(मत्तय 3:13-17)
"तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हें काय? येशूने त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें; तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं, `हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयी मी संतुष्फ् आहे."
बाप्तिस्मा करणाया योहानाचा बाप्तिस्मा
पश्चात्ताप म्हणजे काय?
पापी जीवना कडून परत येणे आणि पवित्र
होण्यासाठीं येशूवर विश्वास ठेवणे.
येशू ह्रा जगांत कां आला होता आणि त्यानें बाप्तिस्मा करणाया योहानाकडून बाप्तिस्मा कां घेतला होता हे जगांत कितीतरी लोकांना माहित नाही. म्हणूनच आपण येशूच्या बाप्तिस्म्याचा उद्देश आणि त्याला बाप्तिस्मा देणारा योहान, याच्यासंबंधी बोलू.
बाप्तिस्मा करणाया योहानानें यार्देनेवर लोकांना बाप्तिस्मा देण्याचे काय कारण होते ह्राचा विचार आपण प्रथम केला पाहिजे. लोकांनी त्यांची पापें कबूल करून देवाकडे परत वळावे यासाठीं बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना बाप्तिस्मा देत होता असं मत्तय 3:1-12 मध्ये सांगितले आहे.
"मी पाण्यानें तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठीं करतो खरा" (11 वे वचन) आणि "अरण्यांत घोषणा करणायाची वाणी झाली कीं परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा" (वचन 3). उंटाच्या केसांचें वस्त्र पांघरणारा आणि टोळ व रानमधाचा आहार घेणारा, बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला सांगत होता.
मोठ¬ाने ओरडून त्यानें लोकांना म्हटले पश्चात्ताप करा, "मानवतेचा तारणारा येत आहे, त्याच्यासाठीं मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा सरळ करा. परराष्ट्रीयांच्या देवांची उपासना करण्याचे सोडून द्या आणि तुमच्या अंतःकरणांत प्रभूला स्वीकारा."
पश्चात्ताप कशासाठी? अन्य देवांची मूर्तिपूजा केल्याबद्दल आणि पापांनी खचून भरलेल्या त्यांच्या आयुष्यांतील दुष्कर्माबद्दल. तर मग आपण काय करायला पाहिजे? पवित्र होण्यासाठी येशूच्या ठायीं आपण बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. बाप्तिस्मा करणाया योहानाने अरण्यांत घोषणा केली, "माझ्याकडून बाप्तिस्मा घ्या. तुमची पापें धुऊन घ्या. तुमचा तारणकर्ता मशिहा ह्रा जगांत येत आहे. तो तुमची पापें जुन्या करारातील अर्पणाच्या कोंकयाप्रमाणे घेऊन तुमची सर्व पापें धुऊन टाकील."
जुन्या करारांत दररोजची पापें अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवण्याद्वारे दिली जात. इस्त्राएल लोकांची वर्षाची पापें, प्रमुख याजक प्रायश्चित्ताच्या दिवशीं बकयाच्या माथीं देत असे. हा प्रायश्चित्ताचा दिवस सातव्या महिन्याच्या दशमीस वर्षातून एकदा असे. (लेवीय 16:29-31).
तशाच प्रकारे मानवजातीची सर्व पापें येशूकडे त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें एकदाच द्यायला हवी होती की ज्यामुळे ती त्याच्याद्वारे संपूर्णतः काढून टाकली जातील. म्हणूनच तुम्ही येशूकडे वळा म्हणजे तो तुम्हांला बाप्तिस्मा देईल असं योहान लोकांना सांगत होता.
बाप्तिस्मा करणाया योहानाचा बाप्तिस्मा; लोकांनी पश्चात्ताप करून नंतर येणाया येशूकडे वळावे यासाठी होता. पश्चात्ताप म्हणजे पापी जीवनाकडून येशूकडे वळणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे यासाठी कीं त्यांच्या पापांची क्षमा व्हावी.
पुढे येणारा माशिहा त्यांची सर्व पापें धुऊन टाकणार आहे ह्रा आशेमुळे इस्त्राएली लोकांचें तारण होऊ शकत होते. तसेच 2000 वर्षापूर्वी स्वर्गांतून पृथ्वीवर येऊन जगाची सर्व पापें धुऊन टाकणाया येशूवर विश्वास ठेवण्यानें आपले तारण झालेले आहे. पण जुन्या करारांतल्या इस्त्राएली लोकांनी देवाचे नियमशास्त्र सोडून दिले होते, ते चुकीची अर्पणे करू लागले होते आणि मशिहाला ते विसरूनच गेले होते.
अशा पार्श्वभूमीवर बाप्तिस्मा करणाया योहानाला लोकांना देवाच्या नियमशास्त्राची व येणाया मशिहाची आठवण करून देण्याची जरूर होती. म्हणूनच त्यानें लोकांना बाप्तिस्मा देण्याच्या कार्यास प्रारंभ केला आणि कांही काळानें यार्देनेवर त्यानें येशूला बाप्तिस्मा दिला.
मूर्तिपूजा केल्याबद्दल आणि देवाच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अनेक लोकांनी पश्चात्ताप करून योहानाकडे येऊन बाप्तिस्मा घेतला. अर्पणापद्धतीत तीन गोष्टी आवश्यक आहेत - जिवंत पशु, डोक्यावर दोन्ही हात ठेवणे आणि पशूचे रक्त. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे जगांतील लोकांचे तारण होणे शक्य होते.
जेव्हां परूशी व सदूकी योहानाकडे बाप्तिस्म्यासाठीं आले तेव्हां त्यांना पाहून योहान मोठ¬ाने म्हणाला, "अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हांला कोणीं सावध केलें? ह्रास्तव पश्चात्तापास योग्य असें फळ द्या; आणि अब्रााहाम आमचा बाप आहे, असें म्हणण्याची कल्पना आपल्या मनांत आणूं नका." (मत्तय 3:7-9)
हे परूशी व सदूकी, मूर्तिपूजा करणारे राजकारणी लोक प्रत्यक्षांत देवाच्या वचनावर विश्वास कधीच ठेवत नव्हते आणि त्यांना वाटायचे कीं ते देवाचे लोक आहेत. त्यांचा विश्वास अन्य देवांवर व स्वतःच्या विचारांवर असे.
बाप्तिस्मा करून घेण्यासाठीं ते जेव्हां योहानाकडे आले तेव्हां त्यांना पाहून तो म्हणाला, "तुम्ही चुकीची अर्पणें करूं नका. पाप करण्याचे सोडून देऊन येणाया मशिहावर खरा विश्वास ठेवा. तो तुमची सर्व पापें धुऊन टाकेल. तुम्ही तुमच्या ह्मदयांत असा विश्वास बाळगला पाहिजे."
पश्चात्ताप करणे म्हणजे चुकीच्या मार्गाकडून परत येणे. खरा पश्चात्ताप म्हणजे अंधश्रद्धा आणि पापाकडून येशूकडे परत येणे. त्याचा अर्थ येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा खांबावर झालेला न्याय ह्रावर विश्वास ठेवणे.
अशा प्रकारे बाप्तिस्मा करणाया योहानानें अरण्यांत ओरडून इस्त्राएली लोकांना देवाकडे परत वळायला सांगितले कारण ते चुकीची अर्पणे करून देवाच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करीत होते. लोकांना येशूकडे परत वळवण्याचे मोठें कार्य बाप्तिस्मा करणाया योहानाने केले होते अशासाठीं की लोकांनी येशूवर विश्वास ठेवून पापमुक्त व्हावे.
येशूच्या बाप्तिस्म्याद्वारें होणाया तारणावर तुमचा विश्वास आहे काय?
सर्व माणसांनी येशूसमोर काय केले पाहिजे?
सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठीं त्यांनी येशूवर
विश्वास ठेवला पाहिजे.
येशूनें त्याच्या कार्याला प्रारंभ करण्याच्या वेळी बाप्तिस्मा करणाया योहानाकडून बाप्तिस्मा घेणे ही पहिली गोष्ट केली. त्याद्वारें येशूकडे जगाची सर्व पापें दिली गेली.
येशूचा बाप्तिस्मा म्हणजे देवाकडून मानवजातीच्या तारणकार्याचा प्रारंभ होता आणि जगाची पापें धुऊन टाकण्याचे येशूचे सत्कृत्य होते. येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें नेली ह्रावर विश्वास ठेवणाया सर्वांना देव पापमुक्त करतो.
जेव्हां येशू ह्रा जगांत आला आणि त्यानें बाप्तिस्मा करणाया योहानाकडून बाप्तिस्मा घेतला तेव्हां स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रारंभ झाला. मत्तय 3:15 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आकाश उघडलें होते, हे द्दश्य जुन्या करारांत लेवीय 1:1-5, 4:27-31 ह्रांत वर्णन केलेल्या प्रायश्चित्ताच्या अर्पणाशी खूप मिळते जुळते होते.
जुन्या करारातील प्रत्येकाला नव्या करारांत जोडीदार आहे. "परमेश्वराच्या ग्रंथांत शोधा वाचा; या प्राण्यांपैकी एकहि कमी असणार नाहीं; कोणी जोडप्यावांचून असणार नाहीं." (यशया 34:16).
जुना आणि नवा करार, हे दोन्ही करार सर्व लोकांच्या पापांच्या प्रायश्चित्तासंबंधी सांगतात
आपल्या रोजच्या पापांसाठी आपण
पश्चात्ताप केला पाहिजे का?
नाही. खरा पश्चात्ताप म्हणजे स्वतःची पापे कबूल करून
स्वतःचे अंतःकरण पापांपासून येशूच्या बाप्तिस्म्याकडे
वळवणे यासाठीं कीं त्यामुळे स्वतःचे
तारण होईल.
जुन्या करारांत रोजच्या पापांसाठी पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवीत त्यामुळें ती पापें पापार्पणा कडे जात असत. पापी मनुष्याऐवजी अर्पणाचा न्याय होऊन त्याचा वध केला जात असे. लोकांची वार्षिक पापें सुद्धां अशीच पापार्पणाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून दिली जात. त्यामुळे लोकांना त्यांच्या एक वर्षाच्या पापांबद्दल क्षमा मिळे.
नव्या करारांत अगदी अशाच पद्धतीनें जगाची पापें घेऊन जाण्यासाठीं यार्देन नदींत येशूचा बाप्तिस्मा झाला होता. जुन्या करारातील देवाच्या संदेशवचनाची अशा प्रकारें पूर्णता झाली.
येशूचा बाप्तिस्मा करणारा योहान, देवाचा सेवक होता, त्याला देवानें येशूच्या 6 महिने आधी पाठवले होते. येशूनें जगाची सर्व पापें घेतली अशी साक्ष देतांना त्यानें योहान 1:29 मध्ये म्हटलें, "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाच कोंकरा!"
यार्देन नदींत येशूला बाप्तिस्मा देऊन योहानानें येशूकडे जगाची सर्व पापें दिली. अशा प्रकारे प्रभुनें मानवजातीच्या सर्व पापांबद्दल प्रायश्चित्त केले. ह्रावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
जगाची सर्व पापें येशूकडे दिली गेली होती. प्रेषितांची कृत्ये 3:19 मध्ये येशूच्या शिष्यांनी म्हटलें, "तुमचीं पापें पुसून टाकलीं जावीं म्हणून पश्चात्ताप करा व वळा, अशासाठीं कीं, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे."
बाप्तिस्मा करणाया योहानानें येशूला बाप्तिस्मा कां दिला होता आणि लोकांनी येशूकडे कां वळले पाहिजे हे आपल्याला समजावे अशीच येशूच्या शिष्यांची इच्छा होती. तो म्हणाला होता, "पश्चात्ताप करा आणि वळा. येशूच्या तारणाच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या सर्व पापांपासून मुक्त व्हा."
मशिहा आला आणि त्यानें बाप्तिस्म्याद्वारे जगाची सर्व पापें एकाचवेळी धुतली. येशूच्या बाप्तिस्म्यामुळे देवाचा करार पूर्ण झाला होता.
मत्तय 3:13-17 मध्ये म्हटलें आहे, "तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असें असतां आपण माझ्याकडे येतां हे काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हे आपणांला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें; तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणावर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयीं मी संतुष्ट आहे."
देवाचें तारणकार्य पूर्ण करण्यासाठीं येशू योहानाकडे बाप्तिस्मा घ्यायला गेला होता. बाप्तिस्मा करणारा योहान देवाचा विशेष सेवक होता. लूकच्या पहिल्या अध्यायांत लिहिले आहे कीं तो प्रमुख याजक अहरोनाचा वंशज होता. अहरोनाचा वंशज योहान ह्राला देवाने निवडले होते कारण धर्माचरण पूर्ण करण्यासाठी देवाला मानवजातीचा प्रतीनिधी हवा होता.
म्हणूनच देवानें योहानाला प्रमुख याजकाच्या घराण्यांत येशूच्या जन्माच्या 6 महिने आधी पाठ्वले होते. बाप्तिस्मा करणाया योहानानें प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठीं अरण्यांत घोषणा करीत म्हटले, "पश्चात्ताप करा, अहो सापाच्या पिलांनो! पश्चात्ताप नाही केला तर तो तुम्हांला झाडाच्या फांदीप्रमाणे कापून अग्नींत टाकून देईल. त्याच्या बाप्तिस्म्यावर आणि त्याच्या रक्तावर विश्वास ठेवा. पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्ही पापमुक्त होऊन जाल."
प्रेषितांचीं कृत्यें 3:19 यांत तारणाच्या सुवार्तेबद्दल स्पष्टपणे सांगितलेले आहे. जेव्हां बाप्तिस्मा करणाया योहानानें लोकांना त्यांच्या पापांबद्दल ओरडून ताकीद दिली होती तेव्हां पुष्कळ लोकांनी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घेतला होता.
योहानानें जगाची सर्व पापें येशूकडे दिल्यामुळे, मानवजातीची सर्व पापें एकाचवेळी पुसली गेली. येशूनें जगाची पापें हरण केली अशी साक्ष बाप्तिस्मा करणाया योहानाने दिली म्हणूनच आपल्याला आता समजते कीं पाणी व रक्ताच्या तारणाच्या सुवार्तेवर विश्वास धरण्याने आपले तारण होऊ शकते.
बाप्तिस्मा करणाया योहानानें येशूच्या आधी येण्याचे कारण
"ह्रा प्रकारें" याचे काय अर्थ आहेत?
(1) सर्वांत योग्य (2) सर्वांत नीट किंवा उचित
(3) फक्त ह्राच मार्गाने
(दुसरा कांही मार्ग नाही)
तारणकत्र्या येशूवर विश्वास ठेवून ज्यांची पापें धुतली गेलेली आहेत ते त्यांच्या तारणाची खात्री मत्तय 3:15-16 मध्ये लिहिलेल्या येशूच्या बाप्तिस्म्याच्या तारणाच्या सुवार्तेने देऊ शकतात. येशूने योहानाकडे येऊन म्हटले, "मला बाप्तिस्मा दे" आणि योहानानें उत्तर दिले, "आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हे काय?"
येशू कोण आहे हे ओळखूनच बाप्तिस्मा करणाया योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला होता. योहान देवाचा सेवक होता आणि त्याला मानवजातीची सर्व पापें येशूकडे देण्यासाठीं पाठवले होते. जुन्या करारातला संदेश पूर्ण करण्यासाठीं येशू तारणकर्ता म्हणून आला होता आणि जगाची सर्व पापें स्वतःच्या माथीं घेण्यासाठी त्यानें योहानाला बाप्तिस्मा घायला सांगितले.
कां बरे? कारण येशू देवाचा पुत्र, सर्वसमर्थ देव, निर्माणकर्ता आणि उद्धारकर्ता आहे. आपली सर्व पापें धुऊन टाकण्यासाठीं तो आला होता. सर्व लोकांना पापमुक्त करण्यासाठीं त्याचा बाप्तिस्मा होणे आवश्यक होते.
"ह्रा प्रकारें" बाप्तिस्मा करणाया योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला आणि आपली पापें धुतली गेली. आपल्याऐवजी त्याचा न्याय खांबावर करण्यांत आला होता. येशूचा बाप्तिस्मा म्हणजे आपल्या तारणाची साक्ष होती. जुन्या करारांत देवानें वचन दिले कीं अर्पणाच्या कोंकयांत सर्व पापें जातील. त्याप्रमाणे देवाचा पुत्र स्वतःच कोंकरा बनला आणि त्यानें सर्व पापें स्वतःकडे घेतली.
म्हणूनच जुन्या करारातले, डोक्यावर दोन्ही हात ठेवणे आणि नव्या करारातला येशूचा बाप्तिस्मा हे दोन्ही पापें देण्यासाठीच होते, आणि जे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात त्यांना तारणाची देणगी व सार्वकालिक जीवन मिळते.
येशूच्या बाप्तिस्म्याने आपली सर्व पापें धुतलेली आहेत
आपण ख्रिस्ताला कसे परिधान करू शकतो?
ख्रिस्तांत बाप्तिस्मा घेऊन.
येशूला जेव्हां बाप्तिस्मा घ्यायचा होता तेव्हां बाप्तिस्मा करणारा योहान त्याला मना करीत म्हणाला "आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा असें असतां आपण माझ्याकडे येतां हें का?"
पण येशूने उत्तर दिलें, "आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." आतां हें होऊं दे असं येशूनें योहानाला सांगितले. "लोकांची सर्व पापें तूं माझ्याकडे दिलीच पाहिजे. त्यामुळें जे पाण्याद्वारे होणाया तारणावर विश्वास ठेवतील ते माझ्याकडे येऊ शकतील. त्यांच्या पापांसाठी माझा न्याय केला जाईल पण माझ्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवल्यामुळे ते पापमुक्त होतील. बाप्तिस्म्याद्वारें तूं जगाची सर्व पापें माझ्या माथीं ठेव यासाठीं कीं जे नंतर येतील ते एकाच वेळी पापमुक्त होतील. म्हणूनच आतां हें होऊं दे."
बाप्तिस्मा करणाया योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो बाप्तिस्मा देवाच्या तारणाच्या नियमशास्त्राप्रमाणे होता. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां त्याच्यकडे सर्व पापें दिली गेल्यामुळे आपण जेव्हां येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतो तेव्हां आपण एकाच वेळी पापमुक्त होऊ शकतो. डोक्यावर हात ठेवण्याद्वारें येशूने आपली सर्व पापें स्वतःकडे घेतली होती, आपल्याऐवजी तो खांबावर मरण पावला आणि आता तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे म्हणूनच पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवण्याने, आपले तारण होऊ शकते.
ज्यानें आपल्याला जगांतील सर्व पापांपासून मुक्त केले तो येशू आहे. येशूनें आपली सर्व पापें स्वतःकडे घेऊन त्या पापांची किंमत त्याच्या रक्तानें खांबावर मोजली ह्राच्यावर विश्वास ठेवून आपले तारण होऊ शकते. येशूचा बाप्तिस्मा म्हणजे तारणाच्या सुवार्तेचा प्रारंभ होता.
पापमुक्त होण्यासाठीं असलेल्या बाप्तिस्म्याचा उल्लेख बायबलमध्ये खूप वेळा केलेला आहे. आणि पौलानें सुद्धां त्याविषयी गलतीकरांस पत्रामध्ये म्हटले आहे की तो ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला
होता कारण त्यानें ख्रिस्तांत बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताला परिधान केले होते. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु या द्वारे होणाया तारणावर असलेल्या त्याच्या विश्वासासंबंधी पौल अनेक ठिकाणी बोललेला आहे.
"आतां हें होऊ दे"
बाप्तिस्मा करणाया योहानाचे
कोणते काम होते?
मानवजातीचा प्रमुख याजक या नात्याने
जगाची सर्व पापें येशूकडे देणे.
येशूने म्हटले होते, "कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." सर्व धर्माचरण म्हणजे त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें सर्व पापें पुसून टाकून, सर्व लोकांची अंतःकरणे निष्पाप करणे होय. "तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें." येशूचा बाप्तिस्मा यार्देन नदींत झाला.
ज्याप्रमाणें प्रमुख याजक बकयाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवत असत, अगदी तसेच बाप्तिस्मा करणाया योहानानें त्याचे दोन्ही हात येशूच्या डोक्यावर ठेवून जगाची सर्व पापें त्याच्या माथीं ठेवली. बाप्तिस्मा करणारा योहान हा प्रमुख याजक होता आणि मानवजातीचा प्रतीनिधी या नात्यानें येशूकडे जगाची सर्व पापें सोपवणे हे त्याचे काम होते. "परमेश्वरा, मी जगाची सर्व पापें तुझा कोंकरा येशू ह्राच्याकडे देत आहे."
बाप्तिस्मा करणाया योहानानें त्याचे दोन्ही हात येशूच्या डोक्यावर ठेवून त्याला पाण्यांत बुडवले आणि येशू जेव्हां पाण्यातून वर आला त्यावेळी त्याने त्याचे हात बाजूला केले होते. येशूचा बाप्तिस्मा तारणासाठीं होता. त्याच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवणाया सर्वांचे अशा प्रकारे येशूनें तारण केलेले आहे.
आकाश उघडलें आणि आकाशांतून वाणी झाली
स्वर्गाचें राज्य कोणत्या वेळी उघडले?
बाप्तिस्मा करणारा योहान ह्राच्या दिवसांपासून
(मत्तय 11:12)
"मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडलें; तेव्हां त्यानें परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशांतून अशी वाणी झाली कीं, `हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्राच्याविषयी मी संतुष्ट आहे`". (मत्तय 3:16-17)
येशूनें बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली तेव्हां आकाश त्याच्यासाठीं उघडलें. हजारो वर्षे आधीच देवाने जो करार केला होता त्या कराराची पूर्णता अशा प्रकारे येशूच्या यार्देनेवरील बाप्तिस्म्याने झाली होती.
अशा प्रकारें येशूने देवाचा कोंकरा म्हणून जगांतीला सर्व लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त केले. जगाची सर्व पापें त्याच्याकडे दिली जाण्याने देवाची इच्छा पुरी केली गेली.
त्याबद्दल योहान 1:29 मध्ये अशी साक्ष दिलेली आहे, "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" देवाचा कोंकरा येशू, ह्राच्याकडे जगाची सर्व पापें दिल्यानंतर, तीन वर्षांनी येशू त्या पापांचें ओझे स्वतःच्या खांद्यावर घेऊन गुलगुथा टेवडीवरील वधस्तंभापर्यंत चालत गेला. बाप्तिस्म्या नंतर त्याने पापें स्वतःकडे घेतल्यानंतर तो ज्या ज्या ठिकाणीं गेला होता त्या त्या ठिकाणी त्याला ज्यांनी विश्वासपूर्वक स्वीकारले त्यांना त्यानें सांगितले होते कीं त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे.
योहान 8:11 मध्ये व्यभिचार करतांना पकडण्यांत आलेल्या स्त्रीला त्यानें म्हटले, "मीहि तुला दंड ठरवीत नाहीं." तो तिला दोषी ठरवू शकला नाही कारण ज्याला दोषी ठरवले जाणार होते त्या येशूनें स्वतःच सर्व पापें स्वतःकडे घेतलेली होती. अशा प्रकारें त्याने लोकांना सांगितले होते की तो पापी लोकांचा तारणकर्ता आहे.
देवाच्या पुत्रानें सर्व पापें काढून टाकल्यामुळें ह्रा जगांतील प्रत्येक विश्वासू व्यक्ती पवित्र होऊ शकते. येशूचा बाप्तिस्मा झाला होता तेव्हां आकाश म्हणजेच स्वर्ग उघडले गेले. स्वर्गाच्या राज्याचे दरवाजे उघडले गेले. जो कोणी येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवतो तो मुक्तपणे ह्रा दारांतून प्रवेश करू शकतो.
येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें स्वतः
कडे घेतल्यानंतर येशूला वधस्तंभावर खिळले होते
येशूनें सैतानाचें डोकें कसे फोडले?
आपल्या सर्व पापांची शिक्षा भोगून मरण पावल्यानंतर
तिसया दिवशी मरणातून पुन्हां उठून.
सर्व पापें येशूच्या माथीं दिली गेल्यामुळे त्यानें वधस्तंभावर खिळले जाण्याची शिक्षा अटळ होती. येशूनें जेव्हां त्याला सामोरे जावे लागणाया कष्टप्रद यातनामय मरणाचा विचार केला तेव्हां तो खिन्न व अति कष्टी झाला. त्याच्या शिष्यांबरोबर गेथशेमाने बागेंत जाऊन तो प्रार्थना करू लागला तेव्हां त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा होऊन तो भूमीवर पडत होता. अत्यंत विव्हळ होऊन येशू म्हणाला, "हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो" (मत्तय 26:39). "मी जगाची सर्व पापें बाप्तिस्म्याद्वारें स्वतःकडे घेतलेली आहेत. शक्यतो हा प्याला माझ्यावरून टळून जावो." पण देवानें उत्तर दिले नाही.
जुन्या करारांत प्रायश्चित्ताच्या दिवशी पापार्पणाचा वध करावाच लागत असे. कारण त्याचा वध झाला तरच त्याचें रक्त प्रमुख याजकाला दयासनासमोर शिंपडता येत असे. त्याचप्रमाणे येशूला वधस्तंभावर खिळले जायचेच होत कारण देवाला त्याखेरीज दुसरा कांही मार्ग नव्हता.
वेदी म्हणजे देवाचा न्याय आहे तर पापार्पणाचें रक्त म्हणजे जीवन आहे. दयासनावर आणि दयासनासमोर सात वेळा रक्त शिंपडणे याचा अर्थ न्याय केला गेला असा होतो. (लेवीय 16:1-22).
पेला टळून जावा यासाठीं येशूनें देवाकडे प्रार्थना केली होती. पण त्याच्या पित्यानें तसे केले नाही आणि शेवटी येशूनें म्हटले, "तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." (मत्तय 26:39).
येशूनें स्वतःची इच्छा सोडून देऊन पित्याच्या इच्छेनुसार केले. का बरे? कारण जगाची सर्व पापें घेतल्यानंतर त्या पापांचा न्याय केला गेला नसता तर तारणकार्य पूर्ण होऊ शकले नसते. त्याला वधस्तंभावर खिळले गेले याचे कारण बाप्तिस्म्याद्वारें त्यानें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतलेली होती. "कारण पापाचें वेतन मरण आहे, पण देवाचें कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे." (रोमकरांस पत्र 6:23).
ज्या करारांत देवानें म्हटले होते कीं तो तारणकत्र्याला ह्रा जगांत पाठवील आणि डोक्यावर हात ठेवण्याने म्हणजेच येशूच्या बाप्तिस्म्याद्वारे संपूर्ण मानवजातीला पापमुक्त करील त्या कराराची देवानें पूर्णता केली. येशूनें देवाची इच्छा मानली आणि आपल्याला होणाया शिक्षेचा स्वीकार केला.
उत्पत्ति 3:15 मध्ये लिहिलेल्या संदेशवचनाची सुद्धां पूर्णता झाली होती. "आणि तूं व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्परवैर स्थापीन; ती तुझें डोकें फोडील व तूं तिची टांच फोडिशील." देवाने आदामाला वचन दिले होते कीं हवेच्या संततीपासून मशिहा येईल आणि तो मानवजातीला पापी बनवून तिला नरकांत पाठवू पहाणाया सैतानाच्या सामथ्र्याचा पराभव करील.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु ह्रावर आपण विश्वास ठेवतो तेव्हां आपली सर्व पापें धुतली जाऊन आपले तारण होते आणि देवाच्या न्यायनिवाड¬ापासून आपली सुटका होते.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे वधस्तंभावरील रक्त याबद्दल आपण विचार करतो तेव्हां आपल्या ह्मदयांत द्दढ विश्वास असला पाहिजे. तुमच्या अंतःकरणांत विश्वास ठेवा म्हणजे तुमचें तारण होईल.
येशूचा बाप्तिस्मा हा स्वर्गीय सुवार्तेचा प्रारंभ आहे
स्वर्गारोहणाच्या आधी प्रभूची शेवटची
आज्ञा काय होती?
प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्यांनीं सर्व राष्ट्रांतील
लोकांना शिष्य करून त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र
आत्म्याच्या नांवानें बाप्तिस्मा द्यावा.
येशूचा बाप्तिस्मा हा सुवार्तेचा प्रारंभ होता आणि त्यानें त्याच्या बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे सर्व पापी लोकांचे तारण केले. मत्तय 28:19 मध्ये लिहिले आहे, "तेव्हां तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नांवानें बाप्तिस्मा द्या." पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी येशूच्या बाप्तिस्म्याच्या व रक्ताच्या द्वारे सर्व पापें धुऊन मानवजातीचे तारण केले अशी साक्ष देण्यास येशूनें त्याच्या शिष्यांस सांगितले होते.
सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करून त्यांना जगाची पापें धुऊन टाकणाया येशूच्या तारणाच्या बाप्तिस्म्याबद्दल शिक्षण द्यायचा अधिकार येशूनें त्याच्या शिष्यांना दिला होता.
2000 वर्षापूर्वी येशू देहाने ह्रा जगांत आला होता आणि बाप्तिस्मा करणाया योहानाकडून त्याचा बाप्तिस्मा झाला होता. त्या बाप्तिस्म्यामुळे आपली सर्व पापें आणि जगाची सर्व पापें त्याच्याकडे दिली गेली.
एकूण किती पाप त्याच्याकडे दिले गेले? उद्याच्या पापांचे काय? तो आपल्याला सांगत आहे कीं उद्याची पापें सुद्धां त्याच्याकडे दिली गेली होती. आपल्या मुलांची पापें, आपल्या पूर्वजांची आणि आपल्या पिढींत येणाया आपल्या वंशजांची आणि आदामाची पापें सुद्धां येशूकडे दिली गेली होती.
पाप नसणे हे कसं काय शक्य आहे? आपण पापाशिवाय कसे काय असू शकतो? येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें नेल्यामुळें विश्वास ठेवणारे सर्वजण पापमुक्त होऊन स्वर्गाच्या राज्यांत जाऊ शकतात.
"परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो ह्रासाठीं कीं, आपली कृत्यें देवाच्या ठायीं केलेलीं आहेत हे उघड व्हावें." (योहान 3:21).
येशूनें आपली सर्व पापें त्याचा बाप्तिस्मा, वधस्तंभावरील त्याचें रक्त, त्याचा मृत्यु आणि त्याचें पुनरुत्थान याच्याद्वारें धुतलेली आहेत. म्हणूनच त्याचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचा मृत्यु ह्रावर विश्वास ठेवणे म्हणजे तारण होण्यासारखेच आहे. हाच तारणाचा खरा विश्वास आहे.
जेव्हां आपण येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवतो तेव्हां आपले तारण होते. जेव्हां आपण ख्रिस्तावर योग्य पद्धतीने विश्वास ठेवतो त्यावेळी आपण नीतिमान ठरतो की पापी? आपण नीतिमान ठरतो. आपण दुर्बल, अपूर्ण असतांना सुद्धां पापाशिवाय असू शकतो का? होय आपण निष्पाप असू शकतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावर केला गेलेला न्याय ह्रावरील विश्वास हाच खरा व योग्य विश्वास आहे.
बाप्तिस्मा देणे आणि येशूच्या नांवाने बाप्तिस्मा घेणे
स्वर्गीय सुवार्तेचा प्रारंभ काय आहे?
येशूचा बाप्तिस्मा.
साधारणपणे लोक अपूर्ण व दुर्बल असेच असतात म्हणूनच पाळक मंडळी किंवा सुवार्तिक येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त ह्राच्यावर विश्वास ठेवणायांना त्यांचा विश्वास द्दढ होण्यासाठीं बाप्तिस्मा देतात. नव्यानें जन्मलेले लोक सुद्धां त्यांच्या विश्वासाचा पुरावा म्हणून येशूने घेतला होता तसाच बाप्तिस्मा घ्यायचा असं ठरवून बाप्तिस्मा घेत असतात.
नव्यानें जन्म घेतलेल्या मनुष्यानें त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत देवाची नीट उपकारस्तुति करावी म्हणून पाळक प्रथम त्या मनुष्याच्या डोक्यावर हात ठेवून देवाचा आशीर्वाद मागतो. त्यानंतर तो त्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नांवाने बाप्तिस्मा देतो.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्राच्यावर आपण ठेवत असलेल्या विश्वासावर आपला बाप्तिस्मा घेणे अवलंबून असते. बाप्तिस्मा करणाया मनुष्याची सर्व पापें येशूकडे दिली गेलेली असून तो मनुष्य ख्रिस्तांत मरण पावला आणि ख्रिस्ता मध्ये त्या मनुष्याचे पुनरुत्थान झालेले आहे असंच तो बाप्तिस्मा दाखवून देतो.
बाप्तिस्मा करून घेणे म्हणजे एखादा मनुष्य, येशूने त्याची पापें स्वतःच्या बाप्तिस्म्याद्वारे नेली आणि त्या मनुष्याने येशूबरोबर शिक्षा सहन करून त्याच्याबरोबर तो मरण पावला आणि येशूबरोबर त्याचे पुनरुत्थान झाले असा विश्वास जाहीर करतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, स्वतःची बहीणभावंडे आणि सैतान या सर्वांसमोर स्वतःचा विश्वास जाहीरपणे प्रगट करणे हे त्याच्या बाप्तिस्म्यामुळे साध्य होते. पाणी व आत्म्यापासून त्याचा नव्यानें जन्म झालेला आहे हे पण तो मनुष्य बाप्तिस्मा घेऊन कबूल करतो.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे वधस्तंभावरील रक्त ह्राचा खरा अर्थ समजून घेऊन येशूवर विश्वास ठेवणारे जगांतील पापांपासून मुक्त होत असतात. म्हणूनच पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नांवानें त्यांचा बाप्तिस्मा झालेला असतो.
"जुनें तें होऊन गेले; पाहा, ते नवें झालें आहे." (करिंथकरांस दुसरें पत्र 5:17). आपले जुनें ते होऊन गेलेले आहे आणि आपण विश्वासू लोक म्हणून नव्यानें जन्मलो आहोत. आपल्या ह्मदयाला याची खात्री पटावी म्हणूनच आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे. येशूवर विश्वास ठेवूनच आपण येशूच्या ठायीं बाप्तिस्मा घेतलेला आहे.
येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचें रक्त ह्रापासून
नव्यानें जन्म घेतल्यानंतरचे जीवन
नव्यानें जन्म घेतलेले कशासाठी जगतात?
जगभर सुवार्तेचा प्रचार करीत, ते देवाच्या राज्यासाठी
आणि देवाच्या नीतिमत्त्वासाठीं जगतात.
तारण होऊन नव्यानें जन्म घेतल्यानंतरचे जीवन देवाच्या वचनावरील विश्वासावर आधारित असले पाहिजें. दररोज पाप केल्याचा पश्चात्ताप करून भावनेवर आधारलेले जीवन निश्चितच असायला नको. येशूने त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आपली सर्व पापें नेलेली आहेत अशा विचाराने आपल्याला दररोज निर्धास्त वाटले पाहिजे. अशा प्रकारचेच आपले जीवन असायला पाहिजे.
येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां आपली सर्व पापें त्याच्याकडे दिली गेली. आपल्या पापांचा न्याय होऊन त्याला वधस्तंभावर खिळले जाण्याच्या काळापर्यंत तीन वर्षे तो आपल्या पापांचे ओझे घेऊन जगला होता.
म्हणूनच आपण विश्वास धरणायांनी भावनेच्या आहारी न जाता देवाच्या लिहिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवणे शिकले पाहिजे. आपण तसं नाही केले तर तारण होऊन आपला नव्यानें जन्म झालेला असतांना सुद्धां आपण निष्कारण आपल्या रोजच्या पापांची चिंता करीत बसू.
पापासंबंधीच्या भलत्या कल्पना काढून टाकून आपण फक्त पाणी व रक्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे. तारण झालेल्या व्यक्तीने हे अशा प्रकारचे जीवन जगले पाहिजे.
बाप्तिस्मा करणारा योहान येशूबद्दल काय बोलला होता? त्यानें म्हटले, "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" (योहान 1:29). येशूनें आजची, उद्याची आणि कालची, आणि आणखी मागे जाऊन पूर्वीची अशी सर्वच्या सर्व पापें हरण केली, ही साक्ष योहानानें दिली होती.
त्यानें ती सर्व पापें नाही का नेली? ती सर्व पापें येशूकडे दिली नव्हती का? जगाची सर्व पापें म्हणजेच त्यांत आपली कालची, आजची आणि उद्याची पण पापें येतात. येशूच्या बाप्तिस्म्याद्वारे आपण तारणाच्या सुवार्तेवरील आपला विश्वास द्दढ केला पाहिजे.
जे येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्रावर विश्वास ठेवतात त्यांचें तारण होत असते. जो येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणांत पाप नसते.
तरीपण खूप लोक असा विचार करतात कीं त्यांच्या अंतःकरणांत अजूनहि पाप आहे ह्राचे कारण म्हणजे येशूच्या बाप्तिस्म्याद्वारे त्यांची सर्व पापें येशूकडे अगोदरच दिलेली आहेत याबद्दल त्यांना कसलीच माहिती नसते. सैतानाकडून ते फसवले गेलेले असतात. सैतान त्यांच्या मनांतील विचारांच्या द्वारे हळूच बोलतो, "तूं रोज पाप करतोस. तूं निष्पाप कसा होऊ शकशील?"
खरं म्हणजे त्यांनी देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. पण सैतान खुबीने त्यांना ते पापीच आहेत असा विचार करायला लावतो. जो येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रावर विश्वास ठेवतात त्यांच्या ठायीं पाप नसते.
ह्रा जगांतं आपण अपूर्ण, दुर्बल असे मनुष्यप्राणी म्हणून रहात असल्यामुळे आपल्याच सत्कर्मांनी आपण नीतिमान बनू शकतो असं आपल्याला म्हणता येत नाही. पण येशूचा बाप्तिस्मा व त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रामुळे आपले तारण झाले असं विश्वासाने आपण म्हणू शकतो. त्या दोहोंवर विश्वास ठेवून आपल्याला खरे ज्ञान मिळाले कीं आपली अंतःकरणे पवित्र होतात आणि आपल्या ठायीं आता पाप नाही अशी आपली खात्री पटते.
"♫माझें तारण झालेले आहे. तुमचे तारण झालेले आहे. आपल्या सर्वांचेच तारण झालेले आहे♫" अशा अर्थाचं गाणं म्हणून हर्षभरित मनाने इतरांना सुवार्ता सांगणे किती सुखावह आहे.
आपण विश्वासू लोक अर्थातच रोज पाप करीत असतो पण आपल्याला ठाऊक असते कीं आपल्या ठायीं पाप नाही. आपल्या ह्मदयांत येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त आहे. पूर्वी आपली ह्मदयें पापांनी भरलेली होती पण आता आपण येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवत आहोत तर आपण कसं काय पापी असू शकतो?
"त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन." (इब्राी लोकांस पत्र 10:16)
आपली ह्मदयें पापमुक्त आहेत. येशूनें त्याचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचे रक्त याच्याद्वारे आपले तारण संपूर्णपणे होणे शक्य केले आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्याने पापमुक्त होण्यास मदत होते.
जो कोणी येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवतो तो परत कधीही पापी बनू शकत नाही
पाप केल्यानंतर आपण परत
पापी होतो का?
नाही. आपण परत कधीही
पापी होत नाही.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्राच्यावर आपण जेव्हां विश्वास ठेवत नव्हतो तेव्हां पापक्षमेसाठी आपण खूप प्रार्थना करून सुद्धां आपल्या ह्मदयांत पाप नेहमीच रहात होते. पण जेव्हां आपण खया सुवार्तेवर विश्वास ठेवू लागलो तेव्हां आपली सर्व पापें धुतली गेली.
"तूं अलिकडे खूप खुशींत कां दिसतोस?"
"तुला माहित आहे काय, की माझ्या अंतःकरणांत आता कांही पाप नाही."
"खरच? तर मग मला वाटते की आता तूं तुला पाहिजे तितके वेळा पाप करू शकशील."
"तुला माहित आहे का, कीं माणूस पाप केल्याशिवाय राहू शकत नाही. पण येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें सर्व पापें स्वतःकडे घेतली आणि त्या पापांचा दंड स्वीकारून तो वधस्तंभावर गेला. त्याच कारणास्तव मी माझा संपूर्ण वेळ चर्चच्या सुवार्ता प्रसारांत घालवतो. रोमकरांस पत्र ह्राच्या 6 व्या अध्यायांत म्हफ्लें आहे कीं आपण सर्वांनी तसं वागले पाहिजे. आता माझ्या अंतःकरणांत पाप नसल्यामुळे मला फक्त चांगल्याच गोष्फ्ी कराव्या असं वाफ्ते. आपण येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रावर विश्वास ठेवून जगभर सुवार्तेचा प्रसार केला पाहिजे! आपला तारणाचा धनी येशू ह्राच्यावर आपण जेव्हां विश्वास ठेवतो तेव्हां आपण परत कधीही पापी होऊ शकत नाही. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रा सार्वकालिक तारणावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. माझें ह्मदय देवाच्या उपकाराने भरून आले आहे!"
पवित्र आत्म्याचें दान कोणाला प्राप्त होते?
बाप्तिस्मा करणाया योहानानें
येशूसंबंधी काय साक्ष दिली होती?
त्यानें साक्ष दिली कीं येशू हा जगाचें पाप हरण करणारा देवाचा
कोंकरा होता आणि त्यानें जगांतील सर्व पापांबरोबरच, पूर्वीची,
कालची, आजची आणि उद्याची अशी सर्वच्या
सर्व पापें हरण केली होती.
जो कोणी येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रावर विश्वास ठेवतो त्याचें तारण होते. आपल्याला पवित्र आत्म्याचे दान कसे काय प्राप्त होते? प्रेषितांचीं कृत्यें 2:38-39 यांत आपल्याला त्याचे उत्तर मिळते. "पेत्र त्यांना म्हणाला, पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नांवानें बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचें दान प्राप्त होईल. कारण हें वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिलें आहे."
येशूच्या नांवाने बाप्तिस्मा घेणे ह्राचा अर्थ येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवून पापमुक्त होणे असा आहे. त्यानंतर देवाकडून पवित्र आत्मा दान म्हणून प्राप्त होतो.
येशू ख्रिस्ताच्या नांवाने बाप्तिस्मा घेणें ह्राचा अर्थ ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्राच्यावर विश्वास ठेवून पवित्र होणे, असाहि होतो. असा विश्वास द्दढपणे धरल्यानंतर आपण पापमुक्त होऊन नीतिमान बनतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे वधस्तंभावरील रक्त याच्याद्वारे विश्वासू मंडळी बर्फासारखी पांढरी होतात.
"म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचें दान प्राप्त होईल." येशूच्या बाप्तिस्म्याद्वारे आपली सर्व पापें त्याच्याकडे दिली गेली होती आणि त्या पापांचा न्याय करण्यांत येऊन तो वधस्तंभावर मरण पावला, असा आपण ठाम विश्वास धरतो तेव्हां आपली अंतःकरणे स्वच्छ धुतली जातात. येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त ह्रावर विश्वास ठेवल्यानंतर आपले नवीन जीवन सुरू होते आणि आपल्याला पवित्र आत्म्याची देणगी मिळून आपण देवाची मुले बनतो.
"तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील" (योहान 8:32). वधस्तंभावर जो न्याय केला गेला होता त्याचा खरा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. येशूनें त्याचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील मृत्यु याच्या द्वारें आपली सर्व पापें पुसून टाकली हेच खरे सत्य आहे. आपण जेव्हां ह्रा सत्यावर विश्वास ठेवतो तेव्हां आपण पापमुक्त होतो.
येशूचा बाप्तिस्मा आपल्याला पापमुक्त करतो
पवित्र आत्मा कोणाला प्राप्त होतो?
येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याच्या रक्तावरील
विश्वासाद्वारे जो पापमुक्त होतो त्याला.
जुन्या करारातील पापाच्या प्रायश्चित्ताबद्दलची अर्पणपद्धत नव्या करारातील येशूच्या बाप्तिस्म्याचे प्रतिनिधीत्व करते. जुन्या करारातील सर्व संदेशांचे मूळ म्हणजे येशूचा बाप्तिस्मा होय. जुन्या करारातले डोक्यावर दोन्ही हात ठेवणे हे नव्या करारातील येशूच्या बाप्तिस्म्यासारखे आहे.
येशूच्या बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें त्याच्याकडे दिली गेली होती. इस्त्राएलचे लोक सुद्धां त्याचप्रमाणे बकयाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवण्याद्वारें त्यांची पापें देत असत.
सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठीं येशूच्या बाप्तिस्म्यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे का? होय! आपण ठेवला पाहिजे! येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें घेतली हे सत्य आपण स्वीकारलेच पाहिजे. आपण जर येशूच्या बाप्तिसम्यावर विश्वास ठेवला नाही तर आपली पापें त्याच्याकडे देणे शक्य होत नाही. आपले तारण पूर्ण होण्यासाठीं आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. नाहीतर आपण नीतिमान बनू शकणार नाही.
येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे उचित मार्गाने जगांतील सर्व पापी लोकांचे तारण केले. दुसया कोणत्याहि मार्गाने तसं करता आले नसते. कारण येशूचा बाप्तिस्मा हा असा विधि होता की ज्याच्याद्वारे येशूकडे सर्व पापें देणे शक्य झाले होते. आली ह्मदयें पापांपासून कायमची स्वच्छ धुतली जाण्यासाठी आपण ह्रावर विश्वास ठेवला पाहिजे.
आपल्या पापांचा न्याय होऊन दंड सहन करण्यासाठीं येशूने त्याचें रक्त ओतले होते म्हणूनच आपण येशूच्या रक्तावरहि विश्वास ठेवला पाहिजे. अशा प्रकारे येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रावर विश्वास ठेवणारे सर्वजण पापमुक्त होत असतात.
स्वर्गाच्या राज्यांत जाता यावे यासाठीं आपण येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. शिक्षेपासून आपली सुटका होऊन, सर्व पापांपासून आपण मुक्त व्हावे यासाठीं हा एकच मार्ग आहे.
नव्या करारातील येशूचा बाप्तिस्मा आणि जुन्या करारातील डोक्यावर दोन्ही हात ठेवण्याचा विधि हे दोन्ही एकमेकांसमोर एखाद्या आरश्यांप्रमाणे आहेत. जुना आणि नवा करार एकमेकांना जोडणाया हूक व पकडीप्रमाणे आहेत.
नव्या करारांत बाप्तिस्मा करणारा योहान येशूच्या 6 महिने आधी आला होता. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां "देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्राच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ झाला होता." (मार्क 1:1). स्वतःच्या बाप्तिस्म्याद्वारें येशूनें जगाची पापे घेतली त्याचवेळी शुभवर्तमानास प्रारंभ झाला होता.
मानवजातीचें तारणकार्य पार पाडणाया घटना एकामागून एक अशा घडत गेल्या होत्याः येशूचा जन्म, त्याचा बाप्तिस्मा, वधस्तंभावरील त्याचा मृत्यु, त्याचें पुनरुत्थान आणि त्याचें स्वर्गारोहण. तारणकार्यातील ह्रा सर्व घटना नीट समजून घेऊन आपण त्यावर विश्वास ठेवला तर आपण आपल्या सर्व पापांपासून मुक्त होतो. येशूचा बाप्तिस्मा म्हणजे सुवार्तेचा प्रारंभ होता आणि वधस्तंभावरील त्याचें रक्त म्हणजे सुवार्तेची पूर्णता होती.
"देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्राच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ" (मार्क 1:1) देवाच्या पुत्राच्या शुभवर्तमानातून आपण त्याचे एकहि सत्कार्य म्हणजे त्याचा बाप्तिस्मा, वधस्तंभावरील त्याचें रक्त, त्याचे पुनरुत्थान, त्याचे स्वर्गारोहण आणि त्याचे दुसयांदा येणे - आपण वगळू शकत नाही.
येशू ह्रा जगांत देहाने आला आणि बाप्तिस्म्याद्वारें त्यानें जगाची सर्व पापें धुतली तेव्हां स्वर्गीय सुवार्तेचा प्रारंभ झाला होता. ह्रांतील एक जरी वगळले गेले असते तर स्वर्गीय शुभवर्तमान पूर्ण झाले नसते.
म्हणूनच एखाद्याला नव्यानें जन्म घ्यायचा असेल तर त्यानें येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्रावर विश्वास ठेवलाच पाहिजे. अलिकडे पुष्कळ लोक येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्राच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटते कीं येशूचा बाप्तिस्मा हा एक केवळ विधि होता. ही एक गंभीर गैरसमजूत आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो त्यानें येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्रावर सुद्धां विश्वास ठेवला पाहिजे.
केवळ क्षमायाचनेच्या प्रार्थना करून आपली पापें कशी काय धुतली जातील? बाप्तिस्मा करणाया योहानानें येशूला बाप्तिस्मा दिला त्यावेळीच आपली सर्व पापें येशूकडे दिली गेली होती. मानवजातीची सर्व पापें स्वतःकडे घेण्यासाठीं येशूला बाप्तिस्म्याखेरीज दुसरा कोणता मार्ग नव्हता.
स्वर्गाच्या राज्यांत जाण्यासाठीं आपण पाण्यापासून व आत्म्यापासून नव्याने जन्म घेतला पाहिजे. बाप्तिस्म्याचे पाणी, वधस्तंभावरील रक्त आणि पवित्र आत्मा याच्याखेरीज दुसया कशानेहि तारण होऊ शकत नाही. योहान 3:5 मध्ये येशूनें निकदेमाला म्हटले त्याप्रमाणे ज्याचा जन्म नव्यानें झालेला आहे तो देवाला पाहू शकतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्रावर आपण विश्वास ठेवतो तेव्हांच आपले खरे तारण होते.
येशूचा बाप्तिस्मा वगळून आपले तारण होऊ शकते का?
येशू आपला तारणकर्ता
कसा झाला?
स्वतःच्या बाप्तिस्म्याद्वारें आपली
पापें घेऊन.
येशूनें ह्रा जगांत येऊन त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें आपली सर्व पापें घेतली होती हे सत्य आपण येशूच्या कार्यातून वगळले किंवा कुमारी मरीयेच्या उदरीं तो जन्मास आला होता ह्रा त्याच्या पावित्र्याकडे पहाण्यास टाळाटाळ केली, किंवा त्याच्या वधस्तंभावर विश्वास ठेवला नाही तर, ख्रिस्ती धर्म म्हणजे विश्वासू लोकांना मंदिरांत जप करणाया बौद्ध भिक्षुकाप्रमाणे "मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर" अशी प्रार्थना शिकवणारा केवळ अंधश्रद्धेचा धर्म होऊन जाईल.
येशूचा बाप्तिस्मा वगळणे म्हणजे आपली पापें त्याच्याकडे दिली गेली नाहीत असं होऊन जाईल. आपला विश्वास वाया जाईल. एखाद्या कर्जदाराने त्याचे कर्ज फेडलेले नसतांना ते फेडले आहे असं त्याने म्हणण्यासारखेच आपलेहि होऊन जाईल. त्यामुळे आपण खोटे बोलणारे ठरू. एखाद्या कर्जदाराने कर्ज फेडलेले नसेल तर वास्तव्यांत आणि त्याच्या सदसद्विवेकबुध्दीने सुद्धां तो कर्जदारच रहातो.
येशूनें त्याच्यावर विश्वास ठेवणाया सर्वांना त्याच्या बाप्तिस्म्याच्या पाण्यानें धुऊन देवाची मुले केलेले आहे. बाप्तिस्मा करणाया योहानानें दिलेल्या बाप्तिस्म्याद्वारें येशूनें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतल्यामुळे विश्वास ठेवणारे सर्वजण पवित्र होऊ शकतात.
देवाच्या ह्रा कृपेबद्दल आपण आभार मानू. लूक 2:14 मध्ये म्हटलें आहे, "ऊध्र्वलोकीं देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला त्या मनुष्यांत शांति." पाणी व येशूचें रक्त ह्रावरील आपल्या विश्वासाने आपले पूर्ण तारण होऊन आपण देवाची मुले बनतो. येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त यामुळे आपले तारण झाले आणि जो कोणी ह्रा दोहोंवर विश्वास ठेवतो त्याचें तारण होते.
येशूच्या तारणकार्यातून कोणतीच गोष्ट वगळता येत नाही. कांही लोक म्हणतात कीं संत पौल फक्त वधस्तंभाचा अभिमान बाळगत होता म्हणूनच ते फक्त येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतात. पण येशूच्या वधस्तंभामध्ये त्याचा बाप्तिस्मा त्यानें समाविष्ट केला होता.
रोमकरांस पत्र 6 मध्ये लिहिले आहे की संत पौलानें ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता आणि तो ख्रिस्तांत मरण पावला होता. आणि त्याचप्रमाणें गलतीकरांस पत्र 2:20 मध्ये त्यानें म्हटलें, "मीं ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहें; आणि ह्रापुढें मी जगतों असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्याठायीं जगतो; आणि आतां देहामध्ये जें माझें जीवित आहे तें देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्यानें माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरितां दिलें."
आणि गलतीकरांस पत्र 3:27-29 मध्ये म्हटलें आहे, "कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्यें बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलें आहे; यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायीं एकच आहां. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहां तर अब्रााहामाचें संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहां."
ख्रिस्तामध्यें बाप्तिस्मा घेणें ह्राचा अर्थ येशूनें केलेल्या सर्व कार्यावर आणि त्याचा बाप्तिस्मा व त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रावर विश्वास ठेवणे असा होतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्रावर विश्वास ठेवणे म्हणजे 2000 वर्षापूर्वी येशूने आपली सर्व पापें पुसून टाकली असा विश्वास धरण्यासारखे आहे. तारण होण्यासाठी दुसरा कोणताहि मार्ग नाही आहे.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रावर आपण विश्वास ठेवतो तेव्हां देवाकडून आपले तारण होते
क्षमेसाठीं प्रार्थना करण्यानें आपली
पापें धुतली जाऊ शकतात का?
नाही. बाप्तिस्मा करणाया योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला
तेव्हां आपली सर्व पापें येशूकडे दिली गेली होती अशा
विश्वासाच्या द्वारेच आपल्या पापांची क्षमा
होणे शक्य होते.
"कारण जो अंतःकरणानें विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखानें कबूल करितो त्याचें तारण होतें." (रोमकरांस पत्र 10:10)
"कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलें आहे." (गलतीकरांस पत्र 3:27) ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेऊन, ख्रिस्ताला परिधान करून देवाची मुले होण्यासाठी आपला विश्वास आपल्याला मार्गदर्शन करतो. येशूने ह्रा जगांत येऊन बाप्तिस्मा घेतला तेव्हां आपली व जगाची सर्व पापें येशूकडे दिली गेली होती.
आपल्या विश्वासामुळे आपण ख्रिस्तांत एक होतो. तो मरण पावला तेव्हां आपण मरण पावलो होतो. त्याचें पुनरुत्थान झाले तेव्हां आपले पुनरुत्थान झाले होते. आता आपण, येशूचा बाप्तिस्मा, त्याचें रक्त आणि त्याचें पुनरुत्थान, त्याचे स्वर्गरोहण आणि त्याचे परत येणे ह्रा सर्वांवर विश्वास ठेवत आहोत म्हणूनच सार्वकालिक जीवनासाठीं आपण स्वर्गांत जाऊ शकतो.
जेव्हां लोक येशूच्या रक्तावरच विश्वास ठेवतात तेव्हां त्यांच्या अंतःकरणांत असलेल्या पापांमुळे त्यांना त्रास होत रहातो. कारण येशूच्या बाप्तिस्म्याद्वारें त्यांची सर्व पापें येशूनें स्वतःकडे घेतल्यामुळे त्यांची पापी ह्मदयें बर्फासारखी शुभ्र कायमची धुतलेली आहेत याबद्दल त्यांना माहिती नसते किंवा त्याचा अर्थ स्वीकारण्यास ते तयार नसतात.
तुमच्या सर्व पापांपासून तुम्हांला मुक्त करणारा येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्रावर तुमचा विश्वास आहे का? कृपा करून ह्रा निर्भेळ सत्यावर तुम्ही विश्वास ठेवा. येशूचा बाप्तिस्मा वगळून तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तो निरर्थक आहे. येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवल्याखेरीज तुमचे तारण होऊ शकत नाही.
जे लोक फक्त वधस्तंभावर विश्वास ठेवतात ते म्हणतात, "येशू माझा प्रभु, माझा तारणकर्ता आहे. तो माझ्यासाठीं वधस्तंभावर मरण पावला. तो मरणांतून पुन्हां उठला. स्वर्गांत जाण्यापूर्वी त्यानें 40 दिवस त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष दिली आणि आता तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. आपला न्याय. करण्यासाठीं तो पुन्हां येणार आहे ह्रावर माझा विश्वास आहे. माझी प्रार्थना आहे की येशूने माझ्यांत संपूर्ण बदल घडवून आणावे यासाठीं कीं तो येईल तेव्हां त्याला मी भेटू शकेन. माझ्या जिवलगा, माझ्या येशू. माझा प्रभु."
ते लोक अशा प्रकारे त्यांच्या पापांची क्षमा मागतात आणि त्यांना वाटते की त्यांची सर्व पापें निघून जातील पण तसे होत नाही कारण त्यांच्या ह्मदयांत पाप असते. "मी येशूवर विश्वास ठेवतो पण माझ्या ह्मदयांत पाप आहे. मी येशूवर प्रेम करतो पण माझ्या ह्मदयांत पाप आहे. मी म्हणून शकत नाही, "माझ्या वरा, कृपा करून ये" कारण माझ्यांत पाप आहे म्हणून मला माझ्या तारणाची खात्री पटू शकत नाही. मला वाटते की मी तयार असेन तेव्हां येशू येईल. मी खूप प्रार्थना आणि खूप पश्चात्ताप केला तर मी येशूच्या आगमनासाठी चांगला तयार होईल. मी पूर्ण ह्मदयाने येशूवर प्रेम करतो. पण माझ्या ह्मदयांत पाप असल्यामुळे येशूच्या समोर जायचे धाडस मी करू शकत नाही."
येशूने जर अशा लोकांना प्रश्न केला, "तूं पूर्ण नाही असं म्हणतोस याचा अर्थ काय?" ते उत्तर देतील, "प्रभो, मला माहित आहे की मी दररोज पाप करतो म्हणून नीतिमान नाही. तूं पापी लोकांना हांक मारशील तेव्हां कृपा करून तू मला बोलवून घे."
निर्माणकर्ता न्यायी देव पापी लोकांना स्वीकारून त्यांना स्वतःची मुले करीत नसतो हे त्या लोकांना समजत नाही.
वर आला होता आणि त्याने त्याच्या नवरीच्या पापासंबंधीच्या सर्व समस्या सोडवल्या होत्या पण नवरी त्या बाबतीत अज्ञानांत राहिल्यामुळे तिचा छळ होत गेला. आपण देहाने पाप करतो म्हणून स्वतःला जेव्हां पापी समजतो तेव्हां आपण देवावरील आपला अविश्वास प्रगट करतो. देवाची वचनें आपल्याला माहित नसली किंवा समजत नसली तर आपल्या ह्मदयातील पाप वाढतच जाते.
कांही लोक त्यांच्या ह्मदयांत असलेल्या
पापामुळे त्रास कां सहन करतात?
कारण येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें त्यांची सर्व पापें नेली होती
ही सत्य त्यांना माहित नसते किंवा ते सत्य जाणून
स्वीकारण्यासाठी ते तयार नसतात.
वरानें जगाची सर्व पापें नेली होती. कुठे? यार्देन नदींत जेव्हां त्याचा बाप्तिस्मा झाला होता. जे लोक ह्रावर विश्वास ठेवत नाहीत ते पापीच रहातात. ते मलीन अशुद्ध नवया म्हणून रहातात.
वर नवरीला विचारतो, "तूं माझी नवरी नसतांना कशी काय माझ्यावर प्रेम करू शकतेस? मी तुझा नवरा आहे असं तूं म्हणायच्या आतच तुझी सर्व पापें धुऊन टाकली पाहिजे."
येशूच्या बाप्तिस्म्याशिवाय आपले तारण होऊ शकते का? नाही! आपण देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे बनवले गेलेले आहोत, म्हणूनच आपले ह्मदय न्याय शोधीत असते आणि आपली सद्सद्विवेकबुद्धि नीतीने रहाण्याचा प्रयत्न करते. पण आपली ह्मदये स्वच्छ धुतलेली नसतील तर आपण पापी नाही असा विचार करणे अशक्य होऊन जाते. जेव्हां आपण येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा स्वीकार करतो तेव्हांच आपण, आपल्या ह्मदयांत पाप नाही आणि आपण नीतिमान आहोत असं म्हणू शकतो.
आपल्या ह्मदयांत पाप असतांना आपण स्वतःला निष्पाप समजत राहिलो तर आपली सद्सद्विवेकबुद्धि कधीच पवित्र होऊ शकत नाही. अशा स्थितींत देव आपला स्वीकार करत नाही. कारण देव कधीच खोट बोलत नाही.
देवानें मोशेला इस्त्राएलचे किती लोक आहेत ते मोजायला सांगून दरडोई त्यांनी त्यांच्या जीविताची किंमत दिली पाहिजे असं सांगितले होते धनवानांनी अध्र्या शेकेलपेक्षां जास्त द्यायचे नाही आणि गरिबांनी त्यापेक्षां कमीपण द्यायचे नाही असा नियम त्यानें केला होता. प्रत्येकाला खंड द्यावाच लागे.
येशूने एखाद्या मनुष्याच्या जीविताची किंमत भरलेली असतांना तो मनुष्य येशूवर विश्वास ठेवत नसेल तर तो कसा काय पवित्र होऊ शकेल? अशा मनुष्याच्या ह्मदयांत सतत पाप रहातेच.
जेव्हां आपण येशूच्या रक्तावरच फक्त विश्वास ठेवतो तेव्हां आपल्या ह्मदयांत पाप रहाते म्हणूनच आपण पापी आहोत असं कबूल करावे लागते. पण जेव्हां आपण येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्रा दोन्हीवर विश्वास ठेवतो तेव्हां आपण विश्वासपूर्वक म्हणू शकतो कीं आपल्या ठायीं पाप नाही. तेव्हां मग तारण आणि सार्वकालिक जीवन याची देणगी आपल्याला मिळते.
पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण
कोणत्या प्रकारचे पाप माणसाला
नरकांत नेते?
पवित्र आत्म्याविरुद्ध पाप. दुसया शब्दांत येशूच्या
बाप्तिस्म्यावर विश्वास न ठेवणे.
रोमकरांस पत्र 1:17 मध्ये म्हटले आहे, "कारण तिच्यांत देवाचें नीतिमत्त्व विश्वासानें विश्वासासाठीं प्रगट झालेलें आहे." देवाचें नीतिमत्त्व सुवार्तेत प्रगट झालेलें आहे. येशू ख्रिस्त ह्रा जगांत आला आणि त्यानें बाप्तिस्म्याच्या व वधस्तंभावरील मृत्यु याच्या द्वारे जगांतील सर्व पापें धुऊन टाकली. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त हे सुवार्तेची सामथ्र्य आहे. येशूने आपली सर्व पापें एकदाच कायमची धुतली होती.
विश्वास ठेवणे म्हणजे तारण आणि न ठेवणे म्हणजे नरक असा अर्थ होतो. आपल्या आकाशातील पित्यानें त्याचा एकुलता एक पुत्र येशू ह्राला जगांत पाठवून आपल्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून त्याचा बाप्तिस्मा घडवून आणला. यासाठीं कीं जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचे सर्व अपराध धुतले जाऊ शकतील.
आता जगांत येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्राच्यावर विश्वास न ठेवण्याचे एकच पाप बाकी आहे. विश्वास न ठेवणे हे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करण्यासारखे पाप आहे आणि देव त्या पापाचा न्याय करून अविश्वासू मनुष्याला नरकांत टाकून देईल. हे सर्वांत गंभीर पाप आहे. तुमच्यापैकी कोणी हे पाप करीत असेल तर पश्चात्ताप करा आणि येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवून पापमुक्त व्हा. तसं नाही केले तुमचा सर्वनाश होईल.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्रा तारणाच्या साक्षीने तुम्ही पापमुक्त झाला आहांत का? योहान 1:29 मध्ये दिलेली योहानाची साक्ष तुम्ही स्वीकारली आहे का? "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" इब्राी लोकांस पत्र 10:18 ह्रांत येशूचा बाप्तिस्मा व रक्त यासंबंधी जे लिहिले आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? "तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं."
जे येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्राच्यावर पूर्ण ह्मदयानें विश्वास ठेवतात त्यांना देव स्वतःची मुलें करतो. येशूच्या प्रेमामुळे त्यांचे तारण होते.
देव ज्यांना पाठवतो ते लोक देवाचेच शब्द बोलतात पण जे पृथ्वीवरचे आहेत आणि देवाने त्यांना पाठवलेले नाही असे लोक त्यांच्या स्वतःच्याच विचाराप्रमाणे उपदेश करतात. पृथ्वीवर अनेक लोक देवाच्या वचनाचा उपदेश करतात आणि असेहि कांही लोक आहेत की ते देवाकडून पाठवलेले आहेत आणि ते लोक येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्राचा उपदेश करतात.
पण जे लोक स्वचःचेच शब्द बोलतात ते स्वतःचेच विचार प्रगट करीत असतात. ते म्हणतात, "आपण फक्त पूर्वीच्या पापांपासून मुक्त झालो आहोत. प्रत्येकाने रोजच्या पापासाठी पश्चात्ताप केला पाहिजे." ते म्हणतात कीं आपण हळू हळू पवित्र बनले पाहिजे.
पण मनुष्य स्वतःच्याच कुवतीवर पवित्र होऊ शकतो का? आपण स्वतःच्याच सद्गुणांनी आणि प्रयत्नांनी पवित्र होऊ शकतो का? देवानें आपली सर्व पापें धुतल्यामुळे आपण पवित्र झालो आहोत कीं आपल्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे आपले तारण झाले आहे?
आपल्याला काय पवित्र करते तोच खरा विश्वास आहे. कोळसा हजार वेळा धुऊन पांढरा होऊ शकेल का? काळी त्वचा आपण साबणाने गोरी करू शकतो का? कितीहि जरी साबण आपण वापरला तरी आपली पापें धुतली जाऊ शकणार नाहीत कारण आपले स्वतःचे नीतिमत्त्व मलीन वस्त्राप्रमाणे आहे. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवून आपण नीतिमान बनतो कीं फक्त वधस्तंभावरील रक्तावर विश्वास ठेवून आपण नीतिमान होत असतो?
येशूच्या बाप्तिस्म्याचे पाणी व त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्राच्यातूनच खरा विश्वास येतो. आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी तारण होत नसते. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त ह्राच्यावरील विश्वासच आपल्याला पापमुक्त करून नीतिमान बनवतो.
पित्यानें त्याच्या पुत्राच्या हाती सर्व लोक सोपवलेले आहेत, आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन मिळते. पुत्रावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याचा बाप्तिस्मा व रक्त ह्रा द्वारें होणाया तारणावर विश्वास ठेवणे होय. जे विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन मिळून ती देवाची मुले होतील. ज्यांचे तारण होते ते देवाच्या उजव्या हाताकडे सार्वकालिक जीवन जगतील.
येशूच्या बाप्तिस्म्यावरील विश्वास, तो व पिता एक आहेत हा विश्वास म्हणजेच पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवणे होय. देवाच्या सत्यवचनांमुळे आपण नव्यानें जन्म घेतो. येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त ह्राच्यावरील विश्वासामुळे आपले तारण झालेले आहे.
विश्वास ठेवा. येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त ह्रावर विश्वास ठेवणे म्हणजे तारणाची देणगी मिळवणे आहे. खया सुवार्तेवर तुम्ही विश्वास ठेवा आणि पापांपासून क्षमा मिळवा.