिकाणीं तो वधस्तंभावर गेला व स्वतःचे रक्त ओतून मरण पावला. "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" बाप्तिस्मा करणा­या योहानानें अशी साक्ष दिली होती.
तुमच्या ठायीं पाप आहे कीं नाही आहे? तुम्ही नीतिमान आहांत कीं पापी आहांत? येशूनें जगाची पापें हरण केली आणि तो आपल्यासाठीं वधस्तंभावर खिळला गेला हे खरे सत्य आहे.
 
जगांतील सर्व पापी लोकांची पापें
येशूकडे कधी दिली गेली होती?
यार्देनेवर बाप्तिस्मा करणा­या योहानाने येशूला
बाप्तिस्मा दिला होता त्यावेळी येशूनें आपली
सर्व पापें घेतली होती.
 
ह्रा जगांत जन्माला आल्यानंतर आपण आपल्या वयाच्या 1 ते 10 वर्षाच्या दरम्यान सुद्धां पाप करीत असतो. येशूने ती पापें हरण केलेली आहेत. आपल्या वयाच्या 11 ते 20 वर्षाच्या दरम्यान सुद्धां आपण पाप करतोच. म्हणजेच मनाने व कृतीने केलेली पापें. येशूनें ती सर्व पापें हरण केली.
वयवर्षे 21 ते 45 च्या दरम्यान पण आपण पाप करतोच आणि येशूने ती सुद्धां हरण केली. त्यानें जगाची सर्व पापें हरण केली आणि त्याला वधस्तंभावर खिळले गेले. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आपण पाप करीत असतो. पण त्यानें ती सर्व हरण केली.
"हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" पहिला पुरुष आदामापासून ते जगांतील शेवटचा पुरुष - तो कधी असेल तेव्हां असेल-यांच्यापर्यंत सर्व पापें येशूनें हरण केली. कोणाची पापे घ्यायची कोणाची नाही असा निर्णय त्याने कधीच घेतला नव्हता.
फक्त थोडट्या जणांवरच प्रेम करायचे असं त्यानें ठरवले नव्हते. तो देहाने ह्रा जगांत आला होता आणि त्यानें जगाची पापें हरण केली आणि त्याला वधस्तंभावर खिळले गेले. आपल्या पापांची शिक्षा त्यानें सहन केली आणि त्यानें जगाची पापें कायमसाठीं काढून टाकली.
त्याच्या तारणकार्यातून कोणालाहि वगळले गेले नव्हते. "जगाची सर्व पापें" ह्रांत आपली पण पापें आहेत. येशूनें ती सर्व पापें हरण केली.
स्वतःचा बाप्तिस्मा व रक्त याच्या द्वारे त्यानें जगाची सर्व पापें धुतली. बाप्तिस्म्याद्वारे त्याने घेतलेल्या पापांचा न्याय वधस्तंभावर केला गेला. मरणापूर्वी येशूने खांबावरती म्हटले होते, "पूर्ण झालें आहे." (योहान 19:30). त्याचा अर्थ मानवजातीचें तारणकार्य पूर्ण झाले होते.
येशूला वधस्तंभावर कां खिळले गेले? कारण शरीराचें जीवन रक्तांत असते. रक्तांत जीव असल्याकारणानें रक्तानेंच प्रायश्चित्त होतें. (लेवीय 17:11) येशूला बाप्तिस्मा कां घ्यावा लागला होता? कारण त्याला जगाची सर्व पापें स्वतःकडे घ्यायची होती.
"ह्रानंतर आतां सर्व पूर्ण झालें आहे हे जाणून येशूनें शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, `मला तहान लागली आहे,` असे म्हटलें." (योहान 19:28). जुन्या करारातील देवाच्या सर्व करारांची पूर्णता यार्देनवरील बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील मृत्यु याच्यामुळे होत आहे हे येशूला त्याच्या मरणाआधी ज्ञात झाले होते.
त्याच्या द्वारें तारणकार्य पूर्ण झाले होते म्हणूनच येशूने म्हटले "पूर्ण झालें आहे." तो खांबावर मरण पावला. त्यानें आपल्याला पवित्र केले, तिस­या दिवशी तो मरणातून उठला, स्वर्गांत गेला आणि आता तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु ह्राच्या द्वारे सर्व पापें धुतली जाणे ही, पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याची आशीर्वादित सुवार्ता आहे. हिच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या सर्व पापांची त्यामुळे क्षमा होईल.
दररोज पश्चात्तापाच्या प्रार्थना करून आपण आपल्या पापांचे प्रायश्चित्त करू शकत नाही. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु या द्वारें तारणकार्य एकदाच, कायमचे झालेले आहे. "तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 10:18).
आता आपण येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभ या द्वारे झालेल्या तारणावर विश्वास ठेवण्याचे एकच काम करायचे आहे. विश्वास ठेवा म्हणजे तुमचे तारण होईल.
रोमकरांस पत्र 5:1-2 मध्ये म्हटलें आहे, "म्हणून आपण विश्वासानें नीतिमान ठरविलेले आहों म्हणून आपणांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारें देवाबरोबर शांति आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहों, त्यांत आपला प्रवेशहि त्याच्या द्वारें विश्वासानें झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतों."
आपण नीतिमान ठरविले जावे यासाठी पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादित सुवार्तेवर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा कोणताहि मार्ग नाही.
 
 
देवाच्या नियमशास्त्राचा उद्देश
 
देवाच्या नियमशास्त्राने आपण
पवित्र होऊ शकतो का?
नाही. आपण पवित्र होऊ शकत नाही. नियमशास्त्र
आपल्याला फक्त आपल्या पापांची जाणीव
देऊ शकते.
 
इब्राी लोकांस पत्र 10:9 मध्ये म्हटलें आहे, "आणि मग तो म्हणाला, पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणें करावयास आलों आहे. ह्रांत दुसरें स्थापण्यासाठीं तो पहिलें नाहींसे करितो." नियमशास्त्राद्वारे आपण पवित्र होऊ शकत नाही. ते फक्त आपल्याला पापी करते. आपण त्याचे पूर्णपणे आज्ञापालन करावे असा कांही देवाचा उद्देश नव्हता.
रोमकरांस पत्र 3:20 मध्ये म्हटलें आहे, "कारण नियमशास्त्राच्या द्वारें पापाची जाणीव होते." अब्रााहामाला देवाचा करार मिळून 430 वर्षे झाल्यानंतर देवानें मोशेच्या द्वारें इस्त्राएली लोकांना नियमशारुा दिले. देवासमोर पाप करणे म्हणजे काय हे त्यांना समजावे म्हणूनच देवानें नियमशास्त्र दिले होते. देवाचें नियमशास्त्र नसते तर लोकांना पापाची जाणीव झाली नसती. आपल्याला पापाची जाणीव व्हावी म्हणूनच देवाने नियमशास्त्र दिले होते.
आपण देवासमोर पापी आहोत हे आपल्याला समजावे एवढाच नियमशास्त्राचा उद्देश आहे. अशी जाणीव झाल्यानंतर आपण पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादित सुवार्तेवर विश्वास ठेवून येशूकडे परत यावे हाच त्याचा अर्थ आहे. देवानें आपल्याला दिलेल्या नियमशास्त्राचा उद्देश हाच आहे.
 
 
प्रभु देवाच्या इच्छेप्रमाणें करावयास आला आहें
 
आपण देवासमोर काय केले पाहिजे?
येशू द्वारे केलेल्या देवाच्या तारणकार्यावर आपण
विश्वास ठेवला पाहिजे.
 
"मी तुझ्या इच्छेप्रमाणें करावयास आलों आहें. ह्रांत दुसरें स्थापण्यासाठीं तो पहिलें नाहींसें करितो." (इब्राी लोकांस पत्र 10:9). नियमशास्त्राने आपण पवित्र होऊ शकत नाही म्हणूनच देवानें नियमशास्त्राच्या द्वारें आपले तारण न करता त्याच्या संपूर्ण तारणकार्यांनें केले. देवानें त्याच्या प्रीतीने व न्यायनीतीने आपले तारण केले.
"त्या इच्छेनें आपण येशू ख्रिस्ताच्या एकदांच झालेल्या देहार्पणाद्वारें पवित्र केलेले आहों. प्रत्येक याजक प्रतिदिवशीं सेवा करीत आणि जे यज्ञ पापें दूर करावयाला कदापि समर्थ नाहींत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे." (इब्राी लोकांस पत्र 10:10-12).
तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे कारण तारण करण्याचे त्याचें जे कार्य होते ते त्यानें पार पाडले आणि आता त्याला आणखी कांही काम करण्याचे उरले नाही. तो पुन्हां कांही बाप्तिस्मा घेणार नाही किंवा आपले तारण होण्यासाठीं पुन्हां स्वतःला अर्पणहि करणार नाही.
आता जगाची सर्व पापें आधीच धुतलेली आहेत म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन देण्याचे काम येशू करत असतो. जे पाणी व आत्म्याच्या तारणकार्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो शिक्काबंद करतो.
येशू ह्रा जगांत आला आणि त्याने जगाची पापे स्वतःकडे घेतली होती. नंतर तो खांबावर मरण पावला. अशा प्रकारे त्यानें स्वतःचे कार्य पूर्ण केले. प्रभूचें कार्य आता पूर्ण झालेले आहे म्हणूनच तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे.
प्रभु येशूने आपल्याला सार्वकालिक पापमुक्ती दिलेली आहे असा विश्वास आपण ठेवला पाहिजे. त्याचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त याच्याद्वारें त्याने आपल्याला कायमचे नीतिमान केलेले आहे.
 
 
जे देवाचें शत्रू होतात
 
देवाचें शत्रू कोण आहेत?
स्वतःच्या ह्मदयांत पाप ठेवून येशूवर
विश्वास ठेवणारे.
 
इब्राी लोकांस पत्र 10:12-14 मध्ये देव म्हणतो, "परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हांपासून आपले वैरी आपलें पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणा­यांना त्यानें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहे." शेवटला न्याय होऊन त्यांच्याबद्दल निर्णय घेईपर्यंत तो वाट पाहिल असं तो म्हणतो.
त्याचें शत्रू अजूनहि त्याला म्हणतात, "देवा, कृपा करून तूं आमच्या पापांची क्षमा कर." सैतान आणि त्याचे चेले, पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास न ठेवता सतत पापांची क्षमा मागत बसतात.
आपला देव त्यांचा न्याय आताच करीत नाही. पण येशू जेव्हां दुस­यांदा येईल तेव्हां त्यांचा न्याय होऊन त्यांना नरकांत जायची शिक्षा होईल. एक दिवस त्यांना पश्चात्ताप होऊन तारणाद्वारे ते नीतिमान होतील या आशेने देव त्या दिवसापर्यंत त्यांना सहन करीत आहे.
आपल्या प्रभु येशूनें आपली सर्व पापें घेतली आणि तो आपल्यासाठी मरण पावला. एक दिवस येशू दुस­यांदा येईल आणि त्याच्यावर विश्वास ठेवणा­यांना तो मुक्त करील. "ये प्रभु येशू, लवकर ये." जे निष्पाप आहेत त्यांना स्वर्गांच्या राज्यांत त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन जगण्यासाठीं तो घेऊन जाणार आहे.
प्रभु परत येईल तेव्हां जे लोक ते पापी आहेत असं म्हणतील त्या लोकांना स्वर्गांत जागा मिळणार नाही. शेवटच्या दिवशीं त्यांचा न्याय होऊन त्यांना नरकाच्या अग्नींत टाकले जाईल. जे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवण्यास नकार देतात त्यांच्यासाठी शिक्षा त्यांची वाफ् पहात आहे.
जे खोटट्यांवर विश्वास ठेवतात त्यांना प्रभु त्याचे शत्रु समजतो. म्हणूनच आपण असत्याविरुद्ध लढाई केली पाहिजे. म्हणूनच आपण पाणी व आत्म्याच्या आशीर्वादित सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे.
 
 
पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे
 
आपली सर्व कर्जे (पापें) पूर्णपणें फेडलेली
असतांना आपण आपल्या पापांचे प्रायश्चित्त
करण्याची जरूर आहे का?
नाही. कांहीही जरूर नाही.
 
इब्राी लोकांस पत्र 10:15-16 मध्ये म्हटलें आहे, "पवित्र आत्माहि आपल्याला साक्ष देतो, कारण हे म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन."
आपली सर्व पापें काढून टाकल्यानंतर देवाने म्हटले, "जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः" तो कोणता करार आहे? "मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन." सुरुवातीला आपण नियमशास्त्राप्रमाणे कायदेशीर जीवन जगण्याचा प्रयत्न केला होता पण नियमशास्त्राद्वारें आपले खरे तारण होऊं शकले नाही.
नंतर मग आपल्याला समजले कीं जे लोक नव्यानें जन्म घेण्याच्या पाणी व आत्म्याच्या आशीर्वादित सुवार्तेवर संपूर्ण ह्मदयाने विश्वास ठेवतात त्यांचे तारण येशूने आधीच केलेले आहे. जो कोणी येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवतो त्याचें तारण होते.
येशू तारणाचा प्रभु आहे. "आणि तारण दुस­या कोणाकडून नाहीं; कारण जेणेकरून आपलें तारण होईल असें दुसरें कोणतेंहि नांव आकाशाखालीं मनुष्यांमध्ये दिलेलें नाहीं." (प्रेषितांचीं कृत्यें 4:12). आपला तारणारा म्हणून येशू ह्रा जगांत आला होता. आपल्याच सत्कर्मांनी आपले तारण होऊ शकत नाही म्हणून येशूनें आपले तारण केले, प्रीति आणि तारणाच्या नियमाने आपले तारण झालेले आहे, असं त्यानें आपल्या ह्मदयपटावर लिहिले.
"आणि त्यांचीं पापें व त्यांचें स्वैराचार मी ह्रापुढें आठवणारच नाहीं. तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 10:17-18).
आता त्याला आपले स्वैराचार आठवत नाही. त्यानें आपली सर्व पापें काढून टाकलेली आहेत त्यामुळे आपल्यामध्ये आता क्षमा व्हावी म्हणून पापेंच उरलेली नाहीत. आपली सर्व कर्जे फेडली गेल्यामुळे फिटण्यासाठी आणखी कांही कर्जच नाही आहे. येशूचे कार्य करतांना, येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे खांबावरील रक्त याच्या विश्वासाद्वारें लोकांचे ठेवण्याचे एकच काम आपंल्याला करायचे आहे. "तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधुमुक्त करील" (योहान 8:32) येशूच्या ठायीं तारणावर विश्वास ठेवा. श्वासोश्वास करण्यापेक्षां तारण करून घेणे सोपे आहे. बायबलमध्ये जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवणे एवढच तुम्हांला करायचे आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे म्हणजेच तारण होणे होय.
येशू हा आपला तारणकर्ता (येशूचा बाप्तिस्मा व त्याचा खांबावरील मृत्यु याच्या द्वारेंफ् आहे असा विश्वास तुम्ही धरा. तुम्ही नुसता विश्वास ठेवला म्हणजे तुमचे तारण झालेच असं समजा. तुमच्या मनच्या विचारांना थारा देऊ नका. फक्त येशूच्या ठायीं असलेल्या तारणावर विश्वास ठेवा. माझी प्रार्थना आहे कीं येशूवर विश्वास ठेवून तुम्ही त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन जगण्यासाठीं सिद्ध रहाल.