• All e-books and audiobooks on The New Life Mission website are free
  • Explore multilingual sermons in global languages
  • Two new revised editions in English have been released
  • Check out our website translated into 27 languages
Search

Sermons

Subject 7 : The Fallacy in the Theory of Predestination and Divine Election

< 7-1 > अगाऊ निवड व ईश्वरी निवड यांच्या नांवाखाली केली गेलेली फसवणूक (रोमकरांस पत्र 8:28-30)

रोमकरांस पत्र 8:28-30)
"परंतु आपल्याला ठाऊक आहे कीं, देवावर प्रीति करणा­यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणें बोलाविलेल्यांस देवाच्या करणीनें सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचें त्याला पूर्वज्ञान होतें त्यांनीं आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणें बनावें म्हणून त्यानें त्यांना अगाऊच नेमून ठेवलें; ह्रांत हेतु हा कीं, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्यानें अगाऊ नेमून ठेवलें त्यांना त्यानें पाचारणहिं केलें. ज्यांना त्यानें पाचारण केलें त्याना त्यानें नीतिमानहि ठरविलें; आणि ज्यांना त्यानें नीतिमान ठरविलें त्यांचें त्यानें गौरवहि केलें."
 
देवानें आपल्यापैकी फक्त थोडट्या
जणांना नेमलेले आहे का?
नाही. ख्रिस्तामध्ये त्यानें आपल्या
सर्वांना नेमलेले आहे
 
अगाऊ निवड व ईश्वरी निवड ह्रा मूलभूत शास्त्रावर आधारित जे ख्रिस्ती शास्त्रलेख लिहिले गेले त्याच्यामुळे येशूवर विश्वास ठेवू पहाणा­या लोकांची दिशाभूल होऊन त्यांची मनें घोटाळल्यासारखी झालेली आहेत.
देवाचं ज्या लोकांवर प्रेम आहे त्यांना तो निवडतो तर जे लोक त्याला आवडत नाहीत त्यांना तो दोषी ठरवितो असं खोटी धर्मशास्त्रें अगाऊ नेमणूकीसंबंधी बोलताना सांगतात. त्याचा अर्थ असा होतो की जे लोक देवाकडून नेमलेले असतात ते पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले असतात म्हणूनच त्यांचे स्वर्गांत स्वागत होते पण जे नेमलेले नाहीत ते नरकाच्या अग्नींत जातात.
देव जर आपल्यापैकी थोडट्यांना निवडत असेल तर आपण अती शोकानें दुःखपूर्ण प्रश्न विचारण्याखेरीज दुसर कांही करू शकत नाही. "माझे तारण होण्यासाठी मला अगाऊ नेमलेले आहे का?" आपल्याला जर आधीच निवडलेले नसेल तर येशूवर विश्वास ठेवण्यांत कांही अर्थ उरत नाही. अशा प्रकारच्या तत्वज्ञानामुळें लोकांना, विश्वास ठेवण्याऐवजी आपण देवाकडून नेमलेले आहोत की नाहीं याचीच जास्त काळजी वाटते.
आपण जर ह्रावर विश्वास ठेवला तर आपल्या सर्व शंकांचें निरसन होऊन आपण फक्त देवावर कसा काय विश्वास ठेवू शकू? देवानें आपल्याला खरोखरच निवडलेले आहे हे आपण कसं काय सिद्ध करू शकतो? तर मग देव फक्त त्यानें निवडलेल्या लोकांचा देव बनतो. पण त्यानें तर म्हटलें आहे, "किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाहि नव्हे काय? हो, आहे." (रोमकरांस पत्र 3:29).
अगाऊ निवड व ईश्वरी निवड याच्या अर्थाबाबतीत अनेक लोक गैरसमज करतात त्यामुळे येशूवर विश्वास ठेवूनसुद्धां, आपला नाशच होणार या विचाराने ते गलितगात्र होतात.
इफिसकरांस पत्र 1:3-5 मध्यें म्हटलें आहे, "आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्यानें स्वर्गांतील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्यें आशीर्वादित केलें आहे;त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेंत पवित्र व निर्दोष असावें, म्हणून त्यानें जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलें; त्यानें आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणें आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारें स्वतःचे दत्तक होण्याकरितां प्रेमानें पूर्वीच नेमिलें होतें."
अगाऊ निवड व ईश्वरी निवड यासंबंधी बायबल आपल्याला काय सांगते हे समजून घेऊन, पाणी व आत्म्याच्या द्वारे होणा­या तारणावरील आपला विश्वास बळकट केला पाहिजे.
रोमकरांस पत्र याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले आहे? धर्मशास्त्राची कांही जाणकार मंडळी `बिनाशर्त निवड` अशा प्रकारची बीनबुडाची विधाने करतात. धर्मशास्त्र म्हणजे देव आहे काय? धर्मशास्त्र मूळातच देव नाही आहे.
देवानें जगाच्या स्थापनेपूर्वी संपूर्ण मानवजातीला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतले आणि आपले तारण करून आपल्याला नीतिमान बनवण्याचे ठरवले. येशू आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो. अविश्वासू लोक त्यांच्या स्वतःच्याच विचारांवर विश्वास ठेवतात पण विश्वासू लोकांच्या विश्वासाचा पाया देवाच्या वचनावर आधारित असतो.
 
 
जुन्या करारातील ईश्वरी निवड
 
बिनाशर्त निवड हे विधान खरे आहे का?
नाही. आपल्या देवाचे मन कांही लहान नाही.
देवाने फक्त थोडट्या लोकांना न निवडता, येशूच्या ठायीं
सर्व पापी लोकांना निवडलेले आहे.
 
उत्पत्ति 25:21-26 मध्ये इसहाकाचे दोन मुलगे याकोब व एसाव यांच्याबद्दल लिहिलेले आहे. इसहाकाचें दोन मुलगे त्यांच्या मातेच्या गर्भाशयांत असतांनाच देवानें याकोबाला निवडले होते.
जे लोक देवाच्या वचनाबाबतीत गैरसमज करतात ते ह्रा ठिकाणी देवाच्या निवडीसंबंधी विधानें करतात. तशी विधानें करणे म्हणजे ख्रिस्ती धर्मांत भेसळ करण्यासारखे आहे.
देवानें आपल्याला येशू ख्रिस्ताच्या ठायीं निवडून न घेता `बिनाशर्त निवडीने` निवडले असा जर आपण विश्वास धरला तर आपलं हे वागणे मूर्तीपूजा करण्यासारखे ठरते. आपला देव कांही नियती किंवा नशिबाचा देव नाही. आपण तसा गैरविचार केला तर आपण सैतानाच्या जाळ्यांत सापडतो.
देवाच्या इच्छेनुसार लोक आज्ञापालन करीत नसतील तर ते लोक नाश होण्याची लायकी असलेल्या रानटी जनावराप्रमाणे असतात. आपण विश्वासू लोक तसे जनावराप्रमाणे नाही आहोत. आपण खरे विश्वासू होण्यासाठीं बायबलमध्ये लिहिलेल्या सत्यवचनांवर विचार केला पाहिजे. त्या वचनांवर चिंतन मनन न करणे म्हणजे स्वतःला सैतानाच्या हातांत झोकून देण्यासारखे आहे.
खरा विश्वास असण्यासाठीं ज्यांनी ख्रिस्तांत नव्यानें जन्म घेतला आहे त्यांच्या विश्वासाचे अनुसरण करण्याची पण जरूर आहे.
कॅलव्हीनीझम पद्धत अनुसरणारे लोक मर्यादित तारणाची भाषा करतात. ते म्हणतात की देवाचें प्रेम आणि त्याचे तारणकार्य सर्वांनाच लागू पडत नाही. हे खर आहे का?
बायबल म्हणते, "त्याची अशी इच्छा आहे कीं, सर्व माणसांचे तारण व्हावें." (तीमथ्याला पहिलें पत्र 2:4). जर तारण होण्याचा आशीर्वाद फक्त थोडट्या लोकांना मिळणार असेल तर पुष्कळ विश्वासू मंडळी येशूवर विश्वास ठेवण्याचे सोडून देतील. शेवपी मर्यादित मन असलेल्या देवावर विश्वास ठेवणे कोणाला आवडेल?
आपला देव कांही छोटट्या मनाचा नाही असा आत्मविश्वास आपल्यामध्ये असायलाच हवा आहे. तो सत्य, प्रीति आणि न्यायाचा देव आहे. आपण येशूवर व पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवायलाच पाहिजे. तसा विश्वास ठेवूनच आपण पापमुक्त होतो. जे पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले आहेत त्या सर्वांचा येशू हा तारणकर्ता आहे.
कॅलव्हीनीझम पद्धतीचे लोक म्हणतात, जर एखाद्या ठिकाणी दहा लोक असतील तर देव त्यातील थोडट्या लोकांचे तारण करील व बाकीचे नरकांतील अग्नीज्वालेंत जळून जाण्यासाठीं ठेवले जातील. हे सपशेल खोटं आहे.
देव कांही जणांवर प्रेम करतो आणि कांही जणांना टाकून देतो असं बोलणे मूर्खपणाचे आहे. कल्पना करा कीं देव आता येथे आपल्याबरोबर आहे. त्यानें जर असं ठरवले की त्याच्या उजव्या हाताला जे बसलेले आहेत त्यांची निवड करायची आणि डाव्या हाताला बसलेल्या सर्वांना नरकांत पाठवून द्यायचे, तर आपण त्याचा देव म्हणून मान राखू का?
टाकून दिलेले डाव्या बाजूचे लोक त्यांचा विरोध दर्शविण्यासाठी आवाज नाही का उठवणार? ते मोठट्याने रडून म्हणतील, "देव असा अन्यायी कसा असू शकेल?" बिनाशर्त निवड ही चुकीची आहे कारण देवानें संपूर्ण मानवजातीला येशू ख्रिस्ताच्या ठायीं निवडलें आहे.
म्हणूनच ज्या कोणाला देव, ख्रिस्ताच्या नांवाने बोलावतो तो निवडलेला असतो. तर मग देव कोणाला बोलावतो? तो पापी लोकांना बोलावतो, नीतिमान लोकांना नव्हे. जे स्वतःला नीतिमान समजतात त्यांना देव बोलवत नसतो.
देवाचा तारणाचा आशीर्वाद नरकांत जाणा­या पापी लोकांसाठीं आहे. नेमणूक किंवा निवडणे याचा अर्थ देव पापी लोकांना, स्वतःची नीतिमान मुले बनवण्यासाठीं बोलावतो.
 
 
देव न्यायी आहे
 
देव फक्त थोडट्या लोकांवरच
प्रेम करतो का?
नाही. देव कांही छोटट्या मनाचा नाही.
देव न्यायी आहे.
 
देव न्यायी आहे. बिना शर्त निवडलेल्यांवरच प्रेम करणारा असा तो नाही. ख्रिस्ताच्या नांवानें त्यानें पापी लोकांना बोलवले. येशू ख्रिस्ताच्या द्वारें पापक्षमेचे तारणकार्य नसते तर देवाचें प्रेम आपल्याला कसे काय समजू शकले असत? तुम्ही देवाला, अन्यायी देव असं कधीच म्हणू नका.
इफिसकरांस पत्र 1:3-5 हा मजकूर पुढे लिहिला आहे तो वाचाल तेव्हां त्यांत काय वगळले गेले आहे ते शोधून काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
"आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्यानें स्वर्गांतील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्यें आशीर्वादित केलें आहे; त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेंत पवित्र व निर्दोष असावें, म्हणून त्यानें जगाच्या स्थापनेंपूर्वी आपल्याला निवडून घेतलें; त्यानें आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणें आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारें स्वतःचें दत्तक होण्याकरितां प्रेमानें पूर्वीच नेमिलें होतें." ह्राच्यामध्ये कोणता शब्द वगळलेंला आहे? तो शब्द हाः "ख्रिस्ताच्या ठायीं."
कॅलव्हीनीझमची बिनाशर्त निवड ही बायबलच्या शब्दाप्रमाणे नाही आहे. बायबल म्हणते, "त्यानें जगाच्या स्थापनेंपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलें."
संपूर्ण मानवजातीने पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घ्यावा यासाठीं देवानें तिला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलें. पापी लोक नव्यानें जन्मून व तारण होऊन देवाची मुलें होऊ शकतात. ज्यांचे तारण व्हायला पाहिजे त्याच्या यादींत, देवाने ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलेल्या मानवजातीतील सर्वांची नांवे नमूद केलेली आहेत.
पुष्कळ धर्मगुरू बिनाशर्त निवड ह्रा विषयाला धरून म्हणतात की फक्त थोडेजण देवाकडून निवडले गेलेले असतात. त्यामुळे लोक भ्रामक समजूती व दिशाभूल करणारे धर्मगुरु व त्यांचे शास्त्रलेख यांच्या जाळ्यांत सापडलेले आहेत. ही खोटी धर्मशास्त्र जाणकार मंडळी म्हणतात की बिनाशर्त निवडीच्या द्वारें देव थोडट्या लोकांना निवडतो व बाकीच्यांना तसेच सोडतो. पण देवाचे वचन सांगते कीं, त्यानें सर्व पापी लोकांना येशूच्या ठायीं निवडून घेतलें. पुष्कळसे लोक त्यांच्या अंधश्रद्धेपायी खोटट्या शास्त्रलेखांना बळी पडतात.
देवानें त्याच्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे संपूर्ण मानवजातीला येशूच्या ठायीं निवडून घेतले यासाठीं की तिचे तारण व्हावे. जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला हे शास्त्रवचन लागू पडते. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आपण नीतिमान होऊन देवाची मुलें होतो व आपल्याला सार्वकालिक जीवन मिळते. देव न्यायी आहे असा आपला विश्वास सुद्धां त्यामुळे द्दढ होतो.
 
 
याकोब आणि एसाव यांच्या कथेंतील ईश्वरी निवड
 
देव कोणाची निवड करतो?
फक्त निवडक व्यक्तीची का?
नाही. देवानें संपूर्ण मानवजातीला ख्रिस्ताच्या ठायीं निवडलें आहे.
म्हणूनच जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या
बाप्तिस्म्याद्वारे पापमुक्त होतो तो ख्रिस्ताच्या
ठायीं निवडलेला असतो.
 
उत्पत्ति 25:19-28 मध्ये आपल्याला समजते की याकोब आणि एसाव, त्यांची आई रिबेका हिच्या उदरांत असतांनाच एकमेकांशीं झगडत होती. उत्पत्ति 25:23 मध्ये म्हटले आहे, "परमेश्वर तिला म्हणालाः तुझ्या गर्भाशयांत दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरांतून दोन वंश निघतील; एक वंश दुस­या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकटट्याची सेवा करील."
पापी लोकांनी ह्रा शास्त्रवचनाचा विपरित अर्थ काढून, अगाऊ निवड व ईश्वरी निवड या नांवाने स्वतःचे धर्मशास्त्रलेख लिहिले. त्या खोटट्या शास्त्रलेखांनी येशूवर विश्वास ठेवणा­यांना इतके घोटाळ्यांत पाडले कीं आपण निवडलेले आहोत की नाही या विचाराने ते चक्रावून गेले! आपण निवडलेले आहोत असा विचार जेव्हां ते करतात तेव्हां त्यांना वाटते कीं आपले तारण झालेले आहे आणि त्यामुळें मग त्यांना पाणी व आत्म्यापासून नव्याने जन्म घेण्याबाबतीत उत्साह वाटत नाही.
बिनाशर्त निवडीच्या प्रचारानें येशूवर विश्वास ठेवणा­या अनेकांना तारणाऐवजी नरकातील मरणाच्या यातनेकडे नेलेले आहे. अशा प्रचाराने देव अन्यायी आहे असा देखावा निर्माण केलेला आहे.
पुष्कळसे धर्मशास्त्रगुरू त्यांच्या स्वतःचा विचारांवर आधारित असलेले खोटे शास्त्रलेख शिकवतात त्यामुळे येशूवर विश्वास ठेवणा­या लोकांना असुरक्षित वाटते आणि आपण निवडलेले आहोत की नाही किंवा आपले तारण अगाऊ नेमले होते का यासारख्या प्रश्नांनी ते गोंधळून जातात.
याकोब आणि एसाव यांच्यापैकी देवानें कोणाला निवडले होते? येशू ख्रिस्ताच्या ठायीं त्यानें याकोबाला निवडले होते. रोमकरांस पत्र 9:10-11 मध्ये असे म्हटलें आहे की रिबेका एकापासून म्हणजे इसहाक ह्राच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुलें अजून जन्मलीं नव्हतीं व त्यांनीं कांही बरें वाईट केलें नव्हतें तेव्हां देवानें याकोबाला त्याच्या भावाऐवजी निवडलें होतें.
याकोबाची निवड त्याच्या कर्मामुळे झालेली नव्हती तर पाचारण करणा­या देवाच्या इच्छेनें झाली होती. बायबल आपल्याला आणखी हे सांगते की येशू सज्जन लोकांसाठी नव्हे तर पापी लोकांसाठीं या जगांत आला होता.
आदामाचे वंशज म्हणून आपण पापी म्हणून जन्मलो आहोत. दावीदाने म्हटले कीं तो त्याच्या आईच्या उदरांत असतांनाच पापी होता आणि पापांतच त्याने जन्म घेतला होता. "पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईनें गर्भधारण केलें तेव्हांचाच मी पातकी आहे." (स्तोत्रसंहिता 51:5).
सर्व लोक त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे पापी म्हणूनच जन्म घेतात. त्यामुळे ह्रा जगांत जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपोआपच पापी बनते, ती पापी असल्याप्रमाणे वागते आणि पापांची फळें धारण करते.
एखाद्या लहान मुलानें कोणतेहि पाप केलेले नसेल तरी तो पापी ठरतो याचे कारण तो पापाचें बीज घेऊन जन्माला आलेला असतो. त्याच्या ह्मदयांत वाईट विचार, व्यभिचार, जारकर्मे आणि खून यासारखी पापें असतात. त्याच्या पूर्वजांनी केलेली पापें घेऊन तो जन्मलेला असतो. सर्व लोक त्यांचा जन्म व्हायच्या आधीपासूनच पापी असतात.
देवाने आपल्याला असं अशक्त बनवण्याचे कारण पुढे दिलेले आहेः मानवजात ही देवाची निर्मीती आहे, पण आपल्याला पापांपासून मुक्त करून स्वतःची मुले बनवण्यासाठीं देवाने आदामाचे पाप होऊ दिले.
आदामाच्या पापामुळे आपण पापी बनल्यानंतर देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, येशूला त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें मानवजातीची पापें घेऊन जाण्यासाठीं या जगांत पाठवले.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त याच्याद्वारे मानवजातीचे तारण करून, जे लोक येशूवर विश्वास ठेवतात त्यांना स्वतःची मुले बनवायचे असाच देवाचा संकल्प होता. ख्रिस्ताच्या ठायीं सर्व पापें धुतली जातील ह्रा वचनावर त्यानें आदामाकडून पाप घडणे होऊ दिले.
खोटट्या शास्त्रलेखांवर विश्वास ठेवणारे पापी लोक म्हणतात, "याकोब आणि एसावाकडे पहा. देवाने एकाला निवडले आणि दुस­याला सोडून दिले." देवाने आपली निवड कांही बिनाशर्त केलेली नाही, त्याने आपल्याला येशू ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलें. आपण फक्त बायबल उघडून त्यांत काय लिहिलेले आहे हे वाचले पाहिजे. रोमकरांस पत्र 9:10-12 मध्ये म्हटलें आहे, "इतकेंच नव्हे, तर रिबेकाहि एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्राच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुलें अजून जन्मली नव्हतीं व त्यांनीं कांही बरें वाईट केलें नव्हतें तेव्हां निवडीसंबंधानें देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर, पाचारण करणा­याच्या इच्छेनें असतो, तो कायम राहावा म्हणून तिला सांगण्यांत आलें, कीं वडील धाकफ्ट्याची सेवा करील."
देवानें येशूच्या ठायीं याकोबाला निवडले होते. याकोब हा अपात्र, स्वतःचे नीतिमत्त्व गमावून बसलेल्या पापी लोकांचे उत्तम उदाहरण आहे. इफिसकरांस पत्र 1:4 मध्ये म्हटलें आहे कीं देवाने आपल्याला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलें.
देव कोणाला हांक मारत असतो? याकोबाला माहित होते कीं तो देवासमोर पापी व अनीतीने चालणारा आहे म्हणूनच तो देवावर जास्त अवलंबून रहात असे. त्यामुळेच देवानें त्याला निवडले होते. येशूच्या नांवानें याकोबाला हांक मारून देवाने त्याचें पाणी व रक्ताच्या द्वारे तारण करून स्वतःचा मुलगा केले. अशा प्रकारे याकोबाला निवडून देवानें त्याला तारणाचा आशीर्वाद दिला.
येशूच्या ठायीं पापी लोकांना निवडून त्यांचे तारण करून त्यांना नीतिमान बनवण्यासाठीच देव पापी लोकांना बोलवतो. देवाचा सत्संकल्प तो हाच आहे.
 
 
बिनाशर्त निवडीसंबंधीचें खोटे शास्त्रलेख
 
देवानें याकोबावर प्रीति कां केली?
कारण याकोबाला तो किती वाईट वागतो
हे माहित होते.
 
अलिकडेच मी एक बिनाशर्त निवड ह्रा विषयावर एक पुस्तक वाचले. त्यांत लिहिले होते कीं एका तरूण माणसाला स्वप्न पडते. एक वृद्ध स्त्री त्याच्या स्वप्नांत येऊन त्याला म्हणते कीं तू अमूक ठिकाणी ये. तो तिकडे जातो. तेव्हां ती वृद्ध स्त्री त्याला सांगते कीं देवानें त्याला बिनाशर्त निवडलेलें आहे.
तो तरूण माणूस तिला म्हणाला की तो देवावर विश्वासच ठेवत नाही तर देव त्याला कसे काय निवडू शकतो? ती त्याला म्हणाली कीं तो जरी अविश्वासू आहे तरीहि देवानें त्याला बिनाशर्त निवडलेले आहे.
हे साफ खोटे आहे. कांही कारण नसतांना देव कसा काय लोकांना दोषी ठरवून नरकांत पाठवील आणि इतरांची तारण होण्यासाठीं निवड करील? येशूच्या ठायीं देवानें प्रत्येकाला निवडलेले आहे.
येशूला वगळून बनवलेली निवडीची थियरी सपशेल खोटी आहे. तरीपण खूप धर्मगुरू म्हणतात की देव आपल्यापैकी फक्त थोडट्या जणांनाच निवडतो. हे कांही खरं नाही. येशूच्या ठायीं प्रत्येकाचे तारण व्हावे हीच देवाची इच्छा आहे. जे लोक येशूच्या ठायीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवत नाहीत त्यांचे तारण होत नाही.
देवानें, त्याचा पुत्र येशू, याच्या द्वारें संपूर्ण मानवजातीचें तारण होऊन, त्यांनी त्याची मुलें व्हावे यासाठीं जगाच्या स्थापनेपूर्वीच मानवजातीला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतलें होते. येशू ख्रिस्ताच्या तारणकार्याच्या द्वारे मानवजातीला पापमुक्त करायचे असा देवाचा संकल्प होता. हे सत्य बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आहे.
ख्रिस्ताच्या ठायीं नवीन जन्म घेतलेली नीतिमान माणसेच निवडलेली असतात. पण धर्मगुरू म्हणतात की देव फक्त थोडट्या जणांनाच निवडत असतो. उदाहरणार्थ ते म्हणतात कीं ते देवाने न निवडलेल्या लोकांपैकी आहेत. पण देवानें त्यांना सुद्धां येशूच्या ठायीं निवडलेले आहे.
जर देवानें येशूशिवाय बिनाशर्त कांही लोकांना निवडले असते आम्हांला सुवार्तेचा प्रचार करण्याची जरूर नसती. देवानें येशूशिवाय एखाद्याला निवडण्याचे ठरवले असते तर पापी लोकांनी येशूवर विश्वास ठेवण्याची पण जरूर नव्हती. तर मग प्रीति, सत्य आणि मुक्ती हे देवाचे शब्द कसे काय पूर्ण होऊ शकले असते?
देवाच्या सेवकांनी जगभर सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी कांही कारण उरले असते का? देवानें तारण झालेले आणि तारण न झालेले ह्रा दोघांनाहि येशूशिवाय बिनाशर्त निवडलेले आहे असं बोलणे बरोबर आहे का?
देवाने याकोबाला निवडले आणि त्याच्यावर प्रीति केली पण एसावाचा द्वेष केला याचें कारण म्हणजे ती दोघं जन्माला येण्यापूर्वीच देवाला माहित होते की याकोब येशूवर विश्वास धरेल पण एसाव तसा विश्वास धरणार नाही.
ह्रा जगांत पापी लोक पुष्कळ आहेत. कांही एसावाप्रमाणे आहेत तर कांही याकोबासारखे आहेत.
देवानें याकोबावर प्रीति कां केली? याकोबाची चाल काही ठीक नव्हती आणि तो ते ओळखून होता. म्हणूनच त्यानें देवासमोर कबूल केले की तो पापी आहे आणि त्याने देवाकडे त्याच्या कृपेची मागणी पण केली. म्हणूनच देवानें याकोबाचे तारण केले.
पण एसाव देवाऐवची स्वतःवरच भिस्त ठेवून होता आणि तो देवाच्या कृपेसाठी कधी भुकेला झाला नव्हता, म्हणूनच देवाने म्हटलें, "मीं याकोबावर प्रीति केली आणि एसावाचा द्वेष केला." हे शब्द सत्य आहेत.
आपले सर्वांचे तारण व्हावे म्हणून येशूच्या ठायीं देवानें आपल्याला पूर्वीच निवडलेले आहे. सर्व पापी लोकांनी येशूवर विश्वास ठेवण्याचे एकच काम करायचे आहे. तेव्हांच देवाचें सत्य व न्याय त्यांच्या ह्मदयांत झिरपत जाईल. आपण सर्व पापी लोक येशूद्वारे होणा­या तारणावर पूर्ण ह्मदयानें विश्वास ठेवण्याखेरीज दुसरे कांही करू शकत नाही. येशूच्या द्वारे होणा­या तारणावर विश्वास ठेवणे एवढंच आपल्या होतीं आहे.
 
 
सावकाश पवित्र होण्याचें खोफे तत्त्वज्ञान
 
पापी मनुष्य सावकाशपणें नीतिमान
बनू शकतो हे खरे आहे का?
नाही. ते अशक्य आहे. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा
वधस्तंभावरील मृत्यु या तारणकार्याच्या द्वारे देवानें पापी
लोकांना एकदाच नीतिमान व
निर्दोष केले.
 
सावकाश पवित्र होण्याचे तत्त्वज्ञान सांगून सैतान पापी लोकांना इतका फसवतो कीं त्यामुळें ते पापमुक्त होऊ शकत नाही. सावकाश पवित्र होणे म्हणजे येशूवर विश्वास ठेवल्यानंतर पापी लोक हळू हळू किंवा सावकाशपणे पवित्र होत जातात.
त्यांचे तत्त्वज्ञान हे असे आहेः येशूवर विश्वास ठेवल्यांनतर पापी लोक एकाच वेळी कायमसाठी नीतिमान होऊ शकत नाहीत. त्यांच्या पूर्वीच्या पापांची फक्त क्षमा केली जाते. रोज घडणारी पापें रोजच्या पश्चात्तापाच्या प्रार्थनेने धुतली गेली की लोक हळू हळू पवित्र बनत जातात.
येशूवर विश्वास ठेवून एखादा मनुष्य सावकाशीने पवित्र ख्रिस्ती बनू शकतो हे ऐकायला अगदी छान वाटते पण अशा तत्वज्ञानाने अनेक ख्रिस्ती लोकांना सुरक्षित पणाची भावना देऊन त्यांना फसवलेले आहे. म्हणूनच आज ख्रिस्ती समाजांत `तुझ्यापेक्षां मी जास्त पवित्र` अशी वृत्ती असलेले अनेक ख्रिस्ती आहेत.
त्यांना वाटते कीं एक दिवस अगदी सहजपणे त्यांच्यांत बदल होईल आणि मग ते पाप करणारच नाहीत. पण ते त्यांचे आयुष्य पापी म्हणूनच घालवतात आणि ते मेल्यानंतर देवासमोर त्यांचा न्याय ते पापी म्हणूनच केला जातो.
बायबलमधील सत्यवचने तुम्ही वाचा. रोमकरांस पत्र 8:30 मध्ये म्हटलें आहे; "ज्यांना त्यानें अगाऊ नेमून ठेवलें त्यांना त्यानें पाचारणाहिं केलें. ज्यांना त्यानें पाचारण केलें त्यांना त्यानें नीतिमानहि ठरविले; आणि ज्यांना त्यानें नीतिमान ठरविलें त्यांचें त्यानें गौरवहि केलें."
आणि 29 या वचनांत, "कारण ज्यांच्याविषयीचें त्याला पूर्वज्ञान होतें त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणें बनावे म्हणून त्यानें त्यांना अगाऊच नेमून ठेवलें; ह्रांत हेतु हा कीं, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा." पहिल्याच द्दष्टिक्षेपांत असं वाटते की नीतिमान होण्याचे काम पायरी पायरीने साध्य होते. पण देवाचे वचन असे सांगते कीं नीतिमत्त्व सर्वांना एकदम दिले गेलेले आहे.
"ज्यांना त्यानें पाचारण केलें त्यांना त्यानें नीतिमानहि ठरविलें." येशूनें पापी लोकांना पाचारण केलें आणि यार्देन नदीतील त्याचा बाप्तिस्मा व वधस्तंभावरील मृत्यु याच्या द्वारें त्यांना नीतिमानहि ठरविलें.
म्हणूनच जो येशूच्या ठायीं तारणकार्यावर विश्वास ठेवतो तो देवाचा गौरवशाली मुलगा होतो. देवाच्या कृपेमुळे पापी लोक पापमुक्त होऊन येशूच्या नांवाने गौरवांत येतात.
देव आपल्याला हे असं सांगत आहे. पण कांही ख्रिस्ती आपल्याला सांगतात की बायबल उघडून तुम्ही रोमकरांस पत्र 8:30 हे वाचा. "पवित्र होण्याचे काम पायरी पायरीने होते. त्याचा अर्थ आपण हळू, हळू सावकाशपणे पवित्र होतो, असाच नाही का होत?" अशा प्रकारे ते फसवतात. ते लोकांना सांगतात की पापी मनुष्य कांही काळांनें नीतिमान होईल.
पण बायबल तसं सांगतांना भविष्यकाळाची भाषा करीत नाही तर भूतकाळाच्या भाषेंत सांगते, ते असे की आपण सर्वजण एकदाच नीतिमान ठरविले गेलो आहोत.
आपण बायबलवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपण लगेच देवाची मुलं होऊ शकतो. सावकाश पवित्र होण्याच्या खोटट्या प्रचाराहून आपण तत्क्षणीं देवाची मुले बनणे हे वेगळे आहे.
सावकाश पवित्र होण्यासंबंधी बोलतांना ते लोक म्हणतात की आपण जेव्हां येशूवर विश्वास ठेवतो तेव्हां फक्त पूर्वीच्या पापांची क्षमा होते. त्याचा अर्थ असा कीं आपण धार्मिक जीवन जगायला पाहिजे आणि आपल्या रोजच्या पापांसाठी पश्चात्ताप केला पाहिजे, तसं केले म्हणजे जेव्हां आपण देवासमोर उभे राहू तेव्हां आपण नीतिमान होऊ.
पुष्कळ लोक या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतात. येशूवर विश्वास ठेवूनसुद्धां ते पापीच रहातात. म्हणूनच त्यांच हे तत्त्वज्ञान खोटे ठरते.
बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते कीं विश्वासामुळे आपण नीतिमान होतो आणि देवाची मुले होतो. जगांत जशी बाळे जन्माला येतात तशीच ज्या क्षणीं देवाची मुले येशूच्या तारणावर विश्वास ठेवतात त्या क्षणीच ती पवित्र होतात. सावकाश पवित्र होण्याच्या तत्त्वज्ञानाचा उगम खोफे पणांत आहे.
 
 
सर्व पापांपासून संपूर्ण मुक्ति
 
पूर्णपणे पवित्र होण्यासाठीं आपण
काय करायला पाहिजे?
पाणी व आत्म्याच्या सुवार्तेद्वारे आपले तारण होते
ह्रावर विश्वास ठेवला पाहिजे.
 
रोमकरांस पत्र 8:1-2 मध्ये म्हटलें आहे, "म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्यानें तुला पाप व मरण ह्रांच्या नियमापासून मुक्त केलें आहे." देवानें येशूकडे आलेल्या सर्व पापी लोकांना नीतिमान करून, पाप व मरण ह्रांच्या नियमापासून मुक्त केले.
संपूर्ण पापमुक्तीविषयी बायबलमध्ये इब्राी लोकांस पत्र 9:12 म्हटलें आहे, "आणि बकरें व वासरें ह्रांचें नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदांच परमपवित्रस्थानांत गेला, आणि त्यानें सार्वकालिक मुक्ति मिळविली." याचा अर्थ असा कीं येशूवर विश्वास ठेवणारे आपण सर्वजण पापमुक्त झालो आहोत आणि आपल्याला स्वर्गांत प्रवेश मिळालेला आहे.
येशू ख्रिस्ताच्या ठायीं पाणी व आत्म्याच्या द्वारे तारण होण्याची सुवार्ता आपण ऐकली आणि त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला म्हणून आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. पण आपल्या पूर्वीच्या पापांचीच फक्त क्षमा झालेली आहे असा विचार करणा­या पापी लोकांचे तारण होऊ शकत नाही. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर, पवित्र होण्यासाठीं रोजच्या पापांबद्दल पश्चात्ताप केला पाहिजे असं त्यांना वाटते.
दिशाभूल करणारा त्यांचा हा विश्वास त्यांना नरकाकडे नेतो. त्यांचा चुकीचा विश्वास त्यांनी सर्व अपराधांपासून मुक्त व्हावे म्हणून त्यांना रोज रोज पश्चात्ताप करायला लावतो. नरकापासून सुटका होण्यासाठीं अशा प्रकारचा विश्वास योग्य नाही.
जर त्यांनी येशूवर विश्वास ठेवला असता तर त्यांचें तारण एकदाच होऊन गेले असते आणि ते नीतिमान होऊन देवाची मुलें झाली असती. खरे तारण, विश्वास धरणा­यांना एकदाच नीतिमान करून देवाची मुलें करते.
विश्वास ठेवणारे लोक जगांतील सर्व पापांपासून जरी मुक्त झालेले असतात तरी मरेपर्यंत त्यांचा देह कांही बदलत नसतो. पण त्यांची ह्मदयें देवाच्या नीतिमत्त्वाने भिजलेली असतात. याबद्दल आपण कधी गैरसमज करता कामा नये.
जेव्हां आपण सुवार्तेवर विश्वास ठेवतो तेव्हां आपण पवित्र होऊन नीतिमान बनतो असं बायबल आपल्याला सांगते.
खरी सुवार्ता म्हणजे काय हे पहाण्यासाठीं आपण इब्राी लोकांस पत्र 10:9-14 यांत काय लिहिलेले आहे ते पाहू. "आणि मग तो म्हणाला, `पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणें करावयास आलों आहें.` ह्रांत दुसरें स्थापण्यासाठीं तो पहिलें नाहींसें करितो. त्या इच्छेनें आपण येशू ख्रिस्ताच्या एकदांच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहें. प्रत्येक याजक प्रतिदिवशीं सेवा करीत आणि जे यज्ञ पापें दूर करावयाला कदापि समर्थ नाहींत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हांपासून आपले वैरी आपलें पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणा­यांना त्यानें एकाच अर्पणाने सर्वकाळचें पूर्ण केले आहे." ही शास्त्रवचनें व्याकरणाच्या भाषेंत भविष्यकालांत न लिहिता वर्तमानकालांत लिहिलेली आहेत.
पूर्णपणें पवित्र होण्यासाठीं आपण येशूने दिलेल्या पाणी व आत्म्याच्या तारणकार्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
 
 
येशूनें एकदाच सार्वकालिक मुक्ति दिलेली आहे
 
मनुष्यानें सर्वदा आनंदित कां  असायला पाहिजे?
(थेस्सलनीकाकरांस पहिलें पत्र 5:16)
कारण येशूने त्याची सर्व पापें काढून फाकल्यामुळें येशूसमोर
नम्रभावानें त्याच्या कृपेबद्दल आभारी रहाण्याखेरीज तो
दुसरे कांही करू शकत नाही.
 
आपण येशूच्या सार्वकालिक तारणावर विश्वास ठेवला तर आपण ताबडतोब नीतिमान होतो. बायबल म्हणते, "सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितींत उपकारस्तुति करा; कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्यें देवाची इच्छा हीच आहे." (थेस्सलनीकाकरांस पहिलें पत्र 5:16-18).
सर्वदा आनंदित असा. आपण सर्व वेळ कसा काय आनंद करू शकतो? ज्यांना एकदाच सार्वकालिक मुक्ति मिळालेली असते ते निरंतर आनंद करू शकतात. यार्देन नदीच्या कांठावर येशूनें आपली सर्व पापें घेतल्यामुळे आपण पापमुक्त झालो या विचाराने त्यांना इतके सुरक्षित वाटते की त्यामुळे ते सर्वदा आनंदित रहातात. येशूसमोर नम्रभावाने त्याच्या कृपेबद्दल उपकारस्तुति करीत ते निरंतर आनंद करतात.
"ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातलें आहे ते धन्य." (रोमकरांस पत्र 4:7). आपल्या ह्मदयांत अजून पाप आहे आणि त्याच्यावर पांघरूण घातलेले आहे असा अर्थ, ह्रा शास्त्रवचनाचा होत नाही. आपली ह्मदये संपूर्णपणे धुतलेली आहेत. येशूनें आपली सर्व पापें धुऊन आपले तारण एकदाच केलेले आहे.
नव्या करारांत ह्रा सार्वकालिक मुक्तीचा उल्लेख केलेला आहे. येशूचा जेव्हां बाप्तिस्मा झाला त्यावेळी त्यानें म्हटलें. "आतां हें होऊं दे; कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणे करणें हें आपणांला उचित आहे." (मत्तय 3:15).
जुन्या करारांत, डोक्यावर दोन्ही हात ठेवण्याने बकरे व मेंढरें लोकांची पापें हरण करीत त्याचप्रमाणे येशूने जगाची पापें हरण करून मानवजातीला उचित प्रकारानें शुद्ध केले.
"ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणे करणें हें आपणांला उचित आहे" असं येशूने म्हटले होते. येशूचा योग्य रीतीने बाप्तिस्मा झाला त्यावेळी त्यानें मानवजातीची सर्व पापें स्वतःकडे घेतली त्यामुळे आपण पापमुक्त झालो.
मत्तय 3:15 यांत लिहिलेले आहे की येशूनें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेतली. त्यामुळे देवाचा न्याय पूर्ण झाला. ही शास्त्रवचने देवानें आपल्याला दिलेल्या पापमुक्तीची आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. "ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातलें आहे, तो धन्य!" (स्तोत्रसंहिता 32:1).
बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून यार्देन नदींत येशूचा बाप्तिस्मा झाला त्यावेळीं त्यानें आपले ह्मदय व आपला देह, याची सर्व पापें धुतली होती. या भ्रष्टाचारी जगांत आपण जी कांही पापें करतो त्यासाठी त्याचा न्याय केला गेला. आपली सर्व पापें काढून टाकून तो वधस्तंभावर मरण पावला.
जो कोणी ह्रा तारणावर विश्वास ठेवतो तो एकदाच नीतिमान होऊन, दोषहीन बनतो. येशू सार्वकालिक जीवन आहे म्हणूनच जो ख्रिस्ताच्या तारणावर विश्वास ठेवतो तो नीतिमानच रहातो.
आपण आता देवासमोर उभे राहून आत्मविश्वासाने म्हणू शकतो, "परमेश्वरा, मी तुझ्या एकुलत्या एका पुत्रावर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि मी सुद्धां तुझा पुत्र आहे. पित्या, मी तुझें आभार मानतो. तुझा मुलगा या नात्याने तू माझा स्वीकार केला आहे त्याबद्दल मी तुझे उपकार मानतो. हे कांही माझ्या कामांमुळे घडून आले नाही तर येशूच्या ठायीं पाणी व आत्म्याने नवा जन्म घेण्याच्या माझ्या विश्वासामुळे शक्य झाले. जगांतील सर्व पापांपासून तूं मला मुक्त केले आहेस. "कारण ह्रा प्रकारें सर्व धर्माचरण पूर्णपणे करणें हें आपणांला उचित आहे." (मत्तय 3:15). ह्रा तुझ्या शब्दांवर माझा विश्वास आहे. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभ याच्याद्वारें मी तुझा पुत्र झालो आहे. त्याबद्दल मी तुझे खूप उपकार मानतो."
तुम्ही तुमची सर्व पापें येशूकडे दिली आहेत का? तुमची सर्व पापें त्यानें घेतली का? येशूचा बाप्तिस्मा व त्याचा वधस्तंभावरील मृत्यु याबद्दल आपण आभारी असायला हवे कारण त्यावर विश्वास ठेवण्याने पापी लोक पवित्र होतात.
 
 
येशूचा बाप्तिस्मा आणि पापमुक्ति यांच्यातील संबंध
 
येशूच्या बाप्तिस्म्याचा
पापमुक्तिबरोबर काय संबंध आहे?
येशूचा बाप्तिस्मा हा लाक्षणिक अर्थाने तारण म्हणजेच पापमुक्ति
आहे. जुन्या करारांत दोन्ही हात डोक्यावर
ठेवण्याद्वारे त्याचा संदेश दिला होता.
 
येशूवर विश्वास ठेवूनसुद्धां पापी जीवन जगणारा एखादा माणूस चर्चला जाऊन अशी प्रार्थना करीत आहे असं समजा, "परमेश्वरा, गेल्या आठवडट्यांत मी जे अपराध केले त्याची तूं मला क्षमा कर. कृपा करून तू मला माझ्या गेल्या तीन दिवसाच्या पापांची पण क्षमा कर. हे प्रभो, आणि आज मी पाप केले त्याबद्दल मला माफ कर. मी येशूवर विश्वास ठेवतो."
आपण असं समजू की ह्रा प्रार्थनेने त्याच्या रोजच्या पापांची क्षमा केली गेली. पण घरी गेल्यानंतर पुन्हां पाप केल्यामुळे तो परत पापी होतो.
येशूने म्हणजेच देवाच्या कोंक­याने, त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे जगाची पापे हरण केली आणि वधस्तंभावर जाऊन पापी लोकांचें तारण केले. तारण होण्यासाठीं पापी लोकांनी पुढीलप्रमाणे विश्वास ठेवला पाहिजे.
बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हां येशूनें जगाची सर्व पापें स्वतःकडे घेऊन देवाचे सर्व धर्माचरण पूर्ण केले. त्यावेळी सर्व पापें धुतली गेली. जो कोणी ह्रा सत्यावर विश्वास ठेवतो तो पापमुक्त होतो. मत्तय 3:13-17 मध्ये लिहिल्याप्रमाणे "ह्रा प्रकारे" बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्याच्यावर विश्वास ठेवणा­या सर्वांचा तो तारणकर्ता बनला.
येशूनें सर्व पापें एकदाच नेली, असं खरी सुवार्ता सांगते. पण खोटे धर्मशास्त्र म्हणते कीं आपण दररोज पापमुक्त व्हायला पाहिजे. यापैकी आपण कशावर विश्वास ठेवायला हवा? आपले तारण एकदाच झाले आहे की आपले तारण दररोज होत असते?
येशूनें आपले एकदाच तारण केले हे अगदी स्पष्ट दिसते. पाणी व आत्म्याच्या द्वारे एकदाच झालेल्या तारणावर विश्वास ठेवणे हाच खरा विश्वास आहे. आपण दररोज पापमुक्त व्हायला पाहिजे, असा विचार करणा­या लोकांचे कधीच तारण होणार नाही.
येशूनें त्याचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील मृत्यु याच्याद्वारे त्याच्यावर विश्वास ठेवणा­यांचे एकदाच खरे तारण केलेले आहे हे त्यांना समजायला पाहिजे. ह्रा ख­या सुवार्तेवर विश्वास ठेवून आपण देवाचे आभार मानले पाहिजे.
पण चुकीचा विश्वास ठेवणारे लोक म्हणतात की आपण फक्त पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्त होत असतो. म्हणूनच रोजच्या घडणा­या पापांसाठीं आपले रोजच तारण व्हायला पाहिजे मगच आपण सावकाश पवित्र होत जाऊन नीतिमान होतो. पण त्यांच हे बोलणे हे चुकीचे आहे.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु यामुळे पापांची क्षमा होण्याचें कार्य एकदाच पार पाडले गेले. हे सत्य आहे. बाप्तिस्मा करणा­या योहानाच्या द्वारे येशूकडे आपली पापें दिली गेली आणि आपले तारण होण्यासाठी येशूला खांबावर जावे लागले.
देव न्यायी आहे म्हणूनच पाप केल्यानंतर "मला माफ कर" असं देवाला म्हणणे हे खटकणारे आहे. देवाचा नियम सांगतो कीं पापाचें वेतन मरण आहे. देव नीतिमान व पवित्र आहे आपण समजून घ्यायला पाहिजे.
पाप केल्यानंतर कांही लोक देवापुढे प्रार्थना करीत म्हणतात, "देवा, कृपया मला माफ कर." अशा लोकांना देव न्यायी आहे हे समजत नाही. त्यांच्या मनाच्या समाधानासाठीं ते अशी प्रार्थना करतात. दररोज पाप करीत रहायचे आणि नंतर मनाच्या समाधानासाठीं अपराधांची क्षमा मागायची हे वागणे बरोबर आहे का? पापमुक्त होण्यासाठीं एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त याच्यावर विश्वास ठेवणे. हा विश्वास आपण आपल्या ह्मदयांत बाळगला पाहिजे. देवाच न्यायनिवाडा टाळण्यासाठी हा एकच मार्ग आहे.
पापमुक्त होण्यासंबंधी आपण जास्त विचार करू. इब्राी लोकांस पत्र 9:22 मध्ये म्हटलें आहे, "नियमशास्त्राप्रमाणें रक्तानें बहुतेक सर्व कांही शुद्ध होतें, आणि रक्त ओतल्यावांचून पापक्षमा होत नाही."
देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे पापें रक्ताने शुद्ध झाली पाहिजे आणि रक्त ओतल्यावांचून पापक्षमा होत नाहीं. पापाचे वेतन भरल्याखेरीज पापक्षमा होऊ शकत नाही.
देवाचें नियमशास्त्र न्यायी आहे. बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानें पापी लोकांचे तारण व्हावे म्हणून वधस्तंभावर स्वतःचे रक्त ओतले. बाप्तिस्म्याद्वारें येशूनें आपले सर्व अपराध स्वतःकडे घेतले व त्याची किंमत त्यानें स्वतःच्या रक्ताने वधस्तंभावर मोजली. आपल्या पापाच्या वेतनाची किंमत त्यानें भरली.
 
पापमुक्ति एकदाच दिलेली आहे की
ती दररोज होत असते?
येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे एकदाच पापी लोकांची
सर्व पापें स्वतःकडे घेतली होती.
 
मत्तय 3:15 मध्ये म्हटलें आहे कीं येशूचा जेव्हां बाप्तिस्मा झाला तेव्हां तो उचित प्रकारें झाला होता. बाप्तिस्म्याद्वारें त्यानें आपली सर्व पापें धुतली आणि जगांतील पापांपासून आपण मुक्त व्हावे म्हणून तो वधस्तंभावर मरण पावला.
येशूकडे दररोज पापांची क्षमा मागणे हे आपली पापें घेऊन त्याला पुन्हां मरायला सांगण्यासारखे आहे. आपण देवाचें न्यायी नियमशास्त्र समजून घ्यायला पाहिजे. आपण पापमुक्त व्हावे म्हणून येशूला परत परत मरायची जरूर नाही.
येशूवर विश्वास ठेवून रोज घडणा­या पापांची क्षमा मागणारे लोक देवाला आवडत नाहीत. कारण ते लोक गर्विष्ठ आणि स्वतःला सज्जन समजणारे आहेत, असं देवाला माहित असते. "हे मूर्ख गर्विष्ठ लोक! हे लोक माझ्या पुत्राला बाप्तिस्मा घेऊन वधस्तंभावर पुन्हां मरायला सांगत आहेत! ते येशूच्या तारणकार्यावर विश्वास ठेवून वर स्वतःला पापी म्हणवून घेतात! मी त्यांचा न्याय करून त्यांना अग्नीच्या नरकांत टाकून देईन. तुमच्या एकुलत्या एका पुत्राला दोन वेळा मारून टाकण्याची तुमची इच्छा आहे का? रोजच्या पापांबद्दल तुम्ही मला माझ्या पुत्राला परत मारायला सांगत आहात. जगाच्या सर्व पापांपासून मुक्त होऊन तुमचें एकदाच तारण होण्यासाठीं मी माझ्या पुत्राला आधीच मारले आहे. तर आता रोजच्या पापांची क्षमा मागत तुम्ही माझा राग वाढवू नका. मुकाटपणें तुम्ही पाणी व आत्म्याने तारण होण्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा."
ज्या चर्चमध्ये खरी सुवार्ता सांगितली जाते त्या चर्चला जाऊन, अंधश्रद्धा टाकून देऊन, विश्वासाने खोटट्यावर जय मिळवून तारणाची देणगी मिळवा असं येशू पापी लोकांना सांगत आहे.
ह्मदयांत विश्वास बाळगून पापमुक्त होण्याची हीच खरी वेळ आहे. तुम्ही विश्वास ठेवता का?
 
 
सत्यावर विश्वास न ठेवता कर्मावर विश्वास ठेवण्याचा परिणाम काय होतो
 
 
सातत्याने विश्वासू जीवन जगण्यांत
ख्रिस्ती लोक असफल कां होतात?
कारण ते स्वतःच्याच कर्मावर
भिस्त ठेवतात.
 
येशूवर विश्वास ठेवूनसुद्धां तारण न झालेले पापी लोक त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर 3-5 वर्षे झळकू शकतात. सुरूवातीला ते फार उत्साही असतात पण जसजसा वेळ जातो तसतसा त्यांचा विश्वास कमी होत जातो. तुम्ही जर तुमच्या कर्माच्या द्वारे येशूवर विश्वास ठेवला तर तुमचा उत्साह सुद्धां नाहीसा होईल.
आंधळा माणूस पाहू शकत नाही. म्हणूनच ते ज्ञान मिळवण्यासाठीं दुस­या इंद्रियांचा उपयोग करतात. डोळ्यातून पाणी येत आहे अशी जाणीव झाली कीं त्यांना वाटते की आपल्या पापांची क्षमा झालेली आहे आणि त्याची खूण म्हणजेच डोळ्यातील अश्रू. पण तसं नसते. खरी पापक्षमा संवेदनेंत नसते.
आध्यात्मिक द्दष्टीने अंध असलेले लोक निष्कारण रिव्हायवल मिटींगला जाऊन त्यांचे पहिले प्रेम परत जागृत करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना पाहिजे ती संवेदना कांही मिळू शकत नाही. पापक्षमा होणे त्यांना अशक्य होऊन बसते. त्यांनी जर प्रथमपासूनच खरा विश्वास ठेवला तर देवाच्या कृपेने त्यांच्या पापांची क्षमा होऊन दिवस जातात तसतसे ते देवाच्या कार्यासाठी जास्त प्रकाशित होऊ शकतात.
खोटी पापक्षमा सुरूवातीला प्रकाशित दिसते पण नंतर तिची चमक कमी होत जाते. लवकरच उत्साहाचे तेज पण नाहीसे होते. याचे कारण आध्यात्मिक द्दष्टीने आंधळा असलेला मनुष्य सुरूवातीपासूनच खरी सुवार्ता नीट ऐकून घेण्यांत असफल झालेला असतो.
ढोंगी शास्त्री व परूशी त्यांच्या कांखेंत बायबल धरून फिरतात. प्रभूची प्रार्थना, प्रेषिताची प्रार्थना चांगली तोंडपाठ करून ते सतत प्रार्थनाच करीत रहातात. चर्चमध्ये त्यांना उच्चपदें दिली जातात. असे लोक भावनावश होऊन भाषणें करतात. पण त्यांच्या पापांचा घडा तुडूंब भरलेला असतो. शेवटी एक दिवस त्या घडट्यावर देवाचा कोप येतो. हे ढोंगी लोक बाहेरून त्यांच्या धार्मिक उधाणाचा सफेद रंग लावतात आणि आतून मात्र त्यांची मने पापांनी सडलेली असतात. सत्यावर विश्वास न ठेवता कर्मावर आधारित असलेल्या धर्मावर विश्वास ठेवल्याचा परिणाम हा असा होत असतो.
 
 
विश्वासाने आपण नीतिमान होतो
 
जगातील सर्व पापांपासून मुक्त
होण्याचें तारणकार्य आधीच पूर्ण
झाले आहे का?
होय. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील
मृत्यु याच्याद्वारें ते तारणकार्य
पूर्ण झालेले आहे.
 
इब्राी लोकांस पत्र 10:16-18 यांत म्हटलें आहे, "परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन. आणि त्यांचीं पापें व त्यांचें स्वैराचार मी ह्रापुढें आठवणारच नाही. तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथें पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाही."
येशूच्या बाप्तिस्म्याचे पाणी आणि त्याचे वधस्तंभावरील रक्त याच्याद्वारें आपले तारण आता झालेले आहे म्हणून पापक्षमा होण्याचे कांही कारण उरत नाही. कदाचित तुम्हांला हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे सर्व बायबलच्या शब्दांप्रमाणे आहे. हे मानवनिर्मीत शब्द नाहीत तर हे देवाचे शब्द आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींची लांबी रूंदी व उंची मोजता येते.
"त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हाः मी आपले नियम त्यांच्या मनांत घालीन, आणि ते त्यांच्या ह्मदयपटांवर लिहीन." तारण झाल्यानंतर तुम्हांला कसं वाटते? तुमचे ह्मदय पापमुक्त झाल्यामुळे तुम्हांला अर्थातच ताजेतवाने वाटते. नीतिमान झाल्यामुळें तुम्ही प्रकाशांत राहू शकता.
इब्राी लोकांस पत्र 10-17 या ठिकाणीं परमेश्वर म्हणतो, "त्यांचीं पापें व त्यांचे स्वैराचार मी ह्रापुढें आठवणारच नाही." तो आपल्याला सांगत आहे की तारण झालेल्या लोकांची पापें व त्यांचे स्वैराचार तो आठवणारच नाही. का बरे? कारण येशूनें "ह्रा प्रकारे" बाप्तिस्मा घेतला होता. आणि ह्रा प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवणा­या सर्व लोकांसाठी त्याचा न्याय केला गेला.
आता येशूनें आपल्या सर्व पापांची किंमत मोजलेली आहे म्हणूनच आपल्याला आपल्या अपराधांची जरी आठवण येत असली तरी त्याबद्दल अपराधीपणाची भावना करून घेण्याची आपल्याला जरूर नाही. आपल्या पापांपायी आपल्याला मरावे लागणार नाही कारण येशूनें आपली पापें धुऊन, खांबावरील त्याच्या रक्ताने त्या पापांची किंमत मोजलेली आहे.
इब्राी लोकांस पत्र 10:18 मध्ये म्हटलें आहे, "तर मग जेथें त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं." ह्राचा अर्थ असा होतो कीं येशूनें जगाची सर्व पापें काढून टाकलेली आहेत. येशूच्या ठायी नव्यानें जन्मलेल्यांसाठी त्यांच्या पापांबद्दल अर्पण व्हावयाचें राहिलें नाहीं असाहि याचा अर्थ होतो.
"हे देवा, कृपा करून तू मला माफ कर. येशूवर विश्वास ठेवूनसुद्धां मी यातनामय जीवन जगत आहे याचे कारण माझे तारण अजूनपर्यंत झालेले नाही. मी ख्रिस्ती आहे पण माझे मन पापांमुळे पूर्णपणे सडलेले आहे." आपण अशा प्रकारची प्रार्थना करण्याची जरूर नाही.
पापी लोक नकळत पापें करतात. देवाचे नियमशास्त्र माहित नसल्यामुळे पाप म्हणजे काय हे त्यांना समजत नाही. स्वतःच्या अंतःकरणाला टोचत राहील असं कांही करायला नको एवढंच त्यांना समजते, आणि देवासमोर पाप करणे म्हणजे काय याबाबतीत ते अज्ञानी असतात. येशूवर विश्वास न ठेवणे हे पाप आहे, असं देवानें आपल्याला दाखवून दिलेले आहे.
योहान 16;9 मध्ये देवासमोर पाप करणे म्हणजे काय यासंबंधी बोलतांना येशूनें म्हटलें, "ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहींत ह्रावरून पापाविषयीं." येशूवर विश्वास न ठेवणे हे देवासमोर पाप आहे. योहान 16:10 मध्ये नीतिमत्त्वासंबंधी म्हटले आहे, "मी पित्याकडे जातों आणि ह्रानंतर तुम्हांला मी दिसणार नाही ह्रावरून नीतिमत्त्वाविषयी." दुस­या शब्दांत असं म्हणता येईल की येशूने संपूर्ण जगाचे तारण अगोदरच केलेले आहे म्हणूनच त्याला दुस­यांदा बाप्तिस्मा घेऊन खांबावर जायची आता जरूर नाही.
तारणावर विश्वास ठेवणा­यांना पवित्र करून नीतिमान बनवण्यासाठी येशू त्यांना पाचारण करतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु याच्यामुळे या जगांत तारणकार्य पूर्ण झालें. पापी लोकांचे तारण होण्यासठीं आणखी दुस­या तारणकार्याची जरूर लागत नाही.
"आणि तारण दुस­या कोणाकडून नाहीं; कारण जेणेंकरून आपलें तारण होईल असें दुसरें कोणतेंहि नांव आकाशाखालीं मनुष्यांमध्यें दिलेलें नाहीं." (प्रेषितांचीं कृत्यें 4:12). सर्व पापी लोकांचे तारण करण्यासाठीं येशू ह्रा जगांत आला होता. बाप्तिस्मा करणा­या योहानाकडून त्यानें बाप्तिस्मा घेतला आणि वधस्तंभावर स्वतःच रक्त ओतून तो मरण पावला. ह्रावर पूर्ण ह्मदयाने विश्वास ठेवून तुम्ही पापमुक्त व्हा. पाणी व आत्म्याच्या द्वारें येशूनें तुम्हांला पवित्र केलेले आहे.
येशूनें आपल्या देहाची सर्व पापें पाणी व आत्म्याच्या द्वारे वाहून नेलेली आहेत. विश्वासामुळे आपले तारण झालेले आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेल्या ह्रा ख­या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवला तर आपण एकदाच नीतिमान होतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु ह्रा दोन गोष्टींमुळे मूलभूत सत्य प्रस्थापित होते.
 
 
पापी लोक स्वतःचा आश्रय म्हणून वापरीत असलेली शास्त्रवचने
 
आपली पापें कबूल करून आपले
तारण खरोखरच होऊ शकते, कीं आपले
तारण आधीच झालेले आहे?
देवाने आपले तारण एकदाच
केलेले आहे
 
योहानाचें पहिलें पत्र 1:9 मघ्ये म्हटलें आहे ; "जर आपण आपलीं पापें पदरीं घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील."
पापांची क्षमा व्हावी म्हणून पापें कबूल करायची सोय असती तर किती छान होते असा विचार डोक्यांत भरवून धर्मशास्त्रांच्या जाणकारांनी नवीन शास्त्रलेखांची एक नवीनच कल्पना अस्तित्वांत आणली. एखादा मनुष्य जेव्हां जेव्हां त्याचे पाप कबूल करतो त्या त्या वेळी त्याला त्याच्या पापांची क्षमा केली जाते अशा प्रकारची मते ते ठामपणे बोलतात. हे किती सोईस्कर आहे नाही का? पण येशूने तर असं कधीच म्हटले नाही कीं देवासमोर आपली पापें आपण कबूल केली कीं आपल्या पापांची क्षमा केली जाते.
आपली पापें कबूल करण्याने आपली खरंच क्षमा होते का, कीं आपले तारण आधीच झालेले आहे? तुम्ही कशावर विश्वास ठेवता? खोटट्या शास्त्रलेखांचा प्रचार करणारे म्हणतात कीं प्रत्येक वेळी पापें कबूल केली की क्षमा केली जाते. पण खरं म्हणजे त्यांच्या अंतःकरणांत पाप असतेच याचे कारण हेच कीं, त्यांना तारणाचे खरे शब्द माहित नसतात. जे पापी येशूवर विश्वास ठेवतात त्यांनी जर त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली तर त्यांच्या रोजच्या अपराधांची क्षमा केली जाते असं म्हणण्यांत अर्थ नाही.
याच कारणास्तव तारणासंबंधी येशूचे जे शब्द आहेत त्या शब्दांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि खरे काय व खोटे काय ह्रातील भेद समजून घेतला पाहिजे.
योहानाचें पहिलें पत्र 1:9 या वचनाबद्दल पापी लोकांची खूप गैरसमजूत आहे. त्यांना वाटते कीं रोजच्या पापांसाठी क्षमा मागितली पाहिजे यासाठीं हे वचन आहे. आपण हे वचन आता काळजीपूर्वक वाचू या. "जर आपण आपलीं पापें पदरीं घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील." तुम्हांला काय वाटते कीं आपण फक्त आपल्या पूर्वीच्या पापांपासून मुक्त झालेलो आहोत आणि म्हणूनच रोज घडणारी पापें आपण कबूल केलीच पाहिजे की तर देव विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून क्षमा करील? हे सर्व दिशाभूल करणारे विचार आहेत. असे विचार देहाच्या अशक्तपणामुळे येतात.
जेव्हां आपण येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त ह्रावर विश्वास ठेवतो तेव्हां आपल्याला समजते की असे विचार व त्याचे वधस्तंभावरील रक्त याच्यामुळे सर्व पापें आधीच धुतलेली आहेत.
पवित्र आत्म्यानुसार विश्वास धरणे आणि दिशाभूल करणा­या विचारांप्रमाणे विश्वास धरणे या दोन गोष्टींत खूप भिन्नता आहे. जे स्वतःच्या विचारांनुसार विश्वास ठेवतात त्यांना त्यांची पापें रोज धुण्याची गरज वाटते. पण जे पाणी व रक्ताच्या तारणावर विश्वास ठेवतात त्यांना माहित असते कीं येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आणि त्याचे रक्त याच्या द्वारें त्यांची एकदाच पापमुक्ति झालेली आहे.
तारण होण्यासाठीं दररोज पापें कबूल केली पाहिजे असं समजणारे लोक प्रत्यक्षांत येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त याच्याद्वारे होणा­या तारणावर विश्वास न ठेवण्याचे पाप करीत असतात.
येशूच्या बाप्तिस्मा आणि त्याचें रक्त याच्या द्वारें तुमचे तारण एकदाच झालेले आहे का? ज्यांचे तारण झालेले नाही ते लोक दररोज त्यांची पापें कबूल करून स्वतःचा उद्धार होण्यासाठीं आटापिटा करतात. त्यामुळें भविष्यकाळांत ते लोक जी पापें करणार आहेत त्याची समस्या रहातेच.
कदाचित ते भविष्यकाळातील त्यांची पापें सुद्धां अगाऊ पद्धतीने कबूल करण्याचा प्रयत्न करतील. पण असं करतांना ते येशूवरील त्यांचा अविश्वास प्रगट करतात. ते लोक तारणाच्या सुवार्तेसाठी आंधळे झालेले असतात. येशूनें त्याचा बाप्तिस्मा व रक्त याच्याद्वारें आपले एकदाच तारण केलेले आहे. येशूवर केवळ विश्वास ठेवण्याने आपण पापमुक्त होतो.
तारण होण्यासाठीं तुम्ही तुमची भविष्यकाळातील पापें सुद्धां कबूल करायला हवी असा जर तुम्ही विचार करीत असाल तर पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या बाबतीत अज्ञानी व अविश्वासू असलेल्या लोकांपेक्षां तुम्ही अजिबात वेगळे ठरत नाही. पापें कबूल करण्याने पापी लोकांचे तारण होऊ शकत नाही.
म्हणूनच तुम्ही जर प्रामाणिकपणाने असं म्हटलें, "मी पापी आहे आणि माझें अजूनहि तारण झालेले नाही." आणि त्यानंतर येशूचा बाप्तिस्मा व त्याचा वधस्तंभावरील मृत्यु याची सुवार्ता ऐकून तुम्ही विश्वास ठेवला तर देव तुम्हांला सर्व पापांपासून मुक्त करील.
पण जर तुम्ही तारणाच्या सुवार्तेवर विश्वास न ठेवता पश्चात्तापाच्या प्रार्थनेमागे लपण्याचा प्रयत्न केला तर येशू जेव्हां न्याय करण्यासाठीं या जगांत येईल तेव्हां एक भयंकर न्यायनिवाडट्यास तुम्हांला सामोरे जावे लागेल.
जे लोक पाणी व आत्म्याच्या सुवार्तेने होणा­या तारणावर विश्वास ठेवत नाहीत त्यांचा न्याय केला जाईल. पापें कबूल करण्याच्या मागे ते लपले तर त्यांना न्यायनिवाडट्यास सामोरे जावे लागेल. म्हणूनच न्यायाच्या दिवसापर्यंत तुम्ही वाट पाहू नका. पाणी व आत्म्याच्या आशीर्वादित सुवार्तेवर आताच विश्वास ठेवा.
 
 
पापें कबूल करण्याची योग्य पद्धत आणि खरा विश्वास
 
पापी लोकांसाठी पापें कबूल करण्याची
योग्य पद्धत काय आहे?
त्यानें कबूल केले पाहिजे की त्यानें जर ख­या सुवार्तेवर
विश्वास नाही धरला तर त्याच्या ह्मदयांत पाप
रहाते आणि त्यामुळे तो
नरकांत जातो.
 
देवाने आपले तारण एकदाच केलेले आहे. मी जे कांही सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते तुम्हांला समजावे म्हणून नी एक उदाहरण देत आहे. असं समजा की उत्तर कोरियाचा एक हेर दक्षिण कोरियांत आलेला आहे. तो येऊन पहातो तो त्याला समजते कीं त्याला फसवले गेलेले आहे कारण दक्षिण कोरियाचे लोक तर चांगलेच भरभराटीला आलेले जीवन जगत आहेत. मग तो हेर हेरगिरीचा धंदा सोडून पोलिसकडे जाऊन शरण व्हायचे असे ठरवतो.
जवळच्याच पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर तो अशा प्रकारे कबूली देण्याची शक्यता आहे, `मी उत्तर कोरियाचा हेर आहे," किंवा "मी अमूक अमूक माणसाचा खून करण्यासाठीं दक्षिण कोरियांत आलेलो आहे, आणि अमूक अमूक ठिकाण मी बॉम्बनें उडवणार होतो, आणि तमूक ठिकाण मी आधीच बॉम्बने उडवलेले आहे, पण आता मी हे सर्व सोडून देऊन तुम्हांला शरण आलो आहे. म्हणूनच येथून पुढे मी हेर नसणार."
कबूली देण्याची ही काय योग्य पद्धत आहे काय? त्याला कबूली खरच द्यायची होती तर त्यानें नुसते एवढंच म्हणायच होत, "मी हेर आहे" या साध्या वाक्यांत सर्व कांही येतेः म्हणजे तो मनुष्य वाईट आहे आणि त्याचा न्याय झाला पाहिजे. जरी तो मनुष्य वाईट कामासाठी आलेला होता तरी त्याच्या एका साध्या वाक्यानें त्याला माफी मिळू शकते.
त्याचप्रमाणे एखादा पापी मनुष्याने जर अशा पद्धतीने देवासमोर कबूली दिली "हे देवा, माझें अजूनहि तारण झालेले नाही. माझा न्याय होऊन नरकांत टाकले जाण्याइतका मी पापी आहे. कृपा करून तूच मला वाचव." आणि नंतर त्यानें येशूवर विश्वास ठेवला तर त्याचें तारण होईल. येशूनें बाप्तिस्मा घेऊन आपल्यासाठीं त्याचे रक्त सांडले आणि आपण फक्त ह्रा तारणकार्यावर विश्वास ठेवण्याचे काम करायचे आहे.
प्रकटीकरण 2;17 मध्ये म्हटलें आहे, "आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खडट्यावर नवें नांव लिहिलेलें असेल, तें तो खडा घेणा­याशिवाय कोणालाहि ठाऊक होणार नाहीं." बायबल म्हणते की जो कोणी खरी सुवार्ता स्वीकारतो त्यालाच येशूचें नांव ठाऊक होईल. ज्याचे एकदाच तारण झालेले आहे त्यालाच नीतिमान बनण्याचे रहस्य माहित असते.
ज्याला हे रहस्य माहित नसते तो मनुष्य दररोज पश्चात्तापाच्या प्रार्थना करूनसुद्धां पापीच रहातो. पापाची कबूली देणे याचा अर्थ असा नाहीं कीं पापक्षमेसाठीं रोज प्रार्थना करायला हवी. एखादा मनुष्य 10 वर्षे ख्रिस्ती असेल आणि देवानें त्याच्या पापांची क्षमा करावी म्हणून तो दररोज प्रार्थना करीत असेल तर तो पापीच ठरतो. कारण तो देवाचा मुलगा झालेला नसतो.
तारण होण्यासाठीं त्यांनी ते पापी आहेत असं कबूल करून येशूच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवायचा एवढंच फक्त करायचं आहे. हाच खरा विश्वास आहे.
 
 
पापांची कबूली देणे म्हणजे स्वतःच्या पापांची यादी
देणे असं कांही योहानाचें पहिलें पत्र 1:
9 हे शास्त्रवचन सांगत नाही
 
आपण आपली पापें रोज कबूल
करायला पाहिजे की आपलें एकदाच
तारण व्हायला पाहिजे?
आपले एकदाच तारण व्हायला
पाहिजे.
 
एखादा चोर आणि एखादा खूनी त्यांची वाईट कृत्यें कबूल करण्याने पापमुक्त होऊ शकतात का? केवळ पापांची कबूली देण्याने पापी लोक पापमुक्त होऊ शकत नाहीत. येशूच्या ठायीं पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादित सुवार्तेनेच त्यांचे तारण होऊ शकते. कांही दिशाभूल झालेले ख्रिस्ती पापांची कबूली साधारणपणे अशी देतात.
"हे देवा, मी कोणाशी तरी भांडण केले, मी आज पाप केले. मी कोणालातरी फसवले. मी कोणाचीतरी चोरी केली."
जर त्यांनी ही बडबड अशीच चालू ठेवली तर देव म्हणेल, "अरे पाप्या, तूं चूप बस! ही अशी पापें तू केलीस तर त्यांत काय नवल!
"हे देवा, कृपा करून तूं माझे ऐक. तूंच आम्हांला पापें कबूल करण्यास सांगितले आहेस. मी तुझ्या दयेची भीक मागत आहे."
ही अशा प्रकारची प्रार्थना ऐकण्याची देवाला अजिबात इच्छा नाही आहे. जे लोक पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात त्यांचीच प्रार्थना देवाला ऐकायला आवडतेः जे लोक स्वतःची पापें कबूल करून नव्यानें जन्म घेण्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात अशा लोकांची प्रार्थना.
ऑगस्टीन म्हणाला होता की त्याच्या मातेंचे दूध प्याल्यामुळें त्याला पश्चात्ताप झाला! त्याला वाटलें कीं अशा प्रकारच्या पश्चात्तापानें तो स्वर्गाच्या राज्यांत जाईल. आपण ह्रावर हसण्याखेरीज दुसरं कांही करू शकत नाही. स्वतःची पापें नुसती कबूल करण्यांत कांही फायदा नाही.
देवा म्हणतो, "चूप बस. तूं पाप केलेले आहे की नाही एवढच मला सांग. जर केले असशील तर त्याबद्दल जास्त बोलू नकोस. तूं आतापर्यंत चुकीचा विश्वास ठेवत आलेला आहेस, ज्या ठिकाणी सत्यज्ञान शिकवले जाते अशा चर्चला तूं जा आणि तारणाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून पापमुक्त हो. जर तूं पापमुक्त झाला नाहीस तर मी येऊन तुझा न्याय करीन."
क्षमा होण्यासाठीं पश्चात्तापाच्या प्रार्थना करणे आणि कन्फेशनच्या द्वारे पापमुक्त होण्याचा प्रयत्न करणे हे सर्व दिशाभूल करणा­या चुकीच्या विश्वासाचे निदर्शक आहेत.
योहानाचें पहिलें पत्र 1:9 ह्रा शास्त्रवचनांत लिहिलेले आहे कीं जेव्हां आपण आपली सर्व पापें कबूल करतो तेव्हां पाणी व रक्ताची सुवार्ता आपल्याला पापमुक्त करते.
 
 
"माझ्यापुढून निघून जा"
 
अनाचार करणारे याचा
अर्थ काय आहे?
स्वतःच्या ह्मदयांत पाप असतांना येशूवर विश्वास
ठेवतात ते लोक अनाचारी असतात असा
या शब्दाचा अर्थ आहे.
 
दिशाभूल करणारा विश्वास बाळगणारे ख्रिस्ती पापी लोक येशूसमोर अनाचार करणारे असतात. "त्या दिवशीं पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नांवानें संदेश दिला, तुझ्या नांवानें भुतें घालविलीं, व तुझ्या नांवानें पुष्कळ महत्कृत्यें केलीं नाहींत काय? तेव्हां मी त्यांनी स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधींच ओळख नव्हती; अहो अनाचार करणा­यांनो माझ्यापुढून निघून जा." (मत्तय 7:22-23).
अशी कल्पना करा कीं खोटट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा माणूस मरतो आणि देवासमोर येऊन म्हणतो, मी खाली असताना माझ्या कल्पनाचित्रांत तूं नेहमीच सुंदर असे पण आता वर येऊन पहातो तर तुझें रूप जास्तच मनोहारी आहे. परमेश्वरा तूं माझें तारण केलेस म्हणून मी तुझा आभारी आहे. माझ्या ह्मदयांत पाप असतांना सुद्धां तूं माझ्याकडे निष्पाप म्हणूनच पाहिले, असा माझा विश्वास आहे. तूं मला स्वर्गांत घेऊन जाण्याचे वचन दिले होते म्हणूनच मी येथे आलो आहे. तेथे त्या बाजूला फुलांना खूप बहर आलेला दिसत आहे मी आता तेथेच जातो. गुड बाय देवा, मला आशा आहे की आपली परत भेट होईल.
तो बागेच्या दिशेने चाललेला असतांना येशू त्याला थांबवतो, "अरे थांब! ह्रा माणसाच्या ह्मदयांत पाप आहे की नाही ते पाहू. तूं पापी आहेस का?"
"होय, माझ्यांत पाप आहे. पण मी तुझ्यावर विश्वास नाही का ठेवला?"
"माझ्यावर विश्वास ठेवून सुद्धां तुझ्यांत पाप आहे?"
"होय, माझ्यांत खात्रीने पाप आहे."
"काय? तुझ्यांत पाप आहे? ते जीवनाचे पुस्तक आण बरे. आणि ब­या वाईट कामांचे पुस्तक आहे ते पण आण. ह्राचे नांव आपण पाहू. कोणत्या पुस्तकांत ह्राचे नांव लिहिलेले आहे?" त्या माणसाचें नांव खात्रीपूर्वक कोठे लिहिलेले आहे हे सांगायचे म्हटले तर ते ब­यावाईट कामांची नोंद केलेल्या पुस्तकांत आहे.
"पृथ्वीवर तूं जी कांही पापें केलीस ती आता तूं कबूल कर."
तो मनुष्य ती पापें कबूल न करण्याचा प्रयत्न करतो पण देव त्याला जबरदस्तीने त्या मनुष्याचें तोंड उघडून त्याची पापें त्याला कबूल करायला लावतो.
"होय, मी अमूक अमूक पापें केली होती..." गोधळून गेल्यामुळे तो मनुष्य त्याचें तोंड बंद करू शकत नाही.
"ठीक आहे, आता बोलणं बंद कर. नरकांत प्रवेश मिळण्याइतकी पापें ह्रा मनुष्यानें केलेली आहेत. तेथे जायला तो पात्र आहे. त्या ज्वालाग्नीच्या ठिकाणीं त्याला पाठवून द्या."
त्या मनुष्याला जेथे फुलांना बहर येतो अशा जागी न पाठवता गंधकाग्नीच्या जागी पाठवले जाते. नरकाकडे नेले जात असतांना तो रडत दात खात रहातो.
"मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्या नांवाने संदेश दिला, तुझ्या नांवाने उपदेश केला, तुझी सेवा करण्यासाठीं मी माझे घर विकले, अनाथांना मदत केली, तुझ्या नांवानें मी खूप सहन केले, संध्याकाळी प्रार्थना केल्या, आजा­यांना मदत केली "मी स्वर्गांत जाण्यासाठींच लायक आहे."
असं म्हणत तो त्याचे दात इतके खातो कीं खाण्यासाठी ते शिल्लक रहात नाही! जेव्हां तो नरकांत येतो तेव्हां त्याला येशूच्या ठायीं होणा­या तारणाचा अर्थ न समजलेले अनेक ख्रिस्ती लोक भेटतात. जे लोक तारणाच्या सुवार्तेबद्दल गैरसमज करतात त्या सर्वांचा येशूकडून त्याग केला जातो.
 
 
ब­यावाईट कामांची नोंद केलेल्या पुस्तकांत खोफ्ट्या विश्वासू मंडळींची पापें लिहिलेली असतात
 
 
सर्व पापी लोकांची
पापें कुठे लिहिलेली आहेत?
त्यांच्या ह्मदयपटांवर आणि ब­यावाईट कामांची
नोंद केलेल्या पुस्तकांत.
 
आपण येशूवर विश्वास ठेवो अगर न ठेवो, ज्यांच्या अंतःकरणांत पाप आहे त्या सर्वांचा देवाकडून नाश होतो. एखाद्याच्या ह्मदयांत पापाचा थोडासा कण जरी देवाला दिसला तरी देव त्याला न्यायाच्या दिवशीं नरकांत पाठवतो. आमचे अजूनपर्यंत तारण झालेले नाही अशी कबूली पापी लोकांनी द्यावी आणि त्यांनी तारण होण्याची इच्छा दर्शवावी हीच देवाची इच्छा आहे.
पापी लोकांची पापें त्यांच्या ह्मदयपटांवर लिहिलेली असतात. पाणी व आत्म्यापासून ज्यांचा जन्म नव्यानें झालेला असतो त्यांना त्यांची पापें आठवत असली तरी त्यांच्या ह्मदयपटांवरून ती खोडून टाकलेली असतात. ते नीतिमान असतात.
पण ज्यांचा जन्म नव्यानें झालेला नसतो त्यांच्या ह्मदयांत पाप असते. म्हणूनच ते लोक देवासमोर पापी असतात. ज्या ज्या वेळीं गुडघे टेकून ते प्रार्थना करतात त्या त्या वेळी त्यांची पापें मध्येच येऊन त्यांना देवापासून वेगळे करतात त्यामुळे देवाला त्यांची प्रार्थना ऐकू येत नाही. ते अनेक गोष्टींबद्दल प्रार्थना करतात, तरीसुद्धां त्यांचे पाप त्यांच्यापाशीच असते. पूर्वी कधी केलेल्या अपराधांची म्हणजे 10 वर्षापूर्वी, 11 वर्षापूर्वी, इतकेच काय पण 20 वर्षापूर्वी केलेल्या अपराधांची आठवण करून त्याचा पश्चात्ताप करीत बसण्यांत त्यांचा शेवट होतो.
परत परत पश्चात्ताप करून प्रार्थना करण्याची त्यांना खरच जरूर आहे का? ते असं कां वागतात? तसं करावे अशी त्यांची इच्छा नसते पण प्रार्थना करायला सुरूवात केली कीं त्यांना देवासमोर आपण अपराधी आहोत असं वाटायला लागते. म्हणून मग त्यांना वाटते की प्रार्थना सुरू करायच्या आधी त्यांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप करून क्षमा मागितली पाहिजे.
देवानें त्यांची पापें लोखंडी पेनने त्यांच्या ह्मदयपटांवर लिहिलेली आहेत त्यामुळें ती कधीच खोडली जाऊ शकत नाही. त्याचा परिणाम हा होतो की त्यांना देवासमोर आल्यावर आपण पापें कबूल केली पाहिजे अशी जाणीव होते. म्हणूनच येशूचा संपूर्ण सुवार्तेवर विश्वास ठेवण्याऐवजी अध्र्या सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांचा शेवट नरकांत होतो.
यिर्मया 17:1 मध्ये म्हटलें आहे, "यहूदाचें पातक लोखंडी खचरणीनें, हिरकणीच्या टोकानें लिहिलें आहे, त्यांच्या ह्मदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगावर खोदिलें आहे." यहूदा हे नांव राजे लोकांच्या वंशातील नांव आहे असं इस्त्राएलचे लोक समजत असत. बायबलप्रमाणे यहूदा म्हणजे संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करणारा असा अर्थ होतो. म्हणजेच यहूदा याचा अर्थ सर्व लोक असाहि करता येतो.
यहूदाचे पातक लोखंडी लेखणीनें, हिरकणीच्या टोकानें लिहिलें आहे. हिरकणीने स्टील सहज कापले जाते. लोखंडी लेखणीनें, हिरकणीच्या टोकानें आपली पापें लिहिलेली आहेत.
एकदा लिहिल्यानंतर ती खोडता येत नाही. जोपर्यंत आपण पाणी आणि आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ती पातकें खोडली जाऊ शकत नाहीत.
ख्रिस्ती शास्त्रलेखांवर विश्वास ठेवण्याने, धर्मशास्त्रे तोंडपाठ करण्यानें आणि चर्चमध्ये पुष्कळ वेळ खर्च करण्याने सुद्धां त्यांच्या ह्मदयांत पापें तशीच रहात असतील तर त्यांचे तारण होण्यांत अर्थ नसतो.
येशूच्या बाप्तिस्म्याखेरीज त्यांची पापें खोडली जाऊच शकत नाहीत म्हणूनच पापी लोकांना त्यांच्या पापांची आठवण येऊन ते म्हणतात, "परमेश्वरा, मी पापी आहे." देवाच्या सहवासांत रहाता यावे म्हणून चर्चच्या कामांच्या जबाबदा­या घ्यायच्या, शास्त्रलेख व धर्मशास्त्रांचे अध्ययन करायचे असा कितीहि जरी प्रयत्न त्यांनी केला तरी त्यांच्या ह्मदयांत पाप तसेच राहिलेले असते.
म्हणून मग ते पर्वतांवर जातात, निराळ्या भाषेंत बोलण्याचा प्रयत्न करतात, पेटलेल्या ज्वालांची द्दष्टांते पहाण्याची अपेक्षा करतात, पण हे सर्व व्यर्थ आहे. जर तुमच्या ह्मदयांत पाप असेल तर तुम्हांला कधीच शांती मिळणार नाही.
यिर्मया 17:1 मध्ये लिहिल्याप्रमाणें आपली पातकें वेद्यांच्या शृंगांवर खोदिलेली असतात. स्वर्गामध्ये जीवनाचें पुस्तक आणि चांगल्यावाईट कामांची नोंद केलेले पुस्तक असते. पापी लोकांची पापें ह्रा दुस­या पुस्तकांत नमूद केलेली असतात. आणि म्हणूनच पापी लोकांना त्यांच्या अपराधांपासून कोणतीच पळवाट नसते. देव आपली पापें पुस्तकांत व आपल्या ह्मदयपटांवर लिहून त्याच्या नियमशास्त्राद्वारें ती आपल्याला दाखवून देतो.
येशूचा बाप्तिस्मा आणि त्यानें आपल्यासाठी ओतलेले त्याचें रक्त याच्यावरील विश्वासा द्वारे ती पापें पुसून आपण आपली पाटी कोरी ठेवली पाहिजे, आणि पापमुक्त व्हायला पाहिजे. मगच आपण सार्वकालिक जीवनासाठी होऊन पात्र आपली नांवे जीवनाच्या पुस्तकांत लिहीली जातात.
 
 
तुमचे नांव जीवनाच्या पुस्तकांत आहे का?
 
जीवनाच्या पुस्तकांत कोणाची
नांवे लिहिलेली आहेत?
ज्यांच्या अंतःकरणांत पाप नाही त्यांची
नांवे लिहिलेली आहेत.
 
जीवनाच्या पुस्तकांत तुमचे नांव लिहिलेले असणे हे फार महत्त्वाचे आहे. तुमचें नांव त्यांत नसेल तर येशूवर विश्वास ठेवण्यांत काय अर्थ आहे? तुमचें खरे तारण होण्यासठीं, नव्यानें जन्म घेण्याच्या पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे.
येशू ह्रा जगांत आला होता. तो 30 वर्षाचा असतांना जगाची पापें घेऊन जाण्यासाठीं त्याचा बाप्तिस्मा झाला, आणि आपल्याला पापमुक्त करण्यासाठीं तो वधस्तंभावर मरण पावला. मत्तय 3;15 मध्ये लिहिले आहे कीं "ह्रा प्रकारे" येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्याला वधस्तंभावर खिळले गेले. आपली नांवे जीवनाच्या पुस्तकांत लिहिली जावी म्हणून आपण येशूच्या ह्रा तारणकार्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.
मेल्यानंतर लोक जेव्हां देवासमोर उभे रहातात तेव्हां देव म्हणतो, "ह्रा मनुष्याचें नांव जीवनाच्या पुस्तकांत आहे का ते पहा बरे."
"होय परमेश्वरा, ते आहे."
"होय, तूं पृथ्वीवर असतांना माझ्यासाठीं खूप अश्रू ढाळून पुष्कळ छळ सहन केलास पण आता तुला असं कधीच करावे लागणार नाही अशी मी तुला खात्री  देतो."
अशा मनुष्याला देव नीतिमत्त्वाचा मुगूट देतो.
"परमेश्वरा, मी निरंतर तुझा आभारी आहे."
"दूतहो, ह्राच्या मस्तकावर मुगूट ठेवा."
"परमेश्वरा, तूं माझे तारण केलेस एवढेच मला खूप आहे. हा मुगूट माझ्यासाठी फार जास्ती आहे. माझें तूं तारण केलेस म्हणून मी तुझें खूप खूप आभार मानतो. तुझ्या सहवासांत रहाणे ह्रांतच मला समाधान आहे."
"दूतहो, गुडघे टेका आणि माझ्या 10,000 नंबरच्या माझ्या मुलाला तुमच्या पाठीवर उचलून घ्या"
देवदूत "होय" अस उत्तर देऊन त्या मनुष्याला म्हणतात,
"कृपा करून माझ्या पाठीवर बस."
"हे खूपच आरामशीर आहे. पण मी हे ठीक करतोय का? चला तर आपण जाऊ"
देवदूत खूप अलगद पावले टाकीत चालतो.
"तुम्हांला येथे फिरायला आवडेल का?"
"वा! हे ठिकाण फारच सुंदर आहे. ही जागा किती मोठी आहे?"
"मी ह्रा जागेंत अब्जावधी वर्षे फिरत आहे पण मला अजूनहि ह्रा जागेचा शेवट कोठे होतो ते ठिकाण सापडलेले नाही."
"खरोखरच हे खरं आहे का? माझे वजन तुला भारी झाले असेल तर मला आता तूं खाली उतरवू शकतोस."
"या ठिकाणीं आमची शक्ती कधीच संपुष्ठांत येत नाही."
"मी तुझा खूप आभारी आहे पण स्वर्गाच्या राज्यांत मला जमिनीवर उभे रहाण्याची इच्छा आहे. माझ्या आधी जी नीतिमान माणसें या ठिकाणीं आली ती सर्व कुठे आहेत?"
"ती त्या ठिकाणीं आहेत."
"तर चल, आपण तेथे जाऊ."
हालेलूया! त्यानंतर सर्व मंडळी हसतमुखाने एकमेकांना मिठट्या मारून, सार्वकालिक जीवन हर्षांने जगतात.
येशूवर विश्वास ठेवत असलेला पण अजूनहि पापीच आहे असा माणूस मेल्यानंतर देवासमोर उभा आहे अशी कल्पना करा.
देव म्हणतो, "ह्रा माणसाचें नांव जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेले आहे का ते पहा बरे."
"परमेश्वरा, त्याचे नांव तेथे नाही आहे."
"तर मग ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे असलेल्या पुस्तकांत त्याचें नांव आहे का ते पहा."
"त्याचें नांव आणि त्याची पापें त्या पुस्तकांत आहेत."
"तर मग पेट्रोलचा व जळणाचा खर्च किती होतो याची काळजी त्याला करावी लागणार नाही अशा ठिकाणीं त्याला पाठवा. आणि त्याला कायम तेथेच राहू द्या."
"अरे देवा! हा अन्याय आहे..."
त्याला वाटते की तो अन्याय आहे. येशूवर त्याचा पुष्कळ विश्वास असतांना सुद्धां त्याला नरकांत कां पाठवले?
याचे कारण म्हणजे सैतानाचे त्याला फसवले आणि त्यानें सुवार्तेचे फक्त अर्धसत्य ऐकले होते. येशूच्या तारणकार्याच्या ख­या अर्थाबाबतीत आपण गैरसमजांत राहिलो तर आपण सुद्धां नरकांत जाऊ.
ह्रा माणसानें येशूवर विश्वास ठेवला होता तरीसुद्धां सैतानानें त्याची फसवणूक केल्यामुळें तो स्वतःला पापी समजत होता. जर त्याने खरी सुवार्ता ऐकली असती तर त्याला कळून चुकले असते की त्याचा विश्वास चुकीचा आहे. पण कुठेतरी त्याचा अंधविश्वास आणि त्याची स्वतःची घमेंड यामुळे तो खरा द्दढविश्वास ठेवण्यांत असफल झाला होता.
तुम्हांला जर स्वर्गाच्या राज्यांत जायची इच्छा असेल तर पाणी व आत्म्यापासून नव्याने जन्म घेण्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. मत्तय 3:15 मध्ये लिहिलें आहे की "ह्रा प्रकारें" येशूनें जगाची सर्व पापे स्वतःकडे घेतली. पाणी व रक्तापासून होणा­या तारणावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे.
 
ब­यावाईट कृत्यांची नोंद असलेल्या
पुस्तकांत कोणाची नांवे लिहिलेली
असतात?
ज्यांच्या अंतःकरणांत पाप आहे त्यांची
नांवे लिहिलेली असतात.
 
कशावरहि विश्वास ठेवायचा आणि कोणाचीहि विनंती अमान्य करायची नाही असा चांगला स्वभाव असल्यासारखे तुम्ही जर वर्तन केले तर नरकांत जाण्यामध्ये तुमचा शेवट होईल. असे चांगल्या स्वभावाचे पुष्कळ लोक नरकांत आहेत. पण स्वर्गांत तुम्हांला लढवय्ये पहायला मिळतील कारण ज्या कारणांवर त्यांनी विश्वास ठेवला त्या कारणांसाठी त्यांना खूप लढाया कराव्या लागल्या होत्या.
जे स्वर्गांत आहेत त्यांना माहित होते कीं ते नरकांत जाण्याच्या लायकीचे पापी होते पण येशूचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त ह्राच्यावर त्यांनी विश्वास ठेवल्यामुळे त्यांची सर्व पापें धुतली गेली.
असं म्हणतात कीं स्वर्गांत फक्त तोंडें आणि कान आहेत. याचे कारण पुष्कळ लोक येशूच्या तारणावर फक्त कानांनी व तोंडांनी विश्वास ठेवतात. म्हणूनच देव त्यांचे उरलेले देह गंधकाच्या अग्नींत टाकून देतो.
कल्पना करा कीं येशूवर विश्वास ठेवून स्वतःच्या अंतःकरणांत पाप बाळगणारा माणूस देवासमोर उभा राहून म्हणतो, "माझ्या ह्मदयांत पाप असतांना सुद्धां मी येशूवर विश्वास ठेवला होता म्हणूनच लोक मला नीतिमान म्हणत असत. माझा विश्वास आहे की तूं सुद्धां मला नीतिमान म्हणशील. मी तर असच ऐकले होते आणि माझा त्यावर विश्वास आहे. पुष्कळ लोक असाच विश्वास धरतात आणि मी तेथूनच आलो आहे."
देव उत्तर देतो, "ज्यांच्या अंतःकरणांत पाप आहे त्यांना मी माफ करू शकत नाही. पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादाने मी तुझी सर्व पापें धुतली होती. पण ह्राच्यावर विश्वास ठेवण्यास तूं नकार दिलास. देवदूतहो, ह्रा घमेंडी माणसाला नरकाच्या अग्नींत फेकून द्या."
जो मनुष्य येशूवर विश्वास ठेवूनसुद्धा त्याच्या ह्मदयांत अजून पाप आहे असा विचार करतो त्याचा शेवट नरकांत होतो. तारणाची खरी सुवार्ता तुम्ही ऐका आणि पापमुक्त व्हा. नाहीतर नरकाच्या अग्नींत तुम्ही जळून जाल.
स्वतःच्या ह्मदयांत पाप असतांनासुद्धां स्वतःला नीतिमान म्हणवून घेणे हे देवाला फसवण्यासारखे आहे. पापी मनुष्य व नीतिमान मनुष्य यांच्यातील फरक आपल्याला शेवटीच समजत असतो. तुम्ही पापमुक्त व्हावे असा आग्रह मी कां करीत आहे हे तुम्हांला नंतर समजेल.
जेव्हां तुम्ही स्वर्ग व नरक यांच्यामध्ये उभे रहाल तेव्हां, संपूर्ण तारणकार्यावर (येशूचा बाप्तिस्मा व त्याचा खांबावरील मृत्यु) विश्वास ठेवणारे व न ठेवणारे यांच्यातील फरक तुम्हांला दिसून येईल. त्याच्याने फार मोठा फरक पडेल. थोडे लोक स्वर्गाच्या राज्यांत जातील तर बाकीचे नरकांत जातील.
तुम्ही येशूवर विश्वास ठेवून अजूनहि पापी आहांत का? तर मग पाणी व आत्म्यापासून नवा जन्म घेतला पाहिजे हे तुम्हांला समजायला पाहिजे. ज्यांच्या ह्मदयांत पाप आहे त्यांना देव नरकांत पाठवत असतो. जे लोक संपूर्ण पापक्षमेवर विश्वास ठेवतात त्यांनाच स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश मिळू शकतो.
तुम्ही आताच पापमुक्त व्हा. काम तुम्ही पुढे ढकलले तर फार उशीर होईल. तुम्ही आधीच तयारींत रहा. नरकांत जाण्याच्या आतच पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून पवित्र व्हा.
प्रभु येशूच्या नांवाला गौरव असो. पापी लोकांना त्यानें नीतिमान केले या त्याच्या कृपेबद्दल आम्ही आभार मानतो. हालेलूया!
 
 
येशूः नीतिमान मनुष्याचा कैवारी
 
पश्चात्तापाची प्रार्थना
करून आपली पापें नाहीशी होऊ
शकतात का?
नाही. ते अगदी अशक्य आहे. आपल्याला
फसवण्यासाठी सैतानाची ती एड्ढ
चाल आहे.
 
योहानाचें पहिलें पत्र 2:1-2 मध्ये म्हटलें आहे, "अहो माझ्या मुलांनो, तुम्हीं पाप करू नये म्हणून हें मी तुम्हांस लिहितों. जर कोणीं पाप केलें, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे."
ह्रा ठिकाणी काय लिहिलेले आहे हे तुम्हांला समजते का? येथे असा कोणी आहे काय की तो विश्वास धरूनसुद्धां पापी ह्मदयाची आहे? तुमच्या ह्मदयांत पाप असतांना सुद्धां तुम्ही देवाला तसं कांही पाप नाही अस सांगत असाल तर तुम्ही देवाची आणि स्वतःची सुद्धां फसवणूक करता.
पण जर तुम्ही येशूला खरोखरच समजून घेऊन, त्यानें तुमची पापें धुण्यासाठी काय केले ह्रावर विश्वास ठेवला तर तुम्ही पापमुक्त व्हाल. मग तुम्ही असं म्हणू शकता, "प्रभो, तुझ्या ठायीं मी पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेतला आहे. आता माझ्यांत कोणतेच पाप नाही म्हणूनच तुझ्यासामोर मी न लाजता उभा राहू शकतो."
मग देव असं उत्तर देईल, "होय, तुझे म्हणणे बरोबर आहे. जसा अब्रााहामानें माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे तो नीतिमान झाला तसंच मी तुझी पापें धुतल्यामुळे तूं आता नीतिमान झाला आहेस."
पण जो मनुष्य ह्मदयांत पाप ठेवून येशूवर विश्वास धरतो त्याचा विचार करा. असा माणूस म्हणतो, "माझ्या अंतःकरणांत जरी पाप आहे तरी येशूवरील माझ्या विश्वासामुळे मी स्वर्गांतच जाणार आहे."
स्वर्गांत जाण्याचा त्याचा इतका हट्ट असतो कीं न्यायासनासमोर उभे रहाण्यासाठीं तो विरोध करतो पण शेवटी तो नरकांतच जाईल. कां बरे? कारण पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याची आशीर्वादित सुवार्ता त्याला माहिती नाही.
पृथ्वीवर असतांनाच प्रत्येकाने तो पापी आहे असं कबूल केले पाहिजे. "मी पापी आहे. मी नरकांत जाणार आहे. कृपया तूंच मला वाचव." पश्चात्तापाच्या प्रार्थनेने पापी माणसाचें तारण होत नाही. त्याऐवजी त्याने तो पापी आहे असं कबूल करून पापमुक्त होण्यासाठीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा स्वीकार केल्याने होतो. पाणी व आत्म्याद्वारें तारण होण्यानेच तो नीतिमान होऊ शकतो.
खोटी सुवार्ताच असं सांगत असते कीं येशूने तुमची पूर्वीची पापेंच फक्त धुतलेली आहेत आणि तारण होण्यासाठीं रोज घडणा­या पापांबद्दल पश्चात्ताप केलाच पाहिजे. अशा खोटट्या सुवार्तेवर विश्वास ठेवून पुष्कळ विश्वासू मंडळी नरकांत जात आहेत. हल्ली हा प्रकार फार जास्त प्रमाणांत दिसतो.
खोटट्या सुवार्तेला तुम्ही जर बळी पडला तर तुमच्या ते लक्षांत येईल का? तुमची सर्व कर्जे फेडली गेल्यावर तुम्ही कर्जदारच रहाता का? तुम्ही याबद्दल विचार करा. येशूवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःला पापी समजत असाल तर ते तुमचा विश्वास बरोबर आहे असं म्हणता येईल का? तुम्ही विश्वासू आणि पापी आहात, कीं तुम्ही विश्वासू आणि नीतिमान आहात?
तुम्हीच ही निवड करू शकता. तुमच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे असा विश्वास तुम्ही धरू शकता किंवा तुमच्या अपराधांबद्दल रोज पश्चात्ताप केला पाहिजे असा विश्वास तुम्ही धरू शकता. तुमचें स्वर्गांत किंवा नरकांत जाणे हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. खरी सुवार्ता सांगणा­या सुवार्तिकाचे बोलणे तुम्ही लक्ष देऊन ऐका.
जे लोक खोटट्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात ते रोज संध्याकाळच्या प्रार्थना सभेंत, बुधवारच्या मिटिंगमध्ये, शुक्रवारी सबंध रात्रभरच्या प्रार्थनेच्या वेळीं त्यांच्या पापांची क्षमा होऊन ती धुतली जावी म्हणून खूप प्रयत्न करतात.
"प्रभो, मी अपराध केलेले आहेत. गेल्या आठवडट्यांत मी पापें केली," असं ते म्हणतात. मग एकाएकी त्यांना खूप वर्षापूर्वीची पापें आठवतात आणि त्या पापांची क्षमा व्हावी म्हणून परत प्रार्थना करतात. असं वागणे, पाणी व आत्म्याच्या आशीर्वादित सुवार्तेचा अनादर राखण्यासारखे आहे.
आपल्या पापांची किंमत रक्तानेच दिली पाहिजे. इब्राी लोकांस पत्र 7:22 मध्ये म्हटलें आहे, "रक्त ओतल्यावांचून पापक्षमा होत नाहीं." तुम्ही जर विचार करत असाल कीं तुमच्यांत अजूनहि पाप आहे तर तुम्ही येशूला तुमच्यासाठी परत रक्त ओतायला सांगत आहांत काय? जे लोक संपूर्ण तारणकार्यावर विश्वास ठेवत नाहीत ते येशूचें तारणकार्य खोटे ठरवण्याबद्दल अपराधी ठरतात. वास्तव्यांत ते लोक म्हणतात कीं येशूने आपले तारण एकदाच केलेले नाही, तो खोटं बोलतो.
येशूच्या ठायीं तारण होण्यासठीं पाणी व आत्म्याने होणा­या ख­या तारणावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. सहस्त्र, हजारो किंवा लक्षवधि प्रार्थनांनी तुमच्या पापांची क्षमा होऊ शकेल का? खरी सुवार्ता आपले तारण एकदाच करते. नीतिमान व्हा, स्वर्गाच्या राज्यांत जा आणि नेहमीसाठी नीतिमत्त्वाचे जीवन जगा.
"♪मी येशूमध्ये नवजीवन जगत आहे. जुने ते संपले आहे. आणि मी नवा झालो आहे. वाया गेलेली वर्षे निघून गेली आहेत. येशू माझे खरे जीवन आहे. मी येशूठायीं नवजीवन जगत आहे♪"
तुम्ही येशूमध्ये नवजीवन जगत आहात. तुम्ही दिसायला आकर्षक असो वा नसो, तुम्ही बुटके असा किंवा तुमचे पोट सुटलेले असो, जे कोणी पाणी व आत्म्यामुळे नव्यानें जन्मलेले असतात ते सुखी जीवन जगतात. तुमचे नाक नीट आकाराचे नाही किंवा तुम्ही बुटके आहांत तर काय झाले? आपण सर्व अचूक असे बनलेलो नाही म्हणूनच येशूच्या ठायीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे आपले तारण झालेले आहे. पण जे गर्विष्ठ असतात ते नरकांत जातात.
प्रभो, मी तुझें आभार मानतो. मी नेहमीच देवाचें आभार मानतो. आपण पाणी व आत्म्याने नव्याने जन्म घेण्याबाबतीत विश्वास धरतो म्हणूनच स्वर्गांत आपले स्वागत केले जाईल.
 
 
असत्य आपल्याला नरकांत नेते
 
नीतिमत्त्वाचा मुगूट शेवटी
कोणाला मिळेल?
जो खोटेपणावर जय
मिळवतो त्याला.
 
असत्य आपल्याला सांगते की क्षमा होण्यासाठी रोज पश्चात्ताप करा, पण पाणी व आत्म्याची सुवार्ता आपल्याला सांगते की तुमच्या सर्व पापांची क्षमा आधीच झालेली आहे, आणि तुम्ही ह्राच्यावर विश्वास ठेवण्याचे एकच काम करा.
ह्रापैकी सत्य काय आहे? आपल्याला रोज पश्चात्ताप करायची जरूर आहे का? किंवा येशूनें आपले तारण व्हावे म्हणून त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आपली सर्व पापें स्वतःकडे घेतली ह्राच्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे? सत्य हे आहे कीं येशूनें आपली सर्व पापें एकदाच योग्यपद्धतीने नेऊन आपले तारण केले.
आध्यात्मिक युद्धामध्ये आपण असत्यावर जय मिळवलाच पाहिजे. पुष्कळ लोक असत्याच्या मार्गाने जातात.
"पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिहीः ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तरवार आहे तो असें म्हणतोः तूं कोठें राहतोस हें मला ठाऊक आहे, सैतानाचें आसन आहे तेथें." (प्रकटीकरण 2:12-13).
"जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यांतून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खडट्यावर नवें नांव लिहिलेलें असेल, तें तो खडा घेणा­याशिवाय कोणालाहि ठाऊक होणार नाहीं." (प्रकटीकरण 2:17).
ज्या ठिकाणी खूप वाईट, अशुद्ध आत्मे असतात आणि असत्य सत्याचा मुखवटा धारण करून उभे रहाते त्या ठिकाणीं सैतान एखाद्या चकचकीत देवदूता प्रमाणे तेथे येतो. जो कोणी पाणी व आत्म्याची सुवार्ता ऐकून सुद्धां तिच्यावर विश्वास ठेवत नाही त्याला देव कांही मदत करत नाही. अशा प्रकारचा माणूस नरकांतच जातो.
येशूच्या तारणकार्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय प्रत्येकाने स्वतःच घेतला पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवून पापमुक्त व्हावे यासाठीं कोणीहि तुमच्यापुढे गुडघे टेकून तुम्ही विश्वास ठेवावा यासाठीं भीक मागणार नाही.
पापमुक्त व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर पाणी व आत्म्याच्या तारणावर विश्वास ठेवा. तुम्हांला येशूच्या प्रेमामुळे व त्याने केलेल्या तारणाच्या कृपेमुळे आभारी वाटत असेल तर विश्वास ठेवा. जर तुम्ही नरकांत जाण्याच्या लायकीचे पापी असाल तर पाणी आणि आत्मा, येशूच्या बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील मरण ह्रा सर्वांवर विश्वास ठेवा मगच तुम्ही नीतिमान व्हाल.
तुम्ही जर पापी नसाल तर येशूवर विश्वास ठेवून तारण होण्याची तुम्हांला गरज नाही. फक्त पापी लोक पापी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्मण्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून पापमुक्त होतात. येशू पापी लोकांचा तारणकर्ता व दुःखी जनांचा स्नेही आहे. तो निर्माणकर्ता आहे. तो प्रेमाचा धनी आहे.
पाणी व आत्मा याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या सुवार्तेवर तुम्ही विश्वास धरावा अशी माझी नम्र विनंती आहे. तिच्यावर विश्वास ठेवा. मगच येशू हाच तारणकर्ता, मित्र, मेंढपाळ आणि देव आहे अशी तुमची खात्री होईल. पापी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. नरकांत जायची तुमची इच्छा नसेल तर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तारणाच्या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवावा म्हणून देव कांही भीक मागत नाही.
स्वर्गांत जायची तुमची इच्छा आहे का? तर मग पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याच्या सुवार्तेवर तुम्ही विश्वास ठेवा. येशू म्हणतो, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा." तुम्हांला नरकांत टाकले जावे, असं तुम्ही सांगत आहात का? तर असेल तर तुम्ही विश्वास ठेवू नका. येशू म्हणतो कीं त्यानें नरकांत तुमची जागा तयार ठेवली आहे.
देव भीक मागत नाही. व्यापारी लोक त्यांचा माल खपवण्यासाठीं भेदभाव करतात, पण देव स्वर्गाचे राज्य ज्यांचे तारण झालेले आहे त्यांना फुकट देतो. न्यायी आहे.
लोक म्हणतात कीं जगाचा शेवट जवळ आलेला आहे. होय, मी पण तसाच विचार करतो. अशा वेळी पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या सुवार्तेवर विश्वास न ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे.
पाणी व आत्म्याद्वारे नव्यानें जन्म घेण्याच्या आशीर्वादित सुवार्तेवर विश्वास ठेवा. आपण एकत्र स्वर्गाच्या राज्यांत जाऊ या. ज्या ठिकाणीं येशू रहात आहे त्या ठिकाणी तुम्ही माझ्याबरोबर नाही का येणार?
 
तुम्ही पापी आहांत की नीतिमान?
ज्याच्या ह्मदयांत पाप नाही असा
नीतिमान मनुष्य.
 
रोमकरांस पत्र 8:1-2 मध्ये म्हटलें आहे, "म्हणून ख्रिस्त येशूमध्यें असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्यानें तुला पाप व मरण ह्रांच्या नियमापासून मुक्त केलें आहे."
येशूनें त्याचा बाप्तिस्मा व खांबावरील मरण याच्याद्वारें आपली सर्व पापें नेली. ज्या पापी लोकांचा न्याय होणार होता त्या सर्वांचें त्यानें तारण केले.
देवाच्या तारणांत दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याचा नियम व दुसरे म्हणजे त्याचे प्रेम. देवाचे नियमशास्त्र आपल्याला सांगते की आपण पापी आहोत. नियमाप्रमाणे पापाचें वेतन मरण आहे. नियमशास्त्राने आपले तारण होत नाही. ते केवळ आपल्याला सांगते कीं आपण पापी आहोत.
पापाचे वेतन भरण्यासाठी येशू ह्रा जगांत आला होता, आणि स्वतःचे जीवन देऊन आपल्या पापांची किंमत त्यानें मोजली आणि न्यायनिवाडट्यापासून आपली सुटका केली. देवाच्या प्रेमाने आपल्याला पापमुक्त केले.
असत्यावर आपण जय मिळवला पाहिजे. जे असत्यावर जय मिळवतात त्यांना देव पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याचा आशीर्वाद देतो.
येशूवर विश्वास ठेवण्याने आपण पापमुक्त झालो. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याने आपण नीतिमत्त्व मिळवतो व आपल्याला सत्य समजते. पाणी व आत्म्याच्या द्वारें नव्यानें जन्म घेण्याच्या सत्यावर तुम्ही तुमच्या ह्मदयांत विश्वास ठेवा म्हणजे तुमचे तारण होईल.