(मत्तय 7:21-23)
"मला प्रभुजी, प्रभुजी, असें म्हणणाया प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असें नाहीं; तर जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणें वागतो त्याचा होईल. त्या दिवशीं पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नांवानें संदेश दिला, तुझ्या नांवानें भुतें घालविलीं, व तुझ्या नांवानें पुष्कळ महत्कृत्यें केली नाहींत काय? तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणायांनो माझ्यापुढून निघून जा."
कदाचित मी असू शकेन...
`प्रभुजी प्रभुजी` असं म्हणणारे सर्वजण
स्वर्गाच्या राज्यांत जात असतात का?
नाही. जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात
तेच फक्त जातात.
येशू ख्रिस्तानें म्हटले, "मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाया प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असें नाहीं; तर जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणें वागतो त्याचा होईल." ह्रा वाक्यानें अनेक ख्रिस्ती लोकांच्या मनांत भीति निर्माण होऊन त्यांना देवाच्या इच्छेप्रमाणें वागण्यासाठीं प्रवृत्त केले असले पाहिजे.
स्वर्गाच्या राज्यांत जाता यावे म्हणून येशूवर विश्वास ठेवला म्हणजे पुरे आहे, असा विचार पुष्कळ ख्रिस्ती लोक करतात पण मत्तय 7:21 मघ्ये म्हटले आहे, `प्रभुजी, प्रभुजी` असं येशूकडे म्हणणारा प्रत्येक मनुष्य स्वर्गाच्या राज्यांत जाईल असं नाही.
हे शास्त्रवचन वाचणारे पुष्कळ जण बेचैन होऊन विचार करतात "कदाचित मी असू शकेन." ते स्वतःची खात्री पटावी म्हणून खूप प्रयत्न करून म्हणतात, "नाही, येशू पापी लोकांसंबंधी बोलत असला पाहिजे." पण कुठेतरी त्यांच्या मनाला बोचणी लागलेली असते.
म्हणून मग ते शास्त्रवचनाच्या दुसया भागाला जास्त महत्त्व देतात. ते वचन असे, "तर जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो." ह्रा वचनाला धरून ते विचार करतात कीं पित्याच्या इच्छेप्रमाणें ते पुढील गोष्टी करून वागू शकतात. त्या गोष्टी म्हणजे, नियमितपणे दशमांश देणे, संध्याकाळी प्रार्थना करणे, उपदेश करणे, सत्कृत्ये करणे आणि पाप न करणे... आणि अशाच कांही गोष्टींसाठी ते खूप मेहनत करतात. हे सर्व पहाताना मला अशा लोकांची खूप दया येते.
खूप लोकांना हे शास्त्रवचन नीट समजत नाही म्हणून ते चुका करतात. म्हणूनच मला ह्रा शास्त्रवचनाचा खुलासा करून सांगायला आवडेल. म्हणजे आपल्याला देवाची इच्छा समजून आपण त्याप्रमाणे वागून.
प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे कीं स्वतःच्या पुत्रानें जगाची सर्व पापें घेऊन आपल्याला पापमुक्त करावे हीच देवाची इच्छा आहे.
इफिसकरांस पत्र 1:5 मध्ये म्हटलें आहे, "त्यानें आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणें आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारें स्वतःचे दत्तक होण्याकरितां प्रेमानें पूर्वीच नेमिलें होतें."
आपल्याला नव्यानें जन्म घेता यावा यासाठीं येशू ख्रिस्तानें आपली सर्व पापें धुतली होती ही सुवार्ता आपल्याला समजावी हीच देवाची इच्छा आहे. आपली सर्व पापें येशूकडे सोपवून पाणी व आत्म्यापासून आपण नव्यानें जन्म घ्यावा हीच देवाची इच्छा आहे.
नुसतं "प्रभुजी, प्रभुजी!" बोलण्याने
येशूच्या ठायीं आपला विश्वास असतो तेव्हा
आपल्याला काय माहित असायला पाहिजे?
पित्याची इच्छा.
"मला प्रभुजी, प्रभुजी, असें म्हणणाया प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असें नाहीं; तर जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणें वागतो त्याचा होईल." (मत्तय 7:21).
पित्याची इच्छा आपण दोन मार्गांनी समजून घेतली पाहिजे. पहिलं म्हणजे पित्याची अशी इच्छा आहे कीं आपल्या सर्व पापांची क्षमा मिळवून आपण पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेतला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्या विश्वासाच्या आधारावर आपण आपले काम केले पाहिजे.
पृथ्वीवरील सर्व लोकांची पापें पुसून टाकणे ही देवाची इच्छा आहे. आपला पूर्वज आदाम ह्राच्या पापाद्वारें सैतानानें पतन घडवून आणले. पण मनुष्याची सर्व पापें पुसून टाकायची ही आपल्या पित्याची इच्छा आहे. आपण नियमित दशांश द्यावे आणि संध्याकाळ झाली की खूप प्रार्थना कराव्या असं आपल्या पित्याला नको आहे तर आपण सर्वांनी पापमुक्त व्हावे अशी त्याची इच्छा आहे असं आपण समजून घेतले पाहिजे. पापाच्या समुद्रांत बुडत असलेल्या आपल्या सर्वांना वाचवायचे ही त्याची इच्छा आहे.
बायबल म्हणते. कीं `प्रभुजी प्रभुजी` असे म्हणणाया प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असें नाहीं. त्याचा अर्थ असा होतो कीं आपण नुसते येशूवर विश्वास ठेवून रहायचे नाही, तर पित्याची इच्छा काय आहे हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आदाम आणि हवेने केलेल्या पापापायी आपण पाप केल्याशिवाय राहू शकत नाही हे देवाला माहित आहे म्हणूनच पाप आणि नरक यापासून आपली सुफ्का करणे हीच त्याची इच्छा आहे.
देवाची इच्छा
देवाची इच्छा काय आहे?
आपल्याला पापमुक्त करून त्याची
मुलें करणे.
मत्तय 3:15 मध्ये म्हटले आहे, "कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." आपल्याला पापमुक्त करण्याची इच्छा देवाला होती. ती पुरी करण्यासाठीं येशू ह्रा जगांत आला होता. बाप्तिस्मा करणाया योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां देवाची इच्छा पुरी झाली होती.
आपले तारण करून स्वतःची मुले करणे हीच देवाची इच्छा होती. त्यासाठीं त्याच्या पुत्राला आपली सर्व पापें घेऊन जावे लागले. सर्व लोकांना स्वतःची मुलें बनवायचे अशी त्याची इच्छा होती. सैतानाच्या पकडींत सापडलेल्या सर्व लोकांना पापमुक्त करण्यासाठीं त्यानें स्वतःच्या पुत्राला ह्रा जगांत पाठवले होते.
स्वतःच्या पुत्राचें जीवन अर्पण करण्याची देवाची इच्छा होती यासाठीं कीं त्यामुळें सर्व लोक त्याची मुलें होऊ शकतील.
येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो वधस्तंभावर मरण पावला तेव्हां देवाच्या इच्छेची पूर्णता झाली. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां आपली सर्व पापें त्याच्याकडे दिली गेली होती आणि आपल्या अपराधांची शिक्षा वधस्तंभावर सहन करून तो मरण पावला होता ह्रावर आपण विश्वास धरावा अशी आपल्या पित्याची इच्छा आहे.
"देवानें जगावर एवढी प्रीति केली कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला." (योहान 3:16). देवानें लोकांना पापांपासून सोडवले होते. ते करण्यासाठीं येशूनें त्याच्या कार्याच्या सुरुवातीसच बाप्तिस्मा करणाया योहानाकडून बाप्तिस्मा घेतला होता.
"येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे. तेव्हां त्यानें तसें होऊं दिलें." (मत्तय 3:15). देवाच्या इच्छेनुसार जगाची पापें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे काढून टाकण्यासाठी येशू ह्रा जगांत आला होता, बाप्तिस्म्यानंतर त्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला आणि नंतर त्याचें पुनरुत्थान झाले.
आपण हे सर्व नीट समजून घेतले पाहिजे. पण पुष्कळ लोकांना वाटते कीं मरणाचा धोका पत्करून त्यांनी देवाची सेवा करणे आणि स्वतःची मालमत्ता विकून चर्चेस बांधणे अशीच अपेक्षा देव त्यांच्याकडून करत आहे. पण तसं नाही आहे.
ख्रिस्ती मित्रहो, येशूवर विश्वास ठेवणाया आपण सर्वांनी प्रथम देवाची इच्छा काय आहे ते समजून घेतले पाहिजे आणि मगच आपल्या कार्यास प्रारंभ केला पाहिजे. देवाची इच्छा जाणून न घेता चर्चच्या कार्याला सर्वस्व वाहून देणे चुकीचे आहे.
स्वतःच्या कर्मठ चर्चच्या मर्यादित विश्वास क्षेत्रांत रहाण्याखेरीज दुसरे आपण काय करू शकतो, अशा प्रकारचा प्रश्न लोक स्वतःलाच विचारीत असतात. पण मी स्वतः प्रेस्बेटेरियन चर्चमध्ये कॅलव्हीनीझमचा अभ्यास केला, आणि एखाद्या मुरलेल्या पाळकाप्रमाणे धार्मिक असलेल्या स्त्रीच्या हाताखाली मी तिचा दत्तक मुलगा म्हणून वाढलो होतो. `कर्मठ चर्च` ज्याला म्हणतात अशा चर्चसंबंधी मी पुष्कळ कांही शिकलेलो आहे.
संत पौलाने म्हटले आहे की तो स्वतः बन्यामीनच्या घराण्यांतला होता आणि महान गुरू गमालिएल ह्राच्या हाताखाली त्यानें शिक्षण घेतले होते. ह्राबद्दल तो अभिमानाने बोलू शकत होता. पौलाचा नव्यानें जन्म होण्याआधी तो येशूवर विश्वास ठेवणायांना पकडण्यासाठी निघालेला होता. पण दिमिष्काच्या रस्त्यावर त्यानें येशूवर विश्वास ठेवल्यामुळे पाणी व आत्म्याच्या आशीर्वादाद्वारें त्याचा नव्यानें जन्म होऊन तो नीतिमान झाला.
आपण कांही करण्याआधी देवाची इच्छा आपण समजून घेतली पाहिजे
येशूवर विश्वास ठेवण्याआधी
आपण काय केले पाहिजे?
प्रथम आपण देवाची इच्छा जाणून
घेतली पाहिजे.
आपण पवित्र बनणे ही देवाची इच्छा आहे. "कारण देवाची इच्छा ही आहे कीं, तुमचें पवित्रीकरण व्हावें, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावें." (थेस्सलनीकाकरांस पहिलें पत्र 4:3). पाणी व आत्म्याच्या द्वारें संपूर्णपणे पवित्र होऊन आपण विश्वासाने जीवन जगावे अशीच देवाची इच्छा आहे.
येशूवर विश्वास ठेवूनसद्धां एखादा मनुष्य जर त्याच्या ह्मदयांत पाप ठेवत असेल तर त्याचा अर्थ तो देवाच्या इच्छेप्रमाणे जगत नाही असाच होतो. येशूच्या द्वारें होणाया तारणामुळे आपण पवित्र होतो. आपल्यासाठी देवाची हीच इच्छा आहे की आपण हे सर्व समजून घ्यावे.
मी जर तुम्हांला विचारले, "येशूवर विश्वास ठेवूनसुद्धां तुमच्यांत पाप आहे का?" आणि तुम्ही होय असे उत्तर दिले तर त्याचा अर्थ असा आहे कीं देवाची इच्छा काय आहे हे तुम्हांला अजूनपर्यंत समजलेले नाही. पाणी व आत्म्याद्वारें पापमुक्त होऊन आपण पवित्र बनावे हीच देवाची इच्छा आहे.
एक माणूस होता, त्याला आज्ञाधारक मुलगे होते. एकदा त्यानें त्याच्या सर्वांत आज्ञाधारक मुलाला म्हणजे त्याच्या थोरल्या मुलाला बोलवून म्हटले, "मुला, शेताच्या पलिकडे जे गाव आहे... " त्यानें त्याचे बोलणे संपवायच्या आतच "होय, पिताजी" असं म्हणत तो मुलगा निघून गेला. त्यानें काय करायला पाहिजे हे ऐकून घेण्यासाठी वाट न पहाता तो सरळ निघून गेला.
त्याच्या वडलांनी त्याला परत बोलवून घेऊन म्हटले, "मुला, तूं खूप आज्ञाधारक आहे हे चांगले आहे पण तूं काय करावे अशी माझी इच्छा आहे, ते तूं समजून घ्यायला पाहिजे."
पण मुलगा म्हणाला, "पिताजी ठीक आहे. मी तुमची आज्ञा पाळीन. तुमचे आज्ञापालन करण्यासाठी माझ्याहून दुसरा चांगला कोण आहे?"
अर्थातच तो मुलगा रिकाम्या हाताने परत आला. पित्याची इच्छा नीट समजून न घेता आणि पुढचा मागचा विचार न करता आंधळ्याप्रमाणे तो आज्ञापालन करायला गेला होता.
आपण येशूला नीट समजून घेतले नाही तर आपण सुद्धां त्या मुलाप्रमाणे वागू शकतो. पुष्कळ लोक देवाची इच्छा समजून न घेता धार्मिक शास्त्रलेखांचे अनुसरण करतात, दशमांश मोठट्या भक्तीभावानें देतात, संपूर्ण रात्रभर प्रार्थना करतात, उपास...!
ह्मदयांत पाप ठेवून ती माणसं जेव्हां मरतात तेव्हां स्वर्गाच्या दारांतून त्यांना हाकलले जाते. देवाची इच्छा जाणून घेण्यासाठीं ते खूप उतावीळ झालेले असतात पण देवाला काय पाहिजे हे त्यांना समजत नाही.
अनाचार करणे म्हणजे काय?
पाणी व आत्म्याची सुवार्ता समजून न प्रेता स्वतःला
पापी समजून येशूवर विश्वास ठेवणे.
"त्या दिवशीं पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नांवानें संदेश दिला, तुझ्या नांवानें भुतें घालविलीं व तुझ्या नांवानें पुष्कळ महत्कृत्यें केलीं नाहींत काय? तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधीच ओळख नव्हती, अहो अनाचार करणायांनो माझ्यापुढून निघून जा." (मत्तय 7:22-23).
देवाची इच्छा असते कीं आपण त्याच्यासाठी कांही कामें करावी, पण त्यासाठी आपल्याकडून तो विश्वासाची अपेक्षा करतो. येशूने आपली सर्व पापें नेली होती ह्रावर आपण विश्वास धरावा अशी त्याची इच्छा आहे. पुष्कळ लोक पाणी व आत्म्याचे सत्य समजून न घेता येशूचे. नांव घेऊन संदेश देतात भुते काढतात आणि पुष्कळ अद्भूत कृत्ये करतात.
अद्भूत कृत्ये करणे म्हणजे चर्चेस बांधणे, स्वतःची मालमत्ता विकून चर्चला दानार्पण देणे स्वतःचे आयुष्य देवासाठीं अर्पण करणे ह्रा गोष्टी त्या अद्भूत कृत्यांत असतात.
येशूच्या नांवाने संदेश देणे म्हणजे लोकांचा गुरू बनणे. अशा प्रकारचे लोक येशूच्या विरुद्ध बोलून नियमशास्त्र काटेकोर पाळण्याचा आव आणणाया परूशी लोकांसारखेच असतात. हाच नियम कर्मठ म्हणणाया ख्रिस्ती लोकांना पण लागू पडतो.
भुते काढणे म्हणजे स्वतःचे सामथ्र्य दाखवणे. त्यासाठी त्यांचा उत्साह खूप उतू जात असतो, पण एक दिवस प्रभु त्यांना सांगेल कीं तो त्यांना ओळखत नाही. तो त्यांना विचारेल की त्याला ते लोक कोण हे माहित नसतांना ते कसे काय त्याला ओळखू शकतात.
येशूने म्हटले, "तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन कीं मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणायांनो माझ्यापुढून निघून जा" त्या दिवशीं पुष्कळ लोक येशूपुढे येऊन रडत म्हणतील, "प्रभो, माझा विश्वास आहे. तूं माझा तारणकर्ता आहेस ह्रावर माझा विश्वास आहे." ते म्हणतील कीं त्यांच्या अंतःकरणांत पाप आहे पण तरीहि ते येशूवर प्रेम करतात. प्रभु त्यांना अनाचार करणारे असे म्हणतो आणि तो त्यांना निघून जाण्यास सांगील.
त्या दिवशी नव्यानें जन्म न होता मरण पावलेले लोक येशूला म्हणतील, "मी संदेश दिले, चर्चेस बांधली आणि तुझ्या नांवाने 50 मिशनरी पाठवले."
पण येशू त्या पापी लोकांना स्पष्टपणे म्हणेल, "मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणायांनो माझ्यापुढून निघून जा."
"याचा अर्थ काय? तुला माहित नाही का कीं मी तुझ्या नांवानें संदेश दिले होते? मी चर्चमध्ये पुष्कळ वर्षे सेवा केली... मी इतरांना तुझ्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले. तूं मला ओळखत नाहीस हे कसे काय शक्य आहे?"
तो उत्तर देईल, "मला तुझी ओळख कधीच नव्हती. तुझ्या ह्मदयांत पाप असतांना तूं म्हणतोस की तूं मला ओळखतोस. माझ्यापुढून निघून जा!"
एखाद्याच्या ह्मदयांत पाप असतांना येशूवर विश्वास ठेवणे हे नियमाच्या विरुद्ध आहे. तारणाच्या नियमावर विश्वास न ठेवणे, देवाची इच्छा समजून न घेणे हे अनाचार करण्यासारखे आहे. देवाची इच्छा समजून न घेता ती पार पाडण्याचा प्रयत्न करणे किंवा पाणी व आत्म्याने नवा जन्म घेण्याचा आशीर्वाद समजून देवाच्या इच्छेप्रमाणे न चालता येशूला अनुसरण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धां अनाचार करण्यासारखे आहे. अनाचार करणे हे पाप आहे.
बायबलमधील देवाची इच्छा
देवाची मुले कोण आहेत?
ज्यांच्या ठायी पाप नाही ते नीतिमान.
पाणी व आत्म्यापासून नव्याने जन्म घेण्याच्या सुवार्तेवर आपण विश्वास धरावा अशी देवाची इच्छा आहे. खरी सुवार्ता आपल्याला नवा जन्म देते. देवाची अशीहि इच्छा आहे कीं त्याची मुलें म्हणून आपण सुवार्तेसाठीं जगावे. देवाची इच्छा काय आहे ते आपल्याला माहित असले पाहिजे, पण पुष्कळ लोकांना पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या सुवार्तेबद्दल कांहीच माहिती नसते.
मी जेव्हां लोकांना प्रश्न विचारतो की ते येशूवर विश्वास कां ठेवतात, त्यावेळीं पापांपासून मुक्त होण्यासाठीं असं ते उत्तर देतात. मी विचारतो, "तर मग तुमच्या ह्मदयांत पाप आहे. का?"
ते म्हणतात, "होय, आहे."
"तर मग तुमचें तारण झाले आहे की नाही झाले?"
"होय, माझें तारण झाले आहे."
"एखाद्या मनुष्याच्या ह्मदयांत पाप असेल तर तो स्वर्गाच्या राज्यांत जाऊ शकतो का?"
"नाही, तो जाऊ शकत नाही."
"तर मग तूं स्वर्गाच्या राज्यांत जाणार आहेस कीं नरकाच्या अग्नींत जाणार आहेस?"
ते म्हणतात कीं ते स्वर्गाच्या राज्यांत जातील, पण ते जाऊ शकतील का? ते नरकांत जातील.
त्यांच्या ह्मदयांत पाप असूनहि ते येशूवर विश्वास ठेवतात म्हणून त्यांना वाटते कीं ते स्वर्गांतच जातील. देवाची पण तशी इच्छा आहे असं ते धरून चालतात. पण स्वर्गाच्या राज्यांत देव पापी लोकांना स्वीकारत नाही.
देवाची इच्छा काय आहे? बायबलमध्ये म्हटले आहे कीं आपल्यासाठीं देवाची इच्छा अशी आहे कीं आपण त्याच्या पुत्राच्या ठायीं विश्वास धरावा आणि येशूचा बाप्तिस्मा व त्याचे वधस्तंभावरील रक्त ह्राद्वारें पापमुक्त होण्याच्या तारणाच्या आशीर्वादावर आपण विश्वास ठेवावा.
पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादावर जे विश्वास ठेवतात ते देवाची मुलें होत असतात. आपण देवाची मुलें होणे हा आपला गौरव आहे. देवाची मुलें नीतिमान असतात.
जेव्हां देव आपल्याला नीतिमान म्हणतो तेव्हां पापी-ख्रिस्ती मनुष्याला तो नीतिमान समजेल का? देव कधीहि खोटं बोलू शकत नाही. म्हणूनच देवासमोर एकतर तुम्ही पापी ठरता किंवा नीतिमान ठरता. जे लोक पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात त्यांनाच देव पवित्र होण्यासाठीं बोलवत असतो.
आपण देवाची मुले कसं बनू शकतो?
पाणी व रक्ताची सुवार्ता स्वीकारून.
देवानें जगाची सर्व पापें त्याच्या पुत्राकडे दिल्यामुळे, त्याच्या स्वतःच्या पुत्राचा सुद्धां त्या पापासाठीं वधस्तंभावर न्याय केला गेला. देव कधीहि खोटं बोलू शकत नव्हता. तो म्हणतो, "पापाचें वेतन मरण आहे" (रोमकरांस पत्र 6:23). जेव्हां त्याचा पुत्र मेला तेव्हां पृथ्वीवर तीन तास काळोख पडला होता.
"येशू मोठट्यानें आरोळी मारून बोलला, एली, एली, लमा सबखथनी? , म्हणजे माझ्या देवा, माझा देवा, तूं माझा त्याग कां केला?" (मत्तय 27:46).
सर्व लोकांना पापमुक्त करण्यासाठीं येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली होती. आपल्याला वधस्तंभावर खिळले जाईल त्यावेळी पिता आपला त्याग करील हे सर्व माहित असतांना सुद्धा येशूनें मानवजातीची सर्व पापें स्वतःकडे घेतली होती. यार्देनेवर घेतलेल्या सर्व पापांसाठी देवानें त्याच्या पुत्राचा न्याय केला आणि त्याच्या स्वतःच्या मुलापासून त्यानें तीन तास त्याचे तोंड फिरवले होते.
"परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नांवावर विश्वास ठेवणायांना त्यानें देवाची मुलें होण्याचा अधिकार दिला." (योहान 1:12)
तुम्ही देवाची मुले आहांत का? पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याची सुवार्ता आपण स्वीकारलेली आहे म्हणून आपण नीतिमान आहोत.
"देव आपणांला अनुकूल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण?" (रोमकरांस पत्र 8:31). देवासमोर व लोकांसमोर नीतिमान मनुष्य जेव्हां स्वतःला नीतिमान म्हणवून घेतो तेव्हां तारण न झालेले लोक नीतिमान मनुष्याचा न्याय करू पहातात. पण संत पौलानें म्हटलें आहे, "देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे." (रोमकरांस पत्र 8:33). देवानें येशूच्या द्वारें आपली सर्व पापें पुसून आपल्याला पवित्र, नीतिमान आणि त्याची मुले केलेले आहे. त्याची गौरवशाली मुलें बनण्याचा हक्क त्यानें आपल्याला दिला आहे.
पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेतलेले देवाची मुलें होत असतात. ते देवाबरोबर सर्वकाळ रहातात. ह्रा जगांतील मनुष्यप्राणी म्हणून न रहाता ते स्वर्गांत देवाची मुले बनतात.
ते देवाची मुले बनल्यानंतर कोणीहि त्यांच्यावर दोषारोप ठेवू शकत नाही, त्यांचा न्याय करू शकत नाही किंवा देवापासून त्यांना वेगळे करू शकत नाही.
पाणी व आत्म्याच्या सुवार्तेबद्दल आपल्याला ज्ञान असले पाहिजे तरच आपण येशूवर विश्वास ठेवू शकतो. आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. देवाची इच्छा पार पाडण्यासाठी त्याची इच्छा समजून घेऊन आपण तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
पापी लोकांनी पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घ्यावा ही देवाची इच्छा आहे
देवाने त्याच्या पुत्राला पापी मनुष्याच्या
प्रतिरूपाने कां पाठवले होते?
सर्व पापें त्याच्याकडे देण्यासाठीं.
आपण पापमुक्त होऊन पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. "कारण देवाची इच्छा ही आहे कीं, तुमचे पवित्रीकरण व्हावें." (थेस्सलनीकाकरांस पहिलें पत्र 4:3).
स्वतःच्या पुत्राला पाठवून त्याच्याकडे सर्व पापें द्यायची यासाठीं कीं त्यामुळे आपले तारण होऊ शकेल ही देवाची इच्छा होती. हा पवित्र आत्म्याचा नियम आहे की त्यामुळे पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेणे आपल्याला शक्य होते. त्या नियमानेंच आपल्याला पापमुक्त केले होते.
आपले तारण झालेले आहे. आता तुम्हांला देवाची इच्छा ओळखता येते का? सर्वांना पापमुक्त करायचे हीच त्याची इच्छा आहे. जगाबरोबर तडजोड न करता केवळ त्याच्याच सत्यवचनावर विश्वास ठेवून आपण फक्त त्याचीच उपकारस्तुति करावी अशी त्याची इच्छा आहे.
ज्यांचा जन्म नव्यानें झालेला आहे त्यांनी त्यांच्या तारणाची साक्ष देऊन, सुवार्तेचा प्रसार करीत, चर्चमध्ये स्वतःचा वेळ खर्चून इतर लोकांना देवाकडे वळवावे अशी पण देवाची इच्छा आहे.
आपली इच्छा आहे म्हणून आपण पाप करीत नसतो तर आपण दुर्बल आहोत म्हणूनच पाप करतो. पण येशूनें ती पापें घेतलेली होती. बाप्तिस्मा करणाया योहानाकडून जगाची सर्व पापें देवानें येशूकडे दिली होती. त्या कारणासाठीच देवानें त्याच्या पुत्राला पाठवून योहानाकडून त्याचा बाप्तिस्मा करवून घेतला. ह्रावर विश्वास ठेवण्यानें आपण पापमुक्त झालो, आपले तारण झाले. देवाची इच्छा हीच होय.
देवाची इच्छा ही आहे कीं आपण त्यानें पाठवलेल्या येशूवर विश्वास ठेवावा
येशू पापी मनुष्याच्या प्रतिरूपाने कां
आला होता?
मानवजातीची सर्व पापें घेऊन
जाण्यासाठी.
देवानें ज्याला पाठवले होते त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच देवाची इच्छा पुरी करणे होय असं बायबल म्हणते. "ह्रावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामें आमच्या हातून व्हावीं म्हणून आम्ही काय करावें? येशूनें त्यांना उत्तर दिलें, देवाचें काम हेंच आहे कीं, ज्याला त्यानें पाठविलें त्याच्यावर तुम्हीं विश्वास ठेवावा. ह्रावरून ते त्याला म्हणाले, असें कोणतें चिन्ह आपण दाखवितां कीं जें पाहून आम्हीं आपणांवर विश्वास ठेवावा? आपण कोणतें कृत्य करितां? आमच्या पूर्वजांनी अरण्यांत मान्ना खाल्ला; असें लिहिलें आहे कीं, त्यानें त्यांस स्वर्गातून भाकर खावयाला दिली." (योहान 6:28-31).
लोकांनी येशूला सांगितले की इस्त्राएली लोक कनान देशाकडे जात असतांना देवानें मोशेला चिन्ह म्हणून स्वर्गातून मान्ना दिला होता. त्यामुळे इस्त्राएली लोकांनी देवावर विश्वास ठेवला होता. (योहान 6:32-39). लोकांनी येशूला विचारले, "देवाची कामें आमच्या हातून व्हावीं म्हणून आम्ही काय करावें?"
येशूनें उत्तर दिलें की देवाचे काम करता येण्यासाठीं त्यांनीं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला जर देवाचें कार्य करायचे असेल तर आपण येशू ख्रिस्ताच्या कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे. देवाची आपल्यासाठीं ही इच्छा आहे कीं आपण सुवार्तेवर विश्वास ठेवून नुसते उपदेश करायचे नाहीत तर आपण सुवार्तेप्रमाणे जीवन जगले पण पाहिजे.
देवानें आपल्याला आज्ञा दिलेली आहे, "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नांवानें बाप्तिस्मा द्या; जें कांहीं मी तुम्हांला आज्ञापिलें तें सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे." (मत्तय 28:19-20).
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नांवाने बाप्तिस्मा देण्यास येशूनें आपल्याला स्पष्टपणें सांगितले आहे. पिता आणि पवित्र आत्मा यांच्यासाठी येशूने जे कांही केले ते त्याच्या बाप्तिस्म्यांत एकवटलेले आहे. आपल्यांला हे सर्व समजले की आपण देवावर विश्वास ठेवून, येशूचे ह्रा जगांतील कार्य समजून घेऊन, आत्म्यानें कशी साक्ष दिली हे आत्मसात करू शकतो.
पाणी व आत्म्याची साक्ष देण्यासाठीं देवानें येशूला पाठवले होते. म्हणूनच देवाच्या वचनावर आणि त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवल्यानंतरच आपले तारण होऊ शकते.
देवाचें काम करणे
आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे?
जगभर सुवार्तेचा प्रसार करण्याद्वारें देवाची
इच्छा पार पाडणे.
आपल्याला जर देवाचें काम करायचे असेल तर प्रथम येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु ह्रावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. देवानें ज्याला पाठवलें त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे देवाचे काम करण्यासारखे आहे. येशूवर नीट विश्वास ठेवता यावा यासाठी सर्वांत प्रथम पाणी व रक्ताद्वारें त्यानें आपले तारण केले ह्रा गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे.
आपण .येशूवर विश्वास ठेवून सुवार्तेबद्दल इतरांना सांगतो तेव्हां देवाची इच्छा त्या द्वारे पुरी होते. अशा प्रकारे सुवार्ताप्रसार करून आपण देवाचें काम करतो जे पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतात ते स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करू शकतात असं त्याने आपल्याला सांगितलेले आहे.
पुढील सत्य गोष्टी नीट ओळखून घेऊन आपण स्वर्गाच्या राज्यांत आपली जागा घेऊः देवाची खरी इच्छा काय आहे ते नीट समजून घेऊन येशूच्या बाप्तिस्म्याद्वारें आपली पापें त्याच्याकडे दिली गेली ह्रावर विश्वास ठेवणे. देवाच्या राज्याची वाढ करण्यासाठीं जगणे. शेवटी मरणाच्या दिवसापर्यंत सुवार्तेचा उपदेश करणे.
ख्रिस्ती मित्रहो! जे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात ते देवाचें काम करीत असतात. देवानें ज्याला पाठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवणे हेच देवाचे काम करण्यासारखे आहे. ज्याला देवानें पाठवले त्याच्याकडे आपली सर्व पापें दिली गेली तो येशू ख्रिस्त आपला तारणकर्ता आहे असा विश्वास ठेवणे म्हणजेच देवाची इच्छा पुरी करणे.
यार्देनेवर येशूचा बाप्तिस्मा झाला त्यानंतर तो आपल्यासाठीं वधस्तंभावर मरण पावला तेव्हां माणसाला सर्व पापांपासून मुक्त करण्याचें काम पूर्ण झाले. ज्याला देवानें पाठवले त्यानें जगाची सर्व पापें नेली त्या तारणकत्र्यावर विश्वास ठेवून सुवार्तेचा प्रसार जगभर करणे हा देवाच्या कामाचा दुसरा भाग आहे.
आता नव्यानें जन्म घेतलेल्या आपण सर्वांनी जगाच्या अंतापर्यंत सुवार्तेसाठी जगून तिचा प्रसार केला पाहिजे.
देवाची इच्छा समजून न घेता जे येशूवर
विश्वास ठेवतात ते कुठे जातात?
ते नरकांत जातात.
"त्या दिवशीं पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नांवानें संदेश दिला, तुझ्या नांवानें भुते घालविलीं, व तुझ्या नांवानें पुष्कळ महत्कृत्ये केलीं नाहींत काय? तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधींच ओळख नव्हाती; अहो अनाचार करणायांनो माझ्यापुढून निघून जा." (मत्तय 7:22-23).
ह्रा परिच्छेदावरून देवासमोर अनाचार करणारे पापी लोक कोण आहेत हे आपल्याला स्पष्टपणे समजते. "प्रभो, प्रभो", म्हणणाया लोकांत नव्याने जन्म न घेतलेले पुष्कळ आहेत. त्यांना वेदना होत आहेत याचे कारण त्यांच्या ह्मदयांत पाप आहे. म्हणूनच ते कुरकूर केल्यासारखे कांहीश्या ढोंगीपणाने "प्रभो, प्रभो," म्हणत रडतात.
त्यांना वाटते कीं प्रार्थना करतांना त्यांनी जर अश्रू ढाळले तर त्यांची सद्सद्विवेकबुद्धि धुतली जाईल, पण हे अशक्य असते कारण त्यांच्या ह्मदयांत पाप असतेच असते. ते पर्वतावर जाऊन ढसढसा रडतात. जसा कांही देव खूप दूर आहे. आपला विश्वास पूर्ण नसेल तर उठसूठ "प्रभो, प्रभो" म्हणण्याकडे आपला कल जातो.
ज्या चर्चमध्ये लोकांचा नव्यानें जन्म झालेला नाही तेथे चर्चचे लोक इतक्या उत्साहपूर्ण जोमाने प्रार्थना करतात कीं व्यासपिठच खाली कोसळते.
पण बायबलवरून आपल्याला समजते कीं `प्रभो प्रभो` म्हणणाया प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होत नाही. जे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वासच त्यांना देवाचे काम करण्याचा मार्ग दाखवतो.
बायबल म्हणते कीं ह्मदयांत पाप राखून देवाचें नांव घेणे हे पाप आहे. तुम्ही कधी पर्वतावरील प्रार्थनेच्या सभांना हजेरी लावली आहे काय? तेथे कांही वृद्ध स्त्रिया खूप रडतात. याचे कारण त्यांना येशू भेटलेला नसतो किंवा पाणी व आत्म्यापासून त्यांचा नव्याने जन्म झालेला नसतो. देवाचें नांव त्या फार उतावीळपणे घेत असतात याचे कारण आपण नरकांत जाऊ अशी भीतीमध्ये त्या रहात रहातात.
समजा एखाद्याने आपले आयुष्य चर्चच्या सेवेसाठी, किंवा मिशनरी म्हणून किंवा पाळक म्हणून घालवले असेल आणि त्याला जर देवानें सोडले तर काय होईल? आईवडलांनी किंवा लग्नाच्या जोडीदाराने सोडून देणे हे कारण एखाद्याचा ह्मदयभंग होण्यासाठीं पुरेसे असते. पण राजांचा राजा, आपल्या आत्म्याचा न्यायाधीश अशा परमेश्वरानेच आपल्याला सोडले तर आपण कुठे जाणार?
तुमचं असं कांही व्हावे अशी माझी इच्छा नाही. कृपा करून पाणी व आत्म्याची सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवा. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेने आपण जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे.
आपण सर्व ख्रिस्ती लोकांनी पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून बायबलमधील सत्यवचनांपासून शक्ति घेतली पाहिजे. तसे केले तरच देवाच्या न्यायनिवाडट्यापासून आपली सुफ्का होऊ शकेल.