• All e-books and audiobooks on The New Life Mission website are free
  • Explore multilingual sermons in global languages
  • Two new revised editions in English have been released
  • Check out our website translated into 27 languages
Search

Sermons

Subject 5 : The Proper Confession of Sin

< 5-1 > पापाची कबूली अचूक व प्रामाणिकपणे कशी द्यायला पाहिजे (योहानाचें पहिलें पत्र 1:9)

2021.04.23 132
(योहानाचें पहिलें पत्र 1:9)
"जर आपण आपलीं पापें पदरीं घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील."
 
 
रक्ताची सुवार्ता ही अर्धी सुवार्ता आहे
 
केवळ रक्ताच्या सुवार्तेने आपण
स्वर्गाच्या राज्यांत जाऊ शकतो का?
नाही. कधीच नाही. आपण संपूर्ण सुवार्तेवर वि·श्वास
ठेवलाच पाहिजे. (पाणी व आत्म्याची सुवार्ता)
 
योहानाचें पहिलें पत्र 1:9 ह्रातील शास्त्रवचन फक्त नीतिमान माणसांना लागू पडते. जर तारण न झालेल्या पापी माणसानें उल्लेख केलेल्या ह्रा शास्त्रवचनाप्रमाणे स्वतःची पापें कबूल करून त्याच्या रोजच्या पापांची क्षमा होण्यासाठीं प्रयत्न केला तर त्याच्या पापांची क्षमा केली जाणारं नाही. मी येथे काय सांगत आहे हे तुम्हांला समजते का? ज्यांचा नव्यानें जन्म झालेला नाही अशा पापी लोकांना ही शास्त्रवचनें लागू पडत नाही.
नव्यानें जन्म न झालेली अशी कितीतरी माणसे आज जगांत आहेत. ते लोक योहानाचें पहिलें पत्र ह्रांतला पहिला अध्याय वाचतात आणि आपल्या पापांची क्षमा होईलच असं धरून चालून पश्चात्तापयुक्त ह्मदयानें प्रार्थना करतात.
पण नव्यानें जन्म झालेला नाही अशा मनुष्याने पापें कबूल करून पश्चात्तापाची प्रार्थना केली तर त्याचे तारण होऊं शकेल का? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे व आपण त्याबद्दल विचार करून शंकानिरसन करून घेऊ.
योहानाचें पहिलें पत्र वाचण्याआधीच आपण ठरवले पाहिजे की योहान कोणत्या प्रकारचा मनुष्य होता. नीतिमान की पापी? मला असाहि प्रश्न विचारायचा आहे, पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून नव्याने जन्म घेतलेला प्रेषित योहान नीतिमान माणूस होता की पापी होता?
तो पापी होता असं तुम्ही जर उत्तर दिले तर तुमचा बायबलवरील वि·श्वास चुकीचा ठरतो. येशूवर वि·श्वास ठेवून नव्यानें जन्म घेतलेला प्रेषित योहान जर नीतिमान होता असं तुम्ही म्हटले तर तुमचा वि·श्वास त्याच्या वि·श्वासापेक्षां वेगळा आहे असं स्पष्ट होते. प्रेषित योहानाच्या वि·श्वासासारखाच तुमचाहि वि·श्वास असायला पाहिजे.
आता मी तुम्हांला दुसरा प्रश्न विचारतो. योहानानें लिहिलेली पत्रें नीतिमान लोकांना उद्देशून लिहिलेली होती कीं पापी लोकांना उद्देशून लिहिलेली होती? त्यानें ती पत्रें नीतिमान लोकांना उद्देशूनच लिहिली होती.
म्हणूनच नव्यानें जन्म न झालेल्या पापी लोकांनी योहानाचें पहिलें पत्र 1:8-9 ह्रा वचनावर बोट ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचे ठरते. तुम्हाला नीतिमान व्हायची इच्छा असेल तर देवासमोर स्वतःची पापें कबूल करून पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवा. ज्या सुवार्तेने जगाची सर्व पापें धुतलेली आहेत त्या सुवार्तेने देव मग तुमची सर्व पापें धुऊन टाकतो.
प्रेषित योहानाचा वि·श्वास हा असा होता. योहानाचें पहिलें पत्र ह्रांतील अध्याय 5 मध्ये त्यानें म्हटले आहे कीं त्याचा "पाणी, रक्त आणि आत्मा" ह्रावर वि·श्वास आहे. येशू ख्रिस्त पाण्यानें, रक्तानें आणि आत्म्यानें आला ह्रावर तुमचा वि·श्वास आहे का? येशू फक्त वधस्तंभाद्वारे आला होता किंवा तो बाप्तिस्मा, त्याचे रक्त व आत्मा याच्या द्वारें आला होता असा तुम्ही वि·श्वास ठेवता?
केवळ रक्ताच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून तुम्हीं स्वर्गाच्या राज्यांत जाऊ शकता का? फक्त वधस्तंभावरील रक्ताच्या सुवार्तेवरच तुम्ही वि·श्वास ठेवत असाल तर तुम्हांला फक्त अर्धीच सुवार्ता समजलेली आहे. तुम्ही वधस्तंभावरील रक्तावरच वि·श्वास ठेवता तर मग तुम्ही तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून दररोज प्रार्थना करीत असाल यात शंकाच नाही. पण त्याचा परिणाम असा होतो की नंतर तुम्हांला वाटायला लागते की अशा पश्चात्तापाच्या प्रार्थना करण्यानेच तुमची पापें धुतली जातात.
पण फक्त वधस्तंभावरील रक्तावर वि·श्वास ठेवण्याने आणि दररोजच्या पापांबद्दल पश्चात्तापाच्या प्रार्थना करण्यानें तुमची पापें धुतली जाणे शक्य आहे का? फक्त वधस्तंभावरील रक्तावर वि·श्वास ठेवून किंवा दररोज पश्चात्तापाच्या प्रार्थना करून कोणीहि स्वतःची पापें धुऊ शकत नाही, म्हणूनच तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल तर तुमची पापें तुमच्या अंतःकरणांत तशीच रहातील. तुमचा वि·श्वास सुद्धा अपूर्ण राहील आणि अजूनपर्यंत तुम्हांला पाणी व आत्म्याची सुवार्ता समजलेली नाही असाहि अर्थ होऊ शकतो.
प्रेषित योहान नव्यानें जन्मलेला होता याचे कारण म्हणजे त्यानें पाणी, रक्त आणि आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवला होता. पण तुम्ही तर फक्त खांबावरील रक्तावर वि·श्वास ठेवता. तुम्हांला स्वतःलाच सुवार्तेबद्दल नीट माहिती नसतांना तुम्ही इतरांना तारण मिळण्यासाठीं कसे काय मार्गदर्शन करणार? तुमचा स्वतःचाच नव्यानें जन्म झालेला नाही, आणि तुम्ही पश्चात्तापाच्या प्रार्थना करीत पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रयत्न करीता. असं वागण्याचा कांहीच उपयोग होणार नाही.
पश्चात्तापाच्या प्रार्थना करण्यासाठीं एखाद्यानें कितीहि कष्ट केले तरी त्याच्या अंतःकरणातील पापें धुतली जाऊ शकत नाही. जर एखादेवेळेस कधी तुम्हांला स्वतःची पापें धुतली गेली आहेत असं वाटले तर ते वाटणे म्हणजे तुसता भावनेचा किंवा कल्पनेचा खेळ असतो. तुम्ही जर पश्चात्तापाने प्रार्थना केली तर तुम्हांला एक किंवा दोन दिवस ताजेतवाने, उत्साही वाटण्याचा संभव आहे. पण अशा मार्गाने तुम्ही तुमच्या पापांपासून कधीच मुक्त होऊ शकत नाही.
पापांपासून आपण मुक्त होऊ अशा आशेने पापी लोक पश्चात्ताप करून प्रार्थना करतात. येशूवर दीर्घ काळ वि·श्वास ठेवूनहि ते पापीच रहातात. याचे कारण पाणी व आत्म्याची सुवार्ता त्यांना माहित नसते. येशूवर वि·श्वास ठेवून सुद्धां तुमचा नव्यानें जन्म झालेला नसेल, तर त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापैकी एक असण्याची शक्यता आहे. पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही जर दररोज पश्चात्तापाच्या प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ तुमचा नव्यानें जन्म झालेला नाही असाच होतो. प्रेषित योहानानें ज्याप्रमाणे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवला होता त्याप्रमाणेच आपणहि ह्रा सुवार्तेवर वि·श्वास ठेवायचा कीं स्वतःचे विचार आणि भावना ह्राच्यावर वि·श्वास ठेवायचा, याबाबतीत तुम्हीच निर्णय घ्यायला पाहिजे. वरीलपैकी एक विचार खरा तर दुसरा खोटा आहे.
जगाची सर्व पापें एकदम एकाच वेळी घेऊन जाण्यासाठी येशूचा बाप्तिस्मा झाला होता, सर्व पापी लोकांच्या पापांसाठी त्यानें वधस्तंभावर मृत्यूदंड सहन केला, हीच बायबलप्रमाणे खरी सुवार्ता आहे. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु यावर कोणी वि·श्वास ठेवला तर त्याला त्याचवेळी त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याचे तारण होते. पण जो कोणी त्याच्या पश्चात्तापाच्या प्रार्थनेच्या द्वारें त्याचें अपराध धुण्याचा प्रयत्न करील तर तो त्याच्या पापांपासून कधीहि मुक्त होणार नाही. तुमची रोजची पापें तुमच्या स्मरणांत असतात का? ज्या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही अशा पापांची देव दखल घेतो का? रोजच्या पापांची समस्या पश्चात्तापाच्या प्रार्थना करण्याने सुटते का? ह्रा सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे नाही.
 
 
खरा पश्चात्ताप आणि पापें कबूल करण्याचा उद्देश
 
पापें कबूल करणे आणि सत्कार्ये
करणे याच्या काय मर्यादा आहेत?
जरी आपल्याला सबंध आयुष्यभर आपली पापें कबूल करावी
लागत असली तरी आपले अपराध कबूल करण्यानें
आणि चांगली कामें करण्याने कांही आपले
तारण होऊ शकत नाही.
 
बायबलप्रमाणे पश्चात्ताप याचा अर्थ, चुकीचा वि·श्वास सोडून देऊन ख­या वि·श्वासाकडे वळणे असा आहे, आणि नीतिमान मनुष्यासाठीं त्याचा अर्थ, स्वतःचे चुकीचे वागणे कबूल करून सुवार्तेच्या प्रकाशाकडे परत येणे असा आहे.
तुम्ही जर या क्षणीं पापी असाल तर तुम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे, "परमप्रिय परमेश्वरा, मी पुष्कळ पापें केलेली आहेत मी नरकांत जाण्याच्या पात्रतेचा आहे. पण सर्व पापांपासून मी मुक्त व्हावे अशीच माझी इच्छा आहे. कृपया तू मला पापांपासून मुक्त कर. माझा अजूनपर्यंत नव्यानें जन्म झालेला नाही आणि मला ठाऊक आहे की त्यामुळे माझ्या वाटेला नरक आहे." पापें कबूल करण्यासाठीं ही अशी प्रार्थना करणे योग्य आहे.
ज्या मनुष्याचा जन्म नव्यानें झालेला आहे त्यानें पापें कबूल करण्यासाठीं कशी प्रार्थना केली पाहिजे? "परमप्रिय परमेश्वरा, मी माझ्या देहाच्या अशक्तपणामुळे पाप केलेले आहे. मी वि·श्वास धरतो की बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला होता तेव्हां त्यानें मला सर्व पापांपासून इतकेच काय मी आताच हे जे पाप केलेले आहे, त्या पापापासून सुद्धां मुक्त केले. माझ्या पापांसाठी खरं म्हणजे मी मरायला पाहिजे. पण पाणी व रक्ताच्या द्वारे प्रभूने माझें तारण केले म्हणून मी त्याचे उपकार मानतो." नव्यानें जन्मलेले व नव्याने जन्म न घेतलेले ह्रा दोघांच्याहि, पापें कबूल करण्याच्या प्रार्थनापद्धतींत फरक असतो.
प्रेषित योहानाच्या वि·श्वासाप्रमाणेच आपला सर्वांचा वि·श्वास असायला पाहिजे. जर तुम्ही पापें कबूल करण्याच्या प्रार्थनेच्या नांवाखाली तुमची पापें लपवू लागला तर पापाचे वेतन जे मरण आहे, त्या मरणापासून तुम्ही कधीच वाचू शकणार नाही.
नव्यानें जन्म न घेतलेल्या सर्व पापी लोकांनी अशा प्रकारे कन्फेशन टाईप प्रार्थनेच्या पाठीमागे लपण्याचे सोडून देऊन; पाणी, रक्त आणि आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवण्यास प्रारंभ केला पाहिजे. योहानाच्या वि·श्वासासंबंधीचे ज्ञान आत्मसात करून त्यांनी स्वतःचे तारण करून घेतले पाहिजे.
पापी लोकांना, त्यांच्या पापांमुळे नंतर किती भयंकर न्यायनिवाडा होईल याची अजिबात कल्पना नसते. देवासमोर सर्वांत भयंकर पाप म्हणजे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेने नव्याने जन्म घेण्याच्या सुवार्तेवर वि·श्वास न ठेवणे हे आहे.
येशूवर वि·श्वास ठेवणारे पण नव्याने जन्म न घेतलेले या सर्वांनी पापें कबूल करून अशी प्रार्थना केली पाहिजे, "प्रभू, नरकांत अग्नीच्या ज्वालेंत टाकले जाण्याच्या लायकीचा मी पापी मनुष्य आहे." असं बोलतांना त्याने "प्रभू माझी पापें तू कृपाकरून धुऊन टाक" असं म्हणणे टाळले पाहिजे. जेव्हां पापी मनुष्य, त्याला वाचवण्यासाठीं यार्देन नदीतील येशूचा बाप्तिस्मा व त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्राची सुवार्ता अंतःकरणपूर्वक स्वीकारतो, तेव्हां त्याचे तारण होते. देवासमोर पापमुक्त होण्यासाठीं, पापी माणसानें अशा प्रकारची प्रार्थना केली पाहिजे.
पापी मनुष्यानें फक्त एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे त्याचा नव्यानें जन्म झालेला नाही हे त्याने कबूल केले पाहिजे, आणि त्यानंतर त्यानें पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास धरला पाहिजे. तसं केले की त्याचे ताबडतोब तारण होते. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेमुळे सर्व पापी लोकांचे तारणकार्य पूर्ण झालेले आहे. "आणि तारण दुस­या कोणाकडून नाहीं; कारण जेणेंकरून आपलें तारण होईल असें दुसरें कोणतेंहि नांव आकाशाखालीं मनुष्यांमध्यें दिलेलें नाहीं." (प्रेषितांचीं कृत्यें 4:12). देवानें त्याचा पुत्र येशू ह्राचा, बाप्तिस्मा करणा­या योहानाकहून झालेला बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील मुत्यु याच्याद्वारें सर्व पापी लोकांचे तारण केले.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, लोक देहाने आणि मनानें जी कांही पापें करतात ती सर्व पापें प्रभूने धुतलेली आहेत. आपले तारण होण्यासाठीं आपण ख­या सुवार्तेवर वि·श्वास ठेवलाच पाहिजे. हा एकच रस्ता आहे की त्यामुळे आपण पवित्र होऊन पापमुक्त होऊ शकतो. पाणी व आत्म्याच्या ख­या सुवार्तेवर आपण वि·श्वास ठेवतो तेव्हां आपण कायमसाठी नीतिमान बनू शकतो.
येशूचा बाप्तिस्मा झाला होता, बाप्तिस्म्याद्वारे त्यानें जगाची पापें स्वतःकडे घेतली, त्या पापांची किंमत त्याने स्वतःचे जीवन देऊन वधस्तंभावरती मोजली, तीन दिवसानंतर त्याचे पुनरूत्थान झाले आणि आता तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. हेच एकमेव सत्य आहे.
आपण सर्वांनी अशी प्रार्थना केली पाहिजे, "प्रभू, मी मरणाच्या दिवसापर्यंत पाप करण्याखेरीज दुसरं कांही करू शकत नाही. मी माझ्या मातेच्या गर्भाशयापासूनच पापी म्हणून जन्म घेतलेला आहे आणि मी इतकी पापें केलेली आहेत कीं त्यासाठीं मला नरकाच्या अग्नी ज्वालेंत टाकले जाईल. याच कारणास्तव जो पाण्याने, रक्ताने आणि आत्म्याने आला आणि माझा तारणकर्ता झाला त्या येशूवर मला वि·श्वास ठेवायचा आहे."
मत्तयाच्या तिस­या अध्यायांत लिहिल्याप्रमाणे येशूने त्याचा यार्देन नदींत बाप्तिस्मा झाला तेव्हां जगाची सर्व पापे आणि आपण मरेपर्यंत जी कांही पापें करणार आहोत ती सर्व पापें हरण केली. "तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." (योहान 8:32).
जर येशूनें फक्त पूर्वीच्या पापांपासून सोडवले असते आणि आपल्याला आपल्याच पापांची समस्या सोडवण्यास सांगितले असते तर आपण सतत दुःखपूर्ण अवस्थेत असतो. पण येशूनें त्याचा बाप्तिस्मा व रक्त या द्वारें आपल्याला पापमुक्त केले. तर मग आपल्याला काळजी करण्याचे काय कारण आहे? जेव्हां आपण येशूचा बाप्तिस्मा व त्याचे वधस्तंभावरील रक्त ह्रावर वि·श्वास ठेवून परमेश्वराचे आभार मानतो तेव्हां आपल्या ठायीं पवित्र आत्मा येतो.
तुम्ही येशूवर वि·श्वास ठेवता का? तुमच्या ठायीं पवित्र आत्मा आहे असा वि·श्वास तुम्ही धरता का? येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली होती तेव्हांच तुमची सर्व पापें येशूकडे दिली होती. त्यानंतर त्या पापांबद्दल त्याचा वधस्तंभावर न्याय केला गेला. अशा प्रकारे येशूने नरकयातनेपासून आपली सुफ्का केली. खरी सुवार्ता हीच आहे.
 
 
नीतिमान मनुष्याची पापकबूलीची प्रार्थना
 
नीतिमान मनुष्याची खरी पाप
कबूलीची प्रार्थना काय आहे?
तो कबूल करतो की तो रोजच पाप करतो पण
त्याचा वि·श्वास असतो कीं येशूनें 2000
वर्षापूर्वी त्याची रोजची पापें
धुतलेली आहेत.
 
योहानाचें पहिलें पत्र 1:9 मध्ये म्हटलें आहे, "जर आपण आपलीं पापें पदरीं घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील."
त्याचा अर्थ असा होतो की जर एखाद्याने पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास करायचा असं ठरवले तर त्यानें अशी प्रार्थना केली पाहिजे, "प्रभो, माझ्या आयुष्यांत पाप केल्याशिवाय मी राहू शकत नाही पण पश्चात्तापाच्या प्रार्थना करून किंवा तुझ्याकडे क्षमेची मागणी करून कांही माझे तारण होऊ शकणार नाही हे मला समजते. पापाचें वेतन मरण आहे हे शास्त्रवचन मला माहित आहे. अशा स्थितींत केवळ येशूचा बाप्तिस्मा व त्याचा वधस्तंभच माझी पापें धुऊ शकेल याची मला खात्री आहे. मी आज पाप केले ते मी तुझ्यापुढे कबूल करतो. पण माझं हे आजचें पाप 2000 वर्षापूर्वी आधीच धुतलेले होते असा माझा वि·श्वास आहे." अशा प्रकारच्या प्रार्थनेने त्या मनुष्याच्या मनाला लागत असलेली अपराधीपणाची टोचणी थांबून, त्याच्या पापांची समस्या ताबडतोब दूर होते.
ज्या लोकांचा नव्यानें जन्म झालेला आहे त्यांना फक्त त्यांची पापें कबूल करावी लागतात. तसं करतांना ते त्यांचा वि·श्वास प्रकट करतात तो असा कीं येशूने ते करत असलेली सर्व पापें आधीच धुतलेली आहेत. 2000 वर्षापूर्वीच येशू पापी लोकांसाठी बाप्तिस्मा घेऊन मरण पावला होता म्हणूनच ते लोक कितीहि जरी अशक्त व अपूर्ण असले तरी येशूनें त्यांची सर्व पापें संपूर्णतः धुतलेली आहेत.
आज आपण जे शास्त्रवचन वाचले ते नीतिमान माणसांसाठीं खूप चांगले आहे. पापी मनुष्यानें जर ह्रा शास्त्रवचनाचा गैरवापर केला तर त्याचा शेवट नरकांत होईल. तरीपण बायबलमधील ज्या वचनाचा जास्त गैरवापर केला जातो ते शास्त्रवचन हेच आहे. ह्रा शास्त्रवचनामुळे ख्रिस्ती लोकांत खूप काळ गैरसमजूती निर्माण झालेल्या आहेत.
अशा अर्थाची एक म्हण आहेः अनुभव नसलेला डॉक्टर त्याच्या पेशंटना मारण्याची शक्यता आहे. जेव्हां अनुभव नसलेला डॉक्टर स्वतःला जितके कांही करता येते त्याच्यापलिकडे कांही करायला गेला तर त्याचा पेशंट मरतो.
म्हणूनच एखाद्याने उत्तम शिक्षण घेऊन, त्याचे काम नीट पार पाडण्यासाठी अनुभवी बनले पाहिजे असा आयुष्याचा एक नियम झालेला आहे. वि·श्वासाच्या जगांत सुद्धां हाच नियम आहे. जे लोक देवाचे वचन शिकवतात त्यांनी त्या वचनातील सत्य हुबेहूब स्पष्टपणे शिकवले पाहिजे, आणि जे लोक त्यांच्याकडून शिकतात त्यांनी सुद्धां त्यांना जे कांही शिकवलेले आहे त्यावर वि·श्वास ठेवला पाहिजे.
जर उपदेश करणा­यांनी त्यांच्या शिष्यांना चुकीचे शास्त्रलेख शिकवले, किंवा वि·श्वासू मंडळींनी चुकीचे बायबलशिक्षण घेतले तर त्याचा परिणाम दोघांच्याहि वाटेला न्यायनिवाडा व नरक येण्यांत होतो. ज्यांचा जन्म नव्याने झालेला आहे तेच फक्त बायबल सुयोग्य रीतीने शिकवू शकतात. एखाद्या चांगल्या औषधाचा डोस पेशंटला नीट दिला नाही तर पेशंट मरू शकतो. देवाचें शास्त्रवचन शिकवणे व शिकणे या दोहोंबाबतीत पण तसेच म्हणता येईल. देवाचे शास्त्रवचन हे जीवनांत आवश्यक असणा­या अग्नीप्रमाणे आहे. पण ही आग लहान मुलांच्या हातांत पडली तर चुकीच्या हातांपायी देवाचें शास्त्रवचन भयंकर संकट आणू शकते.
म्हणूनच नीतिमान माणसाची पापे कबूल करण्याची प्रार्थना, आणि पापी माणसानें पापें कबूल करण्याची प्रार्थना यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. योहानाचें पहिलें पत्र 1:9 हे शास्त्रवचन नीतिमान लोकांसाठीं आहे. जेव्हां नीतिमान माणूस त्याची पापें कबूल करून वि·श्वासाने देवासमोर प्रार्थना करतो तेव्हां तो त्या पापांपासून मुक्त होतो कारण येशूनें त्याची ती पापें 2000 वर्षापूर्वीच धुतलेली आहेत.
पापी लोक त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना करतात तेव्हा त्यांची पापें धुतलेली आहेत असा वि·श्वास त्यांनी बाळगणे हे चुकीचे आहे. एखाद्याचा जर नव्यानें जन्म झालेला नसेल तर त्यानें पापांची कबूली दिल्यामुळे त्याची पापें धुतली जाणे शक्य आहे का?
देव न्यायी आहे. देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला ह्रा जगांत पाठवले. जगाची पापें घेऊन जाणारा त्याचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचे रक्त याच्याद्वारे; त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवणा­यांचे त्याने तारण केले. म्हणूनच नीतिमान माणूस त्याची पापें कबूल करतो तेव्हां देव त्याला सांगतो कीं येशूनें त्याची सर्व पापें 2000 वर्षापूर्वीच धुतलेली आहेत. अशा प्रकारचा मनुष्य जरी देहाने पाप करीत असेल तरी तो खात्रीपूर्वक म्हणत असतो कीं त्याच्या ह्मदयांत अजिबात पाप नाही.