• All e-books and audiobooks on The New Life Mission website are free
  • Explore multilingual sermons in global languages
  • Two new revised editions in English have been released
  • Check out our website translated into 27 languages
Search

Sermons

Subject 4 : Resolving daily sins

< 4-1 > उदंड प्रायश्चित्ताची सुवार्ता (योहान 13:1-17)

(योहान 13:1-17)
"वल्हांडण सणापूर्वी असें झालें कीं, येशूनें आतां ह्रा जगांतून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहें हें जाणून ह्रा जगांतील स्वकीयांवर त्याचें जें प्रेम होतें ते त्यानें शेवटपर्यंत केलें. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्राच्या मनांत त्याला धरून द्यावें असें सैतान घालून चुकला होता. तेव्हां आपल्या हातीं पित्यानें अवघें दिलें आहे, व आपण देवापासून आलों व देवाकडें जातों हें जाणून भोजन होतेवेळीं येशू भोजनावरून उठला, व त्यानें आपली बाह्रवस्त्रे काढून ठेवलीं आणि रूमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळांत पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊं लागला, आणि कमरेस बांधिलेल्या रूमालानें ते पुसूं लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हां तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूनें त्याला उत्तर दिले, मी करितों ते तुला आतां कळत नाही; तें तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हांला माझे पाय कधींहि धुवावयाचे नाहींत. येशूनें त्याला उत्तर दिलें, मीं तुला न धुतलें तर माझ्याबरोबर तुला वांटा नाहीं. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुऊं नका, तर हात व डोकेंहि धुवा. येशूनें त्याला म्हटलें, ज्याचें स्नान झालें आहे त्याला पायांखेरीज दुसरें कांही धुण्याची गरज नाहीं. कारण तो सर्वांगी शुध्द आहे; आणि तुम्ही शुध्द आहां, पण सगळे जण नाही. कारण आपणांस धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता; म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळे जण शुध्द नाहीं. मग त्यांचें पाय धुतल्यावर व आपलीं वस्त्रें चढवून पुन्हा बसल्यावर त्यानें त्यांना म्हटलें, मीं तुम्हांला काय केलें आहे हें तुम्हांला समजलें काय? तुम्ही मला गुरू व प्रभु असें संबोधितां आणि तें ठीक बोलतां; कारण मी तसा आहेंच. म्हणून मी प्रभु व गुरू असूनहि जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसें मी तुम्हांला केलें तसें तुम्हींहि करावें म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हांला खचित खचित सांगतों, दास आपल्या धन्यापेक्षां थोर नाहीं आणि पाठविलेला जो पाठवितो त्याच्यापेक्षां थोर नाहीं;जर ह्रा गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्यानें तुम्ही धन्य आहां."
  
 
वल्हांडण सणापूर्वी येशूनें पेत्राचे पाय कां धुतले? त्याचे पाय धूत असतांना येशू म्हणाला, "मी करितों तुला आतां कळत नाहीं; तें तुला पुढे कळेल." शिमोन पेत्र हा येशूचा सर्वांत उत्तम शिष्य होता. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष त्यानेच दिलेली होती. येशूनें त्याचे पाय धुतले याचे कांही कारण असले पाहिजे. येशू हा ख्रिस्त आहे अशी कबुली देऊन पेत्राने एकप्रकारे येशू हाच तारणकर्ता जो त्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करणार आहे असा ठाम वि·श्वास प्रदर्शित केला.
 
वधस्तंभावर खिळले जाण्याच्या आधी
येशनें त्याच्या शिष्यांचे पाय
कां धुतले?
तारण म्हणजे काय हे शिष्यांना समजावे
म्हणूनच येशूनें त्यांचे पाय धुतले.
 
येशूनें पेत्राचे पाय कां धुतले? पेत्र त्याला लवकरच तीन वेळा नाकारणार आहे आणि पुढील काळांत पण तो खूप पापें करणार आहे हे येशूला माहित होते.
जर येशूच्या स्वर्गारोहणानंतर पेत्राच्या ह्मदयांत पापें राहून गेली असती तर येशूबरोबर एक होणे त्याला जमलेच नसते. येशूला त्याच्या शिष्यांच्या कमकुवत अशक्त मनांची जाणीव होती. त्यांची पापें त्याच्या व शिष्यांच्या मध्ये आडभिंतीप्रमाणे यावी अशी त्याची इच्छा नव्हती. त्या सर्वांचे दोष व अपराध त्यानें आधीच धुतलेले आहेत हे शिकवण्यासाठीच त्यानें शिष्यांचे पाय धुतले. शिष्यांना सोडून मृत्युला सामोरे जाण्याआधीच त्या सर्वांना त्यांच्या आयुष्यभराची पापें संपूर्णतः धुऊन टाकणारी त्याच्या बाप्तिस्म्याची सुवार्ता नीट समजलेली आहे अशी खात्री येशूने करून घेतली होती.
योहानाच्या 13 व्या अध्यायांत येशूने त्याच्या शिष्यांसाठी केलेल्या तारणाच्या परिपूर्णतेबद्दल सांगितलेले आहे. शिष्यांचे पाय धुतांना त्यानें बाप्तिस्म्याची सुवार्ता सांगितली.
"पुढील काळांत तुम्ही सैतानाकडून फसवले जाऊ नका. यार्देन नदींत बाप्तिस्मा घेतला तेव्हाच मी तुमची सर्व पापें स्वतःकडे घेतली. त्या पापांची किंमत मी वधस्तंभावर देणार आहे. त्यानंतर मी मरणातून उठेन. नव्याने जन्मून होणारे तारण मी तुम्हांला देईन. पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी जी पूर्वीची सुवार्ता होती ती तुम्हाला समजावी आणि तुम्हां सर्वांची भविष्यकाळांतील पापें मी आधीच धुतलेली आहेत हे तुम्हांला समजावे म्हणूनच वधस्तंभावर जाण्याआधी मी तुमचे पाय धुतले आहेत. नव्याने जन्म घेण्याचा संदेश देणारी जी सुवार्ता आहे तिचे रहस्य हेच आहे. तुम्ही सर्वांनी यावर वि·श्वास केला पाहिजे."
येशूनें त्याच्या शिष्यांचे पाय कां धुतले आणि तो असं कां म्हणाला, "मी करितों ते तुला आतां कळत नाहीं; तें तुला पुढे कळेल." हे सर्व आपण समजून घ्यायला पाहिजे. ते समजले तरच आपण नव्याने जन्म घेण्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून आपण स्वतः पुन्हां नव्याने जन्मू शकतो.
 
 
योहान 13:12 यांत त्यानें असं म्हटले
 
अपराध म्हणजे काय?
आपल्यातील कमकुवतपणामुळें आपण दररोज
जी पापें करतो ती म्हणजेच अपराध.
 
वधस्तंभावर जाण्यापूर्वी वल्हांडण सणांत येशू शिष्यांबरोबर होता. स्वतःच्या हातानें त्यांचे पाय धुऊन येशूने त्यांना त्यांच्या पापांची क्षमा होण्याच्या सुवार्तेबद्दल सांगितले.
"तेव्हां आपल्या हातीं पित्यानें अवघें दिलें आहे, व आपण देवापासून आलों व देवाकडे जातों हें जाणून भोजन होतेवेळीं येशू भोजनावरून उठला, व त्यानें आपलीं बाह्रवस्त्रें काढून ठेवलीं आणि रूमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळांत पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊं लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हां तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, मी करितों तें तुला आता कळत नाहीं; तें तुला पुढें कळेल."
त्यानें त्याच्या शिष्यांना बाप्तिस्म्याची सुवार्ता सांगून बाप्तिस्म्याच्या पाण्याने पापांचे प्रायश्चित्त कसे केले जाते हे दाखवून दिले.
येशूनें आपले पाय कां धुतले हे त्याचा अति वि·श्वासू शिष्य पेत्र याला समजले नाही. शिष्यांचे पाय पाण्याने धुऊन येशूला त्याच्या बाप्तिस्म्याच्या पाण्याने पापें धुतली गेलेली आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे होते. येशूचे बोलणे ऐकल्यानंतर पेत्राच्या येशूवरील वि·श्वासांत परिवर्तन झाले.
पेत्र त्याच्या भविष्यकाळातील पापांमुळे विशेषकरून त्याच्या देहाच्या पापांमुळे आपल्याजवळ कदाचित येऊ शकणार नाही अशी काळजी येशूला वाटत होती. सैतानाने त्याच्या शिष्यांचा वि·श्वास हिरावून नेऊ नये म्हणूनच येशूनें त्यांचे पाय धुतले. कांही काळानंतर पेत्राला ते कारण समजले.
येशूनें अशा प्रकारे मार्ग सिध्द केला यासाठी की जो कोणी त्याच्या बाप्तिस्म्याच्या पाण्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवेल त्याला कायमसाठी पापांपासून सुटका मिळेल.
योहानाच्या 13 व्या अध्यायांत शिष्यांचे पाय धुतांना म्हटलेले येशूचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांचा जन्म नव्याने झाला आहे त्यांनाच त्या शब्दांचा खरा अर्थ समजू शकतो.
शिष्यांची सबंध आयुष्यांतील पापें त्याने अगोदरच धुतलेली आहेत हे समजावे म्हणूनच येशूने वल्हांडण सणापूर्वी शिष्यांचे पाय धुतले. येशू म्हणाला, "मी तुमचे पाय कां धुत आहे हे तुम्हांला आत्ताच समजणार नाही पण नंतर तुम्हांला समजेल." पेत्राला उद्देशून म्हटलेल्या या शब्दांतच पुन्हां जन्मण्याचे सत्य दडलेले आहे.
सर्व पापें धुऊन टाकत असलेल्या बाप्तिस्म्यावर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे. येशूचा यार्देन नदींत झालेला बाप्तिस्मा म्हणजेच डोक्यावर हात ठेवून सर्व पापें अर्पणाच्या शिरीं देण्याची सुवार्ता आहे. येशूच्या शब्दांवर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे. बाप्तिस्म्याच्या द्वारे त्यानें सर्व लोकांची पापें स्वतःच्या माथीं घेतली आणि त्या पापांबद्दल त्याने वधस्तंभावर मृत्युदंडाची शिक्षा घेतली.
 
 
येशूचा बाप्तिस्मा व रक्त यामुळे सबंध आयुष्यांतील पापांची क्षमा होणे साध्य झाले
 
वधस्तंभ, पुनरुत्थान व स्वर्गारोहण यानंतर सैतान येऊन आपल्या शिष्यांना फसवायचा प्रयत्न करील हे येशूला माहित होते. "तुम्ही जिवंत देवाचे पुत्र, ख्रिस्त आहांत" असं ठाम वि·श्वासाने बोलणारा पेत्र याची साक्ष आपल्याला माहितच आहे. तरीसुध्दां येशूची इच्छा होती की पेत्राला पुन्हां एकदा पापांपासून क्षमा होण्याच्या सुवार्तेबद्दल सांगावे. ती सुवार्ता म्हणजेच त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे त्याने जगाची सर्व पापे घेतली हीच होय. तिच्याबद्दल येशूने पेत्राला, त्याच्या शिष्यांना व जे आपण नंतर येणार होता त्या आपल्याला पण सांगितले आहे. "मी करितों तें तुला आता कळत नाहीं; तें तुला पुढें कळेल."
 
नीतिमान माणसाच्या विरूध्द सैतानाचा
काय `पाश`असतो?
नीतिमान माणसाला फसवण्याचा प्रयत्न करून
सैतान त्याला पुन्हां पापी बनवू पहातो.
 
येशूच्या शिष्यांनी कधी पाप केलेच तर सैतान त्यांना म्हणत असे, "तू जर पाप केलेस तर तू कसा काय निष्पाप ठरणार? आणि तुझे तारण झाले नाही तर तू पापीच ठरतो." हे सर्व टाळण्यासाठी येशूनें त्याच्या शिष्यांना बाप्तिम्याच्या द्वारे त्या सर्वांची भूत, वर्तमान व भविष्य काळांतील पापें धुऊन टाकलेली आहेत हे सांगितले.
"तुम्हांला माहित आहे की माझा बाप्तिस्मा झाला होता! मानवजातीची सुरूवातीपासूनची पापें आणि तुम्हां सर्वांची आयुष्यभराची सर्व पापें धुऊन टाकण्यासाठी यार्देन नदींत माझा बाप्तिस्मा झाला होता. माझा बाप्तिस्मा व वधस्तंभावरील माझे मरण याचे काय कारण होते ते तुम्हांला आता तरी समजते का?" येशूने त्याच्या शिष्यांचें पाय धुऊन त्यांना दाखवून दिले की त्यानें त्यांची दैनंदिन पापें सुध्दां बाप्तिस्म्याच्या द्वारे घेतली व त्या पापांबद्दल तो वधस्तंभावर जाणार होता.
आपल्या सर्व पापांची क्षमा होऊन आपले तारण झालेले आहे याचे कारण म्हणजे आपण येशूचा बाप्तिस्मा व रक्त यावर वि·श्वास ठेवतो हेच आहे. पापांच्या प्रायश्चित्ताबद्दलच्या या सुवार्तेवर वि·श्वास ठेवण्याने आपल्याला पापमुक्ती मिळालेली आहे.
चुकून कधीतरी पुन्हां पाप करण्याने तुम्ही पापी ठरता का? नाही. कधीच नाही. येशूने जर तुमची सर्वच पापें काढून टाकलेली आहेत तर तुम्ही परत कसे काय पापी ठरू शकता? येशूचा बाप्तिस्मा व त्याचे वधस्तंभावरील रक्त म्हणजेच आपल्या सर्व पापांच्या प्रायश्चित्ताची सुवार्ता आहे. जो या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतो तो `नीतिमान माणूस` म्हणून पुन्हां नव्याने जन्मतो.
 
 
नीतिमान माणसं परत कधीहि पापी बनू शकत नाहीत
 
नीतिमान माणसे पुन्हां पापी कां
ठरत नाहीत?
कारण येशूनें त्यांच्या सर्व पापांसाठी
अगोदरच प्रायश्चित्त केलेले आहे.
 
तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करीत असलेल्या पाणी व आत्मा या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून सुध्दां तुम्हांला आपण अजूनहि पापी आहोत असं वाटत असेल तर येशूने तुमची पापें घ्यावी यासाठी तुम्हांला जेथे येशूचा बाप्तिस्मा झाला त्या यार्देन नदीच्या तीरी जावे लागेल. जर तुम्ही परत पापी ठरला तर येशूला पुन्हां एकदा बाप्तिस्मा घ्यावा लागेल. पापांची क्षमा करीत असलेल्या येशूच्या बाप्तिस्म्यावर तुम्ही वि·श्वास ठेवला पाहिजे. येशूने एकदाच एकाचवेळी आपले सर्वच्या सर्वच अपराध स्वतःकडे घेतले हे तुम्ही तुमच्या मनांत सतत ठेवले पाहिजे. येशू हा तारणकर्ता आहे असा द्दढ वि·श्वास तुम्ही ठेवला पाहिजे.
येशू तुमचा तारणकर्ता आहे असा वि·श्वास तुम्ही ठेवता याचा अर्थ तुम्ही तुमची सर्व पापें काढून टाकीत असलेल्या येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास ठेवता असाच होतो. जर तुम्ही येशूचा बाप्तिस्मा, वधस्तंभ, मृत्यु आणि त्याचें पुनरुत्थान यावर खरोखरच वि·श्वास ठेवला तर तुम्ही कितीहि प्रकारची पापें जरी केलेली असतील तरीसुध्दां परत पापी ठरले जात नाही. याचे कारण हेच की तुमच्या वि·श्वासामुळे आयुष्यांतील सर्व पापांपासून तुम्हांला मुक्ती मिळालेली आहे.
आपली भविष्यकाळातील पापें आणि आपण आपल्या कमकुवतपणापायी जी पापें करतो ती सुध्दां येशूने धुतलेली आहेत. स्वतःच्या बाप्तिस्म्याचें महत्त्व समजावे म्हणूनच येशूने शिष्यांचे पाय धुतले. पापांची क्षमा होण्याच्या सुवार्तेचें पाय धुणें हे एक प्रतिक होते. येशूचा बाप्तिस्मा झाला, तो वधस्तंभावर मरण पावला, त्याचें पुनरुत्थान झाले, तो स्वर्गांत गेला यासाठी की उदंड प्रायश्चित्ताच्या सुवार्तेची परिपूर्णता व्हावी. त्यामुळेच येशूचे शिष्य उदंड प्रायश्चित्ताची सुवार्ता, येशूचा बाप्तिस्मा, वधस्तंभ व त्याचे पुनरुत्थान याबद्दल त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सांगू शकले.
 
 
पेत्राच्या देहाचा अशक्तपणा
 
पेत्रानें येशूला कां नाकारले?
कारण तो अशक्त होता.
 
बायबलमध्ये लिहिलेले आहे कीं प्रमुख याजक कयफा याच्या कामदारांबरोबर पेत्र बसलेला होता तेव्हां ते त्याच्यावर आरोप करू लागले की तो नासोरी येशूबरोबर होता. पेत्राने दोन वेळा नाकारून म्हटले, "मी त्या मनुष्याला ओळखत नाही." नंतर शापोच्चारण करून व शपथा वाहून त्यानें पुन्हा तसेच म्हणून तीन वेळां नाकारले.
आपण आता मत्तय 26:69 पासून वाचूया, "इकडे पेत्र वाड¬श्वंत बाहेर बसला होता, तेव्हां एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूहि गालीली येशूबरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तूं काय म्हणतेस तें मला ठाऊक नाहीं. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांस म्हटलें, हा नासोरी येशूबरोबर होता. पुन्हां तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाहीं. नंतर कांहीं वेळानें तेथें उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर, तूंहि त्यांतला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तूं कोण आहेस हें दिसून येतें. तेव्हां तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाहीं. इतक्यांत कोंबडा आरवला. तेव्हां कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तूं मला नाकारशील असें जें येशूनें पेत्राला सांगितले होतें तें त्याला आठवलें आणि तो बाहेर जाऊन मोठ¬श्व दुःखानें रडला." (मत्तय 26:69-75)
खर म्हणजे पेत्राने येशूवर वि·श्वास ठेवलेला होता. वि·श्वासपूर्वक येशूला अनुसरून पेत्र त्याला संदेष्टा, त्याचा तारणकर्ता प्रभु असच समजत होता. पण पिलाताच्या न्यायसभेंत जेव्हां येशूला नेण्यात आले होते त्यावेळी पेत्राला वाटले की येशूबरोबर असलेले आपले संबंध उघडपणे दाखवणे धोक्याचे आहे. म्हणूनच त्याने शापोच्चारण करून येशूला नाकारले.
पेत्राला माहित नव्हते की तो येशूला नाकारील. पण येशूला माहित होते की पेत्र त्याच्या दुर्बलतेमुळे त्याला नाकारणार आहे. म्हणूनच येशूनें पेत्राचे पाय घुऊन त्याला तारणाची सुवार्ता सांगितली, ती सुवार्ता योहान 13 मध्ये लिहिलेली आहे, "तू भविष्यकाळांत पापें करशील पण मी ती सर्व पापें आधीच धुतलेली आहेत."
स्वतःचा जीव धोक्यांत येत आहे अशी चाहूल लगली तेव्हां पेत्राने खरच येशूला नाकारले पण देहाच्या अशक्तपणापायी त्याला असं वागावं लागले. म्हणूनच स्वतःच्या शिष्यांना त्यांच्या भविष्यकाळांतील पापांपासून वाचवण्यासाठी येशूने त्याचे पाय धुतले.
"मी तुमची भविष्यकाळातील पापें सुध्दां काढून टाकीन. मला वधस्तंभावर खिळणार आहेत कारण बाप्तिस्म्याच्या द्वारे मी तुमची सर्व पापें स्वतःकडे घेतली होती. आता या पापाचा दंड मी भरणार आहे. मी तुमचा तारणकर्ता देव आहे. मी तुमच्या सर्व पापांची पुरी किंमत देणार आहे. माझा बाप्तिस्मा व रक्त यामुळे मीच तुमचा मेंढपाळ आहे."
आपण देहाने अशक्त आहोत म्हणूनच आपला नव्यांने जन्म झालेला असतांना सुध्दां आपण पुन्हां पाप करतो. अर्थात आपण पाप करायला नको आहे पण जेव्हां आपण पाप करतो तेव्हां आपल्याला सुध्दां पेत्राप्रमाणें अडचणीला सामोरे जावे लागते. मनांत कांही काळेबेरे नसतांना सुध्दां कधी कधी पाप करण्याकडे आपला कल जातो. आपण देहामध्ये राहत आहोत. कधी कधी आपल्या पापांपायी आपण विनाशमार्गाकडे जातो. जोपर्यंत आपण ह्रा अधार्मिक जगांत राहत आहोत तोपर्यंत आपला देह पाप करीतच रहाणार. पण येशूने त्याचा बाप्तिस्मा व वधस्तंभावरील रक्त याच्या द्वारे आपली सर्व पापें काढून टाकलेली आहेत.
येशू हाच आपला तारणकर्ता असं म्हणायला आपण नकार देत नाही पण आपण देहांत राहत असल्यामुळे आपण पापें करीतच राहतो आणि असं करून आपण देवाच्या इच्छेच्या विरूध्द वागतो. याचे कारण आपण देहरूपाने जन्मलेलो आहोत.
येशूला माहित होते की आपण देहाने पापी आहोत. म्हणूनच स्वतःच्या बाप्तिस्म्याने व रक्ताने आपल्या सर्व पापांची किंमत मोजून तो आपला उध्दारकर्ता बनला. जे लोक त्याच्या तारणकार्यावर व पुनरुत्थानावर वि·श्वास ठेवतात त्या सर्वांचे अपराध त्यानें काढून टाकलेले आहेत.
चारहि शुभवर्तमानाची सुरूवात योहानाकडून झालेल्या येशूच्या बाप्तिस्म्याने होते. मानवीं आयुष्य जगतांना नव्याने पुन्हां जन्मण्याची सुवार्ता आणि तारणाची सुवार्ता परिपूर्ण करणे हाच त्याचा उद्देश होता.
 
आपण देहाने किती काळ
पाप करीत राहतो?
मरेपर्यंत संपूर्ण आयुष्यभर
आपण पाप करीतच राहतो.
 
जेव्हां पेत्राने येशूला केवळ एकदाच नाही, पण कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा नाकारले तेव्हां येशूच्या ह्मदयाला किती यातना झाल्या असतील! त्याला किती लाजिरवाणे वाटले असेल! पेत्राने निश्चयपूर्वक येशूला सांगितले होते की इतर शिष्य त्याच्याविषयी अडखळले तरी तो कधीहि अडखळणार नाही. पण देहाच्या अशक्तपणामुळे पेत्राने पाप केले. दुबळेपणाला बळी पडून येशूला तीन वेळा नाकारल्यानंतर त्याला कसं वाटले असेल? येशूकडे पाहिल्यानंतर त्याला किती शरम वाटली असेल!
पण येशूला हे सर्व किंवा त्याहून अधिक माहित होते. म्हणूनच तो म्हणाला, "मला माहित आहे की तू पुन्हां पाप करशील. तुझ्या पापामुळे तू डगमगून जाऊन पुन्हां पापी बनला तर तुला माझ्याकडे परत येणे अशक्य होऊ नये म्हणून माझ्या बाप्तिस्म्याने मी तुझी सर्वच पापें काढून टाकलेली आहेत. मी तुझा तारणकर्ता आहे. मी तुझा देव व मेंढपाळ आहे. पापांची क्षमा होण्याच्या सुवार्तेवर तू वि·श्वास ठेव. तू जरी देहाने पाप करीत राहिलास तरी मी तुझ्यावर प्रेम करीत राहिन. मी तुझे सर्व अपराध पूर्वीच धुतलेले आहेत. पापांची क्षमा होण्याची सुवार्ता सार्वकालिक आहे. माझे तुझ्यावरील प्रेम पण सार्वकालिक निरंतर आहे."
येशूने पेत्राला व इतर शिष्यांना म्हटले, "मीं तुला न धुतलें तर माझ्याबरोबर तुला वांटा नाहीं." लोकांनी पाण्यानें आणि आत्म्यानें पुन्हां जन्मणे हे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजावे म्हणूनच योहानाच्या 13 व्या अध्यायांत येशूने असं म्हटले आहे. तुम्ही यावर वि·श्वास ठेवता का?
योहान 13:9 मध्ये लिहिले आहे, "शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुऊं नका, तर हात व डोकेंहि धुवा. येशूने त्याला म्हटलें, ज्याचें स्नान झालें आहे त्याला पायांखेरीज दुसरे कांहीं धुण्याची गरज नाहीं. कारण तो सर्वांगीं शुध्द आहे."
मित्रहो, भविष्यकाळांत तुम्ही देहाने पाप करणार की नाही करणार? तुम्ही नक्कीच पाप कराल. पण येशूने तर सांगितले आहे की त्यानें आपली भविष्यकाळातील पापें आणि आपल्या देहाची पापें सुध्दां आधीच त्याच्या बाप्तिस्म्याने व रक्ताने धुतलेली आहेत वधस्तंभावर जाण्यापूर्वीच येशूने त्याच्या शिष्यांना स्पष्टपणें प्रायश्चित्ताची सुवार्ता सांगितली होती.
आपला देह अशक्त व दुर्बल असल्यामुळे आपण पापाखेरीच कांही करू शकत नाही. येशूने जगाची सर्व पापें धुतलेली आहेत. त्यानें आपले डोके व शरीर फक्त धुतलेले नाही तर आपले पाय व भविष्यकाळातील आपली पापें सुध्दां धुतलेली आहेत. येशूच्या बाप्तिस्म्यामुळे पुन्हा जन्मण्याची सुवार्ता ती हीच.
येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर योहान म्हणाला, "हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" (योहान 1:29). येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां त्याच्याकडे दिलेली जगाची सर्व पापें धुतली गेली यावर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे.
या जगांत जीवन जगत असतांना माणसं पापाखेरीज दुसरं कांही करू शकत नाही. हे सत्य आपण स्वीकारायला पाहिजे. आणि जेव्हां जेव्हां देहाची दुर्बलता प्रकट होऊ लागते त्यावेळी आपण स्वतःला बजावले पाहिजे की येशूने पापांची क्षमा होणा­या सुवार्तेने जगाची सर्व पापे धुऊन टाकली आणि त्या पापांची किंमत त्याने त्याच्या रक्तानें मोजली. आपण त्याबद्दल पूर्ण ह्मदयाने येशूचें आभार मानायला पाहिजे. आपला वि·श्वास प्रकट करून येशू हा तारणकर्ता देव आहे असं म्हटलं पाहिजे. परमे·श्वराचे स्तवन करा.
जगांत प्रत्येक जण देहाने पाप करतो. देहाच्या पापांमुळे लोक मरतात. लोक सातत्याने त्यांच्या देहाने पाप करीत असतात.
 
 
लोकांच्या ह्मदयांत असलेले वाईट विचार
 
एकाद्या व्यक्तीला भ्रष्ट काय करते?
वेगवेगळी पापें व वाईट विचार.
 
मत्तय 15:19-20 मध्ये येशूने म्हटले, "कारण अंतःकरणांतूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चो­या, खोट¬श्व साक्षी, शिव्यागाळी हीं निधतात. ह्रा गोष्टी माणसाला विटाळवितात; न धुतलेल्या हातांनीं जेवणें हे माणसाला विटाळवीत नाही." ह्मदयांत असलेली वेगवेगळ्या प्रकारची पापेंच माणसाला भ्रष्ट करीत असतात.
 
 
प्रत्येकाने स्वतःचा वाईट स्वभाव ओळखून घ्यायला पाहिजे
 
प्रत्येकाच्या ह्मदयांत काय असते?
बारा प्रकारची पापें. (मार्क 7:21-23)
 
आपण असं म्हणायला हवं, "लोकांच्या ह्मदयांत ही बारा प्रकारची पापें आहेत. माझ्या पण ह्मदयांत ती पापें आहेत. बायबलमध्ये लिहिलेली बारा प्रकारची पापें माझ्या ह्मदयांत आहेत." पाण्याने व आत्म्याने जन्मायच्या आधी आपण या सर्व पापांची कबूली देऊन देवापुढे स्वतःला पूर्ण पापी असं समजून शरण जायला पाहिजे. पण आपण असं न करता आपल्या पापांबद्दल सबबी सांगून म्हणतो "माझ्या मनांत तसं कांही नव्हते. थोडा काळ मी बहकलो होतो".
येशू माणसांबद्दल काय म्हणतो? त्यानें स्पष्टपणे म्हटले होते की जे माणसाच्या ह्मदयातून बाहेर येते ते त्याला भ्रष्ट करिते याने आपल्याला सांगितले कीं लोकांच्या मनांत वाईत विचार असतात. तुम्हांला काय वाटते? तुम्ही चांगले आहांत की वाईट? तुम्हांला माहित आहे का की सर्वांचेच विचार वाईट असतात? होय, प्रत्येकाचेच विचार वाईट असतात.
कांही वर्षापूर्वी सोल या ठिकाणीं सॅमपूंग डिपार्टमेन्ट स्टोरची इमारत खाली कोसळली. अनेक कुटुंबांनी त्यांची जिव्हाळ्याची माणसं गमावली होती त्यामुळे ती अती शोकाने रडत होती. पण पुष्कळ लोक त्या ठिकाणी मजा पहायला गेल्यासारखे गेले होते.
कांही लोकांनी विचार केला, "किती लोक मेले असतील? 200? नाही, हा आकडा कमी वाटतो. 300? मृतांची संख्या हजारपर्यंत असती तर मग ही बातमी सनसनाटी ठरली असती...." लोकांची मनं इतकी वाईट असू शकतात. मृत व्यक्तींचा केवढा हा अपमान!
अशा ठिकाणी जे लोक बघायला जमतात त्यांना कांहीच सहानुभूति नसते. `आणखी लोक मेले असते तर धमाल आली असती!` काय हे प्रदर्शन! जेथे लोक जास्त आहेत अशा ठिकाणी इमारत कोसळली असती तर काय झाले असते अशा प्रकारचे पण मत लोक प्रदर्शित करतात.
आपल्याला माहितच आहे लोक किती वाईट आहेत. अर्थात ते त्यांचे वाईट विचार मोठ¬श्वने बोलून दाखवित नाहीत. बाहेरून ते सहानुभूति दाखवतात पण मनातून मात्र जास्त सनसनाटी बातमीची अपेक्षा करतात. स्वतःला कांहीहि न होता इतर ठिकाणी हजारो लोक मरत असतील तर ते त्यांना पहायला आवडते. नव्याने जन्म घेण्याआधी आपल्यापैकी पुष्कळजण असे असतात.
 
 
प्रत्येक माणसाच्या ह्मदयांत खून आहे
 
आपण पाप कां करतो?
कारण आपल्या ह्मदयांत वाईट विचार
असतात म्हणूनच.
 
देवाने सांगितले की प्रत्येक माणसाच्या ह्मदयांत खून असतो. पुष्कळ लोक ते मानीत नाहीत. "तुम्ही असं कसं म्हणता? माझ्या ह्मदयांत खूनाबद्दल अजिबात विचार नाही. तुम्ही असा विचार कसा काय करू शकता?" ते लोक त्यांच्या ह्मदयांत खून आहे हे कबूल करीत नाहीत. त्यांना वाटते खून करणा­यांची एक वेगळीच जात असते.
"दोन दिवसापूर्वीच्या बातमीमधील तो एकामागून एक खून करणारा खूनी, अलिकडेच एका जमावाने जाळपोळ करून अनेक लोकांना मारून टाकले यासारख्या लोकांच्या ह्मदयांत खून असतो. त्यांची एक वेगळीच जात असते. मी त्यांच्यासारखा असूच शकत नाही! तेच खूनी आहेत!" असं बोलून ते लोक चिडून ओरडून म्हणतात, "ही पापाची अवलाद पृथ्वीवरून नाहीशी केली पाहिजे! त्या सर्वांना मृत्युदंड दिला पाहिजे!"
दुर्दैवाने हे असे विचार दोन्ही प्रकारचे लोक करीत असतात. देव म्हणतो की सर्व लोकांच्या ह्मदयांत खून आहे. देवाचें वचन स्वीकारून आपण म्हणायला हवे, "मी पापी आहे आणि माझ्या ह्मदयांत खून आहे."
होय, देवाने सांगितले आहे की माणसांच्या ह्मदयांत वाईट विचार आणि खून पण असतो. स्वसंरक्षणासाठी बनवलेली शस्त्रास्त्रे खून करण्याची हत्त्यारे बनतात. आपल्या मनांत खून दडून बसलेला आहे त्याचाच हा परिणाम आहे. रागाच्या भरांत किंवा भयामुळे तुम्ही खून करू शकता. मी असं म्हणत नाही कीं प्रत्येकजण खून करू शकेल. पण आपल्या ह्मदयांत खुनशी विचार असतात.
लोक वाईट विचार घेऊनच जन्माला येतात. आपल्या सर्वांच्या ह्मदयांत ते असतात. कांही जण खरंच खून करून मोकळे होतात. तसं कांही ते खुनी म्हणून जन्माला आलेले नसतात. कारण हेच की आपण खुनी बनू शकतो. आपल्या मनांत वाईट विचार आहेत असं जे देव म्हणतो तेच खरं आहे.
म्हणूनच देवाचे वचन ऐकून त्याप्रमाणे चालणे हा एकच रस्ता आहे. आपण या जगांत पाप करतो याचे कारण आपल्या ह्मदयांत वाईफ् विचार भरलेले आहेत.
 
 
आपल्या ह्मदयांतील व्यभिचार
 
देव म्हणतो की प्रत्येक माणसाच्या ह्मदयांत व्यभिचार आहे. तुम्हांला हे पटते का? तुमच्या ह्मदयांतील व्यभिचार तुम्ही कबूल करता का? होय, प्रत्येक माणसाच्या ह्मदयांत व्यभिचार आहे.
म्हणूनच वेश्याव्यवसायासारखे पापी धंदे समाजांत भरभराटीला येत असतात. इतिहासाच्या प्रत्येक काळांत वेश्याव्यवसाय म्हणजे पैसे खात्रीने मिळणारच अशा प्रकारचा धंदा बनला होता. बाकीचे उद्योगधंदे आर्थिक टंचाईमुळे गडगडलेले आहेत पण ह्रा धंद्याला कधीच धक्का बसलेला नाही याचे कारण माणसांच्या ह्मदयांतच व्यभिचार दडून बसलेला आहे.
 
 
पापी लोकांचे फळ म्हणजे पाप आहे
 
मनुष्याची तुलना कशाबरोबर
करता येते?
पापाचं फळ देणा­या झाडाबरोबर.
 
ज्याप्रमाणे सफरचंदाच्या झाडाला सफरचंदे येतात, पेयरच्या झाडाला पेयर येतात, खजूराच्या झाडाला खजूरे येतात तसंच आपण जे 12 प्रकारची पापं ह्मदयांत घेऊन जन्माला आलेलो आहोत त्या आपल्या जीवनवृक्षाला पण पापाची फळं येतात.
येशूने म्हटले जे माणसाच्या ह्मदयांतून येते ते त्याला भ्रष्ट करिते. तुम्हांला हे पटते का? येशूबरोबर सहमत होऊन आपण म्हणू शकतो, "होय, आम्ही पापांची अवलाद आहोत. परमे·श्वरा, आम्ही पापी आहोत. तुझं म्हणणे बरोबर आहे." होय, आपण वाईटपणा कबूल केला पाहिजे. देवासमोर खर काय ते आपण सांगायला पाहिजे.
येशू ख्रिस्ताने जशी देवाची आज्ञा पाळून त्याच्या इच्छेनुसार केले, तसंच आपण सुध्दा देवाचे वचन स्वीकारून आज्ञापालन केले पाहिजे. पाणी आणि आत्मा याच्या द्वारे सर्व पापांपासून मुक्त होणे हा एकच रस्ता आपल्याला वाचवू शकतो.
माझ्या देशांत चार सुंदर ऋतु आहेत. वेगवेगळया प्रकारची फळं देणा­या झाडांना बहर येऊन ती वेगवेगळी फळं देतात. त्याचप्रमाणे आपल्या ह्मदयांतील बारा पापें त्यांचा रंग दाखवून आपल्याला पाप करण्यास लावतात. आज काय तर खून करावासा वाटलो, उद्या कदाचित व्यभिचार करावासा वाटेल.
नंतर दुस­या दिवशी वाईट विचार, नंतर चोरी, खोटी साक्ष नंतर..... आणि आपण असंच सबंध वर्षभर पाप करीत राहतोः प्रत्येक महिन्याला, प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला पाप केल्याखेरीज आपण राहत नाही. पाप करायचेच नाही असा आपण निश्चय करतो पण कांही उपयोग होत नाही. आपण पाप करीतच राहतो कारण आपण तसंच बनलेलो आहोत.
तुम्ही कधी सफरचंदाचे झाड पाहिले आहे का की जे हफ्फपीपणाने म्हणते, `मी सफरचंदाना येऊ देणार नाही.` झाडाने कांही जरी म्हफ्ले तरी वसंत ऋतुमध्ये फुलांना बहर येऊन उन्हाळ्यांत सफरचंदे येणारच. निसर्गाचा हा नियम आहे. पापी लोक पापाच्या फळाखेरीज दुसर कांहीच उत्पन्न करीत नाहीत.
 
 
येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभ हा आपल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी होता
 
प्रायश्चित्ताचा अर्थ काय आहे?
येशूचा बाप्तिस्मा (डोक्यावर दोन्ही हात ठेवणे)
आणि त्याचे वधस्तंभावरील रक्त यांच्या द्वारे
पापांची दिली गेलेली किंमत म्हणजेच
प्रायश्चित्त होय.
 
पापी लोक त्यांच्या पापांबद्दल प्रायश्चित करून त्यांचें आयुष्य आनंदाने कसे काय जगत हे आपण बायबलमध्ये पाहू. प्रायश्चित्ताची सुवार्ता ती हीच आहे.
लेवीय 4 मध्ये म्हटले आहे, "परमे·श्वरानें निषिध्द ठरविलेलें एखादें कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला, आणि त्यानें केलेलें पाप त्याला कळून आलें, तर त्यानें त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठीं एक दोषहीन बकरी आणावी. त्यानें त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करितात त्या ठिकाणीं त्याचा वध करावा. मग याजकानें त्याचें कांही रक्त बोटानें घेऊन तें होमवेदीच्या शिंगांस लावावें आणि बाकीचें सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावें. आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्राचीहि सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमे·श्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकानें तिचा वेदीवर होम करावा; याजकानें त्याच्यासाठीं प्रायश्चित्त करावें म्हणजे त्याची क्षमा होईल." (लेवीय 4:27-31)
जुन्या कराराच्या काळांत लोक त्यांच्या पापांसाठी कसे प्रायश्चित्त करीत? पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांची पापें त्याच्या माथीं ठेवीत.
लेवीय मध्ये असं लिहिले आहे, "तुमच्यापैकीं कोणी मनुष्य परमे·श्वराला पशुबलि अर्पील तेव्हां त्यानें तो गुरेंढोरें व शेरडेमेंढरें ह्रांतला अर्पावा.
गुरांढोरांतलें होमार्पण अर्पावयाचें असल्यास त्यानें दोषहीन नर अर्पावा, म्हणजे परमे·श्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. यज्ञपशूच्या डोक्यावर त्यानें आपला हात ठेवावा म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल." (लेवीय 1:2-4)
इस्त्राएली लोकांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी देवाने त्यांना पापार्पणाच्या `डोक्यावर हात ठेवून` त्यांची सर्व पापें त्याच्या माथीं ठेवण्यास सांगितले होते. पवित्र दर्शनमंडपाच्या आतमध्ये होमवेदी होती. ही वेदी एखाद्या पेटीप्रमाणे असे व तिच्या चार कोप­यंश्वना शिंगे होती. इस्त्राएली लोक त्यांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांची पापें त्याच्या माथीं ठेवून पापार्पणाला मारल्यानंतर त्याचें मांस होमवेदीवर जाळीत.
लेवीय मध्ये देवाने सांगितले त्याप्रमाणे लोक त्यांची पापें पापार्पणाच्या माथीं डोक्यावर हात ठेवून ठेवीत. त्यानंतर पापी माणूस वध केलेल्या पापार्पणाचें रक्त होमवेदीच्या शिंगांना लावीत असे. अर्पणाच्या शरीरांतले आतले भाग साफ केल्यानंतर त्याच्या मांसांचे तुकडे होमवेदीवर जाळीत. देवासाठी ते सुवासिक हव्यान्न असे. अशा प्रकारे लोक त्यांच्या रोजच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करीत.
त्याशिवाय त्यांच्या वर्षाच्या पापाबद्दल प्रायाश्चित्त असे. रोजच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्याच्या पध्दतीप्रमाणेच तेहि होते फक्त यांत फरक एवढाच की वार्षिक प्रायश्चित्ताच्या वेळी इस्त्राएल लोकांच्या वतीने प्रमुख याजक अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवीत असे. अर्पणाला मारल्यानंतर त्याचे रक्त दयासनाच्या पूर्व दिशेस तो शिंपडीत असे. इस्त्राएली लोकांसमोर जिवंत बक­याच्या डोक्यावर हात ठेवण्याचा हा विधि सातव्या महिन्यातील दहाव्या दिवशी वर्षातून एकदा असे. (लेवीय 16:5-27)
 
जुन्या करारातील पापार्पणाचे
प्रतिक कोण आहे?
येशू ख्रिस्त.
 
नव्या करारांत पापार्पणाची पध्दत कशी बदलली गेली व देवाची सार्वकालिक पध्दती कशी आली ते आपण पाहू.
येशूला वधस्तंभावर कां मरावे लागले? त्याने पृथ्वीवर येऊन काय गुन्हा केला की देवाला त्याचा पुत्राचा वधस्तंभावरील मृत्यु होऊ द्यावा लागला? त्याला वधस्तंभावरील मृत्युची जबरदस्ती कोणी केली? जेव्हां जगांतील सर्व पापी व आपण सर्व पापाच्या चिखलांत रूतून गेलो होतो तेव्हां येशू आपल्याला वाचवण्यासाठी ह्रा जगांत आला.
बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून यार्देन नदींत येशूचा बाप्तिस्मा झाला. मानवजातीच्या सर्व पापांची शिक्षा त्याने वधस्तंभावर सहन केली. जुन्या करारांत पापांच्या प्रायश्चित्तासाठी पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला मारले जात त्याचप्रकारे येशूचा बाप्तिस्मा होऊन तो रक्तबंबाळ होऊन वधस्तंभावर मरण पावला.
जुन्या करांरात पापी मनुष्य पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून, पापांची कबूली देऊन म्हणत असे, `परमे·श्वरा, मी खून व व्यभिचार करण्याचे पाप केले आहे` मग त्याची सर्व पापें पापार्पणाच्या माथीं जात असत.
ज्याप्रमाणे पापार्पणाला देवासमोर मारण्यांत येई तसंच आपल्या सर्व पापांच्या प्रायश्चित्तासाठी येशूला अर्पण करण्यांत आले. येशूचा बाप्तिस्मा झाला व त्याने खांबावर त्याचे रक्त ओतले! आपल्या सर्व पापांच्या प्रायश्चित्तासाठी त्यानें स्वतःला अर्पण केले.
खर म्हणजे येशू आपल्यामुळे मरण पावला. लोकांच्या सर्व पापांबद्दल दोषहीन पशु अर्पण करायचे काय कारण होते? त्या सर्व जनावरांना पाप म्हणजे काय ते माहित नव्हते सर्व माणसांची पापें ते घेऊ शकत नव्हते.
ज्याप्रमाणे ते पशु दोषहीन असत त्याचप्रमाणे येशू दोषहीन होता. तो पवित्र देव आहे, देवाचा पुत्र, आणि त्यानें पाप कधीच केलेले नव्हते. म्हणूनच 30 वर्षाचा असतांना यार्देन नदीतील बाप्तिस्म्याचा द्वारे त्यानें आपली पापे स्वतःच्या माथीं घेतली.
मत्तय 3 यांत लिहिल्याप्रमाणे येशूने आपली सर्व पापें घेतली. मानवजातीची सर्व पापें धुतली जाण्याची
सुवार्ता हीच होय.
 
 
पापाबद्दलच्या प्रायश्चित्ताची सुवार्ता व तिचा आरंभ
 
यार्देन नदींत योहानाकडून येशूचा
बाप्तिस्मा कां झाला?
सर्व धर्माचरण पूर्ण करण्यासाठी.
 
मत्तय 3 मध्ये लिहिले आहे, "तेव्हां योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरितां येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मीं बाप्तिस्मा घ्यावा, असें असतां आपण माझ्याकडे येतां हें काय? येशूनें त्याला उत्तर दिलें, आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." (मत्तय 3:13-15)
येशू 30 वर्षाचा असतांना त्याचा बाप्तिस्मा कां झाला हे आपण समजून घ्यायला पाहिजे. सर्व लोकांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी व सर्व धर्माचरण पूर्ण करण्यासाठी येशूचा बाप्तिस्मा झाला. सर्व लोकांना पापमुक्त करण्यासाठी निर्दोष येशूचा योहानाकडून बाप्तिस्मा झाला होता.
जगाची सर्व पापें स्वतःकडे घेऊन त्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून येशूने स्वतःला अर्पण केले. ह्रा सत्यावर आधारित असा वि·श्वास आपण ठेवला पाहिजे. वि·श्वास ठेवून पापांपासून वाचणे हे आपल्या हातीं आहे.
येशूच्या बाप्तिस्म्याचा अर्थ काय आहे? जुन्या करारांत अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या माथीं पापें ठेवीत यांत जो अर्थ आहे तोच येशूच्या बाप्तिस्म्याशी निगडित आहे.
बाप्तिस्मा करणारा योहान सर्व माणसांमध्ये थोर होता. प्रमुख याजक या नात्याने त्यानें येशूच्या डोक्यावर हात ठेवून जगाची पापें त्याच्याकडे दिली. बाप्तिस्मा याचा अर्थ `सोपवणे. किंवा `एखाद्याकडे देणे`, `पुरणे` किंवा `धुतले जाणे` असा आहे.
येशूने या जगांत येऊन योहानाकडून बाप्तिस्मा कां घेतला हे तुम्हांला माहित आहे का? बाप्तिस्म्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही येशूवर वि·श्वास ठेवता का? सबंध आयुष्यभर आपण आपल्या देहाने पापें करीत बसतो ती सर्व पापें स्वतःकडे घेण्यासाठीच बाप्तिस्मा झाला. आपल्या सर्व पापांच्या प्रायश्चित्ताबद्दल सांगणारी सुवार्ता येशूच्या बाप्तिस्म्यानें पूर्ण होण्यासाठीच योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला.
मत्तय 3:13-17 मध्ये `तेव्हां` असं लिहिलेले आहे. तेव्हां म्हणजेच ज्यावेळी येशूने बाप्तिस्मा घेऊन स्वतःकडे पापें घेतली ती वेळ होय.
`तेव्हां` येशूनें मानवजातीची सर्व पापें स्वतःकडे घेतली. तीन वर्षानंतर तो वधस्तंभावर मरण पावला. तीन दिवसानंतर तो पुन्हां उठला. सर्व जगाची पापें धुऊन टाकण्यासाठी त्याचा एकदाच बाप्तिस्मा झाला. वधस्तंभावर तो मरण पावला. तीन दिवसानंतर तो पुन्हां उठला. सर्व जगाची पापें धुऊन टाकण्यासाठी त्याचा एकदाच बाप्तिस्मा झाला. वधस्तंभावर तो एकदाच मरण पावला आणि तो मरणातून उठला तेहि एकदाच. ज्या लोकांना देवासमोर पापमुक्ती हवी आहे त्या सर्वांना त्यानें एकदाच कायमसाठी पापमुक्त केलेले आहे.
येशूचा बाप्तिस्मा कां झाला? डोक्यावर काट¬श्वंचा मुकूट ठेवून पिलातासमोर एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला कां म्हणून शिक्षा देण्यांत आली? कां म्हणून त्याला वधस्तंभावर मरेपर्यंत रक्तस्त्राव सहन करावा लागला? याचे कारण हेच की बाप्तिस्म्याच्या द्वारे त्यानें अगोदरच आपली सर्व पापें स्वतःच्या माथीं घेतलेली होती आणि त्या पापांबद्दल त्याला वधस्तंभावर मरावं लागले.
देवाने आपल्याला कसं वाचवले यावद्दल कृतज्ञ मनाने तारणाच्या शब्दांवर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे. येशूचा बाप्तिस्मा, वधस्तंभ व पुनरुत्थान या गोष्टी घडल्याच नसत्या तर आपले तारण झालेच नसते.
जे लोक तारणाच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात त्यांचा वि·श्वास असतो की येशूने बाप्तिस्माच्या वेळी सर्वच पापें स्वतःकडे घेतली होती. पण कांही लोक म्हणतात, "पण त्यानें फक्त सुरूवातीची पापें नेली" त्यांचा हा समज चुकीचा आहे.
बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की येशूने जगाची सर्व पापें एकाचवेळी, एकदाच बाप्तिस्म्याच्या द्वारे घेतली. आपली सर्व पापें आणि सुरूवातीची पापें धुतली गेलेली आहेत. मत्तय 3:15 मध्ये म्हटले आहे "कारण ह्राप्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणें करणें हें आपणांला उचित आहे." सर्व धर्माचरण पूर्ण करणे म्हणजेच सर्वच्या सर्व पापें येशूने स्वतःकडे घेणे हाच अर्थ होय.
येशूने आपल्या संपूर्ण जीवनांतील पापें धुतली आहेत का? होय, त्याने धुतलेली आहेत. लेवीयच्या पहिल्या अध्यायांत आपण याचा पुरावा पाहू या. त्याच्यामध्ये प्रमुख याजक व प्रायश्चित्ताचा दिवस यासंबंधी लिहिलेले आहे.
 
 
इस्त्राएल लोकांसाठी त्यांच्या पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्यास लागणारे अर्पण
 
पृथ्वीवरील पापार्पणाने इस्त्राएली
लोक पवित्र होऊ शकले असते का?
नाही. कधीच नाही.
 
"अहरोनानें आपल्यासाठीं पापार्पणाचा गो­हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठीं अर्पून प्रायश्चित्त करावें. मग त्यानें तें दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशीं परमे·श्वरासमोर उभे करावे. अहरोनानें त्या दोन बक­यावर चिठ¬श्व टाकाव्या; एक चिठी परमे·श्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठीं. ज्या बक­यावर परमे·श्वराच्या नांवाची चिठी निघेल तो अहरोनानें सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. ज्या बक­यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठी निघेल त्याला परमे·श्वरासमोर जिवंत उभे करावें व त्याच्याद्वारें प्रायश्चित्त व्हावें, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठीं रानांत सोडून द्यावा." (लेवीय 16:6-10). इस्त्राएली लोकांच्या वर्षभराच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी अहरोन दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारांत जात असे.
"अहरोनानें त्या दोन बक­यावर चिठट्या टाकाव्या, एक चिठी परमे·श्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठीं." प्रायश्चित्तासाठी अशा प्रकारे बक­याची गरज लागत असे.
दररोजच्या पापांसाठी पापी मनुष्य त्याची पापें वाहून नेण्यासाठी बक­याच्या डोक्यावर हात ठेवत असे. पण लोकांच्या वर्षभराच्या पापांसाठी प्रमुख याजक सातव्या महिन्यातील दहाव्या दिवशीं वर्षातून एकदा अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवी.
लेवीय 16:29-31 मध्ये म्हटले आहे, "तुमच्यासाठीं हा एक निरंतरचा विधि असावाः सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावे; त्या दिवशी कोणीहि कसलेच काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो; कारण त्या दिवशीं तुम्हांला शुध्द करावें म्हणून तुमच्यासाठीं प्रायश्चित्त करण्यांत येईल; परमे·श्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुध्द ठराल. तुमच्यासाठीं हा परमविश्रामाचा शब्बाथ होय; ह्रा दिवशीं तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावें; हा निरंतरचा विधि होय."
जुन्या करारांत रोजच्या पापासाठी अर्पण आणून त्याच्या डोक्यावर हात ठेवून पापी माणूस म्हणे, "परमे·श्वरा, मी अमूक अमूक पाप केलेले आहे. कृपया मला क्षमा कर." अर्पणाला मारल्यानंतर त्याचें रक्त तो याजकाकडे नेऊन देई. आता मी पापापासून मुक्त झालो आहे अशी खात्री होऊनच तो घरी जात असे. त्या पापी माणसाच्या ऐवजी अर्पणाला मारले जात असे. जुन्या करारांत हे पापार्पण म्हणजे बकरा, बैल किंवा गो­हा असे. हे सर्व पशू देवाने पवित्र म्हणून ठरवलेले होते.
एखाद्या पापी माणसानें त्याच्या पापांसाठी मरण्याऐवजी देवाने पशू मारले जातील अशी योजना केली होती.
अशा प्रकारें जुन्या करारांत पापी लोक त्यांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी अर्पण करू शकत होते. पापी मनुष्याची सर्व पापें अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवण्याने त्याच्याकडे दिली जात. अर्पणाला मारल्यानंतर त्याचे रक्त याजकाकडे दिले जात असे.
पण रोज रोज अशा प्रकारे प्रायश्चित्त करणे अशक्य होऊ लागले तेव्हां देवाने सातव्या महिन्यातील दहावा दिवस हा वार्षिक प्रायश्चित्ताचा दिवस ठरवला.
प्रायश्चित्ताच्या दिवशी प्रमुख याजकाची काय भूमिका होती? प्रथम अहरोन याजक पापार्पणावर दोन्ही हात ठेवून म्हणे, "परमे·श्वरा, इस्त्राएली लोकांनी ही अशी पापें केलेली आहेत, खून, व्यभिचार, जारकर्मे, जोरी, खोटी साक्ष, दुर्भाषणें ......"
त्यानंतर तो अर्पणाला मारून त्याचें रक्त दयासनावर सात वेळां शिंपडत असे. (बायबल मध्ये 7 ह्रा आकड¬श्वला खूप महत्त्व आहे.)
लोकांची पापें पापार्पणाच्या माथीं ठेवून लोकांच्या जागी पापार्पणाला मारणे हे प्रमुख याजकाचे काम असे.
देव न्यायी आहे म्हणूनच लोकांच्या पापांसाठी त्यांनी मरण्याऐवजी त्याने पापार्पणाची योजना केली होती. देव खरोखरच दयाळू आहे. प्रमुख याजक पापार्पणाचें रक्त दयासनाच्या पूर्वे दिशेला शिंपडीत असे. अशा प्रकारे सातव्या महिन्यातील दशमीस लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त केले जाई.
 
जुन्या कराराप्रमाणे अर्पणाचा
कोंकरा कोण आहे?
निर्दोष येशू हाच होय.
 
प्रायश्चित्ताच्या दिवशीं प्रमुख याजकाला दोन बकरे अर्पण करावे लागत. त्यांतील एक बकरा पाप वाहून नेण्यासाठीं असे. नव्या करारांत पाप वाहून नेण्याचें काम येशू ख्रिस्तानें केले. "देवानें जगावर एवढी प्रीति केली कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठीं कीं, जो कोणी त्याच्यावर वि·श्वास ठेवतो त्याच्या नाश होऊं नये तर, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावें." (योहान 3:16)
अर्पणाचा कोंकरा म्हणून स्वतःचा एकुलता एक पुत्र देवानें दिला. संपूर्ण मानवजातीसाठीं अर्पणाचा कोंकरा म्हणून बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून त्याचा बाप्तिस्मा झाला आणि तो जगाचा तारणकर्ता, मशीहा बनला. मशीहा याचा अर्थ तारण करणारा असा आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणजे, `राजा जो आपले तारण करण्यासाठीं आला.`
जुन्या करारांत प्रायश्चित्ताच्या दिवशी लोकांची सबंध वर्षभराची पापें काढून टाकली जात होती त्याचप्रमाणें 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगांत आला, त्याचा बाप्तिस्मा झाला, तो वधस्तंभावर मरण पावला आणि त्याने आपल्या पापांच्या प्रायश्चित्ताची सुवार्ता पूर्ण करून आपली पापें काढून टाकली.
लेवीय मध्ये म्हटले आहे, "अहरोनानें आपले दोन्ही हात त्या जिवंत बक­याच्या डोक्यावर ठेवून इस्त्राएक लोकांचीं सर्व दुष्कर्मे व अपराध ह्रांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व तीं त्या बक­याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हातीं रानांत पाठवून द्यावें. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशांत वाहून नेईल; त्या मनुष्यानें त्या बक­याला रानांत सोडून द्यावें." (लेवीय 16:21-22)
लेवीय 1 मध्ये सुध्दां लिहिले आहे कीं लोकांची सर्व पापें बक­याच्या डोक्यावर ठेवली जात. `सर्व दुष्कर्मे व अपराध` म्हणजेच त्यांनी देहाने व ह्मदयाने केलेले सर्व अपराध पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून ठेवले जात असत.
 
 
देवाच्या नियमशास्त्रापासून आपल्याला आपल्या सर्व अपराधांसंबंधी जाणीव व्हायला पाहिजे
 
देवानें आपल्याला नियमशास्त्र
कां दिले?
अपराधांसंबंधी आपल्याला ज्ञान
मिळावे म्हणूनच.
 
देवाचें नियमशास्त्र व आज्ञा यांत 613 नियम आहेत. खरं म्हणजे देवाने आपल्याला जे करू नका म्हणून सांगितलेले आहे तेच आपण करतो आणि जे करा म्हणून देवानें सांगितलेले आहे ते आपण करीत नाही.
म्हणूनच आपण पापी आहोत. देवानें आपल्याला जे नियमशास्त्र दिलेले आहे त्याच्या द्वारें आपल्याला पापांची जाणीव होते. (रोमकरांस पत्र 3:20). आपण पापी आहोत हे समजावे म्हणूनच आपल्याला नियमशास्त्र दिले गेले. आपण नियमशास्त्र पाळण्यासाठी समर्थ आहोत म्हणून कांही देवानें नियमशास्त्र दिले नाही तर आपल्याला अपराधाची जाणीव व्हावी यासाठीच दिले.
नियमशास्त्र तंतोतंत पाळण्यासाठी दिलेले नाही. एकाद्या कुत्र्यानें माणसाप्रमाणे वागावे अशी अपेक्षा आपण करत नाही तसंच आपण सुध्दां नियमशास्त्राप्रमाणे वागू शकत नाही, पण नियमशास्त्र व आज्ञा यांच्यामुळे आपल्याला अपराधांची जाणीव होऊ शकते.
आपण पापांनी खूप भरलेले आहोत म्हणूनच देवानें नियमशास्त्र दिले. ते आपल्याला सांगते, `तू खूनी, जारकर्मी, दुष्ट आहेस` देवाने आपल्याला `खून करू नको` असं सांगितले पण आपण मनाने आणि कधी प्रत्यक्षांत खून करतो.
`खून करू नको` असं नियमशास्त्रांत लिहिलेले आहे त्याच्यावरून आपल्याला समजते की आपण खूनी आहोत. तेव्हां मग आपण म्हणतो, `अरेरे! जे करायला नको तेच नेमके मी केले. मी चूक केली. मी पापी आहे.`
म्हणूनच इस्त्राएली लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी देवानें अहरोनाला प्रायश्चित्ताचें अर्पण करण्यास सांगितले. त्याप्रमाणें अहरोन वर्षातून एकदा लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करीत असे.
प्रायश्चित्ताच्या दिवशीं देवासमोर दोन पापार्पणे आणीत. त्यांतला एक देवासाठी असे. तर दुस­या पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्याला रानांत सोडून देत. नेमलेल्या मनुष्याच्या हातीं बक­याला रानांत पाठवून देण्याच्या आधी प्रमुख याजक त्या बक­याच्या डोक्यावर हात ठेवून इस्त्राएली लोकांची पापें बोलून दाखवतांना म्हणत असे, `परमे·श्वरा, लोकांनी खून केले, जारकर्मे केली, चो­या केल्या, मूर्तिपूजा केली.... आम्ही खूप अपराध केले."
पॅलेस्टाईन देश हा निर्जन वाळवंटी प्रदेश आहे. अशा वाळवंटांत बक­याला सोडून दिल्यानंतर तो मरून जाई. बक­याच्या मरणामुळे आपले अपराध पण नाहीसे झाले अशी खात्री इस्त्राएली लोकांना झाली की त्यांच्या मनाला शांति मिळे.
देवानें आपल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त त्याचा कोंकरा येशू ख्रिस्त याच्या द्वारे केले. आपले सर्व अपराध येशूच्या बाप्तिस्म्यामुळे व वधस्तंभावरील त्याच्या रक्तामुळे धुतले गेले.
येशू हा देव आहे आणि आपला उध्दारकर्ता आहे. तो देवाचा पुत्र आहे. मानवजातीला पापांपासून
वाचवण्यासाठी तो आला आणि तोच आपला निर्माणकर्ता आहे. त्यानेच आपल्याला त्याच्या प्रतिरूपाशी सदृश असं बनवले.
आपण आपल्या देहाने व मनाने दररोज जी पापें करतो ती सर्व पापें व भविष्यकाळांत आपण जी कांही पापें करणार आहोत. ती सर्वच्या सर्वच पापें येशूकडे दिली गेली. देवाचें धर्माचरण पूर्ण होण्यासाठीं आणि जगाच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला.
वधस्तंभावर जाण्याच्या तीन वर्षे आधी जेव्हां येशूनें त्याचें कार्य सुरू केले. त्यावेळी यार्देन नदींत योहानाकडून त्याचा बाप्तिस्मा झाला. त्याच्या बाप्तिस्म्याच्या नंतरच आपल्या सर्व पापांच्या प्रायश्चित्ताद्वारे मानवजातीच्या तारणकार्यास आरंभ झाला.
यार्देन नदींत कंबरेपर्यंत पाणी लागेल अशा जागी उभे राहून बाप्तिस्मा करणा­या योहानाने येशूच्या डोक्यावर हात ठेवून त्याला पाण्याखाली बुडवले. हा बाप्तिस्मा जुन्या करारातील पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या माथीं अपराध ठेवण्याच्या पध्दतीप्रमाणेंच होता.
पाण्याखाली बुडणे याचा अर्थ मरण आहे आणि पाण्याच्या वर येणे म्हणजे पुनरुत्थान असा अर्थ होतो. बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून बाप्तिस्मा घेऊन येशूने पापें स्वतःकडे घेणे, वधस्तंभ व पुनरुत्थान या तीनहि गोष्टींची पूर्णता केली.
येशूने कशा प्रकारे आपल्याला पापमुक्त केले त्या वचनांवर वि·श्वास ठेवण्याने आपले तारण होते. येशूच्या द्वारे आपला उध्दार करायचा हीच देवाची योजना होती. त्याप्रमाणें येशू आपले अपराध स्वतःच्या माथीं घेऊन वधस्तंभापर्यंत चालत गेला. आणि त्यामुळें जुन्या करारांत देवाने जो करार केला होता त्याची परिपूर्णता झाली.
 
येशूने आपले अपराध काढून
टाकल्यामुळे आपण आता कोणते
काम करायला पाहिजे?
देवाच्या वचनांचे आज्ञापालन करणे
एवढंच काम आपण करायला हवे.
 
योहान 1:29 मध्ये म्हटले आहे, "दुस­या दिवशीं येशूला आपणाकडे येतांना पाहून तो म्हणाला, हा पाहा जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" बाप्तिस्मा करणा­या योहानानें साक्ष दिली, "हा पाहा, जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!" यार्देन नदींत येशूचा बाप्तिस्मा झाला त्याचवेळीं मानवजातीचे सर्व अपराध येशूच्या माथीं ठेवले गेले यावर वि·श्वास करा! त्यामुळे तुमच्या सर्व पापाचे प्रायश्चित्त केल्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
देवाच्या वचनावर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे. स्वतःचेच विचार व हट्टीपणा बाजूला ठेवून येशूने जगाचें सर्व अपराध नेलेले आहेत अशा साध्या शब्दांवर आपण वि·श्वास ठेवायला हवा.
येशूनें जगाचें सर्व अपराध काढून टाकले असं म्हणणे आणि त्यानें आपल्या दुष्कर्मांबद्दल प्रायश्चित्त करून देवाचें धर्माचरण पूर्ण केले असं म्हणणे या दोहोंचा अर्थ एकच आहे. आणि `डोक्यावर हात ठेवणें` व `बाप्तिस्मा` या दोहोंचा पण अर्थ समान आहे.
आपण जेव्हां `सर्व` किंवा `प्रत्येक` किंवा `संपूर्ण` म्हणतो तेव्हां त्याचे अर्थ सारखेच असतात. त्याचप्रमाणे जुन्या करारातील `डोक्यावर हात ठेवणे` याचा अर्थ नव्या करारातील `बाप्तिस्मा` या शब्दासारखाच आहे. कारण तेथे बाप्तिस्मा हा शब्द वापरला आहे.
बाप्तिस्मा घेऊन व वधस्तंभावर जाऊन येशूने आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त केले, यातूनच आपल्याला सत्याचा उलगडा होतो व तारणासंबंधीची आंरभीची सुवार्ता समजते.
जेव्हां आपण म्हणतो कीं येशूने जगाची सर्व पापें नेली तेव्हां सर्व पापें याचा अर्थ काय होतो? सर्व पापें म्हणजे जी पापें घेऊनच आपण जन्माला आलो तीच होय. ती म्हणजेच दुष्ट विचार, चो­या, जारकर्मे, लोभीपणा, गर्व, दुर्भाषण. आपल्या ह्मदयांत व देहांत असलेली सर्वच्या सर्व पापें त्यांत येतात.
"कारण पापाचें वेतन मरण आहे, पण देवाचें कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे." (रोमकरांस पत्र 6:23). "आणि रक्त ओतल्यावांचून पापक्षमा होत नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 9:22). पापांची किंमत मोजावीच लागते असंच ही वचने सांगतात. आणि येशूनें संपूर्ण मानवजातीला पापमुक्त करण्यासाठी स्वतःला अर्पण करून पापांची किंमत एकदाच मोजली.
म्हणूनच येशूचा बाप्तिस्मा, त्याचे रक्त, आरंभीची सुवार्ता, येशू हाच आपला तारणकर्ता देव आहे असा वि·श्वास आपण ठेवणे एवढंच आपल्या हातीं आहे.
 
 
उद्याच्या पापांबद्दल प्रायश्चित्त
 
आपल्या पापांबद्दल आणखी अर्पण
करण्याची जरूर आहे का?
नाही. कधीच नाही.
 
आज केलेली पापें, उद्याची, परवाची आणि मरेपर्यंत आपण जी कांही पापें करीत राहणार आहोत ती सर्व `जगाच्या पापांत` समाविष्ट केलेली आहेत. त्याचप्रमाणे काल केलेली व त्याच्या आधी केलेली पापें सुध्दां `जगाच्या पापांत` गणली जातात. लोकांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतची पापें ही `जगाच्या पापांचाच` भाग असल्यासारखी आहेत. आणि ही सर्व पापें बाप्तिस्म्याच्या वेळीं येशूकडे दिली गेली. म्हणजेच मरेपर्यंत आपण जी कांही पापें करणार आहोत ती अगोदरच काढून नेलेली आहेत.
देवाच्या वचनावर वि·श्वास ठेवणे एवढंच करण्याची आपल्याला जरूरी आहे. तारणासाठी आपण आपल्या मनाचे विचार बाजूला ठेवायला हवे. तुम्ही कदाचित विचाराल, "मी न केलेली पापें येशूने कशी काय काढून टाकली?" यावर मला अस विचारायला आवडेल, "प्रत्येक वेळी आपण पाप केल्यावर येशूनें परत या जगांत येऊन त्याचें रक्त ओतायला हवे का?"
पुन्हां जन्मण्याच्या सुवार्तेमध्ये पापाबद्दलच्या प्रायश्चित्तासंबंधी नियम आहे. "आणि रक्त ओतल्यावांचून पापक्षमा होत नाही." (इब्राी लोकांस पत्र 9:22). जेव्हां एकाद्या माणसाला पापमुक्त होण्याची इच्छा होई तेव्हां त्याला त्याचें सर्व अपराध पापार्पणाच्या माथीं हात ठेवून द्यावे लागत आणि पापार्पणाला त्या अपराधांपायी मरावे लागे.
या पध्दतीप्रमाणेच, देवाचा पुत्र मानवजातीला वाचवण्यासाठीं या जगांत आला. अपराध स्वतःकडे घेण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा झाला. आपल्या पापाचें वेतन म्हणून त्यानें वधस्तंभावर रक्त ओतले आणि `पूर्ण झाले आहे` असं म्हणून तो मरण पावला. 3 दिवसानंतर तो मरणातून उठला आणि आता तो देवाच्या उजव्या हाताकडे बसला आहे. कायमसाठी तो आपला उध्दारकर्ता झालेला आहे.
पापाच्या जंजाळातून आपली संपूर्ण सुटका होण्यासाठी आपण आपल्या डोक्यांतल्या ठाम कल्पना आणि रोजच्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे ही अंधश्रध्दा काढून टाकली पाहिजे. संपूर्ण मानवजातीचे सर्व अपराध काढून टाकण्यासाठी एकदाच अर्पण होणे आवश्यक होते. स्वर्गातील देवाने म्हणूनच जगाची पापें बाप्तिस्म्याच्या द्वारे स्वतःच्या पुत्राकडे देऊन त्याला आपल्यासाठी वधस्तंभावर पाठवले. त्याच्या पुनरुत्थानाने आपल्या तारणाची पूर्णता झाली.
"खरे पाहिलें असतां तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. खरोखर आमचे व्याधी त्यानें आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्यानें वाहिले; तरी त्यास ताडण केलेलें, देवानें त्यावर प्रहार केलेलें, व त्याला पीडिलेलें असें आम्हीं त्याला लेखिले. अशा आम्हां सर्वांचें पाप परमे·श्वरानें त्याजवर लादिलें." यशयाच्या 53 व्या अध्यायांत लिहिले आहे की मानवजातीचें सर्व अपराध व दुष्कर्मे येशू ख्रिस्ताकडे दिले गेले.
नव्या करारांत इफिसकरांस पत्र 1:4 मध्ये म्हटले आहे, "म्हणून त्यानें जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलें." यांत असं दिसून येते कीं जगाच्या स्थापनेपूर्वीच देवाने आपल्याला त्याची माणसं म्हणून निवडले. जग निर्माण पण झालेले नव्हते तेव्हांच त्यानें आपल्याला ख्रिस्तामध्ये नीतिमान व निर्दोष असे निवडले. पूर्वी आपण कांहीहि विचार केले असले तरी आता मात्र पाणी, रक्त व आत्मा यासंबंधी देवाच्या वचनांवर वि·श्वास ठेवला पाहिजे.
देवानें सांगितले की त्याचा कोंकरा येशू ख्रिस्त यानें जगाचें अपराध वाहिले आणि त्या अपराधांबद्दल प्रायश्चित्त केले. इब्राी लोकांस पत्र 10:1 यांत लिहिले आहे, "तर मग ज्या पुढें होणा­या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रांत छाया आहे, वास्तविक स्वरूप नाहीं; म्हणून तें प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणा­या त्याच त्याच यज्ञांनीं जवळ येणा­यंश्वना पूर्ण करण्यास केव्हांहि समर्थ नाहीं."
यांत म्हटलें आहे कीं प्रतिवर्षी अर्पणें करण्यामुळे आपण पूर्ण बनू शकत नव्हतो. नियमशास्त्रांत पुढें होणा­या चांगल्या गोष्टीची छाया म्हणजेच पुढें येणारा येशू ख्रिस्त मशिहा याच्यामुळे आपण पूर्ण बनलो. इस्त्राएली लोकांच्या वर्षभराच्या पापांबद्दल एकदाच प्रायश्चित होत असे. त्याचप्रमाणें बाप्तिस्मा व वधस्तंभ याच्या द्वारे आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घेऊन येशूने आपल्याला एकदाच पूर्ण केले.
म्हणूनच इब्राी लोकांस पत्र यांतील 10 व्या अध्यायांत येशू म्हणतो, "आणि मग तो म्हणाला, पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलों आहें. ह्रांत दुसरें स्थापण्यासाठीं तो पहिलें नाहींसें करितो. त्या इच्छेनें आपण येशू ख्रिस्ताच्या एकदांच झालेल्या देहार्पणाद्वारें पवित्र केलेले आहों.
 प्रत्येक याजक प्रतिदिवशीं सेवा करीत आणि जे यज्ञ पापें दूर करावयाला कदापि समर्थ नाहींत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हांपासून आपले वैरी आपलें पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणा­यंश्वना त्यानें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहे. पवित्र आत्माहि आपल्याला साक्ष देतो, कारण हे म्हटल्यावर परमे·श्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन. आणि त्यांची पापें व त्यांचें स्वैराचार मीं ह्रापुढें आठवणारच नाही. तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." (इब्राी लोकांस पत्र 10:9-18)
आणि म्हणूनच येशूने त्याचा बाप्तिस्मा व वधस्तंभावरील रक्त यांच्या द्वारें आपल्याला जगाच्या सर्व पापांपासून मुक्त केले ह्रावर आपण वि·श्वास ठेवतो.
 
 
पाण्याने व आत्म्याने जन्मण्यासंबंधीच्या तारणाबद्दल आपल्या ह्मदयपफ्श्ववर व मनावर लिहिलेले आहे
 
आपण आणखी पाप करीत नाही
म्हणून आपल्याला नीतिमान म्हणता
येईल का?
नाही. येशूने आपले सर्व अपराध घेतल्यामुळे
आपण नीतिमान ठरतो.
 
तुम्ही ह्रावर वि·श्वास ठेवता का? - आमेन - आपल्याला वाचवण्यासाठीं येशू ख्रिस्तानें स्वतःहून बाप्तिस्मा घेतला व नंतर तो वधस्तंभावर गेला ही देवाची वचने तुम्ही वि·श्वासपूर्वक स्वीकारता का? येशू ख्रिस्तानें आपली व जगाची सर्वच पापें धुतलेली आहेत या पापक्षमेच्या सुवार्तेवर आपण वि·श्वास ठेवतो तेव्हांच आपले तारण होऊ शकते.
देवाचे नियमशास्त्र पाळून कांही आपण आदर्श बनू शकत नाही तर त्याच्या कार्यावर वि·श्वास ठेवण्याने बनतो. संपूर्ण ह्मदयाने सुवार्तेवर वि·श्वास ठेवला तरच आपण नीतिमान होऊ शकतो. तुम्हांला हे खरे वाटते का?
मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा होण्यासाठीच येशूचा बाप्तिस्मा, वधस्तंभ व नंतर येशूचे पुनरुत्थान झाले. तारणाचा नियम देवाच्या सार्वकालिक प्रेमावर आधारित आहे. आपण कसेहि असलो तरी तो आपल्यावर प्रेम करतो. तो न्यायी आहे म्हणूनच त्यानें आपल्याला प्रथम नीतिमान बनवले. बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व अपराध येशूकडे देऊन त्यानें आपल्याला नीतिमान बनवले.
इब्राी लोकांस पत्र 10:16 यांत लिहिले आहे, "मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन."
देवासमोर आपण मनाने व ह्मदयाने पापी आहोत की नीतिमान आहोत? जर आपण देवाच्या शब्दांचे आज्ञापालन केले तर आपण नीतिमान ठरतो. आपण कदाचित विचार करू, "आपण जर रोज पाप करतो तर आपण नीतिमान कसे ठरणार? आपण खात्रीपूर्वक पापीच ठरतो." येशू ख्रिस्ताने जसे त्याच्या पित्याच्या इच्छेनुसार केले तसंच आपण देवाच्या शब्दाप्रमाणे वागलो तर आपण नीतिमान होतो.
अर्थातच पुन्हां जन्मण्याच्या आधी आपल्या ह्मदयांत पाप असते हे मी सुरूवातीसच सांगितले आहे. पापांची क्षमा होणारी सुवार्ता जेव्हां आपण पूर्ण ह्मदयाने स्वीकारतो तेव्हांच आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जेव्हां आपल्याला ही सुवार्ता माहित नव्हती तेव्हां आपण पापी होतो. पण जेव्हां आपण येशूवर वि·श्वास ठेवायला लागतो तेव्हां आपण देवाची नीतिमान मुलं होतो. वि·श्वासाने नीतिमान बनण्यासंबंधी पौलाने लिहिलेले आहे. पापाची क्षमा होणा­या सुवार्तेवरील वि·श्वास आपल्याला नीतिमान बनवतो.
अब्रााहाम प्रेषित पौल आणि आपले पूर्वज हे कांही सत्कृत्ये करण्यामुळे नीतिमान बनले नव्हते तर देवाच्या वचनांवर वि·श्वास ठेवून त्याची आज्ञा पाळल्यामुळे ते सर्वजण नीतिमान ठरले गेले.
इब्राी लोकांस पत्र 10:18 यांत म्हटले आहे; "तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." यांत लिहिल्याप्रमाणे देवाने आपल्या अपराधांची क्षमा केलेली आहे आणि आपण वाचलो आहोत. त्यामुळे पापांबद्दल आपल्याला मरावे लागणार नाही. तुम्हांला हे खरे वाटते का? -आमेन.-
फिलिप्पैकरांस पत्र 2 मध्ये लिहिले आहे; "अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायीं होती ती तुमच्या ठायींहि असो` तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचें असणें हा लाभ आहे असें त्यानें मानलें नाहीं. तर त्यानें स्वतःला रिक्त केलें, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचें होऊन दासाचें स्वरूप धारण केलें; आणि मनुष्यप्रकृतीचें असें प्रगट होऊन त्यानें मरण आणि तेंहि वधस्तंभावरचें मरण सोसलें; आणि मनुष्यप्रकृतीचें असें प्रगट होऊन त्यानें मरण आणि तेंहि वधस्तंभावरचें मरण सोसलें; येथपर्यंत आज्ञापालन करून त्यानें स्वतःला लीन केलें. ह्रामुळें देवानें त्याला अत्युच्च केलें, आणि सर्व नांवांपेक्षां जे श्रेष्ठ नांव ते त्याला दिलें; ह्रांत हेतु हा कीं, स्वर्गांत, पृथ्वीवर व पृथ्वीखालीं प्रत्येक गुडघा येशूच्या नांवानें टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेनें येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असें कबूल करावें." (फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11)
येशू ख्रिस्तानें स्वतःची थोर कीर्ति पसरवून जगामध्ये वि·श्वासाचा प्रचार केला नाही तर त्यानें दासाचें स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचें असें प्रगट होऊन त्यानें स्वतःला लीन केले आणि आपल्याला वाचवण्यासाठी मरण सोसलें.
म्हणूनच आपण येशूची स्तुति करतो. `तो आपला देव, तारणकर्ता राजा आहे.` येशूनें त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करून शेवटपर्यंत आज्ञापालन केले म्हणूनच आपण देवाचा गौरव करतो व येशूची स्तुति करतो. जर येशूनें आज्ञापालन केले नसते तर आपण देवाच्या पुत्राचा गौरव केला नसता. पण देवाच्या पुत्रानें मरणापर्यंत पित्याचें आज्ञापालन केले म्हणूनच सृष्टी, सर्व लोक देवाचा गौरव करतात व नेहमीच ते गौरव करतील.
येशू ख्रिस्त जगाचीं पापें हरण करण्यासाठीं देवाचा कोंकरा बनला. ही सर्व पापें त्यानें बाप्तिस्म्याच्या
वेळी हरण केली. या घटनेला जवळजवळ 2000 वर्षे झाली आहेत. आता या घटकेपर्यंत आपण जी पापें केली आहेत ती सर्व त्या हरण केलेल्या पापांत समाविष्ट केलेली आहेत.
  
जर आपण उद्या पाप केले तर
आपण पापी ठरतो का?
नाही. कारण येशूने भूत, वर्तमान
व भविष्यकाळातील सर्व पापें काढून
टाकलेली आहेत.
 
येशूला माहित होते की जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत आपण पाप करीतच राहणार आहोत. म्हणूनच त्यानें आधीच आपली पापें काढून टाकली. आता तुम्हांला समजते का? जर आपण 70 वर्षे जगणार असलो तर आपण तेवढ¬श्व काळांत करीत असलेल्या पापांची घाण 70 ट्रक किंवा लॉरी एवढी भरेल! पण येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी एकदाच सर्व पापें स्वतःकडे घेऊन तो वधस्तंभावर गेला.
जर येशूने फक्त आपला पूर्वज आदाम ह्राचें पाप घेतले असते तर आपण सर्व नरकांत गेलो असतो. पण तसं नाही आहे. त्यानें सर्वांचेच अपराध काढून टाकलेले आहेत. 20-30, 30 ते 40 आणि नंतर आपण जे कांही अपराध करतो ते सर्व येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी घेतले.
जगांत पाप आहे असं कोण म्हणते? येशूनें जगांचें सर्व अपराध नेलेले आहेत. यांत शंकाच नाही. येशूने बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील रक्त या द्वारे आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त केले, ह्रावर वि·श्वास ठेवण्याने आपले तारण होऊ शकते.
पुष्कळ लोक त्यांच्याच मनाप्रमाणे वादळी जीवन जगतात. खूप लोकांना आयुष्यांत फार कष्ट करावे लागलेले आहेत. अशा स्थितींत येशूचा बाप्तिस्मा व रक्त यामुळे होणारी पापक्षमेची सुवार्ता आपल्याला न समजणे किंवा आपण ती न स्वीकारणे हे कसे शक्य आहे?
 
 
पापी लोकांचे तारण पूर्ण झाले आहे
 
येशूने पेत्राचें पाय कां धुतले?
स्वतःच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व अपराध
आधीच धुतले गेलेले आहेत ह्रावर
पेत्रानें द्दढ वि·श्वास ठेवावा म्हणूनच
येशूने पेत्राचें पाय धुतले.
 
योहानाच्या 19 व्या अध्यायांत म्हटले आहे; "मग त्यांनीं येशूला आपल्या ताब्यांत घेतलें, आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कंवटीचें स्थान म्हटलेल्या जागीं गेला. त्या जागेला इब्राी भाषेंत गुलगुथा म्हणतात. तेथें त्यांनीं त्याला व त्याच्याबरोबर दुस­या दोघांना, एकाला एका बाजूस व दुस­याला दुस­या बाजूस आणि येशूला मध्यें, असें वधस्तंभावर खिळलें पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लविली; तिच्यावर यहूद्यांचा राजा नासोरी येशू असें लिहिलें होतें. येशूला वधस्तंभावर खिळलें तें स्थळ नगराच्या जवळ होतें. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्राी, रोमन व हेल्लेणी ह्रा भाषांत लिहिली होती." (योहान 19:28-30)
आणि तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हां उठला आणि वरती स्वर्गांत गेला.
योहानाकडून झालेला येशूचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील मृत्यु या दोन्ही घटना एकमेकांशी अशा जुळल्यासारख्या आहेत की नुसती एक घटना दुस­या घटनेशिवाय अर्थपूर्ण होऊ शकत नाही. पापांची क्षमा होणा­या सुवार्तेने प्रभू येशूने आपल्याला वाचवले म्हणून आपण त्याची स्तुति करूया.
मानवाचा देह देहाच्या गरजा भागवतांना पाप केल्यावाचून राहू शकत नाही. देहामुळे होणा­या पापांपासून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्तानें आपल्याला त्याचा बाप्तिस्मा व रक्त दिलेले आहे.
येशूचा जन्म बेथेलहेमांत झाला, यार्देन नदींत त्याचा बाप्तिस्मा झाला, वधस्तंभावर तो मरण पावला. 3 दिवसानंतर त्याचें पुनरुत्थान झाले ह्रा सर्वावर वि·श्वास ठेवून ज्यांच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे ते स्वर्गांत जातात. म्हणूनच आपण परमे·श्वराच्या नांवाचे स्तवन करून त्याला धन्यवाद देतो.
योहानाच्या शेवटच्या अध्यायांत येशू त्याच्या पुनरुत्थानानंतर गालीलांत गेला. पेत्राकडे जाऊन येशूनें त्याला विचारले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?" आणि पेत्रानें उत्तर दिले, "होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हे आपणांला ठाऊक आहे." तेव्हां येशूनें त्याला म्हटलें, "माझीं कोंकरें चार."
पेत्राला सर्व गोष्टी लक्षांत आल्या, येशूचा बाप्तिस्मा व रक्त याची सुवार्ता, आणि पापांची क्षमा होणें म्हणजे काय हे त्याला समजू लागले. येशूनें त्याचें पाय धुतले होते त्यामुळे पेत्राचा वि·श्वास द्दढ होत गेला.
योहान 21:15 मध्ये आपण परत पाहू, "त्यांची न्याहरी झाल्यावर येशूनें शिमोन पेत्राला म्हटलें, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हे आपणांला ठाऊक आहे. त्यानें त्याला म्हटले, माझीं कोंकरें चार." पेत्र येशूचा शिष्य होता. त्याचें तारण होऊन तो नीतिमान असा देवाचा आदर्श सेवक बनला होता म्हणूनच येशू त्याची मेंढरें पेत्राकडे सोपवू शकत होता.
दररोजच्या पापांनी पेत्र जर पापी बनला असता तर पापांच्या प्रायश्चित्ताची सुवार्ता सांगण्याचे कार्य येशू त्याच्यावर सोपवू शकला नसता. पेत्राप्रमाणेच दुसरे शिष्य सुध्दां देहाने होणा­या रोजच्या अपराधांपायी सुवार्तेचे कार्य करू शकले नसते. पण येशूने त्यांना त्यांचें सर्व अपराध काढून टाकणारी सुवार्ता सांगितली कारण त्यांनी येशूचा बाप्तिस्मा व वधस्तंभावरील रक्त ह्रा पापाबद्दलच्या प्रायश्चित्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवला होता.
 
 
प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हे आपणांला ठाऊक आहे
 
परत पाप करण्यानें तुम्ही
पुन्हां पापी बनता का?
नाही. यार्देन नदींत येशूनें तुमची भविष्यकाळातील
पापें आधीच घेतलेली आहेत.
 
येशूने पेत्राला उद्देशून म्हटलेल्या शब्दांबद्दल आपण आता विचार करू. "योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय? होय प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हे आपणाला ठाऊक आहे." पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याच्या सुवार्तेवर पेत्रानें वि·श्वास ठेवला. त्या वि·श्वासामुळेच त्यानें कबूल केलेले येशूवरील प्रेम हे खरे होते.
पेत्र व बाकीचे शिष्य यांचे पाय धुवून पापांची क्षमा होणारी सुवार्ता येशूनें त्यांना सांगितली नसती तर त्या सर्वांना त्यांचें येशूवरील प्रेम अशा प्रकारे प्रगट करता आले नसते. येशूनें जेव्हां पेत्राला विचारले, "ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?" त्यावेळी पेत्र म्हणू शकला असता, "प्रभू, मी पापी आहे म्हणून ह्रांच्यापेक्षां मी तुझ्यावर अधिक प्रीति करू शकत नाही." असं बोलून पेत्र येशूपासून दूर पळून कुठेतरी लपून राहू शकला असता.
पण पेत्राने काय उत्तर दिले याचा विचार करा. येशूचा बाप्तिस्मा व रक्त या पापक्षमेच्या सुवार्तेमुळे पेत्र आशीर्वादीत झाला होता.
म्हणूनच तो म्हणाला, "होय प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हे आपणांला ठाऊक आहे."
पापांची क्षमा होते असं सांगणारी सुवार्ता व येशू हाच देवाचा कोंकरा ह्रावर पेत्राचा द्दढ वि·श्वास होता म्हणूनच तो प्रभू येशूला ठामपणें उत्तर देऊ शकला.
तुम्ही सुध्दां पेत्राप्रमाणें आहात का? ज्या येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याने व रक्तानें जगाची पापें नेली त्याच्यावर वि·श्वास ठेवून तुम्ही प्रीति करता का? त्याच्यावर वि·श्वास न ठेवणे व प्रीति न करणे हे कसे काय शक्य आहे?
येशूने जर फक्त भूतकाळ व वर्तमानकाळांतील अपराध काढून टाकून भविष्यकाळातील अपराध आपल्यापाशी ठेवले असते तर आपण आता करतो तशी त्याची स्तुति केली नसती. त्यांत कहर म्हणजे आपण नरकांत गेलो असतो. म्हणूनच आपण निर्धाराने म्हटले पाहिजे की पापांची क्षमा होणा­या सुवार्तेवर वि·श्वास ठेवण्याने आपण वाचलो आहोत.
देहाचा कल नेहमीच पाप करण्याकडे असतो, त्यामुळे आपण नेहमीच पाप करीत असतो. म्हणूनच येशूचा बाप्तिस्मा व रक्त या उदंड प्रायश्चित्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवण्यानेच आपले तारण झालेले आहे असं आपण निर्धारपूर्वक म्हटले पाहिजे. आपण जर ह्रा सुवार्तेवर वि·श्वास ठेवला नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यातील पापांपासून आपली सुटका होत नाही. सर्व पापांबद्दल प्रत्येक वेळी पश्चातापदग्ध होऊन आपण पापें कबूल करीत राहिलो तर कांही काळानें नीतिमान बनण्यासाठी हा आटापीटा करायचा आपल्याला आळस वाटू लागेल. त्यामुळें अर्थातच आपल्या ह्मदयांत नेहमीच पाप राहिल.
त्यामुळे आपण येशूवर प्रीति करू शकणार नाही व त्याच्या जवळ जाऊ शकणार नाही. त्याच्या तारणकार्यावर वि·श्वास ठेवणें आपल्याला जमणार नाही व आयुष्याच्या अंतापर्यंत आपण येशूला अनुसरून त्याच्या पाठीमागे जाऊ शकणार नाही.
येशूने आपल्याला पापांची क्षमा होणारी सुवार्ता सांगितलेली आहे. आपण त्याच्यावर प्रेम करावे म्हणून आपण रोज करीत असलेले सर्व अपराध त्यानें आधीच धुतलेले आहेत.
प्रिय मित्रांनो, येशूनें लहानसे पाप सुध्दा सोडून दिले असते तर आपण त्याच्यावर वि·श्वास ठेवू शकलो नसतो आणि पापक्षमेच्या सुवार्तेची आपल्याला साक्ष देता आली नसती. त्याशिवाय देवाचे सेवक या नात्याने आपल्याला कोणतेहि कार्य करता आले नसते.
पण तुम्ही पापांची क्षमा होणाया सुवार्तेवर वि·श्वास ठेवला तर जगातल्या सर्व पापांपासून तुमची सुफ्का होऊ शकते.
 
 
ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?
 
सर्वांपक्षां येशूवर आपण अधिक प्रीति
करतो याचे काय कारण आहे?
येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आपली सर्वच
पापें एवढंच काय पण भविष्यकाळातील पापें सुध्दां
धुऊन आपल्यावर प्रेम केले म्हणूनच.
 
पापांची क्षमा होण्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवणा­या सेवकांच्या हाती देवानें त्याची मेंढरे सोपवली होती. येशूनें पेत्राला तीन वेळा विचारले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?" आणि प्रत्येक वेळी पेत्राने उत्तर दिले, "होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हे आपणांला ठाऊक आहे." पेत्राचें हे उत्तर त्याची इच्छा दर्शवित नाही तर जगाच्या सर्व पापांची क्षमा होणाया सुवार्तेवरील त्याचा वि·श्वास दाखवून देते.
देवावर प्रेम करून त्याच्या कार्याला प्रारंभ करण्यासाठी पापक्षमा होणाया सुवार्तेवरील वि·श्वासाचा पाया असणें जरूर आहे. आपली इच्छा हा पाया समजून आपण देवावर प्रेम केले तर तो पाया उद्या डगमगून जाईल व आपल्या स्वतःमधील पापांचा द्वेष करण्यांत आपला शेवट होईल. पण येशूनें पूर्वीची पापें, रोजची पापें, भूत व भविष्यकाळातील पापें व संपूर्ण आयुष्यांतील पापें अशी सर्वच्या सर्व पापें धुतलेली आहेत. पृथ्वीवर असं कोणतेहि पाप नाही की ते त्याच्या तारणकार्यातून वगळले गेलेले आहे.
आपलं प्रेम व वि·श्वास आपल्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असेल तर आपण असफल होऊ. पण पापक्षमा होणाया सुवार्तेवरील वि·श्वासामुळें आपण देवाची नीतिमान मुलं झालो आहोत. पाणी व आत्मा या सुवार्तेवर वि·श्वास ठेवल्यामुळे आपण निष्पाप बनतो.
देवाच्या प्रीतिमुळे आपले तारण झाले. आपण आपल्या आयुष्यांत कितीहि अशक्त किंवा अपूर्ण असलो तरी पापक्षमा होणा­या तारणामुळे आपण नीतिमान आहोत. म्हणूनच आपण सार्वकालिक जीवन मिळून देवाच्या राज्यांत जाणार आहोत, आणि त्याचे स्तवन करणार आहोत. तुमचा ह्रावर वि·श्वास आहे का?
येशू म्हणाला, "तुम्ही माझ्यावर प्रीति केलेली नाही पण मी तुमच्यावर प्रीति केली." पाणी व आत्मा या द्वारे येशूनें आपले तारण केले. म्हणूनच पापाची क्षमा होणा­या सुवार्तेवर, येशूच्या बाप्तिस्म्यावर व त्याच्या रक्तावर आपण वि·श्वास ठेवला पाहिजे.
पापक्षमा होणा­या सुवार्तेने आपल्याला देवाने वाचवले नसते तर आपण कितीहि जरी वि·श्वास ठेवला तरी वाचू शकलो नसतो. पण येशूनें आपल्या देहाची व ह्मदयाची सर्व पापें धुतलेली आहेत.
आपल्याला स्वतःच्या तारणाची खात्री असावी म्हणूनच पाणी, आत्मा व पापक्षमेची सुवार्ता या शब्दांवर वि·श्वास असणे आवश्यक आहे.
 
 
स्वतःच्या इच्छेप्रमाणे असलेला वि·श्वास आपण काढून टाकला पाहिजे
 
खरा वि·श्वास कोठून येतो?
ज्या देवाने आपली भविष्यकालातील पापें धुतलेली
आहेत त्याच्या प्रेमातूनच वि·श्वास येतो.
 
स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलेले प्रेम किंवा वि·श्वास हा खरा असू शकत नाही. जगांत अनेक लोक त्यांच्या सदिच्छेनुसार येशूवर वि·श्वास ठेवतात पण नंतर मनांतील पापांपायी वि·श्वास धरणे सोडून देतात.
आपण केलेली लहानसहान पापें व नकळत केलेली मोठी पापें सुध्दां येशूने धुतलेली आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
योहान 13 मध्ये आपल्याला समजते की वधस्तंभावर जाण्याआधी येशूनें जेवणाच्या अगोदर त्याच्या शिष्यांचे पाय धुऊन त्यांना पापाची क्षमा होण्याच्या सुवार्तेबद्दल सांगितले.
पण पेत्र हट्टीपणाने म्हणाला, "तुम्ही माझे पाय धुऊ नका." स्वतःच्या इच्छेप्रमाणे असलेल्या वि·श्वासामुळे तो असं बोलला होता. पण येशूनें त्याला म्हटले, "मी करितों ते तुला आतां कळत नाहीं; ते तुला पुढें कळेल."
पाणी व आत्मा या सुवार्तेमुळे आपल्याला येशूचे शब्द समजू शकतात. ते पाणी व आत्मा या सुवार्तेचे खरे शब्द आहेत. त्याच्यावर संपूर्ण ह्मदयाने वि·श्वास ठेवल्यामुळे पापी मनुष्याला पापक्षमा मिळून तो नीतिमान बनतो.
पेत्र व इतर शिष्य मासे पकडायला गेले तेव्हां येशूनें त्यांच्यासाठी न्याहरी केली होती. त्यावेळी पेत्राला येशूचें शब्द आठवले, "मी करितों तें तुला आतां कळत नाही; तें तुला पुढें कळेल."
पेत्राने मनांत विचार केला, "प्रभूनें माझी सारी पापें धुतलेली आहेत. मनाच्या दुबळेपणापायी केलेली माझी पापें व भविष्यकाळातील पापें सुध्दां त्यानें धुतली." म्हणूनच स्वतःच्या इच्छेप्रमाणे असलेला वि·श्वास सोडून देऊन पेत्र येशूचा बाप्तिस्मा व रक्त या पापक्षमेच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवू लागला.
न्याहरी झाल्यानंतर येशूनें पेत्राला विचारले, "ह्रांच्यापेक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?" द्दढ वि·श्वासातून येशूवर प्रेम करणा­या पेत्रानें कबूल केले, "होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करितों, हें आपणांला ठाऊक आहे." पेत्र हे असं बोलू शकला याचे कारण येशूनें त्याला म्हटले होते, "ते तुला पुढें कळेल" आणि पेत्राला येशूचा बाप्तिस्मा व रक्त याच्यामुळे पापांची क्षमा कशी होते हे समजले होते.
 
 
त्यानंतर तो देवाचा खरा सेवक बनला
 
त्यानंतर पेत्र व इतर शिष्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत सुवार्तेचा प्रचार केला. ज्या पौलाने ख्रिस्ती लोकांचा निर्दयतेने छळ केला होता त्यानें सुध्दां रोमन साम्राज्यातील कठीण काळांत सुवार्ता सांगितली.

तुम्ही देवाचे खरे सेवक कसे
बनू शकता?
तुमच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त केले
गेले ह्रावर वि·श्वास ठेवण्याने.
 
येशूच्या बारा शिष्यांपैकी यहूदाने येशूला विकले होते नंतर त्यानें गळफास घेतला. त्याच्याजागी पौलाला शिष्य म्हणून देवानें निवडले. पुष्कळ शिष्यांना मारण्यांत आले होते. मरणाची भीति असतांना सुध्दां ते सुवार्ता सांगत होते. `येशू हाच तारणकर्ता देव आहे` असं सांगून येशूच्या शिष्यांनी पाणी व आत्मा याची सुवार्ता पसरविली. आपली पापांपासून सुटका व्हावी म्हणूनच त्यांनी पाणी व आत्मा या सुवार्तेची साक्ष दिली होती. देवाची अगाध प्रीति व येशूचें पूर्ण तारणकार्य यामुळे आपण आता येशूचे शिष्य बनलो आहोत.
तुम्ही ह्रावर वि·श्वास ठेवता का? येशूनें आपल्यावर इतके प्रेम केले कीं त्यानें आपल्याला पापांची क्षमा मिळावी म्हणून पाणी व आत्मा याची सुवार्ता दिली. तिच्यामुळे आपण नीतिमान होऊन येशूचे शिष्य बनलो आहोत. पापांची क्षमा होणारी सुवार्ता आपल्याला समजावी म्हणूनच येशूनें त्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते.
शिष्यांचे पाय धुऊन येशूनें आपल्याला दोन गोष्टी शिकवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यानें म्हटले होते, "मी करितों ते तुला आतां कळत नाहीं; ते तुला पुढें कळेल." म्हणजेच येशूचा बाप्तिस्मा व रक्त यामुळे आपली सर्व पापें धुतली गेलेली आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे येशूला दाखवून द्यायचे होते की पापी लोकांना वाचवून त्यांना नीतिमान बनवण्यासाठी तो स्वतः नम्र झाला होता. म्हणूनच पापक्षमेची सुवार्ता सांगताना नव्याने जन्म घेतलेल्या
आपण सर्वांनी जे आपल्यानंतर येत आहेत त्यांना सेवाभाव दाखवला पाहिजे.
वल्हांडण सणाच्या वेळी येशूनें शिष्यांचे पाय धुण्याची दोन कारणे अगदी स्पष्ट आहेत.
शिष्य हा गुरूपेक्षां कधीच श्रेष्ट नसतो. म्हणूनच आपण येशूची सेवा करीत आहोत असं समजूनच जगामध्ये सुवार्ता सांगायला हवी. ज्यांचे तारण प्रथम झालेले आहे त्या सर्वांनी नंतर येणा­यंश्वंची सेवा केली पाहिजे. हे शिकवण्यासाठीच येशूनें शिष्यांचे पाय धुतले. आपण सैतानकडून कधी फसवले जाऊ नये म्हणून येशूने पेत्राचे पाय धुऊन आदर्श तारणकर्ता तोच आहे असं दाखवून दिले.
 
 
पवित्र निवासमंडपाचे फाटक कसे बनवले होते?
 
पवित्र निवासमंडपाच्या अंगणाचे
फाटक कसे बनवले होते?
निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी
रंगाच्या सुताचा व तलम कापडाच्या
पडद्याने बनवले होते.
 
पवित्र निवासमंडपाच्या अंगणातील फाटकाबद्दल निर्गम 27:16 यांत लिहिले आहे, "अंगणाच्या फाटकासाठीं एक पडदा बनवावा; तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा. तो वीस हात असून त्याला चार खांब व चार उथळ्या असाव्या."
लोकांना निवासमंडपाचे प्रवेशद्वार समजावे म्हणून देवानें मोशेला फाटकासाठी रंगीत पडदा बनवण्यास सांगितले होते. निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचा पडदा चार खांबावर टांगला होता.
पवित्र निवासमंडपासाठी जे कांही वापरले त्यातूनच मानवजातीला वाचवण्याची देवाची जी योजना होती त्याचा अर्थ सूचित होतो.
पवित्र निवासमंडपाच्या अंगणांतील फाटकासाठी काय वापरले होते? निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाचे कापड व तलम सुत अशा चार गोष्टी वापरल्या होत्या. नव्याने जन्मण्याच्या सुवार्तेवरील आपला वि·श्वास बळकट होण्यासाठी ह्रा चार गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत.
पवित्र निवासमंडपाच्या अंगणांतील फाटकासाठी ज्या गोष्टी वापरल्या गेल्या त्या सर्वांनी आपले भूत, भविष्य व वर्तमानकाळांतील पापें धुतली जाणा­या तारणकार्यांत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. म्हणूनच देवानें मोशेला आज्ञा देऊन त्याप्रमाणे काम करण्यास सांगितले.
 
 
देवाच्या सुवार्तेच्या कार्यांत निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाचा काय अर्थ होतो?
 
निवासमंडपांत वापरलेल्या वस्तु
कशाचे प्रतिक आहे?
बाप्तिस्म्याच्या द्वारे येशूने केलेले
तारण याचे प्रतिक आहे.
 
पवित्रस्थानातील पडद्यासाठी निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व तलम कापडाचा वापर केला होता. पवित्रस्थानांत काम करणा­या प्रमुख याजकांच्या झग्यांसाठी सुध्दां त्याचाच उपयोग करीत असत.
निळ्या रंगाचे सुत येशूच्या बाप्तिस्म्याचे प्रतिक आहे. पेत्राचे पहिले पत्र 3:21 यांत म्हटले आहे, "त्याच्या लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारें तुमचें तारण करीत आहे." ह्रा वाक्यांत पेत्राने ठामपणाने म्हटले आहे की बाप्तिस्म्याच्या वेळी येशूनें जगाचें सर्व अपराध घेतले, त्यामुळे तारण शक्य झाले. म्हणूनच निळ्या रंगाचें सुत जे तारणकार्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे ते येशूच्या बाप्तिस्म्याचें प्रतिक आहे.
किरमिजी रंगाचे सुत येशूच्या रक्ताचें प्रतिक आहे आणि जांभळ्या रंगाचे सुत राजेपण दर्शविते. - म्हणजेच येशू हाच राजा व देव आहे. येशूवर व त्याच्या तारणकार्यावर वि·श्वास ठेवण्यासाठी ह्रा तीन रंगांच्या सुतांची जरूर होती.
प्रमुख याजक जो पोशाख परिधान करीत असत त्याला एफोद म्हणत. एफोदाचा झगा निळ्या रंगाचा असे. प्रमुख याजक मुकुट घालीत असे त्यावर शुध्द सोन्याची पट्टी असे. तिच्यावर अक्षरे कोरलेली असतः परमे·श्वरासाठी पवित्र. ही पट्टी मंदिलावर निळ्या रंगाच्या फीतीने बांधीत असत.
 
 
निळ्या रंगाच्या सुताची खरी बाजू
 
निळ्या रंगाचे सुत कशाचे
प्रतिक आहे?
येशूच्या बाप्तिस्म्याचे.
 
बायबलमध्ये निळ्या रंगाच्या सुताबद्दल काय अर्थ होतो हे मी पाहिले. आपण त्याचा अर्थ समजून घेऊ या.
निळ्या रंगाचे सुत याचा अर्थ येशूचा बाप्तिस्मा होय, जगाची सर्व पापें स्वतःकडे घेण्यासाठी येशूचा योहानाकडून झालेला बाप्तिस्मा. (मत्तय 3:15).
येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे जगाची सर्व पापें नेली नसती तर आपण देवासमोर पवित्र ठरलो नसतो. म्हणूनच जगाची सर्व पापें घेण्यासाठी येशूला या जगांत येऊन बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून यार्देन नदींत बाप्तिस्मा घ्यावा लागला होता.
पवित्र निवासमंडपातील अंगणातील फाटकाच्या पडद्यांसाठी निळ्या रंगाचे सुत वापरण्याचे कारण हेच की येशूच्या बाप्तिस्म्याशिवाय आपण पवित्र बनू शकत नव्हतो.
किरमिजी रंगाच्या सुताचा अर्थ येशूच्या मृत्युशी निगडित आहे. जांभळ्या रंगाचा अर्थ म्हणजे आत्मा. "एकच अधिपति, राजाचा राजा व प्रभूचा प्रभु" (तीमथ्याला पहिलें पत्र 6:15)
किरमिजी रंगाचे सुत येशूचे रक्त दर्शविते. मानवजातीच्या पापांसाठी येशूनें खांबावर रक्त ओतले. येशूचा बाप्तिस्मा म्हणजे पापक्षमेची सुवार्ता आहे. तिच्यासंबंधीचा संदेश जुन्या करारांतील पवित्र निवासमंडपांत वापरलेल्या रंगीत सुताच्या द्वारे दिलेला आहे.
निवासमंडपाचे खांब बाभळीच्या लाकडाचे बनवलेले होते आणि त्या खांबाच्या उथळ्या पितळेच्या होत्या त्याच्यावर चांदी लावलेली होती. निवासमंडपांत पडद्यासाठी तलम सुताचा धागा वापरीत त्याचा अर्थ असा कीं येशूनें सर्वांना त्यांच्या सर्व पापांपासून वाचवलेले आहे.
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या नक्षीदार पडद्यातूनच देवाच्या तारणकार्याचा अर्थ आपल्याला समजतो.
पापी लोकांना वाचवण्याची देवाची योजना पूर्वनियोजित होती आणि येशूनें देवाच्या इच्छेप्रमाणेंच तारणकार्य केले. त्याचा बाप्तिस्मा झाला होता; त्याला वधस्तंभावर खिळले होते. तो मरण पावला व नंतर त्याचे पुनरुत्थान झाले. निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या पडद्यातून पापक्षमेची सुवार्ता ही अशा प्रकारे सूचित होते आणि जे ह्रा सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात त्या सर्वांचा येशूने उध्दार केलेला आहे.
 
 
जुन्या करारातील पितळी गंगाळ म्हणजेच नव्या करारातील बाप्तिस्म्याची छाया होय
 
पवित्रस्थानांत प्रवेश करायच्या आधी
याजक त्यांचे हात आणि
पाय कां धूत असत?
कारण देवासमोर त्यांना निष्पाप म्हणून
उभे रहावे लागत होते.
 
गंगाळ पितळेचे बनवलेले होते. पितळेतून न्यायाचा अर्थ सूचित होतो. पापांबद्दल न्याय करण्यांत येऊन येशूने आपल्याऐवजी स्वतः मृत्युदंड सहन केला. पाण्याच्या गंगाळाचा अर्थ म्हणजे आपली पापें धुवून टाकणा­या सुवार्तेचे शब्द होय.
पाण्याच्या गंगाळांत रोज हातपाय धुवावे त्याप्रमाणे रोजची पापें त्याकाळी धुतली जात असत. येशूच्या बाप्तिस्म्यावर व शब्दांवर वि·श्वास ठेवण्याने आपली रोजची पापें धुतली जाऊ शकतात असा अर्थ नव्या करारांत होतो.
योहानाच्या पहिल्या पत्रांत पाचव्या अध्यायांत म्हटले आहे, "आणि ज्यानें जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला वि·श्वास. आणि साक्ष देणारे तिघे आहेत; आत्मा, पाणी व रक्त; ह्रा तिघांची साक्ष एकच आहे." त्याने आणखी असेहि म्हटले आहे कीं जो देवाच्या पुत्रावर वि·श्वास ठेवतो त्याच्या ठायींचे पाणी, रक्त आणि आत्मा याची साक्ष आहे. प्रायाश्चित्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवण्याने आपण पवित्र होऊन पवित्रस्थानांत प्रवेश करू शकू असच देवाने घडवून आणलेले आहे. म्हणूनच आपण देवाच्या शब्दांवर वि·श्वास ठेवून आशीर्वादीत जीवन जगू शकतो. देवाची माणसे होणे म्हणजेच प्रायश्चित्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून पवित्रस्थानांत रहाणे होय.
पवित्र निवासमंडपाच्या अंगणांतील फाटकांत लावलेल्या निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या पडद्याचा अर्थ जाणून न घेता केवळ वि·श्वास ठेवणे पुरेसे आहे असं अनेक लोक आज बोलतात. या गोष्टी समजून न घेता एखाद्याने येशूवर वि·श्वास ठेवला तर तो वि·श्वास खरा ठरू शकत नाही. पाणी, रक्त व आत्मा या प्रायश्चित्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून जे पुन्हां जन्मतात त्यांच्या ह्मदयांत पाप नसते.
ज्याला एखादी व्यक्ती फारशी माहित नाही त्याला विचारले तर तो ऐकणा­याला खूष ठेवायला म्हणेल, "होय, त्या व्यक्तीवर माझा वि·श्वास आहे. मी कांही त्या व्यक्तीला पाहिलेले नाही पण तरीसुध्दां माझा त्या व्यक्तीवर वि·श्वास आहे." तुम्हांला असं वाटते काय की ऐकणा­याला असं ऐकायला आवडेल? कदाचित एखाद्याला आवडेल. पण देवाला अशा प्रकारच्या वि·श्वासाची अपेक्षा आपल्याकडून नाही आहे.
देवाची इच्छा आहे की आपण निळ्या (येशूचा बाप्तिस्मा), जांभळ्या (येशूचें राजेपण), आणि किरमिजी (येशूचे रक्त) या द्वारे होणाया पापाक्षमेच्या सुवार्तेवर आपण वि·श्वास ठेवावा. येशूवर वि·श्वास ठेवण्याआधी त्यानें आपल्याला पापांपासून कसे मुक्त केले याची माहिती आपल्याला असली पाहिजे.
जेव्हां आपण येशूवर वि·श्वास ठेवतो तेव्हां त्यानें आपल्याला पाणी (येशूचा बाप्तिस्मा), रक्त (त्याचा मृत्यु) आमि आत्मा (येशू हाच देव आहे) या द्वारे आपल्याला कसे वाचवले याचे ज्ञान असणे जरूर आहे.
सत्य माहित नसेल तर वि·श्वास पूर्ण होऊ शकत नाही. येशू हाच मानवजातीचा उध्दारकर्ता आहे अशी श्रध्दा ठेवून त्याची पापक्षमेची सुवार्ता नीट समजून घेण्यानेच आपल्या ठायी खरा वि·श्वास रहातो.
 
 
येशूचा उपहास करणारा वि·श्वास
 
वि·श्वास ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे?
येशूच्या बाप्तिस्म्यासंबंधी ज्ञान असणे.
 
जर तुम्ही असा विचार केला, "मला वि·श्वास ठेवणे कठीण वाटते. पण येशू हा देव आहे व तो देवाचा पुत्र आहे म्हणून वि·श्वास ठेवणे मला भाग आहे." असं बोलणं येशूचा उपहास करण्यासारखे आहे. येशूचा बाप्तिस्मा व रक्त या प्रायश्चित्ताच्या सुवार्तेवर तुम्ही वि·श्वास ठेवलाच पाहिजे.
प्रायश्चित्ताची सुवार्ता समजून न घेतां येशूवर वि·श्वास ठेवणे हे येशूवर अजिबात वि·श्वास न ठेवण्यापेक्षां जास्त वाईट आहे. सत्याबद्दल अजाण राहून येशूच्या रक्तावर वि·श्वास ठेवून सुवार्ता गाजवणे हे निरर्थक आहे.
येशूने त्याचा बाप्तिस्मा व रक्त या द्वारे आपले सर्व अपराध कसे धुतले हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याशिवाय निवासमंडपाच्या निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या पडद्यातून कोणता अर्थ होतो हे आपण शिकलो तरच आपल्या ठायीं अफ्ळ व द्दढ वि·श्वास राहतो.
 
 
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताशी साम्य असणाया येशूवर वि·श्वास ठेवल्याखेरीज आपण पुन्हां जन्मू शकत नाही
 
पवित्रस्थानांत प्रवेश करण्यापूर्वी
याजक मंडळी काय करीत?
पितळी गंगाळांत असलेल्या पाण्याने
ते हातपाय धूत असत.
 
आपल्या प्रभु येशूने आपले तारण केलेले आहे. आपण त्याबद्दल देवाची केवळ स्तुति करतो. आपण पवित्रस्थानाकडे पाहिले तर आपल्या लक्षांत येईल की निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या पडद्यांतून त्याने आपल्याला प्रायश्चित्ताच्या सुवार्तेचे शब्द दिलेले आहेत. त्याबद्दल आपण त्याची उपकारस्तुति करू.
भयानक न्यायनिवाड¬श्वतून गेल्याखेरीज पापी माणूस पवित्रम्थानांत जाऊ शकत नसे. त्याच्या पापांबद्दल न्याय झाल्याशिवाय तो कसा काय पवित्रस्थानांत जाऊ शकणार होता? ते अशक्य होते. तसा मनुष्य गेलाच तर तो तेथल्या तेथे मरून पडत असे. पापी मनुष्य पवित्रस्थानांत जाऊहि शकत नव्हता किंवा जिवंतहि राहू शकत नव्हता.
पण आपल्या प्रभूनें आपल्याला पवित्रस्थानाच्या फाटकाच्या निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या आणि तलम सुताच्यामागे दडलेल्या रहस्याच्या द्वारे वाचवलेले आहे.
तुम्ही आणि मी त्याप्रकारे वाचलो आहोत काय? आपण जर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडासंबंधी असलेल्या देवाच्या शब्दांवर वि·श्वास ठेवला नाही तर प्रायश्चित्ताच्या सुवार्तेद्वारे आपले तारण होऊ शकत नाही. निळ्या रंगाचा अर्थ म्हणजे कांही देव नाही तर आपली सर्व पापें घेऊन जाणारा येशूचा बाप्तिस्मा असाच त्याचा अर्थ आहे.
निळ्या रंगाच्या सुतावर वि·श्वास न ठेवता एखादा माणूस होमार्पणाच्या वेदीपर्यंत जाऊ शकतो पण जेथे देवाचे अस्तित्व आहे त्या पवित्रस्थानीं मात्र तो जाऊ शकत नाही.
पवित्रस्थानांत जाण्यापूर्वी आपल्याला निळ्या रंगाच्या सुतावर (येशूचा बाप्तिस्मा), किरमिजी रंगाच्या सुतावर (वधस्तंभावरील येशूचे रक्त) आणि जांभळ्या रंगाच्या सुतावर (देव येशू जो देवाचा पुत्र) वि·श्वास ठेवावा लागतो. असा वि·श्वास धरल्यानंतरच देव आपल्याला स्वीकारतो व आपल्याला पवित्रस्थानाच्या पडद्यापलिकडे जाऊ देतो.
कांही जण दर्शनमंडपाच्या बाहेरच्या अंगणांत येतात आणि त्यांना वाटते की ते आंत आलेले आहेत. पण ह्राला तारण म्हणता येत नाही. तारण होण्यासाठी किती आत जायला हवे? आपल्याला अति पवित्रस्थानांपर्यत जाता आले पाहिजे. तेथे जाण्यासाठी आपल्याला पितळी गंगाळ ओलांडावे लागते. पितळी गंगाळ येशूच्या बाप्तिस्म्याचे प्रतिक आहे आणि त्यांत आपल्याला रोजची पापें धुवून, पवित्र होऊन मगच पवित्रस्थानांत जाता येते.
जुन्या करारांत याजकमंडळी प्रवेश करण्याआधी हातपाय धूत असत आणि नव्या करारांत येशूने त्याच्या शिष्यांची सबंध आयुष्यातील पापें धुऊन टाकलेली आहेत हे दर्शविण्यासाठी त्यांचे पाय धुतले होते.
देवाचा नियम म्हणतो, "कारण पापाचें वेतन मरण आहे, पण देवाचें कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे." (रोमकरांस पत्र 6:23). देव मनुष्याच्या पापाचा न्याय करतो पण त्यानें सर्व पापें त्याच्या पुत्राकडे देऊन आपल्याऐवजी त्याचा न्याय केला. ही देवाची प्रीति व त्याचें तारणकार्य आहे. जेव्हां आपण येशूचा बाप्तिस्मा, रक्त, मृत्यु व पुनरुत्थान ह्रावर वि·श्वास ठेवतो तेव्हांच आपले खरे तारण होते.
 
 
पुन्हां जन्मण्यासाठी देवाच्या शब्दांकडे आपण कधीच दुर्लक्ष करायला नको
 
देवाच्या शब्दांवर वि·श्वास ठेवणे. मी लोकांकडे कधीच दुर्लक्ष करीत नाही. जर एखादा नवीन कांही सांगत असेल तर मी त्याला विचारून शिकून घेतो. पण जेव्हां मी पवित्र निवासमंडपाचा अर्थ इतरांना विचारला तेव्हां कोणीच मला त्याचा अर्थ सांगू शकला नव्हता.
म्हणून मी बायबलकडे वळलो. निर्गमच्या पुस्तकांत त्याबद्दल विस्तृतपणे लिहिलेले आहे. आणि एखाद्याने जर ते नीट काळजीपूर्वक वाचले तर त्याला देवाचे शब्द समजू शकतील.
प्रिय मित्रांनो, येशूवर अंधवि·श्वास ठेवण्याने तुमचें तारण होऊ शकत नाही किंवा नियमित चर्चला जाण्याने तुमचा जन्म नव्याने होऊ शकत नाही. येशू निकदेमाला काय म्हणाला होता हे आपल्याला माहितच आहे. "तुम्ही इस्त्राएलाचे गुरू असूनहि तुम्हांला या गोष्टी समजत नाहीत काय? पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीहि देवाच्या राज्यांत प्रवेश करूं शकत नाहीं." (योहान 3).
जे येशूवर वि·श्वास ठेवतात ते निळ्या, किरमिजी व जांभळ्या सुतावर पण वि·श्वास ठेवतात. म्हणजेच ते येशूचा बाप्तिस्मा, त्याचा मृत्यु व तोच देवाचा पुत्र ह्रावर वि·श्वास ठेवतात.
येशूवर वि·श्वास ठेवून पुन्हां जन्मणे शक्य असते तर ते सोपे ठरले असते का? होय. `♫तुमचे तारण झाले आहे, माझेहि झाले आहे. आपल्या सर्वाचेच तारण झाले आहे.`, अशा आशयाचे एक गाणे म्हटले जाते. येशूवर वि·श्वास ठेवणारे पण नव्यानें न जन्मलेले असे पुष्कळ लोक आज जगांत आहेत.
आपल्याला बायबल नीट माहित असायला हवे. पापांची क्षमा होणारी सुवार्ता, पवित्र निवासमंडपातील निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या पडद्याचे रहस्य व त्याचा अर्थ याबद्दल सुध्दां माहिती असायला पाहिजे. ते एकदा समजले की स्वर्गाच्या राज्यांत जाईपर्यत आपण वि·श्वासाच्या निवासमंडपांत हर्षाने राहू शकतो. म्हणूनच येशूवर योग्य दिशेने व योग्य प्रकारे वि·श्वास ठेवणे आवश्यक आहे.
 
 
पवित्र होण्यासाठी असलेली प्रारंभीची सुवार्ता निळ्या रंगाच्या सुताने सुरू होते
 
तारण होण्यासाठी महत्त्वपूर्ण अट
काय आहे?
येशूचा बाप्तिस्मा.
 
कधी कधी एखाद्या माणसाला वाटते की कोणतीहि चूक न करता तो आदर्श जीवन जगू शकेल. पण जेव्हां तो कांही करायला जातो तेव्हां त्याला त्याच्यातील उणीवांची जाणीव होते, आणि मग पाप न करणे हे त्याला अशक्य वाटते. माणसं अपूर्ण अशी आहेत. त्यामुळे पाप न करता रहाण्याचे त्यांना अशक्य वाटते. पण येशूनें आपल्याला निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या द्वारे म्हणजेच प्रायश्चित्ताच्या सुवार्तेने आपल्याला पवित्र केलेले आहे त्यामुळे आपण देवाच्या पवित्रस्थानांत जाऊ शकतो.
देवानें अशा प्रकारे आपल्याला वाचवले नसते तर आपण स्वतःहून पवित्रस्थानांत कधीच जाऊ शकलो नसतो. याचे कारण काय आहे? जे लोक देहाने आदर्श वागतात त्यांनाच जायला मिळेल असं असते तर पवित्रस्थानांत जाण्यासाठी कोणतीच व्यक्ती लायक ठरली नसती. जो माणूस सुवार्ता वगळून येशूवर वि·श्वास ठेवतो तो त्याच्या ह्मदयांत पापांची भर धालीत असतो.
काळजीपूर्वक योजना करून केलेल्या तारणकार्याने येशूने आपल्याला पापमुक्त केलेले आहे. ते तारणकार्य म्हणजेच निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताच्या व तलम कापडाच्यामधून आपल्याला जो गूढ अर्थ समजतो तेच होय. येशूनें आपली सर्व पापें धुतलेली आहेत. तुम्ही ह्रावर वि·श्वास ठेवता का? होय. - तुमच्या ह्मदयांत पापक्षमेच्या सुवार्तेची साक्ष आहे का? - होय. -
जेव्हां तुम्ही सुवार्तेचे साक्षीदार बनता तेव्हांच तुम्ही `परमे·श्वरासाठी पवित्र` अशी अक्षरे कोरलेली पट्टी तुमच्या मस्तकावर बांधू शकता आणि `राजकीय याजकगणाच्या` (पेत्राचे पहिले पत्र 2:9) रांगेत जाऊ शकता. त्यावेळीच तुम्ही लोकांसमोर देवाचे सेवक म्हणून उभे राहून प्रमुख याजकाचे काम करू शकता.
प्रमुख याजकाच्या मुकुटाला सोन्याची पट्टी असे. ती पट्टी निळ्या फीतीने बांधीत असत. ती निळ्या रंगाचीच कां असे? कारण येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे (जुन्या करारातील पापार्पणाच्या डोक्यावर हात ठेवणे व नव्या करारातील बाप्तिस्मा) आपली सर्व पापें घेतली आणि आपल्याला निष्पाप किंवा निर्दोष असं बनवले.
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या गूढ अर्थाच्या आवरणांत गुरफटलेली, `परमे·श्वरासाठी पवित्र` अशी अक्षरे कोरलेली पट्टी, आपण येशूवर कितीहि वि·श्वास ठेवला तरी ती सहजा सहजी मिळत नाही.
आपण नीतिमान कसं होऊ शकतो? मत्तय 3:15 मध्ये म्हटले आहे, "कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणे करणें हे आपणांला उचित आहे." येशूने बाप्तिस्मा घेऊन आपल्याला जगांतील सर्व पापांपासून वाचवलेले आहे. त्यानें आपली सर्व पापें स्वतःकडे घेतल्यामुळे आपण नीतिमान बनलो आहोत.
येशूचा बाप्तिस्मा झाला नसता तर आपण पापी नाही अस कसं काय म्हणू शकणार होतो? वधस्तंभावर खिळलेल्या येशूला आठवून जगाने कितीहि जरी अश्रू ढाळले असते तरी त्या अश्रूंनी जगाची पापें कधीच धुतली गेली नसती. आपण पश्चात्ताप करून कितीहि रडलो असतो तरी आपल्या ठायीं पापें राहिलीच असती.
`परमे·श्वरासाठी पवित्र.` बाप्तिस्मा व रक्त याच्याद्वारे येशूने आपले सर्व अपराध स्वतःकडे घेतले आणि देवानें तसं होऊ दिले आणि या तारणकार्याचे शब्द बायबलमध्ये लिहिलेले आहेत म्हणूनच आपण दुर्बल असतांनासुध्दां नीतिमान बनलो आहोत.
म्हणूनच आपण देवासमोर उभे राहू शकतो. नीतिमान म्हणून आपण जगाला सुवार्तेचा संदेश देऊ शकतो. `♪माझे, तुमचे व आपल्या सर्वांचेच तारण झालेले आहे.` देवाच्या योजनेप्रमाणे आपण पापमुक्त झालो आहोत.
प्रायश्चित्ताच्या सुवार्तेचे शब्द तुमच्या ह्मदयांत नसतील तर तुम्ही कितीहि जरी प्रयत्न केला तरी तुमचे तारण होऊ शकणार नाही. कोरियामधील एका सुप्रसिध्द भावगीतांत म्हटले आहे, "♫हाय, मी जेव्हां तिला पहातो, तिच्या जवळ जातो तेव्हां माझे ह्मदय नकळत धडकते, मी प्रेमांत पडलो आहे." माझें ह्मदय धडकते पण तिचे नाही. माझं प्रेम कधीच परत येत नाही.
लोकांना वाटते की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकाराने तारण मिळते. ते विचारतात, "बाप्तिस्म्याच्या द्वारेच आपल्याला तारण कां मिळते?" जर बाप्तिस्म्याद्वारे तुमचे तारण झाले नाही तर तुमचें पूर्ण तारण होऊ शकत नाही. सर्व पापांपासून सुटका होऊन देवापुढे नीतिमान बनण्याचा एकच रस्ता म्हणजे बाप्तिस्म्याची सुवार्ता होय.
 
 
निळ्या रंगाच्या सुताने दर्शविणारे असे कोणते तारण येशूनें  आपल्याला दिले आहे?
 
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामधून देवाने जे तारणकार्य आपल्याला दाखवून दिलेले आहे ते तारण म्हणजे मानवतेला मिळालेली देवाची देणगी आहे. त्या देणगीमुळे पवित्र निवासमंडपांत जाऊन शांतीने रहाणे आपल्याला शक्य झाले आहे. चर्चच्या मंडळींत नीतिमान म्हणून राहून देवाच्या शब्दांचा अभ्यास करणेहि आपल्याला शक्य झालेले आहे. जेव्हां आपण देवासमोर प्रार्थना करतो त्यावेळी सुवार्ता आपल्याला देवाच्या प्रेमाचा आशीर्वाद देते. म्हणूनच तारण फार मौल्यवान आहे. येशूने आपल्याला `खडकावर` घर बांधण्यास सांगितलेले आहे. हा खडक म्हणजेच येशूचा बाप्तिस्मा होय. आपल्या सर्वांचेच तारण होऊन, स्वर्गांत जाऊन आपण युगानुयुगाचे आयुष्य जगण्यासाठी देवाची मुल व्हायला पाहिजे.
प्रिय मित्रांनो, प्रायश्चित्ताच्या सुवार्तेमुळे आपण आता वि·श्वासाने पवित्रस्थानांत जाऊ शकतो. येशूच्या बाप्तिस्म्यामुळे आपली पापें धुतली जाऊन आपला उध्दार झालेला आहे.
येशूचा बाप्तिस्मा व त्याचे रक्त हीच उदंड प्रायश्चित्ताची स्वर्गीय सुवार्ता आहे. तुमचा ह्रावर वि·श्वास आहे का?
आपली रोजची पापें सुध्दां धुतली गेलेली आहेत अशी जी उदंड प्रायश्चित्ताची सुवार्ता आहे; त्या येशूच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवण्याने आपण पुन्हां नव्याने जन्मलेले आहोत. हालेलूया! परमे·श्वराची स्तुति असो.
पाणी व आत्म्याची सुवार्ता (पाणी व रक्ताची सुवार्ता) हीच येशूनें सांगितलेली खरीखुरी सुवार्ता आहे. हे पुस्तक येशूची सुवार्ता म्हणजेच पाणी व आत्मा याची सुवार्ता सांगण्यासाठी लिहिलेले आहे.
पुष्कळ लोक सत्य समजून न घेता येशूवर वि·श्वास ठेवतात त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करतांना ते संभ्रमित किंवा घोटाळल्यासारखे असतात. म्हणूनच आपण बायबलकडे वळून खरी सुवार्ता समजून घेतली पाहिजे. अजूनहि वेळ आहे. नीफ् विचार करा.
ज्यांच्या मनांत पाण्याने व आत्म्याने जन्मण्यासंबंधी शंका आहेत त्यांच्यासाठी मी माझ्या दुस­या पुस्तकांत सविस्तरपणे लिहिलेले आहे.